PMC Election Department | आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर तात्काळ पक्षांच्या जाहिराती, बॅनर काढून टाकण्याचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Election Department | आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर तात्काळ पक्षांच्या जाहिराती, बॅनर काढून टाकण्याचे आदेश

| उपायुक्त चेतना केरुरे यांच्या सर्व विभागांना सूचना

PMC Election Department  – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने राज्यात लवकरच आदर्श आचार संहिता (Ideal Code of Conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यावर तात्काळ सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फ्लेक्स, बॅनर, पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश महापालिका निवडणूक विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

भारत निवडणूक आयोगाने निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आचार संहिता लागू होण्याच्या कालावधीत जाहिरातींच्या प्रकाशना संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना अधिक्रमित करून एकत्रित सूचना निदर्शनास आणल्या आहेत. पत्रातील सूचना सर्व सबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यांना सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्याबाबत कळविणेत आलेले आहे.

तसेच आदर्श आचार संहिता लागू झालेनंतर मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत आपले कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर / पेपर्स किंवा कटआऊट / होर्डिंग्ज / बंनर्स / झेंडे तसेच शासकीय बसेस वरील पक्षाच्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन बसस्टॅंड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, इलेक्ट्रीक / टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती इत्यादी निवडणुका जाहीर झाल्या नंतर काढून टाकणेबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी कळविले आहे. त्यानुसार आदर्श आचार संहितेचे पालन होणेकामी आपले स्तरावरावरून योग्य ती कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे.
—–

Illegal Hoardings | 31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस

| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती

पुणे | महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने महापालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबाबत गंभीर पाऊल उचलले आहे. 31 मे पर्यंत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्यात येणार आहेत. त्यानुसार आजपासून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.
शहरात 2629 अनधिकृत होर्डिंग आहेत. तर 2485 अधिकृत आहेत. तर 508 गुन्हे दाखल केले आहेत. तर जवळपास 75 लाखाची वसुली केली आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत होर्डिंग विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किआँक्स यांचेवर आज परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत १५ क्षेत्रीय कार्यालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये ५ क्रेन, ४० बिगारी सेवक, ०६ गँस कटर, ५ वेल्डर, या यंत्रसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करण्यात आला तसेच ज्यांनी विना परवाना जाहिरात होर्डिंग आणि बोर्ड लावले आहेत त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तसेच यापुढे अनधिकृत होर्डिंग, विना परवाना बोर्ड, बँनर, फ्लेक्स, झेंडे, पोस्टर, किऑक्स इ.
यावर परवाना व आकाशचिन्ह विभागाकडून निष्कासन कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

 | कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे
होर्डिंग  – 21
फ्लेक्स, बोर्ड, बॅनर 173
झेंडे – 13
पोस्टर – 21
किऑक्स – 15

एकूण – 239

Structural Audit | Hoardings | पुणे मनपा हद्दीतील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट 15 दिवसात सादर करण्याचे आदेश  | ऑडिट न केल्यास होर्डिंग अनधिकृत समजले जाणार 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे मनपा हद्दीतील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट 15 दिवसात सादर करण्याचे आदेश

| ऑडिट न केल्यास होर्डिंग अनधिकृत समजले जाणार

पुणे | कात्रज देहू रोडवरील किवळे येथे होर्डिंग कोसळल्याने काही जणांना जीव गमवावा लागला. यामुळे आता पुणे महापालिकेने याबाबत गंभीर पाऊल उचलले आहे. पुणे मनपा हद्दीतील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट 15 दिवसात सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. ऑडिट न केल्यास होर्डिंग अनधिकृत समजले जाणार असून त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांनी सांगितले.

आकाशचिन्ह परवाना विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील विविध ठिकाणी स्ट्रक्चरल इंजिनिअरने प्रमाणित केलेला दाखला सादर केल्यानंतरच होल्डिंग उभारण्यास संबंधितांना परवानगी देण्यात येते. तथापी, पुणे शहर व महानगरपालिका हद्दीच्या परिसरात हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठ्या
प्रमाणावर सोसाट्याचा वारा व अवकाळी पाऊस पडत असून पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तदनुषंगाने, हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस व नजीकच्या  पावसाळ्याच्या हंगामात पडणाऱ्या पावसाची शक्यता विचारात घेऊन जीवित, मालमत्ता हानी व वाहतुकीस अडथळा होऊ नये, याकरिता पुणे शहरातील परवानगी देण्यात आलेल्या सर्व होल्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट पुन्हा नव्याने करून घेणेस संबंधित होल्डिंगधारकास कळवून त्याप्रमाणे ऑडीट केल्याचा दाखला १५ दिवसात सादर करण्याचे आदेश खेमनार यांनी दिले आहेत.
खेमनार यांच्या माहितीनुसार महापालिका हद्दीतील स्ट्रक्चरल ऑडीट न केलेली सर्व होल्डिंग अनधिकृत समजून संबंधित महापालिका सहायक आयुक्त यांनी संबंधित होल्डिंगधारकास नोटीस देऊन तात्काळ काढून टाकण्याची कार्यवाही करायची आहे.

| अनधिकृत होर्डिंगवर सक्त कारवाई

खेमनार यांनी सांगितले कि, तसेच सर्व अनधिकृत होर्डिंगवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने, धोकादायक, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या होर्डिंगवर तातडीने कारवाई करायची आहे.  उप आयुक्त (आकाशचिन्ह परवाना विभाग) यांनी सदर कामकाजावर दैनंदिन नियंत्रण ठेऊन संबंधित सहायक आयुक्तांमार्फत नव्याने स्ट्रक्चरल ऑडीट केल्याचे प्रमाणित दाखला सादर न केल्यास अथवा यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडीट न केलेल्या होल्डिंग धारकांना देण्यात आलेल्या नोटीसा व त्यांचेवर प्रत्यक्ष करण्यात आलेली कारवाई याचा साप्ताहिक अहवाल अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे सादर करायचा आहे.