MNS : Raj Thackrey : मनसेचा वर्धापनदिन पुण्यात होणार साजरा  : राज ठाकरेंची तोफ धडाडणार 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसेचा वर्धापनदिन पुण्यात होणार साजरा 

: राज ठाकरेंची तोफ धडाडणार 

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींचा चांगलाच वेग प्राप्त झाला आहे. सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांचे दौरेही सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यानिमित्ताने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे  आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजनाला सुरुवात केली आहे. त्यातच उद्या ९ मार्चला मनसेचा वर्धापनदिन आहे. यंदा मनसेचा वर्धापनदिन पुण्यात साजरा होणार आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

मार्चच्या नऊ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रातून मनसेचा वर्धापनदिन जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत कार्यक्रम असतो. पण यंदा १६ वा वर्धापनदिन पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे. राज्यभरातून असंख्य मनसैनिक आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.

असा असेल राज ठाकरेंचा पुणे दौरा

९ मार्च – सकाळी ११ वाजताची वेळ भेटीगाठीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत यंदा १६ वा वर्धापनदिन शहरातील गणेश कला क्रीडा मंच येथे साजरा होणार आहे.

१० मार्च – सकाळी ११ वाजता पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहर कार्यालयाचे उदघाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

NCP Pune : Jayashree Marne : मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश  : शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील : प्रशांत जगताप 

Categories
Breaking News Political पुणे

मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश

: शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील : प्रशांत जगताप

पुणे : शहरात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर सुरू केले आहे. सर्वाधिक इनकमिंग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष या नात्याने  प्रशांत जगताप यांनी त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे स्वागत केले. यावेळी माजी उपमहापौर  दीपक मानकर, नगरसेवक  बाबुराव चांदेरे, मा. नगरसेवक बंडू केमसे, नगरसेवक सुभाष जगताप,  रुपालीताई ठोंबरे व  अभय मांढरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार, अजितदादा पवार व  सुप्रियाताई सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जयश्री ताई राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील.” असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

Anjaney Sathe : MNS : Congress : मनसेला खिंडार : मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसे नेते अंजनेय साठे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अंजनेय साठे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुंबई येथे टिळक भवनात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या युवा नेत्याचे स्वागत नाना पटोले यांनी पुष्पगुच्छ आणि काँग्रेसचे तिरंगी उपरणे देऊन केले. याप्रसंगी विधिमंडळ पक्षेनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सहप्रभारी सोनल पटेल, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आदी उपस्थित होते.

समाजकारण, राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणारे अंजनेय साठे यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी बांधिलकी मानली. त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.

अंजनेय साठे यांचे वडील डॉ. सुनील साठे आणि आई डॉ. अर्चना साठे हे दोघेही सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आहेत. अंजनेय साठे यांचे पणजोबा स्वर्गीय विनायकराव साठे हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सात वर्षे तुरुंगवास भोगला होता. कै.विनायकराव साठे यांनी तत्कालीन सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री पद भूषविले होते.

MNS : Vasant More : तुम्ही बसा देवळं फिरत; आम्ही पुण्याच्या हितासाठी आमच्या देवळात जाऊन आलो पण….. 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

तुम्ही बसा देवळं फिरत; आम्ही पुण्याच्या हितासाठी आमच्या देवळात जाऊन आलो पण…..

: मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरेंचा टोला

पुणे : प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीला वेग आला आहे. सर्व पक्ष आता हिरीरीने कामाला लागले आहेत. काही नेते पुण्याच्या हितासाठी देवदर्शन करत आहेत. यावरून मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी टोला लगावला आहे. मोरे आणि शहरातील मनसे नेत्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेटघेतली. त्याबाबत मोरे यांनी एक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, तुम्ही बसा देवळं फिरत आम्ही पुण्याच्या हितासाठी आमच्या देवळात जाऊन आलो पण…!
शहर मनसे ने आज राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे ने स्वबळवर निवडणूक लढणार आहे. तसे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मनसे चे नेते देखील कामाला लागले आहेत.
पहा काय आहे पोस्ट…

BJP : MNS : Upcoming Election : महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती नाही! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत भाजप-मनसे युती नाही!

: चर्चाना पूर्णविराम

पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आगामी निवडणुकीत मनसेशी युती नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजपा स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मनसेसोबत युती होणार नाही. हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही असंही पाटील यांनी सांगितले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.

 आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. त्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळेल. मात्र यात भाजपाला नव्या मित्राची गरज भासत असेल तर सर्वांच्या नजरा मनसे-भाजपा(BJP-MNS) युतीवर लागल्या होत्या. अनेक दिवस भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. परंतु आता याला पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबईत भाजपाचा महापौर होणार

मागील वेळी मुंबईत आमचा महापौर झाला असता परंतु अमित शाह यांच्या सांगण्यावरुन महापौर शिवसेनेला देण्यात आला. मात्र यंदा तसं होणार नाही. मुंबईत भाजपाचा महापौर बसेल. आगामी निवडणुकीत भाजपा ११७ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray : तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही : राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही

: राज ठाकरे यांनी बोलून दाखविली खंत

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे  (MNS Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नाशिक, औरंगाबादच्या दौऱ्यानंतर ते पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात राज ठाकरेंनी बुधवारी मुक्काम केल्यानंतर गुरुवारी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा केली. पक्षातील पदाधिकारी आणि शाखा अध्यक्षांच्या बैठका राज ठाकरे यांनी घेतल्या आहेत. तसेच आताच्या दौऱ्यात राज ठाकरे कामाचा आढावा घेत आहेत.

पुण्यात राज ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी एक खंत बोलावून दाखवली. पूर्वी खरंच बरं होतं. जेव्हा मला लोक भेटायचे, तेव्हा तिथले विषय सांगायचे, घरच्या काही गोष्टी सांगायचे. मात्र आता जे मला भेटतात ते फक्त फोटो काढतात आणि निघून जातात. तुमचं आणि माझं जे नातं आहे, ते फक्त फोटोपुरतं मर्यादित नाही, असं राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना म्हटलं.

दरम्यान, आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज ठाकरे यांनी पुण्यावर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. त्यामुळेच ते मतदारसंघानुसार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत. यात ते आगामी निवडणुकीची रणनीती ठरवतानाच उमेदवारांचीही चाचपणी करत असल्याचं बोललं जात आहे. राज ठाकरे स्वतः मैदानात उतरल्याने सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील चांगलाच उत्साह पाहायला मिळत आहे.

पुण्यात राज ठाकरेंनी चिमुकल्याचं केलं नामकरण-

राज ठाकरे यांना पुणे दौऱ्यावर असताना एक वेगळाच अनुभव आला आहे. त्यांचे चाहते राज ठाकरे यांच्याकडे कोणती मागणी करतील याचा काही नेम नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. परभणीचे जिल्ह्यातील एका जोडप्याने राज ठाकरेंकडे त्यांच्या चार महिन्यांच्या चिमुरड्याचे नाव ठेवण्याची मागणी केली. केसरीवाड्यातील बैठक संपल्यावर या दाम्पत्याने राज ठाकरे यांना गाठून चिमुरड्याला नाव देण्याची विनंती केली. या मागणीने राजही काही क्षण बुचकळ्यात पडले होते. पण नंतर मुलाच्या आईचा आग्रह पाहता राज यांनी चिमुरड्याला ‘यश’ हे नाव दिलं.

Vasant More : Pedestrian Day : दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा : मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

Categories
Breaking News PMC Political पुणे

दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करा

: मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांचे महापौरांना खुले आव्हान

पुणे : आज ११ डिसेंबर हा पुणे शहराचा पादचारी दिन घोषित करून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शहरात विविध ठिकाणी घेतलेल्या कार्यक्रमांचा पंचनामा शहरातील पदपथांची दुरावस्था दाखवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेने केला.  राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली व मनसे पर्यावरण शहर अध्यक्ष नितीन जगताप यांच्या माध्यमातून जनहित कक्षाचे शहर अध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांच्या उपस्थितीत पुणे शहराच्या आठही मतदारसंघामध्ये विभाग अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पदपथांवरील अतिक्रमणे आणि पादचाऱ्यांच्या हक्काची होत असलेली पायमल्ली याचा लेखाजोखा फेसबुक live च्या माध्यमातून प्रत्यक्षपणे मांडण्यात आला.

पादचाऱ्यांना रस्त्यांवर प्रथम प्राधान्य असायला हवे, पदपथ अतिक्रमणमुक्त असावेत, झेब्रा क्रॉसिंगचे रंग सुस्पष्ट असावेत, पादचाऱ्यांचे रस्ता ओलांडण्यासाठीचे सिंनल्स दुरुस्त असावेत, अपंगांसाठी आणि दृष्टीहीन लोकांसाठी पदपथ सुस्थितीत असावेत.  अशा मागणीचे फलक घेऊन  महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या प्रभागात मनसेने विरोधाभास दर्शवत मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी महापौर यांना खुले आव्हान दिले आहे. फक्त 1 दिवस पादचारी दिन साजरा करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक न करता पादचाऱ्यांचे हक्क अबाधित ठेवले आणि पदपथ अतिक्रमणमुक्त झाले तरच पादचारी दिन सार्थकी लागला असे म्हणता येईल.  दररोजच पादचारी दिन साजरा होईल असे प्रतिपादन मनसे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी यावेळी केले. तुम्ही दुसऱ्या प्रभागात चमकोगिरी करण्यापेक्षा स्वतःच्या प्रभागाची दुरावस्था दूर करावी असे म्हणत वसंत मोरेंनी स्वतःच्या प्रभागातील सलग 3 किलोमीटरच्या उत्कृष्ट अशा पदपथावरून पायी फेरी मारली. यानिमित्ताने पुणे शहरात इतर सगळ्या विरोधी पक्षांपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच प्रखर विरोधी पक्ष असल्याचे अधोरेखित झाले आहे. आगामी काळात पुणे शहराच्या आणि जनतेच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असल्याचे सांगून वसंत मोरेंनी शासन प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी संपुर्ण शहरातील पदाधिकारी आजी माजी नगरसेवक विभाग अध्यक्ष शाखा अध्यक्ष महिला सेनेचे पदाधिकारी व मनसेच्या सर्व अंगीकृत संघटनांनी सहभाग घेतला होता.

Chandrakant patil : मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही : चंद्रकांत पाटील

: मनसे सोबत युती बाबत पाटील यांची भुमिका

पुणे : महापलिका आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष बाह्य सरसावून कामास लागले आहेत. दरम्यान येणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे एकत्र येणार अशा वावड्या उठल्या होत्या. राज ठाकरे यांनी त्याबाबत संकेत दिले होते.शिवाय पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी देखील तसे सांगितले होते. मात्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही युती होण्याची सुतराम शक्यता नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का, असे एका पत्रकाराने विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही.

 

: सर्वच साखर कारखान्यांच्या विक्रीची चौकशी करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुण्यात जाहीर केलेल्या सर्व ६५ साखर कारखान्यांच्या विक्रीची अवश्य चौकशी करा. केवळ जरंडेश्वरची चौकशी करा आणि उरलेल्या ६४ कारखान्यांची करू नका अशी आमची भूमिका नाही, असे प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी दिले.
ते पिंपरी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, जरंडेश्वर साखर कारखान्याचे प्रकरण काळा पैसा पांढरा करण्याचे आहे व त्याची चौकशी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी करत आहे. ऊर्वरित साखर कारखान्यांचे प्रकरणही मनी लाँडरिंगचे असेल तर त्याचीही चौकशी करावी. उपलब्ध माहितीनुसार इतर कारखान्यांची विक्री कमी किंमतीला झाल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करताना त्या विक्रीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या राज्य सहकारी बँकेची आणि त्या बँकेचे संचालक असलेल्या अजित पवार यांचीही चौकशी होणे आवश्यक आहे. या गैरव्यवहाराला मौन संमती देणाऱ्या त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांची आणि मदत करणाऱ्या नेत्यांचीही चौकशी करावी.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी त्यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार केली आहे, त्याविषयी पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी केवळ तक्रार करण्यापेक्षा राजस्थानमधील सरकारच्या मदतीने धमकी देणाऱ्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती होईल का, असे एका पत्रकाराने विचारले असता मा. प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, संपूर्ण देश एक आहे, अशी भाजपाची भूमिका असून मनसेची परप्रांतियांची भूमिका भाजपाला मान्य नाही. त्यामुळे मनसेसोबत भाजपाची युती होण्याची सुतराम शक्यता नाही.

 

संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव नाही

संभाजी ब्रिगेडसोबत भाजपाची युती होण्याचा काहीही प्रस्ताव आलेला नाही. त्याबाबत आपण केवळ वर्तमानपत्रातून वाचले. असा प्रस्ताव आला तरीही भाजपाची संभाजी ब्रिगेडशी युती होण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने विजयी व्हावे यासाठी स्वतः पक्षाध्यक्ष शरद पवार यांना यावे लागले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहीत पवारही प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी किती भक्कम आहे, याचे हे उदाहरण आहे. शहरातील परिस्थिती हाताळण्यास भाजपाचे नेतृत्व सक्षम आहे, असा टोला त्यांनी हाणला.

Ramdas Athavale : पुण्यात महापौर अन् मुंबईत उपमहापौर रिपाइंलाच मिळणार : रामदास आठवलेंचा विश्वास 

Categories
Political पुणे महाराष्ट्र

पुण्यात महापौर अन् मुंबईत उपमहापौर रिपाइंलाच मिळणार

: रामदास आठवलेंचा विश्वास

 पुणे : भाजप मनसेच्या नादाला लागल्यास ‘रिपाइं’ भाजपचा नाद सोडेल का, असे विचारल्यावर ‘आम्ही त्यांचा नाद सोडला तरी ते आमचा नाद सोडणार नाहीत,’ असे आठवले म्हणाले. स्वतंत्र चिन्हावर लढायचे की, भाजपच्या हे अजून ठरले नाही. मात्र, एकत्र निवडणूक लढवणार असून, मागासवर्गीय आरक्षण पडल्यास पुण्यात महापौर  आणि मुंबईत उपमहापौर  रिपाइंला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यातील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले  विविध विषयांवर बोलत होते.

तर देवेंद्र फडणवीस यांना अजून मुख्यमंत्री असल्याचा भास होतो, यावर आठवले म्हणाले, ”त्यांना तसा भास होतो, तर दोन वर्षांनंतरही उद्धव ठाकरे यांना आपण अजूनही मुख्यमंत्री नाहीत, असे वाटते, अशी मिश्किल टिपण्णी केली.यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिल्याचेही त्यांनी नमूद केले.”

पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल

”एकदा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केला. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन जर भारतीय सैनिकांवर भारतीय नागरिकांवर दहशतवादी हल्ले केले जात असतील तर पाकिस्तानवर पुन्हा एक सर्जिकल स्ट्राइक करावं लागेल. पाकिस्तानी दहशतवादी हल्ले थांबवले नाही तर एकदा आरपारची लढाई लढावी लागेल. पाकिस्तानने बळकावलेला भूभाग आपल्या पुन्हा परत आपल्या ताब्यात घ्यावा लागेल असे मतही आठवले यांनी व्यक्त केले.”

भारत पाकिस्तान क्रिकेट सामना होऊ नये

”भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळू नये असे माझ्या पक्षाचे मत आहे. खेळामध्ये राजकारण आणू नये हे जरी खरे असले तरी अशा परिस्थितीत पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असे माझे मत आहे. जयेश शहा यांना देखील मी हे सांगणार आहे.”

दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत

“जनधन, उज्वला आणि मुद्रा योजनाअंतर्गत मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा झाला आहे. आवास योजनेत अनेकांना पक्की घरे मिळाली आहेत. आयुष्यमान भारत योजनेत सव्वा दोन लाखाच्या वर लोकांना लाभ झाला आहे. जात-धर्म न पाहता नरेंद्र मोदी यांनी या योजना सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. जातीनिहाय जनगणना व्हायला हवी, अशी आमची मागणी आहे. त्यातून जातीभेद वाढणार नाही, तर ज्या जाती अधिक मागास आहेत, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे सोयीचे होणार आहे. दलितांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. त्यांना आत्मनिर्भर करण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी सांगितले.