PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध! 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध!

 

PMC Pune Employees Union | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि अतिक्रमण निरीक्षक (Encroachment Inspector) यांना कर्त्तव्य बजावत असतांना मारहाण करण्यात आली. त्याचा उद्या सकाळी 11 वा. हिरवळीवर शांततामय मार्गाने निषेध केला जाणार आहे. यात सर्व संघटना सहभागी होणार आहेत. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व संघटना कडून करण्यात आले आहे. (PMC Pune Employees Union)

पुणे महापालिका कामगार यूनियन (मान्यताप्राप्त), पी एम सी एम्प्लॉईज युनियन, पुणे महानगरपालिका अभियंता संघ, पुणे महानगरपालिका अधिकारी संघ, डॉक्टर असोसिएशन, पुणे महापालिका मागासवर्गीय संघटना अशा सर्व संघटना यात सहभागी होणार आहेत. काल अतिक्रमण विभागात महापालिका कर्मचारी आणि RTI कार्यकर्ता यांच्या मारहाण झाली. अशा घटना घडत असल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे काम करणे अवघड झाले आहे. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात  येणार आहे. असे संघटना कडून सांगण्यात आले. (PMC Pune News)


News Title | PMC Pune Employees Union | All municipal organizations will protest the beating in the encroachment department tomorrow!

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात बाचाबाची  | अतिक्रमण विभागातील टेबल फोडले 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात बाचाबाची

| अतिक्रमण विभागातील टेबल फोडले

PMC Encroachment Department | पुणे | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) आज सायंकाळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी (Encroachment Department Officer) आणि आरटीआय कार्यकर्ता (RTI Activist) यांच्यात बाचाबाची झाली. संबंधित कार्यकर्त्याने कार्यालयातील काचेचे टेबल फोडले. याबाबत महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते असे त्रास देत असतील तर आम्ही काम कसे करायचे, असा प्रश्न हे अधिकारी विचारत आहेत. (Pune Municipal Corporation)
वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरटीआय कार्यकर्ता यांनी खात्याची माहिती बाबत अतिक्रमण अधिकाऱ्याला फोन केला होता. मात्र फोनवरच दोघात बाचाबाची झाली. अधिकाऱ्याला शिवीगाळ देखील झाली. त्यानंतर संबंधित कार्यकर्ता अतिक्रमण विभागात आला. तिथे अधिकारी आणि कार्यकर्ता यांच्यात हाणामारी आणि शिवीगाळ झाली. त्यानंतर हा कार्यकर्ता उपायुक्त माधव जगताप यांच्या केबीन जवळ असलेल्या केबिन मध्ये घुसला. तिथल्या अधिकाऱ्याला त्याच्याकडून अरेरावी झाली. त्यानंतर त्याने खुर्ची टेबल वर आपटली. त्यात टेबलचे काच देखील फुटले. नंतर हे प्रकरण उपायुक्त माधव जगताप यांच्यापर्यंत पोहोचले. महापालिकेकडून संबंधित व्यक्ती वर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु आहे. (PMC Pune News)
दरम्यान नुकतेच आमदार राणे यांनी महापालिका अधिकाऱ्या बाबतीत एकेरी भाषा वापरून त्यांचा अवमान केला होता. त्याविरोधात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नुकतेच आंदोलन केले होते. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते वेळोवेळी त्रास देत असतात, अशी तक्रार कर्मचाऱ्याकडून केली जात असते. अशा परिस्थितीत काम कसे करायचे, असा प्रश्न अधिकारी आणि कर्मचारी विचारत आहेत. (Pune Municipal Corporation)
News Title |PMC Encroachment Department | An altercation between the officials of the encroachment department of the Pune Municipal Corporation and the RTI activist | The table in the encroachment section was broken

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर (Abandoned vehicles) कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5 हजार पासून ते 25 हजार पर्यंत दंड (Removal Charges) होऊ शकेल. अतिक्रमण विभागाकडून अशा लोकांना नोटीस देखील पाठवणे सुरु केले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (PMC Encroachment Department)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत रस्ता, पदपथावर इत्यादी ठिकाणी बंद / बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळ होत आहेत. अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बंद / बेवारस वाहने उचलणेची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील  बंद / बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.  त्यामुळे अशी वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येणार आहेत.  (PMC Pune News)

-जप्त केलेल्या वाहनांसाठी  रिमुव्हल चार्जेस खालील प्रमाणे –

1. अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक इ.) = २५,०००/-
2. हलकी वाहने (१० टना पर्यंत) = २०,०००/-
3. चार चाकी वाहने (कार, जीप इ.) = १५,०००/-
4. तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) = १०,०००/-
5. दुचाकी (स्वयंचलित) र= ५०००/-
अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार  संबंधित वाहन मालक १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येणार असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, त्यानुसार शहरात २२ वाहने जप्त करण्यात आली असून १८ वाहनांना नोटीस लावण्यात आल्या आहेत. असे ही खात्याकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
—–
News Title | PMC Encroachment Department | Get your abandoned vehicles off the road Otherwise charges ranging from 5 thousand to 25 thousand have to be paid

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Encroachment Department | गॅस सिलिंडर वापरणारे पथारी धारक आणि वितरक दोघांवरही गुन्हे दाखल होणार

| पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सुरु केली तयारी

PMC Encroachment Department | शहरातील पथारी व्यावसायिकांना (Hawker’s) महापालिकेने दिलेल्या परवान्यानुसार पथारीच्या ठिकाणी अन्न पदार्थ शिजविण्यास अथवा तयार करण्यास बंदी आहे. तरीही अनेक पथारी धारक गॅस सिलिंडर (Gas Cylindres) वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा व्यावसायिकांवर महापालिकेकडून (PMC Pune) कारवाई केली जाणार आहे. तसेच, व्यावसायिकाला सिलिंडर देणाऱ्या वितरकावरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली आहे. (PMC Encroachment Department)

शहरात बंदी असतानाही तसेच महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) कार्यवाही सुरू असतानाही अनेक जण सिलिंडर वापरतच असल्याने प्रशासनाने या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक बोलावली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहरात रस्ता-पदपथावर जे पथविक्रेते अनधिकृतपणे सिलिंडरचा वापर करत असताना आढळून आल्यास अशा पथविक्रेत्यांवर सिलिंडर जप्तीची कारवाई करून तसेच संबंधित व्यावसायिकांवर व वितरकांवर पोलिसांमार्फत गुन्हे दाखल करण्याची कारवाई चालू करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी सांगितले.

दरम्यान या कारवाईबाबत जगताप यांच्या नियंत्रणाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिक्रमण विभाग, पोलीस विभाग, अन्न पुरवठा विभाग व गॅस वितरक कंपनीतील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत हा निर्णय संयुक्तपणे घेण्यात आल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. पुणे महापालिकेकडून आतापर्यंत अतिक्रमण कारवाईमध्ये जे व्यावसायिक व्यवसाय करताना सिलिंडरचा वापर करतात, अशा व्यावसायिकांवर 1021 सिलिंडर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. (PMC Pune News)

——

News Title | PMC Encroachment Department | Both the holders and distributors of gas cylinders will be charged| The encroachment department of Pune Municipal Corporation has started preparations

PMC Encroachment Department | कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department |  कारवाई करण्यासाठी आता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे FDA ला साकडे!

PMC Encroachment Department | पुणे शहरातील (Pune City) रस्ता-पदपथांवर विविध ठिकाणी अन्न पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर (Illegal Hawker’s) कारवाई करण्याची मागणी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) अन्न आणि औषध प्रशासनाकडे (FDA)  केली आहे. याबाबत अतिक्रमण विभागाकडून FDA ला पत्र देण्यात आले आहे. (PMC Encroachment Department)

पुणे शहरातील रस्ता -पदपथांवर खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून पावसाळी गटारे व ड्रेनेज
चेंबरमध्ये अनधिकृतपणे सांडपाणी, खरकटे व इतर टाकाऊ पदार्थ सातत्याने टाकले जात असल्यामुळे तेथील चेंबर व ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने त्याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी महापालिकेच्या अतिक्रमण कार्यालयाकडे वारंवार येत आहेत. तसेच असे व्यावसायिक रस्ता पदपथांवर उघड्यावर अन्नपदार्थ शिजवून तयार करताना व विक्री करताना कोणतेही स्वच्छते बाबत नियम व अटींचे पालन करत नसल्यामुळे नागरिकांना अस्वच्छ खाद्यपदार्थ विकले जात असल्यामुळे आरोग्यदायी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे व्यावसायिक मासे, चिकन-मटण व इतर खाद्यपदार्थ तयार करून विक्री करताना रस्ता-पदपथांवर पडलेले खरकटे अन्न तसेच तेलकटपणा व्यवसायानंतर स्वच्छ करत नसल्यामुळे दुर्गंधी तयार होऊन त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होत असतो. असे पथविक्रेते खाद्यपदार्थ तयार करणे करिता ज्वलनशील पदार्थांचा उदा.गॅम-
सिलेंडर, रॉकेल इ. वापर करत असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वारंवार दुर्घटना घडत आहेत. (PMC Pune)
तरी शहरातील अशा प्रकरच्या अनधिकृत/अधिकृत पथारी व्यवसायिकांवर FDA मार्फत  तपासणी पथकांमार्फत सातत्याने कारवाया करून त्यांचेवर नियंत्रण ठेवण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच अशा व्यवसायिकांना खाद्यपदार्थ विक्रीबाबतचा FDA चा परवाणा अतिक्रमण कार्यालयाकडील रीतसर लेखी शिफारस घेतल्यानंतरच अपलेकडील परवाना देण्यात यावा. अशी मागणी अतिक्रमण विभागाने FDA कडे केली आहे.  आपले कार्यालयाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून त्यांचेवर योग्य ती कारवाई करून केलेल्या कार्यवाही बाबतचा साप्तहिक अहवाल आमच्याकडे पाठवावा. तसेच  या कामी पुणे महानगरपालिकेमार्फत काही मदत लगत असल्यास पुणे मनपाच्या पंधरा क्षेत्रिय कार्यालयांकडे संपर्क साधण्यात
यावा. असे पत्रात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation News)
—-
News Title | PMC Encroachment Department |  Pune Municipal Encroachment Department to FDA now to take action!