PMPML Reward Scheme | पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर 

Categories
Breaking News social पुणे

PMPML Reward Scheme |पीएमपीएमएल आपल्या प्रवाशांना देणार शंभर रुपयांचे बक्षीस | योजना जाणून घ्या सविस्तर

|  बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टरची पुराव्यासह तक्रार करणाऱ्या प्रवाशांना मिळणार शंभर रुपये बक्षीस

|  बेशिस्त ड्रायव्हर व कंडक्टरवर होणार एक हजार रुपये दंडाची कारवाई

 

PMPML Reward Scheme |पुणे महानगर परिवहन महामंडळास (PMPML Pune) ड्रायव्हर/कंडक्टरच्या (PMP Drivers and conductors) बेशिस्त वर्तनाबाबत नागरीक, सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी यांचेकडून तक्रारी व सूचना प्राप्त होत असतात. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईलवर बोलणे, बसेसना रूट बोर्ड नसणे किंवा चुकीचे बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे अशा तक्रारींचा समावेश आहे. महामंडळाकडील ड्रायव्हर/कंडक्टर सेवकांच्या गैरवर्तना बाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण होण्याच्या दृष्टीने महामंडळाने पुराव्यासह तक्रार करणाऱ्या प्रवाशांसाठी बक्षीस योजना (PMPML Reward Scheme) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMPML Reward Scheme)

ड्रायव्हिंग करतेवेळी मोबाईलचा वापर करणे, मोबाईल कानाला लावून अगर हेडफोन द्वारे बोलणे सुरक्षिततेच्या दृष्टिने हिताचे नाही. तसेच बसला रूट बोर्ड नसणे/चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे यामुळे प्रवाशी व नागरिकांची गैरसोय होते. सबब ड्रायव्हिंग करतेवेळी ड्रायव्हर मोबाईलचा वापर करत असल्यास व मोबाईल कानाला लावून अगर हेडफोन द्वारे बोलत असल्यास तसेच बसला रूट बोर्ड नसणे/चुकीचा रूट बोर्ड असणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवले असल्याचे प्रवासी/नागरिकांना आढळून आल्यास संबंधित ड्रायव्हर/कंडक्टर सेवकास एक हजार रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे. (PMPML Pune News)

वरील प्रकारच्या तक्रारी प्रवाशांकडून प्राप्त झालेनंतर सदर तक्रारींची शहानिशा करून तदनंतरच तक्रारदार प्रवाशी/नागरिकांना शंभर रुपये बक्षीस रोख स्वरुपात मिळणार आहे. तसेच संबंधित ड्रायव्हर/कंडक्टर यांना एक हजार रुपये दंड करण्यात येणार असून त्याच्या वेतनातून सदरची रक्कम कपात करण्यात येणार आहे. (PMPML Pune)

प्रवाशी/नागरिकांनी अशा ड्रायव्हर/कंडक्टर सेवकांच्या तक्रारी बाबतचे फोटो/व्हिडीओ तसेच बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण,
दिनांक व वेळ महामंडळाच्या complaints@pmpml.org या मेलवरती व ९८८१४९५५८९ या व्हॉटसअॅप क्रमांकावरती पाठवाव्यात किंवा महामंडळाच्या नजीकच्या डेपोमध्ये पुराव्यासह तक्रारी सादर कराव्यात, असे आवाहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.


News Title | PMPML will give its passengers a reward of Rs 100 Know the plan in detail

IAS Sachindra Pratap Singh | पीएमपीचे नवे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंग | ओमप्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण आयुक्त पदी बदली

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

IAS Sachindra Pratap Singh | पीएमपीचे नवे सीएमडी सचिंद्र प्रताप सिंग

|  ओमप्रकाश बकोरिया यांची समाज कल्याण आयुक्त  पदी बदली

 IAS Sachindra Pratap Singh |  पीएमपीचे सीएमडी ओमप्रकाश बकोरिया (IAS Omprakash Bakoria)  यांची बदली करण्यात आली आहे. आता पीएमपीचे सीएमडी म्हणून सचिंद्र प्रताप सिंग (PMPMLPMPMLPMPML CMD Sachindra Pratap Singh) काम पाहतील. राज्य सरकारने नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. बकोरिया यांना पुण्यातच समाज कल्याण आयुक्त (Social Welfare Commissioner) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. (IAS Sachindra Pratap Singh)
राज्य सरकार कडून नुकत्याच काही बदल्या करण्यात आल्या आहेत. सचिंद्र प्रताप सिंग हे 2007 च्या बॅच चे IAS आहेत. त्यानं त्यांच्याकडे पीएमपीएमएल ची जबाबदारी दिली आहे. तर बकोरिया हे 2006 च्या बॅच IAS आहेत. त्यांना समाज कल्याण आयुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान ओमप्रकाश बकोरिया यांनी याआधी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. त्यांना क्रीडा व युवक आयुक्त पदी नेमण्यात आले होते. पुण्यातून त्यांनी चांगले काम केले. त्यानंतर आता बकोरिया यांची समाज कल्याण आयुक्त पदी करण्यात आली आहे.
News Title | IAS Sachindra Pratap Singh |  Sachindra Pratap Singh is the new CMD of PMP |  Omprakash Bakoria has been transferred as Social Welfare Commissioner

PMPML Deficit | PMC General Body | संचलन तुटी पोटी पीएमपीला 217 कोटी देण्यास मुख्य सभेची मान्यता

Categories
Breaking News PMC social पुणे

PMPML Deficit | PMC General Body | संचलन तुटी पोटी पीएमपीला 217 कोटी देण्यास मुख्य सभेची मान्यता

| 8 समान हफ्त्यात दिली जाणार रक्कम

PMPML Deficit | PMC General Body | पीएमपीएमएल (PMPML) ला 2022-23 या आर्थिक वर्षात 696 कोटींची संचलन तूट (Operating Déficit) आली आहे. यात पुणे महापालिकेचा (PMC Pune) हिस्सा 417 कोटीचा आहे. त्यापैकी 200 कोटी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) पीएमपीला (PMP Pune? उचल स्वरूपात दिले आहेत. उर्वरित 217 कोटी रुपये 8 समान हफ्त्यात दिले जाणार आहेत. मात्र 8 वा हफ्ता हा लेखापरीक्षण (Audit) करून दिला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिका मुख्य सभेने (PMC General Body) मान्यता दिली आहे. (PMPML Deficit | PMC General Body)

शासन निर्णयानुसार सन २०१३-१४ या वर्षापासून PMPML संस्थेस येणारी तुट संबंधित महानगरपालिकेने आपल्या स्वामित्व हिश्श्यानुसार PMPML संस्थेस आदा करणेबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार PMPML संस्थेला प्रतिवर्षी संचलन तुटीपोटी पुणे महानगरपालिकेस देय होणारी रक्कम कळविण्यात येते व त्यानुसार पुणे महानगरपालिकेकडून सदरची रक्कम प्रतिमहा PMPML संस्थेस आदा करण्यात येते. (Pune Municipal Corporation News)

पुणे महानगर परिवहन महामंडळास सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील संचलन तुट  अंदाजित एकूण ६९६.५० कोटी ग्राह्य धरली असता पुणे महानगरपालिकेचा (६०%) स्वामित्व हिश्श्यानुसार ४१७.९० कोटी  असल्याचे PMPML संस्थेकडून पत्राने कळविण्यात आलेले आहे. (PMPML Pune News) 
त्यापैकी मुख्य सभेची मान्यतेने सन २०२२-२०२३ मध्ये रक्कम ३६ कोटी PMPML संस्थेस उचल स्वरुपात आदा करण्यात आलेले आहेत. महापालिका आयुक्त यांचे मान्यतेने अनुक्रमे रक्कम रु.५४ कोटी व रक्कम रु ११० कोटी PMPML संस्थेस सन २०२२ २३ मध्ये अपवादात्मक बाब म्हणून उचल स्वरुपात आदा करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेकडून PMPML संस्थेस सन २०२३-२४ मध्ये संचलन तुटीपोटी आदा करण्यात येणाऱ्या रक्कमेपैकी  एकूण रक्कम २०० कोटी  २०२२-२३ मध्येच PMPML संस्थेस उचल स्वरुपात आदा करण्यात आलेले आहेत. (Pune Municipal Corporation Marathi News)
उर्वरित 217 कोटी रुपये 8 समान हफ्त्यात दिले जाणार आहेत. मात्र 8 वा हफ्ता हा लेखापरीक्षण करून दिला जाणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिका मुख्य सभेने मान्यता दिली आहे. (PMC Pune News)
——
News Title | 217 Crores to PMP against operating deficit approved by the main body|  Amount to be paid in 8 equal installments

PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMPML | 7th Pay Commission | पीएमपी कर्मचाऱ्यांना जुलै पासून 100% सातवा वेतन आयोग लागू होणार

| पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

PMPML | 7th Pay Commission | पीएमपीएलच्या (PMPML Employees) 10 हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अजूनही पूर्णपणे सातव्या वेतनआयोगाचा (7th Pay Commission) लाभ देण्यात आलेला नव्हता. मागील वर्षी त्यांना 50% सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र 100% आयोग लागू करण्याबाबत प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे टीका कर्मचारी संघटनेनी केली होती. यावर आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी पीएमपी प्रशासनासोबत बैठक घेत जुलै पासून 100% वेतन आयोग लागू करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे पीएमपी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (PMPML| 7th Pay Commission)
गेल्या दोन वर्षापासून १०० टक्के सातवा वेतन आयोग पीएमपीएमएल कर्मचा-यांना लागू करण्यात आलेला नव्हता. दोन्ही महानगर पालीकेच्या स्वामित्वाची रक्कम मार्च २०२२–२३ च्या अर्थसंकल्पात सुध्दा लागू करण्यासाठी लागणारी रक्कम व फरकाची रक्कम याची तरतुद करण्यात आलेली आहे. परंतु दोन्ही महानगरपालिकेचे आयुक्त यांनी व सध्याचे प्रशासक यांनी  रक्कम परिवहन महामंडळाला दिलेली नसल्याने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न झाल्याने सर्व कामगारामध्ये मोठया प्रमाणात जनक्षोभ वाढलेला होता. त्यामुळे प्रशासनावर कामगारांची विश्वासार्हता राहिलेली नाही. असा आरोप संघटना करत होत्या. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षापुर्वीच सतवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून फरक सुध्दा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२१ पेड इन जानेवारी २०२२ च्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून माहे मार्च २०२२ पेड इन एप्रिल २०२२ मध्ये फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. मागील वर्षी पीएमपी कर्मचाऱ्यांना 50% आयोग लागू केला होता. (PMPML Pune)
मात्र पूर्ण आयोग लागू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पीएमपी प्रशासन आणि कर्मचारी संघटनांसोबत गुरुवारी बैठक घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले कि पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% वेतन आयोग जुलै महिन्यापासून लागू होईल. (PMPML Pune News) 
News Title | PMPML | 7th Pay Commission | 100% Seventh Pay Commission will be applicable to PMP employees from July

PMPML Bus Student Passes |विद्यार्थ्यांनो पीएमपीच्या सवलतीच्या पासेस चा लाभ घ्या | जाणून घ्या पासेस ची सर्व प्रक्रिया 

Categories
Breaking News Education social पुणे

PMPML Bus Student Passes |विद्यार्थ्यांनो पीएमपीच्या सवलतीच्या पासेस चा लाभ घ्या | जाणून घ्या पासेस ची सर्व प्रक्रिया

PMPML Bus Student Passes | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Limits) हद्दीतील विद्यार्थ्यांना पीएमपी प्रशासनाच्या (PMPML Administration)  वतीने सवलतीच्या दरात पासेस (PMPML Bus Pass) देण्यात येतात. पुणे  महानगरपालिकेच्या शाळेतील (PMC Pune Schools) इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास दिला जातो.  तसेच पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील (Private schools) इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% अनुदानित मोफत बस प्रवास पास दिला जातो. याचा लाभ घेण्याचे आवाहन पीएमपीच्या वतीने करण्यात आले. आहे. (PMPML Bus Student Passes)

 

सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षाकरिता पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील (Pune Municipal Corporation Schools)इयत्ता ५ वी ते १२ वी चे विद्यार्थ्यांना १००% अनुदानित मोफत बस प्रवास पास व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वी चे विद्यार्थ्यांना ७५% सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासेस वितरणाची योजना सुरू करण्यात आली आहे. पासेससाठी  १२/०६/२०२३ पासून अर्जाचे वाटप सर्व आगारामधून व सर्व पासकेंद्रावर करण्यात येणार आहे. तसेच भरून दिलेले अर्ज महामंडळाच्या सर्व आगारांमध्ये स्वीकारण्यात येतील. संबंधित शाळा अथवा त्यांचे प्रतिनिधी हे त्यांचे शाळेतील विदयार्थ्यांकरिताचे अर्ज महामंडळाच्या कोणत्याही आगारांमधून एकत्रित रित्या घेवून जाऊ शकतात. (PMPML Pune)

तसेच अर्ज भरून एकत्रित रित्या आगारामध्ये जमा केल्यास त्या शैक्षणिक संस्थेस एकत्रित पास दिले जातील. ते शाळा प्रमुखांनी त्यांचे शाळेत वितरित करावेत. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आगारामध्ये येण्याची गरज भासणार
नाही. खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना महामंडळाचे आगारामधून (PMPML Depot) त्यांचा अर्ज व कागदपत्रांची तपासणी झाल्यावर त्यांचे प्रवासाचे अंतरानुसार होणारे एकूण पासचे रकमेचे २५% रक्कमेनुसारचे चलन तयार करून देणेत येईल ते चलन विद्यार्थ्यांनी पुणे मनपा हद्दीतील बँक ऑफ महाराष्ट्र चे कोणत्याही शाखेमध्ये भरणा केले नंतर अर्जासोबत चलन व आवश्यक कागदपत्रे जोडून जवळच्या आगारामध्ये सादर केल्यावर पास मिळू शकेल. (PMPML Pune Marathi News)

 

पासेसकरीताचे अर्ज वितरण १२/०६/२०२३ पासून महामंडळाच्या सर्व आगारामधून करण्यात येईल. प्रस्तुत योजनेसंबधी सविस्तर माहिती महामंडळाच्या सर्व आगारामध्ये उपलब्ध आहे. तरी पुणे मनपाचे शाळेतील
व पुणे मनपा हद्दीतील खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनी या सवलतीच्या पासचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन महामंडळाकडून करण्यात येत आहे. (Pune News)

अधिक महितीसाठी संपर्क क्र. ०२०-२४५४५४५४


News Title |PMPML Student Passes | Students Avail PMP Discount Passes | Know all procedures of passes

PMPML Ratrani Bus Service | पीएमपीएमएलची रातराणी बससेवा आज पासून पुन्हा पूर्ववत

Categories
Breaking News social पुणे

PMPML Ratrani Bus Service | पीएमपीएमएलची रातराणी बससेवा आज पासून पुन्हा पूर्ववत 

     PMPML Ratrani Bus Service |  पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML spune) प्रवाशांच्या मागणीनुसार दिनांक  जून म्हणजे आज पासून  मार्गावरती रातराणी बससेवा (Ratrani Bus Service) पूर्ववत सुरु करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या (PMPML Administration) वतीने देण्यात आली. (PMPML Ratrani Bus Service) 

रातराणी बसमार्ग खालीलप्रमाणे

.क्र.

मार्ग क्र

पासुनपर्यंत

मार्गाचा तपशील

रातराणी 

कात्रज ते शिवाजीनगर (नविन एस.टीस्टॅण्ड)

स्वारगेटशनिपार..पाभवन

रातराणी 

कात्रज ते पुणे स्टेशन

स्वारगेटनानापेठरास्ता पेठ

रातराणी 

हडपसर ते स्वारगेट

वैदुवाडीरामटेकडीपुलगेट

रातराणी 

हडपसर ते पुणे स्टेशन

पुलगेटबॉम्बे गॅरेजवेस्टएंड टॉकिज

रातराणी 

पुणे स्टेशन ते एनडीए गेट १०

नाना पेठलक्ष्मी रोडडेक्कन कॉर्नर

तसेच बस मार्ग क्र.११४ ..पाभवन ते म्हाळुंगेगांव या मार्गाचा विस्तार पाडळेचौका पर्यंत करण्यात येत आहे. हा मार्ग पुणे विद्यापीठबाणेरगांवम्हाळुंगेगांव व पाडळे चौक असा असणार आहे. (PMPML News l) 

तरी उपरोक्त तक्त्यात नमुद केलेल्या बससेवेचा लाभ प्रवाशीनागरिकविद्यार्थीनोकरदार  महिला वर्ग यांनी घ्यावा असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. 

—–

News title | PMPML Ratrani Bus Service |  Night bus service of PMPML resumed from today

Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून जादा बसेसचे नियोजन

Palkhi Sohala | 2023 | PMPML Pune | संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखीनिमित्त प्रस्थान सोहळ्यास (Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala) पुणे शहर/उपनगरे व संपूर्ण राज्यभरातून आळंदी व देहू येथे उपस्थित राहणाऱ्या असंख्य भाविक नागरिकांचे वाहतुकीची व्यवस्था नेहमीच्या बसेसशिवाय जादा बसेस देवून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (PMPML) दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात येत आहे. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023 | PMPML Pune)

भाविक व नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक ०८/०६/२०२३पासून दिनांक १२/०६/२०२३ पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सद्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकुण १४२ बसेस संचलनात राहणार आहेत. दिनांक ११/०६/२०२३ रोजी रात्रौ १२:०० वा. पर्यंत आळंदी करिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सद्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण ३०बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा १२बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Palkhi Sohala 2023 | PMPML Pune)

​दिनांक १२/०६/२०२३ रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे ०२:३० वा. पासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरूनआळंदीला जाणेकरिता जादा १८ बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. (Pune Traffic Update)

​या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी ०५:३० वाजले पासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान ४० आवश्यक) देण्यात येईल. (PMPML PUNE NEWS)

तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस दिनांक १४/०६/२०२३ रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी १२:०० ते ०१:०० दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. (Palkhi Sohala 2023 News)

 

तद्दनंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बसवाहतुक चालू ठेवण्यात येईल.

​हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तथापि, प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बसवाहतुक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा ६० जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

​तरी सदर बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेवुन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.

—-

News Title | Palkhi Sohala 2023 | PMPML Pune | Planning of extra buses by ‘PMPML’ on the occasion of Palkhi festival

PMPML Pune | मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा

Categories
Breaking News Political social पुणे

PMPML Pune | मार्केट यार्डपासून मुळशी तालुक्यात धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व गाड्या पूर्ववत सुरु करा

| खासदार सुप्रिया सुळे यांची पीएमपीएमएलकडे पत्राद्वारे मागणी

PMPML Pune | मार्केट यार्डपासून (Market yard) मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची (PMPML) सेवा बंद करून सर्व गाड्या कोथरूड डेपोमधून (PMP Kothrud Depot) सोडण्यात येत आहेत. तसे करण्याने मार्केट यार्डात शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह अन्य सर्वच प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. (PMPML Pune)

गेल्या अनेक वर्षांपासून या गाड्या मुळशी तालुक्यातील वेगवेगळ्या गावांतून थेट मार्केट यार्डपर्यंत धावत होत्या. थेट सेवा असल्याने कित्येक शेतकरी आपला शेतमाल या गाड्यांतून मार्केट यार्डात आणत होते. शिवाय काही किरकोळ व्यापारी मार्केट यार्डातून पिरंगुट, भुकुम, भुगाव, पौड, मुळशी आदी भागात भाजीपाला नेऊन विक्री करत होते. याबरोबरच शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरून धावणाऱ्या या गाड्यांमधून शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच आरोग्य सेवा तसेच अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या थेट गाड्यांचा फायदा होत होता.

अचानक या सर्व गाड्या बंद करून कोथरूड पर्यंतच प्रवास थांबवण्यात आल्याने या सर्व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असून दोन दोन गाड्या बदलून इच्छित स्थळी जाणे अडचणीचे ठरत आहे. त्याशिवाय तिकीट दराचाही बोजा वाढला आहे. शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्यांच्याकडील शेतमाल आणि भाजीपाला दोन वेगळ्या गाड्यांत उतर-चढ करणे जिकिरीचे जात आहे. याशिवाय वेळेवर पुढील गाड्या मिळणे, तेथील गर्दी या सर्वच गिष्टींमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप होत आहे, तरी या बस गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.

पीएमपीएमएल ला याबाबत त्यांनी पत्र दिले असून तसे ट्विटही केले आहे. मुळशी तालुक्यात जाणाऱ्या सर्व बसगाड्या पीएमपीएमएलने बंद केल्याबाबतचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याचेही या वृत्तांत नमूद केले आहे. याशिवाय अनेक प्रवाशांनी तशा तक्रारी सुद्धा केल्या आहेत. पीएमपीएमएलने याची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

 

PMPML Pune Bharti | PMPML मध्ये ड्रायव्हर, कंडक्टर ची भरती सुरु आहे कि नाही? जाणून घ्या सविस्तर 

Categories
Breaking News social पुणे

PMPML Pune Bharti | PMPML मध्ये ड्रायव्हर, कंडक्टर ची भरती सुरु आहे कि नाही? जाणून घ्या सविस्तर

PMPML Pune Bharti | पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मध्ये ड्रायव्हर, कंडक्टर व वर्कशॉप विभागाकडील भरती (PMPML Recruitment) करणेत येत असलेबाबतची माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. मात्र याबाबत पीएमपी प्रशासनाने (pmpml administration) स्पष्टीकरण दिले आहे. अशी कुठलीही भरती प्रक्रिया (PMPML recruitment process) करण्यात येत नसल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन देखील पीएमपी प्रशासनाकडून (PMPML Pune) करण्यात आले आहे. (Pmpml Pune Bharti)

पीएमपीएमएल प्रशासनाने दिलेल्या निवेदनानुसार   व्हॉटसअप, फेसबुक व इतर सोशल मिडीयावर, परिवहन महामंडळामार्फत ड्रायव्हर, कंडक्टर व वर्कशॉप विभागाकडील भरती करणेत येत असलेबाबतची माहिती प्रसारीत करण्यात येत आहे. परंतु परिवहन महामंडळामार्फत अशा प्रकारची कोणतीही भरती करणेबाबतचे नियोजन अदयाप करण्यात आलेले
नाही. परिवहन महामंडळाकडील भरती प्रकिया ही दैनिक वृत्तपत्रामध्ये माहिती प्रसिद्ध करूनच राबविण्यात येत असते. (Pmpml Pune News)
तरी सोशल मिडीयावर प्रसारित झालेली सदरची बातमी ही चुकीची / फेक, कोणीतरी खोडसाळपणे दिलेली असून नागरिकांनी यावर विश्वास ठेवू नये, तसेच कुठल्याही कारच्या अमिषाला बळी पडू नये. असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Pune pmpml recruitment)
——
News Title | PMPML Pune Bharti | Driver, conductor recruitment in PMPML or not? Know in detail

PMPML | Award | २४ वर्षात एकही अपघात न करणाऱ्या पीएमपीच्या चालकाला सुरक्षा सन्मान 

Categories
Breaking News social देश/विदेश पुणे

२४ वर्षात एकही अपघात न करणाऱ्या पीएमपीच्या चालकाला सुरक्षा सन्मान

| अपघातमुक्त सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कारा’ने सन्मान

 

नवी दिल्ली, 19 : सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये अपघातमुक्त बस चालविणाऱ्या महाराष्ट्रातील 6 बस चालकांचा ‘सुरक्षा पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. देशभरातील एकूण 42 बस चालकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळातील 2, नवी मुंबई महानगर पालिका परिवहनाचे 1, सोलापूर महानगर पालिका परिवहन महामंडळाचे 1, पुणे महानगर पालिका परिवहन महामंडळ मर्यादितचे 1, बेस्ट चे 1 वाहन चालकांचा समावेश आहे.

येथील कंस्टीट्यूशन क्लबमध्ये मंगळवारी सायंकाळी ‘असोसिएशन ऑफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग्ज (एएसआरटीयू) च्यावतीने ‘हिरोज ऑन द रोड’या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सचिव अलका उपाध्याय यांच्या हस्ते अपघात मुक्त, निर्दोष सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून बस चालकांच्या कुटूंबीयांसोबत ‘सुरक्षा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यामध्ये 17 बस चालकांनी त्यांच्या एकूण सेवेत अपघात न करता 30 वर्षे सेवा दिलेली आहे.

या पुरस्कार विजेत्यांमध्‍ये महाराष्‍ट्रातील एकूण सहा बस चालकांचा समावेश आहे. महाराष्‍ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किसन रामभाऊ घोडके (36 वर्ष अपघातमुक्त सेवा ) आणि मुल्ला मोहम्मद रफिक अब्दूल सत्तार (29 वर्ष अपघातमुक्त सेवा ) अशी या चालकांची नावे आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका वाहतूक सेवेतील नंदकुमार लावंड (26 वर्ष अपघातमुक्त सेवा) सोलापूर महानगरपालिका वाहतूक सेवेतील राजेंद्र महादेव आवटे (25 वर्ष अपघातमुक्त सेवा), पुणे म‍हानगर परिवहन महामंडळातील करूण नारायण कुचेकर (24 वर्ष अपघातमुक्त सेवा), बेस्ट सेवेतील गिरीजाशंकर लालताप्रसाद पांडे (21 वर्ष अपघातमुक्त सेवा) यांचा गौरव करण्‍यात आला.

सध्या, महानगरपालिका अंतर्गत 80 राज्य मार्ग परिवहन उपक्रम हे एएसआरटीयू चे सदस्य आहेत. जे संयुक्तपणे अंदाजे 1,50,000 बस चालवतात आणि सुमारे 70 दशलक्ष प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करतात. एएसआरटीयूच्यावतीने प्रामुख्‍याने सार्वजनिक रस्ते वाहतुकीला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुधारणा घडवून आणत आहेत. तसेच नवनवीन घडामोडींवर चर्चा करण्यासाठी, वाहतूकविषयक प्रमुख समस्या/आव्हाने ओळखण्यासाठी विविध बैठका, परिषदा आणि परिसंवाद/कार्यशाळा यांचे आयोजन करत आहे. राज्य रस्ते वाहतूक उपक्रमांच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच म्हणून एएसआरटीयू कार्यरत आहे.

रस्ते अपघात कमी करण्यासाठी एसआरटीयूने केलेल्या काही उपाययोजना चालकांसाठी जाहीर केल्या आहेत. यामध्ये भरतीच्या टप्प्यातच सुशिक्षित आणि अनुभवी चालकाची निवड करणे. निवडलेल्या चालकांना भरतीच्या वेळीच अद्यावत प्रशिक्षण देणे. वेळोवेळी प्रोत्साहन देण्‍यासाठी वाहनचालकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे.