पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा
| पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
संघटनेच्या निवेदनानुसार आम्ही मागील २४ महिण्यापासून याबाबत पाठपुरावा करीत आहोत. तरीही २४ महिने उलटून जावून सुध्दा १०० टक्के सातवा वेतन आयोग पीएमपीएमएल कर्मचा-यांना लागू करण्यात आलेला नाही. दोन्ही महानगर पालीकेच्या स्वामित्वाची रक्कम मार्च २०२२–२३ च्या अर्थसंकल्पात सुध्दा लागू करण्यासाठी लागणारी रक्कम व फरकाची रक्कम याची तरतुद करण्यात आलेली आहे. परंतु दोन्ही महानगर पालीकेचे आयुक्त यांनी व सध्याचे प्रशासक यांनी सदरची रक्कम परिवहन महामंडळाला दिलेली नसल्याने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी न झाल्याने सर्व कामगारामध्ये मोठया प्रमाणात जनक्षोभ वाढलेला आहे. त्यामुळे प्रशासनावर कामगारांची विश्वासार्हता राहिलेली नाही. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षापुर्वीच सतवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून फरक सुध्दा देण्यात आलेला आहे. तसेच पुणे महानगर पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना डिसेंबर २०२१ पेड इन जानेवारी २०२२ च्या वेतनात सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला असून माहे मार्च २०२२ पेड इन एप्रिल २०२२ मध्ये फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे.
पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना 50% सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. उर्वरित आयोग लागू होण्याची कर्मचारी वाट पाहत आहेत. दोन्ही मनपानी आपल्या हिस्याचा निधी द्यावा आणि 100% वेतन लागू करावा. अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.