E Bus : PMPML : पीएमपीएमएलच्या ‘ई-बस’ ने गाठला अडीच कोटी किमी धावेचा टप्पा : सिंहगड ई-बस सेवेचा शुभारंभ

Categories
Breaking News Political social पुणे

पीएमपीएमएलच्या ‘ई-बस’ ने गाठला अडीच कोटी किमी धावेचा टप्पा

पुणे व पिंपरी चिंचवड शहरवासियांच्या पसंतीस उतरलेल्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात असणाऱ्या वातानुकूलित, आरामदायी व पर्यावरणपूरक ई-बस ने आजपर्यंत जवळपास अडीच कोटी किमी कोटी धावेचा टप्पा पुर्ण केला आहे.

‘पीएमपीएमएल’च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न :  उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील वाढत्या प्रदूषणाचा विचार करता ई-बस काळजी गरज आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या माध्यमातून नागरिकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंहगड ई-बस सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस संचलन मैदान येथे महाराष्ट्र दिन निमित्ताने आयोजित राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रमानंतर हा शुभारंभ कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, पीएमपीएलचे व्यवस्थापकीय  संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पुणे व पिंपरी चिंचवड मनपा यांच्या आर्थिक मदतीमुळे पीएमपीएमएलचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एसटी महामंडळाच्या संप काळात पीएमपीएमएलच्या माध्यमातून उत्तम सेवा देण्यात आली. पीएमपीएमएलच्या ई-बस सेवेमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असून शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहीत सेवा देण्याचा प्रयत्न आहे.

उपमुख्यमंत्री  पवार यांच्याहस्ते वाघोली येथील चौथ्या ई-बस आगाराचे तसेच ‘माझा सिंहगड माझा अभिमान’ योजनेअंतर्गत ई-बस सेवेला हिरवा झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. तसेच ई-बसच्या प्रातिनिधिक स्वरूपात किल्ल्या प्रदान करण्यात आल्या

पर्यावरण पूरक पिशव्या निर्मिती करण्यासाठी सदिच्छा महिला बचत गटाच्या मनीषा पायगुडे आणि सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या अलका पडवळ यांना शिलाई यंत्राचे वाटप करण्यात आले.

मार्गदर्शिकेचे प्रकाशन

पवार यांच्या हस्ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुणे शहर हे विद्येचे माहेर घर असून येथे बाहेरगावावरून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह व योजनांची माहिती होण्यासाठी मार्गदर्शिका उपयुक्त ठरेल अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यात जातीय सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, आपल्या बोलण्यातून, कृतीतून इतरांच्या भावना दुखणार नाही, याची काळजी घ्यावी आणि पोलिसांना साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले.

PMPML : पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांचा संप मागे : बससेवा पूर्वपदावर

Categories
Breaking News social पुणे

पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांचा संप मागे; बससेवा पूर्वपदावर

आज  पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांनी सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून संप पुकारला होता. यामुळे ६८३ बस बंद होत्या तर फक्त ९९ बस रस्त्यावर होत्या. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे पीएमपी प्रशासनाकडून ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान पारी प्रशासन व ठेकेदार चर्चेअंती संप मागे घेण्यात आला व बस सेवा पूर्वपदावर आली. अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

या संपामध्ये मे.ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मे.ट्रॅव्हलटाईम कार रेटल प्रा.लि, मे.अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि, मे. हंसा वहन इंडिया प्रा.लि., मे.एमपी इन्टरप्रायजेस अॅन्ड असोसिएटस लि, मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि या कंपन्यांनी संपात सहभाग घेतला होता.

ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हा संप पुकारला असल्याने ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी प्रशासन व ठेकेदार चर्चेअंती संप मागे घेण्यात आला व बस सेवा पूर्वपदावर आली.

: मनसे कडून आंदोलन

पुणेकरांच्या सेवेसाठी असणाऱ्या  बसची सुविधा अचानकपणे बंद केल्यामुळे बसप्रवासी, नागरीक, विध्यार्थी, कामगार, छोटे व्यापारी असे अनेक घटक आज अचानकपणे अनेक मार्गावरील बस सुविधा बंद केल्या मुळे अनेकांना मोठी अडचण निर्माण झाली. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहराच्या वतीने शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली पी एम पी एल प्रशासन कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.  बस सेवा पुरवणाऱ्या ठेकेदारांची बिले थकवल्याने त्यांनी सेवा बंद केली परंतु प्रशासनाच्या या ढिसाळ नियोजनाचा पुणेकरानी त्रास का सहन करायचा असा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला जाब विचारण्यात आला पी एम पी एल सीएमडी मिश्रा यांना पक्षच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Vaccination Centre : लसीकरण केंद्रावर काम करणारे मनपा आणि पीएमपी चे कर्मचारी कार्यमुक्त  : महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश 

Categories
Breaking News PMC पुणे

लसीकरण केंद्रावर काम करणारे मनपा आणि पीएमपी चे कर्मचारी कार्यमुक्त

: महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

पुणे : शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार लसीकरण केंद्र, मुख्य लसीकरण कार्यालय व लसीकरण बूथ या ठिकाणी पी.एम.पी.एम.एल.कडील कर्मचारी तसेच पुणे महानगरपालिकेकडील सेवक यांची वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशान्वये नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य लसीकरण कार्यालय, मुख्य इमारत, पुणे महानगरपालिका येथे कामकाज करीत असलेले पुणे महानगरपालिकेकडील सेवक वगळून, इतर सर्व लसीकरण केंद्र येथे पुणे महानगरपालिकेच्या विविध खात्याकडून उपलब्ध करून घेतलेले (आरोग्य विभागाव्यतिरिक्त ) सर्व सेवक यांना या आदेशान्वये त्यांचे मुळ खात्यात कामकाजासाठी कार्यमुक्त करण्यात येत आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत.

आदेशानुसार कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना कामकाजासाठी नियुक्त केलेल्या तसेच लसीकरण केंद्रावर कामकाज करीत असलेल्या पी.एम.पी.एम.एल.कडील सर्व कर्मचाऱ्याना या आदेशान्वये कार्यमुक्त करण्यात येत आहे. या कर्मचा-यांनी या आदेशाच्या दिनांकापासून पी.एम.पी.एम.एल.कडे रुजू व्हावे.

Contributed Medical Assistance Scheme : PMPML : पीएमपी कर्मचाऱ्यांना आरोग्य बिलासाठी देखील वाटच पाहावी लागणार  : 4 कोटी देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला 

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांना आरोग्य बिलासाठी देखील वाटच पाहावी लागणार

: 4 कोटी देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला

पुणे : महापालिका कर्मचाऱ्या सोबतच पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील महापालिकेच्या अंशदायी आरोग्य योजनेचा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्यांना फक्त 10% रक्कम भरावी लागते. उर्वरित 90% रक्कम महापालिका देते. यासाठी 4 कोटी देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली होती. त्यावर अंमलबजावणी होण्यासाठी मुख्य सभेच्या मान्यतेची आवश्यकता असते. मात्र मुख्य सभेने हा प्रस्ताव महिन्या भरासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे आरोग्य बिलासाठी देखील पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे.

: स्थायी समितीने मान्य केला होता विषय

महापालिकेच्या वतीने अंशदायी आरोग्य राबवली जाते. महापालिका कर्मचारी, पीएमपी कर्मचारी, शिक्षण मंडळाचे कर्मचारी, आजी माजी नगरसेवक या सर्वांना या योजनेचा लाभ दिला जातो. एकूण बिलाच्या 10 % रक्कम कर्मचाऱ्यांना द्यावी लागते. उर्वरित 90% रक्कम महापालिका संबंधित हॉस्पिटल मध्ये भरते. यासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात करोडोंची तरतूद करण्यात येते. दरम्यान पीएमपीच्या कर्मचाऱ्यांची आरोग्य बिलांची 4 कोटींची रक्कम थकीत होती. ती देण्यासाठी स्थायी समितीने मान्यता देखील दिली होती. स्थायी समिती सदस्यांचा कार्यकाळ संपत असताना हा विषय मंजूर करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी होण्यासाठी मुख्य सभेच्या मान्यतेची आवश्यकता असते. मात्र मुख्य सभेने हा प्रस्ताव महिन्या भरासाठी पुढे ढकलला आहे. महापालिकेचे प्रशासक विक्रम कुमार यांनी नुकतीच मुख्य सभा आयोजित केली होती. त्यामध्ये हा विषय पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आरोग्य बिलासाठी देखील पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे.

Bus Day : येत्या सोमवारी PMP च्या ‘एवढ्या’ बसेस रस्त्यावर धावणार!  : सवलतीच्या दरात करता येणार प्रवास : जाणून घ्या सविस्तर 

Categories
Breaking News social पुणे

येत्या सोमवारी PMP च्या ‘एवढ्या’ बसेस रस्त्यावर धावणार!

: सवलतीच्या दरात करता येणार प्रवास : जाणून घ्या सविस्तर

: पीएमपीचा बस डे उपक्रम

पुणे : पीएमपीएमएल च्या वतीने 18 एप्रिल ला बस डे साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी शहरात 1800 बसेस धावणार आहेत. त्याचे नियोजन पीएमपी प्रशासनाने केले आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील नागरिकांसाठी दि. १८ एप्रिल २०२२ रोजी १८०० बसेस संचलनात आणून ‘बस डे’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘बस डे’ या उपक्रमाचे उद्घाटन पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, शिवाजीनगर येथे होणार असून सदर प्रसंगी पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतील नागरिकांनी प्रदूषण व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीएमएलच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन करणेत येणार आहे.

19 एप्रिल रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. तर “पुण्यदशम’ बसची सेवा मोफत असेल. यासह 20 एप्रिल रोजी महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे.

मात्र, दोन्ही दिवशी पालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना कोणतीही सवलत मिळणार नाही. 19 एप्रिल रोजी पीएमपीचा 15 वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यानिमित्त 14 ते 23 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन केले आहे. तर 18 एप्रिल रोजी 1 हजार 800 बसेसद्वारे प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे.

 

दि. 18 एप्रिल : कोथरूड डेपो ते डेक्कन, स्वारगेट ते वडगाव धायरी फाटा, स्वारगेट ते शिवाजीनगर (बाजीराव आणि शिवाजी रोड मार्गे), जंगली महाराज रोड, फर्गसन कॉलेज रोड या पाच मार्गांवर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने “डेडिकेटेड लेनद्वारे सेवा दिली जाणार आहे.

दि. 19 एप्रिल : पुणे आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील प्रवाशांसाठी किमान तिकीट दर पाच रूपये आणि कमाल तिकीट दर दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे. तर पुण्यदशम बससेवा पूर्ण दिवस मोफत असेल.

 

दि. 20 एप्रिल : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत महिला प्रवाशांना 10 रुपयांच्या दैनिक पासमध्ये संपूर्ण दिवस प्रवास करता येईल.

Electric Mini Buses : पुणे आणि पिंपरी मनपा 300 इलेक्ट्रिक मिनी बस घेणार  : महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती 

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे आणि पिंपरी मनपा 300 इलेक्ट्रिक मिनी बस घेणार 

: महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती 

पुणे : पुणे महापालिकेला केंद्र शासनाकडून इलेक्ट्रिक बससाठी ८० कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सात मीटरच्या २०० मिडी इ बस भाड्याने घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यास आ मंजुरी दिली. दरम्यान पिंपरी मनपा 100 बस घेणार आहे. अशा दोन्ही मनपा मिळून पीएमपीच्या ताफ्यात 300 इलेक्ट्रिक मिनी बस दाखल होणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी पेट्रोल, डिझेलवरील वाहनांची संख्या कमी व्हावी. त्याऐवजी सीएनजी, ईलेट्रीक वाहनांचा वापर वाढावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडूनही इ व्हेईकल खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. केंद्र सरकारने मोठ्या शहरासाठी हवा गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत इ बसचे प्रमाण वाढावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानीक स्वराज्य संस्थांना निधी देऊन बस भाड्याने तसेच खरेदीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या सुमारे २७५ इ बसचा समावेश आहे. तर ३५० बसेस या डिझेलवर धावणाऱ्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यातील डिझेलवरील बसचे प्रमाण टप्प्याटप्‍प्याने कमी केले जाणार आहे. त्याऐवजी इ बस खरेदी व भाड्याने घेण्याचा प्रयत्न महापालिका करणार आहे.केंद्र शासनाच्या हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमाअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत ३०० बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत. त्यापैकी २०० बसेस या पुणे महापालिका घेणार आहे. इ बस भाड्याने घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या प्रस्तावास आज मान्यता दिली आहे. पुढील दोन तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मध्यवर्ती भागासाठी बस उपयुक्तपुण्याच्या मध्यवर्ती पेठा व इतर भागातील रस्ते हे अरुंद असल्याने मोठ्या बसला अडचणी येत आहेत. त्यामुळे या भागासाठी ७ मीटरच्या २०० बसेस भाड्याने घेतल्या जाणार आहेत.  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ मीटरच्या १४० इ बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता आणखी ५० इ बस घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील काळात पीएमपीएच्या ताफ्यात आणखी २५० बसची भर पडेल, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.

इ बाइकचा प्रस्ताव पुढे ढकलला

 प्रशासनाद्वारे इ बाईक भाड्याने घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. गेल्या आठवड्यात १४ मार्च रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी याप्रस्तावावर टीका करत हा प्रस्ताव शहराच्या फायद्याचा नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनीही प्रशासनाचा हा प्रस्ताव पुढे ढकलला. मात्र, आजच्या बैठकीत सत्ताधारी, विरोधक यांच्यापैकी कोणीही नव्हते. तरीही प्रशासनाने हा प्रस्ताव मान्य न करता पुढे ढकलला आहे. याबाबत आयुक्त कुमार म्हणाले, ‘‘इ बाइकच्या प्रस्तावावर अजून चर्चा अपेक्षीत आहे. इतरांची मते जाणून घेतल्यानंतर याचा निर्णय घेतला जाईल.

Pune Metro : PMPML : मेट्रो स्थानकापर्यंत असणार पीएमपीची पूरक सेवा : जाणून घ्या मार्ग

Categories
Breaking News social पुणे

मेट्रो स्थानकापर्यंत पीएमपीची पूरक सेवा

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील मेट्रो स्थानकापर्यंत नागरिकांना पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलकडून पूरस सेवा देण्याची सोमवारपासून सुरुवात झाली. पुण्यामध्ये दोन तर पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणांहून वर्तुळाकार मार्गावरून ही सेवा कार्यरत राहणार आहे. या बससेवेमुळे नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे. या सेवेसाठी मिडी बसचा उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. या सर्व मार्गावर बसच्या वीस फेऱ्या होणार असून दोन फेऱ्यांदरम्यान ४० मिनिटांची वारंवारिता असेल.

गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक येथून पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा आणि सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरूरे यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवून पूरक सेवेचे उद्घाटन करण्यात आले.  पुणे महामेट्रोचे संचालक विनोदकुमार अग्रवाल, संचालक अतुल गाडगीळ, जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनावणे, पीएमपीएमएलचे महाव्यवस्थापक सुनील गवळी, मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, चंद्रकांत वरपे, जनसंपर्क अधिकारी सतीश गाडे या वेळी उपस्थित होते.

पूरक सेवेचे मार्ग 

  • मार्ग क्र. १ : गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक, संजीवनी हॉस्पिटल, खिलारेवाडी, म्हात्रे पूल, दत्तवाडी, आंबील ओढा, लोकमान्यनगर, टिळक चौक, डेक्कन कॉर्नर, गरवारे महाविद्यालय मेट्रो स्थानक
  • मार्ग क्र. २ : नळ स्टॉप मेट्रो स्थानक, एसएनडीटी, अलंकार पोलीस चौकी, विठ्ठल मंदिर, डी. पी. रस्ता, पटवर्धन बाग, मेहेंदळे गॅरेज, महादेव मंदिर, नळ स्टॉप मेट्रो स्थानक
  • मार्ग क्र. ३ : पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानक, गांधीनगर, एच. ए. कॉर्नर, अण्णासाहेब मगर स्टेडियम, टेल्को कंपनी, के. एस. बी. चौक, पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानक
  • मार्ग क्र. ४ : संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक, वल्लभनगर एसटी स्थानक, फुलेनगर, एमआयडीसी कॉर्नर, पिंपरी डेपो, नेहरुनगर कॉर्नर, डी. वाय. पाटील महाविद्यालय पिंपरी, संत तुकाराम नगर मेट्रो स्थानक
  • मार्ग क्र. ५ : नाशिक फाटा भोसरी मेट्रो स्थानक, सी. आय. आर. टी., एमआयडीसी कॉर्नर, फिलीप्स कंपनी, इलेक्ट्कि भवन, क प्रभाग कार्यालय, ज्योती इंग्लिश स्कूल, नेहरुनगर कॉर्नर, वाय. सी. एम. हॉस्पिटल, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा भोसरी मेट्रो स्थानक
  • मार्ग क्र. ६ : फुगेवाडी मेट्रो स्थानक, मार्शल कंपनी, कासारवाडी, कासारवाडी रेल्वे स्थानक, दत्त मंदिर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव मनपा शाळा, काटेपूरम चौक, शितळादेवी चौक, सीएनजी पंप, फुगेवाडी मेट्रो स्थानक

International Women’s Day : PMP Free Bus : महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही? 

Categories
Breaking News PMC पुणे

महिला दिनानिमित्त महिलांना पीएमपीचा  मोफत प्रवास करता येणार नाही?

: प्रशासकीय मान्यतेविना प्रस्ताव रखडणार!

पुणे : 8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Women’s day)  म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आणि या वर्षांपासून 8 मार्च दिवशी पीएमपीच्या (PMPML)  सर्व बसचा प्रवास शहरातील सर्व महिलांसाठी मोफत (free)  असेल. याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या (Women and child welfare committee)  बैठकीत मान्य करण्यात आला आहे. त्यानंतर आज मुख्य सभेत देखील या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे. महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

: मुख्य सभेत एकमताने दिली मंजुरी

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.०८ मार्च २०२२ या सालापासून दरवर्षी पुणे शहरातंर्गत पी.एम.पी.एम.एल.च्या सर्व मार्गावरील बस फेऱ्या संपूर्ण दिवस सर्व महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात. यामध्ये तेजस्विनी बसचा देखील समावेश आहे.   सदरचा उपक्रम यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात यावा. असा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीने मान्य करून तो अंतिम मंजुरीसाठी मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता. सोमवारी सकाळी झालेल्या मुख्य सभेत तत्काळ या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. सर्व पक्षांनी एकमताने हा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर लगेच नगरसचिव विभागाने प्रस्ताव तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी आयुक्त कार्यालयात पाठवला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत आयुक्तांनी यावर निर्णय घेतला नव्हता. आता उद्या ८ मार्च म्हणजे महिला दिन आहे. त्यामुळे महिलांना उद्या मोफत प्रवास करता येणार नाही, असे चित्र दिसते आहे.  महापालिका प्रशासनाकडून हा प्रस्ताव पीएमपी कडे गेलाच नाही.  महापालिका प्रशासन आणि पीएमपी प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Free Bus : Rupali Dhadve : International Womens Day : 8 मार्च ला शहरातील सर्व महिलांसाठी पीएमपीचा मोफत प्रवास! 

Categories
Breaking News PMC social पुणे

8 मार्च ला शहरातील सर्व महिलांसाठी पीएमपीचा मोफत प्रवास!

: महिला बाल कल्याण समितीचा निर्णय

पुणे : 8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Women’s day)  म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त आणि या वर्षांपासून 8 मार्च दिवशी पीएमपीच्या (PMPML)  सर्व बसचा प्रवास शहरातील सर्व महिलांसाठी मोफत (free)  असेल. याबाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या (Women and child welfare committee)  बैठकीत मान्य करण्यात आला आहे. अशी माहिती समितीच्या अध्यक्ष रुपाली धाडवे ( Chairman Rupali Dhadve) यांनी दिली.

: काय आहे प्रस्ताव?

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दि.०८ मार्च २०२२ या सालापासून दरवर्षी पुणे शहरातंर्गत पी.एम.पी.एम.एल.च्या सर्व मार्गावरील बस फेऱ्या संपूर्ण दिवस सर्व महिलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात. सदरचा उपक्रम यावर्षी प्रमाणे दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात यावा.

पीएमपीच्या तेजस्विनी बस सहित सर्व बसमधून 8 मार्च ला शहरातील महिलांना मोफत प्रवास करता येईल. तसा निर्णय महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
: रुपाली धाडवे, अध्यक्षा, महिला बाल कल्याण समिती.

PMPML : Hemant Rasane : Standing Commitee : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा मार्ग मोकळा

: दर माह दिले जाणार 6 कोटी

पुणे : महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणे सुरु झाले आहे. मात्र पीएमपी च्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही. याबाबत वारंवार मागणी देखील केली गेली. याची दखल घेत स्थायी समितीने कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा केला आहे. वाढीव वेतनासाठी संचलन तुटीमधून 6 कोटी रुपये दरमहा अग्रीम स्वरूपात देण्यात येणार आहेत. शिवाय पुढील पाच वर्ष बजेट मध्ये प्रति वर्ष 52 कोटींची तरतूद देखील जाणार आहे. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

: स्थायी समितीने ही उपसूचना मान्य केली

पी.एम.पी.एम.एल.ची सद्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, सातवा वेतन आयोग धर्तीवर सुधारीत वेतन अदा करणेकामी र.रू.६.०० कोटी प्रतिमहा पुढील वर्षी देण्यात येणा-या संचलन तूटीमधून अग्रिम स्वरूपात देणेस त्याचप्रमाणे सुधारीत वेतनश्रेणीची थकबाकी देणेकामी पुणे मनपा हिश्याची रक्कम अंदाजे र.रु.२६१.७६ कोटी होत आहेत. सदरची थकबाकी ७ हफ्त्यात देणेकामी पुढील ५ वर्षाच्या
अंदाजपत्रकात र.रू.७२.३६ कोटी प्रतिवर्ष इतकी तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
 पुणे महानगर परिवहन मंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, पी.एम.पी.एल कामगार युनियन च्या वतीने पुणे महानगरपालिकेस घेराव घालण्यात आला होता. पुणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या प्रमाणे पीएमपीएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा ही ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीमधील सदस्यांनी ठराव दिला होता, त्यानुसार स्थायी समितीने कामगारांना सातवा वेतन आयोग देण्यासाठी ६  कोटी रुपये दिले.
: दिपाली प्रदीप धुमाळ  विरोधीपक्ष नेत्या, पुणे मनपा.