PMU Meeting | Ajit Pawar | पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

PMU Meeting | Ajit Pawar | पुणे मेट्रो मार्गातील अडचणी सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

PMU Meeting |Ajit Pawar| पुणे शहराच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मेट्रो मार्गांबाबत (Pune Metro) आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मेट्रो मार्ग १, २ आणि ३ च्या कामांना गती देण्यात यावी. राजभवन येथील मेट्रो मार्गावर पादचाऱ्यांसाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. याठिकाणी राजभवन परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन स्टील आणि सिमेंट यांचा वापर करून सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात याव्यात. पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक (PCMC Metro Station) ते निगडी मार्गास मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत महामेट्रो, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्यादरम्यानचा त्रिपक्षीय करार तातडीने पूर्ण करावा. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या मागणीनुसार प्रकल्पाच्या कामात काही ठिकाणी सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणांनुसार मेट्रो प्रकल्पाच्या सुधारित प्रकल्प किंमतीस केंद्रीय नगरविकास विभागाची मान्यता आवश्यक आहे. याबाबत केंद्रीय मंत्री महोदयांशी चर्चा करून याबाबतच्या अडचणी सोडविण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पुढील ५० वर्षांचा विचार करून राज्यातील विकासप्रकल्पांची कामे सुरु आहेत. भूसंपादनासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून जमीन देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचे तातडीने वितरण करा. विकासकामे सुरु असलेल्या ठिकाणी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यादृष्टीने कामांचे, वाहतुकीचे नियोजन करून ठरलेल्या वेळेत गतीने कामे पूर्ण करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या (प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनीटच्या- पीएमयू) बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात, ‘उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा’ची बैठक झाली. बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (व्यय) ओ.पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशीष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, वित्त विभागाच्या सचिव शैला ए., सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैसवाल, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव गजानन पाटील आदी उपस्थित होते. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार,  श्रावण हर्डिकर, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवी मुंबईतील उलवे वसाहतीमधील सेक्टर १२ येथे केंद्र शासनाच्या सहकार्याने राज्यातील पहिला ‘युनिटी मॉल’ उभारला जात आहे. यामुळे नवी मुंबई परिसराला भविष्यातील सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांचे व्यापारी केंद्र अशी ओळख मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर युनिटी मॉलचे काम गतीने होण्यासाठी या प्रकल्पाचा समावेश ‘प्रकल्प सनियंत्रण कक्षा’च्या आढावा बैठकीमध्ये करावा.

 

कोकणाच्या पर्यटनाला चालना देणारा रेवस ते रेडी किनारा महामार्ग किनारपट्टीवरील काही गावांतून जातो. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी चार मार्गिकांऐवजी दोन मार्गिका प्रस्तावित करण्याबाबत पुनर्विचार करावा. लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्याकरिता स्कायवॉक आणि टायगर पॉईंट विकासाला गती द्यावी, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा येथील वैद्यकीय महाविद्यालय, अलिबागच्या उसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे बाह्यवळण रस्ता, वडाळा येथील जीएसटी भवन, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे, ‘सारथी’संस्थेचे पुण्यातील मुख्यालय, औंध, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अमरावतीतील ‘सारथी’च्या विभागीय उपकेंद्रांचे बांधकाम, पुणे येथील कृषीभवन, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणीभवन, इंद्रायणी मेडिसिटी आदी प्रकल्पांच्या प्रगतीचा देखील आढावा घेतला.
—–***—–

Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट 

Categories
Breaking News social पुणे

Pune Metro | New Year 2024 | नवीन वर्षाच्या निमित्ताने पुणेकरांना पुणे मेट्रोची भेट

| पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार

Pune Metro | New Year 2024 | १ ऑगस्ट २०२३ रोजी पंतप्रधान यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लीनिक स्थानक आणि फुगेवाडी स्थानक ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक या मार्गाचे लोकार्पण होऊन या मार्गावर प्रवासी सेवेचा विस्तार झाला. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ (पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट) आणि मार्गिका २ (वनाझ ते रामवाडी) मिळून एकूण २४ किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ९ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. (Pune Metro | New Year 2024)

लोकांमधील पुणे मेट्रोचा प्रवासासाठी होणारा वाढता वापर आणि नवीन वर्ष्याच्या निमित्ताने पुणे मेट्रो आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरु असते. यामध्ये सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रोच्या दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर ९ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर १७ तर मार्गिका २ वर १८ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २० फेऱ्या, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २५ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर १० व मार्गिका २ वर ८ फेऱ्या होत होत्या.

पण आता प्रवाश्यांची वाढती संख्या आणि प्रवाश्यांच्या सोयीसाठी नवीन वर्ष्याच्या निमित्ताने पुणे मेट्रो आपल्या प्रवासी सेवेचा विस्तार करीत आहे. १ जानेवारी २०२४ पासून मेट्रो दोन्ही मार्गिकांवर सकाळी ६ ते सकाळी ८ या वेळेत मेट्रो दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १२ फेऱ्या, सकाळी ८ ते ११ दर ७.५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर २४ फेऱ्या, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ वर ३२ व मार्गिका २ वर ३० फेऱ्या, दुपारी ४ ते रात्री ८ या वेळेत दर ७.५ मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर ३२ फेऱ्या आणि रात्री ८ ते रात्री १० या वेळेत दर १० मिनिटांच्या वारंवारतेनी मार्गिका १ व मार्गिका २ वर १३ फेऱ्या प्रत्येक स्थानकावरून उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाश्यांच्या प्रतिक्षेचा कालावधी कमी होऊन त्यांच्या वेळेची बचत होईल. त्याच बरोबर मेट्रोची दिवसांमधील वारंवारता वाढणार आहे. या आधी दिवसभरात मार्गिका १ वर ८१ फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून ११३ फेऱ्या होणार आहेत आणि मार्गिका २ वर ८० फेऱ्या होत होत्या, तर १ जानेवारी २०२४ पासून १११ फेऱ्या होणार आहेत. गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होत्या, तर होत असत तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ८ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होणार आहेत. तसेच कमी गर्दीच्या वेळात मार्गिका १ व २ वर ४ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होत्या तर १ जानेवारी २०२४ पासून मार्गिका १ व २ वर ६ मेट्रो ट्रेन कार्यान्वयीत होणार आहेत.

या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हंटले आहे की, “१ जानेवारी २०२४ पासून होणाऱ्या प्रवासी सेवेच्या विस्तारामुळे मेट्रोच्या प्रवासी वेळेत जास्तीत जास्त लोकांना प्रवास करणे शक्य होणार आहे व वेळेची देखील बचत होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ऑफिस जाण्याच्या/ येण्याच्या वेळेत होणारी गर्दी कमी होईल. “

Swarget Katraj Underground Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Swarget Katraj Underground Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा

 

Swarget Katraj Underground Metro | पुणे|स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे (Swarget Katraj Metro) काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य सरकारच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत (Pune Nagar Road Traffic Congestion) आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre), भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir MLA), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh), पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (Rahul Mahiwal PMRDA), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (Pune ZP CEO Ramesh Chavan), महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC), महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (Atul Gadgil Mahametro)आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा.

अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, नगर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही तातडीने करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बैठकीत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करतांना स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे विचाराधीन आहे. लवकरच त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Swarget Katraj Metro | Pune News | स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार | मंत्री उदय सामंत

Categories
Breaking News Political social पुणे

Swarget Katraj Metro | Pune News | स्वारगेट – कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार| मंत्री उदय सामंत

 

Swarget Katraj Metro | Pune News |नागपूर| पुणे शहरातील स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो (Swarget Katraj Underground Metro) प्रस्तावित आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी विधानसभेत सांगितले. (Swarget Katraj Metro | Pune News)

सदस्य भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांनी पुणे मेट्रो टप्पा १ आणि २ मध्ये स्थानकाची वाढ करण्यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेल्यानंतर राज्य शासन त्याचा पाठपुरावा करून मंजूरी घेईल. खडकवासला ते खराडी (Khadakwasla Kharadi Metro)  हा २५.६५ किमीच्या मेट्रो मार्गाचा डीपीआर राज्य शासनाकडे सादर झालेला आहे. तो देखील मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. या मेट्रोचे शेवटचे स्टेशन खडकवासला धरणापर्यंत असावे अशी मागणी केलेली आहे. त्याची देखील संयुक्त पाहणी झालेली आहे. तो प्रस्ताव फिजिबिलिटी रिपोर्टसह शासनाकडे सादर केलेला असून राज्य शासन त्यावर निर्णय घेईल, असे मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

PCMC to Nigdi Pune Metro | पुणे मेट्रोच्या PCMC ते निगडी मार्गाचे काम ३ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन | विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु

Categories
Breaking News social पुणे

PCMC to Nigdi Pune Metro | पुणे मेट्रोच्या PCMC ते निगडी मार्गाचे काम ३ वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन | विस्तारित मार्गिकेची निविदा प्रक्रिया सुरु

PCMC to Nigdi Pune Metro | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यातील मार्गिका १ आणि मार्गिका २ मिळून एकूण २४ किमी मार्गावर प्रवासी सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ९ किमी मार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले असून लवकरच पुणे मेट्रोची पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गिका प्रवाश्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोतील स्वारगेट ते पिंपरी चिंचवड (Swarget to PCMC Metro)  महानगरपालिका या मार्गिका १ मधील प्रवाश्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी (भक्तीशक्ती चौक) या मार्गाच्या विस्तारीकरणाची निविदा महामेट्रोने शनिवारी प्रसिद्ध केली आहे. (Pune Metro News)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी (भक्तीशक्ती चौक) या विस्तारित मार्गाला केंद्र सरकारने दिनांक २३/१०/२०२३ रोजी मान्यता दिली. या मार्गाची एकूण लांबी ४.५१९ किमी असून या मार्गिकेचा एकूण खर्च ९१०.१८ कोटी इतका आहे. या मार्गाच्या व्हायाडक्तच्या कामाची निविदा प्रकाशित झाली आहे. या संपूर्ण विस्तारित मार्गाचे काम ३ वर्षे आणि ३ महिन्यात पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे.

या मार्गिकेचे बांधकाम स्वीकृती पत्र मिळाल्यापासून १३० आठवड्यात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. हा संपूर्ण मार्ग उन्नत असून या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक ही ४ स्थानके असणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थानक ते चिंचवड स्थानकातील अंतर १.४६३ किमी, चिंचवड स्थानक ते आकुर्डी स्थानकातील अंतर १.६५१ किमी, आकुर्डी स्थानक ते निगडी स्थानकातील अंतर १.०६२ किमी आणि निगडी स्थानक ते भक्ती शक्ती चौक स्थानकातील अंतर ९७५ मीटर असणार आहे. संबंधित निविदेची माहिती पुणे मेट्रोच्या www.punemetrorail.com या अधिकृत संकेतस्थळाला अथवा https://eprocure.gov.in या सीपीपी संकेत स्थळाला भेट देऊन मिळवू शकता. हे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी व्हायाडक्त बांधण्याबरोबरच ठेकेदाराला स्थानकाचे कोनकोर्स व फलाटाच्या स्लॅबचे काम करावे लागणार आहे. यामुळे स्थानकाच्या बांधणीचा वेळ वाचणार आहे. अश्याप्रकारचे नियोजन महामेट्रोमध्ये राबविण्यात येत आहे.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (shravan Hardikar) यांनी म्हंटले आहे की, “या विस्तारित मार्गिकेमुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्तीशक्ती चौक हे विभाग मेट्रो नेटवर्कला जोडले जाणार आहेत. यामुळे त्या भागातील राहणाऱ्या हजारो नागरिकांना त्याचा आहे.”

Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

Pune Metro | PMC Pune |पुणे मेट्रो प्रकल्पातील (Pune Metro Project) रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावर येरवडा हे महत्त्वाचे स्थानक असून, हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. येरवडा मेट्रोस्थानक सुरू झाल्यानंतर या परिसरातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. (Pune Metro | PMC Pune)

येरवडा स्थानक हे पुणे – नगर या राष्ट्रीय महामार्गावर असून तेथे प्रचंड प्रमाणात वाहनांची निरंतर वाहतूक सुरू असते. येरवडा मेट्रो स्थानकात प्रवेश व बाहेर बाहेर पडण्याची रचना तेथील वाहतुकीला सुसंगत व पूरक अशी करण्यात आली आहे. यामुळे येथील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास याची मदत होईल. पुणे मेट्रो व पुणे मनपा यांनी नुकताच यासंबंधी आराखडा बनविला आहे व त्या आराखड्यानुसार लवकरच काम पूर्ण करण्यात येईल.

येरवडा मेट्रोचा स्थानकाच्या दोन्ही बाजूला लिफ्ट, सरकते जिने (एस्केलेटर) आणि पादचारी जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल तसेच प्रवाशांना चांगली सेवा देता येईल.

येरवडा मेट्रो स्थानकापासून पुणे विमानतळ जवळपास ४.८ किमी अंतरावर असून त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळ अशी फिडर बस सेवा पीएमपीएमएलच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे. विमानतळ विशेष फिडर बस थांबण्यासाठी व दोन बस बेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यावर लगेचच विमानतळ बस सेवेचा लाभ घेऊन विमानतळावर जाणे सोयीचे होईल.

मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला (वार्ड ऑफिसच्या बाजूला) महापालिकेची जागा असून तेथे पीएमपीएमएल बस व एमएसआरटीसी बस थांबा करण्यात येणार आहे. जेणेकरून बस थांबलेली असताना महामार्गावरील वाहनांना अडथळा होणार नाही.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) म्हणाले की, ‘पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या संयुक्त नियोजन करून येरवडा स्थानकाचा आराखडा वैशिष्ट्यपूर्ण बनविला आहे. त्यामुळे रस्त्यावरची कोंडी कमी होणार आहे तसेच येरवडा स्थानक वापरणाऱ्या प्रवाशांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन चा फायदा होणार आहे तसेच विमानतळासाठी कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवास जलद होणार आहे’.

Pune Metro | Diwali Laxmipujan| पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना

Categories
Breaking News social पुणे

Pune Metro | Diwali Laxmipujan| पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना

रविवार १२ नोव्हेंबर २०२३ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत असेल. सोमवारपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरळीत सुरू असेल. असे पुणे मेट्रोच्या वतीने सांगण्यात आले.

Pune: On Sunday, November 12, 2023, temporary change in schedule in light of the Lakshmi Pujan. The Pune Metro service will be operational from 6:00 AM to 6:00 PM on both the lines. (PCMC to Civil Court and Vanaz to Ruby Hall Clinic).

From Monday 13th Nov 2023, regular Metro services will resume with normal operating hours, ensuring a seamless commute for the passengers from 6:00 AM to 10:00 pm.

 Pune Metro Phase 2 : PCMC TO NIGDI Extension sanctioned by Centre 

Categories
Breaking News पुणे

 Pune Metro Phase 2 : PCMC TO NIGDI Extension sanctioned by Centre

Pune | In a momentous development, the Government of India has officially sanctioned the next phase of Pune Metro, marking a significant stride towards enhancing the city’s public transportation infrastructure. The sanctioned section, spanning from Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) to Nigdi, covers a total distance of 4.413 km and includes three elevated stations namely Chinchwad,Akurdi, and Nigdi.

The total cost of the project for this route is 910.18 crores and the work of this route will be completed in 3 years and 3 months This approval expands the Pune Metro network to a grand total of 37.613 km, encompassing 33 stations in total.
The natural extension of Pune Metro from Swargate to Pimpri Chinchwad Municipal Corporation and from Pimpri Chinchwad Municipal Corporation to Nigdi was necessary. Therefore, a Detailed Project Report (DPR) was prepared by Pune Metro for the extended route from Pimpri Chinchwad Municipal Corporation to Nigdi and after the approval of Pimpri Chinchwad Municipal Corporation, it was sent to the State and Central Governments. Maha Metro diligently pursued the matter, ensuring all technical requirements were met. Representatives from Pune District continuously monitored and followed up on the progress. Consequently, on 23/10/2023, the Ministry of Housing and Urban Housing, Government of India, granted the ultimate approval.

The Pune Metro project currently has 23.6 km of operational tracks, connecting commuters from PCMC to Civil Court Metro Station and Vanaz to Ruby Hall Clinic, interchanging at civil court metro station. Recently, the Honorable Prime Minister inaugurated the latter stretch.
Maha Metro has already floated tenders for appointing a general consultancy to speed up the work as well as for making a social impact assessment of the project. Soon the tenders for the civil, electrical and signal works will be drawn and the contractors will be appointed and the work will actually start in three to four months.
The PCMC to Nigdi section, this extension will significantly reduce travel time, alleviate congestion, and enhance connectivity for citizens residing in that area. The section’s approval also signifies the commencement of Phase 2 of the Pune Metro project, marking a new chapter in Pune’s journey towards becoming a smart, accessible, and well-connected metropolis.

The newly sanctioned section, spanning 4.413 km, will integrate seamlessly with the existing metro network, ensuring smooth transit for thousands of daily commuters. With the addition of these three stations, Pune Metro’s total station count now stands at 33, catering to diverse travel needs and facilitating effortless movement within the city.
On this occasion, Mr. Shravan Hardikar, Managing Director of Mahametro said, “It is very necessary to extend the route from Pimpri Chinchwad Municipal Corporation to Nigdi. This will connect Chinchwad, Akurdi and Nigdi to the metro network and will benefit lakhs of people living in this area. The work will be completed on schedule, in 3 years and 3 months.”

PCMC – Nigdi Metro | PCMC ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मान्यता 

Categories
Breaking News social पुणे

PCMC – Nigdi Metro | PCMC ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गाला केंद्र सरकारची मान्यता

 

PCMC – Nigdi Metro | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) स्वारगेट ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Swarget -PCMC Metro) या मार्गीकेचा नैसर्गिक विस्तार पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी (PCMC – Nigdi Metro) होणे गरजेचे होते. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या विस्तारित मार्गासाठी पुणे मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनवण्यात आला व पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या (Pimpari chinchwad Municpal Corporation) मान्यतेनंतर राज्य व केंद्र शासनाकडे तो पाठवण्यात आला. महा मेट्रो (Maha Metro) तर्फे त्याचा पाठपुरा करून सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याचा सतत पाठपुरावा चालू ठेवला, त्यामुळे आज  भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी आवास मंत्रालयाकडून अंतिम मान्यता देण्यात आली. अशी माहिती पुणे मेट्रोच्या वतीने देण्यात आली. (Pune Metro New Route)

पुणे मेट्रो ने दिलेल्या माहितीनुसार या मार्गाची एकूण लांबी ४.४१४ किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग संपूर्णतः उन्नत असणार आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी व निगडी ही तीन स्थानके असणार आहेत. या मार्गासाठी एकूण खर्च ९१०.१८ कोटी इतका असून या मार्गाचे काम ३ वर्षे ३ महिन्यांमध्ये पूर्ण होणार आहे.

महा मेट्रोने हे काम जलद करण्यासाठी जनरल कन्सल्टन्सी नेमण्यासाठी तसेच या प्रकल्पाचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बनविण्यासाठी निविदा आधीच काढल्या आहेत. लवकरच यांनी मार्गीकेच्या सिव्हिल, विद्युत आणि सिग्नल या कामासाठीच्या निविदा काढण्यात येऊन ठेकेदारांच्या नेमणूका करण्यात येतील व प्रत्यक्षात तीन ते चार महिन्यात कामाला सुरुवात होईल.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (Maha Metro MD Shravan Hardikar) यांनी म्हटले आहे की, “पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी हा विस्तारित मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो नेटवर्कला जोडले जातील आणि या परिसरात राहणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होईल महा मेट्रो हे काम नियोजित वेळेत, ३ वर्षे ३ महिन्यांत पूर्ण करेल.”

Ajit Pawar | फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा | उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Ajit Pawar | फिनिक्स मॉल ते वाघोली दरम्यान एकात्मिक उड्डाणपूल व मेट्रोसाठी डीपीआर करा | उपमुख्यमंत्री अजित पवार

 

Ajit Pawar | नगर रस्त्यावर (Nagar Road) फिनिक्स मॉल (Phoenix Mall Pune) ते खराडी – वाघोली, सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग उड्डाणपूल (Elevated Flyover) व त्यावर मेट्रोसाठी (Metro) तरतूद अशा पद्धतीच्या रस्त्यासाठी व्यवहार्यता तपासणी व विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister of Maharashtra Aji Pawar) यांनी आज दिले.

रस्ते व मेट्रोच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत श्री. पवार बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मनपा आयुक्त विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, मनपा अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे महानगर पालिकेचे माजी नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे मेट्रोद्वारे (Pune Metro) मास रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (Mass Rapid Transit System) अंतर्गत नगर रोड वरील खराडी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पुलाशी जोडणीबाबत श्री. हर्डीकर यांनी सादरीकरण केले. टप्पा-२ साठी हा विस्तृत प्रस्ताव अहवाल केला असून नगर विकास विभागाकडे पाठविला आहे, असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही गतीने करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

मेट्रोच्या खडकवासला ते स्वारगेटचा प्रकल्प (Khadakwasla-Swarget Metro) अहवाल करण्यात आला असून स्वारगेट ते लोणी काळभोरपर्यंतचा प्रकल्प अहवाल करण्यात यावा. हे करत असताना सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला ते लोणी कालभोरपर्यंत एकात्मिक रस्ते, उड्डाणपूल व त्यावर मेट्रोसाठी तरतूद करावी लागेल. सोलापूर मार्गावरील मोठी वाहनसंख्या पाहता लोणी काळभोर ते उरुळी कांचन या दरम्यानही भविष्यात मेट्रोचा विचार करावा लागेल असेही श्री. पवार म्हणाले.

नगर मार्गावर वाघोली, खराडी आदी परिसरात प्रचंड लोकसंख्या वाढली असून त्यामुळे रहदारी प्रचंड वाढली असून केवळ वाघोली ते खराडी नव्हे तर फिनिक्स मॉलपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान विचारात घेऊन डीपीआर करावा लागेल, याबाबत एनएचएआय, पुणे महानगरपालिका आणि महामेट्रोने समन्वयाने काम करावे, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

श्री. हर्डीकर यांनी मेट्रो कामांबाबत माहिती दिली. वनाझ ते रामवाडीपर्यंत ची पूर्ण मेट्रो मार्गिका डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण व कार्यान्वित होण्याचे प्रस्तावित आहे. यावरील स्थानकांना पीएमपीएमएल बसेसची चांगली जोडणी झाल्यानंतर मोठी प्रवासी संख्या मेट्रोकडे वळेल, असेही त्यांनी सांगितले.