Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Jharkhand Congress | झारखंडमधील काँग्रेस खासदाराकडील ३०० कोटींचे घबाड ही तर काँग्रेसी भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक! | माधव भांडारी

 

 

Jharkhand Congress | भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली तीनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे, तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती दावा भाजपचे  माधव भांडारी  (Madhav Bhandari)  यांनी पत्रकार परिषदेत केला.

झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात ही कोट्यवधींची रोकड सापडली, तर या हिशेबाने काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असेल? याचा हिशेब जनतेने करावा असेही भांडारी म्हणाले.या हिशेबानुसार, गांधी परिवार हा जगातील सर्वात भ्रष्ट परिवार ठरेल, असा आरोपही त्यांनी केला. (BJP Pune)

जेथे जेथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचा आहे, तेथे तेथे भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे, आणि जेथे भाजप आहे, तेथे स्वच्छ कारभाराची गॅरंटी आहे, असेही श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेसच्या नेते, कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच, तर त्याचे नाव गांधी करप्शन सेंटर असे ठेवावे, असा उपरोधिक सल्लाही श्री. भांडारी यांनी दिला. या परिवाराकडूनच काँग्रेसींना भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण दिले जाते का, असा सवालही त्यांनी केला. या सेंटरमधून प्रशिक्षण घेतलेल्यांच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जातो त्याचा हिशेब द्या, अशी मागणी करून ते म्हणाले की, देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणाऱ्या मोदी सरकारने आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याखेरीज स्वस्थ बसू नये. काँग्रेसच्या एका खासदाराकडे कपाटे ओसंडू वाहतील एवढा काळा पैसा असून ज्यांच्या कृपेने हे नेते बनले त्या गरीब जनतेचे डोळे या संपत्तीने दिपून गेले असतील.

भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयटीसारख्या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. झारखंडमधील सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराचा हा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यादेखत उघडकीस आल्याने आता त्यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या सत्तेला खडे बोल सुनावले. इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्वांचा इतिहास भ्रष्टाचाराचाच आहे. बेंगलुरूमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीच्याच घरी ४२ कोटींचे घबाड सापडले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते, तर अरविंद केजरीवाल यांचा इमानदार साथीदार सत्येंद्र जैन याच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे, असे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना उघडकीस आलेल्या महादेव ऑनलाईन जुगारातील हप्तेखओरी प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र्यांचेच हात बरबटले होते, म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवून मोदींच्या गॅरंटीवर गाढ विश्वास व्यक्त केला, असे श्री. भांडारी म्हणाले. काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्याठगबंधन सरकारने मनरेगामध्ये साडोपाचशे कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदी की गॅरंटी ही केवळ निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या मोदी सरकारच्या गॅरंटीने कांग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही भंडारी यांनी व्यक्त केला.

Pune Should be No. 1 City | पुणे शहर भारतामधील पहिल्या क्रमांकाचे शहर केले जाणार

Categories
Breaking News social पुणे

Pune Should be No. 1 City | पुणे शहर भारतामधील पहिल्या क्रमांकाचे शहर केले जाणार

| ‘पुणे विकास व लोक कल्याण समिती चा पुढाकार

Pune Should be No. 1 City |   ‘पुणे शहर भारतामधील पहिल्या क्रमांकाचे शहर व्हावे’ (Pune Should be No. 1 City in India) या उद्देशासाठी ‘Mandke Human Happiness Foundation’ यांच्या पुढाकाराने ‘पुणे विकास व लोक कल्याण समिती’च्या (Pune Vikas ani Lok Kalyan Samiti)  माध्यमातून हे काम केले जाणार आहे. सुधीर मांडके (Sudhir Mandke) यांची ही संकल्पना आहे. (Pune Should be No. 1 City)

यामध्ये सुधीर मांडके, माजी IAS अधिकारी महेश झगडे, पोलीस ट्रॅफिक कमिश्नर विजयकुमार मगर, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मंजू फडके, लायन्स क्लब गव्हर्नर श्री. विजय भंडारी, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष श्री. मधुकर पवार, माजी आईएएस व साहित्य संमेलन अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. राजन जोशी, अभिनेता सुबोध भावे, श्री. बाबासाहेब कल्याणी व अनेक उद्योजक, निरनिराळ्या एनजीओ, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विकास आचलकर, मोठ्या प्रमाणात बिल्डर्स, पुणे शहराचे कामकरणारे महत्वाचे काँट्रॅक्टर्स आणि सर्व ५० लाख पुणेकर या मिशनमध्ये सहभागी आहेत. (Pune News)
याबाबत सुधीर मांडके यांनी सांगितले कि, पुण्यामध्येवेगवेगळ्या क्षेत्रांतील (आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, संरक्षण, कायदा, राजकीय, मनोरंजन, लायन्स क्लबचे पदाधिकारी, रोटरी क्लबचे पदाधिकारी, को-ऑपरेटिव्ह सोसायटींचे पदाधिकारी, पुण्यातील सर्व उद्योजक इत्यादी) अनेक जाणकार नागरिक यात सहभागी आहेत. पुण्याची माहिती असणारे, पुण्याच्या समस्यांची जण असणारे, या समस्यांवर उपाय सुचविणारे, जनजागृतीसाठी उस्फुर्तपणे सहभागी होणारे अनेक सुजाण नागरिक एकत्र येऊन गेली काही वर्षे काम करत आहेत. पुणे शहर केवळ महाराष्ट्राच नाही, भारत देशासाठी मार्गदर्शक ठरेल अशा योजना राबविण्याचा आमचा उद्देश आहे. आपल्या पुण्याचा सर्वांगीण विकास हा एकच विचार सर्व पुणेकरांचा असायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांच्या साहाय्याने प्रयत्न केले आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःचा खारीचा वाटा उचलला तर यश नक्की येईल.
मांडके पुढे म्हणाले. पुण्यातील समस्यांवर उपाय सुचविण्याचे काम ‘पुणे विकास व लोककल्याण समिती’ गेली काही वर्षे करत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिक जेव्हा या शहराला स्वतःच्या घराचे अंगण समजून सूज्ञपणाने काम करेल तेव्हा पुण्याच्या विकासाचा उद्देश सध्या हुईल. पुण्याचे प्रश्न सर्वांनाच माहिती आहेत पण त्यावर जाणकार लोकांच्या मदतीने उत्तरे शोधून त्यावर कृती करणे आवश्यक आहे. उदा. पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगातून वाहतूक समस्येवर उत्तर शोधणे. काही महत्वाच्या गोष्टी आपण उस्फुर्तपणे केल्या तर सर्व आपोआप घडेल. त्यामुळे आपण सर्वजण मिळून सर्व प्रकारचे नियम पाळूयात, पाणी आणि वीज तारतम्याने वापरूयात जेणे करून त्याची प्रचंड प्रमाणात बचत
होईल.
मांडके यांनी पुढे सांगितले प्रत्येक विषयासाठी एक कमिटी बनवण्यात येणार आहे. उदा. पुण्यातील सर्व शिक्षण संस्थांचे (शाळा, महाविद्यालये) प्रमुख आणि मा. शिक्षण मंत्री यांची एक कमिटी बनवून त्यांची बालगंधर्व रंगमंदिर येथे लवकरच एक मिटिंग होणार आहे. अशा जवळपास ३० कमिटी बनवून हे काम चालणार आहे. ही सर्व कामे प्रत्येक पुणेकर सोबत असल्या शिवाय होणार नाहीत. त्यामुळे यात लोकांचा सहभाग महत्वाचा असणार आहे. असेही मांडके यांनी नमूद केले. शहरातील जवळपास 70 हून अधिक समस्यांवर ही समिती काम करणार आहे. असेही मांडके यांनी सांगितले.

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड 

Categories
Breaking News PMC social पुणे

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड

Plastic Use Ban | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्रात प्लास्टिक वापराबाबत नियमांच्या तरतुदी लागू आहेत. त्यास अधीन राहून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने करण्यात आले आहे. अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे. (PMC Pune News)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २१६ च्या नियम ४ (२) नुसार (सुधारित केल्यानुसार ), “पॉलीस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह खालील एकल वापराच्या प्लास्टिक (SUP) चेउत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर दिनांक १ जुलै २०२२ पासून प्रभावीपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)

अ) प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणा-या प्लास्टिकच्या  काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन;
ब) प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, पेंढा, ट्रे, मिठाईचे बॉक्सेस, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर इ. (PMC Solid Waste Management Department)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या नियम ४(१) (क) नुसार (सुधारणा केल्यानुसार ) “व्हर्जिन किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकची कॅरी बॅग दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून पंचाहत्तर (७५) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून एकशे वीस (१२०) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार, संपूर्ण राज्यात हँडलसह आणि हँडलशिवाय प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या सर्व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्था/ कंपन्यांना खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

प्लास्टिकचे उत्पादन, वितरण, साठवण, विक्री किंवा प्लास्टिक वस्तू किंवा थर्माकोलचा वापर केल्यास किंवा पहिल्या वेळी ५०००/- दंड/तडजोड शुल्क, दुस-या वेळी १००००/-, तिस-या वेळी २५०००/- व तीन महिन्यांची कैद

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र वरील नियमांच्या तरतुदी आणि सुधारणांसह अधिसूचना लागू आहेत आणि सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने (मॉल्स/बाजारपेठे/शॉपिंग सेंटर/सिनेमा घर/पर्यटन ठिकाणे ) यांना सूचित करण्यासाठी जारी केले जात आहेत. शाळा/महाविद्यालये/कार्यालयीन ठिकाणे/रुग्णालये आणि इतर संस्था) आणि सामान्य जनतेने बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा,
विक्री, वाहतूक, वितरण किंवा वापर त्वरीत बंद करावा हे सर्व नागरिकांस आवाहन करण्यात आले आहे.

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal | पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा | गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

Categories
Breaking News cultural social पुणे

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal | पैशाचा पाऊस हा जादूटोणाविरोधी गुन्हा | गुन्हा दाखल करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीची मागणी

 

Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal |पुणे : अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार करून पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडतो असे सांगून भोंदूबाबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हडपसर परिसरातील एका युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा सगळा प्रकार महाराष्ट्रात लागू असलेल्या जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा असून या कायद्याच्या कलम 3 नुसार भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते विशाल विमल यांनी केली आहे. (Andhshradhha Nirmoolan Samiti | Vishal Vimal)

युनिव्हर्सल शाळेशेजारी असलेल्या एका बंगल्यामध्ये भोंदूबाबा पूजा मांडून बसला होता. पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून १८ लाख रुपये भरा, त्याचे तुम्हाला ५ कोटी रुपये करून देतो असे आमिष त्याने दिले होते. अधिक पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून चमत्कार जादूटोण्याच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने १८ लाख रुपये बाबाला दिले. त्यांनतर तोतया पोलिसांचे पथक तेथे आले आणि ते १८ लाख रुपये व भोंदूबाबाला घेऊन गेले. मात्र पोलिस हे तोतया असून भोंदूबाबा आणि सहकाऱ्यांनी ही एकत्रित येऊन फसवणूक केल्याचे तरुणांच्या नंतर लक्षात आले. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे. यासंबंधी तरुणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे. भोंदूबाबा आयरा शाब, माधुरी मोरे, रॉकी वैद्य, किशोर पांडागळे यांच्याविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितेच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यात जादूटोणाविरोधी कायद्याची कलमे समाविष्ट केलेली नाहीत.

पैशाचा पाऊस पाडण्याचा चमत्कार घडवून आणण्याचा दावा करून त्यासाठी आर्थिक फसवणूक करणे हा महाराष्ट्रात १० वर्षांपासून लागू असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. युवकाची १८ लाख रुपयांची फसवणूक करून चमत्काराद्वारे पाच कोटी रुपयांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखविणे हा जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 3 स्वरूपानुसार गुन्हा आहे. त्यामुळे भोंदूबाबा आणि या फसवणूक प्रकारात सहभागी असणाऱ्या सहकाऱ्यांविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विशाल विमल यांनी केली आहे.

पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वेळीअवेळी पाऊस का पडतो आणि त्याच्यामागे असलेल्या कार्यकारणभावाची माहिती प्राथमिक शाळेत मिळते. मात्र आपल्या समाजात हा कार्यकारणभाव अजूनही लक्षात घेतला जात नसल्याने पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषावर लोक विश्वास ठेवत आहेत. पैशाच्या पावसातून आर्थिक प्राप्ती होणार यासाठी स्वतःची आर्थिक फसवणूक करून घेत आहेत, ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे, असेही विशाल विमल यांनी सांगितले.

Eknath Shinde Foundation | दोन्ही फुफ्फुस निकामी झालेल्या शेतमजूर गरीब मुलीच्या मदतीला धावून आले एकनाथ शिंदे फाउंडेशन..!!

Categories
Breaking News Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Eknath Shinde Foundation | दोन्ही फुफ्फुस निकामी झालेल्या शेतमजूर गरीब मुलीच्या मदतीला धावून आले एकनाथ शिंदे फाउंडेशन..!!

 

Eknath Shinde Foundation | पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयातील (Pune Sasoon Hospital) श्वसनरोग विभागात उपचार घेत असलेल्या नीलम जाधव या अत्यंत गरीब मुलीच्या उपचाराचा खर्च व औषधोपचारासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशन (Eknath Shinde Foundation) आता पुढे आलं असून या मुलीच्या वैद्यकीय खर्चासाठी तातडीने एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने एक लाख रुपयांची तात्काळ मदत करण्यात आली. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी दिली.

तसेच फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी ही एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने उपचार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यावेळी एकनाथ शिंदे फाउंडेशनचे प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की गेल्या सहा महिन्यांपासून ससून हॉस्पिटलमध्ये नीलम उपचार घेत असून तिचे दोन्ही फुफ्फुस निकामी झाली असून तिला आम्ही एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या वतीने सर्वतोपरी मदत करणार आहोत. तसेच प्रत्यारोपणाची सुविधा असलेल्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी सुद्धा तातडीने प्रयत्न करणार आहोत. नीलम जाधव यांना लागणारी सर्व वैद्यकीय मदत देण्यासाठी एकनाथ शिंदे फाउंडेशन ची टीम सातत्याने प्रयत्नशील असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील असून त्यांच्या दिलेल्या सेवेच्या मार्गांवरच एकनाथ शिंदे फाउंडेशन मार्गक्रमण करत आहे. यावेळी नीलमचे वडील नानासाहेबजाधव, लहान बहीण पल्लवी व दिलशाद अत्तार उपस्थित होत्या.

Viksit Bharat Sankalp Yatra | विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Viksit Bharat Sankalp Yatra | विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ

Viksit Bharat Sankalp Yatra | केंद्र सरकार च्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नोंदणी करण्या करता  २८ नोव्हेंबर ते २६ जानेवारी अशा दोन महिन्यांच्या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा होत आहे. या यात्रेचा शुभारंभ आज श्री कसबा गणपती मंदिर (Kasba Ganpati)  येथुन झाला* ही यात्रा पुण्यातील १२५ चौकात जाऊन केंद्र सरकार च्या विविध योजनेची माहिती, नोंदणी येत्या दोन महिन्यात करणार आहे. या यात्रेचा शुभारंभ पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार (IAS Kunal Khemnar), शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) , माजी स्थायी समिती अध्यक्ष व कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने ,माजी नगरसेवक योगेश समेळ यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये झाला.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले की ‘केंद्र सरकार ने विविध योजना सामान्य नागरिकांच्या साठी जाहीर केल्या त्या नुसत्याच जाहीर न करता प्रत्यक्षात अंमलात आणल्या जातात याचा मनस्वी आनंद होत आहे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचा असलेला दृष्टीकोन हा उद्याचा उज्वल भारत घडविणारा आहे म्हणूनच भारताची यशस्वी वाटचाल चालू आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी या यात्रेची सविस्तर उद्देश व माहिती दिली यावेळी जास्तीतजास्त नागरिकांनी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले . यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Marathwada Janvikas Sangh  | कार्तिकी वारी निमित्त मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा कपडे व मिठाई देऊन सन्मान  

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

Marathwada Janvikas Sangh  | कार्तिकी वारी निमित्त मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने आरोग्य कर्मचाऱ्यांचा कपडे व मिठाई देऊन सन्मान

 

Marathwada Janvikas Sangh | पिंपळे गुरव (Pipmle Gurav) येथील मराठवाडा जनविकास संघाच्या (Marathwada Janvikas Sangh) वतीने कार्तिकी वारीचे (Kartiki Wari) औचित्य साधून पंढरपूरमधील (Pandharpur) 95 आरोग्य कर्मचारी महिलांना साडी व पुरुषांना पोशाख, मिठाई देऊन सन्मान करण्यात आला. (Marathwada Janvikas Sangh)

सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव कोरके, मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, ह.भ.प. निर्मलाताई थिटे, धारूरचे लोकनियुक्त ,सरपंच बालाजी पवार, आशाताई पवार, गणेश पवार ,आशिष पवार, अभिषेक पवार, वैष्णवी पवार, पंढरपूर देवस्थान मंदिर समितीतील कर्मचारी दशरथ देवकुळे, सुरेखा ढेरे आदी यावेळी उपस्थित होते.

वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, की समाजात वावरत असताना आपल्याला समाजातील अनेक असंघटित व दुर्लक्षित घटक दिसून येतात. कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येतात. यामध्ये संपूर्ण शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यांवर असते. कचरावेचक, साफसफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक हे घटक समाजासाठी खूप काम करत असतात. सकाळी लवकर उठून पहाटेपासूनच मंदिरातील स्वच्छता, छोटे गल्ली रस्ते, मंदिर परिसर स्वच्छ करतात. त्यामुळे त्यांचा सन्मान झाला पाहिजे, या दृष्टीने त्यांचा पोशाख, साडी व मिठाई देऊन सन्मान करण्यात आला.

PMC DI Ashish Supnar | पुणे महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक आशिष सुपनार यांना महात्मा फुले कार्यगौरव पुरस्कार

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC DI Ashish Supnar | पुणे महापालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक आशिष सुपनार यांना महात्मा फुले कार्यगौरव पुरस्कार

|  ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची
माहिती

PMC DI Ashish Supnar | खानवडी (ता. पुरंदर) येथे सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) विभागीय आरोग्य निरीक्षक आशिष माणिकराव सुपनार यांना राज्यस्तरीय महात्मा फुले प्रशासकीय कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषदेच्या वतीने महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे . पुणे जिल्हा परिषदेत दुर्गम भागात 4 वर्ष उत्कृष्ठ आरोग्य सेवा केली आहे.
सुपनार यांनी पुणे महानगरपालिकेत 12वर्षे सेवा करीत सर्व सामान्य नागरिकांच्या तक्रार निवारण करीता त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. कोरोना काळात अनेकांचे प्राण वाचवण्यात मोलाचे योगदान दिले. सामाजिक कामात त्यांचा नेहमी सहभाग असतो. उरुळी कांचन येथील सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात त्यांचा नेहमी पुढाकार असतो.

Pramod Nana Bhangire | महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी | आमदार भरतशेठ गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pramod Nana Bhangire | महम्मदवाडीचे आता होणार महादेववाडी | आमदार भरतशेठ गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| मुख्यमंत्र्याचा सकारात्मक प्रतिसाद

Pramod Nana Bhangire | हडपसर विधानसभा मतदारसंघातील (Hadapsar Constituency) महंमदवाडी  (Mohammadwadi) या भागाचे नामकरण महादेववाडी (Mahadevwadi) करावे अशी मागणी शिवसेना पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार भरतशेठ गोगावले  (MLA Bharatsheth Gogawale) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. लवकरच आता महंमदवाडी या गावाचे नाव महादेव वाडी होण्यास मदत होईल. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी दिली.
दरम्यान याबाबत मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे. तसेच महापालिका आयुक्तांना याबाबत तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव लवकरच मान्य होईल. असा विश्वास भानगिरे यांनी व्यक्त केला.

Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मधील अवैध धंद्यांना बसणार चाप

Categories
Breaking News social पुणे

Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मधील अवैध धंद्यांना बसणार चाप

| कारवाई करण्याचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे पोलिस निरिक्षकांना निवेदन

| येरवडा पोलिस प्रशासनाचे कारवाईचे आश्वासन

 

Dr Siddharth Dhende | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal corporation) प्रभाग क्रमांक दोन (Ward no 2) मधील अवैध धंद्यांना आता चाप बसणार आहे. अवैध धंद्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr Siddharth Dhende) यांनी येरवडा पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात दिला. त्याची दखल घेत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बाळकृष्ण कदम यांनी डॉ. धेंडे यांना दिले आहे.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. तरूणाई व्यसनांच्या आहारी गेली आहे. यामध्ये प्रामूख्याने पंचशील नगर, चंद्रमा नगर, जाधव नगर, राजीव गांधीनगर, पाटबंधारे वसाहत, अहिल्या सोसायटी, करुणा सोसायटी, आंबेडकर कॉलनी परिसरातील नागरिकांनी सातत्याने तक्रारींचे गार्‍हाणे मांडले होते. या परिसरात बेकायदेशीर मद्यविक्री (दारु), जुगार, मटका तसेच नशा आणणारे ड्रग्स यांची विक्री होत असल्याचे नागरिक सांगत आहेत. यामुळे या परिसरात सातत्याने हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. गुंडांकडून परिसरात भिती पसरवली जाण्याचे प्रकार होत आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

भीतीपोटी नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्याकडे पाठ फिरवत आहेत. लहान मुले व तरुणाई व्यसनांना बळी पडत आहेत. नशेच्या आहारी गेल्यामुळे एक पिढी वाया जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर वारंवार वाद होणे. महिलांना व जेष्ठांना असुरक्षेतेची भावना निर्माण झालेली आहे. या बेकायदेशीर व्यवसाय करणार्‍यांना काही जण आर्थिक व राजकीय पाठबळ देत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अवैध धंदे करणार्‍यांवर तसेच गुंडांवर जरब बसवावे, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी निवेदनाद्वारे केली. अन्यथा नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या बाबत त्वरीत कार्यवाही करून अवैध धंदा करणार्‍यांवर कारवाई करू, असे आश्वासन पोलिस निरिक्षक कदम यांनी दिले असल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.
——————-
डिसेंबर रोजी वॉर्ड सभेचे आयोजन* –

प्रभाग क्रमांक दोन मध्ये डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने वॉर्ड सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, पुणे महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाचे अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रभागातील विद्युतच्या अडचणी, खराब रस्ते, चौकांची झालेली दुरवस्था, अवैध धंडे आदीसह विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यावर त्वरीत योग्य तोडगा काढण्यासाठी चर्चा होणार आहे.
———————-

प्रभागात अवैध धंदे करणार्‍यांची संख्या वाढली आहे. तरूणाई व्यसनांच्या आहारी गेली आहे. त्यामुळे परिसरात भांडणे, हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या बाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्याची दखल घेत मी निवेदन दिले आहे. अवैध धंदे बंद करून संबंधीतांवर कारवाईची मागणी केली आहे. त्याची कार्यवाही न झाल्यास नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडणार आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
—————————-