Pradhanmantri Matru Vandana Yojana | तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Categories
Breaking News Education Political social महाराष्ट्र

Pradhanmantri Matru Vandana Yojana | तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण

 

Pradhanmantri Matru Vandana Yojana | केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी (Women Empowerment) प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस (Anganwadi Sahayak) यांना अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika)  पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ (CM Eknath Shinde) शिंदे यांनी दिली. आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते राज्यातील प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतील (Pradhanmantri Matru Vandana Yojana) ८ लाख १४ हजार मातांना ३२१ कोटी ५७ लाख रुपयांचे ऑनलाइन वितरण करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. मुंजपरा महेंद्रभाई, कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, आमदार आशिष शेलार, केंद्रीय सचिव इंदेवर पांडे, राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बालविकास आयुक्त रुबल अग्रवाल आदींसह महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, महिला या मातृशक्ती असून समाज, नवीन पिढी घडविण्याचे काम करीत असल्याने ती आदिशक्तीही आहे. केंद्र सरकारच्या मदतीने महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार तत्पर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये महिलांना आरक्षण देवून त्यांचा सन्मान केला आहे. स्वच्छ भारत ही मोहीम राबवून घरोघरी लाखो शौचालयांची निर्मिती केली. महिला समर्थ होतील, तरच देशाची प्रगती होईल, हे ओळखून प्रधानमंत्री देशातल्या दुर्बल महिलांना स्वत:च्या पायावर सन्मानाने उभे करीत आहेत. ग्रामीण भागात लाखो महिलांच्या नावाने घरे करण्यासाठी पीएम आवास योजनेतील घरांवर महिलांची नावे आली आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतिहासात प्रथमच पोषण ट्रॅकर सुरु करून माता- मुलांना योग्य रीतीने पोषणाची सेवा मिळते किंवा नाही याची तपासणी सुरु केली. गेल्या दीड वर्षात राज्य शासनानेही महिलांच्या कल्याणासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना राबवित असून 1 एप्रिल 2023 नंतर गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना लखपती करणार आहे. प्रधानमंत्री यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबवून महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील महिलांना एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सवलत, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, महिलांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’सारख्या योजनेत एक कोटी ४० लाख महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ३० लाख ४० हजार उद्दिष्ट असताना सुमारे ३५ लाख महिलांना लाभ देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचे नवीन पोर्टल, मोबाईल अॅप, ऑनलाइन बेनिफिटचा शुभारंभ सुरू केला. दोन कोटी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करणार असून बचत गटांना सक्षम करण्यासाठी पदार्थांच्या विक्रीसाठी योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारप्रमाणे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये दिले जात आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे बळकटीकरण करण्याचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभागाच्या अडचणी, प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

अंगणवाडी सेविकांच्या विम्यापोटीचा हप्ता केंद्र शासन भरणार – स्मृती इराणी

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती इराणी म्हणाल्या की, राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरेल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. शहरी भागामध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी एक हजार पाळणाघरे सुरू करण्यास केंद्र शासनामार्फत लवकरच आदेश निर्गमित करण्यात येतील. आपदग्रस्त महिलांसाठी राज्यांमध्ये 40 पेक्षा जास्त वन स्टॉप सेंटर सुरू आहेत. या वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून 38 हजार संकटग्रस्त महिलांना मदत झाली. राज्य शासनाच्या निर्भया फंडाबाबत केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री डॉ.महेंद्रभाई म्हणाले की, महिलांच्या शाश्वत विकासासाठी पूरक पोषण आहार देणे, शिक्षण विषयक धोरणे प्रभावीपणे राबविणे, लैंगिक समानतेसाठी काम करणे, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या योजना केंद्र सरकारद्वारे राबवल्या जात आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या माध्यमातून एक सशक्त आणि सक्षम भारत निर्माण होण्यासाठी ही योजना सर्वांच्या सहकार्याने प्रभावीपणे राबवूया, असे आवाहन त्यांनी केले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना प्रभावीपणे राबवणार – मंत्री कु.आदिती तटकरे

महिला व बालविकास मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, माता व बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी महिला व बालविकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम सुरू आहे. आदिवासी पाड्यांमध्ये महिलांना संस्थात्मक प्रसूती होताना अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. आदिवासी पाडे मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना सुरू केली आहे. याद्वारे 17 आदिवासी जिल्हे मुख्य रस्त्यांशी जोडण्यात येणार असून मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून सर्व शासनाच्या योजना एकाच छताखाली राबवल्या जाणार आहेत. लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये चौथ्या महिला धोरणाची लवकरच राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेवटच्या बालकापर्यंत महिला व बाल विकास विभाग पोहोचत असून अंगणवाडी आणि मदतनीस यांच्या माध्यमातून सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची माहिती पुस्तिका, नवीन वेब पोर्टल आणि मोबाईल अॅपचे मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

०००००

Smriti Irani | पुणे महिला काँग्रेसच्या वतीने स्मृती इराणी यांच्या वक्तव्यावर जाहीर निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Smriti Irani | पुणे  महिला काँग्रेसच्या वतीने स्मृती इराणी यांच्या  वक्तव्यावर जाहीर निषेध आंदोलन

  Smriti Irani | केंद्रिय मंत्री स्मृती इराणी (Central Minister Smriti Irani) या पवित्र लोकसभेला सुद्धा आपले कला श्रेत्र समजुन आपला अभिनय सादर करत दोन महिन्यांपासुन जळत असलेल्या मनिपुर मध्ये (Manipur violence) घडलेल्या दुर्देव्यी घटनेबद्दल भ्र शब्द न काढता इतर गोष्टींमध्ये विषयांतर करत देशातील जनतेची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करित आहेत. जनता अश्या या भुलथापांना बळी न पडता मनिपुर दुर्घटनेतील आमच्या भगिनींना न्याय मिळवुन देण्यासाठी व एक स्त्री असुन सुद्धा नेहमीच स्त्री विरोधात कारवाई करणार्‍या केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांचा व केंद्र सरकारचा निषेध  पुजा मनिष आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस (Pune Women Congress) कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे. गुडलक चूक, कलाकार कट्टा इथे हे निषेध आंदोलन आज दिनांक २८/०७/२३ रोजी सकाळी ११:०० वा पार पडले. (Smriti Irani)
    कलाकारांचा आम्ही नेहमी आदर करतो. संविधानिक पदावर असणाऱ्या मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध बोलणं अपेक्षित होत. परंतु सवयीप्रमाणे नौटंकी करून दिशाभूल केली. यामुळे समस्त महिलांमधे नाराजी आहे. तसेच, पंतप्रधान मोदी हे क्राईम मिनिस्टर आहेत. भाजपा भगाव,  संविधान बचावचा नारा देत आपले मत मोहन दादा जोशी यांनी व्यक्त केले.
    ज्या देशाचा स्वातंत्र्य लढा महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाने महिला एकत्र येवून लढल्या. आज त्याच भारतात भाजपाचे नेते, पदाधिकारी महिलांवर अत्याचार करतं आहेत. या संवेदनशील विषयावर पंतप्रधान बघ्याची भूमिका घेत आहे.
इराणी या मनुस्मृती इराणी आहेत. महिला विरोधी धरण त्या राबवत आहेत. महिला बालविकास मंत्री म्हणून त्यांना त्याचे कर्तव्य आठवतं नाही. महिलांवर होणारे अन्याय,  अत्याचार हा राजकीय मुद्दा म्हणून इराणी या कडे पहातात. महिलांच्या सन्मानाखातर समस्त काँग्रेस पक्ष हा लढा देत आहे. मणिपूर मधील महिलांवर झालेला अत्याचार, हिंसा व बळी हे आरएसएस प्रणित भाजपाच्या भ्रष्ट व हिंसक कृतीला काँग्रेस प्रेम व शांती प्रस्थापित करून  उत्तरं देईल. संविधान हटवून मनुस्मृती लागू करण्याचे भाजपचे प्रयत्न हाणून पाडू. असे मत प्राची दुधाने यांनी व्यक्त केले.
    राजश्री अडसूळ यांनी प्रास्ताविक केले तर प्रियांका रणपिसे यांनी आभार व्यक्त केले.
   मा. मोहन दादा जोशी (उपाध्यक्ष महा.प्रदेश काँग्रेस),
प्राची दुधाने (उपाध्यक्ष पुणे शहर महिला काँ.), स्वाती शिंदे
(सरचिटणीस महा. महिला काँ.),
प्रियांका रणपिसे(एस.सि. उपाध्यक्ष प्रदेश), अश्विनी गवारे, रेश्मा शिलेगावकर, राजश्री अडसूळ, प्रियांका मंदाळे, अंजली सोलापूर, ज्योती चंदेवळ, ज्योती परदेशी, पपिता सोनावणे, शिवानी माने, मंदाकिनी नलावडे, मनीषा करपे, सुरेखा मारणे, पौर्णिमा भगत, सारिका मुंडावरे, मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.
News Title | Smriti Irani | Public protest movement on behalf of Pune Mahila Congress against Smriti Irani’s statement

Congress Pune | स्मृती ईराणी यांच्या विरोधात पुणे महिला कॉंग्रेसचे आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे

स्मृती ईराणी यांच्या विरोधात पुणे महिला कॉंग्रेसचे आंदोलन

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा  सोनिया गांधी यांच्या विरोधात काल संसदेमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी घोषणा देऊन अपमान केला. स्मृती ईराणी यांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन गोंधळ घातला. हातवारे करीत पूर्ण सदन डोक्यावर घेतले होते या कृत्याच्या निषेधार्थ आज महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवन येथे ‘माफी माँगो माफी मांगो स्मृती ईराणी माफी मांगो, भ्रष्टाचारीणी स्मृती ईराणी या घोषणा देऊन निषेध आंदोलन करण्यात आले.

      या प्रसंगी निषेध व्‍यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी म्हणाल्या की, ‘‘बेकायदेशिरपणे बार चालविणाऱ्या स्मृती ईराणीने आमच्या नेत्या मा. सोनियाजी गांधी यांच्याबद्दल माफी माँगो हे बोलणे हस्यास्पद आहे. सोनियाजी गांधी या त्यागमूर्ती असून देशाचे पंतप्रधान पद त्यांनी सोडून दिले. स्मृती ईराणी या स्वत: कोणत्या क्षेत्रातून आल्या आहेत आणि आपल्या मुलीला कोणत्या क्षेत्रात त्यांनी उभी केले आहे हे आधी त्यांनी पहावे. काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती. सोनियाजी गांधी यांच्यावर टिका केलेली आम्ही कदापीही सहन करणार नाही. बीन संस्कारी सून स्मृती ईराणी जर पुण्यामध्ये आल्या तर आम्ही त्यांना पुण्यात फिरणे मुश्किल करू.’’

      यानंतर पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा आनंद यावेळी म्हणाल्या, ‘‘संसदेमध्ये झालेला प्रकार हा निदंनीय आहे. आमच्या नेत्या सोनियाजी गांधी यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर असून त्यांच्याबद्दल अशा प्रकारची वागणूक झाली तर आम्ही कदापीही सहन करणार नाही. सोनियाजी गांधी या नुकत्याच आजारातून बाहेर पडलेल्या असताना ज्या पध्दतीने स्मृती ईराणी संसदेत त्यांच्याशी वागल्या हे बघितल्यावर लक्षात येते की, गोव्‍यामधील अवैध दारू व्‍यवसायात झालेल्य बदनामीला लपविण्यासाठीच हे कृत्य स्मृती ईराणी यांनी केले. त्यामुळेच आज पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने स्मृती ईराणी यांचा आम्ही ‘जोडो मारो आंदोलन’ करून निषेध करीत आहोत.’’

      यावेळी पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश बागवे, कमल व्‍यवहारे, लता राजगुरू, सुजाता शेट्टी, रजनी त्रिभुवन, संगीता पवार, स्वाती शिंदे, सिमा सावंत, सुंदरा ओव्‍हाळ, ताई कसबे, नंदा ढावरे, पपिता सोनावणे, सुजाता नेमुर, प्रियंका रणपिसे, प्राची दुधाने, छाया जाधव, आयेशा शेख, सिमा महाडिक, प्राजक्ता गायकवाड, अंजू डिसुझा, अश्विनी गवारे, ॲड. रूकसाना पठाण, सुरेखा माने, रूकसाना शेख आदींसह असंख्य महिला कार्यकर्त्यां या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

NCP activists show black flags | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे 

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्मृती इराणींना दाखवले काळे झेंडे

२०१४ साली अवघ्या ५ रुपयांनी गॅस सिलेंडरची किंमत वाढून ३६५ रुपये झाल्याने रस्त्यावर उतरून निदर्शने करणाऱ्या परंतु आज भाजप सरकारच्या काळात तब्बल १००२ रुपये गॅस सिलेंडर होऊन देखील चकार शब्द देखील न काढणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने सेनापती बापट रोड येथे आंदोलन घेण्यात आले.

स्मृती इराणी आज एका पुस्तक प्रदर्शनासाठी पुणे शहरात आल्या असता पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गावर काळे झेंडे दाखवत , घोषणा देत स्मृती इराणी यांचा निषेध केला. याप्रसंगी ” महागाई ची राणी, स्मृती इराणी” , ” स्मृती भाभी जवाब दो” , ” बहुत हुई महागाई की मार,चले जाओ मोदी सरकार” या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.


याप्रसंगी बोलतांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशातील प्रत्येक कुटुंब महागाईच्या झळा सोसत असताना केंद्रातील मोदी सरकार मात्र याची दखल घेत दिलासा देण्यास तयार नाही.अश्या परिस्थितीमध्ये ज्या अभिनेत्री स्मृती इराणी यांच्या महागाई विरोधी अभिनयावर विश्वास ठेवत ज्या सर्वसामान्य नागरिकांनी २०१४ मध्ये भाजपला मतदान केले त्या नागरिकांना स्मृती इराणी यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या परंतु गेल्या ७ वर्षात गॅस सिलेंडरची किंमत ३६५ वरून तब्बल १००२ वर गेल्याने नागरिकांचा मोदी सरकार वर रोष असल्याचे आजच्या आंदोलनात पाहायला मिळत आहे.२०१४ साली याच भाजपने तत्कालीन पंतप्रधानांना महागाई साठी दोषी ठरवत बांगड्या पाठवल्या होत्या आज मात्र तत्कलिन परिस्थिती पेक्षा कितीतरी जास्त महागाई झाल्याने आजच्या पंतप्रधानांना देखील तीच भेट देण्याची वेळ आली आहे.”

हे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या १०० ते १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या प्रसंगी शहराध्यक्ष  प्रशांत जगताप, जेष्ठ नेंते अंकुश काकडे, वैशाली नागवडे,प्रदीप देशमुख,बाळासाहेब बोडके,निलेश निकम, किशोर कांबळे,मृणालिनी वाणी,रुपाली पाटील,उदय महाले,गणेश नलावडे,विक्रम जाधव,मानली भिलारे,राजू साने, कार्तिक थोटे , अनिता पवार,वैशाली थोपटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Video : Smriti Irani Vs Congress : तोंड उघड बया, तोंड उघड… महागाई विरोधात तोंड उघड

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

तोंड उघड बया, तोंड उघड…
महागाई विरोधात तोंड उघड

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा निषेध

महागाई विरोधात आठ वर्षांपूर्वी आंदोलन करणाऱ्या विद्यमान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सध्या वाढत चाललेल्या महागाईबद्दल गप्प आहेत.

या महागाई विरोधातील जनतेचा आवाज मांडण्यासाठी पुणे शहर महिला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पूजा आनंद या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना चूल आणि बांगड्या भेट देण्यासाठी हॉटेल मॅरिएट येथे शिष्टमंडळासह गेल्या होत्या. त्यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना बोलावून या शिष्टमंडळाला मंत्र्यांची भेट घेण्यापासून रोखले. पोलिसांनी पूजा आनंद यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Amit Shah : Book : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे सोमवारी प्रकाशन

Categories
Breaking News cultural Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ पुस्तकाचे स्मृती इराणी यांच्या हस्ते सोमवारी प्रकाशन

पुणे : ‘अमित शाह आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तकाचे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते येत्या सोमवारी (१६ मे) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे शहर भाजपच्या वतीने प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी कळविली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, खासदार प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पुस्तकाचे मूळ लेखक शिवानंद द्विवेदी, मराठी अनुवादक डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर आणि प्राची जांभेकर उपस्थित राहणार आहेत.