MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न | दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे दुसऱ्यांदा ठरल्या विशेष संसद महारत्न

| दिल्ली येथे १७ फेब्रुवारी रोजी होणार पुरस्कार प्रदान

MP Supriya Sule | पुणे : चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन (Prime Time Foundation) आणि इ- मॅगॅझीनतर्फे (E- Magazine) दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार (Sansad Maharatna Award) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना दुसऱ्यांदा जाहीर झाला आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभागासाठी, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून यापूर्वी सोळाव्या लोकसभेतील कामगिरीसाठीसुद्धा त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. येत्या १७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांना हा पुरस्कार दिल्ली (New Delhi) येथे प्रदान करण्यात येणार आहे. (MP Supriya Sule)

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आला आहे, असे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. चालू सतराव्या लोकसभेत सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून ५ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत त्यांनी ९४ टक्के उपस्थिती लावत २३१ चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात त्यांनी आतापर्यंत ५८७ प्रश्न विचारले असून १६ खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा संसद महारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. तर याच संस्थेचा संसदरत्न पुरस्कार त्यांना सात वेळा प्रदान करण्यात आला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

गत सोळाव्या लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभागृहात ९६ टक्के उपस्थिती लावत १५२ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण ११८६ प्रश्न उपस्थित केले, तर २२ खासगी विधेयके मांडली आहेत. ज्युरी कमिटीचे चेअरमन व केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सह चेअरमन व भारतीय निवडणूक आयोगाचे माजी अध्यक्ष टी एस कृष्णमूर्ती यांनी सुळे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. खासदार सुळे यांची संसदेतील सातत्यपूर्ण सर्वोत्तम कामगिरी आणि त्याच वेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांसाठी जनहीताची केलेली कामे यांचा या पुरस्कार निवडीसाठी विचार करण्यात आला आहे.

 

| पुरस्कार म्हणजे कामाला मिळालेली पावती | खासदार सुळे यांची भावना

प्राईम पॉईंट फौंडेशन, चेन्नई यांच्या वतीने सर्वोत्कृष्ट संसदीय कामगिरीसाठी दर पाच वर्षांनी देण्यात येणाऱ्या विशेष संसद महारत्न पुरस्कारासाठी आपली निवड करण्यात आली असून बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला लोकसभेत निवडून पाठविले तो सार्थ ठरविण्यासाठी आपण सदैव कार्यरत आहे, अशा शब्दात खासदार सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हा पुरस्कार आपल्या कामाला मिळालेली पावती आहे. अर्थात हे यश माझ्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहे. म्हणूनच हा पुरस्कार मतदारसंघातील जनतेला कृतज्ञतापूर्वक अर्पण करताना मला अतिशय आनंद होत आहे. हा पुरस्कार १७ व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देण्यात येत आहे. यापुर्वीही १६ व्या लोकसभेतील सर्वोत्तम कामगिरीसाठी देखील हाच पुरस्कार मिळाला होता, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

Baramati Loksabha Consistency | बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा | खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Baramati Loksabha Consistency | बारामती लोकसभा मतदार संघात पाण्याचे नियोजन करा | खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Baramati Loksabha Consistency | बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Loksabha Consistency) सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न (Water issues in Baramati) हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट केले असून मुख्यमंत्री तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही त्यांनी टॅग केले आहे.

दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

Categories
Breaking News Political social पुणे

MP Supriya Sule | खासदार सुप्रिया सुळे बसणार उपोषणाला

| बावधन येथे महावितरणचे सबस्टेशन झाले नाही, तर २० नोव्हेंबर रोजी करणार उपोषण

MP Supriya Sule | पुणे : वारंवार मागणी आणि पाठपुरावा करूनही पूर्तता होत नसल्याने खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून त्यांनी आता थेट उपोषणाचाच इशारा दिला आहे. महावितरणच्या बावधन येथील सबस्टेशनसाठी त्यांनी हा इशारा दिला असून २० नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातील बावधन सबस्टेशनसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. यासाठी आवश्यक असणारी जागाही सुचविण्यात आली आहे. परंतु तरीही येथे सबस्टेशन उभारण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही, असे सांगत सुळे यांनी याबाबत ट्विट केले आहे. महावितरण, पुणे महापालिका, पीएमारडीए आणि पुणे जिल्हाधिकारी यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केले असून येत्या २० नोव्हेंबर पर्यंत सबस्टेशन बाबत कार्यवाही झाली नाही, तर आपण स्वतः उपोषणाला बसू असा।इशारा दिला आहे.

महावितरणने याची तातडीने दखल घेऊन सबस्टेशनचा विषय मार्गी लावला नाही तर बावधनकरांसाठी आपण स्वतः २० नोव्हेंबरला येथे उपोषणाला बसणार आहोत. जनतेच्या सुविधेसाठी हे सबस्टेशन आवश्यक आहे, परंतु जागा सुचवलेली असतानादेखील उर्जा खात्याकडून याबाबत कार्यवाही होत नाही हे खेदजनक आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

Contract Police Recruitment | गृहमंत्र्यांना हवेत पोलिसांच्या रक्षणासाठी बाऊन्सर | खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Contract Police Recruitment | गृहमंत्र्यांना हवेत पोलिसांच्या रक्षणासाठी बाऊन्सर

| कंत्राटी पोलीस भरतीला बाऊन्सरची उपमा देत खासदार सुप्रिया सुळेंची शासनावर टीकेची झोड

Contract Police Recruitment | पुणे : …तर अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) सुरक्षेसाठी मायबाप दयाळू सरकार ३ हजार’ बाऊन्सर’ (कंत्राटी सुरक्षारक्षक ) नेमणार आहे, असा उपरोधिक टोला लगावत खासदार सुप्रिया सुळे (MP Supirya Sule) यांनी शासनाच्या पोलीस दलातील कंत्राटी भरतीवर (Contract Police Recruitment) टीकेची झोड उठवली आहे. गृहमंत्र्यांचा (Home Minister of Maharashtra) आपल्याच पोलिसांवर विश्वास नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शासनाने बृहन्मुंबई पोलीसांच्या आस्थापनेवर ३ हजार कंत्राटी मनुष्यबळ नेमण्याचा आदेश काढला आहे. यावर उपहासात्मक ट्विट करत खासदार सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे. त्यांना टॅग करत केलेल्या ट्विटमध्ये सुळे यांनी कंत्राटी पोलीस भरतीचा शासनाचा अध्यादेशही पोस्ट केला आहे.

हा आदेश कुणाच्या भल्यासाठी आणि कुणाचा खिसा गरम करण्यासाठी काढला? शासनाला तीन हजार मनुष्यबळ हवे आहे, तर त्यासाठी भरतीची प्रक्रिया का राबविण्यात येत नाही? मुंबई सारखे अतिसंवेदनशील शहर कंत्राटी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्यात कोणते शहाणपण आहे? पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करणारे तरूण-तरुणी या शासनाला दिसत नाहीत का?त्यांचा हक्क का हिरावून घेतला जातोय?, असे कळीचे प्रश्न उपस्थित करत सुळे यांनी गृहमंत्र्यांनी याचे जनतेला उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

PMC Health System | MP Supriya Sule | पुणे महापालिकेकडे क्षय रोगावर असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत 

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

PMC Health System | MP Supriya Sule | पुणे महापालिकेकडे क्षय रोगावर असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत

 

आरोग्य केंद्राचे ऑडिट करण्याबरोबरच रिक्त पदांची भरती आणि सर्व सुविधा तातडीने द्या | खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी

PMC Health System | MP Supriya Sule | पुणे : पुणे महापालिकेकडे (Pune Municipal Corporation) क्षय रोगावर (TB) असणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याच्या तक्रारी रुग्णांकडून करण्यात येत आहेत. यामुळे आरोग्यकेंद्रांमध्ये (Health Center) उपचार घेणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.  रुग्णालयाची ही स्थिती असणे गंभीर असून शासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पत्राद्वारे केली आहे.

नुकत्याच झालेल्या मतदार संघाच्या दौऱ्यादरम्यान बहुतांश प्रथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अपुरे मनुष्यबळ आणि औषधांचा अपुरा पुरवठा होत असल्याचे दिसून आले आहे. या रुग्णालयाचे ऑडिट करावे. याशिवाय सासूनसारख्या बड्या रुग्णालयातही हीच स्थिती आहे. सहा कोटी रुपये देऊनही रुग्णालयाला हाफकीन इन्स्टिट्यूटने औषध पुरवठा केला नसल्याचे वृत्त आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या रुग्णालयाची ही स्थिती असणे गंभीर असून शासनाने तातडीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे केली आहे. (Health System of Maharashtra)

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच, महापालिकेची रुग्णालये आणि राज्य शासनाच्या मोठी रुग्णालयांबाबत योग्य ती पावले उचलण्याबाबत मागणी केली आहे. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी शहरांमध्ये नुकत्याच घडलेल्या घटनांचा दाखला देत सुळे यांनी राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात नुकताच सुळे यांचा दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शासकीय रुग्णालयांना भेटी दिल्या. या रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांची काही पदे रिक्त असून, औषधेही अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध असल्याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांकडून त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या. शासनाने आरोग्य सेवांबाबत सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. परंतु रुग्णांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना दुर्लक्ष होत आहे, हे नांदेड येथील घटनेतून अधोरेखित होत आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे.

या निरीक्षणाअंती बारामती लोकसभा मतदारसंघातील शासकीय रुग्णालायांसोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे यांचे हेल्थ ऑडीट करण्यात यावे व रुग्णाना आवश्यक ती रुग्णसेवा उपलब्ध होणे बाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी नोंदवलेली निरीक्षणे :

* ससून हॉस्पिटल हे पुणे जिल्ह्यातील अद्ययावत हॉस्पिटल असून येथे मोफत तसेच माफक दारात रुग्णसेवा उपलब्ध असल्याने पुणे शहर, पुणे जिल्हा व आजूबाजूच्या ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील व्यक्ती सुद्धा चांगल्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेऊन शकतात. परंतु या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत, त्याचबरोबर औषधेही अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध आहेत त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यात दिरंगाई होत आहे, अशा तक्रारी रुग्णांकडून येत आहेत. ससून हॉस्पिटलकडून औषधे खरेदीसाठी ‘हाफकिन’ या संस्थेला सहा कोटी रुपये देण्यात आले आहेत. परंतु अद्यापही औषधपुरवठा करण्यात आला नाही.

*दौंड तालुक्यातील कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त आहेत. यामुळे येथील आरोग्यसेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. याखेरीज येथे अधिक तत्पर आरोग्यसेवेसाठी ट्रॉमा केअर सेंटरचे अद्ययावतीकरण होण्याची आवश्यकता आहे.

*दौंड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात आला आहे. परंतु तो तांत्रिक अडचणींमुळे कार्यान्वित नाही. यासाठी २५० केव्ही रोहित्राची गरज आहे. आरोग्य आणि उर्जा या दोन खात्यांमध्ये समन्वय साधून याबाबत सकारात्मक विचार करुन तातडीने मार्ग काढावा‌ आणि हे केंद्र कार्यान्वित करण्याबाबत निर्णय घ्यावा.

*पुणे महानगर पालिकेत नव्याने समाविष्ट गावांच्या हद्दीत वायसीएमच्या धर्तीवर, सर्व सुखसोयींनी युक्त मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची आवश्यकता आहे. या परिसरातील रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी ससून रुग्णालयात जावे लागते.

MP Supriya Sule | आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

Categories
Breaking News Political social आरोग्य महाराष्ट्र

MP Supriya Sule | आवश्यक मनुष्यबळाअभावी राज्यातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम

| तातडीने रिक्त पदांची भरती करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे पत्राद्वारे मागणी

MP Supriya Sule | पुणे : आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची (Maharashtra Health System) कार्यक्षमता कमी झाली आहे. परिणामी आरोग्य सेवेवर होत असून आरोग्य खात्यात तातडीने सर्व रिक्त पदांची भरती (Recruitment in Health Department Maharashtra) करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya sule) यांनी राज्य शासनाकडे (State Government) केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले असून तसे ट्विटही केले आहे. मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक रित्या लक्ष घालून तातडीने हा प्रश्न सोडवावा, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. राज्यातील शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एकंदर आरोग्य खात्यामध्ये डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि इतर सपोर्टींग स्टाफची कमतरता आहे. नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि ठाणे येथे नुकत्याच घडलेल्या घटनांमधून हे स्पष्ट होत आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आवश्यक मनुष्यबळच उपलब्ध नसल्याने आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता कमी झाली आहे. याचा परिणाम आरोग्य सेवेवर झाला आहे. याबाबत माध्यमातून दररोज बातम्या येत आहेत. ठाणे, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नागपूर येथील नुकत्याच घडलेल्या घटनांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने आरोग्य खात्यातील सर्व रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. तरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिक लक्ष घालून याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे त्यांनी आपल्या पत्रात पुढे नमूद केले आहे.

Tehsildar Bharti Maharashtra | तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Tehsildar Bharti Maharashtra | तहसीलदारांच्या कंत्राटी भरतीवरून खासदार सुप्रीया सुळे यांचा संताप

| राज्याचा खेळखंडोबा केल्याचा आरोप करत स्पर्धा परीक्षार्थींसाठी व्यक्त केली चिंता

Tehsildar Bharti Maharashtra | पुणे : भाजपाला या महाराष्ट्राचं नेमकं काय करायचंय? आता तहसीलदार (Tehsildar) देखील कंत्राटी नेमण्याचा घाट या सरकारनं घातला आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे (MO Supriya Sule) यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून हा निर्णय घेताना, रात्रंदिवस एक करून मुलं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, त्यांचा तरी विचार करायला हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार पदासाठी कंत्राटी भरती करण्याबाबत जाहिरात दिली आहे, त्यावरून खासदार सुळे यांनी सरकारला धारेवर धरले असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय असा सवाल उपस्थित केला आहे. (Jalgaon Tahsildar Bharti)

खरंतर या सरकारने मुख्यमंत्री, हवे तेवढे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अख्खं मंत्रीमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला द्यावं, असे म्हणत सुळे यांनी, ‘उपहासाचा भाग सोडला तर हे सरकार असे असंवेदनशील निर्णय का घेतंय याचे आश्चर्य वाटते. कारण या राज्यात लाखो मुलं दरवर्षी तहसीलदार आणि तत्सम पदांवर निवड व्हावी. क्लास वन अधिकारी होऊन आईवडिलांची स्वप्ने साकार करावी यासाठी एमपीएससीची परीक्षा देतात’ असे ट्विट केले आहे.

वर्षोनुवर्षे झिजून मुले अभ्यास करतात, मेहनत करतात. त्यांची अर्धी संधी अगोदर ‘लॅटरल एन्ट्री’च्या नावाखाली आणि उरलेली अर्धी कंत्राटी पद्धतीच्या नावाखाली गिळंकृत केली जात आहे. संपूर्ण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणारे हे असले आदेश काढण्याआधी किमान या पोरांचा तरी विचार शासनाने करायला हवा होता. काही चांगलं करता येत नसेल तर किमान कुणाचं वाईट तरी करु नये हे तत्त्व या राज्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही का? असा सवाल खासदार सुळे यांनी सरकारला विचारला आहे.

PMC Garbage Collection | धायरी, आंबेगाव, नऱ्हे परिसरात कचऱ्याचे कंटेनर नाहीत | खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Garbage Collection | धायरी, आंबेगाव, नऱ्हे परिसरात कचऱ्याचे कंटेनर नाहीत | खासदार सुप्रिया सुळे यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

PMC Garbage Collection | पुणे महानगर पालिकेच्या (Pune Municipal Corporation limits Included Villages) हद्दीतील नऱ्हे, आंबेगाव, धायरी या परिसरात धुळ, घाण, कचरा, राडारोडा,
पाण्याचे टँकर, खड्डे यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे.  या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे तक्रार उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation)

खासदार सुळे यांच्या पत्रानुसार या परिसरात कचऱ्यासाठी कंटेनर नाहीत. कचऱ्याच्या गाड्या वेळेवर येत नाहीत. कचरा जागोजागी पडलेला आढळतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. डासांची पैदास होते. यामुळे डेंग्यू, हिवताप या सारख्या साठीच्या आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या आरोग्यास यामुळे धोका संभवत आहे. तसेच या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असून पादचाऱ्यांसाठी फुटपाथची व्यवस्था केलेली नाही. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच सकाळ पासून दुपार पर्यंत कचऱ्याच्या गाड्या व पाण्याचे टँकर रस्त्यावरून फिरत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तरी सकाळी ७ च्या आत महानगर पालिकेमार्फत कचरा व्यवस्थापन व सफाई आदी कामे होऊन गेल्यास नागरिकांना सोयीचे होईल तसेच कचऱ्याचे व्यवस्थापन रोजच्या रोज करण्यात यावे अशा मागण्या
नागरिकांनी केल्या आहेत.  नागरिकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार होऊन योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. अशी मागणी खासदार सुळे यांनी आयुक्तांकडे केली आहे. (PMC Solid Waste Management Department)
——-
News Title | PMC Garbage Collection | There are no garbage containers in Dhairi, Ambegaon, Narhe areas Complaint of MP Supriya Sule to Municipal Commissioner

Lack of DP Impediments in Development of Villages Included in the PMC | MP Supriya Sule 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Lack of DP Impediments in Development of Villages Included in the PMC | MP Supriya Sule

 | Urgent preparation of development plan.  Supriya Sule’s demand to the government

 Pune: The plan of villages included in Pune Municipality in Baramati Lok Sabha Constituency has not been prepared yet.  As a result, although there are always obstacles in the development works in these villages, MP Supriya Sule has demanded to the state government that these villages should be done immediately.
 tagging Chief Minister Eknath Shinde, Guardian Minister Chandrakant Patil and Municipal Commissioner Vikram Kumar.  Sule has on X about this.  No important decisions are taken regarding the development of villages included in Pune Municipal Corporation of Baramati Lok Sabha Constituency.  The reason behind this is that the development plan for the included villages has not been prepared.  Citizens of these villages are getting a big hit due to this and there are also problems regarding the completion of infrastructure facilities.  This is a matter of great concern, he said in his post.
 He has mentioned that we are continuously following up for this, and it is not right that the citizens have to bear the burden of administrative and government delay.  In this regard, he has demanded that the Chief Minister of the state, the Guardian Minister of Pune and the Pune Municipal Commissioner should immediately take initiative and take positive action regarding the approval of the development plan.

DP of Included Villages |विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

Categories
Breaking News PMC Political पुणे

DP of Included Villages |विकास आराखड्याअभावी पालिकेत समाविष्ट केलेल्या गावांच्या विकासकामांत अडथळे

| तातडीने विकास आराखडा तयार करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची शासनाकडे मागणी

DP of Included Villages | पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Constituency)  पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट करण्यात आलेल्या गावांचा आराखडाच (Included Villages DP) अद्याप तयार झालेला नाही. परिणामी या गावांत विकासकामे करताना नेहमी अडथळे येत आहेत, तरी तातडीने या गावांचा करण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि (Chandrakant Patil) पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांना टॅग करत खा. सुळे यांनी याबाबत X वर Post (Post on X) केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासाबाबत कोणतेही महत्वाचे निर्णय होत नाहीत. यामागे समाविष्ट गावांसाठीचा विकास आराखडा तयार झाला नसल्याचे कारण सांगण्यात येते. याचा मोठा फटका या गावांतील नागरिकांना बसत असून पायाभूत सुविधांच्या पूर्ततेबाबतही अडचणी येत आहेत. ही मोठी काळजीची गोष्ट आहे, असे त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत असून, प्रशासकीय आणि शासकीय दिरंगाईचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतो, हे योग्य नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिका आयुक्त यांनी तातडीने पुढाकार घेऊन विकास आराखडा तयार करुन तो मंजूर करण्यासंबंधी सकारात्मक विचार करुन कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


News Title | DP of Included Villages | Lack of development plan hinders the development of villages included in the municipality | MP Supriya Sule demanded the government to prepare a development plan immediately