MP Supriya Sule | NCP Youth | सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार | कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

सुप्रिया सुळेंचा खोटा फोटो प्रसिद्ध केल्याबद्दल माजी नगरसेविके विरोधात पोलिसात तक्रार

| कोथरूड युवक राष्ट्रवादी आक्रमक

पुणे येथील कोथरूड पोलिस स्टेशन मध्ये आज कोथरूड युवक राष्ट्रवादी अध्यक्ष गिरीश गुरुनानी यांनी शिंदे गटातील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला खोटा फोटो प्रसिद्ध केल्याचे या वेळी गुरूनानी यांनी सांगितले. त्यांनी पुरावा म्हणून फोटो ची मूळ प्रत तसेच म्हात्रे यांनी प्रसिद्ध केलेल्या खोट्या फोटो ची प्रत पोलिसांकडे सुपूर्द केली. तसेच म्हात्रे यांच्या वर कलम ५०४, ५०५ व २६८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा व कठोर कार्यवाही व्हावी अशी विनंती करणारे पत्र त्यांनी पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप  यांच्या कडे दिले.

 

MP Supriya Sule | दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी | खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

दौंड, पुरंदर तालुक्यांतील रेल्वेशी संबंधीत प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी

| खा. सुप्रिया सुळे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत बैठकीत मागणी

पुणे – बारामती लोकसभा मतदारसंघातील रेल्वे खात्याशी संबंधित विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांची भेट घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज चर्चा केली. दौंड रेल्वे स्थानकाचा रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यक्षेत्रात समावेश करणे आणि अन्य मुद्द्यांचा यात समावेश आहे.

दौंड रेल्वेस्थानक हे सोलापूर पेक्षा पुणे शहराशी जवळचे स्थानक असून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येथील प्रवाशांना पुणे विभागीय कार्यालय सोयीचे आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक विचार व्हावा, अशी मागणी खासदार सुळे यांनी यावेळी केली. या मुख्य मुद्द्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील पुरंदर तालुक्यातील रेल्वेशी संबंधीत समस्यांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

दौंड तालुक्यातील रेल्वे रुळांखालील कानगाव – पाटस रोड (एल.सी. नंबर १५),कडेठाण – वरवंड रोड (एल.सी. नंबर १४) आणि गिरिम वायरलेस फाटा ते नानवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता (एल.सी. नंबर १७) येथील मोऱ्यांची कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाचे पाणी मोऱ्यांमध्ये साचून वाहतुकीला अडथळा ठरत आहे. याशिवाय काम सुरु असल्याने पर्यायी रस्त्याचे गेटही बंद आहेत. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. या मोऱ्यांचे काम तातडीने पूर्ण व्हावे, अशी मागणी सुळे यांनी यावेळी केली.

पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे जेजुरी एमआयडीसी जवळील मोरीचे काम तातडीने सुरु करण्याची गरज असून जेजुरी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील वस्त्यांसाठी सर्विस रोड करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबरोबरच पुरंदर तालुक्यातील अन्य ठिकाणी राहिलेली मोऱ्यांची कामेही तातडीने पूर्ण करावी. आंबळे येथील अंडरपासच्या संरक्षक भिंत, शाळेजवळील उड्डाण पूल कोथळे येथील मोरीचे काम अर्धवट अवस्थेतील काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.

Vedanta Foxconn project | महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

Categories
Breaking News Commerce Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र

महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यासाठीच वेदांता गुजरातला हलविला  |खासदार सुप्रिया सुळे

| राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

पुणे – वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी कऱण्यासाठी वाटेल ते केले जात असून हा प्रकल्प गुजरातला हलविण्यामागे हीच मनोवृत्ती कारणीभूत आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी राज्याला गंभीर मुख्यमंत्र्याची गरज असून गरज पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा पण मराठी तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊ नका अशी खोचक टिपण्णी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातील स प महाविधालय, टिळक रोड येथे आयोजित आंदोलनात सुप्रियाताई सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती दिल्लीपुढे न झुकण्याची राहिली आहे, परंतु सध्याच्या ईडी सरकारचे सर्व निर्णय दिल्लीत होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात नवीच संस्कृती उदयास येत आहे असेही सुप्रियाताई म्हणाल्या. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले. घोषणाबाजी करुन त्यांनी आसमंत दणाणून सोडला.
या आंदोलनात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदिप देशमुख म्हणाले की, राज्यातील एक ते सव्वा लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारा सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही सुरळीतपणे पार प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प महाराष्ट्रात साकारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम केले होते. परंतु राज्यातील सत्तांतरानंतर खोके संस्कृतीचे पाईक असणाऱ्या ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे.

सदर आंदोलनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपरोधिक पध्दतीने ढोल ,ताशे व नगारे वाजवून पुढील काळात राज्यातील मोठ मोठे उद्योग रोजगार जर असेच परराज्यात गेले तर आम्हाला फक्त दहीहंडी व इतर सभा समारंभा मध्ये सामील होवून ढोल वाजवणे एवढेच काम शिल्लक राहणार आहे त्याची आम्ही आतापासूनच तयारी सुरू केली आहे अशी उदिग्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली
या सदर आंदोलनात प्रवक्ते प्रदीप देशमुख सौ मृणालिनी वाणी,सौ अश्विनी कदम,दीपक जगताप,विक्रम जाधव,विशाल तांबे,संतोष नांगरे,नाना नलावडे , काका चव्हाण वैष्णवी सातव,रत्ना नाईक,अश्विनी भागवत ,मनीषा होले,रोहन पायगुडे , फईम शेख व इतर कार्यकर्ते मोठेया संख्येने उपस्थित होते.

Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला फार काळजी वाटते आहे . त्यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री करत आहेत. सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे, असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असलेले मंत्री जातात, असा टोलाही खासदार सुळे यांनी भाजपला लगावला.

शिवसेनेतून बाहेर पडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिचारे आहेत. यामागे मागे मोठे षडयंत्र आहे, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दिपक केसरकर यांच्या बरोबर मी खूप वर्ष कामे केले आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांची चिंता आहे. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतः गोंधळात आहे. सध्या राज्यात जे राजकारण जे चाललं आहे ते महाराष्ट्राला शोभत नाही.

काल राज्य शासनाने संरपंच आणि नगराध्यक्ष ही पदे प्रत्यक्षरित्या जनतेतून निवडली जातील अशी घोषणा केली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरपंच आणि सदस्या बॉडी वेगळी झाली तर एकत्र चर्चा होत नाही. त्यामुळे याचा वाईट परिणाम होईल.  राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. लोकांकडून पैसे घेणे, धमक्या देणे हे राजकारण नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित केलेल्या सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ निमित्त सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर उपस्थितीत होत्या.