Pune Zilha Dudh Utpadak Sangh | PMC Pune | जिल्हा दूध संघाने स्वबळावर जागा विकत घ्यावी | क्रीडांगणाची जागा लाटण्याचा प्रकार झाल्यास न्यायालयात जाणार | पुणे काँग्रेस चा इशारा 

Categories
Uncategorized

Pune Zilha Dudh Utpadak Sangh | PMC Pune | जिल्हा दूध संघाने स्वबळावर जागा विकत घ्यावी | क्रीडांगणाची जागा लाटण्याचा प्रकार झाल्यास न्यायालयात जाणार | पुणे काँग्रेस चा इशारा

 

Pune Zilha Dudh Utpadak Sangh | PMC Pune | कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या  पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (Pune Zilha Sahkari Dudh Utpadak Sangh)  संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण (Play Ground Reservation) रद्द करून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबतच्या प्रस्तावास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने तीव्र विरोध करून लेखी हरकत घेतली आहे. आरक्षण रद्द बातल न करता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच खेळाच्या मैदानाचे आरक्षण कायम ठेवावे. अशी मागणी शहर काँग्रेस (Pune Congress) कडून करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

कात्रज येथील स.नं. १३२ (पार्ट) ते १३३ (पार्ट) या पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संस्थेच्या लगतच्या सुमारे ३.५९ हेक्टर (साधारणत: ७ एकर) जागेवर विकास आराखड्यामध्ये खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे. हे आरक्षण काढून ती जागा दूध डेअरी व प्रक्रिया या कारणासाठी आरक्षित करण्याबाबत प्रस्ताव शासन व मनपा स्तरावर कार्यवाही सुरू आहे. तसेच सदर आरक्षणाकरिता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला समुचित प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात यावे ही बाब देखील प्रस्तावात नमुद केली आहे. (PMC Pune News)

या प्रस्तावानुसार या आरक्षण बदलावर हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. या प्रस्तावास काँग्रेस पक्षाची तीव्र हरकत व विरोध आहे. कॉंग्रेस कडून महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार
दूध डेअरी व प्रक्रिया उद्योग हा ग्रामीण भागाशी संबधित आहे. शहरी भागाच्या विकास आराखड्याच्या आरक्षण सुचिमध्ये दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगाचा समावेश नाही. असे असताना खेळाच्या मैदानाचे आरक्षण उठवून त्या ठिकाणी दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगाचे आरक्षण टाकणे हे अयोग्य असून असा घातक पायंडा शासनाने पाडू नये. शहराच्या चारीही बाजूने मोठ्या प्रमाणात बांधकामे होत आहेत, वाढती लोकसंख्या व पायाभूत सुविधांचा वाढता ताण यामुळे विकास आराखड्यातील आरक्षणांचा विकास होणे आवश्यूक आहे. दक्षिण पुण्यातील धनकवडी, बालाजीनगर, कात्रज परिसर दाट लोकवस्तीचा आहे. त्या तुलनेत या भागात खेळाची मैदाने कमी आहेत. या परिसराची लोकसंख्या सुमारे दोन लाखांच्या पुढे आहे. परंतू या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेत खेळांची मैदाने नाहीत. अशातच मैदानासाठीची आरक्षित जागा दूध डेअरी व प्रक्रिया उद्योगासाठी दिल्यास पुढील पिढ्यांना खेळण्यासाठी जागाच उपलब्ध राहाणार नाही.

कात्रज डेअरी करिता व्यावसायिक प्रयोजनार्थ खेळाच्या मैदानावर घाला घालणे ही बाब शहराच्या दृष्टीने घातक आहेत. मैदान, नदी पात्र, हिल टॉप, हिल स्लोप ही ठिकाणे शहराचे प्राणवायू असून काँक्रीट जंगलात ती हरवू नयेत. पुणे जिल्हा दूध संघ ही जुनी मातब्बर नावलौकिक असलेली आर्थिक सक्षम संस्था असून स्वतःची वास्तू स्वबळावर घेण्याची क्षमता बाळगून आहे. शासनाने खेळाचे मैदानाचे आरक्षण उठवू नये. उलटपक्षी मैदान आरक्षण विकसित करण्यासाठी विषेशनिधी उपलब्ध करून द्यावा. बहुमताच्या जोरावर उठवण्याचा शासनाने प्रयत्न केल्यावर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रस्स्यावर उतरून पुणेकरांसह तीव्र विरोध करण्यात येईल व प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल याची नोंद घ्यावी. आरक्षण रद्द बातल न करता या ठिकाणी पूर्वीप्रमाणेच खेळाच्या मैदानाचे आरक्षण कायम ठेवावे. असे कॉंगेस ने म्हटले आहे.

Women Self Help Group | Hari Sawant | हडपसर परिसरात गोरगरीब महिलांचे बचत गट | भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचा पुढाकार 

Categories
Breaking News PMC social पुणे

Women Self Help Group | Hari Sawant | हडपसर परिसरात गोरगरीब महिलांचे बचत गट | भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचा पुढाकार

 

Women Self Help Group | Hari Sawant |भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेच्या (Bhatkya Vimukt Jati Jamati Samajik Adhar Sanghtana) माध्यमातून  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने हडपसर परिसरामध्ये वेताळबाबा वसाहत मध्ये गोरगरीब महिलांचे बचत गट (women Self Help Group) करण्यात आले. संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरी सावंत (Hari Sawant) यांनी पुढाकार घेऊन महिलांचे गट स्थापन केले आहेत. अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

बचत गट स्थापने वेळी  प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या समाज  विकास विभागाचे उपायुक्त  नितीन उदास (Nitn Udas PMC), मुख्य समाज विकास अधिकारी रामदास चव्हाण (Ramdas Chavan PMC), खडकवासला पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सेवानिवृत्त पांडुरंग शेलार  हे उपस्थित होते.  त्याचबरोबर हडपसर परिसरातील सामाजिक कार्य करणारे भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हरी सावंत यांनी सदर कार्यक्रमाचा पुढाकार घेऊन महिलांचे गट स्थापन होणे बाबत सक्रिय भाग घेतला. महिलांना शासनाच्या विविध योजना मिळतील याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन देण्याबाबत सदर कार्यक्रमांमध्ये कार्य करण्यात आले.

हरी सावंत म्हणाले,  हडपसर परिसरातील अनेक वर्षापासून हडपसर विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहेत. पण या झोपडपट्टी धारकांना खऱ्या अर्थाने शासनाच्या सर्व योजना मिळत नाहीत. त्यासाठी महिलांना योजनाचा लाभ मिळून देण्यासाठी आम्ही  महानगरपालिकेचे समाज विकास विभागाचे उपायुक्त यांच्या समोर मत मांडले. चांगला प्रतिसाद मिळाला.  पांडुरंग शेलार  यांनी देखील महिलांच्या उन्नती बाबत उपायुक्तच्या समोर मत मांडले. त्उयानुसार हे बचत गात स्पाथापन करण्युयात आले.  महिलांना चांगल्या प्रकारे सक्षमीकरण करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण पुढे कार्य करू, असे आश्वासन यावेळी उपायुक्त नितीन उदास यांनी सदर कार्यक्रमांमध्ये दिले.

कार्यक्रमासाठी या भागातील स्मित सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष स्मिताताई गायकवाड, त्याचबरोबर सामाजिक कार्य करणारे रफिक शेख, दादा राम शिंदे, भगतसिंग कल्याणी, संतोष पाटील, भटक्या विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचे कार्याध्यक्ष सुमंत गायकवाड, तसेच भटके विमुक्त जाती जमाती सामाजिक आधार संघटनेचे उपाध्यक्ष सौ हेमाताई लाळगे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा वैशालीताई वंजारी,  वेताळबाबा वसाहतामध्ये महिलांचा संघटन करून बचत गटाची खऱ्या अर्थाने चालना देणारे  यशोदाताई हरिअर, मालन ताई पवार व इतर महिलांच्या उपस्थित सदर बचत गटाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.

Pune Water Cut | शहरातील 5 प्रभागात 8 ते 22 जानेवारी दरम्यान फक्त एक वेळ पाणीपुरवठा! 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut | शहरातील 5 प्रभागात 8 ते 22 जानेवारी दरम्यान फक्त एक वेळ पाणीपुरवठा!

 

Pune Water Cut | पर्वती येथील MLR टाकी वरून अस्तित्वातील ९०० मि.मी. व्यासाच्या मोठ्या प्रमाणात लिकेज Prestres Line वरून खालील ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पर्वती MLR टाकी ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मि.मी. व्यासाच्या पाण्याच्या लाईनचे काम पूर्ण झाले आहे. सदर लाईनच्या जोडणीची कामे सोमवार दिनांक ०८ जानेवारी ते २२ जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहेत. यासाठी काही भागातील पाणीपुरवठा ८०० मि.मी. व्यासाच्या पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. एकूण 5 प्रभागात 1 वेळ पाणी मिळणार आहे. परिसरामध्ये सोमवार ०८ पासून ते २२ जानेवारी अखेर पाणीपुरवठा एक वेळ व कमी दाबाने होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Nandkishor Jagtap PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)

पर्यायी लाईन मधून एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणारा भाग:-

प्र. क्र. १८ – स्वारगेट पोलीस लाईन, झगडेवाडी खडकमाळ आळी, घोरपडी पेठचा संपूर्ण परिसर, मोमिनपुरा पूर्ण, टिंबर मार्केट, महात्मा फुले पेठ, गंजपेठ, गुरुवार पेठ, धोबी घाट, खडक पोलीस वसाहत, इत्यादी भाग.
प्र. क्र. १९ – लोहिया नगर, इनामकेमळा, घोरपडे पेठ, एकबोटे कॉलनी, काशिवाडी, गुरुनानकनगर, नेहरू रोड, पूर्ण भवानी पेठ परिसर, बालाजी व भवानी माता मंदिर परिसर, टिंबर मार्केट, नवीन नाना पेठ, हरकानगर, चुडामण तालीम इत्यादी भाग
प्र.क्र. २०- भगवान दास चाळ, वायमेकर चाळ न्यु नानापेठ परिसर, राजेवाडी, पत्राचाळ SRA, भवानी पेठ पोलीस वसाहत, सोमवार पेठ पोलीस वसाहत, बरके आळी, पद्मजी सोसायटी परिसर, महीफिल वाडा, साठेवाडा, रमेश फर्निचर परिसर, सायकल सोसायटी इत्यादी भाग
प्र. क्र. २८ – मुकुंदनगर, व्हेईकल डेपो, अप्सरा टॉकीज परिसर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, C.P.W.D. Quarter, रांका हॉस्पिटल परिसर, शंकरशेठ रोड एस. टी. स्टॅन्ड ते धोबी घाट परिसर उजवी बाजू, मीरा सोसायटी,
प्र. क्र. २९ – लक्ष्मी नारायण चौकीच्या मागील वस्ती, मित्र मंडळ कॉलनी इत्यादी भाग

PMC Fireman Bharti | उमेदवारांच्या हरकतीवर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद | लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Fireman Bharti  | उमेदवारांच्या हरकतीवर महापालिकेचा सकारात्मक प्रतिसाद | लवकरच अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार

Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत  घेण्यात आली. दरम्यान अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांच्या काही हरकती असल्या तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही हरकती आल्या आहेत. याचे निरसन प्रशासनाकडून सुरु आहे. हे झाल्यानंतर येत्या 8-10 दिवसात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आता अग्निशमन साहित्य ओळख बाबत घेतलेल्या लेखी परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. (Pune Mahanagarpalika Bharti)
त्यानुसार काही उमेदवारांनी हरकती घेतल्या आहेत. यामध्ये गुण कमी मिळणे, उत्तर बरोबर असून कमी गुण मिळणे, प्रतिस्पर्धी उमेदवाराला जास्त गुण देणे, अशा हरकतींचा समावेश आहे. यामुळे प्रशासनाने सर्वच उत्तरपत्रिका पुन्हा एकदा तपासण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी आठवडा भराचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर तात्काळ अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन

Pune News | पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) शाळा, कॉलेजला जप्तीच्या नोटिसा दिल्याच्या निषेधार्थ महात्मा फुले वाडा गंज पेठ येथे विद्यार्थी व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन करण्यात आले. (PMC Pune)

यावेळी जेष्ठ कामगार नेते बाबा आढाव, ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस संजय बालगुडे, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी नरेंद्र व्यवहारे, वाल्मिकी जगताप, ऋषिकेश बालगुडे, आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | साधू वासवानी उड्डाणपूल 6 जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद!

Categories
Breaking News PMC social पुणे

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | साधू वासवानी उड्डाणपूल 6 जानेवारी पासून वाहतुकीसाठी राहणार बंद!

| वाहतूक पोलिसांकडून दिली जाणार पर्यायी व्यवस्था

Sadhu Vaswani Flyover | PMC Pune | पुणे महानगरपालिका प्रकल्प विभागामार्फत (PMC Project Department) कोरेगाव पार्क (Koregaon Park Pune) येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल (Sadhu Vaswani Railway Flyover) कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्याकरिता सदरचा पूल वाहतुकीकरिता बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्वावर 6 जानेवारी पासून पुढील १० ते १५ दिवस प्रायोगिक तत्वावर पुढे नमूद केल्यानुसार वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून सुमारे ५० वर्षापूर्वी बांधण्यात आलेला असून सद्यस्थितीत सदरचा पूल हा कमकुवत झाल्याने पुणे महानगरपालिकेमार्फत पुलाच्या दोन्ही बाजूस हाईट बॅरीअर टाकून सदरील पूल जड वाहतूकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. (PMC Pune News)

नगररोड कोरेगाव पार्क बंडगार्डन कौन्सिल हॉल – मोरवाडा या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात येणार आहे. काही रोड One Way व काही रोड No Entry करण्यात येणार आहेत. सदरील बाबत Detail Notification पुणे पोलीस वाहतूक विभागामार्फत करण्यात येणार असून सदरचे बदल ०६/०१/२०२४ पासून पुढील १० १५ दिवस प्रायोगिक तत्वावर करण्यात येणार आहे. तदनंतर वाहतुकीच्या Diversion चा अभ्यास करून अंतिम आदेश पुणे पोलीस वाहतूक विभागामार्फत निर्गमित करण्यात येणार आहे.

Arvind Shinde | PMC Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागावर अरविंद शिंदे यांचे आहे लक्ष! | महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या या मागण्या | वाचा सविस्तर 

Categories
Breaking News PMC Political पुणे

Arvind Shinde | PMC Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागावर अरविंद शिंदे यांचे आहे लक्ष! | महापालिका आयुक्त यांच्याकडे केल्या या मागण्या | वाचा सविस्तर

 

पुणे शहरातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या बांधकाम विभागाने नुकतीच कारवाई केली आहे. असे असेल तरीही मात्र बांधकाम विभाग टीकेचा लक्ष झाला आहे.  पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी देखील आरोप केले आहेत. महापालिका नगर अभियंता  यांचा बांधकाम विकास विभागाचा एकाच पदा वरील तब्बल २० वर्षाचा पदभार तातडीने काढून घेण्याची मागणी शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे.

शिंदे यांच्या पत्रानुसार शहर अभियंता यांचेकडे २००३ सालापासून २० वर्षांपेक्षा जास्त काळ बांधकाम विभागाचा पदभार आहे. सदर पदावरील त्यांची नेमणुक ही शासन आदेशान्वये झाली असून राज्य शासनाकडून वेळोवेळी सदर पदावर नियुक्तीकरीता आदेश येत असतात. जाणिवपूर्वक सदर आदेशांचे उल्लंघन करून त्यांची नेमणुक कायम ठेवण्यात येते.
शहर तसेच नविन समाविष्ट गावे इत्यादी परिसरात अनधिकृत बांधकामे रोखणे पर्यायाने शहराचे बकालीकरण रोखणे याकडे शहर अभियंता (बांधकाम विकास विभाग) यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.  शहर अभियंता पदी नेमणुकीपूर्वी संपूर्ण मनपा हद्दीमध्ये एक चौरस फूट अनधिकृत बांधकाम करायला सुध्दा विकसक कचरत होते. तिथे  यांच्या नियुक्तीनंतर कोट्यवधी चौरस फूट बांधकामे सर्रास उभी केली जात आहेत. आज समाविष्ट गावात अनधिकृत बांधकाम माफियांचा सुळसुळाट झाला असून बेकायदेशीर बांधकामांनी नागरी सुविधांवर प्रचंड ताण आलेला आहे. तसेच सदर बेकायदेशिर बांधकामांमुळे महानगरपालिका व शासनास मिळणारा महसूल जाणिवपूर्वक बुडविला जात आहे. २/२ गुंठ्यावर बांधकाम विकास विभागातील अभियंत्यांच्या आशीर्वादाने ६/६ मजली इमारती उभ्या असल्याचा भयानक प्रकार सद्य स्थितीत समाविष्ट गावात  निदर्शनास आलेला आहेच.

शिंदे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि,.समाविष्ट गावातील अनधिकृत बांधकामांची संख्या पाहता किमान १०,००० कोटींची उलाढाल मनपाच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी केल्याच्या नागरिकांनी केलेल्या आरोपांची खातरजमा पोलीस यंत्रणेद्वारे करावी अशी माझी मुख्य मागणी आहे.
कार्यकारी अभियंता  हेमंत मोरे यांनी त्यांच्या खुलासात २०२१ आली देण्यात आलेल्या नोटिसांवर कारवाईचा तपशील उपलब्ध नाही असे उत्तर दिले. पण खात्याकडून प्राप्त गुगल इमेज मध्ये मागील चार वर्षात इमारती कशा उभ्या राहत होत्या आणि त्याकडे जबाबदार अधिकारी लक्ष देत नव्हते हे स्पष्टपणे दिसून येत आहे . कारवाई करण्यात आलेल्या अकरा इमारतींना महानगरपालिकेने कोणतीच परवानगी दिली नव्हती असे असताना या ११ इमारतींमधील सदनिकांचे व्यवहार कसे काय नोंदवण्यात आले? याबाबत मी स्वतः येत्या एक-दोन दिवसात दुय्यम निबंधकांकडे लेखी तक्रार करणार आहे. अशा स्वरूपाचे दस्त हे महापालिकेच्या परवानगीची बनावट कागदपत्रे सादर करून नोंदले जातात अशी माहिती नुकतीच मला मिळाली आहे.

शिंदे यांनी पत्रात पुढे म्हटले आहे कि,  वर्षानुवर्षे बांधकाम विभागातच कार्यरत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक २०१७ साली नविन भरती झालेल्या अननुभवी अभियंत्यांना पुढे करून अनेक बेकायदेशीर कृत्ये घडवून आणली जात आहेत. खाते प्रमुखांचा कित्ता गिरवत जुन्या जाणत्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुटूंबियांच्या नावाने भव्य बांधकाम प्रकल्प उभारले आहेत. बांधकाम विभागाला मनपातील अनुभवी दर्जेदार प्रामाणिक अभियंत्यांचे वावडे असून तिथे फक्त सांगकाम्यांना प्राधान्य दिले जाते जर चांगले अधिकारी आले तर त्यांचा पद्धतशीरपणे छळ करून तडीपार केले जाते ही वस्तुस्थिती आहे का? मा. आयुक्त महेश झगडे वगळता राज्यसरकार कडून नियुक्तीवर आलेले सर्वच आयुक्त हे शहर अभियंता  यांच्या वर जाणीवपूर्वक कर्तव्यात कसुर होत असतानाही कारवाई करण्याची हिंमत का दाखवू शकले नाहीत? असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे यांनी या केल्या आहेत मागण्या!

१) शहर अभियंता यांचा २० वर्षांपासून असलेला बांधकाम विभागाचा पदभार तातडीने काढून घ्यावा.
२) अति. आयुक्त यांना बांधकाम विभागातील या गैरव्यवहाराची माहिती असणे आवश्यक होते. तथापी जाणिवपूर्वक शहर अभियंता कार्यालयाने ही बाब दडवून ठेवली आहे का? याबाबत अतिरिक्त आयुक्त यांना विषयांकित ठिकाणी पाहणी करण्यास सांगून सविस्तर अहवाल घ्यावा.
३) आंबेगाव कारवाई निगडित जबाबदारी असलेल्या सर्व कनिष्ठ अभियंता, उप अभियंता यांचे वर एमआरटीपी अॅक्ट १९६६ कलम ५६ मधील २०१५ साली करण्यात आलेल्या तरतुदीनुसार जबाबदारी निश्चित करून फौजदारी कारवाई करावी.

४) बांधकाम विभागातील अतिरिक्त पदभार तात्काळ संपुष्टात आणावेत. वर्षानुवर्षे एकाच बांधकाम विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या करून त्यांना क्षेत्रिय कार्यालयाकडे वर्ग करावे.

५) पुणे महानगरपालिकेत दहा वर्षे अभियंता पदी कार्यरत असलेल्या अन्य विभागातील प्रशिक्षित अभियंत्यांनाच बांधकाम विभागात नेमणूक देण्यात याव्यात.
६) समाविष्ट गावात ना विकास झोन, बिडीपी ,आरक्षित जागा यांवर अहोरात्र प्रचंड वेगाने सुरू असलेली बेकायदेशीर बांधकामे तातडीने रोखण्यासाठी यंत्रणा नेमावी.

 

PMC encroachment action | महापालिकेकडून आंबेगाव बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरूच 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC encroachment action | महापालिकेकडून आंबेगाव बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरूच 

PMC Encroachment Action | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) झोन क्र.२ मधील मौजे आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं.४३ व स.नं.२५ आणि व आंबेगाव स.नं.१० येथील विनापरवाना बांधकामावर कारवाई करणेत येऊन एकूण सुमारे ४७६६४ चौ.फुट क्षेत्र मोकळे  करणेत आले..

आंबेगाव बु. (जुनी हद्द) स.नं. ४३ व स.नं. २५ येथे २५ महाराष्ट्र महापालिका कलम ४७८ (१), २६० (अे) (अे) (बी) व कलम  ५३ (१) (अे) अन्वये नोटीस देऊन विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)

 आंबेगाव बु. (जुनी हद्द) मधील रोहन ओदेल व इतर यांचे ३०० चौ. फुट, एस.एम.पवार व इतर  यांचे ९०० चौ. फुट, उदित सिंग व इतर यांचे ५०० चौ. फुट, तारू राजेंद्र गणपत यांचे ६८४ चौ., विलास कोकरे व इतर  यांचे १५० चौ. विकास चव्हाणव इतर यांचे ८० चौ. फुट  आणि आंबेगाव (बु.) स.नं.१० येथील अथर्व डेव्ह. व इतर यांचे ४३५० चौ. फुट, साई गणेश डेव्ह. व इतर यांचे ४३०० चौ. फुट, श्रावणी डेव्ह. व इतर यांचे ४२०० चौ. फुट, आर एल चोरगे व इतर यांचे ४२५० चौ. फुट, श्री डेव्ह. व इतर यांचे ४२०० चौ. फुट, साईनाथ डेव्ह. व इतर यांचे ४३५० चौ. फुट, समर्थ डेव्ह. व इतर यांचे ४४५० चौ. फुट, गवळी व इतर यांचे ४५०० चौ. फुट, मौर्य डेव्ह. व इतर यांचे ८३०० चौ. फुट, गुरुदत्त डेव्ह. यांचे २१५० चौ. फुट, असे एकूण ४७६६४ चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले.

ही  कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी,  ब्रेकर, गॅस कटर,जॉ क्रशर,ब्रेकर, इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

 

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन

 

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके (PMC Engineer Association Calendar) चे प्रकाशन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांचे हस्ते करण्यात आले. (Pune Municipal Corporation)

यावेळी अतिरिक्त महा आयुक्त   रविन्द्र बिनवडे , डॉ. कुणाल खेमनार , शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे, सुनिल कदम , मुकुंद बर्वे, संजय पोळ, अजय मोरे हे उपस्थित होते.