Tag: Encroachment Dept
गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन
| मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत
पुणे – गणेशोत्सव संपल्यानंतरही रस्त्यावर मंडळांचे मांडव, कमानी, रनिंग मांडव काढले न गेल्याने नागरिकांना व वाहतुकीला अडथळा होत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत सर्व मांडव काढून घ्यावेत, मांडवामुळे पडलेले खड्डे मंडळांनी बुजविले आहेत की नाहीत ते पाहून त्याचा अहवाल क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण कार्यालयाकडे सादर करावा. जर मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नसल्यास त्यास पुढील वर्षी गणेशोत्सवासाठी परवागनी देऊ नये असे स्पष्ट प्रस्ताव सादर करा असे आदेश अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले होते. मात्र या आदेशाला गणेश मंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयांनी देखील हरताळ फासला आहे. गणेश मंडळांनी मांडव काढले नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई नसल्याने त्याचा अहवाल देखील दिलेला नाही.
यंदाच्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेने परवाना शुल्क माफ केल्याने व पुढील पाच वर्षांसाठी एकच परवाना ग्राह्य धरला जाणार असल्याने मंडळांना दिलासा मिळाला. गणेशोत्सवानंतर मंडळांनी, खासगी कंपन्यांनी रस्ते व पादचारी मार्गावरील देखावे साहित्य, मिरवणूक साहित्य, बोर्ड, बॅनर, जाहिराती तीन दिवसात काढून घेणे बंधनकारक आहे. पण मंडळांनी व खासगी व्यक्तींनी मुदतीत साहित्य व बोर्ड काढलेले नाहीत. त्याच प्रमाणे मांडव काढल्यानंतर खड्डेही बुजविले नाहीत. त्यामुळे पादचारी व वाहतुकीला अडथळा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या हद्दीतील मंडळांनी मांडव काढला की नाही, रस्ते स्वखर्चातून दुरुस्त केले की नाही याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी. त्याचा अहवाल आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांचा अहवाल १५ सप्टेंबर रोजी अतिक्रमण विभागाकडे सादर करावा. ज्या मंडळांनी रस्ता, पादचारी मार्ग मोकळा केला नाही, त्यांना पुढील वर्षी परवानगी देऊ नये असा प्रस्तावही सादर करावा असे आदेशात नमूद केले होते.
मात्र या आदेशाला गणेश मंडळ आणि क्षेत्रीय कार्यालयांनी देखील हरताळ फासला आहे. गणेश मंडळांनी मांडव काढले नाहीत. तसेच क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाई नसल्याने त्याचा अहवाल देखील दिलेला नाही. याबाबत अतिक्रमण उपायुक्त माधव जगताप यांना विचारले असता, ते म्हणाले, याबाबत आधीच आदेश देण्यात आले आहेत. आमच्याकडे अहवाल नाही आले तर आम्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई करू. तसेच मांडव देखील काढून घेतले जातील.
पुणे शहरात गणपती मुर्ती विक्रीचे 222 अनधिकृत स्टॉल | १९५ लोकांना दिली नोटीस
शहरात स्टॉल थाटून गणपती मुर्तींची विक्री करणारे अनधिकृत २२२ स्टॉलधारक आढळले आहेत. त्यापैकी १९५ जणांना आतापर्यंत नोटीस देण्यात आली आहे. तर २५ लोकांनी stall काढून घेतले आहेत. अनधिकृत स्टॉलधारकांविरोधातील सर्व पुरावे गोळा करून पोलिसांकडे तक्रार देणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. १९ लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र व्यवहार करण्यात आला आहे.
वाहतुकीला अडथळा ठरणार्या बेकायदा विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू आहे. तसेच गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगीनुसारच मंडप उभारलेत का याचीही तपासणी सुरू आहे. अतिक्रमण निरीक्षकांच्या पाहाणीमध्ये शहरात विविध ठिकाणी अनधिकृतरित्या २२२ गणेश विक्रीचे स्टॉल उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. विशेष असे की महापालिकेने शहराच्या विविध भागामध्ये गणेश विक्रीच्या स्टॉल्ससाठी ओपन स्पेसेस उपलब्ध करून दिल्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने अनधिकृत स्टॉल्स उभारले आहेत. यापैकी १९५ स्टॉल धारकांना नोटीस बजावण्यात आली असून उर्वरीत स्टॉलधारकांना पुढील दोन दिवसांत नोटीस बजावण्यात येईल.
स्टॉलच्या ठिकाणाचे जीओ मॅपिंग व विक्रेत्यांची संपुर्ण माहिती घेउन संबधित पोलिस ठाण्याकडे देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अतिक्रमण निरीक्षकांना देण्यात आले आहेत.
अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत १५४७ मंडळांना मंडप परवाने देण्यात आले आहेत. यामध्ये २०१९ नुसार परवाना दिलेल्या मंडळाची संख्या ११८८ इतकी आहे.
तुळशी बागेतील फक्त 4 व्यावसायिकांनी पूर्ण भाडे भरले
:19 मे पासून तुळशी बाग बंद
हस्तांतरण शुल्क न भरणाऱ्या फेरीवाल्यांचा परवाना रद्द होणार!
– महापालिकेचा अतिक्रमण विभाग नियमानुसार करणार कारवाई
– फेरीवाल्यांसाठी 2014 पूर्वीचे नियम
– फी कशी आकारली जाते
: असे आहेत आदेश
कोणतेही व्यवसायिक राहणर नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. दिलेल्या मुदतीनंतर केलेल्या कार्यवाहीचा संपूर्ण अहवालासह सदरचे परवाने रद्द करून नोंद रजिस्टरमध्ये नोंद घेणेकामीचा रितसर प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्य कार्यालयाकडे त्वरित सादर करावा.
बेवारस गाड्याने बालेवाडीचे गोडाऊन ‘फुल्ल’!
: पाषाण ला नवीन गोडाऊन करणार
: अतिक्रमण विभागाने 1877 बेवारस गाड्या केल्या जप्त!
पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC Encroachment dept) शहरात बंद पडीक गाड्यांवर (Scrap vehicles) कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. नोटीस सात दिवसांनंतर सदरच्या गाड्या जप्त करून उचलण्यात येत आहेत. त्यानुसार 1 जानेवारी ते 25 फेब्रुवारी पर्यंत 1877 गाड्या जप्त (seize) करण्यात आल्या आहेत. तर 2311 नोटीस देण्यात आल्या आहेत. दरम्यान या गाडयांमुळे बालेवाडी चे महापालिकेचे गोडाऊन (Balewadi Godaun) भरले आहे. महापालिका पाषाण ला नवीन गोडाऊन करणार आहे. अशी माहिती अतिक्रण विभागाकडून देण्यात आली.
