PMC : Vikram Kumar : विषय समित्यामधील प्रलंबित प्रस्तावावरून महापलिका आयुक्तांनी घेतला महत्वाचा निर्णय!

Categories
PMC पुणे

विषय समित्यामधील प्रलंबित प्रस्तावावर आयुक्त गंभीर

: दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रस्तावांची मागितली माहिती

पुणे : महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्याकडून विषय समित्या समोर विकास कामाचे प्रस्ताव ठेवले जातात. मात्र त्यावर कित्येक महिने निर्णय होताना दिसून येत नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याकडे गंभीरपणे लक्ष दिले आहे. दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रस्तावांची माहिती आयुक्तांनी सर्व खातेप्रमुख, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना मागितली आहे. मात्र आयुक्तांचा हा सत्ताधारी भाजपाला झटका मानला जात आहे.

: सत्ताधारी काय भूमिका घेणार

महापालिकेत स्थायी समिती सर्वात महत्वाची मानली जाते. त्या खालोखाल विविध विकासकामे करण्यासाठी शहर सुधारणा समिती, क्रीडा समिती, विधी समिती, महिला बाल कल्याण समिती आणि शिक्षण समित्यांमध्ये प्रस्ताव ठेवले जातात. नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाकडून हे प्रस्ताव ठेवले जातात. मात्र महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आले कि बऱ्याच विषयावर निर्णय होत नाही. त्यामुळे विकासकामे ठप्प होतात. याबाबत महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष घातले आहे. दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रस्तावांची माहिती आयुक्तांनी सर्व खातेप्रमुख, उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना मागितली आहे. मात्र आयुक्तांचा हा सत्ताधारी भाजपाला झटका मानला जात आहे. यावर सत्ताधारी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

: अभिप्राय देण्यास उशीर करण्याबाबत आयुक्त काय करणार?

दरम्यान असे असले तरी प्रशासनाकडून देखील सभासदांच्या प्रस्तावावर लवकर अभिप्राय दिला जात नाही. यावर आयुक्त काय कारवाई करणार, याकडे ही लक्ष लागून राहिले आहे. कारण सभासद देखील विकास काम करण्याबाबत प्रस्ताव विषय समित्या समोर ठेवतात. मात्र समिती कडून काही प्रस्ताव  अभिप्राय देण्यासाठी पाठवले जातात. मात्र त्यावर ही लवकर निर्णय होत नाही. याबाबत तक्रारी करून देखील उपयोग होत नाही. याबाबत आयुक्त काय करणार, याकडे लक्ष लागले आहे.

7th pay commission: PMC : अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मनपा आयुक्तांचे परिपत्रक जारी

Categories
Breaking News PMC पुणे

अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मनपा आयुक्तांचे परिपत्रक जारी

: नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पासून वेतन लागू करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे.  मात्र महापालिका आयुक्तांकडून त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले नव्हते. महापालिका कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार सातव्या वेतन आयोगाचा लाभ नोव्हेंबर पेड इन डिसेंबर  देण्याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर बुधवारी ठेवला होता. आयुक्तांची त्यावर गुरुवारी सही झाली असून तात्काळ परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा संपली असून त्यांना आता सुधारित वेतन नोव्हेंबर महिन्यापासून लागू होणार आहे.

: प्रशासनाने ठेवला होता प्रस्ताव

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रस्ताव बरेच दिवस महापालिका आणि पुन्हा राज्य सरकारकडे पडून होता. अखेर सप्टेंबर  महिन्यात वेतन आयोग राज्य सरकारकडून लागू करण्यात आला आहे. आयोगाला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याबाबत कुठलीही हालचाल करण्यात आलेली नव्हती.  याबाबत  स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनतर  वेतन निश्चितीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. नंतर या कामास गती देण्यात आली होती. आता हे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा लाभ नोव्हेंबर पेड इन डिसेंबर  देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर ठेवला होता. आयुक्तांनी त्यानुसार सुधारित वेतन देण्याचे परिपत्रक जारी केले आहे.

: असे आहे परिपत्रक

राज्यातील महानगरपालिकांमधील अधिकारी/कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफासरशीनुसार सुधारित
वेतन श्रेणी लागू करण्याची कार्यवाही संदर्भ क्र.१ अन्वये विहित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार पुणे महानगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणेस संदर्भ क्र.२ अन्वये मा. स्थायी समिती ठ.क्र. ४४१ दि १८/०८/२०२० व संदर्भ क्र.३ अन्वये मा मुख्य सभा ठराव क्र २५७ दि. १०/०३/२०२१ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे
उपरोक्त मान्यतेस अनुसरुन जा.क्र.मआ/मुले/८६७ दि.०८/०६/२०२१ अन्वये नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन याच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव संदर्भ क्र ४ अन्वये महाराट्र शासन नगर विकास विभाग क्र.पीएमसी -२०२१ /प्र क्र. १८७/ नवि-२
दिनांक १६/९/२०२१अन्वये मंजूर करण्यात आला आहे. ७ व्या वेतन आयोगाचा लाभ आकृतीबंधानुसार मंजूर पदावरील पुणे महानगरपालिकेकडील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना देणे तसेच दि.०१/०१/२०१६ ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झालेले आहे/ मृत पावलेल्या पुणे महानगरपालिकेकडील अधिकारी/कर्मचारी यांना मंजूर पदावरील कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ देणे व त्यानुसार सेवानिवृतीवेतन सुधारित करणे आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेकडील अधिकारी/कर्मचारी यांना सदर मंजूर केलेल्या प्रस्तावातील अटीनुसार  नियमावली व अनुसुची नुसार माहे नोव्हेबर पेड इन डिसेंबर या माहे पासून  दर महा वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

: 10 महिन्यांचा वेतनातील फरक नंतर दिला जाणार

दरम्यान या परिपत्रकात 10 महिन्यांचा वेतनातील तफावतीचा उल्लेख केलेला  नसला तरी सरकारच्या आदेशानुसार हा फरक डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तसेच पाच वर्षाचा फरक हा पुढील पाच वर्षात कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडात जमा होणार आहे.
महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचे परिपत्रक अखेर महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे. महापालिकेच्या सर्वच कर्मचारी संघटनांनी याबाबत पाठपुरावा केला होता. शिवाय यासाठी महापालिकेतील पदाधिकारी आणि विरोधी पक्ष नेत्यांची देखील मोलाची मदत झाली. यामुळे आता कर्मचारी व अधिकारी वर्ग खुश आहे.
   : प्रदीप महाडिक, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन 

Katraj-Kondhwa road : PMC : कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते 

Categories
Breaking News PMC पुणे

कात्रज – कोंढवा रस्त्याला २ पर्यायी रस्ते

९ कोटींच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी

पुणे : रहदारी टाळण्यासाठी कात्रज कोंढवा ८४ मीटरचा डीपी रस्ता तयार करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी त्याला पर्यायी रस्ते तयार करण्याची निकड आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक ४१ ड मध्ये दोन पर्यायी रस्ते केले जाणार आहेत. यासाठी ९ कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.

: डीपी रस्त्याच्या कामातून खर्च केला जाणार

याबाबतचा प्रस्ताव नगरसेविका मनीषा कदम आणि उज्वला जंगले यांनी स्थायी समिती समोर ठेवला होता. त्यानुसार कात्रज-कोंढवा 84 मी डी.पी. रस्ता विकसित करणे या कामासंदर्भात पर्यायी रस्ते तयार करण्यासाठी प्रभाग क्र.41 ड मधील सर्वे नं.७६,७५,५१,५२,४३,४४,४५ मधून जाणारा डी.पी. रस्ता टिळेकर नगर मुख्य रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामासाठी रू.7 कोटी तसेच  कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सदर रस्त्याला जोडणारे रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी प्रभाग क्र.41 ड मधील साई नगर,गोकुळ नगर,टिळेकर नगर डांबरीकरण व मजबुतीकरण करणे या कामासाठी र.रु.2 कोटी लागणारा खर्च सन 2021-22 च्या अंदाजपत्रकातील कात्रज-कोंढवा रस्ता राजस सोसा चौक ते खडीमशीन चौक ते पिसोळी गाव पुणे मनपा हद्द रस्ता 84 मी डी.पी. रस्त्याचे काम करणे बजेट कोड:- CE20A1262/A9-283 र.रू. 35 कोटी या तरतुदी मधून करण्यास मान्यता देण्यात यावी. या प्रस्तावाला स्थायी समिती ने मान्यता दिली आहे.

PMC : Sinhagadh Road : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार  :  पर्यायी रस्ता उपलब्ध होणार

Categories
Breaking News PMC पुणे

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार

:  पर्यायी रस्ता उपलब्ध होणार

पुणे : महापालिकेकडून प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्ता विकसित करण्याते येणार असून या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 76 लाख 76 हजार रूपयांच्या खर्चास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरून नांदेड सिटीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या उपलब्ध होणार असून मुख्यरस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

 

सदर कामाअंतर्गत माती मुरूम खोदाई,वाहतुक करणे, मुरूम पुरविणे, मुरूम पसरविणे, मुरूम दबाई करणे, जी.एस.बी., वेटमिक्स मॅकाडम, प्राईम कोट,टॅककोट,डेन्स बिटुमिनस मॅकाडम,बिटुमिनस काँक्रीट,मॅनहोल चेंबर रस्त्याच्या समपातळीत बांधणे, इ.आयटेमचा समावेश आहे.
विषयांकित कामाची निविदा मागविली असता प्रकरणी ९ निविदा प्राप्त झाल्या असून ७ निविदाधारक पात्र आहेत. ठेकेदार मे. मे.त्रिमुर्ती स्टोन मेंटल कं. यांची सर्वात कमी दराची (१८.५२%) कमी दराचे म्हणजेच टेंडर र.रु. १,४६,१०,३०२ २४ ची निविदा प्राप्त झाली आहे. तसेच जी.एस.टी. र.रू.२१,५१,७३८= १८ अधिक रॉयल्टी र.रू.६,३४,८८०=६४ अधिक मटेरीयल टेस्टिंग र.रू.१३,२३३=०० अधिक लेबरसेस ररू.१,७९,३११=५२ अधिक वर्करइंश्युरन्स र.रू ८९,६५५=७६पर्यंत अदा करणेत येणार आहे. सदर ठिकाणी प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी.पी.रस्ता विकसित केल्याने सिहंगड रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे व पी.एम.वय प्रकल्पास जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे.
नांदेड सिटीकडे जाण्यासाठी सध्या सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे, महामार्गावरून आलेली वाहने तसेच मुख्य रस्त्याने आलेली वाहने वडगाव पूलापासून धायरी मधून पुढे नांदेड सिटीकडे आणि शिवणे मध्ये या मार्गावरून जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या शिवाय, नांदेड सिटीच्या जवळच महापालिकेची पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यात आलेली असून त्यांनाही याच मार्गाने जावे लागते.

Pune : PMC : नागरिकांना सूचना : गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

Categories
PMC पुणे

गुरुवारी लष्कर भागात पाणीपुरवठा बंद!

पुणे : गुरूवार  रोजी लष्कर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठाबंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक १२/११/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.

Hemant Rasne : Vilas Kande : टॅक्स मधून महापालिकेला 1155 कोटींचे उत्पन्न  : हेमंत रासने आणि विलास कानडे यांचे एकत्रित प्रयत्न 

Categories
Breaking News PMC पुणे

टॅक्स मधून महापालिकेला 1155 कोटींचे उत्पन्न

: हेमंत रासने आणि विलास कानडे यांचे एकत्रित प्रयत्न

पुणे : महापालिकेचा उत्पन्न मिळवण्याचा सर्वात महत्वाचा स्रोत हा टॅक्स विभाग आहे. विभागाने 31 ऑक्टोबर पर्यंत सुमारे 1155 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. जे मागील वर्षा पेक्षा 198 कोटींनी अधिक आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि विभाग प्रमुख विलास कानडे यांच्या एकत्रित प्रयत्नाने हे शक्य झाले आहे.

: मागील वर्षी पेक्षा 198 कोटी अधिक उत्पन्न

टॅक्स हा महापालिकेचा उत्पन्न वाढीचा सर्वात महत्वाचा स्रोत ठरला आहे. मागील आर्थिक वर्षात टॅक्स ने 1700 कोटींचे उत्पन्न मिळवले होते. कोरोना काळात त्यामुळे महापालिकेला चांगली मदत झाली. दरम्यान चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यात टॅक्स मधून महापालिकेला 1155 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. जे मागील वर्षा पेक्षा 198 कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी पहिल्या सात महिन्यात पालिकेला 957 कोटी मिळाले होते. टॅक्स विभाग प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले कि, वसुली करण्यास अजून 5 महिन्याचा अवधी आहे. तोपर्यंत आम्ही 1600 कोटी पर्यंत उत्पन्न मिळवू.

: 36 हजारापेक्षा अधिक मिळकतीचे मूल्यमापन

विभाग प्रमुख विलास कानडे यांनी सांगितले कि, चालू आर्थिक वर्षात आम्ही 36 हजार 866 नवीन मिळकतीचे मूल्यमापन केले आहे. ज्यामधून महापालिकेला 195 कोटींचे उत्पन्न मिळणार आहे. यावर्षी विभागाच्या प्रयत्नाने सगळ्यात जास्त मिळकतीचे मूल्यमापन झाले आहे. मागील पूर्ण वर्षात 47666 मिळकतीचे मूल्यमापन केले होते. 2019-20 मध्ये 38968, 2018-19 मध्ये 24255, 2017-18 मध्ये 27104 तर 2010-11 मध्ये 27773 मिळकतीचे मूल्यमापन करण्यात आले होते.

Municipal Election: पुणे मनपाला ३० नोव्हेंबर पर्यंत कच्चा प्रारूप तयार करावा लागणार  : प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुणे मनपाला ३० नोव्हेंबर पर्यंत कच्चा प्रारूप तयार करावा लागणार

: प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे निर्देश

: राज्य निवडणूक आयोगाच्या महापालिका आयुक्तांना सूचना

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यासाठी वेळापत्रकही निश्‍चित केले आहे. त्यानुसार आता पुणे महापालिकेला

राज्यातील मुदती संपणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करावे लागणार आहे. शासनाने पूर्वीच्या अध्यादेशात सुधारणा करून महापालिकेस तिच्या लोकसंख्येनुसार देय असलेल्या किमान व कमाल सदस्य संख्येत बदल केला आहे. या सुधारणेला अनुसरून सदस्य संख्या, प्रभागांची संख्या याचा तपशीलही जाहीर करण्यात आला असून शंका असल्यास तत्काळ राज्य निवडणूक आयोगाकडे संपर्क साधावा लागणार आहे.

 

महापालिका आणि आराखडा सादर करण्याची मुदत 

नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली,
कोल्हापूर – 18 नोव्हेंबर

पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, ठाणे, उल्हासनगर,
नाशिक, सोलापूर, अमरावती, अकोला  – 30 नोव्हेंबर

लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव- 25 डिसेंबर

पनवेल, मिरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा- 15 फेब्रुवारी

PMC : पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता!  : राज्य सरकारचे परिपत्रक प्रसिद्ध 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता!

राज्य सरकारचे परिपत्रक प्रसिद्ध

राज्यशासनाने महापालिकेच्या कमाल आणि किमान सदस्यांची संख्या निश्‍चित केल्याने पुण्यात 173 नगरसेवक होण्याची शक्यता आहे. सरकारने नुकतेच याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.  तर, या निवडणुका 3 च्या प्रभाग रचनेनुसार होणार असल्याने आता शहरात 57 प्रभाग 3 सदस्यांचे होणार असून 1 प्रभाग 2 सदस्यांचा होण्याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर वर्तवला जात आहे.

निकषानुसार 71 जागा ओबीसी, एससी, एसटी या आरक्षणांसाठी असणार आहेत. 102 जागा या खुल्या गटातील असण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, विद्यमान महापालिकेत चार सदस्यांचे प्रभाग असून सध्या एकूण प्रभाग संख्या 42 आहे. मात्र, आता तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने तसेच सदस्यांची किमान आणि कमाल मर्यादा वाढविण्यात आल्याने 16 ने वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

सदस्य संख्या वाढल्याने प्रभागांची संख्याही वाढणार आहे. परिणामी, प्रभागासाठीच्या मतदारांच्या संख्येचा आकडा कमी होणार असून प्रभाग संख्या तीनची असली, तरी त्यासाठीचे मतदान मात्र दोनच्या प्रभागाएवढे म्हणजेच 49 ते 54 हजारांच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. सध्या चार प्रभागात ही मतदारसंख्या सुमारे 70 ते 80 हजारांच्या आसपास होती. त्यामुळे ही प्रभाग रचना मिनी विधानसभाच समजली होती. मात्र, आता मतदार संख्या कमी झाल्याने राजकीय समीकरणेही बदलणार असून त्यामुळे राजकीय चुरस निर्माण होणार असून महापालिकेत कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळेल का नाही, याबाबत साशंकता उपस्थित केली जात आहे.

 : प्रभाग रचनेच्या कामास येणार वेग 

 

महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने या संस्थांच्या सदस्य संख्येत वाढ केली आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार हा निर्णय घेतला असून त्याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेत नगरसेवकांची संख्या आता 173 होणार आहे. सध्या महापालिकेत 164 नगरसेवक आहेत. त्यात या वाढीच्या निकषांनुसार 9 सदस्यांची भर पडणार असून, ही संख्या 173 होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत ही सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी शासनाने दिलेल्या निवेदनात 17 टक्के नगरसेवक वाढणार असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे नेमके किती नगरसेवक पुण्यात वाढणार? याबाबत गोंधळाची स्थिती होती.

 

मात्र, अखेर शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाल्याने हा गोंधळ मिटला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, पुण्याची लोकसंख्या 30 लाखांपेक्षा अधिक असल्याने पूर्वीच्या नियमानुसार पुण्यात कमीत कमी 156 आणि जास्तीत जास्त 168 सदस्यसंख्या असावी, असा नियम होता. मात्र, शासनाने त्यात बदल केल्याने आता 30 लाखांपर्यंत 168 तर त्यापुढे प्रत्येक लाख लोकसंख्येसाठी एक नगरसेवक असणार आहे.

तर शहरात नगरसेवक तसेच प्रभागांची संख्या वाढणार असल्याने राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.आता प्रभाग तीनचा असला, तरी मतदान मात्र 50 ते 55 हजारांचे असणार आहे. ते दोन सदस्यांच्या प्रभागांएवढेच असणार आहे. महापालिकांच्या आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने 2011 ची लोकसंख्या गृहीत धरून तीन सदस्यांचा प्रभाग रचनेच कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश महापालिकेस दिले होते. मात्र, 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगरपरिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. करोनामुळे 2021 च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. असल्याने शासनाने घेतलेल्या या निर्णयाबाबत स्पष्टता आली नसल्याने प्रभाग रचनेचे काम रखडलेले होते. मात्र, आता या कामास वेग येणार आहे, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

PMC Employee : मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

Categories
PMC social पुणे

मनपा नगरसचिव कार्यालयातील सेवकांकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिठाई वाटप

शिवाय दरवर्षी प्रमाणे सैनिकांना दिवाळी फराळ

पुणे : महापालिकेतील नगरसचिव कार्यालयातील सेवका मार्फत दरवर्षी सैनिकांना दिवाली फराळ पाठवला जातो. यासाठी कर्मचारी वर्गणी जमा करून आणि एक सामाजिक काम या भावनेतून मदत करत असतात. यावर्षी देखील कर्मचाऱ्यांनी सैनिकांना दिवाली फराळ पाठवला. सोबतच महापालिकेत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याना देखील दिवाली फराळाचे वितरण केले आहे. यासाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यांची उपस्थिती होती.

नगरसचिव कार्यालय कर्मचारी व मित्र परिवार कडून मनपा मध्ये इमारत मधील स्वच्छतेचे  काम करणारे कंत्राटी कामगार व त्यांचे सुपर वायजर अश्या 54 कामगारांना कामगारांकडून दिवाळीची  भेट म्हणुन मिठाई (प्रत्येकी ५ kg) वाटप करण्यात आले. तसेच सालाबादाप्रमाणे भारतीय सैनिक यांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला.
सदर कार्यक्रमास  स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर  योगिता भोसले, प्रोटोकॉल ऑफिसर तसेच नगरसचिव कार्यालय तील सेवक उपस्थित होते.

PMP Employee Bonus : पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत प्रशासन नकारात्मक तर हेमंत रासने सकारात्मक   

Categories
Breaking News PMC पुणे

पीएमपी कर्मचाऱ्यांच्या बोनस बाबत प्रशासन नकारात्मक तर हेमंत रासने सकारात्मक

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) दहा हजारहून अधिक कर्मचार्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान (बोनस) देता यावा यासाठी पीएमपीएमएलला महापालिकेने द्यायच्या संचलन तुटीतून उचल देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान बोनस देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मात्र नकारात्मक अभिप्राय दिला होता. मात्र स्थायी समितीने कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.
रासने म्हणाले, पीएमपीएमएलकडून कर्मचार्यांना बोनस देता यावा यासाठी पुणे महापालिकेच्या हिश्याचे २४ कोटी ३१ लाख रुपये द्यावेत अशी मागणी करर्णयात आलेली आहे. पुणे महापालिकेकडून पीएमपीएमएलला मोफत किंवा सवलतीच्या दराचे बसपास, इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे बसपास यासाठी संचलन तुट रक्कम दिली जाते. मात्र सानुग्रह अनुदान किंवा बक्षीस वाटपासाठी रक्कम दिली जात नाही.
रासने पुढे म्हणाले, गेल्या आर्थिक वर्षात पीएमपीएमएलकडून वितरीत करण्यात आलेल्या मोफत किंवा सवलतीच्या दरातील पासेसची रक्कम तीन कोटी आठ लाख रुपये इतकी आहे. या संदर्भात आयुक्तांनी पाठविलेल्या अभिप्रायाचे अवलोकन करून बोनस देण्यासाठी आवश्यक असणारी एकवीस कोटी रुपयांची उचल देण्यास मान्यता देण्यात आली. ही रक्कम सं २०२२-२३  च्या संचलन तुटीच्या तरतुदीमधून समायोजित करण्यात येणार आहे.