Tag: pmc
पीएमपी प्रशासनाला वाटते; कंपनी सेक्रेटरी पद निर्माण केले तरच कारभार सुधारेल!
: कंपनी सेक्रेटरी पद निर्माण करण्याचा प्रशासनाचा संचालक मंडळासमोर प्रस्ताव
: संचालकांची भूमिका काय आहे?
: पीएमपी प्रशासनाचा नवीन प्रस्ताव असा आहे
पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ही कंपनी, कायदा २०१३ नुसार कार्यरत असून सदर कायदयानुसार कंपनी सेक्रेटरी हे पद अत्यंत आवश्यक असून या पदावरील अधिकारी हे कुशल /विशेष शैक्षणिक अर्हता असलेले असणे आवश्यक आहे. संचालक मंडळ ठराव क.१८,दि.१६/०८/२०१७ अन्वये सन २०१७ चे नविन आस्थापना आराखड्यास मान्यता दिलेली आहे. सदरच्या आराखडया मध्ये कंपनी सेकेटरी व विधी अधिकारी हे पद आहे. तथापि सदरच्या आराखडयास मे. औद्योगिक न्यायालयाची स्थगिती असलेने सन २०१३ च्या आस्थापना आराखडया नुसार संचालक मंडळ ठराव क.६,दि.१७/११/२०१८ अन्चये परिवहन महामंडळाचे कामकाज करणेस मान्यता दिलेली आहे. तसेच सन २०१७ चा नविन आस्थापना आराखडा रद्द करणेबाबतचे विषयपत्र मा. संचालक मंडळ यांचे मान्यतेकरीता सादर करणेत आलेले आहे. सध्या सन २०१३ चे आस्थापना आराखडयानुसार महामंडळाचे कामकाज चालू आहे. तथापि सन २०१३ चे मान्य आस्थापना आराखडयाचे आकृती बंधामध्ये सदर पदनामाचे स्वतंत्र पद नाही. महामंडळाचे आस्थापना आराखडयानुसार महामंडळाकडील विधी अधिकारी अथवा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे कडे कंपनी सेक्रेटरी या पदाचा अतिरीक्त पदभार देण्याची तरतूद आहे. परंतू विधी अधिकारी अथवा मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया या संस्थेचे सभासद असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत महामंडळाकडे कंपनी सेक्रेटरी या पदाची शैक्षणिक पात्रता धारण करणारा एकही कर्मचारी नाही. सबब कंपनी सेकेटरी या पदाची महामंडळाची गरज विचारात घेता या पदनामाचे १ पद कायम स्वरूपी निर्माण करणे आवश्यक आहे.
डॉ रामचंद्र हंकारे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा करणार लेखाजोखा
: केंद्र आणि राज्याच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी आढावा
पुणे : राज्य आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ रामचंद्र हंकारे गुरुवारी दुपारी 2:30 ते 6 या वेळेत महापालिकेच्या आरोग्य विभागाचा आढावा घेणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आगामी काळात प्रभावीपणे राबवण्यासाठी हा लेखाजोखा होणार असे मानले जात आहे. दरम्यान डॉ हंकारे महापालिकेचे आरोग्य प्रमुख होते. नुकतीच त्यांची बदली झाली होती. त्यांनतर डॉ हंकारे महापालिकेत आढावा घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे या आढावा बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
: लसीकरणाचा देखील होणार आढावा
लसीकरण केंद्रावरील कर्मचारी निवांत; मनपा प्रशासन देखील सुस्त!
: आरोग्य अधिकाऱ्यांनी तक्रार करूनही आयुक्त, अतिरिक्त आयुक्ता कडून दखल नाही
: शहरात 189 लसीकरण केंद्रे
: कर्मचाऱ्यांना काम देण्याची मागणी
वडगाव बुद्रुक मधील प्रकल्पांना निधी कमी पडू देणार नाही
– स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिले आश्वासन
पुणे : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना महामारीच्या काळात पुणे महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देत ५५० कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला आहे . त्यातूनही कितीही संकटे आली तरीही आवश्यक त्या सर्व विकास कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून वडगाव बुद्रुक परिसरात सुरु असलेल्या सर्व प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही प्रभाग क्र. ३३ अ वडगाव बुद्रुक येथील सर्वे नं. ४१ आणि ४२ मधील डी .पी. रस्ते विकसित करणे या कामाच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमदार भीमराव अण्णा तापकीर होते . आपल्या मनोगतात आमदार तापकीर म्हणाले की , नगरसेवक हरिदास चरवड अतिशय चांगले काम करीत आहेत , प्रचंड पाठपुरावा करून कामे मार्गी लावणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्ये आहे. भविष्यातही नागरिकांनी त्यांच्याबरोबर रहावे अशी विनंती त्यांनी केली .
नवनिर्वाचित पी. एम.आर.डी ए . सदस्य नगरसेवक हरिदास चरवड यांच्या निधीतून होत असलेल्या या कामासाठी दीड कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे . यावेळी नगरसेविका नीता दांगट, राजश्री नवले , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव , शिवाजीआप्पा येवले, अनंतदादा दांगट, अप्पासाहेब पोळेकर, बाळासाहेब पोरे,सुरेश कोळेकर , ह .भ .प .रामदास चरवड, , शहाजी वांजळे, संजय पवळे , चंद्रकांत लोखंडे , लक्ष्मण खाडे , संदीप चरवड, कल्पेश ओसवाल, सिद्धेश पाटील, सचिन मणेरे, दत्तात्रय भरेकर, राजेंद्र गिरमे, अर्जुन शिंदे, भिवाजी वाकचौरे, पै. अनंता बनकर, अनंता भोईर, सचिन पोळेकर, सागर पोळेकर,गणेश टकले,लेले काका, बाळासाहेब कंगले , गुरुनाथ साळुंखे,राहुल खाटपे, नामदेव यादव,नवनाथ टाक,विठ्ठल खुटेकर,सुरज शेडगे ,शिवनारायण बंग, विजय खोल्लम,महेश वाघ,दत्तात्रय मारणे,हरिष घोलप, हेमंत अग्रवाल , गणपत शिंदे, रोहित पळशीकर, अमित देशमुख,विनोद डागा,सूर्यकांत साठे चंद्रकांत पवळे,केदारनाना जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते .
शेतकरी समूह गट आणि हंगामी व्यवसायिकांना होणार ओटा मार्केटचा फायदा
: 11 महिने भाडे कराराने गाळे देण्याचे महापालिकेचे धोरण तयार
: ओटा मार्केट अनेक वर्षांपासून विनावापर पडून
ओटा मार्केटमधील ओटे/गाळे हे यापूर्वी अतिक्रमण विभागाकडील रस्ता, पदपथावरील अधिकृत परवानाधारकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने यापूर्वी सदर ओटा मार्केटमधील गाळ्यांमध्ये औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीमधील रस्ता, पदपथावरील अधिकृत परवानाधारकांचे रीतसर पुनर्वसन करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करून देखील तेथील व्यवसायिक सदर ओटा मार्केटमध्ये व्यवसाय होत नाही. या कारणास्तव तेथे पुनर्वसन करून घेणेस तयार झालेले नाहीत. त्यामुळे सदरचे ओटा मार्केट अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहेत.
सद्यस्थितीत पुणे शहरात विविध ठिकाणच्या मनपा मिळकतींवर बांधून तयार असलेली खालीलप्रमाणे एकूण सात ओटा मार्केट आहेत. (१) खराडी ओटा मार्केट, खराडी स.नं.५, (२) पुण्यनगरी ओटा मार्केट, वडगावशेरी स.नं.३९, (३) राजमाता जिजाऊ ओटा मार्केट, धानोरी, स.नं.१७, (४) कुरुंजाई ओटा मार्केट, कळस, स.नं.१२०, (५) सनसिटी ओटा मार्केट, वडगाव बु., स.नं.१२ (६) बाणेर ओटा मार्केट, बाणेर स.नं.८५अ, (७) आंबेगाव ओपन ओटा मार्केट, आंबेगाव बु. स.नं.४३/१. यामधील काही ओटा मार्केटमध्ये संबंधित क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील नोंदणीकृत पथविक्रेत्यांचे रितसर पुनर्वसन करून देखील पथविक्रेते ओटा मार्केटमध्ये व्यवसाय होत नसल्याची कारणे सांगून ओटा मार्केटमध्ये पुनर्वसन केलेल्या गाळ्यांमध्ये व्यवसाय करण्यास नकार देवून ते पुन्हा रस्ता, पदपथांवर व्यवसाय करण्यास मागणी करीत आहेत. त्यामुळे उपरोक्त ओटा मार्केटमधील बहुतांश गाळे रिक्त राहत आहेत. अशा ओटा मार्केटमधील रिक्त गाळ्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होण्याच्या अनुषंगाने मनपा स्तरावर नव्याने धोरण तयार करणेकामी सर्व संबंधित विभागांची बैठक घेवून याबाबतचे धोरण करण्याबाबत निर्णय झाला होता. त्यानुसार हे धोरण तयार करण्यात आले आहे.
: धोरणात अशा काही तरतुदी
विभागाकडून ताब्यात घेण्यात येईल.
“ती” बस ची महिला बाल कल्याण समितीचे सदस्य करणार पाहणी
: त्यानंतरच देखभाल व दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावर चर्चा
पुणे : पुणे शहरामध्ये महिलांकरिता ११ “ती” बस टॉयलेट कार्यरत आहेत. स्वच्छ “ती” बसटॉयलेटमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशीन, टॉयलेट सीट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृती विषयक माहिती देण्यासाठी टीव्ही इत्यादी सुविधा आहेत. ‘ती” बस टॉयलेटची दैनंदिन देखभाल दुरूस्ती व अनुषंगिक कामे ११ महिने करिता प्रायोगिक तत्वावर करणेबाबत साराप्लास्ट यांचे समवेत करारनामा करण्यात आला होता. तो संपला असून नवीन करारनामा करण्याबाबत प्रशासनाकडून महिला बाल कल्याण समिती समोर प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यावर शुक्रवार च्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार येत्या आठवड्यात समितीचे सदस्य ती बस ची पाहणी करतील. त्यानंतरच सदरच्या प्रस्तावाला मंजुरी द्यायचे अथवा नाही, हे ठरवले जाईल. अशी माहिती समितीच्या अध्यक्ष रुपाली धाडवे यांनी दिली.
: प्रशासनाकडून प्रस्ताव दाखल
: सद्य स्थितीत एकूण ११ “ती” बसेस
२) संभाजी पार्क , जे एम रोड, शिवाजीनगर
३) सिमला ऑफीस, शिवाजीनगर
४) शनिवारवाडा
५) ग्रीन पार्क हॉटेल, बाणेर
६) आनंद नगर , सिंहगड रोड
७) छत्रपती शिवाजी उद्यान, बोपोडी
८) आर टी ओ ऑफीस जवळ,फुले नगर
९) बसस्टॉप, लोहगाव
१०) पोलीस चौकि जवळ, विश्रांत वाडी
११) संविधान चौक, वानवडी
प्रभाग क्र. १४ क मध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे आरोग्य केंद्र उभारणार
: महापालिकेच्या महिला बाल कल्याण समितीची मान्यता
: प्रशासनाचा सकारात्मक अभिप्राय
प्रभाग विकासाचे मॉडेल राबविणार
: स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची माहिती
महाविकास आघाडीतील पक्ष विचाराने कधी एकत्र येऊ शकत नाहीत
: सभागृह नेते गणेश बिडकर यांनी लगावला टोला
पुणे : पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची (भाजप) मते फुटतील हा महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या पक्षाने केलेला दावा खोटा ठरला आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस तसेच शिवसेना या तीनही पक्षाचा मुखवटा गळाला आहे, अशी प्रतिक्रिया महनगरपालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. एकसंघ पद्धतीने भाजप या निवडणुकीला सामोरे गेल्याने हा विजय निश्चित होता, असे बिडकर यांनी स्पष्ट केले. तर केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीनही पक्ष आहेत, ते विचाराने कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.
१४ जागांवर भाजप विजयी
पुणे महानगर नियोजन समिती (पीएमआरडी) सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. या निवडणुकीत भाजपने उभे केलेले सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. २२ पैकी १४ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या विजयानंतर सभागृह नेते बिडकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. योग्य पद्धतीने केलेले नियोजन यामुळे या निवडणुकीत भाजपची सर्व मते ‘इनकॅश’ झाली. त्यामुळे भाजपची मते फुटतील हा विरोधी पक्षाने केलेला दावा फोल ठरला आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील बिघाडी पुणेकरांच्या लक्षात आली. महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या एका पक्षाच्या उमेदवाराला तर आवश्यक असलेला मतांचा कोटा देखील पूर्ण करता आला नाही. भाजपची मते फोडण्याच्या वल्गना ते करत राहिले. मात्र त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली. केवळ सत्तेसाठी एकत्र आलेले हे तीनही पक्ष आहेत, ते विचाराने कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, हे यानिमित्ताने समोर आले, अशी टीका देखील सभागृह नेते बिडकर यांनी केली.