Tag: DA Hike
Big decision of Pune Municipal Corporation! | 4% DA applicable to employees from July 1
| Circular issued regarding DA
DA Hike Circular : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! | कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू | DA बाबतचे सर्क्युलर जारी
Dearness Allowance to PMC Pune Employees : पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. महागाई भत्त्यातील ४ टक्के वाढ १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी जारी केले आहे. चार महिन्याचा फरक नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 5 महिन्याचा फरक डिसेंबर पेड इन जानेवारी च्या निवृत्ती वेतनातून दिला जाणार आहे. (DA Hike Circular)
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिल्यांनतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. (7th pay Commission)
दरम्यान पुणे महापालिकेने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या चार महिन्याच्या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतनातून द्यावा असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित दराचा जुलै ते नोव्हेंबर असा 5 महिन्याचा फरक डिसेम्बर पेड इन जानेवारी च्या पेन्शन मधून दिला जाणार आहे. (Dearness allowance News)
महागाई भत्त्याची रक्कम फरकासह अदा करताना नोव्हेंबर पेड इन डिसेम्बर च्या पगारबीलातून 24 महागाई भत्ता, या अंदाजपत्रकीय तरतुदींवर खर्च टाकण्यात यावा. तसेच दर महाच्या महागाई भत्त्याचा खर्च खात्याच्या वेतन विषयक तरतुदींमधून करण्यात यावा. यासाठी सर्व खातेप्रमुख आणि सहायक आयुक्त यांनी आपल्या नियंत्रणाखालील सेवकांना सूचित करण्या बाबत सांगण्यात आले आहे.
DA Hike : राज्य सरकारचा मोठा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता लागू
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची वातावरण आहे. (7th pay Commission)
राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबरच्या वेतनासह रोखीने देण्यात यावा, असा निर्णय सरकारने घेतला आहे. (Dearness allowance News)
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्याबाबत विद्यमान तरतुदी आणि कार्यपद्धती त्याचप्रकारे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा, असेही निर्देश सरकारने दिले आहेत.
अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्याबाबतती संबंधित लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा.