Tag: Marathi news
PMC Property Tax | मिळकत करात 40% सवलत नेमकी कुणाला मिळणार? कुणाची सवलत रद्द होणार? | जाणून घ्या सर्व काही
PMC property Tax | पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे. (PMC property Tax)
PMC Pune property tax | PT 3 अर्ज कुठे जमा करायचा? आवश्यक कागदपत्रे कुठली? जाणून घ्या सर्व काही
propertytax.punecorporation.
सवलत प्राप्त करणेकरिता PT-३ अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे:
२) मतदान ओळखपत्र / पासपोर्ट/वाहनचालक परवाना/ गैस कार्ड / रेशनकार्ड इ.
३) पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत
PT-३ अर्जासोबत वरील सक्षम पुराव्याचे कागदपत्रे व २५ रु. चलन फी भरून नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय / नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचेकडे अर्ज जमा केलेनंतर पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचेकडून कागदपत्रांची तपासणी करून करआकारणी व करसंकलन प्रमुख यांचेकडून प्रकरण अंतिम करणेत येईल.
Pune Municipal Corporation | बाणेर-बालेवाडी पाणी पुरवठा योजनेचे १७ मे रोजी लोकार्पण करा
| पालकमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
Pune Municipal Corporation | समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी (Baner Balewadi) भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी येत्या १७ मे रोजी योजनेचे पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या कामाचे लोकार्पण करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठकीत दिले. (PMC Pune)
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित या बैठकीस पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar), अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissoner Vikas Dhakane), पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर (Chief Engineer Aniruddha pawaskar) , २४x७ योजनेचे अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप आदी उपस्थित होते. Pune Municipal corporation (PMC)
महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली समान पाणीपुरवठा योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच पाणी मोजणीसाठी मीटर लावावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. (PMC Pune Water Department)
PMC Pune Water Department | पुणे शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार
– सकाळी 9 ते सायंकाळी 5 पाणी बंद राहणार
PMC Pune water Department | गुरूवार रोजी वडगाव जलकेंद्र येथे म.रा.वि.वि.कंपनीचे २२ KV येणाऱ्या विद्युत वाहिनीवर म.रा.वि.वि.कंपनी तातडीचे व अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे काम करणार आहे. त्यामुळे उपरोक्त जलकेंद्र व राजीवागांधी पंपिंगचा पाणीपुरवठा सकाळी : ९ ते सायंकाळी ५ यावेळेत बंद राहणार आहे. तसेच गुरूवार ११/०५/२०२३ रोजी सायंकाळी ५ नंतर उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा
होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
PMC Pune River front Devlopment project | नदीसुधार प्रकल्पातील त्रुटीबाबत मते विचारात घेऊनच पुढील कार्यवाही करावी
| विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे नगरविकास विभागाच्या सचिवांना, पुणे महापालिका आयुक्तांना निर्देश
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | PT 3 application for 40% discount available on PMC Pune website
| The application should be submitted at the Civic Facility Center along with the ward Offices
PMC Pune Property Tax 40% Discount PT 3 Application Form | ४०% सवलतीचा पीटी ३ अर्ज महापालिका वेबसाईट वर उपलब्ध
| क्षेत्रीय कार्यांलयांसह नागरी सुविधा केंद्र येथे अर्ज जमा करावा लागणार
Kothrud Constituency | बाणेरमध्ये नाट्यगृह उभारण्यासाठी प्रयत्नशील | चंद्रकांतदादा पाटील
| थेट भेटच्या माध्यमातून बाणेरमधील नागरिकांशी संवाद
Kothrud Constituency | कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक भागात स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून, त्यासाठी ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून कोथरुड मधील प्रत्येक भागात स्वच्छता राखली जाईल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील (Minister chandrakant patil) यांनी आज दिली. तसेच बाणेरमधील नागरिकांसाठी नाट्यगृह उभारण्यासाठी (Theatre in Baner) सर्वतोपरी प्रयत्न करु, असे त्यांनी यावेळी आश्वास्त केले. (Kothrud constituency)
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरुड मतदारसंघातील नागरिकांशी थेट भेट उपक्रम सुरू केला असून, या उपक्रमाअंतर्गत आज बाणेरमधील मॉर्निंग वॉकसाठी मुरकुटे गार्डन येथे येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, सचिन पाषाणकर, उमाताई गाडगीळ, सचिन दळवी, प्रकाशतात्या बालवडकर, यांच्या सह भाजपाचे सर्व स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Minister Chandrakant patil)
नामदार पाटील म्हणाले की, कोथरुड हे माझं घर आहे. त्यामुळे इथला प्रत्येक भाग स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे. महापालिकेच्या माध्यमातून कचरा संकलन केल्यानंतरही काही भागात कचऱ्याचे ढीग दिसून येतात, असे एकूण ७८ ठिकाणे निदर्शनास आली असून, सदर भागात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन केल्यानंतर ही कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे लोकसहभागातून ‘स्वच्छ’ संस्थेच्या माध्यमातून सदर भागातील कचरा संकलित केला जाईल, अशी व्यवस्था निर्माण केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. (Kothrud constituency)
ते पुढे म्हणाले की, बाणेर मधील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेसोबत सततच्या पाठपुराव्यामुळे समान पाणीपुरवठा योजने काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे बाणेरमधील पाण्याचा प्रश्न सुटेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. (Theatre in Baner)
दरम्यान, यावेळी नागरिकांनी बाणेरमध्ये मनोरंजनासाठी नाट्यगृह उभारावे, भागात ठिकठिकाणी टाकलेला राडारोडा, मुरकुटे गार्डन येथे मोठे विश्रांतीस्थान, अवैध फेरीवाले यामुळे होणारा त्रास, स्वच्छता गृहे आदी समस्या मांडल्या. सदर समस्यांचे तातडीने निवारण केले जाईल, असे यावेळी आश्वास्त केले. तसेच यासंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Deepak Mankar | तरूणांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देते – दीपक मानकर
| सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांच्या नोकरी महोत्सवामुळे अनेक कुटुंबांना मिळाला आधार
Deepak Mankar | नोकरी मिळाल्याचा आनंद तरूणांच्या चेहऱ्यावरील पाहिल्यावर खऱ्या अर्थाने वाढदिवस सार्थकी झाला असे वाटते. हा आनंद सनी आणि गिरीश यांनी दिला असून, असा स्तुत्य उपक्रमाचे सर्वांनी अनुकरण करावे, असा भावना राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी उपमहापौर दीपक मानकर (former Deputy mayor of pune Deepak Mankar) यांनी व्यक्त केले.
दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेश प्रभारी सनी मानकर आणि कोथरूड युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी आयोजीत नोकरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार ऍड. वंदना चव्हाण, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा ,युवक शहर अध्यक्ष किशोर कांबळे, कोथरूड अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Deepak Mankar Birthday)
केंद्र सरकार रोजगार घालवते तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देते, ही कौतुकास्पद बाब आहे, असे ऍड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.
सनी आणि गिरीश हे नेहमी समाजाला उपयोगी असे उपक्रम घेत असतात, सध्या रोजगार महोत्सव ही गरज असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले.
या महोत्सवात 540 तरूणांनी रजिस्टेशन करून मुलाखती दिल्या. त्यातील 95 तरूणांना तात्काळ नोकरीची संधी मिळाली, तर अन्य तरूणांचे दुसऱ्या फेरीत नोकरी संधी उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सनी मानकर आणि गिरीश गुरनानी यांनी दिली.