By-election |  कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

 कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पुणे | मुक्ताताई टिळक (Mukta Tilak)  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक (kasba byelection) भारतीय जनता पक्ष (BJP) जिंकणारच असा निर्धार आज भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक माननीय खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक (city president Jagdish Mulik)यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.

विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा माजी पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात.‌ त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे. तसेच, माननीय खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल.

बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

MLC Election | महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर,शिक्षक मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

भारत निवडणूक आयोगाने  महाराष्ट्र विधान परिषदेच्या दोन पदवीधर मतदारसंघ आणि तीन शिक्षक मतदारसंघ अशा एकूण पाच मतदार संघांसाठी द्वैवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. नाशिक व अमरावती विभाग पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद आणि नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी निवडणुक होणार आहे. आजपासून या निवडणूकीची आचारसंहिता संबंधित पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात लागू करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

गुरुवार दि. 5 जानेवारी 2023 रोजी या निवडणूकीची अधिसूचना जारी करण्यात येईल. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असेल. शुक्रवार दि. 13 जानेवारी 2023 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होईल्, सोमवार दि. 16 जानेवारी 2023 ही नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अतिम तारीख असेल. सोमवार दि. 30 जानेवारी 2023 रोजी सकाळी 08:00 ते दुपारी 04:00 वाजेपर्यंत मतदान होणार असून गुरुवार दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होईल.

सर्वश्री डॉ. सुधीर तांबे (नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ), डॉ. रणजित पाटील (अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ), श्री.विक्रम काळे (औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ), श्री.नागोराव गाणार (नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ), श्री. बाळाराम पाटील (कोकण विभाग शिक्षक मतदार संघ) हे विधानपरिषद सदस्य 7 फेब्रुवारी 2023 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.

Municipal Elections | Ward Structure | पुण्यासह सर्वच महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना | राज्य सरकारचे आदेश | महाविकास आघाडीला झटका

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुण्यासह सर्वच महापालिकांची नव्याने होणार प्रभाग रचना

| राज्य सरकारचे आदेश | महाविकास आघाडीला झटका

पुणे महापालिकेसह (PMC Pune) राज्यातील २४ महापालिकांच्या निवडणुका (Municipal Elections) घेण्यासाठी या सर्व महापालिकांची प्रभाग रचना नव्याने करण्याची आदेश राज्य सरकारने काढले. निवडणुका विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये रखडलेल्या असताना राज्य सरकारने महापालिकांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश काढले आहेत. या निर्णयामुळे महापालिकांच्या निवडणुका आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. (PMC election)

दरम्यान, स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार असतानाच आधीच्या महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सरकारने तयार केलेली प्रभाग रचना नव्याने बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

 राज्यातील २४ महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश नगरविकास विभागाने मंगळवारी काढले. मुदत संपलेल्या व नजीकच्या कालावधीत मुदत संपत असलेल्या महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीसाठी शेवटच्या जनगणनेनुसार प्रभागातील सदस्यांची संख्या आणि रचना निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने संबंधित महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.

City Hawkers Committee Election | नगर पथविक्रेता समिती  निवडणुकीसाठी येणार २८ लाखाचा खर्च!

Categories
Breaking News PMC social पुणे

नगर पथविक्रेता समिती  निवडणुकीसाठी येणार २८ लाखाचा खर्च!

पुणे | राज्य सरकारने शहरातील पथ विक्रेत्यांचे सर्वेक्षणाद्वारे (Hawkers Survey) नोंदणीकृत पथ विक्रेत्यांची मतदार यादी प्रसिद्ध करणेबाबत व निवडणूक घेणेबाबत आदेशित केले आहे. त्यानुसार महापालिका अतिक्रमण विभागाकडून (PMC Encroachment Dept) ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दरम्यान यासाठी 28 लाखाचा खर्च येणार आहे. प्रत्यक्षात 39 लाखांचा खर्च येणार असला तरी मनपा आयुक्तांनी (PMC Commissioner) 28 लाख खर्च करण्यासच मान्यता दिली आहे. त्यामुळे 28 लाखाचे वर्गीकरण करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (City Hawkers Committee Election)
स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार  पुणे महानगरपालिका अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत सदर निवडणूकीसंदर्भात नोंदणीकृत एकूण २२,८८९ पथविक्रेत्यांची प्राथमिक मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जागेवर आढळून न आलेल्या व्यावसायिकांना पुनर्वसित नाही असा शेरा देऊन एकूण २२,८८९ पथविक्रेत्यांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेकडून शहर फेरीवाला समितीचे (नगर पथविक्रेता समिती) निवडणूक घेणेकरिता पुणे शहरातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांची मतदार यादी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीर प्रकटन देवून सूचना व हरकती मागविणेकरीता प्रसिद्ध करणेबाबत कार्यवाही करणेत आली आहे. सदरच्या मतदार याद्या नागरिकांचे सूचना व हरकतींसाठी पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांसह अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामध्ये पाहणेकरीता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा मतदार याद्यांमधील सूचना व हरकती घेणेकरीता नागरिकांना १५ दिवसांची कालमर्यादा देण्यात आली होती. त्यानुषंगाने लेखी स्वरुपात आलेल्या सर्व सूचना व हरकतींची सहाय्यक महापालिका आयुक्त परिमंडळ क्र.१ ते ५ यांचेमार्फत १५ दिवसांचे आत सुनावणीघेवून योग्य तो निर्णय घेऊन खात्याकडून शहरातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि, नगर पथविक्रेता समितीची निवडणूक खर्चासाठी खात्याकडे सुसंगत अर्थशीर्षक उपलब्ध नसल्याने निवडणूक खर्चासाठी नवीन अर्थशीर्षक तयार करून त्यावर वर्गीकरण करून निवडणूक खर्च करणे शक्य होणार आहे. निवडणूक घेणेकरिता अंदाजे ३९,९४,१००/- इतका खर्च येईल असे, इकडील खात्यास कळविण्यात आले आहे.  खर्चासाठी मान्यता मिळणेसाठी सादर केलेल्या निवेदनावर महापालिका आयुक्त यांनी  २८ लक्ष खर्च करणेसाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार 28 लाखाचे वर्गीकरण करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
यावर समितीच्या आगामी बैठकीत चर्चा होईल.

Voter List Program | ९ नोव्हेंबरला पुण्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

 ९ नोव्हेंबरला पुण्यात मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ

| मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे | भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित देशपातळीवरील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ ९ नोव्हेंबर रोजी पुणे येथे होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरी मतदार आणि युवकांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी पुणे येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे नमूद करून देशपांडे म्हणाले, मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम आगामी काळातील निवडणुकांच्यादृष्टीने महत्वाचा आहे. यानिमित्ताने मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमाचे आयोजनही करण्यात येणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त यांच्या उपस्थितीत मतदार नोंदणीविषयी जनजागृती करण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी बालेवाडी येथे सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत. या माध्यमातून पुणे शहराच्या विविध भागातील नागरिकांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मतदान नोंदणी अभियानाच्या माध्यमातून नवीन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे, शिवाय याठिकाणी केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे मतदार जागृतीसाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करुन घेण्याच्यादृष्टीने निवडणूक आयोग वंचित घटकांनाही महत्व देत असल्याने दोन्ही निवडणूक आयुक्त याच ठिकाणी तृतीयपंथीय समुदायाशी संवाद साधणार आहे.

उद्योग क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांचा निवडणूक प्रकियेत सहभाग वाढविण्यासाठी हिंजेवडी येथील टेक महिंद्रा कंपनीच्या सभागृहात विविध उद्योगसंस्थांमध्ये स्थापन झालेल्या मतदार जागृती मंचच्या प्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासोबतच विद्यार्थ्यांना निवडणूक प्रकियेत सहभागी करण्यासाठी, मतदार नोंदणी विषयी जागृती करण्यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ येथे 10 नोव्हेंबर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येणार आहे.

पुनरीक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ असा आहे. दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवार विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहे. तर २६ डिसेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती निकालात काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२३ रोजी करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने मतदार नोंदणी नियम १९६० मध्ये केलेल्या सुधारणेनुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर असे अर्हता दिनांक उपलब्ध झाले आहेत. प्रारुप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १ जानेवारी या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आणि त्यापुढील १ एप्रिल, १ जुलै, १ ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर नोंदणीसाठी पात्र असलेले अर्जदार आगाऊ अर्ज सादर करु शकतील. १ जानेवारी या अर्हता दिनांकावर आधारित पात्र मतदारांच्या अर्जावर वरील नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करुन अंतिम प्रकाशनासह मतदार यादी अद्ययावत करण्यात येईल.

छायाचित्रासह मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम शुभारंभ निमित्ताने भारत निवडणूक आयोगाच्या उपस्थितीत होणाऱ्या विविध जनजागृती कार्यक्रमात सहभाग घेण्याचे आवाहनही मुख्य निवडणूक अधिकारी श्री.देशपांडे यांनी केले आहे.

 NOTA | 1.29 कोटी मतदारांनी निवडणुकीत सर्व उमेदवारांना नाकारले | फक्त NOTA बटण दाबले

Categories
Breaking News Political social देश/विदेश

 NOTA | 1.29 कोटी मतदारांनी निवडणुकीत सर्व उमेदवारांना नाकारले

| फक्त NOTA बटण दाबले

 NOTA in India: गेल्या पाच वर्षांत देशातील सार्वत्रिक निवडणुका आणि राज्य विधानसभा निवडणुकांदरम्यान, सुमारे 1.29 कोटी मतदारांनी फक्त NOTA बटण दाबले (वरीलपैकी काहीही नाही).  NGO ‘Association for Democratic Reforms’ (ADR) ने गुरुवारी ही माहिती दिली. .  पीटीआयच्या बातमीनुसार, एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (न्यू) ने 2018 ते 2022 या कालावधीतील विविध निवडणुकांमध्ये ‘नोटा’ पर्यायाखाली टाकलेल्या मतांचे विश्लेषण केले.

 या सीटवर NOTA सर्वाधिक दाबले गेले

 अहवालानुसार, या कालावधीत राज्य विधानसभा निवडणुकीत NOTA अंतर्गत सरासरी 64,53,652 मते पडली, तर बिहारमधील गोपालगंज मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक 51,660 मतदार होते.  तर लक्षद्वीप लोकसभा जागेवर किमान 100 मतदारांनी NOTA बटण दाबले.  अहवालानुसार, 2020 मधील विधानसभा निवडणुकीदरम्यान, दोन राज्यांमधील सर्वाधिक 1.46 टक्के मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला, ज्यामध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत 7,06,252 आणि दिल्लीत 43,108 मतदारांनी NOTA बटण दाबले.

 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी वापर

 अहवालानुसार, 2022 मध्ये पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत सर्वात कमी लोकांनी NOTA चा पर्याय निवडला.  त्यापैकी 0.70 टक्के मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला, ज्यामध्ये गोव्यात 10,629, मणिपूरमध्ये 10,349, पंजाबमध्ये 1,10,308, उत्तर प्रदेशात 6,37,304 आणि उत्तराखंडमध्ये 46,840 मतदारांनी EVM मध्ये NOTA बटण दाबले.  अहवालानुसार, 2019 मधील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, सर्वाधिक 7,42,134 मतदारांनी NOTA ला निवडले, तर सर्वात कमी 2,917 मते 2018 च्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत NOTA अंतर्गत पडली.

 केव्हा आणि कोणत्या राज्यात जास्त वापर केला गेला

 2018 च्या छत्तीसगड राज्य विधानसभा निवडणुकीत, सर्वाधिक मतदारांनी NOTA ला निवडले, जे 1.98 टक्के होते.  त्याच वेळी, सर्वात कमी टक्केवारी म्हणजे 0.46 टक्के मतदारांनी दिल्ली विधानसभा निवडणुका, 2020 आणि मिझोरम विधानसभा निवडणुका, 2018 मध्ये NOTA अंतर्गत NOTA बटण दाबले.  ADR नुसार, 2018 च्या विधानसभा निवडणुकीत आत्तापर्यंत 26,77,616 मतदारांनी NOTA चा पर्याय निवडला जेथे तीन किंवा अधिक उमेदवारांवर फौजदारी खटले आहेत.

Legislative Council | विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

Categories
Breaking News Political महाराष्ट्र

विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ  राज्य विधीमंडळाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी मतदान होणार आहे.  विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे. निवडणूक आयोगाकडून देशातील उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार या तीन राज्यांतील विधानपरिषदेच्या निवडणूक कार्यक्रमाची बुधवारी घोषणा केली. या तीनही राज्यातील एकूण ३० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे.


असा असेल निवडणूक कार्यक्रम?
  – २ जून  रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
 – ९ जून २०२२उमेदवारांच्या अर्जांची छाननी
 – १० जून २०२२उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
 – १३ जून २०२२मतदानाचा दिनांक
 – २० जून २०२२मतदानाची वेळ – सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत
‘या’ सभासदांचा संपतोय कार्यकाळ
सदाशिव खोत, सुजीतसिंह ठाकूर, प्रवीण दरेकर, सुभाष देसाई, रामराजे नाईक-निंबाळकर, संजय दौंड, विनायक मेटे, प्रसाद लाड, दिवाकर रावते, रामनिवास सिंह या दहा मंत्र्यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत असल्यानं या जागांवर निवडणूक होणार आहे.

Rajya Sabha seat Election : महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी १० जूनला निवडणूक

नवी दिल्ली  : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ३१ मे आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी.चिदंबरम, प्रफुल्ल पटेल,डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार. ३ जून पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

PCMC : PMC : पिंपरी मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! : पुण्याचे कधी वाजणार? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

पिंपरी मनपाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले!

:पुण्याचे कधी वाजणार?

 

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका(PCMC)  निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आगामी निवडणुकीसाठीचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा 1 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविल्या जाणार आहेत. पुणे महापालिकेची(Pune Municipal Corporation) प्रभाग रचना हि १ फेब्रुवारी लाच जाहीर होण्याची शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवच्या प्रभाग रचनेसाठी प्राप्त हरकती 16 फेब्रुवारी रोजी आयोगाला सादर कराव्या लागणार आहेत. 26 फेब्रुवारी रोजी या हरकतीवर सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारसी 2 मार्च 2022 रोजी निवडणूक आयोगाला(State Election Commission) पाठवावे लागणार आहे. आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी हा कार्यक्रम महापालिकेला पाठविला आहे.

पुण्याच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. आयोगाने सांगितले आहे कि अगोदर प्रभाग रचना जाहीर होणार. त्यांनतर निवडणुकीचा कर्यक्रम असेल. त्यानुसार पुण्याच्या प्रभाग रचनेची उत्सुकता सर्वांना आहे.