Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

Categories
Breaking News cultural Political social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Aarogyawari | Palkhi Sohala | वारीतील महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियानाचा शुभारंभ

Aarogyawari | Palkhi Sohala | वारी दरम्यान (Pandharpur Wari 2023) महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची (Sanitory Napkins) व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी (Lactating Mothers) वारी मार्गावर हिरकणी कक्ष (Hirkani Kaksha) उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक (Toll Free Number) आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. (Aarogyawari | Palkhi Sohala)

निवडुंग विठोबा मंदिर येथे राज्य महिला आयोग (Maharashtra State Women Commission) आणि पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यवारी अभियानाचे  (Aarogyawari Abhiyan) उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), मनपा अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Additional Commissioner Ravindra Binwade), महिला आयोगाच्या सदस्य संगिता चव्हाण, प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. (Aarogyawari Abhiyan)

संतांनी माणसातला देव ओळखण्याचा संदेश मानवजातीला दिला असून आरोग्यवारीच्या माध्यमातून माणसातल्या ईश्वराची सेवा घडते, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्य महिला आयोगाने अतिशय संवेदनशीलतेने हा उपक्रम सुरू केला आहे. मासिक पाळीसारख्या विषयाकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनामुळे याबाबतची समस्या मांडताना मनात संकोच असतो. त्यामुळे महिलांची ही समस्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या सहकार्याने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. समाजाच्या सहकार्याने शहरात अनेक ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारे यंत्र बसविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात जागा उपलब्ध झाल्यास सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेच्या विषयावर लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले. वारीत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचे त्यांनी विशेष कौतुक केले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, साधुसंतांच्या विचारधारा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. पंढरपूर वारीच्या निमित्ताने हा विचार सर्वत्र पोहोचतो. पंढरीच्या वारीला जाणाऱ्या महिलांची संख्या वाढते आहे. वारीदरम्यान महिलांना २३ ते २४ दिवस चालावे लागते. या कालावधीत त्यांना एकदा तरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते. त्यांची ही समस्या लक्षात घेऊन आरोग्यवारी अभियान सुरू करण्यात आले आहे.

वारी दरम्यान महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची व्यवस्था करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी वारी मार्गावर हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. महिलांसाठी स्वतंत्र डॉक्टर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ टोल फ्री क्रमांक आणि पिवळ्या रंगाच्या दुचाकीवर मदतीसाठी दूतांची व्यवस्था केली आहे. महिला वारकऱ्यांच्या हस्ते १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. महिलांच्या आरोग्यासोबत त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

आमदार धंगेकर म्हणाले, वारीच्या निमित्ताने सर्व धर्मातील एकात्मता दिसून येते. वारीसाठी जिल्हा प्रशासनाने चांगल्या सुविधा केली आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यवारी उपक्रम स्तुत्य असून वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपा ठाकूर यांनी प्रास्ताविकात आरोग्यवारी अभियानाची माहिती दिली. वारी सोहळ्यादरम्यान महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते आरोग्यवारी अभियान आणि महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उदघाटन करण्यात आले.


News Title | Aarogyawari | Palkhi Sohala | ‘1091’ toll free number for women in Wari | Guardian Minister Chandrakantada Patil launched Aarogyawari Abhiyaan

MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे मंडईतील व्यापाऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निकाली 

Categories
Breaking News Political social पुणे

MLA Ravindra Dhangekar | आमदार रवींद्र धंगेकर यांच्यामुळे मंडईतील व्यापाऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न निकाली

MLA Ravindra Dhangekar | पुणे मेट्रोच्या (Pune Metro) कामामुळे बाधित झालेल्या मंडईतील व्यापाऱ्यांचा (Mandai)  तब्बल ४ वर्ष रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता. अतिशय महत्त्वाचा असणारा कांदा बटाटा मार्केट कडील रस्त्याचा प्रश्न आमदार रवींद्र धंगेकर (MlA Ravindra Dhangekar) यांनी पुणे मेट्रोचे अधिकारी (Pune Metro officers) यांच्या समवेत झालेल्या बैठकीमध्ये तातडीने सोडवला असून या व्यापाऱ्यांना रस्ता मोकळा करून देण्यात आला आहे. (MLA Ravindra Dhangekar)

आमदार रवींद्र धंगेकर यांनी सांगितले की,” स्वतःची रोजी- रोटी बाधित होत असताना देखील शहराच्या विकासासाठी मंडईतील नागरिकांनी व्यापाऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. परंतु मेट्रो कडून घेण्यात आलेल्या निर्णयांमध्ये काही त्रुटी राहिल्याने व्यापाऱ्यांना हकनाक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. यामध्ये समन्वय साधत मेट्रो प्रकल्प व मंडई यांनी परस्पर सहकार्यातून यात मार्ग काढल्यास व्यापारी बांधवांचा प्रश्न देखील सुटणार आहे. त्यामुळे कांदा बटाटा मार्केटसाठी पुणे मेट्रोने रस्ता खुला करून द्यावा, अशा सूचना केल्या असता मेट्रोने तातडीने पाच जून रोजी सदर रस्ता सुरू करून दिला आहे. (Mahatma phule mandai pune)

या बैठकीसाठी माजी आमदार मोहन दादा जोशी, ॲड.रूपाली पाटील यांसह पुणे मेट्रोचे अधिकारी व मंडई मधील व्यापारी, विक्रेते व कांदा बटाटा मार्केट मधील व्यवसायिक उपस्थित होते. (Pune Metro)


News Title | MLA Ravindra Dhangekar | Due to MLA Ravindra Dhangekar, the road problem of the traders in Mandai was resolved

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड | भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला

| कॉंग्रेस नेत्यांचा आरोप

Pune News | निवडणुकीत भाजपाने (BJP) आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा (Old Wada) विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू. परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. भाजपा ने पुणेकरांवर सूड उगवला आहे. असा आरोप कॉंग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar), कॉंग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) आणि संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी केला. (Pune News)

कॉंग्रेस नेत्यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे शहराचा विकास आराखडा (Pune Devlopment Plan) सन 2013-14 मध्ये प्रकाशित झाला. त्या वेळेस शहरातला गावठाण भाग विशेषता पेठामध्ये बांधकामाला 1.5 FSI करण्यात आला होता. या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता व सभागृहात तसेच राज्य सरकारने हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यावेळेस पुण्यातील पेठामध्ये राहणाऱ्या नागरिकांवर अन्यायकारक आहे अशी हरकत व सूचना केली होती. पुण्यातील गावठाणात आलेले जुने वाडे व त्यात राहणारे नागरिक अक्षरश 60 ते70 स्क फूट घरात राहत आहेत, भाडेकरूंना पुनर्वसन करण्यासाठी व वाड्यांच्या विकास करायचा असेल तर 2.50 FSI द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. (Pune Municipal Corporation)

सन 2015 मध्ये भाजप सरकारने मनपा कडून विकास आराखडा स्वतःच्या ताब्यात घेतला व तो प्रकाशित केला. परंतु त्यात सुद्धा पुणेकरांना गावठाण भागात 1.50 FSI. ठेवण्यात आला होता. त्यावर निवडणुकीत भाजपाने आश्वासन दिले होते की जुन्या वाड्याचा विकास करण्यासाठी आम्ही किमान 2 FSI करू.परंतु पुन्हा एकदा सरकारने पेठाया मध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पुण्यातील वाड्यांचा विकास होणे अवघड झाले आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (PMC Pune)

तसेच वाड्याचा व पेठामधील घरांचा विकासाला 1 मीटर साईड मार्जिन सोडावी लागणार असे समान विकास नियमावलीत (U.D.C.P.R) सन 2020 मध्ये नमूद करण्यात आले होते. याबाबत आपण 1 मीटरची अट रद्द करू असे आश्वासन भाजपाच्या नेत्यांनी अनेक वेळा दिली व कसबा पोटनिवडणुकीत सुद्धा दिले होते परंतु साईड मार्जिनची अट सुद्धा तशीच ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जुन्या पुण्याचा विकास ठप्प होणार आहे. पुणेकरांनी भाजपा ला 100 नगरसेवक 4आमदार 1खासदार दिले. त्या बदल्यात  पुणेकरांवर भाजपाने सूड उगवला आहे. असा आरोप या नेत्यांनी केला आहे. (Pune News)


News Title | Pune News | It is difficult to develop palaces in Pune BJP took revenge on the people of Pune| Allegation of Congress leaders

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | मराठा सेवा संघाकडून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन 

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | मराठा सेवा संघाकडून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti |  स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या ३६६ व्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शिवश्री राजेंद्र कुंजीर, आमदार रविंद्र धंगेकर, मराठा महासंघाचे अनिल ताडगे व मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti)

यावेळी बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले,’ छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी घालून दिलेला आदर्श त्यांनी बलिदाना पर्यंत पाळला. तत्कालीन विशिष्ट समाजाने संभाजी महाराजांना छत्रपती होण्यासाठी आडकाठी केली तोच समाज आज बहुजनांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले इच्छित साध्य करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजां प्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज हे युगपुरुष होते त्यांचा आपण आर्दश घेतला पाहिजे. वयाच्या १२ व्या वर्षी संस्कृत मधून बुधभूषण ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक म्हणूनच ओळखले गेले पाहिजेत.

यावेळी आबा जगताप, अनंत घरत , चैतन्य नाणेकर, अन्वर शेख , राकेश भिलारे, पै. गणेश सपकाळ यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

MLA Ravindra Dhangekar | पुणे शहरातील ५०० चौ. फुट पर्यंतच्या सदनिकांना मिळकत करात सूट देण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Ravindra Dhangekar |  पुणे शहरातील ५०० चौ. फुट पर्यंतच्या सदनिकांना मिळकत करात सूट देण्याची मागणी

| आमदार रविंद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी

MLA Ravindra Dhangekar | (Author: Ganesh Mule) : पुणे शहरातील (Pune city) ४६.४५ चौ मीटर (५०० चौ. फुट) पर्यंतच्या अथवा त्या पैकी कमी क्षेत्रफळ असलेल्या सदनिकांना मिळकत करातून सूट (Property Tax Discount) देण्याची मागणी काँग्रेस चे पुण्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Congress MLA Ravindra Dhangekar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. (MLA Ravindra Dhangekar News)
आमदार धंगेकर यांच्या पत्रानुसार मुंबई महानगर पालिकेच्या (BMCC) हद्दीतील निवासी इमारतीमधील ५०० चौ. फुट पर्यंत चटई क्षेत्र असलेल्या सदनिकांना मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी सन २०२१ मध्ये घेतला आहे. पुणे मनपा (PMC pune) ने सदनिका धारकांना देण्यात येणारी मिळकत करातील ४० टक्के सवलत रद्ध केली होती. याचा फटका हजारो पुणेकरांना बसला होता. याबाबत मी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३ मध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून पुणेकरांची व्यथा मांडली होती. (Pmc Pune news)
पुणे शहरात सर्व सामान्य नोकरदार व मध्यमवर्गीय वर्ग ५०० चौ. फुट अथवा त्यापेक्षा कमी जागेत मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांना मालमत्ता कर भरणे अत्यंत जिकरीचे होत आहे.  आपणांस विनंती आहे कि, मुंबईच्या धर्तीवर पुणे महानगर क्षेत्रातील ५०० चौ. फुट किंवा त्यापेक्षा कमी जागेत असलेल्या सदनिकांना मालमत्ता करातून मुक्त करण्यात यावे, व त्या बाबतचा निर्णय तातडीने घ्यावा. असे धंगेकर यांनी म्हटले आहे. (Pmc pune property tax)

Book Distribution | “भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

Categories
Breaking News Education Political social पुणे

“भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त २५ हजार पुस्तके वाटप “

पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार मोहन जोशी व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानोपासक होते “ज्ञान ही शक्ती” आहे. यावर त्यांचा विश्वास होता यासाठी त्यांनी समाजाला शिका व *संघटित व्हा … वाचाल तर वाचाल…असा संदेश दिला. तरी आजची तरुण पिढी ही* *बाबासाहेबांच्या कार्याबद्दल अनभिद्य दिसून येते म्हणून तरुण वर्गाला या थोर समासुधारकांचे समाजासाठी केलेले त्यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते या जयंती निमित्त आज या ठिकाणी 25000 पुस्तकांचा वाटप करीत आहोत “असे उदगार आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले.

 

“भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान देऊन समतेची दिशा दिली. डॉ. बाबासाहब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते नव्हते ते संबंध राष्ट्राचे नेते होते, *ते युगकर्ते होते त्यांनी निर्माण केलेले युग हे सामान्य माणसाला लोकशाहीच्या क्षितिजावर उभे करणारे युग होते. असे प्रतिपादन मोहन जोशी यांनी केले*

यावेळी अनेक थोर समाज सुधारक ज्यांनी महाराष्ट्र राज्याला दिशा देणारे धोरण दिले यांच्या जीवनावरील २५ हजार पुस्तकाचे वाटप आमदार रवींद्र धंगेकर व मोहन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मा. महापौर कमल व्यवहारे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, विशाल धनवडे, लता राजगुरू, मा नगरसेविका सुशिला ताई नेटके, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, बाळासाहेब अमराळे,काँग्रेस ओ.बी.सी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे,स वाल्मिकी जगताप, प्रियांका रणपिसे,चेतन आगरवाल, डॉ अनुपकुमार बेगी, चंद्रकांत चव्हाण, अस्लम बागवान, वाहिद बियाबनी, अविनाश अडसूळ, गेहलोत ताई, गोरख पळसकर, शिवानी माने, नरेश नलवडे , रुपेश पवार , राजेंद्र खेडेकर, किरण जगताप, अमित देवरकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन मा गणेश नवथरे यांनी केले.

MLA Ravindra Dhangekar | आमच्या लढ्याला यश आले | आता ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत द्या | आमदार रविंद्र धंगेकर

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

आमच्या लढ्याला यश आले | आता ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत द्या | आमदार रविंद्र धंगेकर

शहरातील नागरिकांना मिळकतकरातील 40% सवलत कायम राहावी, यासाठी आम्ही सर्वजण लढा देत होतो. त्या लढ्याला यश आले आहे.  काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली. त्यामध्ये शहरातील मिळकतकरात ४० टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असा दावा काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला. तसेच ते म्हणाले कि, पुणे शहरातील ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी. (MLA Ravindra Dhangekar)

आमदार धंगेकर पुढे म्हणाले, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शिंदे आणि फडणवीस यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडले असून आता ते निर्णय घ्यायला लागले आहेत. त्यामुळे मी कसबा मतदार संघातील सर्व नागरिकाचे आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

धंगेकर यांनी सांगितले कि, शहरात जवळपास १० लाख मिळकती आहे. त्या सर्व मिळकतधारकांना दररोज अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून त्यांच्याकडून महापालिका प्रशासन मिळकतकर वसुली करीत होती. त्यामुळे मिळकतकरात सवलत मिळाली पाहिजे अशी मागणी महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून आजवर मांडत आलो आणि आमदार म्हणून विधिमंडळात गेल्यावर तीच मागणी केली होती. त्या मागणीला काही प्रमाणात तरी यश आल्याच म्हणावं लागेल. कारण काल मुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ४० टक्के मिळकतकराची सवलत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारला केवळ नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे घ्यावा लागला असून त्यामुळे मी तमाम कसबा मतदार संघातील नागरिकांचा आभारी आहे.

 आमदार धंगेकर म्हणाले, मुंबई महापालिकेने ज्या प्रकारे ५०० स्क्वेअर फुटाच्या घराना सवलत दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील ५०० फुटाच्या घरांना देखील मुंबई महापालिके प्रमाणे सवलत देण्यात यावी, ही मागणी विधिमंडळात करणार असून आमची मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवणार असल्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

MLA Ravindra Dhangekar | कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी | आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

कसब्यातील 5 प्रभागाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी

| आमदार रविंद्र धंगेकर यांनी कामाला केली सुरुवात

पुणे : नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्या कामाचा श्रीगणेशा केला आहे. कसब्याच्या विकासावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दरम्यान कसबा मतदारसंघाच्या विकासासाठी आगामी बजेट मध्ये 10 कोटींची तरतूद करण्याची मागणी केली आहे. यामध्ये प्रभाग 16,17,18,19 आणि 29 अशा सर्व प्रभागातील विकासकामासाठी प्रत्येकी 2 कोटीची तरतूद करण्याची मागणी आमदार धंगेकर यांनी आयुक्ताकडे केली आहे.

दरम्यान आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेतली. यामध्ये मिळकत कर, सुरळीत पाणीपुरवठा या महत्वाच्या प्रश्नांबाबत पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांची भेट घेऊन आमदारकीच्या कामाचा श्रीगणेशा केला. पुणेकरांच्या मिळकत करात ४० टक्के सूट द्यावी, मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारू नये, पेठांच्या भागांमध्ये समानदाबाने व सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी योग्य नियोजन करावे. अशा विविध मागण्या केल्या.

  त्यांच्यासोबत प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस वीरेंद्र किराड, प्रदेश कॉंग्रेस प्रतिनिधी रमेश अय्यर, कसबा कॉंग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे, प्रदेश युवक कॉंग्रेस सचिव कान्होजी जेधे, आदी उपस्थित होते. या भेटीवेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी रवींद्र धंगेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.

याप्रसंगी रवींद्र धंगेकर म्हणाले की, संपूर्ण देशात पुण्यात मिळकत कर सर्वाधिक असून नागरिकांना मिळकत करात ४० टक्के सवलत देऊन त्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच मुंबई प्रमाणेच पुण्यातही ५०० चौरसफुटांच्या खालील सदनिकांवर मिळकत कर आकारला जाऊ नये. त्यामुळे छोट्या सदनिका धारकांना मोठा दिलासा मिळेल. या संदर्भात विधीमंडळात मी प्रश्न उपस्थित करणार असून राज्यशासनाकडे त्याचा मी पाठपुरावा करेन. असे सांगून ते म्हणाले की, याबरोबरच पेठांच्या भागांमध्ये दाट वस्ती असून तेथे पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून त्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सुरळीत पाणीपुरवठा होण्याकरिता योग्य नियोजन करून आमलात आणावे अशी मागणी त्यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे केली.

या सर्व प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने विचार करेल आणि योग्य तो निर्णय लवकर घेतला जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी दिले.

| गुरुवारी घेणार शपथ

दरम्यान विधिमंडळ सभागृहात विधानसभा सदस्य म्हणून आसनस्थ होण्यासाठी आधी शपथ घेणे आवश्यक असते. त्यानुसार आमदार रविंद्र धंगेकर यांना गुरुवारी शपथ दिली जाणार आहे. विधिमंडळाकडून तसे पत्र त्यांना देण्यात आले आहे.