Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune EV Charging Station | PMC |  पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

| शहरात 83 जागा निश्चित

Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरात 83 ठिकाणी चारचाकी गाड्यांचे चार्जिंग स्टेशन (Four Wheeler Charging Station) उभारण्यात येणार आहेत. हे काम Evigo Charge Pvt. Ltd. या कंपनीला देण्यात आले आहे. 83 स्टेशन पैकी महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य राहणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. तसेच तीनचाकी वाहनांसाठी (Three Wheeler charging Station) देखील स्टेशन उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. (Pune EV Charging Station | PMC)

| बैठकीत हे झाले निर्णय

1. Evigo Charge Pvt. Ltd. यांना निश्चित करून दिलेल्या जागांपैकी ज्याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास अडचणी अथवा जागा बदल करणे आवश्यक असेल अशा जागांबाबत विद्युत विभागाने आवश्यक सर्व्हे करून नवीन जागा उपलब्ध करून द्याव्यात. (PMC Pune)

2. Evigo Charge Pvt. Ltd. यांनी निश्चित जागांवर खोदाई करण्यासाठी परवानगीसाठी मनपाच्या विद्युत खात्याकडे अर्ज करावा व पथ विभागाकडे ठरविण्यात आलेले खोदाई शुल्क संबंधितानी भरावे व पुनर्स्थापित (Reinstate) करावे. (Pune Municipal Corporation News)
3. चार्जिंग स्टेशनकरिता अतिरिक्त विद्युत पुरवठा आवश्यक असल्यास Evigo Charge Pvt. Ltd. यांनी MSEB कडे अर्ज करावे व यासाठी आवश्यक मदत विद्युत विभागाने करावी. (PMC Pune News)
4. निविदा जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे Evigo Charge Pvt.Ltd यांना जाहिरातीचे बोर्ड लावण्याची ठिकाणे, त्याचे आकारमान याबाबत आवश्यक पूर्तता करावी. (PMC Electrical Department)
5. प्रथमतः महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उदा. मनपा मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालय, बालगंधर्व, सावरकर भवन इत्यादी किमान २० ठिकाणी, प्राधान्याने उभारण्यात याव्यात यासाठी विद्युत विभागाने मालमत्ता व मनपाच्या अन्य विभागाशी समन्वयाने जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. पुणेस्टेशन सारख्या वर्दळीच्या ठिकाणी- जास्तीचे चार्जिंग स्टेशन उभारण्याची कार्यवाही करावी. (PMC Pune Marathi News)
6. महापालिकेमार्फत पे ॲण्ड पार्क योजना राबविण्यात आलेल्या ठिकाणच्या निविदाधारकांना, बसविण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी, चार्जिंगसाठी आलेल्या वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहन पार्क न करणेबाबत पत्राद्वारे सूचित करावे.
7. रिक्षा व अन्य तीन चाकी वाहनांच्या चार्जिंग स्टेशनबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी.
—-
News Title | Pune EV Charging Station |  PMC |  Preference to set up charging station on 20 places owned by Pune Municipal Corporation!

CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! | महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

CHS Portal | PMC Health Service | अंशदायी वैद्यकीय योजनेचे संगणकीकरण! |  महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी पोर्टलवर माहिती भरण्याचे आदेश

CHS Portal | PMC Health Service | पुणे महापालिका कर्मचारी (PMC Pune Employees) आणि आजी माजी नगरसेवकांना (Corporators) आरोग्य सुविधा देण्यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) अंशदायी वैद्यकीय सहायता योजना (CHS) चालवली जाते. शहरी गरीब वैद्यकीय योजनेप्रमाणे या योजनेचे संगणकीकरण कधी केले जाणार, अशी देखील मागणी केली जात आहे. त्यानुसार महापालिका आरोग्य विभागाने (PMC Health Department) वाटचाल सुरु केली आहे. या योजनेसाठी महापालिका प्रशासनाकडून एक पोर्टल (CHS Portal) तयार करण्यात आले आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना CHS कार्ड साठी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती ऑनलाईन भरण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत. 26 जून पर्यंत ही माहिती देण्याचे आदेशात म्हटले आहे. (CHS Portal | PMC Health Service)

अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिकेच्या सेवकांसाठी व सेवानिवृत्त सेवकांसाठी आरोग्य कार्यालयामार्फत अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना राबविण्यात येते. या योजनेची ओळखपत्र (CHS कार्ड) सभासदांना देताना सभासदांची माहिती ऑफलाईन (Offline) पद्धतीने रजिस्टर मध्ये नोंदविण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)

या योजनेच्या सभासदांना त्यांचेवर अवलवून असणाऱ्या कुटुंबीयांची माहिती Online पद्धतीने भरण्यासाठी http://chs.punecorporation.org ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामध्ये सभासदांनी त्यांची व त्यांचेवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांची CHS कार्ड वर असणारी माहिती या लिंक वर भरावी. ही माहिती जून पर्यंत http://chs.punecorporation.org या
पोर्टलवर भरावी. असे आदेशात म्हटले आहे. (PMC CHS Portal)
—-
News Title | CHS Portal | PMC Health Service | Computerization of Contributory Medical Scheme! | Mandate to municipal employees to fill information on portal for CHS card

Pune Municipal Corporation | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

 

| मनपा भवनात पुन्हा समूहाने फिरताना दिसताहेत महापालिका कर्मचारी

Pune Municipal Corporation | महापालिकेच्या (PMC Pune) कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी (PMC Pune Employees) हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना तसेचचर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली होती. ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी (PMC Additional Commissioner) गंभीरपणे घेतली होती आणि नियमावली ठरवून दिली होती. तसेच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत महापालिका कर्मचारी पुन्हा समूहाने फिरताना दिसू लागले आहेत. यावर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (Pune Municipal Corporation)

| काय होते अतिरिक्त आयुक्तांचे आदेश?

पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी  आदेशान्वये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यआदेशनुसार कामकाजाची वेळ निश्चित केलेली असून, सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी विहित केलेली कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळणे आवश्यक आहे.  आदेशाप्रमाणे दुपारी ०२.०० ते ०२.३० ही आर्धा तास भोजनाची सुट्टी नेमून दिलेली आहे. पुणे महानगरपालिका सेवा विनियमामधील ‘नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम’ यातील नियम क्र. २८ आणि २९ नुसार प्रत्येक महानगरपालिका कर्मचाऱ्याने कार्यालयात वक्तशीरपणे हजर राहाणे, नेमून दिलेले काम कार्यालयीन वेळेमध्ये इमानाने व प्रामाणिकपणे करणे, सहकाऱ्यांबरोबर अनावश्यक बडबड न करणे, गटागटाने चर्चा न करणे असे वर्तन सर्व कर्मचाऱ्यांकडून होणे अभिप्रेत व आवश्यक आहे. (PMC Pune Circular) 
कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत.  कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना / चर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तणूक ही प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. याबाबत कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता. मात्र हा आदेश डावलत कर्मचारी मनमानी करताना दिसून येत आहेत. 2:30 वाजून गेले तरी कर्मचारी भवनात समूहाने फिरताना दिसत आहेत. काही कर्मचारी नियमाचे पालन करतात तर काही मात्र हरताळ फासताना दिसून येतात. यामुळे आता प्रशासन अशा लोकांवर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Pune News)
——-
News Title | Pune Municipal Corporation |  Pune Municipal employees protested the order of Additional Commissioner |  Municipal employees are again seen moving in groups in the municipal building

Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलवर पडून! | अतिरिक्त आयुक्तांनी ठेवले आहे सकारात्मक निवेदन

Categories
Breaking News PMC पुणे

कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलवर पडून!

| अतिरिक्त आयुक्तांनी ठेवले आहे सकारात्मक निवेदन

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सातव्या वेतन आयोगानुसार (7th pay commission) वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर (PMC Additional Commissioner) मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार (Econimic Burden) येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून (IT Dept) ही माहिती सादर करण्यात आली आहे. यावर अतिरिक्त आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचे निवेदन मंजुरी साठी महपालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्यासमोर ठेवले आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून हा प्रस्ताव आयुक्तांच्याच टेबलवर पडून आहे. आधीच खूप प्रलंबित राहिलेला हा प्रस्ताव लवकर मान्य केला जाणार का, असा सवाल कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. (Pune Municipal Corporation)

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (Time Bound Promotion, PMC Pune)
मात्र महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. अतिरिक्त आयुक्तांनी सूचना केली होती कि यामुळे महापालिकेवर आर्थिक भार येणार आहे का? याची शहनिशा करावी. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने म्हटले होते कि यासाठी नवीन आर्थिक तरतूद करण्याची आवश्यकता नाही. वेतनासाठी असणाऱ्या तरतुदीतून हे वाढीव वेतन दिले जाईल. मात्र अतिरिक्त आयुक्तांना हा खुलासा मान्य नव्हता. त्यामुळे लेखा विभागाकडून आर्थिक भाराची माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र वित्त व लेखा विभागाने हा विषय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडे पाठवला होता. त्या विभागाकडे बरेच दिवस हा विषय तसाच पडून होता.  माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने या बाबतची माहिती सादर केली आहे. (7th pay commission)
माहिती आल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने पुन्हा याबाबतचा अंतिम प्रस्ताव तयार करत तो अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवला. अतिरिक्त आयुक्तांनी याबाबत सकारात्मक निवेदन तयार करून ते मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठवले आहे. आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर लगेच सर्कुलर काढले जाणार आहे व  कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून हा प्रस्ताव आयुक्तांच्याच टेबलवर पडून आहे. अजून किती दिवस हा विषय प्रलंबित ठेवणार, असा प्रश्न कर्मचारी विचारात आहेत. (PMC Pune)

Holidays in New Year | PMC Pune | आगामी वर्षासाठी (2023) महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

Categories
Breaking News PMC पुणे

आगामी वर्षासाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

| एकूण २३ सुट्ट्या

पुणे | आगामी वर्ष म्हणजेच २०२३ साल (New year 2023) काही दिवसावर येऊन ठेपले आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune municipal corporation) दर वर्षी सुट्ट्या (holiday) जाहीर करण्यात येतात. त्यानुसार महापालिका कमर्चारी आणि अधिकाऱ्यासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण २३ सुट्ट्या असणार आहेत. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. (PMC Pune)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) कार्यालयाकडून या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध उत्सव, सण (festival) यासाठी सुट्ट्या देण्यात येत असतात. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी असे सगळे सणवार धरून वर्षभरात एकूण २३ सुट्ट्या महापालिका कर्मचार्यांना मिळतील. तर ५ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. यामध्ये महाशिवरात्री -शनिवार, छत्रपती शिवाजी महाराज जयंती रविवार, रमझान ईद शनिवार, मोहरम शनिवार, आणि दिवाळी (लक्ष्मिपुजन) रविवार यांचा समावेश आहे. तर १२ जून या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. त्यादिवशी अर्धा दिवस सुट्टी राहिल. (Pune Municipal Corporation)

Additional Commissioner Vikas Dhakne | विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार | १४ खात्यांचे कामकाज सोपवले

Categories
Breaking News PMC पुणे

विकास ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार

| १४ खात्यांचे कामकाज सोपवले

पुणे | महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) पदी राज्य सरकारने नुकतीच विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची नियुक्ती केली आहे. मात्र अजूनही त्यांच्याकडे कुठलाही पदभार देण्यात आला नव्हता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar)  यांनी  ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार सोपवला आहे. तसेच त्यांच्याकडे विविध १४ खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. दरम्यान अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) हे पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. सरकारने तसा अध्यादेश देखील जारी केला होता. मात्र हे पद मनपा अधिकाऱ्यांना न देता सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे.(Pune Municipal corporation)

| महापालिका अधिकाऱ्यांसाठी पद निर्माण केले होते

   महापालिका सेवा नियमावली नुसार महापालिकेत तीन अतिरिक्त आयुक्तांची पदे निर्माण करण्यात आली होती. त्यातील एक पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) हे पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आले होते. तसा अध्यादेश देखील राज्य सरकार कडून जारी करण्यात आला होता. पदोन्नतीने या पदावर महापालिका अधिकाऱ्याला जाता येईल. त्यानुसार सुरेश जगताप हे पहिले महापालिका अधिकारी होते जे अतिरिक्त आयुक्त बनले होते. जगताप सेवानिवृत्त झाल्यानंतर ही संधी ज्ञानेश्वर मोळक यांना मिळाली. मोळक देखील  सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ही संधी विलास कानडे यांना मिळाली मिळाली होती.  कानडे काही दिवसापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे या पदावर महापालिकेचा अधिकारी येणे अपेक्षित होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने या पदासाठी ७ मनपा अधिकाऱ्यांची यादी आयुक्ताकडे पाठवली होती. यातील बरेच अधिकारी प्रयत्न देखील करत होते. मात्र यातील कुठल्याही अधिकाऱ्याला हे पद न देता सरकारी अधिकाऱ्याला हे पद देण्यात आले आहे.  यामुळे सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. (PMC Additional Commissioner)
दरम्यान ढाकणे यांच्याकडे कुठलाही पदभार देण्यात आला नव्हता. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी  ढाकणे यांच्याकडे अतिरिक्त मनपा आयुक्त (विशेष) पदाचा पदभार सोपवला आहे. तसेच त्यांच्याकडे विविध १४ खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. नुकतेच याबाबतचे आदेश आयुक्तांनी जारी केले आहेत. (PMC Pune)
| ही आहेत खाती
विधी विभाग
मालमत्ता व व्यवस्थापन विभाग
भवन रचना विभाग
भूसंपादन व व्यवस्थापन विभाग
कामगार कल्याण विभाग
बीएसयूपी सेल
बीओटी सेल विभाग
पथ विभाग
ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभाग
उद्यान विभाग
स्थानिक संस्था कर विभाग
मध्यवर्ती भांडार विभाग
जिल्हा नियोजन व विकास समिती विभाग
क्रीडा व सांस्कृतिक विभाग

Water issue of Warje area | वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक   | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

Categories
Breaking News PMC social पुणे

वारजे परिसरातील नागरिकांच्या पाणी प्रश्नाबाबत सकारात्मक बैठक

 | क्लोजर कमी करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आश्वासन

पुणे | वारजे परिसरात (Warje Aea) मागील आठवड्यात नागरिकांना पाणी प्रश्नाचा (water problem) चांगलाच सामना करावा लागला. वारंवार घेतल्या जाणाऱ्या क्लोजर मुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागला. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांनी पुढाकार घेत आणि प्रशासनाला धारेवर धरत प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त (PMC additional commissioner) यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. यामध्ये क्लोजर (water closure) कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले. शिवाय ज्यावेळी क्लोजर असेल त्याच्या आधीच नागरिकांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल, असे ही आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. (Pune Municipal corporation)
मागील काही दिवसापासून वारजे परिसरातील नागरिक पाण्याचा समस्येबाबत त्रस्त आहेत. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसात दोन गुरुवारी पाणी बंद (closure) ठेवले होते. महापालिकेची system अशी आहे कि संबंधित परिसरात एकदा पाणी बंद ठेवल्यानंतर पुढील तीन दिवस पाणी पुरवठा विस्कळीत होतो. असे असतानाही इथेच वारंवार closure घेतले जाते. त्यामुळे पाण्याच्या टाक्या बंद राहतात. त्यामुळे पाणी येत नाही. जिथे पाणी येते, तिथे खूप कमी दाबाने पाणी येते. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांच्या तक्रारी देखील ऐकून घेतल्या जात नव्हत्या. याबाबत माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ चांगल्याच आक्रमक दिसून आल्या. याची दखल महापालिका प्रशासनाला घ्यावी लागली. (warje water problem)
वारजेच्या पाणी प्रश्नाबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि परिसरातील नागरिक यांच्यासोबत बैठक झाली. याबाबत माहिती देताना धुमाळ यांनी सांगितले कि, वारजे परिसरात क्लोजर कमी करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी दिले. तसेच क्लोजर ची सूचना लवकरच देण्याबाबत सूचना करण्यात आली. क्लोजर च्या आधीच काही दिवस टँकरने पाणी पुरवठा करण्याची खात्री देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिली. परिसरातील नागरिकांना पाणी बिलाबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. याबाबत देखील अतिरिक्त आयुक्तांनी आश्वस्त केले कि नागरिकांना नाहक त्रास दिला जाणार नाही. तसेच समान पाणी पुरवठा अंतर्गत जे काम केले जात आहे, ते आगामी 15 दिवसात पूर्ण करून तिथून पाण्याच्या लाईन घेतल्या जातील. जेणेकरून पाणी समस्या कमी होईल. एकूणच बैठक सकारात्मक झाल्याचे धुमाळ यांनी सांगितले. (PMC Pune)

Health Minister Dr Tanaji Sawant | पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता | शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे महाराष्ट्र

पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

|शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. तानाजी सावंत,  (Health Minister Dr Tanaji Sawant) यांनी रविवारी पुणे महानगरपालिका (PMC Pune) येथे भेट दिली. यावेळी त्यांनी शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा आढावा (Review of health system) घेतला. यात प्रामुख्याने सद्यस्थितीत नव्याने उद्भवलेल्या साथी बाबत सखोल आढावा घेण्यात आला. त्यांनी पुणे शहरामध्ये वाढत असलेल्या गोवर रुग्णांबद्दल (Measles patients)  चिंता व्यक्त केली व गोवर आजारावर त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी च्या उपाय योजना सुचविल्या. (Pune Municipal corporation)

मंत्र्यांनी शहरातील दाट वस्ती मध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून गोवर संशयित रुग्ण शोधून त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणे, विशेष करून खाजगी रुग्णालयांना जास्तीत जास्त भेटी देवून रुग्ण शोध मोहीम तीव्र करणे, नवीन समावेश झालेल्या गावांमध्ये विशेष लक्ष देणे, इत्यादी मा. डॉ. तानाजी सावंत यांनी गोवर सोबतच इतर आजार उदा. जापानी मेंदू ज्वर, झीका विषाणू (Zika virus) इत्यादीचा देखील सखोल आढावा घेतला. या सोबतच संपूर्ण आरोग्य विभागाला तत्परतेने कामे करण्याच्या सूचना दिल्या.  तसेच राज्य शासना कडून संपूर्ण तांत्रिक मदतीची ग्वाही दिली.

डॉ. सावंत यांनी यावेळी संपूर्ण जनतेला ताप व पुरळ असलेल्या प्रत्येक रुग्णाने शासकीय दवाखान्यामध्ये येवून उपचार घेण्याबाबत आव्हान केले. या भेटीच्या वेळी आमदार  भीमराव आण्णा तापकीर, विक्रम कुमार, महापालिका आयुक्त पुणे, रविंद्र बिनवडे, अति. महापलिका आयुक्त पुणे,  वृषालीताई चौधरी व आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (PMC commissioner Vikram Kumar)

Additional Commissioner | PMC Pune | महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातून अतिरिक्त आयुक्त पद निसटले! | भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिका अधिकाऱ्यांच्या हातातून अतिरिक्त आयुक्त पद निसटले!

| भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदी नियुक्ती

पुणे | महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner ) विलास कानडे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या पदावर महापालिकेचा अधिकारी पदोन्नतीच्या माध्यमातून येणार असे बोलले जात होते.  यासाठी 5 ते 6 नावे चर्चेत होती. त्यासाठी चांगलीच रस्सीखेच सुरु होती. मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या (PMC Officers) हातातून हे पद निसटले आहे. कारण राज्य सरकारने या पदावर भारतीय रेल्वे सेवेतील (IRPFS) विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांची या पदावर प्रतिनियुक्ती ने नियुक्ती केली आहे. यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षेवर पाणी फेरले आहे. (Pune municipal corporation Additional commissioner)
राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्त पद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. कानडे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानुसार महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे पद नियुक्त केले जाणार होते. यासाठी बरेच जण पात्र ठरत आहेत. त्यानुसार राज्य सरकारला महापालिकेकडून 5 ते ६ लोकांच्या नावांची यादी पाठवायची होती. सामान्य प्रशासन विभागाकडून हा प्रस्ताव आयुक्ताकडे पाठवला होता. मात्र आयुक्त कार्यालयातून हा प्रस्ताव राज्य सरकार पर्यंत पोचला नव्हता.
सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीनुसार यामध्ये नगर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला, पीएमआरडीए कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर तसेच विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदूल यांची नावे अंतिम केली होती. यावर महापालिका आयुक्तच निर्णय घेणार होते.
नगर अभियंता या पदासाठी पहिल्यापासूनच इच्छुक नाहीत. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार उल्का कळसकर पात्र होत होत्या. एक महिला अधिकारी अतिरिक्त आयुक्त झाली तर पुण्यासाठी ते महत्वाचे मानले जाणार आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. त्याखालोखाल दौंडकर, बोनाला आणि खरवडकर यांची नावे येतात. त्यामुळे कळसकर या पदासाठी जोरदार प्रयत्न करत होत्या. मात्र दुसरीकडे महापालिका अधिनियम कलम 45 मधील तरतुदीनुसार काही नावे यातून अपात्र होऊ शकतात. त्यामुळे इथे  तांत्रिक विभागाकडून विद्युत विभागाचे श्रीनिवास कंदूल देखील जोरदार फिल्डिंग लावून होते.
तर इकडे महापालिका आयुक्तांच्या मनात दुसरेच काहीतरी घोळते होते. महापालिका आयुक्तांना असे वाटत होते कि काही काळासाठी या पदावर महापालिकेचा अधिकारी देण्यापेक्षा सरकारचाच अधिकारी द्यावा. मात्र नियमानुसार तसे करता येत नव्हते. तरीही आयुक्तांची ही मनीषा कशी फलद्रुप होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार आता भारतीय रेल्वे सेवेतील विकास ढाकणे यांची अतिरिक्त आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.