Manipur Violence | NCP Pune | मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

Manipur Violence | NCP Pune | मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध आंदोलन

Manipur Violence | NCP Pune |  मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निषेध आंदोलन करण्यात आले. (Manipur Violence | NCP Pune)
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, स्त्रीला “देवी “म्हणून पुजा करणाऱ्या आपल्या भारत देशात सुमारे ७० दिवसांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. देशाची राजसत्ता उपभोगत जगभर डंका पिटनारे मोदी सरकार मात्र हातावर हात ठेऊन बसले आहे. (Manipur News)
जगताप पुढे म्हणाले, भारतात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्यावर सतत अत्याचार व जीवघेणे हल्ले होत आहेत. ज्या लोकांचा मतांवर आपण सत्ता उपभोगत आहात, ज्यांच्या टॅक्सच्या पैश्यावर हा देश चालतो, त्या लोकांची जर आपण रक्षा करू शकलो नाही, तर हे आपण चालवत असलेल्या शासनाचे अपयश आहे, अशा प्रकारे शासन करणाऱ्या चालविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. (Manipur Violence News)
या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काकासाहेब चव्हाण, डॉ.सुनील जगताप, मृणालिनीताई वाणी,सुषमा सातपुते,शिल्पाताई भोसले, किशोर कांबळे,विक्रम जाधव,उदयजी महाले, आप्पासाहेब जाधव,गणेश नलावडे,अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,फहीम शेख,मंगेश मोरे,हेमंत बधे,सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-
News Title | Manipur Violence | NCP Pune | Protest movement by Pune Nationalist Congress to protest the ongoing oppression of women in Manipur

NCP Against Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Against Sadabhau Khot | सदाभाऊ खोत यांच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे “जोडे मारो” आंदोलन

 

NCP Against Sadabhau Khot | विधानपरिषदेचे माजी आमदार सदाभाऊ खोत (Former MLA Sadabhau Khot) खा. शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट असून आज पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांनी सदा खोत यांच्या फोटोला चप्पल व जोडे मारत आंदोलन (Agitation) केले. यावेळी “सदा खोत मुर्दाबाद” , “अगोदर बिल द्या…मग ज्ञान पाजळा”, “खोताच्या बैलाला घो”, अशा प्रकारच्या घोषणा देत बालगंधर्व रंग मंदिराचा परिसर दणाणून सोडला. (NCP Against Sadabhau Khot)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) म्हणाले की,”शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेटलमेंट करत आमदारकी मिळविणाऱ्या सदा खोत नावाच्या आमदाराने आदरणीय पवारसाहेबांवर अतिशय घाणेरड्या भाषेत टीका केली आहे. टाकलेला तुकडा संपत आला की पुन्हा तुकडा मिळावा यासाठी गेटकडे पाहून रखवालदारीचा आव आणणाऱ्या या प्रवृत्ती केवळ आमदारकीची टर्म संपत आल्याने अशी विधाने करत आहेत. (NCP Pune Sharad Pawar Camp)

“आज सदा खोत यांच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत केले असलो, तरी भविष्यात जर अशा प्रकारची टीका टीपणी पुन्हा सदा खोत यांनी केली तर आम्ही त्यांच्या चेहऱ्याला काळेफासत त्यांच्या कृत्यांचा निषेध करू”, असा इशारा देखील प्रशांत जगताप यांनी दिला. (NCP Pune News)

आंदोलन प्रसंगी ज्येष्ठ नेते अंकुशअण्णा काकडे, प्रकाशआप्पा म्हस्के, काकासाहेब चव्हाण, उदय महाले, आप्पासाहेब जाधव, मृणालिनीताई वाणी, स्वातीताई पोकळे, प्रभावतीताई भुमकर, नितीनजी कदम, सुषमा सातपुते, किशोर कांबळे, रोहन पायगुडे, दीपक कामठे, आनंदजी सावणे,राजू साने,युसुफ शेख,मनोज पाचपुते ,अनिताताई पवार,तन्वीर शेख, विविध सेलचे अध्यक्ष,कार्याध्यक्ष,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


News Title | NCP Against Sadabhau Khot | Pune Nationalist Congress Party’s “Jode Maro” movement against Sadabhau Khot

 

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी | पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस! 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Deepak Mankar | Ajit Pawar | अजित पवारांनी दीपक मानकर यांच्याकडे दिली पुण्याची जबाबदारी

| पक्ष बांधणीवर जोर देण्याचा मानकरांचा मानस!

Deepak Mankar | Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (NCP Ajit Pawar Camp) गटाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर (City President Deepak Mankar)!यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील  तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी तसे पत्र मानकर यांना दिले आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दीपक मानकर यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. दीपक मानकर यांनी सांगितले कि या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. तसेच शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. (Deepak Mankar | Ajit Pawar)

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांनी पुण्याची जबाबदारी माजी उपमहापौर दीपक मानकर (Former Deputy Mayor of PMC Deepak Mankar) यांच्याकडे दिली आहे. शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे अजित पवारांच्या जवळचे मानले जायचे. असे असले तरी जगताप हे शरद पवार यांना समर्थन देत आहेत. तर दीपक मानकर हे अजित पवार यांच्या गटासोबत गेले आहेत. (NCP Crisis)

अजित पवार यांनी 40 आमदारांच्या सह्यांचे पत्र निवडणूक आयोगाकडे दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे. तसेच बहुमताने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून नेमल्याचेही त्या पत्रात म्हटले आहे. त्यानंतर अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटाकडून नवीन नेमणुका करण्याचे काम जोरदार सुरु आहे. (NCP Pune Ajit Pawar Camp)

त्यात पुण्यात मानकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेशी (thekarbhari.com) बोलताना नवनियुक्त शहर अध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले कि, या माध्यमातून पक्ष बांधणीवर जोर दिला जाणार आहे. शहरातील प्रश्नाकडे बारकाईने लक्ष दिले जाईल. खासकरून नागरी सुविधा युवा वर्गाच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली जाणार आहे. तळागाळापर्यंत जाऊन शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार काम सुरु केले जाणार आहे. लवकरच शहराची कार्यकारिणी देखील तयार केली जाईल. अजित पवार हे 8 जुलै ला पुण्यात येणार आहेत. यावेळी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

—-

News Title | Deepak Mankar Ajit Pawar Ajit Pawar gave the responsibility of Pune to Deepak Mankar Mankar intends to emphasize party building!

NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune | Sharad Pawar | पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या सोबत | कार्यकारिणी बैठकीत केला ठराव

NCP Pune | Sharad Pawar | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP Pune) २३ वी मासिक कार्यकारणी बैठक आज नेहरू आर्ट गॅलरी, घोले रोड शिवाजीनगर पुणे येथे संपन्न झाली. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. (NCP Pune | Sharad Pawar)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांनी सांगितले कि,  या बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ३ महत्वपूर्ण ठराव संमत केले. यात प्रामुख्याने  खासदार शरद पवार हेच पक्षाचे नेतृत्व असल्याचा ठराव पुणे शहर कार्यकारिणीने एकमताने संमत केला. तसेच उद्या होणाऱ्या कार्यकारणीच्या बैठकीसाठी हजारोंच्या संख्येने पदाधिकारी पुणे शहरातून मुंबई येथे जाणार आहेत. प्रदेश कार्यकारणीने पाठवलेल्या आराखड्यानुसार लाखोंच्या संख्येने प्रतिज्ञापत्र पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्यालयाला पाठवणार आहे. (NCP Pune News)


या या बैठकी प्रसंगी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”देशाचे लोकनेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आजवर महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व औद्योगिक या सर्व क्षेत्रांमध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपले भरीव योगदान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष आणि या पक्षाचे आम्ही सर्व सामान्य कार्यकर्ते  पवार साहेबांच्या छत्रछायेखाली कायम सामाजिक प्रश्नांसाठी लढत आलो आहोत. आज काही मत-भिन्नता असल्याने पक्षातील काही सन्माननीय सदस्यांनी वेगळी वाट निवडली असली तरी ८३ वर्षाच्या या योध्याला सोडून कुठलाही दुसरा विचार करणे आम्हाला शक्य नाही. कालांतराने पक्षातील हे समज-गैरसमज दूर होतील. परंतु आज मात्र आम्ही सर्व  पवार साहेबांच्या सोबत आहोत आणि कायम स्वरूपी राहणार आहोत. (Sharad Pawar News)

राज्यातील शिंदे -फडणवीस सरकार राज्यातील प्रश्न सोडवण्यास पूर्णपणे अपयशी ठरले आहे. राज्यातील शेतकरी, नोकरदार, अल्पभूधारक, अल्प उत्पन्न गटातील नागरिक व सर्वसामान्य जनता अनेक अडचणींना सामोरे जात असताना विरोधीपक्ष म्हणून सर्वसामान्य नागरिकांची बाजू मांडण्याची काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करत आहे.राज्यातील जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विविध आंदोलने करून सातत्याने आवाज उठवत आहे व या पुढेही उठवत राहील. असेही जगताप यावेळी म्हणाले.

या बैठकीला खासदार वंदनाताई चव्हाण,ज्येष्ठ नेते माजी आमदार  जगन्नाथ बापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, कमल ढोले पाटील, अंकुशआण्णा काकडे, माजी महापौर .शांतीलाल सुरतवाला, प्रकाशआप्पा म्हस्के, भगवानराव साळुंखे, रवींद्रआण्णा माळवदकर, माजी उपमहापौर निलेश मगर, निलेश निकम, दिपालीताई धुमाळ, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.सुनील जगताप, मा.नगरसेवक सतीश म्हस्के,काकासाहेब चव्हाण,प्रदीप गायकवाड,बाळासाहेब धनकवडे,श्रीकांत पाटील, वनराज आंदेकर,संतोष फरांदे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे,युवती अध्यक्ष सुषमा सातपुते,महिला अध्यक्षा मृणालिनीताई वाणी , मा.जि.सदस्य सौ.अनिताताई इंगळे, यांच्यासह सर्व सेलचे शहराध्यक्ष , कार्याध्यक्ष व कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune News)


News Title | NCP Pune | Sharad Pawar Pune Nationalist Congress with Sharad Pawar Resolution passed in executive meeting

Traitor Day | Pune News | पुण्यात राष्ट्रवादी कडून ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन | गद्दार दिवस देखील साजरा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Traitor Day | Pune News | पुण्यात राष्ट्रवादी कडून ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन

| गद्दार दिवस देखील साजरा

Traitor Day | Pune News | ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांना सोबत घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (Nationalist congress party) राज्यभरात गद्दार दिवस (Traitor Day) म्हणून साजरा केला जात आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap) यांच्या नेतृत्त्वाखाली यानिमित्ताने गद्दार दिवस (Traitor Day) साजरा करत ’50 खोके एकदम ओके’ आंदोलन (50 Khoke ekdam ok Agitation) करण्यात आले. ५0 खोके माजलेत बोके, चले जाव चले जाव गद्दार गुवाहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त खोके खाऊन गद्दार मस्त अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. (Traitor Day | Pune News)

“देशातील जनतेने आज पर्यंतच्या ७५ वर्षाच्या काळात अनेक राजकीय घडामोडी पाहिल्या आहेत.पण एक वर्षापूर्वी ठाकरे गटातून एकनाथ शिंदे  यांनी ५० आमदारसह बाहेर पडत बंड पुकारले. त्यानंतर सूरत,गुवाहाटी आणि गोवामार्गे पुन्हा महाराष्ट्रामध्ये येत भाजपसोबत नव्याने सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होता आले आहे.हे बंड देशातील जनता कधीच विसरू शकणार नसून या बंडखोर आमदारांना ५० खोके दिल्याची चर्चा आहे. त्या घटनेचा आणि कृतीचा आम्ही अनोख्या प्रकारे निषेध नोंदवित आहे. तो म्हणजे गद्दार दिवस साजरा करित आहोत ” असं राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी सांगितले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे गटातील खासदार,आमदारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रियाही यावेळी जगताप यांनी दिली. (NCP pune)

—-

News Title | Traitor Day |  Pune News |  ’50 boxes are ok’ movement by NCP in Pune |  Traitor’s Day is also celebrated

NCP Pune Agitation | दिल्लीत क्रिडापटुंना पोलिसांकडून केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

NCP Pune Agitation | दिल्लीत क्रिडापटुंना पोलिसांकडून केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादीचे आंदोलन

NCP Pune Agitation | दिल्लीत नविन संसद भवनाचे (New parliament) उद्घाटन होत असताना केंद्र सरकारच्या पोलीसांकडून आंतरराष्ट्रीय क्रिडापटुंना (Wrestler Agitation) झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP Pune Agitation) वतीने गोपाळ कृष्ण गोखले चौक येथे आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनात “नरेंद्र मोदी राजीनामा द्या”,”अमित शहा राजीनामा द्या”,”ब्रुजभूषणसिंग यांना अटक झालीच पाहिजे ” खिलाडीयों के सन्मान मे राष्ट्रवादी मैदान मे या घोषणांनी परिसर दनानुन सोडला. (NCP Pune Agitation)

एकीकडे संसद भवनाचे लोकार्पण होत असताना दिल्लीमध्ये लोकशाहीची हत्या चालू होती व ते काल संपूर्ण देश पाहत होता. वर्षानुवर्षे कष्ट करून स्वतःचे नव्हे तर देशाचे स्वप्न पूर्ण करण्यात आयुष्य पणाला लावून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचाविणाऱ्या खेळाडूंचे आंदोलन चिरडून टाकण्यात आले.साक्षी मलिक, विनेश फोगाट यांसह अनेक क्रिडापटूंना पोलिसांकडून धक्काबुक्की व मारहाण करत त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Pune news)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President prashant Jagtap) म्हणाले की, “आंदोलन करत असलेल्या महिला खेळाडू या कुठल्याही सोयीसुविधांसाठी आंदोलन करत नाहीत तर त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार व लैंगिक शोषणासारख्या गंभीर आरोपात आरोपी असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांना अटक होत नाही, या कारणासाठी हे आंदोलन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना अक्षरशः फरफटत नेऊन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सुरू आहे.खेळाडूंना प्रशासनाकडून अशी वागणूक भेटत असेल तर यासारखे दुर्दैव कोणतेच नाही.आज एकीकडे लोकशाहीचा जयजयकार चालू असताना दुसरीकडे त्याच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना पायदळी तुडवत असतानाचे दृष्य या संपूर्ण देशांने पाहिले आहे.मग देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने चालू आहे हा यक्ष प्रश्न उभा राहत आहे. देशातील खेळाडूंचा अपमान हा देशाला लाभलेल्या जाज्वल्य क्रीडा परंपरेचा अपमान आहे. देशातील खेळाडूंना जर अशी वागणूक मिळणार असेल तर ही गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापि सहन करणार नाही, या खेळाडूंना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्यात यावे”. (NCP Pune)

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, ,रविंन्द्र माळवदकर , प्रमित गोरे , रूपेश संत , अंजली लोटके ,आलिम शेख रूपाली बिबवे, अजय पवार , पायल चव्हाण, भक्ती कुंभार , ऋशिकेश कडू , गजानन लोंढे यांसह अनेक कुस्तीपटु व खेळाडू देखील उपस्थित होते.


News Title | NCP Pune Agitation | Protest by Pune NCP to protest against beating of sportspersons by police in Delhi

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा? 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Lok Sabha By-election | पुणे लोकसभा पोटनिवडणूक | आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता तरीही अजित पवारांना का हवीय पुण्याची जागा?

Pune Lok Sabha By-election | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातील (Pune Lok Sabha  constituency) राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) ताकदीचा हवाला देत दावा केला आहे कि पुणे लोकसभेची जागा आम्ही लढवणार.  पुण्याची लोकसभेची जागा परंपरेनुसार काँग्रेसनेच (INC)  लढवली आहे. त्यामुळे अजित पवारांचे हे वक्तव्य राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) साथीदाराला फारसे पटण्याची शक्यता नाही. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता मानली जात आहे. (Pune Lok Sabha By-election)
 पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार  गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीने यावर दावा केला आहे. याआधी देखील पुणे राष्ट्रवादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP pune City President Prashant Jagtap) यांनी पुण्याच्या जागेवर दावा केला होता.   महाविकास आघाडीत  – राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (UBT) हे पक्ष आहेत.  काँग्रेस परंपरेने पुणे लोकसभेची जागा लढवत आहे आणि पवारांच्या विधानामुळे युतीमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. (Pune Lok Sabha bypoll)
अजित पवार म्हणाले कि, “माझे मत आहे की, निवडणुका जाहीर झाल्या की ज्या पक्षाची मतदारसंघात ताकद जास्त असेल त्याला तिकीट मिळाले पाहिजे.  आता कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे हे कसे ठरवायचे?  तुम्ही महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुकांमधील निवडणूक निकाल पहा आणि विश्लेषण केल्यास पक्षांची तुलनात्मक ताकद दिसून येईल.  पुणे लोकसभा मतदारसंघात आमचे अनेक आमदार आहेत आणि रवींद्र धंगेकर यांना तुम्ही खाजगीत विचाराल तर ते सांगतील की कसबा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने त्यांना खूप मदत केली,” (Pune Lok Sabha by-election)
 पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) मागील निवडणुकीत भाजपनंतर राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता, तर काँग्रेसची फारशी कामगिरी झाली नाही.  पुणे शहरातून काँग्रेसकडे फक्त एकच आमदार आहे, तर राष्ट्रवादीने मागील निवडणुकीत दोन विधानसभा जागा जिंकल्या होत्या.
 पवार म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीला कमी अवधी असल्याने पोटनिवडणूक होऊ शकत नाही, असे आयोगाने यापूर्वी सांगितले होते, परंतु अलीकडच्या घडामोडींमुळे त्यांचे मत बदलले आहे.  “माझ्या मते सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष उरले आहे, त्यामुळे पुणे लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार नाही.  पण आता मला अंतर्गत वर्तुळातून असे कळले आहे की निवडणुका जाहीर होण्याची तयारी सुरू आहे,” (NCP Leader Ajit Pawar)
 पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक मानकरही नशीब आजमावण्यास इच्छुक आहेत.  दुसरीकडे काँग्रेसने ही जागा लढवावी, असा आग्रह धरला आहे.  या जागेसाठी काँग्रेस नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) , मोहन जोशी (Mohan Joshi) आणि रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) हे मोजकेच दावेदार आहेत.
 “निवडणुकीबाबत कोणताही निर्णय उच्च पातळीवर घेतला जातो.  आम्ही राज्यातील नेत्यांना आधीच कळवले आहे की काँग्रेस पुणे लोकसभेची जागा लढवणार आहे. कारण पुणे जिल्ह्यातील उर्वरित लोकसभेच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे,” असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले. (Ajit Pawar)
 पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच जाहीर होऊ शकते, या संकेतावर जिल्हा निवडणूक कार्यालयाने नुकतेच मॉक पोलिंग केले.  पुणे महानगरपालिकेने निवडणूक ड्युटीवर असलेल्या 120 नागरी अधिकार्‍यांना देखील मॉक पोलमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते.  गैरहजर असलेल्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असाही इशारा महापालिकेने दिला होता. (Pune Lok Sabha bypoll mock polling)
 बापट यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपायला एक वर्ष बाकी असताना या वर्षी २९ मार्च रोजी निधन झाले.  काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव करून मे 2019 मध्ये ते लोकसभेवर निवडून आले होते.  कायद्यानुसार लोकसभेची जागा सहा महिन्यांपेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही. (MP Girish Bapat)
 संभाव्य पुणे लोकसभा पोटनिवडणुकीची बरीच उत्सुकता आहे. कारण सार्वत्रिक निवडणुकांना फक्त एक वर्ष बाकी आहे आणि पोटनिवडणुकीचा निकाल 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कल निश्चित करेल.  नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या धंगेकरांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपचे हेमंत रासने  यांचा पराभव केला होता.  भाजपने मागील सहा निवडणुकांमध्ये जागा जिंकून पुण्याच्या राजकारणावर आपली पकड सिद्ध करण्यासाठी पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती.  भाजपच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पोटनिवडणूक झाली होती. (Pune Lok Sabha constituency)
—-
News Title | Pune Lok Sabha By-election | Pune Lok Sabha By-Election | Why does Ajit Pawar want the seat of Pune despite the possibility of failure in the alliance?

NCP Pune Agitation | Jayant Patil | जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीकडून निदर्शने 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Agitation | Jayant Patil | जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे राष्ट्रवादीकडून निदर्शने

| ईडी म्हणजे भाजपची घरगडी – शहराध्यक्ष प्रशांत जगताप

NCP Pune Agitation | Jayant Patil | केंद्र सरकारच्या यंत्रणांचा (Central government Agencies) वापर करून सूडबुद्धीने विरोधकांवर कारवाई करण्याचे सत्र सध्या देशभरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील  (NCP State President Jayant Patil) यांना समन्स जारी केल्यानंतर आज स्वतः जयंत पाटील  ईडीच्या कार्यालयात(ED Office) गेले आहेत. यावेळी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या समर्थनार्थ पुणे शहरातील (NCP Pune) समस्त पदाधिकाऱ्यांनी बालगंधर्व रंगमंदिर चौकात निदर्शने केली व स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी इडी सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा निषेध केला. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Pune city president Prashant Jagtap) यांनी दिली. (NCP Pune Agitation | Jayant Patil)

“सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है” , “ईडी म्हणजे भाजपचा घरगडी”, “वातावरण फिरलय , सरकार घाबरलय” , “नागपूरचा पोपट काय बोलतोय,फौजदाराचा हवलदार झालो म्हणतोय” अश्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. (NCP Pune Agitation)

यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”गेल्या तीन दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. श्री. जयंत पाटील साहेब यांच्यावर देखील इडीची कारवाई करत त्यांचा आवाज दाबण्याचा तसेच त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रकार केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करू पाहत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अश्या दबावाला बळी पडणार नाही,तुम्ही जितका त्रास द्याल तितक्या जास्त ताकदीने आम्ही येत्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच पुणे जिल्याचे जिल्हाधिकारी मा.श्री. राजेंद्र देशमुख याना निवेदन सुधा देन्यात आले. (Jayant Patil News)

आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे, प्रदीप गायकवाड़ ,किशोर कांबळे, सदानंद शेट्टी, राकेश कामठे, अजिंक्य पालकर, मनोज पाचपुते,नितीन जाधव, महेश हांडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.


News Title | NCP Pune Agitation | Jayant Patil Demonstrations by Pune NCP in support of Jayant Patil| ED is home of BJP – City President Prashant Jagtap

Dr. Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें

Categories
Uncategorized

Dr Pradeep Kurulkar Latest News | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें

Dr Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | देशाची गुपिते पाकिस्तानला देणाऱ्या संघस्वयंसेवक डॉ. प्रदीप कुरुलकर या DRDO चा प्रमुख शास्त्रज्ञास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने करण्यात आली, यासाठी आज निदर्शने करण्यात आली. (DRDO Scientist Dr Pradeep Kurulkar Latest News)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांनी सांगितले कि,  कुरुलकर याला ISI साठी हेरगिरी करताना पोलिसांनी पुण्यात पकडला. याने आजपर्यंत ISI ला काय गोपनीय माहिती पुरवली आणि देशाचं किती नुकसान केलंय, याचीही चौकशी व्हावी या मागणीकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बालगंघर्व चौक येथे करण्यात आलेल्या निदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला. (NCP Pune News)

डॉ कुरूलकर हा माझ्या चार पिढ्या संघाचे काम करीत आहेत व माझ्यावर संघाचे संस्कार आहे, मी आर एस एस चा शाखा प्रमुख असून त्याकरीता कार्य करत असल्याचे अभिमानाने सांगतानाच्या व्हीडीओ क्लिप प्रसार माध्यमांमघ्ये पहायला मिळत आहेत , ज्या संघटनेच्या स्वयंसेवकाला देशद्रोहाच्या गुन्ह्यत अटक होते त्या संघटनेने अजूनही त्या व्यक्तीचे निलंबन केलेले नाही यावरूनच या संघटनेचे देशप्रेम लोकांना समजून येत
आहे , जर सदरील व्यक्ती ही इतर कोणत्याही समाजातील असती तर याच मंडळीनी संपूर्ण भारत आज नंगानाच केला असता. संबंधित यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता सदर व्यक्तीची कठोर चौकशी करून त्याच्याबाबत सर्व पुरावे गोळा करून त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.


सदर प्रसंगी *भारत माता की जय *
*पाकिस्तान मुर्दाबाद *पाकिस्तानचा ऐंजट कोण , आर एस एस चा स्वयंसेवक ..स्वयंसेवक *जबाव दो जबाब दो नरेंद्र मोदी जबाब दो * या धोषणा देवून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला

शहराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , विनोद पवार , बाबा पाटील , सुवर्णा माने , प्रदीप हुमे , वंदना साळवी , सुनिल पडवळ , विशाल गद्रे , राहूल तांबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

Dr. Pradeep Kurulkar Latest News | Dr. Strong protests of NCP against Kurulkar

NCP Pune Celebration | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Celebration | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

|  पवारसाहेबांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवंचैतन्य – प्रशांत जगताप

NCP Pune Celebration |  “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या (Lok Majhe Sangati – Autobiography) प्रकाशन प्रसंगी लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार (Sharad pawar) यांनी जाहीर केलेला पक्षाध्यक्षपद निवृत्तीचा निर्णय आज देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांच्या विनंतीनंतर अखेर मागे घेतला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवन येथे ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. (NCP Pune Celebration)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “देशाचा बुलंद आवाज…शरद पवार..शरद पवार” , “पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” , “देश का नेता कैसा हो पवार साहेब जैसा हो” अशा घोषणा देत संपूर्ण राष्ट्रवादी भवनचा परिसर दणाणून सोडला. (NCP Chief Sharad pawar)

यावेळी आनंदोत्सव साजरा करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune President prashant jagpat ) म्हणाले की, “गेली सहा दशके देशाच्या, राज्याच्या राजकारणातील ‘शरद पवार’ हे नाव कुणालाही, कुठेही थांबवता आलेलं नाही. देशाच्या कृषी, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, संस्कृतीक व औद्योगिक क्षेत्रात आदरणीय पवारसाहेबांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. या सर्व क्षेत्रांमध्ये पवारसाहेबांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आजही ‘आदर्शवत’ असे आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांची देशाला व राज्याला नितांत आवश्यकता असताना आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेला हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना धक्कादायक असाच होता.ज्यांना आदर्श मानत आमची पिढी राजकारणात आली,त्या नेतृत्वाच्या छायेत काम करत असताना त्या नेतृत्वाकडून अचानक पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा ऐकून कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या भावना आवरता येणार नाहीच,अशी परिस्थिती असताना कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आदरणीय साहेबांनी आज आपला निर्णय मागे घेतला आहे. आदरणीय साहेबांचा आधार पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला हवा आहे. देश एका अराजकतेच्या उंबरठ्यावर असताना आदरणीय साहेबांनी हा निर्णय मागे घेतल्याने, देशातील परिवर्तनाची ही लढाई जिंकण्यासाठी आता आम्ही सर्वजण सज्ज आहोत. (NCP Pune News)

आदरणीय साहेबांनी आपला निर्णय मागे घेतल्याबद्दल साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपकभाऊ मानकर, दत्ताभाऊ सागरे, किशोर कांबळे, महेश हांडे, सुषमा सातपुते, समीर शेख, संदीप बालवडकर, गणेश नलावडे, राजश्री पाटील, नाना नलावडे, आनंद सागरे, भक्ती कुंभार , कुलदीपशर्मा , रोहन पायगूढ़े, फहीम शैख़ यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.