Contract Employees | पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा | 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

Categories
Breaking News PMC पुणे

पुणे मनपातील कंत्राटी कामगारांचा मेळावा

| 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या निर्णयाबद्दल प्रशासनाचे मानले आभार

पुणे महानगरपालिकेतील (PMC pune) कंत्राटी कामगारांचा मेळावा (Contract employees Gathering) काँग्रेस भवन येथे पार पडला. या मेळाव्यामध्ये राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले. या मेळाव्यामध्ये गेली सहा महिन्यापासून 45 वयाची अट या व इतर कारणांसाठी विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आलेल्या सुमारे 250 सुरक्षा रक्षकांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांनी घेतल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. (contract employees)


या मेळाव्यासाठी पाणीपुरवठा विभाग, सुरक्षारक्षक विभाग, उद्यान विभाग, स्मशानभूमी विभाग, झाडन काम, कचरा वाहतूक करणारे चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये बोलताना कामगार नेते व राष्ट्रीय मजूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सर्व सुरक्षा रक्षकांनी संघटनेवर विश्वास ठेवला व संघटनेच्या पाठीशी उभे राहिले म्हणून त्यांच्यासाठी संघटनेने आंदोलन उभारले व त्या आंदोलनाला यश येऊन या सर्व सुरक्षारक्षकांना पुन्हा पूर्ववत कामावर घेण्यात आले असे सांगितले. त्याचप्रमाणे सुनील शिंदे यांनी पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांना एवढाच बोनस व 19 हजार रुपये दिला पाहिजे ही मागणी ही प्रशासनाने मान्य केली असून लवकरच याबाबत ही ठोस निर्णय संघटना करून घेईल असे आश्वासन यावेळी दिले ते पुढे बोलताना म्हणाले कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच राहिले पाहिजे. किमान वेतन कायद्यातील फरकाशी रक्कम तात्काळ दिली गेली पाहिजे, अशा महत्त्वाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघ कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मागण्यांबाबत आपण प्रशासनाबरोबर वारंवार चर्चा करत असून या बाबतीत पालिका अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेतला नाही तर यापुढे मोठे आंदोलन छेडण्याचा निर्णयही यावेळी जाहीर केला.
या वेळामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सरचिटणीस एस के पळसे यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे परिमंडळ प्रमुख विजय पांडव यांनी सूत्र संचालन केले तसेच स्मशानभूमीचे प्रमुख बाबा कांबळे व्हेईकल डेपोचे संदीप पाटोळे संजीवन हॉस्पिटलच्या मेघमाला काकडे इत्यादी कामगार नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. (pune municipal corporation)

Sunil Shinde | RMS| उद्यापासून कंत्राटी कर्मचारी महापालिका गेटवर आमरण उपोषण करणार | सुनिल शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

उद्यापासून कंत्राटी कर्मचारी महापालिका गेटवर आमरण उपोषण करणार | सुनिल शिंदे

पुणे | महापालिकेत (PMC Pune) काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (contract Employees) समस्या तशाच आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उद्यापासून पुणे महापालिका गेटवर आमरण उपोषण (Hunger strike) करण्यात येणार आहे. अशी भूमिका राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे (RMS president Sunil Shinde) यांनी घेतली आहे.


पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समस्या संदर्भात काँग्रेस भवन पुणे येथे बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष व कामगार नेते सुनील शिंदे यांनी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजूनही जवळजवळ 200 सुरक्षारक्षकांना कामावर घेण्यात आलेले नाही. या संदर्भामध्ये यापूर्वीच आयुक्तांनी मान्य  करूनही सर्व कामगार गेली पाच महिन्यापासून कामापासून वंचित आहेत. त्यांना पगारही देण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे कायम कामगारांना एक पगार आणि 19 हजार रुपये एवढा बोनस देण्यात आला, तेवढाच बोनस सर्व कंत्राटी कामगारांना देण्यात यावा. ही मागणी मान्य करूनही अजून त्याच्यावर अंमलबजावणी झालेली नाही. ईएसआयसी चे कार्ड अजूनही कर्मचाऱ्यांना वाटप करण्यात आलेच नाही. या व अशा अनेक प्रश्नांसाठी मंगळवार दिनांक 28 मार्च रोजी सकाळी दहा वाजल्यापासून पुणे मनपाच्या गेटवर हे सर्व कर्मचारी आमरण उपोषण आंदोलन सुरू करणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत कोणीही त्या जागेवरून उठणार नाही. असे ही शिंदे म्हणाले. 

RMS Women Wing | राष्ट्रीय मजदूर संघाची आता महिला आघाडी | महिला कर्मचाऱ्यांना दिलासा

Categories
Breaking News social पुणे

राष्ट्रीय मजदूर संघाची आता महिला आघाडी | महिला कर्मचाऱ्यांना दिलासा

राष्ट्रीय मजदुर संघ कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने लढत असतो पण लढाई लढत असताना महिलांना कामगार म्हणून काम करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी बाबत सोडवायलाही विचार पीठ असल पाहिजे अस परखड मत कामगार नेते सुनील शिंदे यांनी मांडले.
निमित्त होते राष्ट्रीय मजदूर संघ व अभिव्यक्ती आयोजित राष्ट्रीय मजदुर संघ महिला आघाडीचं उद्घाटन समारंभ व महिला मेळाव्याचे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम काँग्रेस भवन इथे झाला.

आज महिला व पुरुष म्हणून आपण प्रश्नाकडे पाहत राहिलो तर प्रश्न सोडवण अवघड होत पण आपण जर माणूस म्हणून जर लढलो तर प्रश्न सुटणं शक्य होईल या उद्देशाने आपणं महिला आघाडी सुरू करत आहोत असं मत अभिव्यक्तीच्या समन्वयक अलका जोशी यांनी मांडले. या आघाडी उद्घाटन दरम्यान साफसफाई, घरकाम, दवाखाना, सुरक्षारक्षक अशा विविध क्षेत्रातील महिलांनी काम करताना येणाऱ्या अडचणी मांडल्या व या आघाडीची गरज अधोरेखित केली. या अडचणी सोडविण्याचा निर्धार या मेळावा निमित्त करण्यात आला. बाई माझ्या काचच्या बरणीत, मैं अच्ची हू घबराऊ नको ही गाणी तसेच महिला कष्टकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणाही घेण्यात आल्या. मुलगी झाली हो हे ज्योती मापसकर यांचं नाटक अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्यांनी सादर केलं.
संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, सचिव एस.के. पळसे यावेळी उपस्थित होते. मेळाव्याला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. सूत्र संचालन शंकुतला भालेराव व मेघा काकडे यांनी केले.

PMC Contract Employees | ४५ वर्षावरील कंत्राटी कामगारांना दिलासा | कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

४५ वर्षावरील कंत्राटी कामगारांना दिलासा | कामावरून न काढण्याचे पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

 

| पुणे महानगरपालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला यश

45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या महापालिकेतील कंत्राटी कामगारांना (PMC contract employees) दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांनी लक्ष घातले आहे. पालकमंत्री पाटील यांनी महापालिका प्रशासनाला आदेश दिले कि, ४५ वर्षावरील एक ही कामगार घरी बसता कामा नये. यामुळे या कामगारांना कामावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी दिली.

शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्या सुरक्षारक्षकांना कामावर काढून टाकण्याचा घाट पुणे महानगर पालिकेच्या प्रशासनाने नेमलेल्या कंत्राटदाराने घातला.  त्यामुळे पुणे महानगर पालिकेच्या 300 पेक्षा जास्त जास्त कामगाराना घरी बसाव लागलं. याबाबत राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा चालू होता. प्रशासन या निर्णयाबाबत कुठलीही भूमिका घेत नव्हत. त्यामुळे 2 जानेवारी रोजी पुणे मनपा मुख्य गेट समोर सुरक्षा रक्षक आमरण उपोषणाला बसले होते. पुणे जिल्हा सुरक्षा मंडळ मार्फत 45 वयाची असलेली अट बेकायदेशीर आहे, याबाबत पत्र देखील महानगर पालिका प्रशासनाला दिले होते. कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे शेवटी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन संघटने मार्फत निवेदन देण्यात आले. या भेटी दरम्यान आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त बिनवडे, कुणाल खेमनार ही उपस्थित होते. पालकमंत्री यानी आयुक्तांना याबाबत आदेश दिले की कुठल्याही कामगाराला 45 वयाची अटीबाबत घरी बसू देऊ नये. त्यांना कामावर घेण्यात यावे.
संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, प्रतिनिधी विजय पांडव, बाळू दांडेकर, जान्हवी दिघे, अरविंद आगम उपस्थित होते. (Pune  Municipal corporation)

ESIC Benefit | PMC Contract employees | कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर

Categories
Breaking News PMC social पुणे

 कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी महापालिका पुढाकार घेईल| शिवाजी दौंडकर

पुणे मनपा (PMC Pune) मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी (Contract employees) कामगार राज्य महामंडळाचे (ESIC) फायदे कसे घ्यावेत या संदर्भामध्ये मनपा व कामगार राज्य विमा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार सल्लागार तथा सह महापालिका आयुक्त शिवाजी दौंडकर (Labor Adviser and Joint Municipal Commissioner Shivaji Daundkar) आश्वासन दिले कि पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल. (Pune Municipal corporation)

या कार्यशाळेमध्ये ई एस आय सी चे पुणे रिजनचे उपनिदेशक हेमंत पांडे , डेप्युटी संचालक चंद्रकांत पाटील, तर मनपाचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, कामगार अधिकारी नितीन केंजळे, अरुण खिलारी हे उपस्थित होते. ही कार्यशाळा कामगार नेते व इ एस आय सी चे स्थानीय सल्लागार समितीचे सदस्य सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती.(PMC Pune)

या कार्यशाळेमध्ये हेमंत पांडे यांनी ईएसआयसी च्या वेगवेगळ्या कायद्याबाबत माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांनी वेगवेगळे लाभ कसे घ्यावेत या संदर्भातले सविस्तर प्रेझेंटेशन दिले. शिवाजी दौंडकर यांनी पुणे महानगरपालिका सर्व कंत्राटी कामगारांना ईएसआईसी चे फायदे देण्यासाठी पुढाकार घेईल व प्रयत्न करेल असे सांगितले. सुनील शिंदे यांनी एस आय सी चे लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी सर्व कामगारांनी तात्काळ करून घ्यावी व त्याचे लाभ व नोंदणी करण्यासाठी संघटनेच्या कार्यालयामध्ये मोफत संगणक व मार्गदर्शक नेमण्यात येणार असून त्याद्वारे सर्व कंत्राटी कामगारांनी एस आय सी चा लाभ घ्यावा. असे आवाहन यावेळी केले. त्याचबरोबर ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी मनपाचे आयुक्त विक्रमकुमार व अतिरिक्त आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी परवानगी दिल्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.

केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यशाळेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे करण्यात आले होते. यासाठी मोठ्या संख्येने पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगार हे उपस्थित होते. (ESIC)

Sunil Shinde | महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड

Categories
Uncategorized

महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड

पुणे :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित राज असून, देशभरातील असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम काँग्रेस अंतर्गत या विभागामार्फत केले जाते.
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी पुणे येथील कामगार नेते सुनील शिंदे यांची आज नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र डॉ उदित राज यांनी पाठवले आहे.

सुनील शिंदे हे गेली 30 वर्षे कामगार क्षेत्रामध्ये काम करीत असून संघटित व संघटित क्षेत्रातील अनेक कामगारांच्या समस्या यशस्वीरित्या सोडण्याचे काम त्यांनी केले आहे. विशेषतः घरेलू कामगारांची मोठ्या प्रमाणावर नोंदणी करून त्यांना न्याय देण्याचे काम त्यांनी केले. बांधकाम मजूर, ऑटो रिक्षा, कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक यांना न्याय मिळण्यासाठी अनेक आंदोलने ही त्यांनी केले आहेत व त्यात त्यांनाही अशी आले आहे. सध्या ते पुणे माथाडी हमाल व इतर श्रमजीवी मंडळाचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.

त्यांची नियुक्ती झाल्यानंतर आज काँग्रेस भवन येथे कामगार मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्री शिंदे यांचा सत्कार केला व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ उदित राज, सोनिया गांधीजी, राहुल गांधीजी, मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे विशेष आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना  शिंदे म्हणाले की असंघटित कामगारांचे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्यासाठी कोणताही कायदा नाही. अशा सर्व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्यासाठी नवीन कायदा करण्यासाठी यापुढे कार्यरत राहणार आहे व महाराष्ट्रामध्ये असंघटित कामगारांची मोठी चळवळ उभी करून त्यांना न्याय देण्याचे काम करण्यात येईल. असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण यांनी केले. यावेळी विजय पांडव, मेघमाला वाघमारे, बाबा कांबळे, प्रदीप पांगारे, संतोष काटे, इत्यादी कामगार नेत्यांनी भाषणे केली.

Security guards | contract workers | मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे

Categories
Breaking News PMC social पुणे

मनपा सुरक्षा रक्षक, कंत्राटी कामगारांवरीलअन्याय सहन करणार नाही | कामगार नेते सुनील शिंदे

पुणे:- महानगरपालिकेतील (PMC Pune) कंत्राटी कामगारांवर (Contract workers) होत असलेला अन्याय सहन करणार नाही. असा इशारा आज कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (RMS president Sunil Shinde) यांनी दिला. ते पुणे महानगरपालिका मधील कंत्राटी कामगारांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.(Pune Municipal corporation)

ते पुढे म्हणाले की पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना, कायम कामगारां एवढाच बोनस मिळाला पाहिजे. त्याचबरोबर किमान वेतन, वाढीव रकमेच्या फरकाची रक्कम मिळाली पाहिजे. समान कामासाठी समान वेतन मिळालेच पाहिजे, त्याचबरोबर कंत्राटदार बदलला तरी कंत्राटी कामगार तेच राहतील, या मागण्या या मेळाव्यात करण्यात आले. या मेळाव्यामध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध खात्यांमधील कंत्राटी कामगारांनी आपले प्रश्न, होत असलेला अन्याय, या मेळाव्यामध्ये मांडला यावेळी शिंदे म्हणाले पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही, पगार पावती दिली जात नाही, प्र. फंडाचे रक्कम भरली जात नाही, ईएसआयचे कार्ड दिले जात नाही, शुल्लक कारणावरून कामावरून काढून टाकण्यात येते, अशा अनेक प्रकारे या कामगारांवर अन्याय चालू आहे नुकतेच सुरक्षा रक्षकांची नवीन कंत्राट आले असून या नवीन कंत्राटदारा मार्फत 45 पेक्षा जास्त वयाच्या कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्याचे काम चालू आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे आहे. वास्तविक पाहता कुठेही निवृत्तीचे वय हे 58 ते 60 असताना महापालिकेमधील सुरक्षा रक्षकांचे वयाची अट 45 ठेवण्यात आली आहे. हा या सर्व सुरक्षारक्षक यांच्यावर अन्याय होत आहे. (PMC Pune contract workers)

शिंदे पुढे म्हणाले मनपा मधील कंत्राटी कामगारांना कायम कामगारां एवढंच बोनस देण्याबाबतची चर्चा महापालिकेमधील अधिकाऱ्यांशी चालू असून, त्याबाबत लवकरच निर्णय जाहीर होईल असे असे शिंदे यांनी यावेळी सांगितले कंत्राटी कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास त्यासाठी आंदोलनाचा मार्ग देखील स्वीकारावा लागेल असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यासाठी पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षा रक्षक, वाहन चालक, पाणीपुरवठा विभाग, झाडू खाते, आरोग्य विभाग, स्मशानभूमी अशा विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटी कामगार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये दीप दीप प्रज्वलन करून कामगार नेते सुनील शिंदे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक राष्ट्रीय मजदूर संघाचे सेक्रेटरी एस के पळसे यांनी केले. सिताराम चव्हाण संघटनेचे उपाध्यक्ष यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले विजय पांडव यांनी सूत्रसंचालन केले. (RMS Sunil Shinde)

Domestic Workers Law | घरेलू कामगारांसाठी राज्यामध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम चालू

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

घरेलू कामगारांसाठी राज्यामध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम चालू

एन डी डब्ल्यू एफ (NDWF) या राष्ट्रीय संस्थे तर्फे घरेलू कामगारांसाठी (Domestic Workers) महाराष्ट्र राज्यामध्ये कायद्याचा मसुदा तयार करण्याचे काम चालू आहे. या संदर्भामध्ये मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यासाठी काही मान्यवरांना व उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या एडवोकेट, पत्रकार यांना बोलाविण्यात आले होते. या मसुद्यावर मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते सुनील शिंदे  यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी यासंदर्भात मार्गदर्शन केले व महाराष्ट्र राज्याच्या घरेलू कामगारांच्या संदर्भात मसुद्यामध्ये सूचना सुचविल्या. घरेलू कामगारांच्या कामगारांच्या कायद्यासंदर्भात व मागण्या संदर्भात आवश्यक ती सर्व मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बोलताना त्यांनी दिले.

Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती

Categories
Breaking News PMC पुणे

मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक

| कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती

 पुणे :- पुणे मनपातील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणेच 8.33% बोनस व सानुग्रह अनुदान मिळावे, या मागणीसाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या गेटवर विविध आंदोलने करण्यात आली. त्याचे दखल घेऊन आज पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी बैठकीचे आयोजन केले होते. बोनस देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती कामगार नेते सुनील शिंदे यांनी दिली आहे.
सुनील शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार या बैठकीमध्ये कंत्राटी कामगार हे कायम कामगारांप्रमाणेच सारखेच काम करत असून कायम कामगारांना मात्र 8.33% बोनस व 19 हजार रुपये सानुग्रह  अनुदान देण्यात आले. कंत्राटी कामगारांना मात्र काहीही देण्यात आलेले नाही. हा त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ही बाजू कामगार नेते सुनील शिंदे यांनी यावेळी मांडली ते पुढे म्हणाले कंत्राटी कामगार कायदा अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार या सर्व कंत्राटी कामगारांनाही कायम कामगारांन प्रमाणे बोनस व सानुग्रह अनुदान दिले पाहिजे.  यावेळी झालेल्या चर्चेमध्ये डॉ खेमनार यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. सदर बाबींचा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव स्थायी समिती व मुख्य सभेपुढे मांडू असे आश्वासन त्यांनी  यावेळी दिले.
    या बैठकीला पुणे महानगरपालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, मुख्य लेखापाल उल्का कळस्कर, विधी सल्लागार हे उपस्थित होते. राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, एस के पळसे, सिताराम चव्हाण, विजय पांडव, उज्वल साने, जानवी दिघे, संदीप पाटोळे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Contract Employees | ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांचा असंतोष सहन करावा लागेल | राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

Categories
Breaking News PMC social पुणे

ऐन दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांचा असंतोष सहन करावा लागेल

| राष्ट्रीय मजदूर संघाचा इशारा

पुणे – पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायम कामगारांप्रमाणे बोनस मिळावा,वेळेवर पगार मिळावा,या व इतर कायदेशीर मागण्या संदर्भात महानगरपालिकेतील विविध खात्यातील सुरक्षा रक्षक, पाणी पुरवठा, स्मशानभूमी कर्मचारी, आरोग्य विभाग,वाहन चालक इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्यां कंत्राटी कामगारांनी राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष  सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा आंदोलने केली. प्रत्येक वेळी महापालिका प्रशासनाने बैठक घेऊ, निर्णय घेऊ असे आश्वासन दिले परंतु अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता ऐन दिवाळीत कंत्राटी कामगारांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
वास्तविक पाहता कंत्राटी कामगार अधिनियम १९७१ मधील तरतुदीनुसार कंत्राटदाराने पगार किंवा कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यास मुख्य नियोक्ता म्हणून महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. त्याचप्रमाणे याच कायद्यातील तरतुदीनुसार समान काम समान वेतन दिले गेले पाहिजे. त्याच अनुषंगाने महापालिकेतील कायम कामगारांना ८.३३टक्के बोनस व १९००० रूपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि कंत्राटी कामगारांना पगार देण्यात आलेला नाही. यामध्ये सुरक्षा रक्षकांना गेली २ महीन्यापासून पगार देण्यात आलेला नाही या संदर्भामधे क्रिस्टल कंपनीने हात वर केले आहे. असे अनेक कंत्राटदाराने पगार प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविक पाहता पुणे महानगरपालिकेला कामगार उपायुक्त कार्यालयाने कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत पत्र  पाठवले आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिका आयुक्तांनी तात्काळ लक्ष घालून निर्णय घ्यावा अन्यथा: ऐन दिवाळीत कंत्राटी कामगारांच्या असंतोषाला पुणेकरांना सामोरे जावे लागेल असा इशारा राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष  सुनिल शिंदे यांनी दिला आहे.