PMC Property Tax Department | पुणे महापालिका मिळकतकर विभागाचा कारवाईचा धडाका | एकाच दिवशी 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 मिळकती केल्या सील

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Department | पुणे महापालिका मिळकतकर विभागाचा कारवाईचा धडाका | एकाच दिवशी 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 मिळकती केल्या सील

PMC Property tax department | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune municipal corporation) मिळकतकर विभागाने (PMC Property tax department) थकबाकीदार मिळकत धारकांवर कारवाईचा चांगला धडाका सुरु केला आहे. खासकरून व्यावसायिक मिळकतींवर (Commercial Properties) जोरदार कारवाई सुरु केली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळकतकर विभागाने 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 व्यावसायिक मिळकती सील केल्या आहेत. तर या कारवाई दरम्यान 1 कोटी 80 लाखांची थकबाकी वसूल केली आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांनी दिली. (Pune Property tax)
मिळकतकर विभागाने मिळकतकर वसुलीवर चांगला जोर दिला आहे. त्यासाठी विभागाला महापालिका आयुक्तांनी नुकतेच 150 कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. त्यानुसार विभागाने वसूली आणि थकबाकीदारावर कारवाई करण्याचे काम सुरु केले आहे. व्यावसायिक मिळकतीवर करोडोची थकबाकी आहे. मात्र हे लोक टॅक्स जमा करत नाहीत. त्यामुळे महापालिकेने व्यावसायिक मिळकती सील करण्याचा धडाका सुरु ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळकतकर विभागाने 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 व्यावसायिक मिळकती सील केल्या आहेत. तर या कारवाई दरम्यान 1 कोटी 80 लाखांची थकबाकी वसूल केली आहे. (Pune Municipal corporation)
उपायुक्त अजित देशमुख यांनी सांगितले कि, आज एकूण 217 मिळकतींना भेट दिली. त्यातील 80 मिळकतींना नोटिसा देण्यात आल्या. यातील 40 मिळकती सील केल्या. देशमुख यांनी सांगितले कि आजपर्यंत 2004 मिळकती सील केल्या आहेत. यांची थकबाकी ची रक्कम 123 कोटी इतकी आहे.
दरम्यान महापालिकेने 200 व्यावसायिक मिळकतीची लिलाव प्रक्रिया देखील सुरु केली आहे. यातून महापालिकेला 60 कोटी उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे.

PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Property Tax Lottery | मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  बक्षीस वितरण

| पुणे शहारातील वाहतुक सुविधा आणि पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य-अजित पवार

PMC Property Tax Lottery | उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या हस्ते पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर (Pune Property tax) भरलेल्या नागरिकांसाठी राबविलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पुणे शहरातील वाहतूक कोंडी (Traffic congestion Pune) दूर करण्यासाठी वर्तुळाकार महामार्गाचे काम लवकर सुरू व्हावे आणि मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील कामे गतीने पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री.पवार यांनी केले. (Pune Municipal Corporation Property tax lottery)
सीओईपी विद्यापीठ (CEOP University) मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh), अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (IAS Kunal Khemnar), विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane), उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh), उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam), उपायुक्त जयंत भोसेकर (Deputy Commissioner Jayant Bhosekar) आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शहराचा विकास करण्यासोबत शहर सुंदर आणि हिरवेगार रहावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शहराचा नियोजनबद्ध विकास करून नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. नदीसुधार प्रकल्पाचा पहिला टप्पा ९  किलोमीटर क्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना नदीच्या दोन्ही तटावर फिरण्यासाठी चांगली सुविधा मिळणार आहे. या परिसरात झाडे लावण्यात येणार आहेत. पुढील ५० वर्षाचा विचार करून विकासकामे करण्यात येत आहेत.
 कचरा संकलनासाठी पर्यावरणपूरक विद्युत वाहने घेण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठीदेखील विद्युत बसेस घेण्यात आल्या आहेत. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषण मुक्त करण्याच्या या प्रयत्नांना नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुदतीत मिळकतकर भरलेल्या नागरिकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, नागरिकांनी वेळेत मिळकतकर भरावा यासाठी प्रोत्साहन म्हणून १ कोटी रुपयांची ४५ बक्षिसे देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत ६ लाख ६० हजार ७८५ मिळकतधारकांनी मुदतीत कर भरला.  त्यामुळे मिळकतकर संकलनात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत ३०० कोटींपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. यामुळे महापालिकेमार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देता येतील. इतरही महानगरपालिकांनी अशा स्वरूपाचा  उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी लॉटरी उपक्रमाची माहिती दिली. मिळकतकरातून येणारी रक्कम शहराच्या विकासासाठी उपयोगात आणली जाते. वेळेवर कर भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविल्याने यावर्षी मिळकतकरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनांची किंमत सुमारे १ कोटी ७२ लाख असून एका फेरीत १.५ ते २ टन कचऱ्याची वाहतूक होणार आहे.
                                     ***

PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागाला वसुलीसाठी अतिरिक्त 150 कर्मचारी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Property tax Department | प्रॉपर्टी टॅक्स विभागाला वसुलीसाठी अतिरिक्त 150 कर्मचारी!

| 31 मार्च पर्यंत राहणार नेमणूक

PMC Property Tax Department | पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाला (Pune Municipal Corporation Property tax Department) टॅक्स वसूलीसाठी अतिरिक्त 150 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही दिवसापूर्वी 30 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले होते. तर आज अजून 120 कर्मचारी असे एकूण 150 कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही 31 मार्च पर्यंत असणार आहे. महापालिका  आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Property Tax)

महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1500 कोटी पर्यंत  उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. तसेच व्यावसायिक मिळकत धारक देखील टॅक्स भरत नाहीत. (PMC Pune Property tax Department)

विभाग प्रमुखानी खात्याला जास्तीत जास्त वसूली करण्याबाबत आदेश दिले आहेत. विभागीय निरीक्षक (DI) आणि पेठ निरीक्षक (SI) यांना यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक दिवशी किमान 50 व्यावसायिक मिळकती करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र हे करताना टॅक्स विभागातील कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. नागरिक टॅक्स करण्याबाबत उदासीन दिसताहेत. तसेच काही ठिकाणी कोर्ट केसेस असल्याने अडचणी येत आहेत. तरीही दररोज 15-17 मिळकती सील केल्या जात आहेत. तसेच विभागप्रमुखानी बिल्डर करून भोगवटा पत्र लवकरात लवकर भरून घेण्याचे आदेश दिले आहेत. (Pune Municipal Corporation)
दरम्यान वसुली करण्यासाठी विभागाला मागील वर्षाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे वसुलीत अडचणी येत आहेत. कारण एखादी मिळकत सील करताना किमान 5 कर्मचारी लागतात. मात्र कर्मचारी अपुरे आहेत. तसेच कधी कधी नागरिक देखील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून येतात. जवळपास 100- 150 कर्मचारी कमी असल्याने विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार काही दिवसापूर्वी अतिरिक्त आयुक्तांनी वसूलीसाठी 30 अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर आज पुन्हा 120 कर्मचारी महापालिका आयुक्तांनी उपलब्ध करून दिले आहेत. असे एकूण 150 कर्मचारी विभागाला देण्यात आले आहेत. (PMC Pune News)
——
नवीन कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्यांच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स ची वसूली, जप्ती, लिलाव प्रक्रिया अशी कामे करून घेतली जातील.
अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पुणे मनपा 
——

PMC Property Tax Department is planning to auction 200 sealed commercial properties

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

 PMC Property Tax Department is planning to auction 200 sealed commercial properties

 |  All inspectors were trained

 Pune PMC Property Tax |   Pune Municipal Corporation’s Income Tax Department (PMC Property tax Department) has emphasized on tax collection.  Due to various reasons Punekars are apathetic about paying taxes.  Therefore measures are being taken for recovery.  As part of this, commercial properties are being sealed.  200 of them will be auctioned.  The planning of the property tax department has been prepared in this regard.  This information was given by Deputy Commissioner Ajit Deshmukh.  (Pune PMC Property Tax)
 The property tax collection department of the Municipal Corporation has received an income of more than 1400 crores in the current financial year.  However, the department is facing many difficulties in fulfilling the target given by the Municipal Commissioner.  Because the citizens of the involved villages are reluctant to pay income tax.  Also business income holders do not pay tax.  The head of the department has given orders to the department for maximum recovery.  Divisional Inspectors (DI) and Peth Inspectors (SI) have also been provided staff for this.  Accordingly, it has been ordered to make at least 50 commercial properties every day.  15-17 properties are being sealed every day.  Also, the head of the department has ordered the builder to fill the occupation letter as soon as possible.  (Pune Property tax).
 Deshmukh said that in the meantime, the property Tax Department is now going to auction these sealed properties.  Earlier, the pune Municipal Corporation had conducted an auction in Katraj area.  From that, the municipal corporation got more than 4 crores of income.  Accordingly, the municipality is going to auction 200 out of the sealed properties.  It is planned.  Training in this regard has also been given to all inspectors.  Deshmukh gave this information.

 – Such will be the auction process

 – Issuance of Warrant
 – Issuance of forfeiture notice if the amount is not deposited within 7 days.  Allow 21 days for this.
 – If the amount is not paid thereafter, assessment of property by Construction and Property Management Department for auction process.
 – After this process to auction the proceeds and take the approval of the Municipal Commissioner to issue a public notice in the newspaper.
 – Candidates participating in the auction process will have to deposit 10% earnest money of the income assessment amount to the Municipal Corporation through online mode.
 —–

PMC Pune Property Tax Bill | मिळकत करातून १२० कोटी जमा  | मिळकत कराची ४ लाख छापील बिले दिली 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Property Tax Bill | मिळकत करातून १२० कोटी जमा

| मिळकत कराची  ४ लाख छापील बिले दिली

| 5-10% सवलतीचा कालावधी 31 जुलै पर्यंत

PMC Pune Property Tax Bill | पुणे महानगरपालिकेकडून (PMC pune) निवासी मिळकतींना (Residential Property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत कायम राहणार आहे. ०१.०४.२०१९ पूर्वीच्या निवासी व बिगरनिवासी मिळकतींना (Non residential property) देखभाल दुरुस्ती करिता देण्यात येणारी १५% वजावट रद्द करून १०% वजावट देण्यात येणार असून त्यांची अंमलबजावणी ०१.०४.२०२३ पासून करण्यात आली आहे . अशा मिळकतींची सन २०२३-२४ करिताची देयके (property Tax Bill) देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना १० लाख  ऑनलाईन बिले (Online Property tax bills) देण्यात आली आहेत. तर पोस्टाच्या माध्यमातून (Post office) आतापर्यंत ४ लाख छापील बिले (Printed property tax bills) पाठवण्यात आली आहेत. आगामी दोन दिवसात उर्वरित बिले पाठवण्यात येतील. तर आतापर्यंत मिळकत करातून १२० कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अशी माहिती कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC pune property Tax bill)

 ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत ०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे.  मिळकतींचे सन २०२३-२४ ह्या आर्थिक वर्षाची देयके ३१.०५.२०२३ पर्यंत बनवण्यात येणार आहेत. वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना  ०१.०४.२०१८ पासून ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत दि. ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वःवापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (PT 3 Application Form)
 विहित मुदतीत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकास सर्वसाधारण करात ५% किंवा १०% सवलत देण्यात येते. त्या सवलतीचा कालावधी ३१.०७.२०२३ अखेरपर्यंत देण्यात आला आहे. १५.०८.२०२३ पासून प्रथम सहामाहीस  दरमहा २% शास्ती आकारण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pmc Pune news)
दरम्यान महापालिकेने १५ मे पासून ऑनलाईन बिले देण्यास सुरुवात केली होती. १० लाखाहून अधिक ऑनलाईन बिले नागरिकांना पाठवण्यात आली आहेत. तर ४ लाख छापील बिले पोस्टाच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात आली आहेत. उर्वरित बिले आगामी दोन दिवसात दिली जातील. नागरिकांकडून मिळकत करापोटी आतापर्यंत १२० कोटी वसूल करण्यात आले आहेत. अशी माहिती देशमुख यांनी दिली. (Pune Municipal corporation Property tax department)
—-
News Title | PMC Pune Property Tax Bill | 120 crore collected from income tax| 4 lakh printed income tax bills issued

PMC Pune property tax |  Where to submit PT 3 application form?  What are the required documents?  Know everything

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune property tax |  Where to submit PT 3 application form?  What are the required documents?  Know everything

 PMC pune Property Tax |  Pune Municipal Corporation (PMC) has made the application form available on the website of the municipal corporation (PMC pune) as PT 3 Application form has to be filled and submitted to the corporation to get 40 percent discount on property tax.  The facility of filling this application form will be made available at the civic facility center along with the wardoffices of the municipal corporation.  What documents have to be attached with this application?  Let us find out.  (PMC Pune Property Tax)
 For the convenience of the property holders, PT-3 Application form can be submitted to the nearest ward Office/Regional Office/Head Office to the Civil Welfare Center or Peth Inspector.  Residents who have been given 40% exemption prior to 01.04.2019, whose exemption continues today need not file PT-3 application again.  (PMC pune news)
 PT-3 Application for 40% Discount at Civil Facilities at Liaison Office / Regional Office / Head Office
 Center or Peth Inspector / Divisional Inspector will also be available in the office. The form is also made available on the website propertytax.punecorporation.org.  (Pune Municipal Corporation)

 Required documents to accompany PT-3 application for availing exemption:

 1) Nomination letter from society regarding use of property for self-maintenance (Society
 if any)
 2) Voter Identity Card / Passport / Driving License / Gas Card / Ration Card etc.
 3) Copy of property tax bill of that income in case of property elsewhere in Pune city
 (PT 3 application form)
 —
 PT-3 along with above competent proof documents and Rs.25  After submitting the application form to the nearest ward Office/Regional Office/Head Office/Nagri Suvidha Center or Peth Inspector/Divisional Inspector by paying the fee, the case will be finalized by the Head of Taxation and Tax Collection after inspection of the documents by the Peth Inspector/Divisional Inspector.
 – Ajit Deshmukh, Deputy Commissioner, Taxation and Tax Collection Department

PMC Pune property tax | PT 3 अर्ज कुठे जमा करायचा? आवश्यक कागदपत्रे कुठली? जाणून घ्या सर्व काही

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune property tax | PT 3 अर्ज कुठे जमा करायचा? आवश्यक कागदपत्रे कुठली? जाणून घ्या सर्व काही

PMC pune Property Taxपुणे महापालिकेने (pmc pune) मिळकत करात ४० टक्के सवलत मिळवण्यासाठी पीटी ३ हा (PT 3 Application form) अर्ज भरून महापालिकेकडे जमा करावा लागणार असल्याने तो अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर (PMC pune Website) उपलब्ध करून दिला आहे. हा अर्ज भरून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यांलयांसह नागरी सुविधा केंद्र येथे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.   या अर्जासोबत कुठली कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. हे आपण जाणून घेऊया. (PMC pune property Tax)

 

मिळकतधारकांच्या सोयीच्या दृष्टीने PT-३ अर्ज (PT 3 Application form) आपल्या नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय येथे नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक यांचेकडे जमा करता येणार आहे. दि. ०१.०४.२०१९ पूर्वीच्या ज्या निवासी मिळकतीना ४०% सवलत देण्यात आली आहे, ज्यांची सवलत आजही कायम आहे त्यांनी पुन्हा PT-३ अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. (PMC pune news)
४०% सवलतीकरिता PT- ३ अर्ज संपर्क कार्यालय / क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधाvकेंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचे कार्यालयात उपलब्ध होणार आहेत तसेच
propertytax.punecorporation.org ह्या संकेतस्थळावर देखील फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

सवलत प्राप्त करणेकरिता PT-३ अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे:

१) मिळकतीचा वापर स्वत: राहण्यासाठी करित असल्याबाबत सोसायटीचे नाहरकत पत्र (सोसायटी असल्यास)
२) मतदान ओळखपत्र / पासपोर्ट/वाहनचालक परवाना/ गैस कार्ड / रेशनकार्ड इ.
३) पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत
(PT 3 application form)
PT-३ अर्जासोबत वरील सक्षम पुराव्याचे कागदपत्रे व २५ रु. चलन फी भरून नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय / नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचेकडे अर्ज जमा केलेनंतर पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचेकडून कागदपत्रांची तपासणी करून करआकारणी व करसंकलन प्रमुख यांचेकडून प्रकरण अंतिम करणेत येईल.
अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग 

Property Tax | मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकतकर विभागाने घडविला इतिहास | विविध अडचणींवर मात करत वर्षभरात 1965 कोटींचे उत्पन्न

| मागील वर्षी पेक्षा 125 कोटींचे मिळवले अधिक उत्पन्न!

 | मागील वर्षी मिळाले होते 1840 कोटी

पुणे |  विविध अडचणींवर मात करत मिळकतकर विभागाने (PMC property tax department) आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुमारे 1965 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे. मागील वर्षी पेक्षा हे उत्पन्न 125 कोटींनी अधिक आहे. मागील वर्षी पालिकेला 1840 कोटी मिळाले होते. यावर्षी मिळालेले उत्पन्न हे आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात जास्त आहे. अशी माहिती मिळकतकर विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Deputy commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली.
 पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने आजच्या दिवशी म्हणजे आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 42 कोटींचा मिळकतकर वसूल केला आहे. मागील वर्षी याच दिवशी 39 कोटी मिळाले होते. एकूणच आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाने 1965 कोटींचे उत्पन्न प्राप्त केले आहे. मागील वर्षी 1840 कोटी मिळाले होते. विशेष म्हणजे मागील वर्षी अभय योजना दोनदा राबवण्यात आली होती. तीनपट कराचा मुद्दा, 40% सवलतीचा मुद्दा मागील वर्षी नव्हता. असे असतानाही मागील वर्षीपेक्षा सुमारे 125 कोटी अधिक उत्पन्न विभागाने मिळवले आहे. (PMC Pune)
| 65 हजार मिळकतींचे मूल्यमापन 
मिळकतकर विभागाने पहिल्यापासूनच वसुलीवर जोर दिला होता. त्यामुळे विभागाला 1900 कोटींचा टप्पा पार करता आला आहे. तसेच नवीन मिळकतीचे मूल्यमापन करण्यावर देखील विभागाकडून जोर देण्यात आला होता. वर्षभरात 65 हजार मिळकतीचे मूल्यमापन करण्यात आले. ज्यातुन महापालिकेला 400 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. विभागाला 2022-23 मध्ये 2200 कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. तर 2023-24 मध्ये 2618 कोटी उत्पन्न जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आगामी वर्षात देखील 2200 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Pune Municipal Corporation)
—-

Property Tax Recovery | चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार! | महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

चेक बाऊन्स झाला तर आता थेट मिळकत सील केली जाणार!

| महापालिका मिळकत कर विभागाकडून नोटीस पाठवण्यास सुरुवात

पुणे | महापालिकेचा मिळकतकर विभागाच्या कर वसुलीला नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे विभागाने आता काही कडक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चेक बाऊन्स झाला तर संबंधित प्रॉपर्टी धारकाची प्रॉपर्टी सील करण्यात येणार आहे. त्यानुसार कर संकलन विभागाने नागरिकांना नोटीस पाठवणे देखील सुरु केले आहे.
| विभाग प्रमुखांच्या नेतृत्वाखाली बैठक 
महापालिकेच्या कर संकलन विभागाला चालू आर्थिक वर्षात 1650 कोटी इतके उत्पन्न मिळाले आहे. मात्र महापालिका आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात मात्र विभागाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो आहे. कारण समाविष्ट गावांतील नागरिक मिळकतकर भरण्यास टाळाटाळ करत आहेत. या नागरिकांना अपेक्षित आहे कि पिंपरी च्या धर्तीवर पुण्यातही तीन पट कर माफ होईल. तसेच उरुळी आणि फुरसुंगी प्रमाणे आपली ही गावे महापालिका हद्दीतून वगळली जातील. शिवाय गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिक कर भरण्याबाबत उदासीन दिसत आहेत. तसेच शहरातून देखील नागरिक कर भरताना दिसत नाहीत. कारण 40% कर माफीचा निर्णय अजून प्रलंबित आहे. याचा परिणाम टॅक्स विभागाच्या वसुलीवर होत आहे. त्यामुळे उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. याचे नियोजन करण्यासाठी महापालिका वर्धापन दिनी म्हणजे बुधवारी  विभाग प्रमुख अजित देशमुख यांनी घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात एक बैठक घेतली. त्यासाठी सगळे प्रशासन अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयातील सर्व निरीक्षकांना बोलावण्यात आले होते. सुट्टी असून देखील सर्व हजर होते.
टॅक्स भरणा करण्यासाठी नागरिक चेक चा उपयोग करतात. मात्र मोठ्या रकमेचे चेक बाऊन्स होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. मात्र तरीही नागरिक जुमानत नाहीत. त्यामुळे आता प्रॉपर्टी सील करण्याचे आदेश देशमुख यांनी विभागाला दिले आहेत. त्याआधी नोटीस दिली जाणार आहे. त्यानुसार आजपासून नोटीस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सोसायट्यांमध्ये मोहीम राबवली जाणार 
दरम्यान शहरात बरेच नागरिक असे आहेत ज्यांनी टॅक्स भरणा केलेला नाही. त्यासाठी आता विभागाकडून मोठ्या सोसायट्याना टार्गेट केले जाणार आहे. त्यासाठी सोसायट्यामध्ये मोहीम राबवली जाणार आहे. ज्या नागरिकांचा टॅक्स भरणा थकीत आहे, अशा सोसायट्या शोधून महापालिका कर्मचारी तिथे जातील. तिथेच तात्काळ टॅक्स भरणा करून त्यांना पावती देखील देतील. यामुळे नागरिकांना टॅक्स भरणा करणे अनिवार्य राहणार आहे. अशीच मोहीम काही वर्षांपूर्वी विभागप्रमुख सुहास मापारी असताना राबवण्यात आली होती. त्याच धर्तीवर ही मोहीम राबवली जाईल. यातून महापालिकेला अपेक्षित वसुली होईल, असे मानले जात आहे.
| सोमवार, गुरुवार सोडून सर्व दिवस फिल्ड वर जावे लागणार 
दरम्यान टॅक्स विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी फिल्ड वर जावे लागणार आहे. याबाबत ही बैठकीत चर्चा झाली. फक्त सोमवार आणि गुरुवारी कार्यालयात येण्याची अनुमती असेल. बाकी सर्व दिवस फिल्ड वर राहून वसुली करावी लागणार आहे. तसेच आगामी काळात विभागातील क्लेरिकल काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील फिल्ड वर काम करावे लागणार आहे.

Property Tax | मिळकत करातून महापालिकेच्या तिजोरीत 1520 कोटी जमा  | मागील वर्षीच्या तुलनेत 225 कोटी अधिक 

Categories
Breaking News PMC पुणे

मिळकत करातून महापालिकेच्या तिजोरीत 1520 कोटी जमा

| मागील वर्षीच्या तुलनेत 225 कोटी अधिक

पुणे | मिळकतकर (Propety tax) हा महापालिकेचा (PMC Pune) उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत (source) मानला जातो. या आर्थिक वर्षात महापालिकेला आतापर्यंत 1520 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी पेक्षा हे 225 कोटींनी अधिक आहे. अशी माहिती कर संकलन आणि कर आकारणी विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. (Dy commissioner Ajit Deshmukh)
देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये 1505 कोटी शहरातून तर समाविष्ट 23 गावातून 15 कोटीच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत महापालिकेला 23 गावे आणि शहरातून 1295 कोटीचे उत्पन्न मिळाले होते. यामध्ये 1278 कोटी शहरातून मिळाले होते.
(Pune Municipal corporation)
देशमुख यांनी सांगितले कि उत्पन्न वाढीसाठी वसुलीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच यावर्षी अभय योजना देखील नसणार आहे. त्यामुळे वसुलीवर भर देऊन आम्ही आमच्या उद्दिष्ट पर्यंत पोहोचू असा आम्हाला विश्वास आहे. (PMC Pune)