PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Election | BJP | भाजपकडून पुणे महापालिका निवडणुकीची तयारी सुरु

| महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून राजेश पांडे यांची नियुक्ती

PMC Election | BJP | पुणे महापालिका निवडणूक (Pune Municipal Corporation Election) कधी होणार याची उत्सुकता सर्वानाच आहे. मात्र निवडणूक कधी होणार, हे खात्रीशीरपणे कुणीच सांगू शकत नाही. पण दुसरीकडे भाजपने (BJP) मात्र निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. पुणे महापालिका निवडणूक प्रमुख (PMC Pune election) म्हणून राजेश पांडे (Rajesh Pande) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (PMC Election | BJP)
पांडे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State president Chandrashekhar Bawankule) यांनी नुकतेच तसे पत्र दिले आहे. पत्रात बावनकुळे यांनी म्हटले आहे कि पुणे महापालिकेत पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणण्यासाठी आपण प्रयत्न कराल.
प्रदेश भाजपने पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे. पक्ष नेतृत्वाने टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवीन. अशा भावना पांडे यांनी यावेळी व्यक्त केल्या. (PMC election news)
महापालिकेच्या माध्यमातून भाजपने शहरात मोठी विकासकामे केली आहेत. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत आम्ही मागील यशाची पुनरावृत्ती करू. त्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करीन. बूथ रचनेचे सक्षमीकरण, नियोजनबद्ध निवडणूक व्यवस्थापन आणि विकासकामे व योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करू.
राजेश पांडे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप, महाराष्ट्र
पुणे महापालिका निवडणूक प्रमुख, भाजपा
—–
News Title |PMC Election | BJP | Preparations for Pune Municipal Elections have started from BJP | Appointment of Rajesh Pandey as Chief Municipal Election Officer

Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले? | मोहन जोशी यांचा भाजपला सवाल 

Categories
Breaking News Political पुणे

Pune News | Mohan Joshi | पुणेकरांनी भाजपला खूप काही दिले; पण भाजपने शहराला काय दिले?

| मोहन जोशी यांचा भाजपला सवाल

Pune News | Mohan Joshi | पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची नऊ वर्षाची कारकीर्द धुमधडाक्यात साजरी केली जात आहे. नवा भारत नवी संसद याचे नारे दिले जात आहेत पण काँग्रेसचा (Pune congress) शहर भाजपाला (Bjp Pune) यानिमित्त एकच प्रश्न आहे तो म्हणजे पुणेकरांनी तुम्हाला भरपूर दिले पुणे शहराला तुम्ही काय दिले? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष माजी आमदार  मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी जोशी यांनी हा सवाल केला आहे. (Pune News)
जोशी म्हणाले, दोन खासदार, 5 विधानसभा मतदारसंघात आमदार महानगरपालिकेत 98 नगरसेवक केंद्रात राज्यात आणि मनपात एक हाती सत्ता. पुणेकरांनी उदार मनाने इतके राजकीय यश दिले, त्या बदल्यात पुणे शहराच्या पदरी काय पडले? फक्त भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी.  केंद्र सरकारने जायका,  समान पाणीपुरवठा, मेट्रो, स्मार्ट सिटी,  पंतप्रधान आवास योजना आणखी काही योजना जाहीर केल्या त्या कागदावर आहेत.  (Pune Congress)
जोशी पुढे म्हणाले, महापालिकेची सत्तेची पाच वर्षे निव्वळ भ्रष्टाचारात गेली हे. सर्व पुणे शहराने पाहिले त्या भ्रष्टाचाराच्या भीतीने आता भाजप महानगरपालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाही. घरपट्टीत महापालिकेने ठराव करून घेतलेली नागरिकांना दिलेली ४० टक्के सवलत यांनी काढून घेतली. वसुली लावली ती सुद्धा चार वर्षापासून. वीस ते बावीस हजार रुपयांच्या बोजा साधे घर असणाऱ्यापर्यंत पडत होता. याबाबत आंदोलने करावी लागली. तेव्हा कुठे परत निर्णय फिरवला. आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विषय विधिमंडळात मांडून या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळवून दिला. (BJP Pune)
भ्रष्टाचारी लोक या शहरातील  नागरिकांचे गुन्हेगार आहेत. असा काँग्रेसचा आरोप आहे यांना सत्ता दिली ती स्वतःसाठी वापरली केंद्र सरकारची ९ वर्ष कसली साजरी करता महानगरपालिकेतल्या सत्तेतला पाच वर्षाचाकामचा  लेखा जोखा पुणेकरांना हिम्मत असेल तर द्या ? असे काँग्रेसने भाजपाला आव्हान दिले आहे.
जोशी म्हणाले, तेरा वर्षाच्या  कांग्रेस पक्ष च्या  प्रयत्नांमुळे 2013 रोजी मेट्रो मंजूर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ डिसेंबर 2016 रोजी पुणे मेट्रोची पायाभरणी केली. तब्बल सहा वर्षांनी पूर्ण झालेल्या गरवारे ते वनाज या छोट्या मार्गाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. ३४.६ किमी चा मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मोदींनी कोणतेही आग्रह केल्याचे  अजूनही ऐकिवात नाही. मोदीजींनी पुणेकरांना उत्तर द्यावे की अजूनही मेट्रो का सुरू होत नाहीये.
पंतप्रधान आवास योजना दुर्बल घटकांसाठी या योजनेतून सन 2022 पर्यंत मोफत घरे देण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. योजनेअंतर्गत किती घरे बांधून दिली याची माहिती भाजपा का लपवत आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन, जाहिराती फोटो आणि बातम्या झाले की जणू विकास झाला असे भाजप दाखवते, पुण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घोषणांचा सुकाळ आहे. मात्र अंमलबजावणी चा दुष्काळ आहे. पुण्याची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन मंजूर झालेले आयआयएम नागपूरला गेली. प्रकाश जावडेकर माहिती आणि नभोवाणी मंत्री असताना पुण्यातील नॅशनल फिल्म अर्किव ची स्वायत्तता संपली. दूरदर्शन केंद्र मराठी बातम्या आकाशवाणी याची स्वायत्तता संपली.
पत्रकार परिषद वेळी  काँग्रेसचे सरचिटणीस प्रवक्ते रमेश अय्यर, शहर कॉंग्रेस उपाध्यक्ष शाबीर खान, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रशांत सुरसे, शहर काँग्रेसचे चिटणीस चेतन अग्रवाल, प्रदेश प्रतिनिधी यशराज पारखे उपस्थित होते.
—-
News Title | Pune News | Mohan Joshi | The people of Pune gave a lot to the BJP; But what did the BJP give to the city?| Mohan Joshi’s question to BJP

BJP state executive meeting in Pune | पुणे आणि कर्नाटक पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची उद्याची महत्वाची बैठक 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

BJP state executive meeting in Pune | पुणे आणि कर्नाटक पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजपाची उद्याची महत्वाची बैठक

: भाजप प्रदेश कार्यकारिणीची गुरुवारी पुण्यात बैठक

BJP state executive meeting in Pune | भाजप प्रदेश कार्यकारिणीची (BJP Executive committee) येत्या गुरुवारी (18 मे) पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) येथे बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक (city president Jagdish Mulik) यांनी आज पत्रकारांना दिली. BJP state executive meeting in Pune on Thursday
मुळीक म्हणाले, या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (BJP National President J P Nadda) मार्गदर्शन करणार आहेत. त्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrashekhar Bawankule) यांचे मार्गदर्शन होणार आहे. बैठकीनंतर सर्व आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या स्वतंत्र बैठका होणार आहेत.
मुळीक म्हणाले, या बैठकीसाठी राज्यातून बाराशे प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. बैठकीत विविध संघटनात्मक आणि राजकीय ठराव संमत करण्यात येणार आहेत. (BJP Pune)
मुळीक पुढे म्हणाले, या बैठकीच्या निमित्ताने पुणे शहर भाजपच्या वतीने विविध व्यवस्थांचे नियोजन आणि वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयारीसाठी विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत.
 कर्नाटक निवडणुकीतील दारुण पराभवानंतर, भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत आहे.  पुण्यात नुकतीच विधानसभेची पोटनिवडणूक  झाली होती. यात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भाजपची ही बैठक विशेषत: आगामी एका वर्षात अपेक्षित असलेल्या स्थानिक आणि लोकसभा निवडणुकांमुळे, हे महत्त्वाचे ठरत आहे.
 विशेष म्हणजे भाजपचे प्रमुख जेपी नड्डा आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत गुरुवारी कार्यकारिणीला संबोधित करणार आहेत.  ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून मुंबई आणि पुण्यात पक्षाच्या बैठका घेणार आहेत.
 एकहाती निवडणूक जिंकणाऱ्या भाजपने कर्नाटकातील सत्ता गमावली आहे.  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक भाजप नेत्यांनी शेजारच्या राज्यात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला.  आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकातील मराठी भाषिक भागात प्रचार केला.
 लोकसभेच्या निवडणुका अवघ्या वर्षभरावर असताना, महापालिका  निवडणुका केव्हाही होऊ शकतात.  राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर भाजप-शिवसेना सरकार धाडस दाखवत असले, तरी विरोधी महाविकास आघाडीकडून त्यावर निशाणा साधला जात आहे.
 कसब्याचा बालेकिल्ला भाजपने  गमावल्याने पुण्यातील भाजप कार्यकारिणीची बैठकही महत्त्वाची आहे.  पक्षाने हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला होता आणि वरिष्ठ नेत्यांनी आपल्या उमेदवाराचा प्रचार केला पण 30 वर्षांनंतर त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.  पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवाकडे देशाचे लक्ष लागले होते.
 भाजप खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेच्या जागेवरही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.  सार्वत्रिक निवडणुका अवघ्या वर्षभरावर आल्याने भाजपला जागा गमावणे परवडणारे नाही.  राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत.
 दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांनी कर्नाटक निवडणुकीचे निकाल आणि त्याचा महाराष्ट्र भाजपवर होणारा परिणाम याला कमी लेखले होते.  भाजप-सेना युती राज्यात सत्ता कायम ठेवेल, असे ते म्हणाले.  पुणे हा भाजपचा बालेकिल्ला असून लोकांचा पक्षावर विश्वास राहील, असेही ते म्हणाले होते.
—-
News Title | BJP state executive meeting in Pune Important meeting of BJP tomorrow in the wake of Pune and Karnataka defeat: BJP state executive meeting in Pune on Thursday

Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे भाजप शहर अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक 

Categories
Breaking News Political पुणे

Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुणे भाजप शहर अध्यक्षांचे तोंड भरून कौतुक

Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी फडणवीस यांनी भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे तोंड भरून कौतुक केले. फडणवीसांनी केलेल्या या कौतुकाने अजून काही वर्ष तरी अध्यक्ष मुळीकच राहणार हे स्पष्ट होत आहे. (Devendra Fadnavis in Pune)
भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस यांनी मुळीक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.
फडणवीस म्हणाले, जगदीश हा खूप शांत स्वभावाचा माणूस आहे. त्याला फक्त काम करणे एवढेच माहित आहे. शांत असला तरी लोकांशी प्रेमाने बोलणे, लोकांशी चांगले संबंध ठेवणे, हे जगदीशला चांगले जमते. फडणवीस पुढे म्हणाले, जगदीश माझ्याकडे कधीही वैयक्तिक कामासाठी येत नाही. तो येतो तो लोकांच्याच कामासाठी. लोकांशी चांगला संपर्क असलेला नेता हा जगदीश आहे.
मागील काही दिवसापूर्वी शहरात भाजप शहर अध्यक्ष यांच्या बदलण्याच्या वावड्या उठल्या होत्या. काही काळाने त्या शांत देखील झाल्या. मात्र आता फडणवीस यांच्या कौतुकाच्या वर्षावाने पुढील काही वर्ष तरी मुळीकच अध्यक्ष राहणार, हे स्पष्ट होत आहे.
—–
News Title | Devendra Fadnavis in Pune | Jagdish Mulik Devendra Fadnavis praises Pune BJP city president

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ 

Categories
Breaking News Political पुणे

BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in pune | भाजपाच्या घर चलो संपर्क अभियानाचा पुण्यात शुभारंभ

| कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन मोदीजींचे विकासकार्य जनतेपर्यंत पोहचवावे

| उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आवाहन

 

BJPs Ghar Ghar Chalo Samprak Abhiyan in pune | Devendra Fadnvis In pune |देशाचे लोकप्रिय पंतप्रधान  नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात गत नऊ वर्षांचा कार्यकाळ हा विकासपर्वचा काळ राहिला आहे. त्यामुळे  मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी केले. तसेच कर्नाटकच्या विजयावर आनंद व्यक्त करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोलाही यावेळी विरोधकांना लगावला. (BJPs Ghar Ghar Chalo Sampark abhiyan in pune)

भारतीय जनता पक्षाच्या ‘घर चलो’ या संपर्क अभियानाचा शुभारंभ आणि भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP pune city president Jagdish Mulik) यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार फडणवीस बोलत होते. (Devendra Fadnavis in Pune)

यावेळी व्यासपीठावर आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे,राहुल कुल, सिद्धर्थ शिरोळे,भीमराव तापकीर, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, मेधा कुलकर्णी, बापू पठारे, प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी,राजेश पांडे, चिटणीस वर्षा डहाळे यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामदार देवेंद्रजी फडणवीस म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारताने सर्वाधिक गतीने विकास केला. कोरोना काळानंतर अनेक देश मंदीच्या सावटाखाली आहेत. पण आपला देश विकासाच्या वाटेवर आजही मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे विकसित देश देखील आपल्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहात आहे. आज माननीय मोदीजींचे नेतृत्व जगमान्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील माननीय मोदीजींशी बोलण्यासाठी आतूर असतात. त्यामुळे मोदीजींच्या नेतृत्वातील विकासपर्वचे काम कार्यकर्त्यांनी सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले की, आज कर्नाटक निवडणुकीतील विजयावर विरोधक आनंदोत्सव साजरा करत आहेत. बेगामी शादी में अब्दुल दिवाना अशी स्थिती आहे. आज विरोधकांनी कितीही आनंदोत्सव साजरा केला तरी आगामी लोकसभा निवडणुकीत २८ पैकी २५ जागांवर भारतीय जनता पक्ष नक्कीच विजय होईल. वास्तविक, विरोधकांनी आत्मचिंतन केले पाहिजे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अर्धा टक्का ही मतं मिळू शकली नाहीत. असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांचे मूल्यमापन नेहमीच होत असते. कोरोना काळात भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात रस्त्यावर उतरून काम करत होता. त्यामुळे जगदीश मुळीक यांनी असेच आपले कार्य सातत्याने सुरू ठेवावे अशी सूचना केली. तसेच घर चलो संपर्क अभियानाद्वारे कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी ओबीसी आघाडीचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केले.‌तर स्वागत गणेश घोष यांनी केले.

News Title |BJPs Ghar Ghar Chalo Sampark Abhiyan in Pune BJP’s Ghar Chalo Sampark campaign launched in Pune

BJP Mahila Aghadi | स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान

Categories
Breaking News Political social पुणे

स्व. सुषमा स्वराज अवॉर्डने ‘ती’चा सन्मान

पुणे: आपल्या कुटुंबापासून ते देश सांभाळण्याची अविरत शक्तीचे उदाहरण असलेल्या स्त्री शक्तीला सलाम करत समाजातील उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा भाजप महिला आघाडीच्या वतीने पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री अनुरागजी ठाकूर व भाजप सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे, शहराध्यक्ष जगदीशजी मुळीक हे प्रमुख उपस्थित होते.

भाजपा महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चनाताई तुषार पाटील यांच्या नेतृत्वात आयोजित या कार्यक्रमात अनुरागजी ठाकूर यांनी महिलांच्या कामाचे कौतुक केले व त्यांच्या हस्ते अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर महिलांचा सन्मान यावेळी संपन्न झाला. सांस्कृतिक आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी यावेळी प्रमुख उपस्थित राहून महिलांना प्रोत्साहित केले. यावेळी नव्या निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पुण्याच्या प्रभारी अलका शिंदे, अपर्णा गोसावी, सर्व मंडलाध्यक्षा विनया बहुलीकर, हर्षदा फरांदे, स्वाती कुरणीक, ममताताई दांगट, अश्विनी पांडे या उपस्थित होत्या. सर्व कार्यकारिणी, पदाधिकारी व सहकारी उपस्थित होत्या.
भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयात हा सोहळा संपन्न झाला.

Kasba By election | Mahayuti | कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसब्यात महायुतीचे शक्ती प्रदर्शन

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

आज सकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, शिवसंग्रामचे अध्यक्ष भारत लगड, शहर भाजप प्रभारी धीरज घाटे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्षा स्वरदा बापट, डॉ. सिद्धार्थ धेंडे, अजय भोसले, किरण साळी, बाळासाहेब जानराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

सकाळी ग्रामदैवत कसबा गणपतीची महाआरती करून पदयात्रेला सुरुवात झाली. पदयात्रेत महायुतीचे हजारो कार्यकर्ते, गणपती मंडळ, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करण्यात आली. त्यापुर्वी रासने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. रासने यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नेहा कितवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.
———-
विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ! | हेमंत रासने यांचा विश्वास

गेल्या वीस वर्षांत कसबा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली विविध विकासकामे, सेवा कार्याच्या माध्यमातून प्रस्थापित केलेला जनसंपर्क, महायुतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम संघटनात्मक फळी, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पाठींबा आणि कसब्यातील मतदारांचा दृढ विश्वास या बळावर विक्रमी मताधिक्याने ही निवडणूक जिंकू असा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

रासने म्हणाले, मी भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. गेल्या तीस वर्षांपासून मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आजपर्यंत पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. त्यामुळे पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पतित पावन संघटना आणि गणेश मंडळाच्या पूर्ण ताकदीसह ही निवडणूक मोठ्या मताधिक्क्याने जिंकू.

Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर,
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आ. माधुरीताई मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

ते म्हणाले की, कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे.

मुळीक पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा उपाध्यक्ष संजय नाना काकडे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, आज मोदींचे नेतृत्व जनसानसात आज रुजलेलं आहे.‌याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

By-election |  कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

Categories
Breaking News Political पुणे

 कसबा पोट निवडणूक भाजपा जिंकणारच | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बैठकीत भाजपा पदाधिकाऱ्यांचा निर्धार

पुणे | मुक्ताताई टिळक (Mukta Tilak)  यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदार संघाची पोटनिवडणूक (kasba byelection) भारतीय जनता पक्ष (BJP) जिंकणारच असा निर्धार आज भाजपा पुणे शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच ही निवडणूक माननीय खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक (city president Jagdish Mulik)यांच्या नेतृत्वात लढली जाईल, असेही यावेळी निश्चित करण्यात आले.

विधानसभा कसबा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसंदर्भात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant patil) यांच्या कोथरुड निवासस्थानी भाजपा सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला भाजपा शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, कुणाल टिळक, भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना काकडे, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपा माजी पुणे शहर अध्यक्ष योगेश गोगावले यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नामदार पाटील म्हणाले की, कसबा विधानसभा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ राहिला आहे. या मतदारसंघातील सर्व मतदार नेहमीच भाजपावर मनापासून प्रेम करतात. मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे एकप्रकारे कोरं पाकीट असतात. पक्ष नेतृत्व जे काम सांगेल ते कार्यकर्ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करतात.‌ त्यामुळे विधानसभेच्या कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराचे नाव पक्षाच्या पार्लिमेंटरी बोर्डकडून ठरविण्यात येईल. पण त्यापूर्वीच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मिळणारे मताधिक्य वाढविण्यावर सर्व कार्यकर्त्यांचा भर आहे. तसेच, माननीय खासदार गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होईल.

बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना नामदार पाटील म्हणाले की, मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ नये; असा सुतोवाच केला आहे. त्यामुळे गाफिल न राहता ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

Ajit Pawar Vs BJP | अजित पवार यांच्या विरोधात पुणे भाजपचे आंदोलन | पवार यांनी माफी मागण्याची मागणी

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

चुकीच्या वक्तव्यासाठी अजित पवार यांनी माफी मागावी

| भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी

वंदनीय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल (Chhaptrapati Sambhaji Maharaj) चुकीचे वक्तव्य करणाऱ्या विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City president Jagdish Mulik) यांनी केली.

मुळीक यांच्या नेतृत्त्वाखाली आज शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने आज खंडोजीबाबा चौकात तीव्र निदर्शने केली. या वेळी ते बोलत होते.

मुळीक म्हणाले, ‘संभाजी महाराजांचे कर्तृत्व थोर आहे. त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे विरोधी पक्षनेत्यांना शोभत नाही. शंभू राजांचा अपमान हा शिवछत्रपती घराण्याच्या कर्तृत्वाचा, माता जिजाऊंच्या संस्कारांचा आणि समस्त हिंदुजनांच्याअस्मितेचा अपमान असून, तो कदापि सहन केला जाणार नाही. अजित पवारांनी संपूर्ण देशाची माफी मागावी.’

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, संदिप लोणकर, प्रतिक देसरडा, दिपक पवार, राजू परदेशी, सुनील शर्मा, यांच्यासह नगरसेवक, शहर पदाधिकारी आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.