Pune BJP : Jagdish Mulik : निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज

Categories
Breaking News PMC Political पुणे

निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज

: शहर अध्यक्ष जगदीश मुळीक

निवडणुका कधीही झाल्या तरी भाजप निवडणुकीसाठी सज्ज आहे. पुणे महापालिकेत भाजपचे शंभरहून अधिक नगरसेवक निवडून येतील असा विश्वास शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महापालिकेच्या माध्यमांतून केलेली विकासकामे, पक्षाने कोरोना काळात केलेले सेवा कार्य, बूथ स्तरापर्यंतची भक्कम संघटनात्मक यंत्रणा आणि पुणेकरांचा विश्वास या जोरावर भाजपची महापालिकेत पुन्हा सत्ता येईल, असा विश्वास वाटतो.

मुळीक पुढे म्हणाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारला ट्रिपल टेस्ट पूर्ण करून हे आरक्षण पुन्हा लागू करणे शक्य होते. परंतु गेल्या दोन वर्षांत एंपिरिकल डेटा गोळा करून तिहेरी चाचणी पूर्ण करता आली असती. न्यायालयात ओबीसींची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी अपयशी ठरली. महाविकास आघाडी सरकारच्या राजकीय उदासिनतेमुळे ओबीसींना राजकीय आरक्षण गमवावे लागले आहे. हा या समाजावर मोठा अन्याय झाला आहे.

Pune NCP : Prashant Jagtap : राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार 

Categories
Breaking News PMC Political पुणे

राष्ट्रवादी ओ.बी.सी ना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार

:  रष्ट्र्वादी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

पुणे : कोर्टाने जरी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे जाहीर केले असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुणे शहरात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तिकीट वाटपात ओ.बी.सी बंधु भगिनींना सर्वसाधारण कोट्यातून त्यांच्या वाट्याची तिकिटे देणार आहेत. ओ.बी.सी बांधवांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ न देण्याची काळजी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी घेईल. असे आश्वासन पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

: पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज

जगताप म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्य निवडणूक आयोगास ओ.बी.सी आरक्षणाशिवाय दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सर्वप्रथम सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो. अर्थात अशा प्रकारचा निर्णय होणे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला अपेक्षित नव्हते. महाराष्ट्रातील ओ.बी.सी बांधवांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आग्रही भूमिका होती, आहे आणि यापुढेही राहील. ओ.बी सी बांधवांना निवडणुकीतील राजकीय आरक्षण मिळावे यासाठी आमची सुरू असणारी लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे. परंतु कोर्टाच्या निर्णयाचा मान राखत असताना निवडणुका कधी घ्यायच्या याबाबतचे सर्व अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने तत्काळ निवडणुका जाहीर केल्या, तर पुणे शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज आहे. असे ही जगताप म्हणाले.

 

Ward Structure : PMC Election : प्रभाग रचनेसाठी स्वायत्त यंत्रणा असावी

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचनेसाठी स्वायत्त यंत्रणा असावी

पुणे : महापालिकेने प्रभाग रचना करताना एक विशिष्ट पक्ष डोळ्यासमोर ठेवून ११ प्रभाग ५५ हजार लोकसंख्येचे, तर बाकीचे ६८ हजार ते लोकसंख्येचे केले होते़ त्यामुळे पुन्हा महापालिकेकडे प्रभाग रचना करण्यासाठी न देता, प्रभाग रचना करायला देण्यासाठी स्वायत्त अशा यंत्रणेच्या मार्फत करावी, अशी मागणी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

महापालिका प्रशासन विशिष्ट व्यक्ती व पक्ष यांच्या दबावाखाली आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकाच ही प्रभाग रचना करणार असेल तर मागची रचना ते करतील परिणामी शासनाने संचालक नगर रचना यांच्याकडे हे काम सोपवावे, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

: जुनी प्रभाग रचनाच कायम राहील ही शक्यता

राज्य शासनाने आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले असले तरी, पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही नव्याने रचना करण्यात येणार नसल्याचे सूतोवाच केले आहेत. परिणामी महापालिकेने निवडणूक आयोगाला सादर केलेली प्रभाग रचनाच कायम राहील ही शक्यता अधिक आहे.

राज्य शासनाने महापालिका निवडणुकांचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतल्यावर मंगळवारी प्रथमच ही निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले़ परंतु, अद्यापही सर्वोच्च न्यायालयात या अधिकाराविषयी, तसेच ओबीसी आरक्षणाबाबत अंतिम सुनावणी बाकी आहे. ही सुनावणी येत्या २१ एप्रिलला होणार असून, त्यानंतरच निवडणूक प्रक्रियेचे चित्र स्पष्ट होणार आहे़ त्यामुळे सध्या तरी पालिका स्तरावर राज्य शासनाचे पत्र आले तरी वेट ॲड वॉच अशीच भूमिका घेण्यात आली आहे.

Last Day Of PMC : Administrator : नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस! : उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

Categories
Breaking News PMC Political पुणे

नगरसेवक, सत्ताधाऱ्यांचा आज शेवटचा दिवस!

: उद्यापासून महापालिकेवर प्रशासक 

पुणे – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal कॉर्पोरेशन) सभागृहाचा आज अखेरचा दिवस असणार आहे. सर्व पक्षीय नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा हा शेवटचा दिवस आहे. निवडणुका होईपर्यंत मंगळवारपासून महापालिकेत प्रशासक (Administrator) सुरू होणार आहे. दरम्यान, आज शेवटच्या दिवशी महापालिकेची निरोपाची ऑनलाइन सभा (Online Meeting) होणार आहे. त्यामुळे या शेवटच्या सभेत एकमेकांवर कुरघोड्या, पाच वर्षांच्या कारभाराचा मागोवा घेतानाच सत्ताधारी व विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने याकडे लक्ष लागले आहे.

कोरोना आणि ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. पुणे महापालिकेसाठी तीन सदस्यांच्या प्रभाग निश्चित केला आहे. या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होऊन त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या. त्याची सुनावणी होऊन प्रारूप आराखड्यात आवश्‍यक असलेल्या बदलांचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. त्यामुळे अंतिम आराखडा जाहीर करून आरक्षणाची सोडत जाहीर करण्याची प्रक्रिया अद्याप शिल्लक आहे. त्यातच राज्य सराकरने विधिमंडळात नवीन कायदा पारित करून निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे या निवडणुका किमान सहा महिने पुढे जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

: स्थायी समितीच्या बैठकीत काय होणार?

 दुपारी सव्वाबारा वाजता स्थायी समितीची अंदाजपत्रकाची बैठक आहे. यामध्ये भाजपकडून उपसूचना मांडून त्यांना आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात हवे ते बदल करून घेतले जाण्याची शक्यता आहे. मात्र, आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकात बदल करता येत नाहीत. त्यासाठी मुख्यसभेची मान्यता घ्यावी लागते, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकीत वाद होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजता आॅनलाइन मुख्यसभा होणार आहे. या मुख्यसभेत महत्त्वाचे विषय नाहीत. पण या सभेत गेल्या पाच वर्षांचा मागोवा घेणारी भाषणे व भावनिक भाषणे होण्याची शक्यता आहे. सुविधा काढून घेणारमंगळवारपासून आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून महापालिकेचा कारभार सांभाळणार आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यालय, गाड्या व इतर सुविधा काढून घेतल्या जातील. त्याबाबतही प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी मांडलेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. याचवेळी भाजपकडून स्थायी समिती बरखास्त होऊ शकत नाही, त्यामुळे अध्यक्ष हेमंत रासने हेच पुढील वर्षाचे अंदाजपत्रक मांडणार असे सांगत आहेत. त्यास विरोधीपक्षांनी विरोध केला आहे.  बैठकीत अंदाजपत्रकावर उपसूचना देऊन त्यात बदल करायचे प्रस्ताव भाजपकडून केले जाऊ शकणार आहेत. तर प्रशासनाने राज्य सरकारकडे भाजपच्या दाव्याबाबत खुलासा मागितलेला असून, त्यावर उत्तर न मिळाल्यास प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.

: भाजप पुन्हा नको; शिवसेना करणार आंदोलन

दरम्यान शहर शिवसेना आज दुपारी महापालिकेत आंदोलन करणार आहे. भाजप पुन्हा नको रे बाबा, अशा पद्धतीच्या घोषणा शिवसेनेने तयार केल्या आहेत. तसेच   पुणे महापालिकेत मागील पाच वर्षात केलेला भ्रष्टाचार पथनाट्याच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. तसेच पालिकेतील भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात येणार आहे.

Report of Ward Structure : PMC election : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाला  सादर  : सरकारच्या भूमिकेकडे लक्ष 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल निवडणूक आयोगाला  सादर

: सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभागरचनेवरील ( Ward Structure)  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल महापालिकेने निवडणूक आयोगाकडे (State election commission) सादर केला आहे. अहवाल ५  मार्चऐवजी ८ मार्च रोजी सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सरकारने नुकतेच नवीन बिल आणल्यामुळे या प्रभाग रचेनेचे काय होणार याबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. याची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यातील प्रभाग रचनेवर आक्षेप असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय पण संपूर्ण शहराच्या हरकतींचा अद्याप विचार झालेला नाही. त्याचा अहवाल २ मार्चपर्यंत आयोगाला सादर करणे आवश्‍यक होते. पण हे काम अपूर्ण असल्याने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाकडून ५ मार्च पर्यंतची मुदत वाढवून दिली होती. मात्र ५ ला देखील हा अहवाल सादर होऊ शकला नाही. अहवाल ५  मार्चऐवजी ८ मार्च रोजी सादर करण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने हा अहवाल सादर केला आहे. दरम्यान सरकारने नुकतेच नवीन बिल आणल्यामुळे या प्रभाग रचेनेचे काय होणार याबाबत आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सर्वस्वी निर्णय हा राज्य सरकारच्या हाती आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Hearing Report of Ward Structure : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास पुन्हा  मुदतवाढ 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास पुन्हा  मुदतवाढ

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभागरचनेवरील ( Ward Structure)  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने (State election commission) पुन्हा तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. याचा अहवाल ५  मार्चऐवजी ८ मार्च रोजी आयोगाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. मूळ मुदत २ मार्च पर्यंत होती. ती वाढवून ५ मार्च केली होती. मात्र पुन्हा एकदा ही मुदत वाढवून देण्यात आली आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. याची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यातील प्रभाग रचनेवर आक्षेप असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय पण संपूर्ण शहराच्या हरकतींचा अद्याप विचार झालेला नाही. त्याचा अहवाल २ मार्चपर्यंत आयोगाला सादर करणे आवश्‍यक होते. पण हे काम अपूर्ण असल्याने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाकडून ५ मार्च पर्यंतची मुदत वाढवून दिली होती. मात्र ५ ला देखील हा अहवाल सादर होऊ शकला नाही. आता ८ मार्च ला हा अहवाल सादर केला जाणार आहे. अशी माहिती महापालिका निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

Hearing Report : PMC Election : महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास मुदतवाढ 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका प्रभाग रचना : हरकती सूचनांवरील अहवाल सादर करण्यास प्रशासनास मुदतवाढ 

पुणे: पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) प्रारूप प्रभागरचनेवरील ( Ward Structure)  सुनावणी पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने (State election commission)  तीन दिवसांची मुदतवाढ दिली आहे. याचा अहवाल २ मार्चऐवजी पाच मार्च रोजी आयोगाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. याची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. २४ व २५ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतल्यानंतर आता त्याचा अहवाल बनविण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पूर्व पुणे आणि पश्चिम पुण्यातील प्रभाग रचनेवर आक्षेप असल्याने त्यात बदल होण्याची शक्यता आहे. शिवाय पण संपूर्ण शहराच्या हरकतींचा अद्याप विचार झालेला नाही. त्याचा अहवाल २ मार्चपर्यंत आयोगाला सादर करणे आवश्‍यक होते. पण हे काम अपूर्ण असल्याने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार आयोगाकडून ५ मार्च पर्यंतची मुदत वाढवून दिली आहे

BJP Pune : Rajesh Pande : PMC election : राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख : भाजपकडून खुलासा 

Categories
Breaking News Political पुणे

राजेश पांडे हे ‘निवडणूक संचालन समिती’ चे प्रमुख

: भाजपकडून खुलासा

पुणे : गेले दोन दिवस पुणे शहरातील विविध प्रसिद्धी माध्यमांमध्ये पुणे शहर भाजपच्या निवडणूक संचालन समिती प्रमुख पदाच्या नियुक्ती बाबत वृत्त प्रसारित झाले आहे. यापैकी काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बाबत  भाजपने खुलासा केला आहे.

त्यानुसार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पुणे शहर भाजपचे संघटन सरचिटणीसराजेश पांडे यांना पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती पत्र दिले आहे.  राजेश पांडे हे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी ‘निवडणूक संचालन समिती’चे प्रमुख म्हणून काम पाहातील.

भाजपने नुकतीच घोषणा केली होती कि शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका निवडणुका लढल्या जातील. त्या अगोदर भाजपने घोषणा केली होती कि महापालिका निवडणुकीची सूत्रे राजेश पांडे यांच्याकडे राहतील. यामुळे भाजप मधेच संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे आता भाजपला हा खुलासा करावा लागला आहे.

Hearing : Objections : Ward Structure : प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

Categories
Breaking News PMC पुणे

प्रभाग रचना : हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस सुनावणी

: बालगंधर्व रंगमंदिरात पूर्ण होणार प्रक्रिया 

पुणे- महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता ही सुनावणी दि. 24 आणि 25 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पहिल्यांदा एकच दिवस सुनावणीसाठी देण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सुनावणीसाठी सर्व हरकतदारांना नोटीस देऊन ठिकाण आणि वेळ कळविण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

प्रभाग रचनेवर सुमारे 3 हजार 596 हरकती आल्या आहेत. सुनावणींसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती.

 

तर 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती घेण्याची मुदत होती. तर, यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल महापालिकेस 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर करायचा आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

हरकतींचे स्वरूप एकाच प्रकारचे असल्यास एकत्र गटाने सुनावणी घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार प्रभागनिहाय एक प्रकारच्या हरकतींचे गट तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, मनपा प्रशासनाने सुनावणीसाठी यापूर्वी एकच दिवस निश्‍चित केला होता. मात्र, हरकतींची संख्या जास्त असल्याने आता दोन दिवस ही सुनावणी होणार आहे.

Congress : PMC Election : परिवर्तन रॅलीद्वारे काँग्रेस फुंकणार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग!

Categories
Breaking News PMC Political पुणे

परिवर्तन रॅलीद्वारे काँग्रेस फुंकणार महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणशिंग!

 

     पुणे : महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने(Pune congress) जय्यत तयारी सुरू केली आहे. डिजीटल सभासद नोंदणीच्या अभियानामार्फत पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना भेटून काँग्रेस पक्षाचे सभासद करीत आहेत. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिकेमध्ये(PMC) परिवर्तन करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘परिवर्तन रॅली’’ आयोजित करण्यात आली आहे.

उद्या ५ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले यांचा पुणे दौरा आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. गेली ५ वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या ५ वर्षात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पुणेकरांची अपेक्षा भंग केली. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत पुणे महानगरपालिकेमध्ये परिवर्तन करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे विद्यापीठ चौक ते काँग्रेस भवन पर्यंत ‘‘परिवर्तन रॅली’’ आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व आघाडी संघटना व विभागाचे प्रमुख व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. त्यानंतर काँग्रेस भवनच्या पटांगणामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नानाभाऊ पटोले हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्‍यास काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, आजी-माजी आमदार, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

     या मेळाव्‍यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रोत्साहन व उर्जा मिळणार आहे. या मेळाव्‍याच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या निवडणीचे रणशिंगे फुंकणार आहे. असे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी  पत्रकाद्वारे सांगीतले आहे.