PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या | पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Suspension | कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याआधी त्यांना प्राथमिक सुविधा द्या

| पीएमसी एम्प्लॉईज युनियन ची आयुक्तांकडे मागणी

PMC Employees Suspension | महापालिका कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करतांना प्रशासनाने काळजी पुर्वक दक्षता घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक महिन्याला आमचे सेवक निलंबीत करत राहिला तर PMC मध्ये कर्मचाऱ्याना  काम करणे अडचणीचे होईल. निलंबन हा पर्याय नसुन तेथील सिस्टीम सुधारली गेली पाहिजे. त्यामुळे निलंबन करण्याआधी प्रशासनाने प्राथमिक सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. अशी मागणी पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर (PMC Employees Union) यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

महापालिका प्रशासनाने नुकतेच काही खात्यातील कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. या कर्मचाऱ्यांचे निलंबन माघारी घेण्यात आले आहे. याबद्दल अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे, कुणाल खेमणार  खेमणार, उपआयुक्त सचिन इथापे, खातेप्रमुख माधव जगताप यांनी केलेल्या सहकार्य बद्दल त्यांचे आभार संघटनेच्या वतीने मानण्यात आले आहेत. याबाबत पोखरकर यांनी सांगितले कि, परंतु इथून पुढे सेवकांवर अशा प्रकारे निलंबनाची कार्यवाही करतांना प्रशासनाने काळजी पुर्वक दक्षता घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे जर प्रत्येक महिन्याला आमचे सेवक निलंबीत करत राहिला तर pmc मध्ये कर्मचारी याना काम करणे अडचणीचे होईल. निलंबन हा पर्याय नसुन तेथील सिस्टीम सुधारली गेली पाहिजे. आज शिक्षण मंडळ असेल किंवा इतर कोणतेही खाते असेल व्यवस्थित इंटरनेट उपलब्ध होत नाही , कॉम्पुटर चा तुटवडा , टेंशनरी मिळत नाही , सॉप्टवेअर चांगल्या दर्जाची नाहीत , पेपर रिम उपलब्ध नाहीत, सेवकांना बसायला जागा नाही. या गोष्टीकडे प्रामुख्याने आयुक्त यांनी लक्ष दिल पाहिजे. सेवकांना  चांगल्या सुविधा दिल्या तर खात्री शीर सांगतो या पुढे pmc मध्ये एकही सेवक निलंबित होणार नाही. प्रशासनाने प्राथमिक सुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे आहे. असे ही पोखरकर म्हणाले.

PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Officers Retirement | मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी, मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी महापालिका सेवेतून सेवानिवृत्त 

 
 
PMC Officers Retirement | पुणे महापालिकेत  (Pune Municipal Corporation) तीन दशक काम करणारे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (PMC Chief Engineer V G Kulkarni) , मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (PMC Chief Labour Officer Arun Khilari) हे महापालिका सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. महापालिकेत नम्रता पूर्वक काम कसे करावे, याचा आदर्श या दोघांनी घालून दिला आहे. त्यांच्या कामाची नोंद महापालिकेच्या इतिहासात नेहमी घेतली जाईल. (PMC Pune) 
व्हि. जी. कुलकर्णी हे 1994 मध्ये महापालिकेच्या सेवेत दाखल झाले. महापालिकेच्या 30 वर्षांच्या सेवेत त्यांनी पाणी पुरवठा विभागात सर्वाधिक काळ अर्थात जवळपास 26 वर्षे काम पाहिले आहे. या कालावधीत खडकवासला ते पर्वती आणि पर्वती ते लष्कर जलकेंद्र बंद पाईप योजना, भामा आसखेड पाणी पुरवठा योजना, चोवीस तास पाणी पुरवठा योजनांसह वारजे, वडगाव पाणी पुरवठा केंद्र तसेच काही एसटीपी प्लांटच्या निर्मिती मध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. मागील चार वर्षांपासून त्यांच्याकडे पथ विभागाचा कार्यभार होता. शिपाई ते वरिष्ठ अधिकारी अशा सर्वांमध्ये ते एक नम्र अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.  (Pune PMC News)
 
अरुण खिलारी यांनी कामगार अधिकारी म्हणून खूप काळ काम पाहिले. त्यांच्याकडे या कामासोबतच क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. 10 वर्षाहून अधिक काळ त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात क्षेत्रीय अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे मुख्य कामगार अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. खिलारी हे महापालिकेत 1987 साली रेडिओग्राफर म्हणून रुजू झाले. त्यानंतर त्यांनी food inspector म्हणून 5 वर्ष काम पाहिले. कामगार कल्याण विभागात ते 2003 साली रुजू झाले. 2 वर्ष त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात देखील काम पाहिले. प्रत्येक काम तंतोतंत आणि चोख करण्यावर त्यांचा भर होता.

PMC Encroachment Department | खराडी, विमाननगर परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई | अतिक्रमण विभागाची माहिती

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Department | खराडी, विमाननगर परिसरात जोरदार अतिक्रमण कारवाई

| अतिक्रमण विभागाची माहिती

PMC Encroachment Department | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) येरवडा-कळस – धानोरी क्षेत्रिय कार्यालय (Yerwada-kalas-Dhanori Ward Office) हद्दीमधील सार्वजनिक रस्ते पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर काल जोरदार कारवाई करण्यात आली. तसेच फ्रंट मार्जिन, अनधिकृत फ्लेक्स वर देखील कारवाई करण्यात आली. अशी माहिती अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap) यांनी दिली. (PMC Pune)

जगताप यांच्या माहितीनुसार  सादलबाबा चौक ते खराडी बायपास, विमाननगर परिसरातील रस्तारुंदीत येणारी अतिक्रमणे तसेच रस्ता / पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायीकांवर तसेच पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला
प्रमाणपत्रामधील अटी / शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे इत्यादी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. तसेच फ्रंट मार्जिन कारवाई, बोर्ड बॅनर कारवाई, सिमेंट ओटे, कारवाई करण्यात आली. (PMC Encroachment Action)
कारवाईसाठी २ क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, ५ अतिक्रमण निरिक्षक, २४ सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, ६ जेसीबी, ६ गॅस कटर, १२ ट्रक व १०० बिगारी सेवक, २० पोलीस कर्मचारी, ३२ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस बंदोबस्त उपलब्ध असल्यामुळे कारवाई सुरळीतपणे पार पडली.
अतिक्रमण विभागामार्फत  विकास ढाकणे
मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) श्री. माधव जगताप, (उप आयुक्त, अतिक्रमण / अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग) श्रीमती किशोरी शिंदे (उप आयुक्त, परिमंडळ क्र. १) यांचे नियंत्रणाखाली व यांचे उपस्थितीमध्ये श्री. बनकर (महा. सहा. आयुक्त), श्री. पवार (विद्युत विभाग ), श्री. वाडेकर (पथ विभाग) व श्री. कुंभार संजय व श्री. नारायण साबळे (क्षेत्रिय अतिक्रमण निरिक्षक) यांनी ही कारवाई केली.
–  कारवाई करण्यात आलेला तपशील खालीलप्रमाणे

स्टॉल – ६
हातगाडी – ५
पथारी/काउंटर – १५
शेड/झोपड्या – ५०
बोर्ड/बॅनर – १२५
फ्रंट मार्जिन – ३०००० स्क्वे. फुट

Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune News | गावठाण भागातील  इमारतीसाठी १८ मी.खोलीची अट शिथिल करा

| हेमंत रासने यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

 

Pune News पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील दाट वस्ती आणि गावठाण भागातील बांधकामाच्या सामायिक अंतरामध्ये (पुढील सामायिक अंतर वगळून) सवलत देऊन हार्डशिप आकारणी करावी अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन केली. (PMC Pune News)

 

रासने यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, UDCPR नियमावलीमध्ये दाट लोकवस्ती भागातील मिळकतीसाठी 6.1.1 नियमावली आहे,सदर गावठा ण भागातील अनेक मिळकतीचे पुनर्विकसन अत्यंत आवश्यक आहे.तेथे भाडेकरूंचेही पुनर्वसानासोबत मिळकत धारकांचेही प्रश्न गंभीर आहेत.हा भाग नागरी सुविधांपासून वंचित आहेच तसेच अनेक ठिकाणी वास्तू धोकादायकही झालेल्या आहेत.५ जानेवारी २०१७ रोजीच्या वि.नि.नियमावली व विकास आराखड्यान्वये या भागात अनुज्ञेय FSI हि कमी झाला होता.प्रस्तावित रस्ता रुंदीही बऱ्याच ठिकाणी रद्द झाली आहे.

गावठाण भागामध्ये विकसनाचे काम करणेस अनेक अडचणींचा सामना करावा लागतो याची आपणास कल्पना आहेत. आजपावेतो,इमारतींना कोणतेही साईड मार्जिन न सोडता नकाशांना मंजुरी मिळत होती. परंतु वरील विनिमयान्वे १५ मि.उंचीच्या वरील इमारत असेल तर त्या इमारतीसाठी १ मी.साईड मार्जिनचे बंधन आहे.अनेक ठिकाणी इमारतींचे नकाशे कोणतेही साईड मार्जिन न सोडता मंजूर झाले आहे. In situ – FSI / TDR घेणेच्या वेळेस सदर १ मीटर साईड मार्जिनची अडचण झाली आहे.
या नियमांमध्ये बदल करणे संदर्भात शासनाकडे पत्र व्यवहार केला होता.त्यास अनुसरून म.न.पा.ने हि  २४/०९/२०२१ रोजी अभिप्राय दिलेला होता, ज्या अन्वये वरील १ मीटर साईड मार्जिनची आवश्यकता नसल्याचे कळविले होते. १५/०५/२०२३ रोजी शासनस्तरावरून एक आदेश या बाबत प्रसृत झाला आहे.त्यानुसार UDCPR 2.4 अन्वये स्पष्ट निदर्शक अडचण ( Demonstrable Hard Ship ) उदभवत असल्यास अशा ठिकाणी शिथिलता देण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत असे स्पष्ट केलेले आहे.
आपलेकडून या सर्व बाबींचा विचार करून वरील संदर्भीय परिपत्रक पारित केले आहे. परंतू हि सवलत पुरेशी होत नाही, कारण या परिपत्रकान्वये सदरची सवलत फक्त १८ मी. खोलीपर्यंतच्या म्हणजेच ६० फुट खोली असणाऱ्या मिळकतीनांच लागू होते.

गावठाणामध्ये १०० फुट ते १५० फुट खोलींच्या जास्तीत जास्त ईमारती,वाडे आहेत. प्रचलित वि.नि. नियमावलीनुसार १५ मी.उंची वरील ईमारतींना Fire Act नुसार Provisional ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.तसेच भोगवटापत्रा पूर्वी सदर अग्निशमन विभागाकडून अंतिम ना हरकत दाखला घेणेचे बंधन आहे, ज्या योगे ईमारतींमध्ये कायद्यानुसार आवश्यक आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली जाते. या बाबींचा विचार करून वरील  परिपत्रकातील १८ मी.खोलीची अट शिथिल करावी व नवीन परिपत्रक पारित करावे.

PMC Labour Welfare Department | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा  सन्मान 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Labour Welfare Department | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा  सन्मान

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे (PMC Labour Welfare Fund) सन्मान करण्यात अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी यांनी दिली. (PMC Labour Welfare Department)

विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ चिटणीस यांनी 10 वी 12 वी नंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार आणि बुद्धिमते नुसार योग्य शिक्षण पद्धतीची निवड करणे, जीवनाची पंचसुत्रे, करियर साठी असणारे नवनवीन मार्ग, प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या संधी आणि शाखाबाबत डॉ गौतम बापट यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यानुसार कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी 24 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने याची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे.  यात पात्र ठरलेल्या 127 पाल्यांचा सन्मान केला करण्यात आला. यामध्ये 10 विच्या 96 आणि 12 विच्या 31 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बक्षीस म्हणून या विद्यार्थ्यांना दप्तर आणि पेन ड्राइव्ह दिला गेला. (Pune Municipal Corporation)

PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 भरून देण्याची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवा | माजी नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 भरून देण्याची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवा

| माजी नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मागणी

PT 3 form | Pune Property tax | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कर आकारणी विभागाचे फॉर्म PT-3 (PMC Property tax Department PT 3 Form) भरून देण्याची मुदत 15 नोव्हेंबर रोजी संपत आहे. ही मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवण्याची मागणी माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, प्रशांत बधे, सुहास कुलकर्णी आणि नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. (PMC Property tax Department)
माजी नगरसेवकांच्या निवेदनानुसार आम्ही पहिल्यापासून ही भूमिका घेतली होती कि महानगरपालिकेकडे सर्वच्या सर्व करदात्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांच्या कडून फॉर्म भरून निष्कारण वेळेचा अपव्यय करू नका. तरी देखील कर आकारणी प्रशासनाने हा अनावश्यक फॉर्म भरून घेण्याचा अट्टाहास आणि आग्रह धरला. आता सणासुदीचे दिवस आहेत 15 नोव्हेंबर हा ऐन दिवाळीचा दिवस आहे. आमची आपणास विनंती आहे की या सगळ्या प्रकरणाची मुदत 20 डिसेंबर पर्यंत वाढवावी.

दरम्यान  पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत दि.०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके (PMC property Tax bill) पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे. (PMC property Tax)

वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना दि. ०१.०४.२०१८ पासून दि. ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज (PT 3application form) संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन (pmc pune property Tax department) खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता  दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (Pune property tax)

PMC Illégal Construction Action | कोंढवा, लोहगांव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 33 हजार चौरस फुटांहून अधिक क्षेत्र हटवले

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Illégal Construction Action | कोंढवा, लोहगांव परिसरात अनधिकृत बांधकामावर कारवाई | 33 हजार चौरस फुटांहून  अधिक क्षेत्र हटवले 

PMC Illegal Construction Action | पुणे महानगरपालिका झोन क्र.२ मधील कोंढवा बु. स.नं.१८, २४, ५८, ५९  आणि झोन क्र.४ मधील लोहेगाव(जुनी हद्द) विमाननगर स.नं.१९९, २०९/१ येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत येऊनएकूण सुमारे ३३३९२ चौ.फुट क्षेत्र मोकळे  करणेत आले. (Pune Municipal Corporation) 

कोंढवा बु. स.नं. १८, २४, ५८, ५९ येथे महाराष्ट्र रिजनल अॅण्डटाऊन प्लॅनिंग Act १९६६ चे कलम ५३ (१) (ए) अन्वये व लोहेगाव(जुनी हद्द)विमाननगर स.नं.१९९,२०९/१ येथे महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३(१) व ५४ सह महाराष्ट्र महापालिका अधिनियम १९४९ चे कलम ४७८ व कलम २६७(१) अन्वये नोटीस देऊन विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.

सदरच्या कारवाईमध्ये कोंढवा बु. स.नं.१८ येथील चाॅइस फर्निचर यांचे ०० चौ. फुट, क्लासिक इलेक्ट्रनिक्स यांचे ४०० चौ. फुट, स.नं. २४मधील इसाक पानसरे यांचे २१६० चौ. फुट स.नं. ५८ मधील रणजीत काळे व रमेश काळे यांचे ४५०० चौ. फुट चौ. फुट, स.नं.५९ मधील हुसेन शेख यांचे ४०००चौ. फुट असे एकूण ११६६० क्षेत्र मोकळे करणेत आले.

लोहेगाव(जुनी हद्द) विमाननगर स.नं.१९९,२०९/१ येथील CCD चौक विमाननगर, दत्तमंदिर चौक विमाननगर, CCD चौक ते दत्तमंदिर चौक, CCD चौक श्रद्धा टेरेस, दत्तमंदिर चौक ते कैलास सुपर मार्केट, दत्तमंदिर चौक ते देवकर चौक इत्यादी विमाननगरच्या विविध भागातील अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात आली असून एकूण २१७३२  चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले

सदरची कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, जेसीबी,  ब्रेकर, गॅस कटर इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली.

Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Lord Shri Rama Statue | हडपसरमध्ये साकारणार 9 फूट उंचीचा प्रभू श्रीरामाचा पूर्णाकृती पुतळा

Lord Shri Rama Statue |  पुणे : हडपसर (Hadapsar) परिसरातील हांडेवाडी येथे प्रभू श्रीराम यांचा 9 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला महापालिकेच्या मुख्य सभेने (PMC General Body) मंजुरी दिल्यानंतर तो अभिप्रायासाठी राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्यानंतर महापालिकेने या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली आहे. दरम्यान ही मूर्ती आणि त्याचा चौथरा बनवण्याचे काम महापालिकेचे ठेकेदार विश्वास मणेरे (Vishwas Manere) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)
हांडेवाडी येथील श्रीराम चौकामध्ये रामाचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेचे तत्कालीन नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांनी महापालिकेला २०१८ मध्ये दिला होता. या खर्चाला महापालिकेने मान्यता द्यावी, असे या प्रस्तावात भानगिरे यांनी नमूद केले होते. महंमदवाडी- कौसरबागमधील हांडेवाडी येथे हा पुतळा उभारण्याचे नियोजित होते. या प्रस्तावाला स्थायी समितीने आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेने मान्यता दिली होती. मात्र, सार्वजनिक ठिकाणी पुतळा उभारावयाचा झाल्यास त्यासाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेकडून हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पाठविण्यात आला होता.

प्रमोद नाना भानगिरे यांचा पाठपुरावा

प्रमोद नाना भानगिरे हे शिवसेना शहरप्रमुख असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. या प्रस्तावाला नगरविकास विभागाकडून मान्यता मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे नगरविकास विभाग, गृह विभाग आणि पोलीस महासंचालक कार्यालयाकडूनही या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्याबाबत महापालिकेला कळविण्यात आल्यानंतर महापालिकेनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

| विश्वास मणेरे यांनी बनवली मूर्ती

दरम्यान ही मूर्ती आणि चौकाचे सुशोभीकरण करण्याचे काम ठेकेदार विश्वास मणेरे यांनी केले आहे. ही मूर्ती 9 फूट उंच असून यासाठी फायबर मटेरियल एस एस चे स्टील वापरण्यात आले आहे. मूर्तीच्या पाटाची साईज 5 फूट *3 फूट आहे. तर मूर्तीचे वजन अंदाजे 650 कि. असणार आहे. अशी माहिती विश्वास मणेरे यांनी दिली.

Kojagiri Purnima 2023 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Kojagiri Purnima 2023 | PMC Garden Department | कोजागिरी पौर्णिमे निमित्त महापालिकेची उद्याने रात्री 12 पर्यंत उघडी राहणार

 

|  मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांची माहिती

Kojagiri Purnima 2023 | PMC Garden Department | “कोजागिरी पौर्णिमा” (Kojagiri Purnima 2023) निमित्त पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीमधील उद्यानांच्या (PMC Garden) वेळेत वाढ करण्यात आली आहे. कोजागिरी पौर्णिमा” निमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० वा. उघडी ठेवण्यात येणार आहेत. पुणे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. असे आवाहन महापालिकेचे मुख्य उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे (Ashok Ghorpade) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation)

घोरपडे यांच्या माहितीनुसार महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६६ (१०) अन्वये, सार्वजनिक उद्याने, बागा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची तरतूद करणे, नागरिकांच्या मनोरंजनासाठी उद्याने /बागा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी क्षेत्रामध्ये एकूण १५ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीअंतर्गत उद्यान विभागामार्फत एकूण २११ उद्याने, मत्सालय व प्राणी संग्रहालय विकसित करण्यात आलेली आहे. सदर उद्यानांचे विकसन, सुशोभिकरण, देखभाल, देखरेख व दुरुस्ती विषयक कामे उद्यान विभागामार्फत करण्यात येतात. सदर उद्यानांमध्ये नागरिक /लहान मुले परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणवर भेट देत असतात. (PMC Pune)
२८ ऑक्टोबर रोजी “कोजागिरी पौर्णिमा” असून, पुणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उद्यानांमध्ये भेट देत असतात. सबब, पुणे शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे कि, सालाबादप्रमाणे “कोजागिरी पौर्णिमा” निमित्त पुणे महानगरपालिका हद्दीमधील उद्याने सकाळी ६.०० ते ११.०० व सायंकाळी ४.३० ते रात्री १२.०० वा. उघडी ठेवण्यात येणार आहे. पुणे शहरातील नागरिकांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

Categories
Breaking News Education PMC पुणे

PMC Employees and Officers | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या 127 पाल्यांचा सोमवारी केला जाणार सन्मान

PMC Employees and Officers | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अधिकारी / सेवकांच्या पाल्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता दहावी व बारावी) परीक्षांमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे. अशा उत्तीर्ण सर्व पाल्यांचे महापालिकेच्या कामगार कल्याण निधीतर्फे सन्मान केला जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट देण्यात आला होता.  त्यानुसार येत्या सोमवारी 127 पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी यांनी दिली. (PMC Employees and Officers)

माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता १० वी, १२ वी) परीक्षांमध्ये ६५% गुणांपेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या सर्व पाल्यांचा कामगार कल्याण निधीमार्फत गुणगौरव व सत्कार समारंभ प्रस्तावित आहे. कामगार कल्याण निधीच्या ज्या सभासद सेवकांच्या पाल्यांनी ६५% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत, अशा पाल्यांचा सन्मान केला जातो. यात पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून सामग्री दिली जाते. दरम्यान यासाठी अर्ज करण्यासाठी 24 ऑगस्ट ची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाने याची सगळी प्रक्रिया पूर्ण केली आहे.
यात पात्र ठरलेल्या 127?पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे. यामध्ये 10 विच्या 96 आणि 12 विच्या 31 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बक्षीस म्हणून या विद्यार्थ्यांना दप्तर आणि पेन ड्राइव्ह दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करियर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमआयटीचे कुलगुरू डॉ आर एम चिटणीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे होणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून शालेय उपयोगी सामग्री दिली जाते. तसेच त्यांच्यासाठी तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान ठेवले जाते. या व्याख्यानाचा लाभ सन्मानास पात्र ठरलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी घ्यावा. शिवाय ज्यां कर्मचाऱ्यांची  मुलं आता 10 आणि 12 वी ला आहेत त्यांनी देखील व्याख्यानाचा लाभ घेण्यासठी यावे.
अरुण खिलारी, मुख्य कामगार अधिकारी.
—-