PMC Central Store Department | गेल्या 6 महिन्यापासून अत्यावश्यक पेपर खरेदीच्या प्रस्तावाला मान्यताच मिळेना | महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस रखडली खरेदी!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Central Store Department | गेल्या 6 महिन्यापासून अत्यावश्यक पेपर खरेदीच्या प्रस्तावाला मान्यताच मिळेना |  महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके दिवस रखडली खरेदी!

PMC Central Store Department | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) सर्वच खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना पेपरची (Paper Purchase) आवश्यकता असते. प्रत्येक खात्याची ती मूलभूत गरज आहे. मध्यवर्ती भांडार विभाग (PMC Central Store Department) याची खरेदी करते. त्यासाठी चालू अर्थसंकल्पात (PMC Budget) 2 कोटींची तरतूद देखील केली आहे. मात्र महापालिकेत आर्थिक वर्ष सुरु झाल्यापासून भांडार विभागाकडून पेपर ची खरेदीच झाली नाही. कारण याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्तांकडून अजून मंजूरीच मिळालेली नाही. पुणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पेपर ची खरेदी इतके दिवस रखडली आहे. यावरून महापालिकेत उलट सुलट चर्चाना उधाण आले आहे. (PMC Central Store Department)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) ही राज्यातीत दुसऱ्या क्रमांकाची महानगरपालिका असुन तिचे बजेट अंदाजे १० हजार कोटी जवळपास आहे. महानगरपालिकेत विविध खाती, क्षेत्रिय कार्यालये, असुन त्यांना दैनंदिन कामकाजा साठी मोठया प्रमाणावर साहित्य, वस्तु, मालाची  आवश्यकता असते. त्याची एकत्रितरित्या खरेदी करण्यासाठी  मध्यवर्ती भांडार विभागाची निर्मिती केली आहे. या विभागाकडुन खात्याच्या मागणी व आवश्यकतेनुसार वस्तु, साहित्य, माल खरेदी करून त्याचा पुरवठा  केला जातो. अशा खरेदीचे स्वतंत्र अधिकार इतर खात्याना नाहीत. असे असताना दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक असणारे पेपरची खरेदी गेली काही महिन्यांपासुन भांडार विभागाकडून केली गेलेली नाही. (Pune Municipal Corporation)

खरेदी वेळेत न झाल्याने विविध  खात्यांना आणि क्षेत्रिय  कार्यालयांना पेपरचा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी मागणी केलेल्या खात्यांना भांडार विभागाकडून ना हरकत पत्र देऊन कोटेशन मागवुन तुमची तुम्ही खरेदी करा, असे सांगितले जात आहे.
याबाबत अधिक माहिती घेतली असता पेपरची खरेदी करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात 2 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. दरवर्षी भांडार विभागाकडून एकत्रितरित्या टेंडर मागवून खरेदी केली जाते. बल्क मध्ये खरेदी केल्याने उत्पादक कंपनी कडुन कमी दरात खरेदी होते. यात मनपाचा आर्थिक फायदा होतो. असे असतानाही आता प्रत्येक खात्याला अधिकार दिले जात आहेत. दोन लाखांपर्यंतची खरेदी करण्यास अधिकार दिले आहेत. मात्र यात खात्याला सगळी प्रक्रिया करावी लागते. यात दर जास्त देखील येऊ शकतात. त्यामुळे महापालिकेचेच नुकसान होत आहे. पेपरसारख्या दैनंदिन अत्यावश्यक साहित्याची महिनो महिने खरेदी करू न शकणाऱ्या पुणे महानगरपालिकेसाठी ही शरमेची बाब आहे.
याबाबत मध्यवर्ती भांडार विभागाकडून खुलासा करण्यात आला कि अर्थसंकल्प मान्य झाल्यावर लगेच पेपर खरेदीचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. अतिरिक्त आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव आयुक्त यांच्याकडे गेला होता. मात्र आयुक्तांनी अजून याला मंजूरी दिली नाही. नुकतेच हे प्रकरण आयुक्तांनी आमच्याकडे माघारी पाठवले आहे. यावर चर्चा करा असे आदेश दिले आहेत. त्यानुसार खात्याकडून नवीन प्रस्ताव ठेवला जाणार आहे.
मात्र अत्यावश्यक कामाची खरेदी करण्यास देखील इतका उशीर होत असेल तर यात कुणाचे हितसंबंध गुंतले आहेत, याची चौकशी आयुक्त स्तरावरून होणे आवश्यक आहे.
——

Housing Society & Quality city Expo | तुम्हांला ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय | तर मग पुणे महापालिकेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्या

Categories
Breaking News PMC social पुणे

Housing Society & Quality city Expo | तुम्हांला ओला कचरा जिरवणाऱ्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घ्यायचंय | तर मग पुणे महापालिकेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या प्रदर्शनाला भेट द्या

Housing Society & Quality city Expo |  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) , नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (National Society for clean city) व पुणे जिल्हा गृहनिर्माण महासंघ (Pune District Gruhnirman Mahasangh) यांचे संयुक्त विद्यमाने “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली.

२७ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट पुणे या ठिकाणी “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टार्टअप कंपन्यांनी उपकरणे व उत्पादने समावेश आहे. त्याद्वारे नागरिकांना विविध तंत्रज्ञानाबाबत एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध होणार असून शहर दर्शनी साफ़ दिसण्यात मदत होईल. शुध्द हवा, शुद्ध पाणी, कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच या ठिकाणी ओला कचरा जिरवीणाऱ्या विविध तंत्रज्ञान प्रदात्यांचे प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येणार आहे.
गुणवत्ता पूर्ण शहर निर्माण (क्वालिटी सिटी मिशन) करणे हा केंद्र सरकारच्या अभियानाचा एक महतवपूर्ण भाग असून यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुढाकार आणि नागरिकांचा कृतीशील, सातत्यपूर्ण सहभाग महत्वपूर्ण ठरणार आहे. ही संकल्पना पुणेकर नागरिकांसमोर ठेवण्यासाठी सहकार विभाग (महाराष्ट्र
शासन), पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटस महासंघ मर्यादित, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (NSCC) आणि विविध समविचारी, सहयोगी संस्था “Housing Society & Quality city Expo” चे आयोजन करीत आहेत.
“Housing Society & Quality city Expo” ला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून संबोधित करणार आहे. २७/१०/२०२३ रोजी “Housing Society & Quality city Expo” चे उद्घाटन व
मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. दि. २८/१०/२०२३ रोजी पर्यावरण पुरक वाँड सोसायटी व दर्शनी शहर सफाइत नागरिकांचा सहभाग याविषयी विशेष सत्र सादर होणार आहे. यामध्ये नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सीटीस यांच्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षानिमित्त त्यांचे ५० वर्ष कामामागील (१९७३ ते २०२३) मनोगत सादरीकरण, श्रीमती. पुर्वा केसकर यांचे विचार, पुणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग व शुद्ध हवा व इतर योजनांची माहिती, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या योजना, कर आकारणी व कर संकलन, पुणे
विभागाचे सादरीकरण मा. डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शन व मा.नीलमताई गोऱ्हे उप सभापती, विधान परिषद, महाराष्ट्र यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे.
“Housing Society & smart Quality city Expo” चा लाभ जास्तीतजास्त गृहनिर्माण संस्था, शासकीय – शैक्षणिक संस्था व खाजगी संस्था व पुणेकर नागरिक यांनी घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC CHS Card | CHS योजनेतील नवीन बदल जाणून घ्या! | काय आहे नवीन परिपत्रकात?

PMC CHS Card | पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत (PMC Health Department) अंशदायी वैद्यकीय साहाय्य योजना (CHS) कार्यान्वित आहे. या  अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांचे वैयक्तिक स्वखार्चाची वैद्यकीय परतावा बिले सादर केल्यानंतर वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. दरम्यान आता एका CHS कार्डवर (CHS Card) आई-वडील किंवा सासू-सासरे यांनाच लाभ घेता येणार आहे. एकाचवेळी चौघांना लाभ न देण्याचा निर्णय CHS कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान याबाबत प्रशासनाकडून दोन परिपत्रके काढण्यात आली आहेत. नवीन परिपत्रकात महिला कर्मचारी तसेच महिला आजी माजी सभासद, महिला सेविका यांच्याबाबत नियम करण्यात आला आहे.  (PMC Pune Health Department)

पूर्वीच्या परिपत्रकात काय होते?

 पुणे मनपा सेवक, सेवा निवृत्त सेवक/सेविका, शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल  सेवक/सेविका विभागाकडील सेवक/सेविका, सेवा निवृत्त सेवक/सेविका, मा. आजी सभासद, व मा. माजी सभासद यांना
त्यांच्या फक्त आई-वडिलांची नांवे अथवा फुक्त सासू-सासरे यांची नावे नियमानुसार समाविष्ठ करता येतील.
ज्या वर्षी आई-वडील किंवा सासू सासरे यांचे नांव समाविष्ठ असेल त्या आर्थिक वर्षासाठी आई-वडील किंवा सासू सासरे यांचीच नांवे समाविष्ठ राहतील. आई-वडील अथवा सासू सासरे यापैकी जी नांवे कार्डवर समाविष्ठ करावयाची असतील, ती नांवे तसे स्वयंघोषणापत्र भरुन दिल्यानंतर त्या पुढील आर्थिक वर्षातच समाविष्ठ करता येतील. परंतू एकदा निश्चीत केलेली नावे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कार्डमध्ये नियमानुसार समाविष्ठ केल्यास त्यामध्ये चालू आर्थिक वर्षात बदल करता येणार नाही. (Pune Municipal Corporation)

नवीन परिपत्रकात काय आहे?

पुणे महानगरपालिकेच्या सेविका, सेवा निवृत्त सेविका शिक्षण मंडळ व पीएमपीएमएल विभागाकडील सेविका, सेवा निवृत्त सेविका, मा. आजी नगरसेविका व मा. माजी नगरसेविका यांना मुलभूतरीत्या फक्त त्यांच्या आई-वडिलांची नांवे नियमानुसार अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या कार्डमध्ये समाविष्ठ करता येतील. तसेच सासू-सासरे यांची नावे जर समाविष्ट करावयची असतील तर त्याआर्थिक वर्षात आई-वडिलांची नावे योजनेच्या कार्डमध्ये टाकणार नाही या आशयाचे स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. एका आर्थिक वर्षात आई-वडील किंवा सासू-सासरे अश्या एकाच जोडीचे नाव योजना कार्डमध्ये टाकता येईल. (PMC Pune News)
—-

PMC puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

PMC puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या किनारी रंगला दांडिया 

| पुणे महानगरपालिका आयोजित पुणेरी नवरात्री फेस्ट हा विशेष कार्यक्रम 

PMC Puneri Navratri Fest | मुळा मुठा नदीच्या (Mula Mutha River) किनारी सोमवार दि. २३ ऑक्टोबर २०२३रोजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुणेरी नवरात्री फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. पुणे शहर व परिसरातील हजारो नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्वांनी मुळा-मुठा नदीकिनारी मनसोक्त दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळील सॅम्पल स्ट्रेचवर हा कार्यक्रम झाला. (Pune Municipal Corporation) 

 

पुणे महानगरपालिकेने मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत येरवडा ब्रिज ते संगमवाडी ब्रिज दरम्यान गणपती विसर्जन घाटाजवळ ३०० मीटरचा सॅम्पल स्ट्रेच तयार करण्यात आला आहे. हा सॅम्पल स्ट्रेच नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. जास्तीतजास्त नागरिकांना हा सॅम्पल स्ट्रेच पाहता यावायासाठी महानगरपालिका सॅम्पल स्ट्रेचवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. ८ सप्टेंबर २०२३ रोजी सॅम्पल स्ट्रेचवर महाविद्यालयीन तरुणांसाठी पुणेरी हॅपी यूथ फेस्ट’ उपक्रमाचे आयोजन महानगरपालिकेने केले होते. महाविद्यालयीन तरुणांचा चांगला प्रतिसाद त्या उपक्रमाला मिळाला होता. तरसोमवारी महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुणेरी नवरात्री फेस्टचे आयोजन सॅम्पल स्ट्रेचवर केले होते. (PMC Pune) 

मुळा मुठा नदी किनारी नवरात्री फेस्ट हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यामागे महानगरपालिकेची एक संकल्पना होती. मुळा-मुठा नदीचा किनारा रात्रीच्या वेळीही किती सुंदर दिसू शकतोमहानगरपालिका यासाठी कसे प्रयत्न करीत आहेतहे नागरिकांना समजावेयासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागरिक व नदी यांच्यातील नाते  दृढ होण्यास मदत झाल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली. पुणे महानगरपालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त (ज) रवींद्र बिनवडे, मा. अतिरिक्त आयुक्त (ई) डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह महानगरपालिकेच्या विविध विभागाचे अधिकारीकर्मचारी यांनीही या उपक्रमात सहभागी होतनागरिकांना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची माहिती दिली. (Pune Corporation News) 

पुणे महानगरपालिकेने यावेळी दांडिया खेळण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सेल्फी कॉर्नर३६० डिग्री फोटो बूथ तसेच विविध गेमचेही आयोजन केले होते. या सर्वांना चांगला प्रतिसाद नागरिकांनी दिला. नागरिकांना ऑन दी स्पॉट फोटो प्रिंट दिली जात होती. तसेच महानगरपालिकेच्या वतीने कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना अल्पोपहार सुद्धा देण्यात आला. अनेकांनी महानगरपालिकेच्या या उपक्रमांचे कौतुक केले.

पुणेरी नवरात्री फेस्ट या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीच्या कॅडेटची लक्षणीय उपस्थिती होती. जवळपास ६०० एनसीसी छात्र या उपक्रमात सहभागी झाले होते. एनसीसी ग्रुप कॅप्टन अभिजीत खेडकर यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावत एनसीसी छात्रांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे अनेकांनी कौतुक करीत असा नदी किनारा प्रत्येक शहरांमध्ये होणे गरजेचे असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन 

Categories
Breaking News cultural PMC पुणे

Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन

Punit Balan Group | Oxyrich | ऑक्सिरिच कंपनीच्या पुनीत बालन (Oxyrich punit Balan) यांना दहिहंडी उत्सवाचे दरम्यानचे कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरणेबाबतचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिले होते. तसेच याबाबत बालन यांच्याकडून खुलासा देखील मागवण्यात आला होता. बालन यांनी आपला खुलासा माधव जगताप यांना सादर केला आहे. त्यात बालन यांनी म्हटले आहे कि, जगताप यांनी दिलेली सदर नोटीस चुकीची व बेकायदेशीर असून सदर नोटीस मंडळाना देण्याऐवजी जाणूनबुजून व वैयक्तिक आकसापोटी माझी बदनामी करिता माझ्या नावे नोटीस दिली आहे. दरम्यान बालन यांच्या खुलाश्यावर महापालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. (PMC Sky Sign Department)

 पुनीत बालन यांचा सविस्तर खुलासा खालीलप्रमाणे :

सार्वजनिक उत्सव सादर करणे आणि त्यास निःशुल्क मान्यता देण्यासंदर्भात  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली १४/०९/२०२३ रोजी बैठक घेवून निर्णय घेतला आहे असे  वृत्तपत्रात आले आहे. तसेच तुमचे पत्र जावक क्रमांक ई/५७४६ दिनांक ०४/०१/२०२३ सदर मा.उप सचिव, महाराष्ट्र शासन, गृह विभाग, मंत्रालय मुख्य इमारत, मुंबई यांजकडे सादर केलेले पत्र. सदर पत्रामध्ये तुम्ही नमूद केले आहे की पुणे शहरातील गणेशउत्सव कालावधीत रस्ता, पदपथावर उभारण्यात येणाऱ्या मान्य मापाच्या उत्सव मंडप/ स्टेज करिता पूर्वीपासूनच कोणतेही परवाना शुल्क आकारण्यात येत नव्हते. तसेच सन २०१९ पूर्वी स्थानिक पोलीस विभागाकडून मान्यता दिलेल्या स्वागत कमानी व रनिंग मंडप यांना आकारण्यात येत असलेले परवाना शुल्क देखील पुणे महानगरपालिका आकाशचिन्ह परवाना व विभाग मुख्य सभा ठराव क्रमांक ५६४ दिनांक ०९/०९/२०१९ अन्वये रद्द करण्यास मान्यता दिलेली असून त्याबाबत सन २०१९ पासून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

पुणे शहरात सन २०१९ गणेशउत्सव कालावधीत मोहरम / दहीहंडी आणि गणेशउत्सव मंडळाना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने देण्यात आलेल्या नि: शुल्क परवानगी ही पुढील ५ वर्षा करिता म्हणजेच सन २०२२ पासून सन २०२७ सालापर्यंत गृहीतधरणे बाबत पुणे महानगरपालिका, पुणे कडून सार्वजनिक गणेशउत्सव २०२२ करिता सर्व गणेश मंडळे, पोलीस अधिकारी व मनपा अधिकारी यांची ०८/०८/२०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकत्रित निर्णय घेण्यात आलेला होता.
वरील सर्व गोष्टींचा विचार करता तुम्ही पाठवलेली नोटीस ही माझे व्यक्तिमत्व बदनाम करण्यासाठी जाणूनबुजून मला पाठवली आहे. तसेच तुम्ही घेतलेला निर्णय चुकीचा व आयोग्य असून त्यानुसार आपण क्रमांक एल-१०४३ ०३/१०/२०२३ ची आमच्या कार्यालयात ०४/१०/२०२३ रोजी देण्यात
आलेली नोटीस रद्द करण्यात यावी तसेच सदर नोटीस केल्या बाबत प्रसारमाध्यमांना देखील कळवावेसबब, ज्याअर्थी या शासनानेच निर्बंधमुक्त” उत्सवाची घोषना केलेली आहे. त्याअर्थी आपणा दंड / विद्रुपीकरण शुल्क इत्यादिची मागणी आमच्याकडे करणे बेकायदेशीर व चुकीचे आहे. तसेच अश्या वसुली मिळकतकरातून करण्याबाबत उल्लेख देखील बेकायदेशीर आहे याचीही नोंद घ्यावी.

PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Water Meter | अवास्तव पाणीवापर लपवण्यासाठी आयुक्त बंगला, महापौर बंगल्यावरच  पाणी मीटर्स बसवले नाहीत

| विवेक वेलणकर यांचा आरोप

 

PMC Water Meter | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) सध्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Equal water supply scheme) घरोघरी मीटर बसवत आहे. मात्र अजूनही महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी मीटर बसवले नसल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो. याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velnkar) यांनी केला आहे. तसेच मीटर बसवण्याची मागणी केली आहे. (PMC Pune Water Supply Department)

 

विवेक वेलणकर यांच्या निवेदनानुसार  पुणेकर पाण्याचा अति वापर करतात हा आरोप सातत्याने केला जातो. या पार्श्वभूमीवर ही पाणी मीटर ची योजना राबवली जात आहे. बसवलेल्या मीटर्स पैकी ज्या नागरीकांचा पाणीवापर दरडोई दर दिवशी १५० लिटर पेक्षा जास्त होत आहे. त्यांना कायदेशीर कारवाई च्या धमक्या देणाऱ्या  नोटीसा ही गेल्या वर्षी पाठवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती अधिकार दिनात समान पाणीपुरवठा कार्यालय प्रमुखांकडे महापौर बंगला, महापालिका आयुक्त निवास, अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या सर्व ठिकाणी दरडोई दर दिवशी किती पाणीवापर होतो याच्या माहितीसाठी गेलो असता त्यांनी महापालिकेच्या कोणत्याही प्राॅपर्टी मधे अजून पाणी मीटर्स बसवले नसल्याचे मला सांगितले होते.  लवकरच या ठिकाणी आम्ही पाणी मीटर बसवू असे सांगितले. मात्र परवा माहिती अधिकार दिनात परत एकदा याची माहिती मिळवण्यासाठी गेलो असता अजूनही महापौर बंगला , महापालिका आयुक्त निवास , अतिरिक्त आयुक्तांची निवासस्थाने, कलेक्टर बंगला या ठिकाणी मीटर बसवले नसल्याचे मला सांगितले गेले. या ठिकाणी अवास्तव पाणीवापर होतो याबाबत पाणीपुरवठा विभागाची बहुतेक खात्री असावी म्हणून झाकली मूठ ठेवण्याच्या उद्देशाने अद्यापही पाणी मीटर बसवले गेले नाहीत. असा आरोप वेलणकर यांनी केला आहे. (Pune Municipal Corporation)

———–

आता तरी पाणीपुरवठा विभाग पुण्यातील सर्वच सरकारी व निमसरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी पाणीमीटर बसवतील आणि त्यांचा पाणीवापर किती आहे हे दरमहा जाहीर करतील अशी अपेक्षा आहे.

विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे.

——–

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद

Pune Water cut on Thursday | पुणे | येत्या गुरुवारी  वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत एस.एन.डी.टी. HLR झोनमध्ये एस.एन.डी.टी. HLR व चतुश्रुंगी GSR तसेच तळजाई झोन अखत्यारीतील पाईपलाईन जोडणी विषयक कामे तसेच लष्कर जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी रॉ वॉटर लाईनचे दुरुस्तीचे काम करणेकरिता पाणीपुरवठा बंद राहणार आहे . शुक्रवार रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या (PMC Water Supply Department) वतीने करण्यात आले आहे. (Pune Water cut)
वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस. एन. डी. टी. HLR टाकीवर अवलंबून असणारा भाग
१) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस.एन.डी.टी. HLR टाकी परिसर –
वैदुवाडी, मॉफको परिसर, आशानगर, बहिरटवाडी, शिवाजी हौसिंग सोसा., चतुश्रुंगी मंदिर परिसर, पत्रकार नगर, एल. आय.जी., एम. आय. जी. एच. आय. जी., नीलज्योती, म्हाडा वसाहत, गोखले नगर, कुसाळकर पुतळा चौक, जनवाडी, मारुती मंदिर येथील पी.एम.सी. कॉलनी, लाल चाळ, हिरवी चाळ, भोसलेनगर, खैरेवाडी, सिंचननगर,  आय. सी. एस. कॉलनी, लॉ कॉलेज रोड, बी.एम.सी.सी रोड, गणेशवाडी, भांडारकर रस्ता व प्रभात रोड,
वडारवाडी, दिपबंगला चौक परिसर, मॉर्डन कॉलेज परिसर, घोलेरोड परिसर एफ.सी. रोड व शिरोळे रोड, मॉडेल कॉलनी हनुमाननगर, शिवाजीनगर पोलीस लाईन, रेव्हेन्यु कॉलनी, विश्रामबाग सोसा. रामोशीवाडी मंगलवाडी
सोसा., हॅपी कॉलनी गल्ली क्र. ४ नवीन शिवणे, अमर सोसायटी, कांचन गल्ली, अशोक पथ, लिमये पथ, गुलमोहर पथ, रामबाग कॉलनी काशिनाथ सोसा., मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, ओढ्याजवळ, केळेवाडी,
हनुमाननगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर, एम.आय.टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू, शिल्पा सोसा., यशश्री सोसा., सीमा १, एम. आय.टी. कॉलेजची रोड मागील बाजू, कानिफनाथ, जीवनछाया सोसा., एल.आय.सी.
कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, राजा शिवराय प्रतिष्ठांण शाळा, शिवतीर्थ नगर, न्यु. फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, साम्राज, कांचनबाग, लिलापार्क, सिल्व्हरक्रेस्ट ऑर्नेट, रमेश सोसा., शेफालिका आर्चीड मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती रोनक, शिवगोरक्ष, गोदाई, लोटसकोर्ट, ऋतुजा जानकी बळवंत, चिंतामणी सोसा., सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, वनाज कंपनी मागील भाग, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वडारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. १ ते २१, स्टेट बँक कॉलनी, वनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. १ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी बौध्दविहार पर्यंतचा संपूर्ण परिसर, अमर सोसायटी, कांचनगल्ली, प्रभाग रोड, लॉ कॉलेज रोड, हॅपी कॉलनी, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल मागील
भाग, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (राम गल्ली), आनंदनगर, मधुर कॉलनीचा भाग, आयडियल भाग, पौड रोडचा भाग, पौड रोडचा डावी बाजू महागणेश सोसा., इशदान सोसा., सर्वत्र पान (2) सोसायटी, प्रशांत, न्यु. अंजठा, प्रतिक नगर, मधुराजनगर, गुजरात कॉलनी, मयूर डी. पी. रस्त्याची डावी बाजू – शिवशक्ती सोसा ते २० ओवस सोसायटी पर्यंत इ.
२) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतुथुंगी टाकी परिसर :-
सकाळ नगर औध रोड, आयटीआय रोड, औंध गाव आणि वाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हण मळाभाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग चव्हाण नगर पोलीस लाईन अभिमान श्री सोसायटी, राजभवन,
भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, औंध उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.
३) पुणे कॅन्टोनमेंट जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील परिसर :-
खराडी गावठाण, चंदननगर, Eon आय टी पार्क, थिटे वस्ती, बोराटे वस्ती, तुकाराम नगर, यशवंतनगर, गणेश नगर, आनंद पार्क, मते नगर, माळवाडी, सोमनाथ नगर, सुनिता नगर, बॉम्बे सॅपर्स, राम टेकडी इंडस्ट्रीयल भाग,
हडपसर इंडस्ट्रीयल भाग, ससाणे नगर, मुंढवागाव, काळेपडळ, काळेबोराटे नगर, हडपसर गाव, मगरपट्टा सिटी, केशवनगर, महंमदवाडी, तुकाई टेकडी, सातवनगर, गांधळेनगर, माळवाडी, इंद्रप्रस्थ सोसायटी इ.
४) तळजाई झोन अखत्यारीतील परिसर :-
संभाजीनगर, बालाजीनगर, तळजाई वसाहत, पुण्याई नगर, काशिनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, अप्पर इंदिरानगर, महेश सोसायटी, लेक टाऊन परिसर, मनमोहन पार्क व बिबवेवाडीचा काही परिसर.

PMC Road Department | खडकी रेल्वे स्टेशन जवळ सेवावाहीन्या आता ट्रॅक खालून टाकण्याची गरज नाही | महापालिकेने साधला समन्वय

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Road Department | खडकी रेल्वे स्टेशन जवळ सेवावाहीन्या आता ट्रॅक खालून टाकण्याची गरज नाही | महापालिकेने साधला समन्वय

PMC Road Department | पुणे | खडकी रेल्वे स्टेशन (Khadki Railway Station Pune) जवळ amunition factory, defence & kirloskar factory यांना जोडणारा रेल्वे ट्रॅक पुणे – मुंबई रस्त्यास , खडकी स्टेशन व एल्फिन्स्टन रोड, बोपोडी या ठिकाणी क्रॉस होत आहे. सदर रेल्वे ट्रॅक सुमारे 100 वर्षापूर्वी टाकनेत आला होता. अलीकडे त्याची पातळी रस्त्याचे लेव्हल पेक्षा 1 ते दीड फूट खाली असल्यामुळे पावसाळ्यात पाणी साठणे, वाहने घसरणे या घटना घडत होत्या. यात महापालिकेच्या पथ विभागाने समन्वय साधून कामाचे नियोजन केले आणि भविष्यात सेवावाहीन्या ट्रॅक खालून टाकाव्या लागणार नाही. असे काम करून घेतले. अशी माहिती पथ विभागाकाडून देण्यात आली. (PMC Pune Road Department)

पथ विभागाच्या माहितीनुसार सिद्धार्थ शिरोळे  (MLA) यांनी Divisional railway manager, पुणे यांचेकडे पुणे महानरपालिकेच्या अधिकारी समवेत बैठक घेऊन चर्चा एक महिन्यापूर्वी केली होती. त्यानुसार रेल्वे ट्रॅक रस्त्याचे पातळीत घेणेचे ठरले. रेल्वे ट्रॅक खालील सेवा वाहिन्या बऱ्याच जुन्या व कमी क्षमतेच्या होत्या. सदर संधीचा फायदा घेऊन पथ विभागामार्फत पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन व केबल डक्ट रेल्वे ट्रॅक खालून टाकनेचे समन्वय साधून नियोजन केले. जेणेकरून भविष्यात रेल्वे ट्रॅक खालून सेवावहिण्या टाकणे ची गरज भासणार नाही. गेल्या शनिवारी एल्फिन्स्टन रस्त्यावरील ट्रॅक रस्त्याचे समपातळीत घेतला. या शुक्रवारी रात्री ते रविवार रात्री पुणे मुंबई रस्त्यावरील अर्ध्या ( 21मिटर) लांबीचा रस्ता क्रॉस करून वाहतुकीस उपलब्ध करीत आहोत. पुढचे शुक्रवारी ते रविवार रात्री राहिलेला अर्धा रस्ता क्रॉस करणेचे नियोजन आहे.

या कामासाठी विकास ढाकणे  ( अति.महा. आयुक्त) व विजयकुमार मगर  ( उप आयुक्त – वाहतूक) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदरचे काम पथ विभागाचे दिनकर गोजारे ( कार्य कारी अभियंता) , सुशांत कुमार ( रेल्वे अधिकारी) व मा. मासाळकर ( पोलिस निरीक्षक, वाहतूक) यांचे प्रत्यक्ष नियंत्रणाखाली करणेत येत आहे.

PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक! 

Categories
Breaking News PMC Political पुणे

PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक!

PMC Kharadi STP Plant | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने खराडी परिसरात मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (Storm Water Treatment Plant) अर्थात एसटीपी प्लांट निर्माण करण्यात आला आहे. याची आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाहणी केली. प्लांट मधून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे अजित दादांकडून कौतुक करण्यात आले. अशाच पद्धतीने सर्व प्लांट मध्ये काम व्हायला हवे, अशा सूचना पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. (PMC Pune)
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकास कामाची पाहणी केली. महापालिका प्रशासना कडून जायका प्रकल्पाचे (PMC JICA Project) काम हाती घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून शहरात 11 एसटीपी प्लांट निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील एक प्लांट खराडी परिसरात निर्माण करण्यात येणार आहे. याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पवार आले होते. हा प्रकल्प 30 MLD चा असणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्याच शेजारी महापालिकेचा 40 MLD चा शुद्धीकरण प्रकल्प आहे. याची पाहणी अजित पवार यांनी केली. शुद्धीकरण प्रकल्पातून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याची शुद्धता त्यांनी तपासली. शुद्ध पाणी नदीत सोडले जात असल्याबद्दल अजित दादांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. तसेच अशाच पद्धतीने सर्व शुद्धीकरण केंद्राचे काम व्हायला हवे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.
यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
—–

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा 2 लाख करा | दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Categories
Breaking News PMC Political social पुणे

PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची उत्पन्न मर्यादा 2 लाख करा | दिपाली धुमाळ यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

PMC Shahari Garib Yojana | पुणे | शहरातील नागरिकांना पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा (PMC Shahari Garib Yojana) लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे. तरी ती वाढवून २ लाख रुपये करावी, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ (Deepali Dhumal) महापालिका आयुक्तांकडे केली आहे. तसेच योजनेतील सवलती पूर्वीप्रमाणे ठेवाव्यात, अशीही मागणी धुमाळ यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)

धुमाळ यांच्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये शहरी गरीब सहाय्य योजनेचा लाभ अनेक नागरिक घेत आहे व अनेक नागरिकांनी घेतलेला आहे. पूर्वी या योजनेच्या अंतर्गत रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंतची सर्व दिवसांचे जे काही हॉस्पिटलचा फी किंवा बिल दिले जायचे त्याच्या निम्मे ५०% बिल माफ करण्यात यायचे. परंतु सध्या पालिकेने यामध्ये बदल केला असून रुग्ण हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर जोपर्यंत शहरी गरीब योजनेचे कार्ड ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये दाखल करतो तेव्हा पासून पुढचे बिलात सवलत दिली जाते. पूर्वी सारखे संपूर्ण दिवसाच्या बिलात सवलत दिली जात नाही. यामुळे अनेक रुग्णांना नागरिकांना आर्थिक भुर्दड बसत असून अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना सावकारी कर्ज काढण्याची वेळ येत आहे. (PMC Urban Poor Health Scheme)

धुमाळ यांनी पुढे म्हटले आहे कि, त्यामुळे या  योजनेत नव्याने बदल न करता पूर्वीप्रमाणे सवलती मिळाव्यात. तसेच या योजनेचा लाभ अनेक गोर गरीब नागरिक घेत आहेत त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट १ लाख ६० हजार आहे. तरी ती वाढवून २ लाख रुपये करण्यात यावी. असे ही धुमाळ यांनी म्हटले आहे.