Tag: pmc property tax department
PMC Property Tax Department | उपायुक्त अजित देशमुख यांची प्रॉपर्टी टॅक्स वसुलीसाठी धडक मोहीम | जागेवर जाऊन केली व्यावसायिक मिळकतींची तपासणी
पुणे महानगरपालिकेमधील कर आकारणी व कर संकलन विभाग (PMC Pune Property Tax Department) हा उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता खात्यास देण्यात आलेल्या उद्दिष्ट पूर्ततेच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेस (Pune Municipal Corporation) जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त होण्याच्या अनुषंगाने कर आकारणी व कर संकलन कार्यालयाकडून थकबाकी वसुली, सिलिंग व आकारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. (PMC Pune)
अशी केली कारवाई
त्रिमूर्ती इंजिनियरिंग, नर्हे या मिळकतीवर अंदाजे २० हजार स्क्वेअर फुटाचे आकारणी न झालेले गोडाऊनची आकारणी करण्यात आली. आंबेगाव च्या हॉटेल वेदांत येथे फ्रंट मार्जिन व रूफ टॉप येथे तपासणी दरम्यान अनधिकृत वापर सुरु असल्याने, त्याची आकारणी तीन पटीने करण्याचे आदेश देण्यात आले. हॉटेल विठ्ठल आंबेगाव बुद्रुक येथे ३० लाख थकबाकी असल्यामुळे सील करण्यात आले. सील करतेवेळी रक्कम ३० लाखांचा धनादेश प्राप्त. धायरीतील हॉटेलवर रक्कम रु. ३१ लाख ३९ हजार इतकी थकबाकी असल्यामुळे मिळकत सील करण्यात आली. धायरीतील हॉटेलवर मिळकत सीलींगची कारवाई करते वेळी रक्कम रु.२ लाखांचा पुढील तारखेचा धनादेश प्राप्त झाला. धायरीतील गोडाउनवर अंदाजे १४,००० स्क्वेअर फूट अनधिकृत पत्र्याचे गोडाऊन MSEB च्या पुरवठा दिनांकानुसार सन २०१९ पासून सुरु असल्याने अनधिकृत बांधकामाची तीन पटीने आकारणी करण्याचे आदेश देण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
Pune Property Tax | समाविष्ट गावांत मिळकतकर ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा | महापालिका अधिनियम १२९ अ (१) चा अवलंब व्हावा
| खा. सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार स्थानिक लोकप्रतिनिधींची अतिरिक्त आयक्तांसोबत बैठकीत चर्चा
Pune Property Tax | महापालिकेत (Pune Municipal Corporation) नव्याने समाविष्ट केलेल्या गावांतील (Merged Villages) नागरिकांना मिळकतकर, समावेश केलेल्या तारखेपासून दुसऱ्या वर्षीच्या ३१ मार्च पर्यंत ग्रामपंचायतीच्या दरानेच आकारावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे. याबरोबरच या भागातील औद्योगिक क्षेत्र आणि व्यावसायिक गाळे यांसाठी आकारण्यात येणाऱ्या मिळकत करांसाठी महानगरपालिका अधिनियम १२९ अ (१) चा अवलंब करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Pune Property Tax)
महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या बारामती लोकसभा मतदार संघातील (Baramati Lok sabha Constituency) वारजे, धायरी, वडगाव, खडकवासला आदी गावांतील नागरिकांची ही मागणी असून अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर याबाबत उहापोह करण्यात आला आहे. या आशयाचे पत्र खासदार सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लिहिले आहे. सुळे यांच्या सुचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक लोकप्रतिनिधी सचिन दोडके, बाबा धुमाळ, अतुल दांगट, विकास दांगट, अविनाश जोगदंड, संजय धावडे, अतुल धावडे, राहुल दांगट, चंद्रशेखर मोरे, सुरेंद्र कामठे सचिन देशमुख, चेतन दांगट, सौरभ दांगट, सागर दांगट आदींनी आज अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (Additional Commissioner Kunal Khemnar) यांच्यासोबत बैठक घेऊन विषयावर सविस्तर चर्चा केली. (PMC Pune Property Tax Department)
महापालिकेत गाव समाविष्ट झाल्यापासून त्यांनतर पुढील दर वर्षी मार्च महिन्यापासून सर्वसाधारण कर व इतर सेवा कर यांच्या एकत्रित बेरजेतून ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण करातील उर्वरित रकमेच्या २० टक्के वाढीसह कर आकारणी करण्यात आली आहे. असे न करता महाराष्ट्र महागरपालिका अधिनियम नियम १२९ अ (१) अन्वये समाविष्ट गावात, समावेश करण्याच्या तारखेपासून, त्या वर्षीनंतरच्या दुसऱ्या वर्षाच्या ३१ मार्च पर्यंत ग्रामपंचायत दरानेच कर आकारणी करण्यात यावी व त्यानंतरच्या पुढील वर्षापासून महानगरपालिकेच्या दराने कर आकारण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. (PMC Pune News)
या मुख्य मागणीच्या पुष्ट्यर्थ खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :-
* ज्या सालचे घर, त्या सालचा दर या दराने महापालिके मार्फत कर आकारणी केली गेल्याचे दिसून येत आहे. त्यास अनुसरून पूर्वीपासून महापालिकेत असणारे क्षेत्र व नव्याने समाविष्ट गावे या दोन्ही ठिकाणी आकारल्या जाणाऱ्या कराकरिता एकच निकष लावण्यात आलेला आहे. वास्तविक १९९७ साली समाविष्ट झालेली गावे व २०१७ साली समाविष्ट झालेली गावे यांत तब्बल तीस वर्षाचा फरक आहे. वार्षिक करपात्र रक्कम ठरविताना त्या ठिकाणी भाडे किती मिळते याचा विचार करून त्या ठिकाणचे दर हे नव्याने करणे आवश्यक आहे.
* समाविष्ट गावांत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र आहे. त्यासाठी उभारण्यात आलेल्या शेडचा ग्रामपंचायत मध्ये असतानाचा कर व महापालिकेत आल्यानंतरचा कर हा साधारणत: दहा पटीने वाढलेला दिसून येत आहे. तरी वार्षिक करपात्र रक्कम ठरविताना या ठिकाणी भाडे किती मिळते याचा विचार होऊन त्यानुसार कर आकारणीमध्ये बदल करण्यात यावेत.
* समाविष्ट गावांतील औद्योगिक क्षेत्राची ग्रामपंचायत नमुना नं. ८ ला नोंद दगड वीट बांधकाम अशी आहे. महानगरपालिकेकडे झोपडी, साधे बांधकाम, पत्रा शेड, लोडबेअरिंग व आरसीसी या प्रमाणे वर्गीकरण नसून, पत्रा शेडसाठी लोड बेअरिंगच्या दराने कर आकारणी केली जात आहे. त्या कर आकारणीमध्ये बदल करण्यात यावेत.
* सामाविष्ट गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी इमारती आहेत. या रहिवासी फ्लॅट व दुकानांची ग्रामपंचायत नमुना नं. ८ वर विक्रीयोग्य प्रतीनुसार क्षेत्र नमूद करण्यात आले आहे. पुणे महापालिकेचा कर हा कारपेट क्षेत्रावर आकारला जातो. विक्रीयोग्य क्षेत्रातून महापालिकेमार्फत १० टक्के क्षेत्र वजा केले जाते. परंतु महापालिकेमार्फत सामाविष्ट गावातून केल्या गेलेल्या सर्वेनुसार आलेल्या अहवालात २० ते २५ टक्के अधिक क्षेत्र वजा करावे असे सांगितले आहे. तरी या मिळकतीचे क्षेत्र कारपेट नुसार आकारण्याकरिता अजून २० ते २५ टक्के क्षेत्रफळाची कपात करण्यात यावी.
News Title | Pune Property Tax | In the included villages, income tax should be levied at the Gram Panchayat rate only Municipalities Act 129 A (1) should be adopted
PMC Property Tax | 400 हून अधिक प्रॉपर्टी सील | कारवाई अधिक तीव्र करण्याचा प्रॉपर्टी टॅक्स विभागाचा इशारा
अधिक बिगरनिवासी मिळकती विभागाकडून सील करण्यात आल्या आहेत. यापुढेही थकबाकी असलेल्या मिळकतीवर सिलिंग कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. अशी माहिती उपायुक्त अजित देशमुख (PMC Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांनी दिली. (PMC Property Tax)
पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीतील सर्व मिळकतधारकांना (Pune Property Holder) आवाहन महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे की, सन २०२३-२४ ची देयके (PMC Property Tax bill) वितरीत करण्यात आली असून ३१ जुलै २०२३ पर्यंत संपूर्ण मिळकतकर भरा व सर्वसाधारण करावर ५ किंवा १०% सवलत मिळवा. (PMC Pune News)
Pune residents have paid the entire property tax! Then win a car, phone and laptop from Pune Municipal Corporation!
The objective is to encourage timely payment
Efforts for maximum property tax recovery
PMC Appeal to property tax holders
Here are the payment options
– Such will be the rewards
PMC Pune Property Tax Bill | तुमच्या कामाची बातमी | प्रॉपर्टी टॅक्स च्या बिलांबाबत अडचणी असतील तर ही माहिती जाणून घ्या!
०१.०४.२०१९ पूर्वी मिळकतीची आकारणी झाली असल्यास :-
०१.०४.२०१९ नंतर मिळकतीची आकारणी झाली असल्यास :-
विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल व त्यांना पुढील कालावधीत फरकाचे देयक दिले जाईल. (PMC Pune Property tax News)
जी. आय. एस. सर्वे अंतर्गत ०१.०४.२०१८ पासून सवलत काढून घेतली असल्यास :-
स्वः वापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल व त्यांना पुढील कालावधीत फरकाचे देयक दिले जाईल. (PMC Pune Marathi News)
सवलत प्राप्त करणेकरिता PT-३ अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे : (PT 3 Application form)
PMC Pune Property Tax | Pune Municipal Corporation will advertise on property tax discounts and bills through FM radio
PMC Pune Property Tax | प्रॉपर्टी टॅक्स च्या सवलती आणि बिलांबाबत पुणे महापालिका FM रेडिओ वरून करणार जाहिरात
PMC Pune Property tax | पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation)) राबविण्यात येणा-या मिळकतकरासंबंधी (Property tax) विविध योजनेची माहिती तसेच मिळकतकराच्या बिलातील (Property tax bills) सवलतीची माहिती नागरिकांना होणेसाठी एफ एम रेडिओच्या माध्यमाद्वारे जाहिरात (FM Radio advertising) करण्यात येणार आहे. यासाठी 35 लाखांपर्यंत खर्च करण्यात येणार आहे. यासाठी निविदा(Tender) न मागविता कलम ५(२) (२) नुसार खात्याच्या आवश्यकतेनुसार काम करून घेण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाच्या (PMC Property tax department) प्रस्तावाला स्थायी समितीची (PMC standing committee) नुकतीच मान्यता मिळाली आहे. (PMC Pune Property tax)
प्रशासनाच्या प्रस्तावावनुसार पुणे शहरातील थकीत बाकी असणाऱ्या सर्व मिळकतकर थकबाकीधारकांना (Property holder) त्याच्या मिळकतीवरील थकबाकी व त्यावरील शास्तीची (दराची) रक्कम त्वरीत मनापाकडे जमा करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना माहिती होण्यासाठी, अभय योजना सवलत इ. नागरिकांनी मनपाकडे भरणा करण्याकरीता मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे आवश्यक आहे. रेडिओ (Radio FM) हे एक चांगले माध्यम असून, रेडिओमार्फत केलेल्या जाहिरातीस मोठ्या प्रमाणावर नागरिकांना माहिती मिळण्यास मदत होते. (Radio FM advertising)
एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लि., रेडिओ मिर्ची एफ एम ९८.३., म्युझिक ब्राडकास्ट लि. रेडिओ सिटी ९१.१, बिग एफ एम रिलायन्स ब्राडकास्ट नेटवर्क लि. रेड एफ एम ९५, साऊथ एशिया एफ एम लि. रेड एफ एम
९३.५, प्रसार भारती आल इंडिया रेडिओ, नेक्स्ट रेडिओ लि. रेडिओ वन ९४.३ या कंपन्या कार्यरत आहे. विविध रेडिओ कंपनीकडून दर प्राप्त करुन खात्याच्या आवश्यकतेनुसार व योजनेनुसार रेडिओ कंपनीकडून काम करून घेतले जाते. नागरिकांपर्यंत पोहचण्याकरीता रेडिओ हे उत्तम माध्यम असून सर्वसामान्य नागरिकापर्यत जाहिरातीद्वारे पोहचण्यासाठी वारंवार मान्यता न घेता निवेदन मान्य झालेनंतर कार्यादेशाच्या दिनाकापासून पुढील एक वर्षापर्यंत वेळोवेळी देण्यात आलेल्या कार्यादेशानुसार बिल आदा करेपर्यंत काम करुन घेण्यात येते. (PMC Pune Marathi News)