Tag: Pramod (Nana Bhangire)
Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण!
Pune News | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर (PM Narendra Modi Pune Visit) आले होते. पुणेकरांनी मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मोदींचा दौरा असल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात केला होता. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. तसेच भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. याच दरम्यान शिवाजीनगर येथे झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक (Retired Police Inspector) गंभीर जखमी (Seriously Injured) झाले. यावेळी त्याठिकाणी उपस्थितीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीमचे प्रमुख सुधीर जोशी (Sudhir Joshi) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपघातात (Pune Accident News) जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांचे प्राण वाचवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रो (Pune Metro) उद्घाटन सोहळ्यासाठी वडगाव शेरी मतदार संघातील भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे (Retired PI Vitthal Surve) आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना त्यांना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसने जोरदार धडक दिली. त्याचवेळी कार्यक्रमाला आलेले सुधीर जोशी आसनव्यवस्थेकडे जात होती. त्यांनी अपघात (Pune Accident News) पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी विठ्ठल सुर्वे यांना तातडीने वैद्यकीय उपचार (Medical Treatment) मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.
त्याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने होते. मात्र, कर्तव्यावर नियुक्त असल्याने त्यांनी मदत करण्यास असमर्थता दाखवली. यानंतर जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगाने हालचाली करत त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तज्ञ डॉक्टरंशी संपर्क करीत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. सुर्वे यांच्या मेंदूला मार बसल्याने वेळात वैद्यकीय उपचार मिळाल्याने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले.
यावेळी आशुतोष शेंडगे, ऋषिकेश गोसावी, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर यांनीही तातडीने मदत केली. विठ्ठल सुर्वे त्यांच्यावर संचेती रुग्णालयात (Sancheti Hospital) आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. शिवसेना (Shiv Sena) शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) आणि एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशनतर्फे (Eknath Shinde Social Foundation) त्यांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.
News Title | Pune News | Members of Team CM saved the life of a retired police inspector!
MLC | Pune News | विधान परिषदेवर आमदार म्हणून नाना भानगिरेंना मिळणार संधी!
| पुण्याला मिळू शकतो अजून एक आमदार
| नाना भानगिरे यांचे जोरदार प्रयत्न
Pune Girl Attack | कोयता हल्ल्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या युवकांना मुख्यमंत्र्यांच्या वतीने 15 लाखांची बक्षिसे
| पीडित तरुणीलाही मुख्यमंत्र्याच्या वतीने पाच लाखाची मदत
Aashadhi Ekadashi | Shivsena Pune | आषाढी एकादशीच्या दिवशी पुणे शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवावेत
| शहर शिवसेनेची पोलिस आयुक्तांकडे मागणी
PMC Pune new Villages | समाविष्ट 34 गावांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याचे राज्य सरकारचे आदेश
| विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश
समाविष्ट ३४ गावांना न्याय देण्यासाठी या समितीची स्थापना होणे आवश्यक आहे. त्यानुसार आम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करत होतो. त्यानुसार आमच्या मागणीला यश आले आहे. विभागीय आयुक्तांनी लवकरात लवकर समितीची स्थापना करावी.
समाविष्ट गावांमध्ये मुलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानुसार सरकारने समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. आता विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार आहे. मात्र सद्यस्थितीत आमदार यांच्याशिवाय कुणी लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे या समितीत स्थानिक आमदार यांनाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. तशी आमची मागणी आहे.
Hadapsar Devlopment Works | हडपसर आणि महंमदवाडी परिसरात विविध विकास कामांचे उदघाटन
| शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे यांचे विशेष प्रयत्न
Hadapsar Devlopment Works | पुणे शहरातील हडपसर आणि महंमदवाडी परिसरात (Hadapsar and Mohammedwadi₹ मुख्यमंत्री विशेष निधीतून (CM Special Fund) आणि शिवसेना शहर अध्यक्ष नाना भानगिरे (Shivsena City President Nana Bhangire m) आणि शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास तुपे यांच्या विशेष प्रयत्नातून कोट्यवधी रुपये निधीच्या विविध विकास कामांचे भव्य उदघाट्न आज होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) आणि शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. शहर अध्यक्ष नाना भानगिरे (Nana Bhangire) यांनी ही माहिती दिली. (Hadapsar Devlopment Works)
ही होणार कामे
1. महंमदवाडी सर्वे नं. २५ व २६ मधून सर्वे नं, ५६ पर्यत जाणारा ३०व २४ मीटर चा .डि. पी रस्ता विकसित करण्यासाठी – २६ कोटी निधी
रस्त्यासाठी – १ कोटी ८० लक्ष निधी
विकसित करण्यासाठी – १ कोटी ५० लक्ष निधी
4. महंमदवाडी तरवडेवस्ती येथील कै. दतोबा उर्फ आप्पा शंकर तरवडे पाझर तलाव येथे संत सृष्टी उभारण्यासाठी – २ कोटी निधी
5. वाडकर नळा येथील महात्मा ज्योतीराव फुले जलतरण तलाव विकसित करण्यासाठी -५० लक्ष निधी
6. महंमदवाडी व हडपसर विभागातील विविध सोसायटी मधील ड्रेनेज व रस्ते विकसित करण्यासाठी -४ कोटी निधी
महंमदवाडी व हडपसर येथील खालील ठिकाणी रस्त्याचे व ड्रेनेज कामाचे उद्घाटन
Pune News | Pramod (Nana) Bhangire) | पुणे शहरातील विविध मुख्य समस्या सोडवण्याबाबत प्रमोद भानगिरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
| महापालिका आयुक्तांना आदेश देण्याबाबत केली विनंती
मुख्यमंत्र्यांकडे या समस्या मांडल्या
4) हडपसर येथील सोलापूर हायवे वर असलेला पूल हा बांधून देखील वाहतूक कोंडी जशीच्या तशी आहे. त्यामुळे तो पूल पाडून नव्याने बांधण्यात यावा.
पर्याय शोधत आहे. त्यामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी व होणारे अपघात टाळण्यासाठी हे सर्व पूल व रस्ते रुंदीकरण लवकरात लवकर होणे खूप गरजेचे आहे.
8) उपरोक्त संबंधित ठिकाणी महापालिका आयुक्त यांनी पाहणी करण्याच्या सूचना द्याव्यात.