Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul | Pune Politics | निष्ठावंतांना न्याय मिळत नसेल तर न्याय यात्रेला काय अर्थ?

| काँग्रेसच्या धोरणाची राज्यात पायमल्ली: माजी उपमहापौर आबा बागुल यांची खंत

Aba Bagul | Pune Politics – (The Karbhari News Service) – एकीकडे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी हे न्याय यात्रा काढत आहेत मात्र दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये निष्ठावंतावर अन्याय करण्याचे सत्र सुरू झाले आहे. मग न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे. त्याहीपेक्षा काँग्रेसच्या धोरणाची पायमल्ली राज्यात कोण करत आहे. असा थेट सवाल पुणे लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असणारे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत केला. शिवाय कार्यकर्ते ,मतदारांशी चर्चा करून पुढील भूमिका घेणार असल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले. (Pune congress)

आबा बागुल म्हणाले की, गेली चाळीस वर्षे मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत आहे. यंदाच्या लोकसभेसाठी मी प्रबळ दावेदार असताना प्रदेश काँग्रेसने कोणत्या निकषावर मला उमेदवारी नाकारली. याचा खुलासा झाला पाहिजे. दुसऱ्या पक्षातून येवून जेमतेम दीड वर्षे होत नाही ते आमदार झाले मात्र त्यांना आता पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देणे म्हणजे निष्ठावंत लोकांवर अन्याय करण्यासारखेच आहे. एकप्रकारे ही निष्ठेची हत्या आहे. पक्षात माझ्यासह अनेक जण निवडून येण्याची क्षमता असणारे आहेत मग त्यांना डावलून परस्पर उमेदवारी जाहीर करणे हेच मुळात खेदजनक आहे. वास्तविक यंदा पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर उमेदवारी देण्यासंदर्भात धोरण ठरले आहे.त्यानुसार एक व्यक्ती एक पद हे पाहता विद्यमान आमदारांना उमेदवारी परस्पर कशी दिली गेली. जे यापूर्वी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत आणि जे विद्यमान आमदार आहेत त्यांना उमेदवारी देता येणार नाही. या पक्षाच्या धोरणाची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पायमल्ली केली आहे. याकडेही आबा बागुल यांनी लक्ष वेधले.

ज्यांनी दुसऱ्या पक्षात असताना काँग्रेस नेतृत्वावर खालच्या पातळीवर टीका केली. त्यांच्यासमवेत असलेल्यांचे क्लिप उद्या व्हायरल झाल्यास त्यावर प्रदेश काँग्रेसची कोणती भूमिका राहील. असे नमूद करून आबा बागुल म्हणाले ,ज्यांनी अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. त्या निष्ठावंतांना हा धक्का आहे.त्यामुळे आम्ही निष्ठावंताची बैठक घेवून पुढील भूमिका जाहीर करणार आहोत. निष्ठेचा विचार करा आणि गटा तटाचे राजकारण बंद करा हेच मी सर्व नेत्यांना सांगत आहे. अजूनही पक्षाने माझा विचार करावा तसेच लवकरच पुढील दिशा स्पष्ट केली जाईल असेही ते म्हणाले.

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha – Pune Congress | मराठा विरुद्ध ओबीसी लढत पुण्यात काँग्रेसच्या पथ्यावर पडणार!

| मराठा विरुद्ध ओबीसी लढत, पुण्यात काँग्रेसला विजयाची गॅरंटी

Pune Loksabha – Pune Congress – (The Karbhari News Service) – राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यंदा मतदानातून सत्ताधारी भाजपलाच काय त्यांच्यासमवेत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेना – राष्ट्रवादी पक्षांना ( गट) त्याची मोठी झळ बसणार असल्याची दाट शक्यता आहे.नेमक्या या स्थितीचा काँग्रेसने फायदा उठवला तर पुणे लोकसभा मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची नामी संधी काँग्रेसला आहे ;मात्र त्यासाठी ओबीसी उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्यास ओबीसी वर्गासह मराठा समाजाची मते काँग्रेससाठी निर्णायक ठरतील. त्यातही काँग्रेस पक्षाने केलेल्या नव्या धोरणानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेला निष्ठावंत चेहरा दिला तर पुणे लोकसभा मतदारसंघावर पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकल्याचे चित्र पाहावयास मिळू शकते.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने मराठा कार्ड खेळले असले तरी मराठा आरक्षण प्रश्नावरून मतांची विभागणी अटळ असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे काँग्रेसने यंदा ओबीसी उमेदवार देऊन मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेट लढत केल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर ठरेल मात्र नवा चेहरा रिंगणात उतरविल्यास मतांचे समीकरणही सहज साध्य आहे. त्यामुळे एकेकाळी पुण्याचा हा महत्वाचा लोकसभा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसकडून ‘इलेक्टीव्ह मेरीट’ असलेल्या जुन्या निष्ठावंतांना संधी दिली तर काँग्रेसला विजयाची गॅरंटी निश्चित राहील. यंदा लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने एक महत्वाचे धोरण तयार केले आहे.

लोकसभेची प्रत्येक जागा महत्वाची आहे आणि विजय कसा मिळेल यासाठी हे धोरण आहे. त्यानुसार विजयाची खात्री असलेल्या नव्या व्यक्तींना यंदा प्राधान्य दिले जात आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीत त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. या धोरणानुसार एका व्यक्तीला दोन पदे मिळणार नाहीत, की विद्यमान आमदारांना लोकसभेसाठी रिंगणात उतरवले जाणार नाही तसेच ज्यांनी आजवर लोकसभा,विधानसभा निवडणूक लढवली ;पण पराभव पत्करला आहे. त्यांनाही संधी देऊ नये असे हे धोरण आहे. त्यामुळे पुण्यात ओबीसी नवीन उमेदवार दिला तर काँग्रेसला विजय निश्चित आहे.

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी! 

Categories
Breaking News Political पुणे

Muralidhar Mohol Pune Loksabha ‘मोहोळ’ यांच्या नावावर ‘मोहोर’! पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी!

| महाविकास आघाडी टाकतेय सावध पाउल

Muralidhar Mohol Pune Loksabha – (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha Constituency) हा भाजपचा (BJP)  बालेकिल्ला मानला जातो. पुणे लोकसभेसाठी यावेळी भाजपकडून पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Ex Mayor Pune Muralidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मात्र जपून आणि सावध पावले टाकताना दिसून येत आहे. आता महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून कळणार आहे कि पुणे लोकसभा निवडणूक किती रंगतदार होणार आहे. (Pune Loksabha Election)
देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. सगळेच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. मात्र यात भाजपने चांगलीच आघाडी घेतली आहे. भाजपने उमेदवार जाहीर करण्यात मुसंडी मारली आहे. भाजपने आपल्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. आज भाजपने महाराष्ट्रतील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना संधी दिली आहे.
पुणे लोकसभेसाठी बरेच लोक इच्छुक होते. यामध्ये मोहोळ, जगदीश मुळीक, सुनिल देवधर अशी नावे आघाडीवर होती. अखेर मोहोळ यांच्या नावावर मोहोर उमटवली गेली आहे. मोहोळ हे पुण्याचे माजी महापौर राहिले आहेत.
दरम्यान भाजपकडून दोन याद्या जाहीर केल्या तरीही विरोधी पक्षाकडून हालचाल दिसून येत नाही. महाविकास आघाडीने मात्र जपून आणि सावध पाऊल टाकायचे ठरवलेले दिसत आहे. कारण महाविकास आघाडीने अजून आपले पत्ते ओपन केले नाहीत. पुणे ही सगळ्यासाठी प्रतिष्ठेची जागा आहे. खासकरून भाजप साठी तर जास्तच. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत तेव्हाच कळणार आहे जेव्हा महाविकास आघाडी पुण्यासाठी उमेदवार जाहीर करेल!

Aba Bagul Pune | नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका! | जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवा

Categories
Breaking News Political पुणे

Aba Bagul Pune | नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका! | जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेचा उमेदवार ठरवा

| कॉंग्रेस च्या आबा बागुल यांची नाना पटोले यांच्याकडे मागणी

Pune – (The Karbhari News Service) – Aba Bagul Pune | लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी जाहीर सभा घ्या. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. अशी मागणी कॉंग्रेस नेते आबा बागुल यांनी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. नेहमीसारखे तेच ‘यशस्वी कलाकार’ देऊ नका. तसे झाले तर निकालही नेहमीप्रमाणे ‘ यशस्वी’च लागेल. असा टोला देखील बागुल यांनी लगावला आहे.

बागुल यांनी पटोले यांना लिहिलेल्या पत्रानुसार तुम्ही आम्हाला कधीही सांगा, कुठे सभा घ्यायची तेही सांगा. ७० हजार ते १ लाखापेक्षा अधिक पुणेकर या सभेला एक हजार टक्के उपस्थित राहतील याची मी ग्वाही देतो. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा.

मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे.

बागुल यांनी पुढे म्हटले आहे कि, मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचा कौल घ्या,जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल.

आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घेऊन जाहीर सभेच्या आयोजनासाठी निर्देश द्या आणि त्यानुसारच पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा ही विनंती. जर तेच ‘यशस्वी कलाकार’ पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे ‘ यशस्वी’च लागेल. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जाहीर सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, त्यानुसारच उमेदवार ठरवावा. असे बागुल यांनी म्हटले आहे.

Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

Categories
Breaking News Political पुणे

Pune BJP Booth Chalo Abhiyan | लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपच्या वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान

 

Pune BJP Booth Chalo Abhiyan | आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Pune lok sabha Election 2024)  तयारीसाठी शहर भाजपच्या (Pune City BJP) वतीने 4 ते 11 फेब्रुवारी या कालावधीत बूथ चलो अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate BJP) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. (BJP Pune Booth Chalo Abhiyan)

घाटे म्हणाले, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सुचनेनुसार पुणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता बूथवर भेट देणार आहे. केंद्र शासन आणि राज्य सरकारची विकासकामे आणि योजना या अभियानाअंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. शहर सरचिटणीस रवी साळेगावकर आणि सुभाष जंगले यांची या अभियानाच्या संयोजक म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.

घाटे म्हणाले, बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोफ्लदणी, मतदार यादीचा आढावा, व्हॉटसॲप ग्रुप तयार करणे, विकसित भारतसाठी ब्रँड ॲबँसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर 51 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे या अभियानातून करण्यात येणार आहेत.या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर,महेश पुंडे, संजय मयेकर,पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते

घाटे पुढे म्हणाले, पुणे लोकसभेची बूथ समितीची रचना पूर्ण झाली असून 2010 बूथ प्रमुख, 731 सुपर वॉरियर्स, 472 शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे

लोकसभा चुनाव प्रबंधन समिती
*लोकसभा क्षेत्र – पुणे

प्रभारी – श्रीनाथ भिमाले
सहप्रभारी – राजेश येनपुरे
संयोजक – मुरलीधर मोहोळ
सहसंयोजक – दिपक पोटे
विस्तारक – शैलेन्द्र ठकार
चुनाव अभिकर्ता – राजेश पांडे
चुनाव कार्यालय – संजयमामा देशमुख
कॉल सेंटर – नीलेश कोंढाळकर
वाहन व्यवस्था – महेश पुंडे, प्रवीण जाधव
प्रचार सामग्री – आनंद पाटील, अमोल डांगे
प्रचार अभियान – पुनीत जोशी , प्रतीक देसरडा
सोशल मिडिया एवं हायटेक अभियान – निखिल पंचभाई, चंद्रभूषण जोशी
यात्रा एवं प्रवास – गणेश बिडकर, रघुनाथ गौडा
मिडिया प्रबंधन – संजय मयेकर, पुष्कर तुळजापुरकर
बूथ स्तर का कार्य – कुलदीप सावळेकर, हरिष परदेशी
संसाधन जुटाना एवं प्रबंधन – रविंद्र साळेगावकर, गणेश घोष
लेखा- जोखा – हेमंत लेले, बाळासाहेब अत्रे
न्यायिक प्रक्रिया संबंधी एवं चुनाव आयोग से समन्वय – वर्षाताई डहाळे, माधवीताई निगडे
मतगणना – गोपाल चिंतल
आंकडे – सुहास कुलकर्णी
प्रलेखीकरण / दस्ताएवजीकरण – योगेश बाचल
घोषणापत्र प्रभारी – सिद्धार्थ शिरोळे, संजय मयेकर
आरोपपत्र – राणीताई कांबळे, समीर जोरी –
विडियो व्हान – नामदेव माळवदे, ऋषिकेश मळेकर
प्रवासी कार्यकर्ता – महेंद्र गलांडे, सुनील पांडे
लाभार्थी संपर्क – अजय खेडेकर, प्रल्हाद सायकर
सामाजिक संपर्क – दत्ताभाऊ खाडे, प्रशांत हरसुले
युवा संपर्क – राघवेंद्र मानकर, अमोल बालवडकर
महिला संपर्क – रूपालीताई धाडवे, हर्षदाताई फरांदे
एससी संपर्क – अतुल साळवे, सुखदेव अडागळे
एसटी संपर्क – राजश्री काळे
झुग्गी- झोपडी अभियान – विशाल पवार, गणेश शेरला
विशेष संपर्क (व्यावसायिक एवं सामाजिक) – दिपक नागपूरे, सौरभ पटवर्धन
साहित्य निर्माण, विज्ञापन बनाना एवं मुद्रण – दुष्यंत मोहोळ, राजू परदेशी
प्रचार सामग्री एवं साहित्य वितरण – आनंद पाटील

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा! 

 
 
 
Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात आचारसंहिता देखील लागू शकते. कुठल्याही पक्षाने आपले पत्ते उघड केले नसले तरीही सर्वांची अंतर्गत तयारी जोरदारपणे सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे. यासाठी आता नवीन उमेदवार कोण असणार? गेल्या काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता सुनील देवधर (Sunil Devdhar) हे नवीनच नाव चर्चेत आले आहे. भाजप नेहमी नवीन चेहऱ्याच्या शोधात असते. तोच धागा पकडून भाजपने हा नवीन उमेदवार शोधला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
 
 
 

कोण आहेत सुनील देवधर?

 

सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली. 

2010 मध्ये, ते सक्रिय राजकारणात सामील झाले आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग ३ वेळा निवडणूक लढविणारे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. गुजरातमधील त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, 2016 मध्ये, त्यांची 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाने राज्य केलेल्या त्रिपुरा राज्याचे पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तत्कालीन भाजप अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान मोदींच्या प्रचंड लोकप्रिय प्रतिमेसह, त्यांच्या जमिनीवर कठोर परिश्रम करून, ते राज्यातील २५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवण्याचे प्रमुख साधन बनले. ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि जुलै २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी होते. २०१८ मध्ये ते भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी बनले.
दरम्यान मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे आपण उमेदवार असण्याची आस लावून आहेत. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय ही केंद्रीय टीम करणार आहे. तसेच भाजप नेहमी ऐन वेळेला नवीन चेहरा देत असते. त्यानुसार या टीम ने सुनील देवधर यांच्या नावाला पसंती देण्याची तयारी चालवली आहे, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली. अशी देखील चर्चा आहे कि देवधर यांचा प्रचार बड्या उद्योगपतींच्या माध्यमातून सुरु आहे.
दरम्यान लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याबाबत कोर्टाच्या आदेशाने भाजपची गोची झाली आहे. कारण पोटनिवडणुकीची भाजपची सध्या तरी कुठली तयारी दिसत नाही किंवा भाजप त्या मनःस्थितीत नाही.
दरम्यान इकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्टवादी चे देखील अजून काही ठरलेले नाही. लोकसभेची जागा परंपरागत रित्या काँग्रेस कडे राहिलेली आहे. मागील वेळी मोहन जोशी यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. यावेळी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना संधी देऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र आघाडीचे अजून तरी काही ठरलेले नाही.
मनसे ने मात्र आधीच आपला उमेदवार घोषित केला आहे. वसंत मोरे ना उमेदवारी दिली जाणार आहे. त्या दिशेने मोरेंनी आपली तयारी देखील सुरु केली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मोरे दौरे करत फिरत आहेत. तसेच मोरे नेहमीच आपल्या कामाच्या पद्धतीने प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावर त्यांना पसंत करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

Pune Lok Sabha By Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकर घ्या | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश 

Categories
Breaking News Political पुणे

Pune Lok Sabha By Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लवकर घ्या | हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश

 

Pune Lok Sabha By Election | गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी लवकरात लवकर पोटनिवडणूक (Pune Lok Sabha By election) घ्या असा आदेश उच्च न्यायालयाने (High Court) निवडणूक आयोगाला (Election Commission) दिला आहे. (Pune Lok Sabha By Election)

संसदेच्या विद्यमान सदस्याच्या निधनानंतर एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवण योग्य नाही असेही उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सांगितले आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 10 महिन्यांत निवडणूक आयोगानं काहीच का केलेलं नाही?, असा सवाल करत सुघोष जोशी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.  यावर कायद्यानुसार सहा महिन्यांत पोटनिवडणूक घेण्याची तरतूद असताना ती का घेण्यात आली नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आणि याबाबत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा याचिकाकर्त्याच्या बाजूने निर्णय देण्याचा इशारा न्यायालयाने दिला होता. आज मुंबई उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला आदेश देत याचिका निकाली काढली.

Pune Loksabha Election | BJP | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha Election | BJP | पुणे लोकसभेच्या भाजपा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले!

Pune Loksabha Election | BJP | भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्या (BJP Maharashtra)  ‘महाविजय २४’ (Mahavijay 24) या अभियानाच्या पुणे लोकसभा (Pune Loksabha) समन्वयकपदी महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले (Shrinath Bhosale) यांची नियुक्ती करण्यात आली असून नियुक्तीचे पत्र भिमाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या हस्ते पुण्यात स्विकारले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande), शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate), जगदीळ मुळीक उपस्थित होते.
भिमाले यांनी १९९८ साली भाजपा युवा मोर्चामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली असून २००२ पासून पुणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. शिवाय २०१२ साली पुणे शहर सरचिटणीस आणि २०१७ साली पुणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची धुराही सांभाळली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिमाले यांना ही जबाबदारी मिळाली आहे. शिवाय पुणे लोकसभेंतर्गत असणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.
नियुक्तीबाबत भिमाले म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी  आणि पार्टीने माझ्यावर टाकलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्याचा प्रयत्न आहे. पुणे लोकसभेवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचाच झेंडा फडकेल, यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस आहे. संघटनेत आजवर मिळालेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडली असून नवी जबाबदारीही पूर्ण क्षमतेने आणि समर्पण भावनेतून निभावली जाईल’.
—-
News Title | Pune Loksabha Election | BJP | Srinath Bhimale as BJP coordinator of Pune Lok Sabha!