Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

Categories
Breaking News PMC पुणे

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन | प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ न दवडण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

| आयुक्तांनी मंजूरी दिल्यांनतरही प्रस्ताव पुढे जाईना 

PMC Pune Education Department | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर  मंडळ हा एक महापालिकेचा (PMC Pune) विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती (promotion) पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. त्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मात्र यात कालावधी वाया जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकासेवा (PMC pune new) प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग, नगरसचिव कार्यालय, मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी नुकतीच मंजूरी दिली आहे. (Pune Municipal Corporation News)
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत.  त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून  प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील. मात्र आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतरही ही प्रक्रिया करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कर्मचारी पदोन्नती बाबतच्या काही तांत्रिक बाबी आणि कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यामुळे प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यास वेळ लागणार आहे. मात्र हे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही प्रक्रिया कर्मचाऱ्यांना दिलासा दिला जाईल.
– सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग.
—-
Pune PMC Education Department |  Education Department Adjustment |  Demand of employees not to waste time in releasing the draft list

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 320 पदांसाठी 10171 अर्ज | अर्ज करण्याची मुदत संपली | लवकरच परीक्षा घेतली जाणार

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 320 पदांसाठी 10171 अर्ज

| अर्ज करण्याची मुदत संपली | लवकरच परीक्षा घेतली जाणार

Pune Mahanagarpalika Bharti 2023 :  (Author: Ganesh Mule) : पुणे महापालिकेत (PMC Pune Recruitment) एकूण 320 पदांसाठी भरतीकरण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता लवकरच परीक्षा घेतली जाणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)

किती आणि कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे?

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली होती.  पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी  वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. 
 

भरती प्रक्रियेत किती अर्ज प्राप्त झाले? 

 एवढ्या कालावधीत महापालिकेकडे 10744 अर्ज आले होते. त्यातील 10171 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. या भरती प्रक्रियेत फायरमन च्या सर्वात जास्त जागा आहेत. फायरमन च्या 200 जागांसाठी एकूण 3738 अर्ज आले, त्यातील 3555 पात्र झाले आहेत. त्या खालोखाल औषध निर्माता पदासाठी 3148 अर्ज आले. त्यातील 3032 पात्र झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) साठी 1853 अर्ज आले. त्यापैकी 1677 पात्र झाले आहेत. आरोग्य निरीक्षक साठी 771 अर्ज आले त्यातील 738 पात्र झाले. वैद्यकीय अधिकारी पदासाठी 465 अर्ज आले. त्यातील 450 पात्र झाले. (Pmc Pune recruitment) 
 

कधी होणार उमेदवारांची परीक्षा?

उपायुक्त सचिन इथापे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लवकरच उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा केंद्राची माहिती IBPS या परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून घेण्यात येईल. त्यानुसार 11 पेपर असतील. यामध्ये फायरमन साठी physical exam देखील होणार आहे. परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक आणि त्या अनुषंगाने याबाबतची माहिती लवकरच उमेदवारांना कळवण्यात येईल. (Pune municipal corporation Recruitment)

– पदे आणि अर्जाची संख्या 

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 12
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 450
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) – 9
४) पशु वैदयकीय अधिकारी – 47
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक – 209
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 1677 
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर – 738 
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर – 216 
९) औषध निर्माता – 3032
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 226 
११) अग्निशामक विमोचक / फायरमन – 3555

PMC Recruitment | महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद! | फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज | 28 मार्च पर्यंत करू शकता अर्ज

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिका भरतीला अल्प प्रतिसाद!

| फक्त 4 हजाराच्या आसपास अर्ज

पुणे | पुणे महापालिकेत एकूण 320 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवार यासाठी 28 मार्च पर्यंत अर्ज करू शकतात. दरम्यान या प्रक्रियेला खूप अल्प प्रतिसाद मिळाला आहे. कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4218 अर्ज आले. त्यातील 3775 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. याअगोदर महापालिकेने 448 पदांची भरती केली होती. हा दुसरा टप्पा आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली. (PMC Pune recruitment)
पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०८/०३/२०२३ पासुन ते दिनांक २८/०३/२०२३ पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी
https://pmc.gov.in/mr/recruitments या लिंकवर दिनांक २८/०३/२०२३ रोजीचे२३:५९ वाजे पर्यंत online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in/mr/recruitments या
लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहेत.
दरम्यान आतापर्यंत या भरती प्रक्रियेला अल्प असा प्रतिसाद मिळताना दिसला आहे. कारण कारण एवढ्या कालावधीत महापालिकेकडे फक्त 4218 अर्ज आले. त्यातील 3775 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. उपसंचालक (प्राणी संग्रहालय) यासाठी तर अजून एकही अर्ज आलेला नाही. या भरती प्रक्रियेत फायरमन च्या सर्वात जास्त जागा आहेत. फायरमन च्या 200 जागांसाठी एकूण 1630 अर्ज आले. त्यातील 1490 पात्र झाले आहेत. त्या खालोखाल औषध निर्माता पदासाठी 1152 अर्ज आले. त्यातील 1044 पात्र झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) साठी 741 अर्ज आले. त्यापैकी 618 पात्र झाले आहेत. आरोग्य निरीक्षक साठी 249 अर्ज आले त्यातील 223 पात्र झाले. वैद्यकीय अधिकारी पदासाठी 162 अर्ज आले. त्यातील 151 पात्र झाले.   अजूनही तीन दिवस शिल्लक आहेत. यात अर्ज वाढू शकतात. असे उपायुक्त इथापे यांनी सांगितले.
– पदे आणि अर्जाची संख्या

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 5
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 151
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) – 0
४) पशु वैदयकीय अधिकारी – 12
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक – 71
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 618 
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर – 223
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर – 74 
९) औषध निर्माता – 1044
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 87 
११) अग्निशामक विमोचक / फायरमन – 1490

Training | PMC Pune | नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य | अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

नवनियुक्त सहायक अतिक्रमण निरीक्षकांना प्रशिक्षण अनिवार्य

| अन्यथा शिस्तभंगाची कारवाई 
पुणे | महापालिका प्रशासनाकडून नुकतीच भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यामध्ये 97 सहायक अतिक्रमण निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान प्रशासनाचे कामकाज गतिमान करण्यासाठी या निरीक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे लोक प्रशिक्षणाला येणार नाहीत. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिला आहे.
पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सक्षम प्रशासन व सक्षम कार्यप्रणाली निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेतील नवनियुक्त सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजासंबंधित विविध विषयांचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे म.न.पा प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक संवर्गातील कर्मचा-यांना  प्रशिक्षण पुणे महापालिकेतील श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह (Old G.B. hall) येथे आयोजित करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार
१. प्रशिक्षणाकरीता निवडलेले सेवक यांचेकरीता सदर ३ दिवसीय प्रशिक्षण सक्तीचे आहे.
२. संबंधित सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणाचे ठिकाणी प्रशिक्षण वेळेच्या १५ मिनिटे आगोदर उपस्थित रहावयाचे आहे. उशीरा येणा-या प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार नाही.
3. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी प्रशिक्षणास पूर्ण दिवस प्रशिक्षणास उपस्थित रहावे.
४.संबंधित खातेप्रमुख यांनी वरील प्रशिक्षणार्थी सेवकांना प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहण्यासाठी ०८ ते १०मार्च २०२३ या दोन दिवसांसाठी कार्यमुक्त करावे.
५. जे सेवक प्रशिक्षणास उपस्थित रहाणार नाहीत त्यांना गैरहजर समजून पुढील शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

cVIGIL | निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर आचारसंहिता भंगाच्या करा तक्रारी

| ॲपवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा

पुणे| निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा देण्यात आली आहे. (code of conduct violations)

जिल्ह्यातील २०५- चिंचवड व २१५- कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, दारु वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (cVIGIL) ॲप मोफत डाऊनलोड करता येते.

ॲप सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, व्हिडीओ किंवा ऑडिओ तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनीटामध्ये ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो.

तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास ॲपद्वारे संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगा बाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली

पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून नोंद झालेल्या ५२ तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. इथापे यांनी दिली.

PMC Recruitment Exam Results | अखेर पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर  ला कागदपत्रांची छाननी

Categories
Breaking News PMC पुणे

अखेर पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर  ला कागदपत्रांची छाननी

जाणून घ्या सविस्तर

पुणे महापालिकेत विविध खात्यात विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अर्ज मागवले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यात आल्या. कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर ला झाल्या. याचा निकाल घोषित करण्यात आला आहे. महापालिकेच्या वेबसाईट वर याची यादी देण्यात आली आहे.

याबाबत उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले कि वेबसाईट वर निकालाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला मिळालेले मार्क आणि topers ची यादी देण्यात आली आहे. त्यानुसार मेरीट मध्ये पात्र होणाऱ्या सदर यादीमधील उमेदवारांनी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११:०० वाजता, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे. इथापे यांनी सांगितले कि उमेदवारांनी कुठली कागदपत्रे घेऊन यायचे आहे. हे देखील वेबसाईट च्या माध्यमातून कळवले जाईल.

पुणे महापालिकेत विविध खात्यातील 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यासाठी 20 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या पदासाठी 26 सप्टेंबर ला परीक्षा घेण्यात आली.  कनिष्ठ अभियंता (सिव्हिल इंजिनियर) या पदासाठी 3 ऑक्टोबर ला परीक्षा घेण्यात आली. 4 ऑक्टोबर ला सकाळच्या सत्रात सहायक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठी तर दुपारच्या सत्रात सहायक विधी अधिकारी पदासाठी परीक्षा झाली. तर कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक पदाच्या परीक्षा या 10, 12 आणि 13 ऑक्टोबर झाल्या.

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील लिपिक टंकलेखक पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल व कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी पाहण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.

 

PMC Pune | राजेंद्र मुठे यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे 

Categories
Breaking News PMC पुणे

राजेंद्र मुठे यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे

पुणे | महापालिकेत प्रतिनियुक्ती वर आलेले उपायुक्त राजेंद्र मुठे यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्याकडील पदभार उपायुक्त अजित देशमुख आणि सचिन इथापे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
राजेंद्र मुठे यांची बदली विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडील पदभार आता इतर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. मुठे हे मालमत्ता व्यवस्थापन विभाग, दक्षता विभाग आणि उपायुक्त (विशेष) या विभागाचे कामकाज पाहत होते. हा पदभार दोन अधिकाऱ्यांना विभागून देण्यात आला आहे. मालमत्ता व्यवस्थापन विभागाचा अतिरिक्त पदभार कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख अजित देशमुख यांच्याकडे देण्यात आला आहे. तर दक्षता विभाग आणि उपायुक्त (विशेष) या विभागाचा अतिरिक्त पदभार सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Traffic in pune | PMC Pune | वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी |अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

Categories
Breaking News PMC social पुणे

वाहतूक कोंडीबाबत नियोजन करण्याबाबत महापालिकेची पोलिसांकडे मागणी

|अति वृष्टीमुळे वाहतूक कोंडी वाढली

शहरात गेले काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याने पुणेकर नागरिक अडकून पडत आहेतच. यामुळे पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक, शहरात घुसणारे अवजड वाहने, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने थेट वाहतूक उपायुक्तांना पत्र पाठवून वाहतूक कोंडीच्या अशा वाहनांवर कारवाई करा अशी मागणी केली आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी वाहतूक पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना पत्र पाठवले आहे.  अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध भागात पूरस्थिती निर्माण होत आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी होत असताना गर्दीच्या ठिकाणी अवजड वाहतूक बंदी असणारे वाहने फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रिक्षा, बसेस हे त्यांच्या थांब्या व्यतिरिक्त थांबून कोंडीत भर घालत आहेत. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना शहरात प्रवेश देऊ नये, बस, रिक्षा योग्य त्या ठिकाणी थांबतील याचे नियोजन करावे अशी विनंती महापालिकेने वाहतूक पोलिसांना केली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून पुणे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मध्यवर्ती भागातून मिक्सर, डंपर, मोठे ट्रक बिनधास्त फिरत आहेत. खरे तर शहरात अवजड वाहनांना बंदी असताना ही वाहने थेट शहरात येत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे.

 

Suspension | PMC Pune | महापालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवणारा कनिष्ठ अभियंता निलंबित  | सामान्य प्रशासन विभागाची कारवाई 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेत नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवणारा कनिष्ठ अभियंता निलंबित

| सामान्य प्रशासन विभागाची कारवाई

पुणे | सूरज पवार,  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांना पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून तूर्तातूर्त निलंबित करणेत आले आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेत पवार हे उमेदवारांना नोकरी लावून देण्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून पैसे घेत होते. त्यामुळे ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
इथापे यांच्या माहितीनुसार पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील  सुरज पवार, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा या ठिकाणी कार्यरत आहेत.  पुणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया चालू आहे. सदर भरती प्रक्रीयेमधील उमेदवार यांना पवार हे पुणे महानगरपालिकेत नोकरी लावून देतो, असे प्रलोभन दाखवून विविध उमेदवारांकडून पैश्यांची मागणी करीत आहे, असे निदर्शनास आले आहे. हे  कृत्य हे वर्तणूक नियमाचे भंग करणारे व पुणे महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणारे असल्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम मधील कलम ५६ (२) (फ) अन्वये  सुरज पवार, हुद्दा कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे मनपा यांना दिनांक १९/१०/२०२२ पासून पुणे महानगरपालिकेच्या सेवेतून  अटी व शर्तीच्या अधिन राहून निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान पवार त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाईल. त्यामुळे पवार यांना निम्नस्वाक्षरीकर्ता यांचे पूर्व परवानगीशिवाय पुणे महानगरपालिका क्षेत्र सोडता येणार नाही. खातेनिहाय चौकशी करणेची कार्यवाही सहाय्यक आयुक्त, सिंहगडरोड क्षेत्रिय कार्यालय यांनी तात्काळ सुरु करावयाची आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. असे आदेश ही इथापे यांनी दिले आहेत.
—-
 अशा गैरकृत्य करणाऱ्यांना बळी पडू नये. अन्यथा सर्व संबंधितांवर कारवाई केली जाईल. असे आवाहन आहे.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग 

Show cause notice | महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस! 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेच्या 157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस!

| वेळेचे उल्लंघन केल्याने प्रशासनाकडून कारवाई

पुणे | पुणे महापालिका प्रशासनाच्या वतीने  157 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. वेळेचे उल्लंघन केल्याने महापालिका प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना याबाबत दोन दिवसात खुलासा करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिले आहेत. तसेच आगामी काळात ही कारवाई कडक करण्यात येणार असल्याचे संकेत देखील उपायुक्त इथापे यांनी दिले आहेत. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मागील काही दिवसापूर्वी एक सर्क्युलर जारी करत वेळेचे पालन आणि कार्यालयीन शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्याने महापालिका प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी कार्यालयीन वेळेत महापालिकेत न आलेल्या कर्मचाऱ्यांना गेटवर अडवतच त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यासाठी सामान्य प्रशासन आणि सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली होती. त्यानुसार याबाबत कर्मचाऱ्यांना दोन दिवसात खुलासा करावा लागणार आहे. मात्र याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सर्वच गोष्टी कायदेशीर केल्या जाव्यात अशी मागणी महापालिका कर्मचारी करत आहेत.
महापालिकेतील बरेच कर्मचारी वेळेचे पालन करताना दिसत नाहीत. तसेच कार्यालयीन वेळेतही इतरत्र फिरताना आढळतात. याचा कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ही कारवाई करण्यात येत आहे. आगामी काळातही कारवाई जारी राहणार आहे. सलग तीन वेळा वेळेचे पालन नाही केले तर एक रजा (CL) रद्द करण्यात येईल. असेच 7 वेळा झाल्यास दिवसाचा पगार कापला जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नियमांचे पालन करावे.
सचिन इथापे, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पुणे मनपा