Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस च्या इच्छुकांना अर्ज करण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस च्या इच्छुकांना अर्ज करण्यासाठी उद्या पर्यंतची मुदत!

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress |  पुणे | लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024)  वारे जोरदारपणे वाहू लागले आहे. पुण्यात देखील सर्वच पक्ष झाडून कामाला लागले आहेत. नेहमीप्रमाणे यात काँग्रेस ने आघाडी घेतली आहे. पुणे लोकसभेसाठी (Pune Lok Sabha Constituency) इच्छुक उमेदवारांचे अर्ज काँग्रेस कडून (Pune City Congress) मागवण्यात येत आहेत. त्यासाठी 9 जानेवारी 5 वाजे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराकडे उद्याचा दिवस शिल्लक आहे. (Pune Lok Sabha Constituency | Pune Congress)
प्रदेश काँग्रेस कडून अर्ज मागवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहर काँग्रेस ने हे आदेश पारित केले होते. पुणे लोकसभेसाठी महाविकास आघाडी मध्ये   अजून जागा वाटप झाले नसले तरीही परंपरे नुसार ही जागा काँग्रेस च्या वाट्याला येते. त्यानुसार काँग्रेस यावर  पहिल्यापासूनच दावा करत आली आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस समोर भाजप चे मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेस ला ही निवडणूक प्रतिष्ठेची करावी लागणार आहे. कारण काँग्रेस ने नुकतीच कसबा विधानसभेची पोट निवडणूक जिंकली होती. त्यामुळे भाजप बॅकफूट वर गेली होती तर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना बळ मिळाले होते. मात्र या अपयशामुळे भाजप खूप झटून कामाला लागली आहे. त्यामुळे काँग्रेस ला देखील तसाच तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. (Pune Lok Sabha Election)
पुणे लोकसभेसाठी काँग्रेस मध्ये बरेच इच्छुक आहेत. यामध्ये आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी, प्रभारी शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी शहर अध्यक्ष अभय छाजेड, रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांचा समावेश आहे. यातून काँग्रेस ला एक विजय खेचून आणणारा उमेदवार शोधावा लागणार आहे. उद्या म्हणजे 9 जानेवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना अर्ज सादर करावे लागणार असून उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय हा प्रदेश आणि केंद्र स्तरावर घेतला जाणार आहे. असे शहर काँग्रेस कडून सांगण्यात आले. (Local Pune News)

Maval Loksabha | AAP | मावळ लोकसभेची जागा आप पार्टी लढवणार!

Categories
Breaking News Political पुणे

Maval Loksabha | AAP | मावळ लोकसभेची जागा आप पार्टी लढवणार!

| रविराज काळे, युवक शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड यांची माहिती

Maval Loksabha | AAP | आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) इंडिया आघाडीत असलेला अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (Aam Aadami Party) मावळ लोकसभेची (Maval Loksabha) जागा लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. रविराज काळे (Raviraj Kale) यांनी युवक आघाडी आम आदमी पक्षाच्या येथे पुणे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मावळ या लोकसभेची जागा आपण लढवणार आहोत. अशी माहिती दिली. (Maval Loksabha AAP Party)

सध्या ही जागा शिवसेना पक्षाकडे होती परंतु शिवसेना हा पक्ष सत्तेत असल्याने आम आदमी पक्ष ही जागा लढवणार आहे.महाराष्ट्रातील इतर जागांवर इंडिया आघाडीतील पक्षांचे उमेदवारांचे काम करणार आहोत असे रविराज काळे यांनी सांगितले. या जागेबाबत सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील पक्षाची ताकद इतर जागांच्या तुलनेत चांगली आहे.आपल्या कार्यकर्त्यांची ताकद पाहून आपण या जागेची निवड केली आहे. त्यासंदर्भात इंडिया आघाडीतील इतर पक्षाध्यक्ष यांच्याशी चर्चा करुन निर्णय होईल. असे रविराज काळे यांनी सांगितले.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे सरकार आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी आपल्याला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. असे कार्यकर्त्यांशी चर्चा करताना सांगितले.

Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात

Categories
Breaking News Political देश/विदेश

Bharat Jodo Yatra :2 | भारत न्याय यात्रा : 14 जानेवारी ला मणिपूर मधून सुरुवात

Bharat Nyay Yatra | लोकसभा निवडणुकीआधी एकीकडे भाजपकडून राममंदिर (Ram Mandir) उद्घाटनाची भव्य तयारी तर दुसरीकडे काँग्रेसकडून भारत जोडो दुसऱ्या टप्प्याची घोषणा (Bharat Jodo Yatra 2) करण्यात आली आहे.  (Bharat Nyay Yatra)
14 जानेवारीला मणिपूर मधल्या इंफाळ मधून राहुल गांधी भारत न्याय यात्रेला सुरुवात करणार आहेत.
14 राज्यांमधून, 6200  किलोमीटरअंतर पार करत 20 मार्चला मुंबईमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे.
यावेळी ही यात्रा बस आणि पायी अशा दोन्ही स्वरूपाची असणार आहे
 14 जनवरी पासून 20 मार्च
मणिपुर पासून मुंबई पर्यंत
6200 किमी. | 14 राज्य | 85 जिल्हे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा!

Categories
Breaking News Political पुणे

Pune Loksabha 2024 | Sunil Devdhar | पुणे लोकसभेसाठी भाजपकडून सुनील देवधर यांच्या नावाची चर्चा! 

 
 
 
Pune Loksabha 2024 | लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) तयारी अंतिम टप्प्यात आहे. पुढील महिन्यात आचारसंहिता देखील लागू शकते. कुठल्याही पक्षाने आपले पत्ते उघड केले नसले तरीही सर्वांची अंतर्गत तयारी जोरदारपणे सुरु आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपचा (BJP) उमेदवार कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. कारण गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने ही जागा रिक्त आहे. यासाठी आता नवीन उमेदवार कोण असणार? गेल्या काही दिवसापासून मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता सुनील देवधर (Sunil Devdhar) हे नवीनच नाव चर्चेत आले आहे. भाजप नेहमी नवीन चेहऱ्याच्या शोधात असते. तोच धागा पकडून भाजपने हा नवीन उमेदवार शोधला, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 
 
 
 

कोण आहेत सुनील देवधर?

 

सुनील देवधर (जन्म 29 सप्टेंबर 1965). त्यांनी ईशान्य भारतातील माय होम इंडिया या एनजीओची स्थापना केली. 

2010 मध्ये, ते सक्रिय राजकारणात सामील झाले आणि जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्ष, भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या ईशान्य भारत संपर्क सेलचे राष्ट्रीय संयोजक म्हणून नियुक्त झाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सलग ३ वेळा निवडणूक लढविणारे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी गुजरातमध्ये पूर्णवेळ विस्तारक म्हणून काम केले. गुजरातमधील त्यांच्या मेहनतीने प्रभावित होऊन पंतप्रधान मोदींनी त्यांची वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर, 2016 मध्ये, त्यांची 2 दशकांहून अधिक काळ मार्क्सवादी पक्षाने राज्य केलेल्या त्रिपुरा राज्याचे पक्षाचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली. तत्कालीन भाजप अध्यक्ष श्री अमित शहा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, पंतप्रधान मोदींच्या प्रचंड लोकप्रिय प्रतिमेसह, त्यांच्या जमिनीवर कठोर परिश्रम करून, ते राज्यातील २५ वर्षांची कम्युनिस्ट राजवट संपवण्याचे प्रमुख साधन बनले. ते भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि जुलै २०१८ ते जुलै २०२३ पर्यंत आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी होते. २०१८ मध्ये ते भाजप आंध्र प्रदेशचे सह-प्रभारी बनले.
दरम्यान मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक हे आपण उमेदवार असण्याची आस लावून आहेत. त्या दिशेने त्यांचे प्रयत्न देखील सुरु आहेत. मुळीक यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाश झोतात राहण्याचा प्रयत्न केला होता. मोहोळ आणि मुळीक हे देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. असे असले तरी लोकसभेच्या उमेदवाराचा निर्णय ही केंद्रीय टीम करणार आहे. तसेच भाजप नेहमी ऐन वेळेला नवीन चेहरा देत असते. त्यानुसार या टीम ने सुनील देवधर यांच्या नावाला पसंती देण्याची तयारी चालवली आहे, अशी माहिती भाजपच्या गोटातून मिळाली. अशी देखील चर्चा आहे कि देवधर यांचा प्रचार बड्या उद्योगपतींच्या माध्यमातून सुरु आहे.
दरम्यान लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याबाबत कोर्टाच्या आदेशाने भाजपची गोची झाली आहे. कारण पोटनिवडणुकीची भाजपची सध्या तरी कुठली तयारी दिसत नाही किंवा भाजप त्या मनःस्थितीत नाही.
दरम्यान इकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्टवादी चे देखील अजून काही ठरलेले नाही. लोकसभेची जागा परंपरागत रित्या काँग्रेस कडे राहिलेली आहे. मागील वेळी मोहन जोशी यांना आपला करिष्मा दाखवता आला नव्हता. यावेळी काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर किंवा अरविंद शिंदे यांना संधी देऊ शकते. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रशांत जगताप यांचे नाव देखील काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. मात्र आघाडीचे अजून तरी काही ठरलेले नाही.
मनसे ने मात्र आधीच आपला उमेदवार घोषित केला आहे. वसंत मोरे ना उमेदवारी दिली जाणार आहे. त्या दिशेने मोरेंनी आपली तयारी देखील सुरु केली आहे. शहर तसेच ग्रामीण भागात मोरे दौरे करत फिरत आहेत. तसेच मोरे नेहमीच आपल्या कामाच्या पद्धतीने प्रकाशझोतात असतात. सोशल मीडियावर त्यांना पसंत करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

Loksabha Election 2024 | लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Loksabha Election 2024 | राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील (Maharashtra Vidhansabha) मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणुका-2024 (Loksabha Election 2024) मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्ययावत असण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (District Élection Officer) यांच्याकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये एन. एन. बुटोलिया, वरिष्ठ प्रधान सचिव सौम्यजित घोष, सचिव, सुमनकुमार दास, सचिव, भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) यांचा समावेश होता.
            या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यांचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर केले.  यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18-19 वर्षे वयोगटातील मतदार नोंदणींची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय, विविध आस्थापनांमध्ये विशेष मोहीम राबविणे, मतदार साक्षरता मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या मदतीने या वयोगटातील अधिकाधिक तरुणांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयनिहाय मतदार नोंदणीचा आढावा नियमित घेणे, इ. उपयायोजना सुचविल्या.
            राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करुन टक्केवारी वाढविण्याचे निर्देश दिले. मतदार यादींमधील दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीचे मार्गदर्शन आयोगाने केले. मतदान केंद्रांमध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका-2019 मधील मतदानाची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही आयोगाने उपाययोजना सुचविल्या. तसेच, मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
****