Kasba by-election | कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

कसबा पोटनिवडणूक सर्वांना सोबत घेऊनच जिंकणार

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

कसबा पोटनिवडणुकीत सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन जिंकायची आहे. मी स्वतः पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच फिरायला सुरुवात केली आहे. सर्व कार्यकर्त्यांनीही कामाला लागावे, अशी सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केली. कसबा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पुणे शहराची महाबैठक आज संपन्न झाली. या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजयनाना काकडे, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शैलेश टिळक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, आ. माधुरी मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,माजी सभागृह नेते गणेश बिडकर,
भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, शहर सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक पोटे, गणेश घोष, संदीप लोणकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कसबा महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनी पांडे यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपाचे ४० असे मतदारसंघ आहेत; जिथे कोणतीही राजकीय समीकरणे तयार झाली, तरी भारतीय जनता पक्षाचाच विजय होतो. कसबा विधानसभा मतदारसंघ हा त्यापैकीच एक आहे. खासदार गिरीश बापट यांनी पक्षाची भक्कम बांधणी करुन, हा बालेकिल्ला तयार केला आहे. आपल्याला असे शंभर मतदारसंघ तयार करायचे आहेत‌. त्यामुळे मुक्ताताईंच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करायचे आहे.

पाटील पुढे म्हणाले की, कसबा पोट निवडणुकीसाठी पक्षाने तीन समित्या स्थापन केल्या आहेत. त्यातील राजकीय समितीचे प्रमुख पद आ. माधुरीताई मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. संजयनाना काकडे त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहतील. त्यासोबतच संघटनात्मक कामांसाठी राजेश पांडे यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात आली असून, राजेश येनपुरे त्यांना मदत करतील. तर व्यवस्थापन समिती कसबा‌‌ मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांच्या नेतृत्वात काम करेल.‌

ते म्हणाले की, कसबा निवडणुकीसाठी मी स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करणार असून, निवडणुकीच्या अनुषंगाने किमान शंभर घरी भेट देणार आहे. त्यासाठी मी माझ्या वेळापत्रकात ही बदल केला आहे. कार्यकर्त्यांनीही आपापल्या कामाचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, खासदार गिरीश बापट यांच्या भक्कम पक्षबांधणीमुळे पाचवेळा या मतदारसंघातून भाजपाला विजय मिळाला. आजही ते पक्षाचं काम रुग्णालयातून करत आहेत. त्यामुळे बापट साहेबांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून शहरातील प्रत्येक पदाधिकारी काम केले पाहिजे.

मुळीक पुढे म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीमध्ये तिकीट वाटपावरून वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे हास्यास्पद नेतृत्व ठरत आहेत. सध्या ते ‘भारत जोडो’ यात्रा करत आहेत. पण त्यांचेच पणजोबा जवाहरलाल नेहरू यांच्या काळात भारताची फाळणी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचार सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे अशा पक्षांना लोक उभे करणार नाहीत. भारतीय जनता पक्षालाच कसब्याची जनता विजयी करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. माधुरी मिसाळ म्हणाल्या की, यंत्र, तंत्र आणि मंत्र या त्रिसूत्रीवर आपण काम केले, तर कसबा विधानसभा मतदारसंघ आपल्याला सहज जिंकणे शक्य आहे. इथला प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी आपुलकी जपतो; आणि हीच आपुलकी आणि प्रेम भारतीय जनता पक्षाला सातत्याने मिळाले आहे. त्यामुळे आपण कसबाची पोटनिवडणूक शंभर टक्के जिंकू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा उपाध्यक्ष संजय नाना काकडे म्हणाले की, कसबा आणि चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील भाजपाचे बालेकिल्ले आहेत‌. पण तरीही कार्यकर्त्यांनी पोटनिवडणुकीत गाफील राहू नये. पक्ष नेतृत्व ज्यांना उमेदवारी देईल, त्यांचा सर्वांनी एकत्रितपणे प्रचार करुन निवडून आणू‌, अशी अपेक्षा व्यक्त केली.

संघटन सरचिटणीस राजेश पांडे म्हणाले की, आज मोदींचे नेतृत्व जनसानसात आज रुजलेलं आहे.‌याचं एकमेव कारण म्हणजे बूथ वरील कार्यकर्ता. बूथ कार्यकर्ता हा पक्षाचा पाया आहे. त्यामुळे बूथ कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचावे अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

बैठकीचे प्रास्ताविक मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू काकडे यांनी केले. तर छगन बुलाखे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Higher education | येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

Categories
Breaking News Education Political पुणे महाराष्ट्र

बालभारतीचा ५६ वा वर्धापनदिन संपन्न

येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे | येत्या शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज केले.

बालभारतीच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण सचिव रणजित सिंग देओल, ज्येष्ठ समीक्षक व प्रमुख वक्ते डॉ. श्रीपाल सबनीस, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक, उपसंचालक औदुंबर उकिरडे, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या विषयावरील थेट प्रसारित मार्गदर्शनपर भाषण विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.

बालभारतीच्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन श्री. केसरकर म्हणाले, आपल्या जीवनात बालभारतीचे एक आगळे वेगळे स्थान आणि महत्व आहे. बालभारतीचे आजवरचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे आहे. बालभारती हा पुस्तक निर्मिती करणारा विभाग असला तरी पुढील काळासाठी चित्रफीतीद्वारे लहान मुलांना शिक्षणाची सोय करण्यात येत आहे.

देशात नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यातून विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. येत्या १० वर्षात भारत हा जगातील तरुण देश असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्वाचा विकास करून भारताचे नेतृत्व करावे. अभियंता, डॉक्टर हे करिअरचे एकमेव क्षेत्र नसून विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात उत्कृष्ठ काम करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा -२०२३’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनाचा परीक्षांना सामोरे जाताना चांगला फायदा होईल असे सांगून दहावी-बारावीच्या आगामी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा तणाव न घेता परीक्षांना चांगल्या प्रकारे सामोरे जाऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी किशोर विभागाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यास बालभारतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

Pariksha pe Charcha | क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

Categories
Breaking News Education Political देश/विदेश पुणे

क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळेत ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम संपन्न

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या परीक्षा पे चर्चा २०२३ कार्यक्रमाद्वारे शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या क्रांतीवीर लहुजी वस्ताद शाळा येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी लेखन पॅड आणि कंपास साहित्य भेट दिले. तसेच परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

माजी नगरसेविका अर्चनाताई पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे दोन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत. दहावी, बारावी झाल्यानंतर आता मागे पाहायचे नाही. नंतरच्या शिक्षणात तुम्हाला कुठेही काहीही अडचण आली तर सांगा आपण ती नक्की सोडवू. शिकून आपल्याला चांगले काम करायचे आहे. ही जिद्द मनात ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवा.” यावेळी तुषार पाटील, क्रांतिवीर लहुजी वस्ताद शाळेच्या मुख्याध्यापिका संकपाळ मॅडम, सतीश साठे, सीमा खेडेकर, विक्रम खेनट यांच्यासह शिक्षक, पालक उपस्थिती होते.

Mohan Joshi Vs Chandrkant Patil | चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ? | मोहन जोशी यांचा सवाल

Categories
Breaking News PMC Political पुणे

चंद्रकांतदादा, क्या हुआ तुम्हारा वादा ?

– मोहन जोशी यांचा सवाल

पुणे | पुण्याची मेट्रो कधी पूर्ण होणार या प्रश्नावर ‘तारीख पे तारीख’ असेच उत्तर भाजपाने तयार ठेवले आहे. याचे कारण म्हणजे गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावरील मेट्रोचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा नवा वायदा पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. आता २६ जानेवारी हा दिवस उलटून गेला. म्हणूनच यावर असे विचारावेसे वाटते की, चंद्रकांतदादा, क्या तुम्हारा वादा ? प्रदेश काँग्रेस चे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी हा सवाल केला आहे.

जोशी म्हणाले, आता म्हणे मार्च महिन्याचा वायदा करण्यात येत आहे. जनतेला वायदे करायचे, आश्वासने द्यायची आणि ती पूर्ण करायची नाहीत ही त्या भाजपची नीती बनली आहे. ‘अच्छे दिन लायेंगे’, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार’, ‘गॅस, पेट्रोल, ‘डीझेल दरवाढ कमी करणार’ , ‘महागाई कमी करणार’, ‘दरवर्षी २ कोटी नवे रोजगार निर्माण करणार…’ असे असंख्य वायदे भाजपच्या मोदी सरकारने केले. मुख्य म्हणजे असे अनेक वायदे करताना जनतेला आपण बांधील आहोत असे ते मानत नाहीत. त्यांचे वायदे ‘हेडलाईन मॅनेजमेंट’पुरतेच असतात. आदरणीय चंद्रकांतदादा पाटीलदेखील याच मुशीत घडले आहेत. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोबाबत प्रत्येकवेळी नवीन वायदे करताना त्यांना ना खंत ना खेद! ‘हेडलाईन छापून येण्यापुरताच त्यांचा पुण्याच्या विकासाशी संबंध आहे. त्यामुळेच आता नवा वायदा करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाच्या खात्यांमध्ये ‘वायदामंत्री’ हे नवे खातेदेखील स्वीकारावे. सुज्ञास अधिक सांगणे न लागे !

जोशी पुढे म्हणाले, दीर्घकालीन पाठ्पुराव्यानंतर काँग्रेस पक्षाने पुण्याॉत मेट्रो प्रकल्प आणला. मात्र भाजप राजवटीत काम रेंगाळले व अखेरीस मागीलवर्षी मार्च महिन्यात जेमतेम १२ किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले. आताही गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याचे पुण्याचे पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आता २६ जानेवारी दिवस उजाडला. आता नवा वायदा मार्च महिन्याचा ! तसेच, पुण्यातील ३३ किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

 

By-Election | विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल | २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

विधानसभा पोट निवडणूक मतदानाच्या तारखेत बदल

| २६ फेब्रुवारी रोजी होणार मतदान

पुणे |  भारत निवडणूक आयोगाने पुणे जिल्ह्यातील २१५- कसबा पेठ व २०५- चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार २७ फेब्रुवारीऐवजी रविवार २६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे.

आमदार मुक्ता शैलेश टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठची, तर आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १८ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामध्ये बदल करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आले आहे.

सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. या पोटनिवडणुकीसाठी मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. मंगळवार ७ फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असेल. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी बुधवार ८ फेब्रुवारी २०२३ रोजी होईल. शुक्रवार १० फेब्रुवारी २०२३ उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होईल. गुरुवार २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती प्र. उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले यांनी दिली आहे.
०००००

Pakistan Economy | पाकिस्तानी रुपयाची भयानक घसरण | एका दिवसात 25 रुपयांनी घट | आता 1 डॉलरच्या तुलनेत ही किंमत

Categories
Breaking News Commerce देश/विदेश

पाकिस्तानी रुपयाची भयानक घसरण | एका दिवसात 25 रुपयांनी घट | आता 1 डॉलरच्या तुलनेत ही किंमत

 बुधवारी पाकिस्तानी रुपया प्रति डॉलर 230 रुपयांवर बंद झाला होता.  गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही तासांतच तो आणखी घसरून 255 रुपयांवर आला.  सरकारने याबाबत सध्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
 गंभीर संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या चलनात गुरुवारी डॉलरच्या तुलनेत प्रचंड घसरण नोंदवली गेली.  आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदत पॅकेजच्या पुढील हप्त्याबाबत सरकारने कठोर अटी मान्य करण्याचे संकेत दिल्यानंतर चलनाचे मूल्य घसरले आहे.  बुधवारी पाकिस्तानी रुपया प्रति डॉलर 230 रुपयांवर बंद झाला होता.  गुरुवारी बाजार सुरू झाल्यानंतर काही तासांतच तो आणखी घसरून 255 रुपयांवर आला.  सरकारने याबाबत सध्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
 मदत पॅकेज जारी करण्यासाठी पाकिस्तान आयएमएफशी चर्चा करत आहे
 कर्ज परतफेडीत चूक टाळण्यासाठी पाकिस्तानला $6 अब्जच्या मदत पॅकेजपैकी $1.1 अब्जचा महत्त्वाचा हप्ता मिळवायचा आहे.  मदत पॅकेज जाहीर करण्यासाठी पाकिस्तान आयएमएफशी चर्चा करत आहे.  विश्लेषक अहसान रसूल यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानी रुपयाची घसरण हे एक संकेत आहे की पाकिस्तान सध्या IMF कडून आवश्यक कर्ज मिळविण्याच्या अगदी जवळ आहे.
 पाकिस्तान मदत पॅकेजसाठी कठोर अटी स्वीकारण्यास तयार आहे
 काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले होते की, त्यांचे सरकार गेल्या काही महिन्यांपासून रखडलेले 6 अब्ज डॉलरचे मदत पॅकेज पुनर्संचयित करण्यासाठी आयएमएफच्या कठीण अटी स्वीकारण्यास तयार आहे.  परकीय चलनाचा साठा कमी होत असताना पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट आहे.
 पाकिस्तानच्या निर्यातीवर मोठे संकट निर्माण झाले आहे
 पाकिस्तानच्या निर्यातीवरही खूप वाईट काळ आहे.  खरं तर, पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या विदेशी शिपिंग कंपन्या त्याच्यासाठी त्यांची सेवा बंद करण्याचा विचार करत आहेत.  अशा स्थितीत देशातील सर्व निर्यात ठप्प होऊ शकते.  पाकिस्तान शिप एजंट असोसिएशन (PSAA) चे अध्यक्ष अब्दुल रौफ यांनी अर्थमंत्री इशाक दार यांना पत्र लिहून इशारा दिला आहे की शिपिंग सेवांमध्ये कोणत्याही व्यत्ययामुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Solid Waste Management | पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग होणार ‘आत्मनिर्भर’!

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग होणार ‘आत्मनिर्भर’

| सेवक वर्गाला केले जाणार तांत्रिक दृष्ट्या सक्षम

पुणे | महापालिकेचा घनकचरा विभाग आता आत्मनिर्भर होणार आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये कार्यरत तांत्रिक सेवक वर्गाला घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियमावली (MSW Rule २०१६) चे अनुषंगाने तांत्रिक दृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. त्यासाठी  निरी नागपूर (NEERI- National Environmental Engineering and
Research Institute) या भारतातील पर्यावरण अभियांत्रिकी संशोधनातील एकमेव शासकीय संस्थेची नेमणूक करून त्यांचे मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये तांत्रिक समिती (Technical Cell) स्थापन केली जाणार आहे. या समितीस २ वर्ष प्रशिक्षण देऊन त्यांना तांत्रिक दृष्ट्या सक्षम केले जाणार आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
पुणे शहरात ऑक्टोबर २०१७ पूर्वी दैनंदिन सुमारे १६०० ते १७०० मे.टन कचरा निर्माण होत होता.  ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावे व माहे जुलै २०२१ पासून पुणे महापलिकेच्या कार्यक्षेत्रात नव्याने २३ गावे समाविष्ठ झाल्याने दैनंदिन कचरा निर्मिती २२०० ते २३०० मे.टन पर्यंत होत आहे. 2017 मध्ये, PMC च्या घनकचरा विभागाने CSIR-NEERI च्या SWM विभागाशी MSW प्रोसेसिंग प्लांटच्या तांत्रिक ऑडिटसाठी संपर्क साधला होता. निरी संस्थेने 35 लाख रुपयेच्या शुल्कासाठी ऑडिट केले होते आणि PMC परिसरामध्ये MSW प्रक्रिया संयंत्रांच्या सुधारणेसाठी विशिष्ट शिफारसी दिल्या होत्या. त्या शिफारशी त्यावेळीच्या कचरा प्रक्रिया परिस्थितीस अनुसरून विशिष्ट होत्या. तांत्रिक लेखापरीक्षणादरम्यान असे आढळून आले की PMC SWM कर्मचाऱ्यांना MSW प्रक्रियेबद्दल पुरेसे तांत्रिक ज्ञान नव्हते आणि त्यांनी यापूर्वी MSW प्लांटसाठी कोणतेही अंतर्गत तांत्रिक लेखापरीक्षण केले नव्हते. त्यामुळे लेखापरीक्षणाच्या अंतिम सादरीकरण दरम्यान तत्कालीन महापालिका आयुक्त, यांनी “(NEERI- National Environmental Engineering and Research Institute) ने PMC ला प्रत्येक वेळी अशी तांत्रिक मदत देण्याऐवजी PMC-SWM तांत्रिकदृष्ट्या “आत्मा-निर्भर” बनविणेसाठी  PMC च्या कर्मचाऱ्यांना सर्व MSW प्रोसेसिंग प्लांट्ससाठी तांत्रिक बिंदूंबद्दल योग्य मार्गदर्शन केले तर ते अधिक चांगले होईल” असे नमूद केले व त्यानुसार प्रस्ताव सादर करणे बाबत पत्रा द्वारे कळविले. व त्यानुसार निरी नागपूर यांनी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात तांत्रिक समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव माहे डिसेंबर २०१९ मध्ये सादर केला होता. परंतु तदनंतर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सदर प्रस्तावाबाबत पुढील कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
पुणे महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापना करिता स्वतंत्र विभाग कार्यान्वित आहे. शहराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कार्यक्षमतेने होणे आवश्यक आहे.. सदर विभागाचे विभाग प्रमुख उपायुक्त स्तराचे अधिकारी असून त्यांच्या नियंत्रणा खाली स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत शाखेचे २० अभियंता (कार्यकरी १९ (अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता) कार्यरत आहेत. सदर तांत्रिक सेवकांना पर्यावरण संबंधित तज्ञ ज्ञान नाही ही वस्तूस्थिती आहे. सबब त्यांचे तांत्रिकदृष्ट्या सक्षमीकरण करणे आवश्यक आहे. या कारणाने निरी, नागपूर या संस्थेकडून पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात तांत्रिक समिती स्थापन करणेबाबत पुनश्चः नव्याने प्रस्ताव मागविण्यात आला. सदर प्रस्ताव अभ्यासून प्रस्तावाच्या अनुशंगाने काही मुद्द्यांबाबत निरी संस्थेकडून स्पष्टीकरण घेण्यात आले आहे.
कार्यपद्धती (Work plan)

उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पुढील कार्य योजना आखण्यात आली आहे.

SWMTC साठी PMC अधिकारी आणि ऑपरेटर टीम सदस्यांची ओळख.
MSW प्रोसेसिंग प्लांटच्या तांत्रिक बाबी समजून घेण्यासाठी SWMTC अधिकाऱ्यांना शिक्षित / प्रशिक्षित करणे
SWMTC अधिकाऱ्यांना तंत्रज्ञान आणि प्रक्रियेच्या संदर्भात तसेच घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 2016 चे पालन करण्याच्या संदर्भात कमतरता ओळखण्यासाठी शिक्षित आणि प्रशिक्षित करणे,
• SWMTC ला तांत्रिक अहवाल आणि कागदपत्रांसह मदत करणे.
PMC च्या सर्व MSW व्यवस्थापन समस्यांवर तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करणे.
PMC अंतर्गत MSW प्रोसेसिंग प्लांटमध्ये तांत्रिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी SWMTC अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे,.
PMC मधील MSW प्रक्रियेशी संबंधित प्रस्तावांच्या तांत्रिक तपासणीसाठी SWMTC ला मदत करणे.
क्षमता, कार्यप्रदर्शन, डिझाइन आणि अभियांत्रिकी, ऑपरेशनल प्रक्रिया, उत्पादन गुणवत्ता, पर्यावरणीय मानदंड, सौंदर्यशास्त्र इत्यादींच्या संदर्भात वनस्पती विशिष्ट मूल्यांकन करण्यासाठी SWMTC ला शिक्षित
करणे
• प्रकल्प कालावधी (Project Cost)
प्रकल्पाचा एकूण कालावधी देय रक्कमेच्या पहिला हप्ता मिळाल्यापासून २४ महिने असेल व दर सहा महिन्यांनी अर्धवार्षिक अहवाल सादर केला जाईल.
प्रकल्पाचा खर्च
कर वगळून “सल्लागार” प्रकल्प म्हणून एकूण प्रकल्प खर्च रु. ३५ लाख (पस्तीस लाख) आहे. यामध्ये वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (CSIR) नियमांनुसार मनुष्यबळ, (NEERI- National
Environmental Engineering and Research Institute) कर्मचाऱ्यांना भेट देण्यासाठी TA/DA, आकस्मिकता (Contingencies) आणि संस्था ओव्हरहेडसाठी शुल्क समाविष्ट आहे CSIR चे प्रचलित
धोरणाप्रमाणे आहे.

CNG Vehicles | सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी बातमी |सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी बातमी |सीएनजी पंप चालक मध्यरात्रीपासून संपावर

पुण्यात सीएनजी पंप चालकांनी उद्यापासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे सीएनजी वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

टोरंट कंपनीने नफ्याचा हिस्सा न दिल्याने या संपाची घोषणा करण्यात आली असून, या संपामध्ये पुणे ग्रामीणमधील सर्व पंप चालक सहभागी होणार आहे. यामुळे उद्यापासून पुण्याच्या ग्रामीण भागातील सीएनजी पंप बंद राहणार आहे.

पुणे शहरातील ‘एमएनजीएल’ची सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. ‘उद्यापासून टोरंट कंपनीच्या डीलरने सीएनजी खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने १-११-२०२१ रोजी सीएनजी विक्रीतील नफ्फ्याच्या हिस्साचं सुधारित परिपत्रक जारी केलं होतं. त्यानंतरही टोरंट कंपनीने एकही रुपया वाढवून दिलेला नाही’. त्यामुळे पंप चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.

Rotating washing’ centre | पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

Categories
Breaking News social पुणे

पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर

|  बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्यासाठी होणार वापर

| फिटर  बाबासाहेब मुलाणी यांच्या कडून ३ दिवसात निर्मिती.

| कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे होणार स्वच्छ.

बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बसथांबे पाण्याने धुवून स्वच्छ करणेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या पिंपरी आगारात कार्यरत असलेले बेंच फिटर बाबासाहेब मुलाणी यांनी कल्पना लढवून ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार करून बी.आर.टी. बसथांबे स्वच्छ करणे सोपे केले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अनेक यांत्रिकी बाबींशी संलग्न काम करणारे कर्मचारी हे कल्पकता लढवून आपल्या परीने कामात सोपेपणा
आणण्यासाठी नावीन्यपूर्ण गोष्टी करत असतात. बी.आर.टी. मार्गावरील अस्वच्छ बसथांबे स्वच्छ करण्याच्या अडचणी दूर करण्यासाठी पिंपरी आगाराचे आगार व्यवस्थापक भास्कर दहातोंडे व पिंपरी आगार अभियंता राजकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली बाबासाहेब मुलाणी यांनी १ एच.पी.ची मोटर, २ हजार लिटर पाण्याची टाकी व अन्य टाकाऊ साहित्या पासून सर्व्हिस व्हॅन मध्ये ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केले आहे.

एका बी.आर.टी. बसथांब्यावरून दुसऱ्या बसथांब्यावर जाऊन कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे पाण्याने धुवून स्वच्छ करणे शक्‍य होणार असल्याने ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार करण्याबाबत आगार व्यवस्थापक  भास्कर दहातोंडे व आगार अभियंता  राजकुमार माने व  बाबासाहेब मुलाणी यांनी विचार केला, यासाठी पार्ट कोणतेवापरायचे ? त्याची रचना कशी करायची ? याचा अभ्यास करून त्यांनी एक डिझाईन तयार करून पार्ट्स बनवून घेतले व ते सर्व्हिस व्हॅन मध्ये जोडले. सिंगल फेज विजेवर चालणारी मोटार जोडून ३ दिवसांच्या प्रयत्नानंतर हे ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार झाले आहे. एका बी.आर.टी. बसथांब्यावरून दुसऱ्या बसथांब्यावर जाऊन कमी वेळेत व कमी मनुष्यबळात बसथांबे पाण्याने धुवून स्वच्छ करणे सोयीस्कर झाले आहे. ‘फिरते वॉशिंग’ सेंटर तयार केल्याबद्दल आगार व्यवस्थापक  भास्कर दहातोंडे, आगार अभियंता राजकुमार माने व फिटर श्री. बाबासाहेब मुलाणी यांचे महामंडळाचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया व सहव्यवस्थापकीय संचालक प्रज्ञा पोतदार – पवार यांनी कौतुक केले.

Mula mutha River beutification | मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विदयार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप

Categories
Breaking News PMC Political पुणे

मुळा मुठा नदी सुशोभीकरण प्रकल्पासाठी विदयार्थ्यांना वेठीस धरण्यास राष्ट्रवादी अर्बन सेलचा आक्षेप

पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या मुळा मुठा नदी सुधार व सुशोभीकरण योजनेसंदर्भातील त्रुटी व धोके राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आपल्या निदर्शनास आणले होते. यासाठी पुणेकर नागरिक व पुणे मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तज्ञाकडून सदर प्रकल्पाचे सादरीकरण देखील आयोजित केले होते. या प्रकल्पामुळे नदीची वहन क्षमता कमी होऊन पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असे आम्ही आपणास वारंवार सूचित करत आलो आहे. राज्य शासनाच्या पातळीवर देखील अनेक तज्ञ पुणेकरांच्या वतीने या शंका मांडल्या गेल्या होत्या व जोपर्यंत या शंकाचे निरसन होत नाही तोपर्यंत सदर नदी सुधार प्रकल्पाचे काम बंद ठेवावे असे ठरले असता, आता दुर्दैवाने पुणे मनपाच्या वतीने सदर प्रकल्प पुढे रेटण्याचे काम सुरु आहे. असा आरोप खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

खासदार चव्हाण म्हणाल्या, काही नागरिकांनी आमच्या निदर्शनास आणून दिले आहे कि पुणे महानगरपालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत योजनेस नागरिकांचा पाठिंबा असल्याचे दर्शवण्यासाठी नागरिकांचे प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत आहे. असा प्रयत्न अत्यंत धक्कादायक व निंदनीय आहे. पुणे शहरातील इतर महत्वपूर्ण प्रकल्पासाठी नागरिकांच्या सूचना ऐकल्या जात नाहीत व त्यांच्या भावनेचा कुठेच आदर केला जात नाही. मात्र आता लहान मुलांना वेठीस धरून बक्षिसांची आमिष दाखवून, त्यांची दिशाभूल करून त्यांचा माध्यमातून त्यांच्या पालकांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात येत असून ते चुकीचे व आक्षेपार्य आहे.

हा प्रकल्प मुळात तांत्रिक दृष्ट्या सदोष असल्याने व त्यामुळे पुणेकरांवर गंभीर नैसर्गिक संकट ओढण्याची शक्यता असल्याने सदरचा प्रकल्प नागरिकांच्या पाठींब्याने होत आहे असे दर्शविण्याचा प्रशासनाचा अट्टहास दिसत आहे. आमची विनंती आहे कि हि मोहीम महानगरपालिकेने ताबडतोब मागे घ्यावी.

सदर पत्रकार परिषदेस खा. वंदना चव्हाण यांच्यासमवेत, प्रवक्ते प्रदीप देशमुख , नितीन कदम उपस्थित होते