2000 Rupees Note | RBI | पुणे राष्ट्रवादी च्या वतीने RBI कार्यालयाच्या बाहेर २००० च्या नोटांना श्रद्धांजली 

Categories
Breaking News Commerce Political social देश/विदेश पुणे

2000 Rupees Note | RBI | पुणे राष्ट्रवादी च्या वतीने RBI कार्यालयाच्या बाहेर २००० च्या नोटांना श्रद्धांजली

2000 Rupees Note | RBI | १९ मे २०२३ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) ने अचानकपणे माहितीपत्रक जारी करत दोन हजार रुपयांच्या नोटा (2000 Rupees Note) चलनातून कमी करत असल्याचे सांगितले. आणि पुन्हा एकदा संपूर्ण भारतीय नागरिकांकरिता दुसरी नोटबंदी जाहीर करत नोटा बदलून घेण्याच्या त्रासदायक कार्याचा प्रारंभ करण्यात आला. असा आरोप करत आणि याच्या विरोधात पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP Pune Agitation) च्या वतीने पुण्यात RBI च्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. (RBI  on 2000 Rupees Note)

“मुळात मोदी सरकारने (Modi Government) ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी करुन पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली व आज जवळजवळ सहा वर्षांनंतर ती नोटही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला व ही नोट देशाच्या अर्थव्यवस्थेकरीता किती पोषक आहे हे भाजपचे समर्थक गेली अनेक वर्षे घसा फोडून सांगत आहेत, मात्र आज त्या सर्वांना मोदींनी तोंडावर पाडले आहे. कुठलीही माहिती न घेता केवळ प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने देशातील अर्थव्यवस्थेमध्ये जाणीवपूर्वक असे बदल मोदी सरकारने केले आहेत. आजवर नोटबंदीचा काय फायदा झाला हे कुठल्याही स्तरावर केंद्र सरकारला सिद्ध करता आलेले नाही, असे असताना पुन्हा ही दुसरी नोटबंदी जाहीर झाल्याने पहिल्या नोटबंदीचे फायदे सांगणाऱ्या मोदी भक्तांना शोकअनावर झाला आहे. भक्तांच्या ह्या दुःखात सहभागी होण्याकरीता आज ह्या नोटेचा श्रध्दांजली कार्यक्रम करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City president Prashant Jagtap) यांनी सांगितले.

या वेळी
“परत द्या परत द्या , नोटेतील चिप परत द्या “
“चांगभल चांगभल नोटबंदीच्या नावाने चांगभल “
“यु टर्न सरकार… मोदी सरकार “
“नोटबंदी कशाला कसबा कर्नाटच्या बदला ध्यायला “
अश्या प्रकारच्या घोषणा  देण्यात आल्या (NCP Pune agitation)

या शोकसभेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , बाळासाहेब बोडके , अजिंक्य पालकर , मूणालीनी वाणी , सुषमा सातपुते , महेश हंडे , शालिनी जगताप , कुलदिप शर्मा , शुभम माताळे व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


News Title |2000 Rupees Note | RBI | Tribute to 2000 notes outside RBI office on behalf of Pune NCP

Dr. Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें

Categories
Uncategorized

Dr Pradeep Kurulkar Latest News | डॉं. कुरूलकरच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसची तिव्र निदर्शनें

Dr Pradeep Kurulkar Latest News | NCP Agitation | देशाची गुपिते पाकिस्तानला देणाऱ्या संघस्वयंसेवक डॉ. प्रदीप कुरुलकर या DRDO चा प्रमुख शास्त्रज्ञास कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) वतीने करण्यात आली, यासाठी आज निदर्शने करण्यात आली. (DRDO Scientist Dr Pradeep Kurulkar Latest News)

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (NCP City President Prashant Jagtap) यांनी सांगितले कि,  कुरुलकर याला ISI साठी हेरगिरी करताना पोलिसांनी पुण्यात पकडला. याने आजपर्यंत ISI ला काय गोपनीय माहिती पुरवली आणि देशाचं किती नुकसान केलंय, याचीही चौकशी व्हावी या मागणीकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बालगंघर्व चौक येथे करण्यात आलेल्या निदर्शनास उत्तम प्रतिसाद लाभला. (NCP Pune News)

डॉ कुरूलकर हा माझ्या चार पिढ्या संघाचे काम करीत आहेत व माझ्यावर संघाचे संस्कार आहे, मी आर एस एस चा शाखा प्रमुख असून त्याकरीता कार्य करत असल्याचे अभिमानाने सांगतानाच्या व्हीडीओ क्लिप प्रसार माध्यमांमघ्ये पहायला मिळत आहेत , ज्या संघटनेच्या स्वयंसेवकाला देशद्रोहाच्या गुन्ह्यत अटक होते त्या संघटनेने अजूनही त्या व्यक्तीचे निलंबन केलेले नाही यावरूनच या संघटनेचे देशप्रेम लोकांना समजून येत
आहे , जर सदरील व्यक्ती ही इतर कोणत्याही समाजातील असती तर याच मंडळीनी संपूर्ण भारत आज नंगानाच केला असता. संबंधित यंत्रणांनी कोणत्याही दबावास बळी न पडता सदर व्यक्तीची कठोर चौकशी करून त्याच्याबाबत सर्व पुरावे गोळा करून त्यास जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.


सदर प्रसंगी *भारत माता की जय *
*पाकिस्तान मुर्दाबाद *पाकिस्तानचा ऐंजट कोण , आर एस एस चा स्वयंसेवक ..स्वयंसेवक *जबाव दो जबाब दो नरेंद्र मोदी जबाब दो * या धोषणा देवून कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला

शहराघ्यक्ष प्रशांत जगताप , प्रवक्ते प्रदीप देशमुख , विनोद पवार , बाबा पाटील , सुवर्णा माने , प्रदीप हुमे , वंदना साळवी , सुनिल पडवळ , विशाल गद्रे , राहूल तांबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थीत होते .

Dr. Pradeep Kurulkar Latest News | Dr. Strong protests of NCP against Kurulkar

NCP Pune Celebration | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Celebration | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पेढे वाटून साजरा केला आनंदोत्सव

|  पवारसाहेबांच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवंचैतन्य – प्रशांत जगताप

NCP Pune Celebration |  “लोक माझे सांगाती” या आत्मचरित्राच्या (Lok Majhe Sangati – Autobiography) प्रकाशन प्रसंगी लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार (Sharad pawar) यांनी जाहीर केलेला पक्षाध्यक्षपद निवृत्तीचा निर्णय आज देशभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नेत्यांच्या विनंतीनंतर अखेर मागे घेतला आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP Pune) पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी भवन येथे ढोल ताशांच्या गजरात, फटाके वाजवून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. (NCP Pune Celebration)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी “देशाचा बुलंद आवाज…शरद पवार..शरद पवार” , “पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” , “देश का नेता कैसा हो पवार साहेब जैसा हो” अशा घोषणा देत संपूर्ण राष्ट्रवादी भवनचा परिसर दणाणून सोडला. (NCP Chief Sharad pawar)

यावेळी आनंदोत्सव साजरा करताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Pune President prashant jagpat ) म्हणाले की, “गेली सहा दशके देशाच्या, राज्याच्या राजकारणातील ‘शरद पवार’ हे नाव कुणालाही, कुठेही थांबवता आलेलं नाही. देशाच्या कृषी, कला, क्रीडा, समाजकारण, राजकारण, संस्कृतीक व औद्योगिक क्षेत्रात आदरणीय पवारसाहेबांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. या सर्व क्षेत्रांमध्ये पवारसाहेबांनी आपल्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आजही ‘आदर्शवत’ असे आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये आदरणीय पवारसाहेबांची देशाला व राज्याला नितांत आवश्यकता असताना आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेला हा निर्णय आम्हा कार्यकर्त्यांना धक्कादायक असाच होता.ज्यांना आदर्श मानत आमची पिढी राजकारणात आली,त्या नेतृत्वाच्या छायेत काम करत असताना त्या नेतृत्वाकडून अचानक पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा ऐकून कुठल्याही कार्यकर्त्याला आपल्या भावना आवरता येणार नाहीच,अशी परिस्थिती असताना कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आदरणीय साहेबांनी आज आपला निर्णय मागे घेतला आहे. आदरणीय साहेबांचा आधार पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला हवा आहे. देश एका अराजकतेच्या उंबरठ्यावर असताना आदरणीय साहेबांनी हा निर्णय मागे घेतल्याने, देशातील परिवर्तनाची ही लढाई जिंकण्यासाठी आता आम्ही सर्वजण सज्ज आहोत. (NCP Pune News)

आदरणीय साहेबांनी आपला निर्णय मागे घेतल्याबद्दल साहेबांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दिपकभाऊ मानकर, दत्ताभाऊ सागरे, किशोर कांबळे, महेश हांडे, सुषमा सातपुते, समीर शेख, संदीप बालवडकर, गणेश नलावडे, राजश्री पाटील, नाना नलावडे, आनंद सागरे, भक्ती कुंभार , कुलदीपशर्मा , रोहन पायगूढ़े, फहीम शैख़ यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Resigns news |  Finally all office bearers of NCP in Pune resigned

NCP Pune Resigns  news |  NCP President Sharad Pawar has announced his resignation from the post of President.  The news was heard and all office bearers of NCP Pune in Pune resigned.  Activists gathered at NCP Bhavan to protest Sharad Pawar’s resignation.  All the activists present led by spokesperson Pradeep Deshmukh were present outside the party office.  (NCP Pune Resigns news)
 Speaking on the occasion, Deshmukh said, NCP is a family.  Pawarsaheb is the patriarch of the house.  A family elder can never retire.  Therefore, we are all adamant on resignation till the time sir does not change the decision.  (Sharad Pawar Latest News)
 All the workers were overwhelmed with emotions at this time. Tears were not stopping.  Announcements were being made to withdraw the resignation.  (NCP Pune Resigns news)
 Spokesperson Pradeep Deshmukh, Ravindra Malwadkar, Sadanand Shetty, Munalini Vani, Nilesh Nikam, Kaka Chavan Ajinkya Palkar, Vikram Jadhav, Faim Sheikh, Gurumit Singh Gill and other prominent activists were present in large numbers.  (Pune Rashtravadi news)

NCP Pune Resigns Marathi news | अखेर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune Resigns Marathi news | अखेर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

NCP Pune Resigns Marathi news | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar retirement) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ही बातमी समजली आणि पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Pune) सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. शरद पवार (Sharad Pawar resigns) यांना साकडे घालण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्ते जमा झाले. प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित सर्व कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर उपस्थीत होते. (NCP Pune Resigns Marathi news)

याप्रसंगी बोलताना देशमुख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक परिवार आहे. पवारसाहेब हे घरातील वडीलधारे कर्ते आहेत. घरातील वडीलधारे कधीही रिटायर होऊ शकत नाही. त्यामुळे साहेब निर्णय बदलत देत नाही तोपर्यंत आम्हीही सर्वजन राजीनाम्यावर ठाम आहोत. (Sharad pawar Latest News)

सगळ्याच कार्यकर्त्यांना यावेळी भावना अनावर झाल्या होत्या.अश्रू आवरत नव्हते. राजीनामा मागे घ्या अशा घोषणा दिल्या जात होत्या. (NCP Pune Resigns news)

प्रवक्ते प्रदीप देशमुख , रविंन्द्र माळवदकर , सदानंद शेट्टी , मुणालिनी वाणी , निलेश निकम , काका चव्हाण अजिंक्य पालकर, विक्रम जाधव , फईम शेख , गुरूमितसिंग गिल व इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Pune Rashtravadi news)

NCP Pune latest news | Sharad pawar पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काय चाललंय? सगळे पदाधिकारी राजीनामा देणार? 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

NCP Pune latest news | Sharad pawar पुणे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काय चाललंय? सगळे पदाधिकारी राजीनामा देणार? 

NCP pune Latest News |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी (sharad pawar quit) पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये ‘लोक माझा सांगाती’ (Lok Majhe Sangati Book) या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही निवृत्तीची घोषणा केली. पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनीही शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.  पुणे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. (NCP pune city president News in Marathi)

पुणे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (ncp pune city president Prashnat Jagtap) ट्विट करत म्हणाले, “कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही (Sharad pawar) अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही.” पुण्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध दर्शविला आहे. (Sharad Pawar latest news)

Hunger Strike | MLA Sunil Tingre | महापालिका प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आमदार सुनिल टिंगरे यांचे लाक्षणिक उपोषण मागे!

Categories
Breaking News PMC Political पुणे

वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्गी लावणार

|आमदार सुनिल टिंगरे यांना महापालिकेचे लेखी आश्वासन

| लाक्षणिक उपोषण घेतले मागे

पुणे |वडगाव शेरी मतदार संघातील  प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील. पुढील आठवड्यापासूनच त्यावर कार्यवाही होईल असे लेखी आश्वासन महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आमदार सुनिल टिंगरे यांना दिले. त्यानंतर आमदार टिंगरे यांनी या मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण सायंकाळी मागे घेतले.


वडगाव शेरी मतदारसंघात नगर रस्ता, पोरवाल रस्ता वाहतूक कोंडी, रखडलेले रस्ते, खराडी, शास्त्रीनगर, विश्रांतवाडी येथील रखडलेले उड्डाणपूल, लोहगावचा पाणी प्रश्न इत्यादी प्रलंबित प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाकडून त्यावर कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे आमदार सुनिल टिंगरे यांनी या प्रलंबित प्रश्नांसाठी पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ महापालिका भवनासमोर गुरुवारी सकाळ दहा पासून उपोषण सुरू केले होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार जयदेव गायकवाड, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह माजी नगरसेवक महेंद्र पठारे, अविनाश साळवे, उषा कळमकर, मीनल सरवदे, शितल सावंत, अ‍ॅड. रुपाली ठोंबरे पाटील, सतिश म्हस्के, महिला शहराध्यक्ष मृणाली वाणी, राकेश कामठे, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, मतदारसंघाचे अध्यक्ष नाना नलावडे, महिला अध्यक्षा नीता गलांडे यांच्यासह मोठ्या संख्येने मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान आमदार टिंगरे यांनी मांडलेले प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी आमदार टिंगरे यांच्यासह शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर सांगितले. मात्र, आपण मांडलेले प्रश्न नक्की किती कालावधीत सोडविणार यासंदर्भात प्रशासनाने लेखी द्यावे अशी भुमिका घेतली. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपायुक्त सचिन इथापे व शहराध्यक्ष जगताप यांच्या हस्ते लिंबु पाणी घेऊन आमदार टिंगरे यांनी उपोषण मागे घेतले.
—————–

NCP Youth | April Fool | “एप्रिल फुलचा दिवस म्हणजे मोदी विकासाचा वाढदिवस” | राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे

“एप्रिल फुलचा दिवस म्हणजे  मोदी विकासाचा वाढदिवस”

| राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने एप्रिल फुल आंदोलन

भारतीय नागरीकांना खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देशात आणि महाराष्ट्रात फसवा विकास केला आहे, हा फसवा विकास म्हणजेच मोदी विकास. अशी व्याख्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून करण्यात आली आहे. म्हणून मोदी विकासाचा वाढदिवस 1 एप्रिल म्हणजेच “एप्रिल फुल” या दिवशी साजरा करून पुणे शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज डेक्कन येथील गुडलक चौकात प्रतिकात्मक आंदोलन करुन मोदी वाढदिवसाचा केक कापण्यात आला.

दरवर्षी देशात दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देणार, वेदांत फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देणार, पेट्रोल – डिझेल दरवाढ कमी करणार, महागाई कमी करणार, प्रत्येक नागरीकाला पंधरा लाख रुपये देणार अशा अनेक खोट्या घोषणा मोदी यांनी निवडणूकीपूर्वी केल्या परंतु यातील एकही घोषणा त्यांनी पुर्ण केली नाही याचा यावेळी निषेध करण्यात आला.


आंदोलनासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेश कार्याध्यक्ष राकेश कामठे, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर,अभिषेक बोके,मयूर गायकवाड उपस्थित होते.

NCP Vs Gopichand Padalkar | आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा | राष्ट्रवादी काँग्रेसचे पोलिसांना निवेदन

भाजपचे आमदार गोपाचंद पडळकर हे सातत्याने शरद पवार यांच्यावर गरळ ओकत आहेत. त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुणे पोलिसांना केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या निवेदनानुसार लवासा, बारामती व मगरपट्टा हे तीन वेगवेगळे राज्य करण्यात यावे, या तिन्ही राज्यांचे वेगवेगळे मुख्यमंत्री असावेत आणि या तिन्ही राज्यांचा मिळून एक वेगळा देश निर्माण करावा ज्याचे पंतप्रधान पवार साहेबांना करावे, असे वक्तव्य करत देशाचे तुकडे करण्याची भाषा केली आहे. त्यांचे हे वक्तव्य भारताच्या संघराज्य व्यवस्थेला छेद देणारे असून याबाबत गोपीचंद पडळकर यांच्यावर तातडीने देशद्रोषाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच इंदापूर येथील जाहीर सभेत बोलताना “पवार हे या देशाला लागलेली कीड आहे” , असे वक्तव्य करत पवार आडनाव असलेल्या अठरापगड जाती -धर्मातील विविध कुटुंबीयांचा व त्यांच्या जातीचा अवमान केला आहे.यापैकी आदिवासी व मागासवर्गीय या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी वडार समजाचे महेश पवार व घिसाडी समाजाचे माधव पवार यांनी त्यांच्या आडनाव व समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा.

ज्या गुन्हे अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरविण्यात आलं तोच गुन्हा गोपीचंद पडळकर यांच्यावर दाखल करत व आम्हाला देखील न्याय मिळावा, अशी मागणी या पदाधिकाऱ्यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली.  पुणे शहर पोलीस आयुक्त या घटनेचा गांभीर्याने विचार करून यावर कार्यवाही करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

सदर शिष्टमंडळात प्रवक्ते प्रदीप देशमुख , किशोर कांबळे , महेश पवार , माधव पवार , मधुकर पवार , महेश हंडे, शशिकांत जगताप , दिपक कामठे , शुभम मताळे इ प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

NCP pune | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महागाईची होळी

Categories
Breaking News Political पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महागाईची होळी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, जातिवाद तसेच ई.डी.सरकारच्या अनिष्ट व नकारात्मक गोष्टींचे दहन करत प्रतिकात्मक होळी साजरी केली. “नोटबंदीची घोषणा करुन जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्यांना सद्बुद्धी दे रे महाराजा”, “सरकारी कंपन्या विकून जनतेचा रोजगार हिसकाविणाऱ्यांना शिक्षा दे रे महाराजा”, “जाती-धर्मात तेढ वाढवून राजकारण करणाऱ्यांना चोप दे रे महाराजा”, “सत्तेच्या धुंदीत बेताल वागणाऱ्यांना ताळ्यावर आण रे महाराजा “, “पेट्रोल-डिझेल-गॅस महाग करणाऱ्यांना बुद्धी दे महाराजा”, “शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणाऱ्याना अक्कल दे रे महाराजा” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

आज होळी या सणाच्या निमित्ताने आपण घरोघरी असत्य अन्याय अत्याचार यांसह अनेक अनिष्ट तत्वांची होळी करत नकारात्मक गोष्टींतून नव्या सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करत असतो. आज या प्रतिकात्मक होळी च्या माध्यमातून केंद्रातील सत्ताधारी भाजप असो वा राज्यातील शिंदे फडणवीस सरकार असो दोन्ही ठिकाणी सत्ताधारी भाजपमुळे नागरिकांना विविध त्रासांना सामोरे जावे लागले आजही महागाई, जातिवाद, धार्मिक तेढ हे मुद्दे गंभीर बनले असून जर विरोधी पक्षातील कोणी या मुद्द्यांवर आवाज उठवला तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवत छापेमारी, धाडसत्र, अटक यांसारखी दडपशाही करत विरोधी पक्षातील जनतेचा आवाज उचलणाऱ्या नेत्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशातील या संपूर्ण परिस्थितीवर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही, अशा परिस्थितीत या प्रतिकात्मक होळीच्या माध्यमातून सर्व अष्ट प्रवृत्तींचा आम्ही दहन करत आहोत”. असे मत शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केले.

सर्वच महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंच्या बाबत अदानी- अंबानी यांसारख्या मोठ्या उद्योगपतींच्या हातात खाजगीकरणाद्वारे देशाची सूत्रे दिल्याने मोठ्या प्रमाणात महागाईला सामोरे जावे लागत आहे. नुकतीच झालेली गॅस दरवाढ, सातत्याने होत असलेली इंधन दरवाढ, सर्व वस्तूंवर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला जी.एस.टी जीवनावश्यक वस्तू , गोळ्या औषधे यांवर देखील टॅक्स वाढवल्याने सर्वसामान्य नागरिक महागाईने होरपळत आहेत. या सर्वांच्या विरोधात आज या प्रतीकात्मक होळीच्या आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने करण्यात आले आहे.

या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे,डॉ. शंतनु जगदाळे,अनिता पवार,संतोष नांगरे दिपक कामठे,यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.