Bibwewadi | Chetan Chavir | बिबवेवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त  | समस्य सोडवण्याची भाजप नेते चेतन चावीर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Bibwewadi | Chetan Chavir | बिबवेवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त

| समस्य सोडवण्याची भाजप नेते चेतन चावीर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

 

Bibwewadi | Chetan Chavir |बिबवेवाडी परिसराती नागरिक खड्डे, पाणी न येणे, ड्रेनेज लाईन टाकणे, चेंबर दुरुस्ती व राडारोडा अशा विविध समस्यांनी ग्रासले आहेत. या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी भाजप नेते चेतन चावीर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune PMC News)

चावीर  यांच्या निवेदनानुसार  बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक – २८ मध्ये खिलारे,वस्ती ढोले मळा,डायसप्लॉट झोपडपट्टी भागा मध्ये कित्येक महिने खड्डे,ड्रेनेज लाईन टाकणे,चेंबर दुरुस्ती, कमी दाबाने पाणी येणं व राडारोडा उचलणे अश्या अनेक समस्यांना स्थानिक नागरिक तोंड देत आहेत. काही भागात नागरिकांच्या दरवाजा मध्ये चेंबर च घाण पाणी साचून राहत आहे. त्यामुळे वस्ती भागामध्ये रोगराई पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झोपडपट्टी च्या काही भागात पाणी येत नाही. अश्या अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत.

चावीर यांनी पुढे म्आहटले आहे  कि, खात्यातील संबंधित अधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे असं आमच्या लक्षात येत आहे. आमच्या परिसरात कधीपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे,चेंबर दुरुस्ती व पाण्याची लाईन, राडारोडा उचलणे ही सर्व कामे कधी पर्यंत पूर्ण करून देणार आहेत याचं लेखी उत्तर द्यावे. तक्रारी  लवकरात लवकर मार्गी लावाव्यात.

PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा  | महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा

| महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण

 

PMC EV Charging Stations | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीतील विविध ८२ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील २१ स्टेशन चे काम पूर्ण झाले आहे. याचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले आहे.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.  आजपासून नागरिकांना याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.  (PMC Pune News)

 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध ८२ ठिकाणी कार्यालयीन इमारती, वाहनतळ क्षेत्रे, उद्याने, संग्रहालये, सभागृहे, दवाखाने व स्मशानभूमी इ) नागरिकांच्या सोयीकरिता PPP तत्वावर आधारित इलेक्ट्रिक
व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा कालावधी ८ वर्षे आहे. मे. मरीन इलेक्ट्रिकल्स कंपनीला याचे काम देण्यात आले आहे. येणारा सर्व खर्च संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे व त्यामधून येणाऱ्या net profit मधून ५०% शेअर पुणे महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. (Pune PMC News)

नागरिकांना काय करावे लागेल?

चार्जिंग स्टेशन्स नागरिकांनी वापरण्यासाठी प्ले स्टोअर मधून अथवा प्रत्येक चार्जिंग स्टेशन वरील QR कोड स्कॅन करून Bijlify हे App डाउनलोड करून व स्वतःचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करता येईल. सदर App द्वारे हे लोकेशन मॅपच्या सहाय्याने ठिकाण व पार्किंग उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत माहिती सहज कळू शकते तसेच पेमेंट सुविधा सुद्धा App द्वारे उपलब्ध करण्यात आलेली असून चार्जिंग शुल्क (charges) नागरिकांना र.रु. १३ ते १९ प्रति युनिट दर राहणार आहे.  जे इतर खाजगी चार्जिंग स्टेशन दरापेक्षा कमी राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अत्याधुनिक सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात
आले आहे.

| या ठिकाणी आहेत  चार्जिंग स्टेशन्स

१ पुणे महानगरपालिका पार्किंग
२ सावरकर भवन पार्किंग
३ गणेश कला क्रीडामंच
४ यशवंतराव चव्हाण नाटयगृह / बाळासाहेब ठाकरे कलामंदिर
५ बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
६ घोले रोड क्षेत्रिय कार्यालय
७ टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय
८ बालगंधर्व नाट्यगृह
९ स्केचर्स शोरूम जंगली महाराज रोड पार्किंग
१० मॅकडोनाल्ड्स जंगली महाराज रोड पार्किंग
११ लेमन सलन एफ सी रोड पार्किंग
१२ कुशल वाल स्ट्रीट एफ सी रोड पार्किंग
१३ आर्ट स्टेशन पुणे एफ सी रोड पार्किंग
१४ मिलेनिअम प्लाझा एफ सी रोड पार्किंग
१५ पेशवे पार्क पार्किंग
१६ मंडई आर्यन पार्किंग
१७ गुलटेकडी पार्किंग
१८ नवलोबा पार्किंग नं. ३८ शुक्रवार पेठ
१९ पद्मावती पम्पिंग स्टेशन पार्किंग
२० पंडित भीमसेन जोशी ऑडीटोरीअम
२१ संजय गांधी हॉस्पिटल पार्किंग

PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई

| आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार

 

PMC Encroachment Action | औंध परिसरातील (Sai Chowk, Aundh Pune) साई चौक, जयकर पथ येथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) व पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान आता रस्ता मोकळा झाल्याने आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ता चौपदरी केला जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) यांनी दिली. (PMC Pune News)

हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा हद्दीवर येत असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. खडकी रेल्वे स्टेशन पिछाडीस हा चौक येतो. औंध, बोपोडी हद्दीतील नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे म.न.पा ला संयुक्त कारवाई करनेच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे म.न.पा कडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्ती साठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले. त्यानुसार आज  संयुक्त कारवाई करणेत आली. त्यामध्ये सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले.  आले. त्यामुळे साई चौक मोकळा झाला. आज रात्री त्याचे डांबरीकरण करून, ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत येणार आहे.  सध्या उपलब्ध 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24मी पर्यंत रुंदीचा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटनेस मदत होणार आहे.

विकास ढाकणे ढाकणे ( अति.महा.आयुक्त) व रॉबिन बलेचा ( मुख्याधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड) यांचे नियंत्रणाखाली  अनिरुद्ध पावसकर  ( मुख्य अभियंता), साहेबराव दांडगे ( अधीक्षक अभियंता), दिनकर गोजारे ( कार्यकारी अभियंता), संतोष वारुळे ( उपआयुक्त),  दापेकर ,( महा.सहा आयुक्त, औंध क्षेत्रिय कार्यालय) यांनी ही कारवाई केली.


पीएमआरडीए च्या वतीने मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठ चौकात पूल उभारला जाणार आहे. यामुळे वाहतुकीस अडचण होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीस अडचण करत असलेल्या जागांवर अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. अशा सर्व बॉटलनेक वर कारवाई करण्यात येईल. दरम्यान साई चौकातील रस्ता आता चारपदरी केला जाणार आहे.

  • विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा. 

Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका 

Categories
Breaking News PMC social पुणे

Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका

| आगामी काळात 5 हजारहून अधिक कर्मचारी लागण्याची शक्यता

Maratha Samaj Survey | PMC | पुणे | राज्य सरकारच्या आदेशानुसार राज्यभरात मराठा समाज (Maratha Samaj) आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण (Open Category Survey) करण्यात येणार आहे. पुणे शहरात (Pune City) देखील हे काम केले जाणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) 1 हजार 5 कर्मचाऱ्यांची या कामासाठी प्रगणक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान आगामी काळात या कामासाठी 5 हजार हून अधिक कर्मचारी लागण्याची शक्यता आहे.  हे काम कर्मचाऱ्यांना बंधनकारक असणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)
महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम दिले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी भागातील मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पुणे शहरात देखील हे काम असणार आहे. आगामी काळात घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून महापालिकेकडून माहिती मागवण्यात येत आहे. कमी कालावधीत हे काम केले जाणार आहे. त्यासाठी जास्त कर्मचाऱ्यांची यासाठी आवश्यकता आहे. सध्या तरी प्रशासनाकडून विविध खात्यातील 1 हजार 5 कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त केले आहेत. 15 प्रगणकामागे एक पर्यवेक्षक असणार आहे. तर याचे सगळे नियंत्रण हे उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे असणार आहे. आगामी काळात अजून जास्त कर्मचारी लागतील. दरम्यान हे काम कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असेल.   दरम्यान प्रत्यक्ष अजून या कामाला सुरुवात झालेली नाही. सरकारच्या आदेशानुसार याची सुरुवात होणार आहे. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
—-
राज्य सरकारच्या मार्गदर्शनानुसार या सर्वेचे काम केले जाणार आहे. सद्यस्थितीत ऑनलाईन काम सुरु आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. सरकारच्या प्रोटोकॉल नुसार कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी आणखी कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासू शकते.
चेतना केरुरे, उपायुक्त 

Navale Bridge Traffic Pune | ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का? | स्वराज्य पार्टीचा महापालिका प्रशासनाला सवाल

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Navale Brigde Traffic Pune | ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का?

| स्वराज्य पार्टीचा  महापालिका प्रशासनाला सवाल

Navale Bridge Pune Traffic | आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk pune) येथील भुयारी मार्गाला लागून असणारा रस्ता की जो रस्ता कात्रज ते नवले ब्रिज (Katraj: Navale bridge) या महामार्गाला जोडणार असा प्रकल्प आहे. रस्त्यावर खड्डे झाले आहेत. भिंतीवर  ऐतिहासिक वास्तू चे चित्रभित्ती वर प्रशासन खर्च कोणत्या कारणासाठी करते? या ठिकाणी मद्यपींचा वावर आहे. या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू चे धिंडवडे नाचवण्याचे काम प्रशासन करत आहे का? असा सवाल स्वराज्य पार्टीचे सदस्य आशिष भोसले (Ashish Bhosale Swaraj) यांनी केला आहे. (Pune News)
भोसले यांच्या निवेदनानुसार गेले अनेक वर्षे बायपास रस्त्याचे काम मंदगतीने चालू आहे. या भागात पिण्याचे पाणी अजून पोहचले नाही. दुप्पट तिप्पट टॅक्स असून देखील प्रशासन जाणूनबुजून हे करत आहे. भित्तिचित्रे लावून काय साध्य होणार अनेक वर्षे  मंदगतीने काम सुरू असून भुयारी मार्ग ते सिंहगड कॉलेज पर्यंत   ट्राफिक रोज सातत्याने होत आहे. नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.रोज सातत्याने असे अपघाताचे सत्र चालू असून प्रशासनाने यावर तोडगा काढून  हा मार्ग नागरिकांसाठी चालू करावा.  सुस्वच्छ आणि योग्य रस्ते,  या सर्व सुविधांसाठी आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा करत आहोत. खरं तर या ठिकाणी तात्काळ बाणेर/पाषाण/वारजे माळवाडी सारखा प्रशस्त मोठा  भुयारी मार्ग अपेक्षित असून  पुणे महानगरपालिका, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय, पुणे वाहतूक विभाग,राज्य महामार्ग विभाग आणि राष्टीय महामार्ग विभाग आणि  PMRDA आयुक्त यांनी विशेष  लक्ष घालणे गरजेचे झाले आहे. कारण जवळच असलेल्या महाराष्टातील “शिवसृष्टी” या भव्य दालनाचे काम पूर्णत्वास येत असून त्या नंतर अधिकच वाहतूक  परिस्तिथी गंभीर होऊ शकते. या गंभीर वाहतुक कोंडीची तात्काळ  दखल घ्यावी अन्यथा आम्हाला ठिय्या आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही. असा इशारा  आशिष भोसले यांनी दिला आहे.
—-

Pune PMC Charging Station Rates| चार्जिंग स्टेशन मधील चार्जिंग चे दर १३.२५ रु प्रति युनिट ठेवावेत | सजग नागरिक मंचाची मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune PMC Charging Station Rates| चार्जिंग स्टेशन मधील चार्जिंग चे दर १३.२५ रु प्रति युनिट ठेवावेत

| सजग नागरिक मंचाची मागणी

 

Pune PMC Charging Station Rates| पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) उभारत असलेल्या चार्जिंग स्टेशन (PMC Charging Station) मधील चार्जिंग चे दर खूप जास्त ठेवले जाणार आहेत, ते महावितरणने (MSEDCL)  उभारलेल्या चार्जिंग स्टेशन मधील दरांएवढे ठेवावेत. म्हणजेच १३.२५ रुपये प्रति युनिट ठेवावेत. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nargik Manch) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.  (Pune PMC Charging Station Rates)

वेलणकर यांच्या पत्रानुसार विजेवर धावणाऱ्या  वाहनांच्या चार्जिंग साठी पुणे महापालिका शहरात ८२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे, त्यातील २१ ठिकाणची चार्जिंग स्टेशन ची सुविधा शुक्रवार १२ जानेवारी पासून सुरु होणार आहे. या स्टेशनवर चार्जिंग साठी ग्राहकांकडून १३ ते १९ रुपये प्रति युनिट दराने पैसे घेतले जाणार आहेत. मुळात कंत्राटदाराला या सर्व जागा महापालिका देणार असल्याने व चार्जिंग स्टेशन उभारणी साठी सर्व ठिकाणी सारखाच खर्च येणार असल्याने ग्राहकांना चार्जिंग साठी द्याव्या लागणाऱ्या प्रती युनिट दरात १३ ते १९ रुपये एवढी तफावत का ? कोणत्या ठिकाणी १३ रुपये व कोणत्या ठिकाणी १९ रूपये दर असणार आहे आणि त्याचे गणित ही माहिती तातडीने पारदर्शक पद्धतीने जाहीर करणे आवश्यक आहे.
वेलणकर यांनी म्हटले आहे कि, आज रोजी महावितरण कंपनीने स्वतः राज्यभरात ५० ठिकाणी ( पुणे शहरात ८ ठिकाणी) विजेवर धावणार्या वाहनांच्या चार्जिंग साठी चार्जिंग स्टेशन उभारणी केली आहे व तिथे १३.२५ रुपये प्रति युनिट या दराने चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे , मग पुणे महापालिका १९ रूपये प्रति युनिट दर का आकारते आहे ? असा प्रश्न वेलणकर यांनी विचारला आहे. (PMC Pune News)

———–

आमची आग्रहाची मागणी आहे की पुणे महापालिकेने स्वतःच्या सर्व चार्जिंग स्टेशन वरील दर महावितरणने उभारलेल्या चार्जिंग स्टेशन मधील दरांएवढे ठेवावेत, म्हणजेच १३.२५ रुपये प्रति युनिट ठेवावेत.

–  विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच , पुणे

My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाचे एकूण  ३८ उपक्रमांचे आयोजन

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाचे एकूण  ३८ उपक्रमांचे आयोजन

 

My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ या सप्ताहात (Rashtriya Yuva Din Saptah)  पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) आणि विविध स्वयंसेवी संस्थाचे एकूण विविध ठिकाणी ३८ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (My Bharat | National Youth Day)

भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मेरा युवा भारत (MY Bharat) ही भारतातील युवा विकासासाठी मेरा युवा भारत (MY Bharat) हे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यावर कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे डिजिटल प्लॅटफॉर्म “MY Bharat” https://www.mybharat.gov.in/ मा. पंतप्रधान यांनी लॉन्च केले आहे.

तदअनुषंगाने पुणे महानगरपालिकेमार्फत ०९ जानेवारी पासून वास्तविक जीवनात पूर्णपणे ऐच्छिक आधारावर काम करून, तरुण लोकांशी कसे जोडले जावे, तसेच स्थानिक लोकसमुदायामध्ये युवकांचे योगदान कसे असावे हे समजण्यासाठी व्यावहारिक शिक्षण, समुदाय प्रतिबद्धता, वैविध्यपूर्ण कनेक्शन, सहयोगी प्रकल्प, युवा-केंद्रित शासन या विविध घटकांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

डिजिटल प्लॅटफॉर्म चा प्रमुख उद्देश तरुणांच्या आवडीशी जुळणाऱ्या कामासाठी स्वयंसेवा कार्यक्रम करणे आणि प्रोफाईल पेजेस, इव्हेंटमध्ये सहभाग आणि अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रम वापरून मार्गदर्शक आणि समविचारी समवयस्कांशी जोडणे, तसेच समाजाचा एक भाग असण्याची भावना वाढवण्यासाठी आणि सामाजिक कारणांमध्ये व्यस्त राहण्यासाठी तसेच विविध क्षेत्रातील कार्यक्रममध्ये सहभागी होण्यासाठी आणि आयोजित करण्यासाठी, विकासात्मक कार्ये आणि नेतृत्व कौशल्य विकसित करणे ज्यामुळे तरुणांना समाजाशी जोडून घेता येईल हा आहे.

त्याअनुषंगाने उपरोक्त कार्यक्रमाची सुरवात ०९ जानेवारी २०२४ पासून पुणे महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “युवक कल्याणाशी संबंधित शासकीय योजनांबाबत जनजागृती पर सत्र” आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये युवकांना पुणे मनपाच्या विविध विभागांशी कसे जोडता येईल व फिल्ड – अनुभव कसा घेता येईल याबाबत मार्गदर्शन केले.तसेच पुणे मनपाच्या व केंद्र सरकार मार्फत सुरु असणाऱ्या  विविध योजना बाबत माहिती देण्यात आली पोर्टलचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आली.

दि.१० जानेवारी २०२४ रोजी रोटरी क्लब – केएएम फाउंडेशन व पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी “प्रशिक्षण आणि कौशल्य” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

११ जानेवारी २०२४ रोजी Wash Summit – पुणे मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने “पाणी, आरोग्यरक्षणार्थ घ्यावयची खबरदारी आणि स्वच्छता विषयक जनजागृती सत्र” कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये वॉश क्षेत्रातील विविध तंत्रज्ञान, नव-नविन कल्पना आणि टिकाऊपणा याबाबतचे युवकांना महत्व पटवून देण्यात आले.

उपरोक्त ०९ ते ११ जानेवारी २०२४ या तीन दिवसात झालेल्या कार्यक्रमामध्ये एकूण ३५० युवकांचा सहभाग नोंदवीला आहे.

राष्ट्रीय युवा दिनापासून म्हणजेच १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ या सप्ताहात पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आणि विविध सामाजिक संस्था आर.के. स्मृती बहुउद्देशीय संस्था, सौदामिनी सामाजिक संस्था, जे.एस.आय. यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय येथे युवा वर्गाच्या सहभागाने आरोग्य विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य मित्र, आभा कार्ड नोंदणी, सि.पी.आर. प्रशिक्षण, व्यसन मुक्ती जन जागृती तसेच AIDS, टी.बी. व कुष्ठरोग इ. आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती होणेसाठी पथनाट्ये आयोजित करण्यात आली आहेत.

पुणे मनपा – नेहरू युवा केंद्र, पोलीस विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) तसेच वेगवेगळी महाविद्यालये यांच्या संयुक्त विद्यमाने वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियान,पर्यावरण विषयक जनजागृती, सांस्कृतिक उपक्रम’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

याचबरोबर पुणे मनपा व  कमिन्स जनवाणी यांच्या संयुक्त विद्यमाने “करिअर मार्गदर्शन आणि जागरूकता” या आधारावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पुणे महानगरपालिका व सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने युवकांसाठी कौशल्य विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका आणि Urban- 95 यांच्या संयुक्त विद्यामाने पुणे शहराला बालस्नेही करण्याच्या दिशेने मनपाच्या अर्बन95 उपक्रमांतर्गत विविध प्रकल्प व सेवासुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. या बद्दल युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध कार्यशाळांसह निबंध, कल्पना, रेखाचित्र, घोषवाक्य आणि सेल्फी स्पर्धांसह खेळण्यातून शिकवणे यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहे.

तसेच पुणे महानगरपालिका आणि स्वच्छ संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने १५ क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छ कचरा वेचक आणि घनकचरा व्यवस्थापन यांच्या नेतृत्वाखाली ओला कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय युवा दिनापासून म्हणजेच दि.१२ जानेवारी ते दि.१९ जानेवारी २०२४ या सप्ताहात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्यामध्ये बहुसंख्येने इच्छुक युवकांनी सहभाग नोंदवण्यासाठी खालील संकेतस्थळावर जाऊन रजिस्ट्रेशन करावे ही विनंती :

https://mybharat.gov.in/Gov/Urban-Local-Body/pune-municipal-corporation या लिकावरनोंदवावा असे आवाहन पुणे महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

Pune 10th Ranking | Pune 5 Star City | स्वच्छ सर्वेक्षण च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये पुणे 20 वरून 10 व्या स्थानावर

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

Pune 10th Ranking | Pune 5 Star City | स्वच्छ सर्वेक्षण च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये पुणे 20 वरून 10 व्या स्थानावर

| महाराष्ट्रात 2nd रँक

Pune 10th Ranking | Pune 5 Star City | पुणे महापालिका स्वच्छतेबाबत  (Pune Municipal Corporation) करत असलेल्या प्रयत्नामुळे पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. तसेच पुणे महापालिकेला (PMC Pune) स्वच्छ सर्वेक्षण 2023 (Swachh Survey 2023) मध्ये 1 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात 10 वी रँक (Pune 10th Rank) मिळाली आहे. मागील वर्षी पुणे 20 व्या स्थानावर होते. तर 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात पुणे 9 व्या स्थानावर आहे. तर इकडे महाराष्ट्रात पुणे 2 ऱ्या स्थानावर (Pune 2nd Rank in Maharashtra) आले आहे. नुकताच केंद्र सरकारकडून महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला आहे. पुणे महापालिका आणि पुणे शहरासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. (PMC Pune News)
देशातील राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर म्हणून पुणे शहराचा नावलौकिक झाला आहे. तसेच विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी बरीच बिरुदे पुणे शहराला मिळाली आहेत. त्यात अजून एक नावलौकिकाची भर पडली आहे. पुणे शहर आता 5 स्टार झाले आहे. पुणे महापालिकेचा घनकचरा विभाग (PMC Solid Waste Management Department) यासाठी सातत्याने प्रयत्नशील होता. पुणे शहर आतापर्यंत 3 स्टार मधेच होते. मात्र आता यात वाढ होऊन ते 5 स्टार झाले आहे. याबाबत सप्टेंबर च्या शेवटच्या आठवड्यात केंद्राकडून सर्वे करण्यात आला होता. यामध्ये घरोघर कचरा जमा करणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे, अशा 20 विविध घटकांचा समावेश होता. या सर्व गोष्टीत महापालिकेने चांगली प्रगती केली आहे. त्यामुळे महापालिका हा ‘किताब मिळवू शकली आहे. पुणे महापालिका आगामी काळात 7 स्टार आणि वॉटर प्लस मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जायका प्रकल्प अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची कामे पूर्ण झाल्यावर महापालिका यासाठी पात्र होऊ शकते. (Pune PMC News)
दरम्यान नुकतेच केंद्र सरकारकडून पुणे शहराला हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच आज म्हणजे 11 जानेवारीला पुणे महापालिकेला राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला. यामध्ये शहराची स्वच्छ सर्वेक्षण मधील रँकिंग समजली आहे. त्यानुसार 1 लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरात पुणे 20 व्या रँकिंग वरून 10 व्या स्थानावर आले आहे. तर 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात पुणे 9 व्या स्थानावर आहे. तर इकडे महाराष्ट्रात पुणे 2 ऱ्या स्थानावर आले आहे. नुकताच केंद्र सरकारकडून महापालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला आहे. केंद्र सरकारने  राज्यातून फक्त 3 शहरांनाच निमंत्रण दिले होते. यामध्ये नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा समावेश होता. पुणे महापालिकेचे याबाबत कौतुक होत आहे.
—-
पुणे शहराला याआधीच  5 स्टार प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात आता रँकिंग देखील वाढली आहे. ही पुणे महापालिकेच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. महापालिकेने केलेल्या चांगल्या कामगिरीवर केंद्र सरकारने मोहोर लावली आहे. मागील वर्षी पेक्षा खूप सुधारणा आपण केल्या आहेत. महापालिका आपल्या कामगिरीत अजून चांगल्या सुधारणा करणार आहे. आता आपण 7 स्टार आणि वॉटर प्लस साठी प्रयत्न करणार आहोत. तसेच शहर भारत भरात पहिल्या 3 मध्ये कसे राहील, याबाबत देखील प्रयत्न सुरु राहणार आहेत.
डॉ कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका 
स्वच्छ सर्वेक्षण 2023, (SS23), आपल्या पुणे महापालिकेला 5 स्टार सिटी प्रमाणपत्र मिळाले आहे. तसेच आता रँकिंग देखील कळली आहे. 20 वरून दहाव्या स्थानावर येणे आणि महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर राहणे ही आमच्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे यात सर्वांचे मोलाचे योगदान आहे. मात्र आता आमची जबाबदारी वाढली आहे. आम्ही आता शहराला पहिल्या 5 मध्ये आणण्याचा प्रयत्न करू.
संदिप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग 

PMC JICA Project | Italy Tour | मैलापाण्याच्या गाळापासून पुणे महापालिका तयार करणार खत! | इटली देशातून येणार मशीन

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC JICA Project | Italy Tour | मैलापाण्याच्या गाळापासून पुणे महापालिका तयार करणार खत! | इटली देशातून येणार मशीन

| महापालिका अधिकारी इटलीला जाऊन मशीनची करणार तपासणी

PMC JICA Project | Italy Tour | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने केंद्र सरकारचा जायका प्रकल्प (JICA Project) राबवण्यात येत आहे. या अंतर्गत नवीन 11 मैलाशुद्धीकरण केंद्र (Sewage Treatment Plant) निर्माण करण्यात येणार आहेत. मैलापाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर जो गाळ (Sludge) राहणार आहे, त्यापासून महापालिका खत (Fertiliser) तयार करणार आहे. त्यासाठी इटली देशातून मशीन Sludge Thickener मागवण्यात येणार आहे. दरम्यान या मशीनची पाहणी करण्यासाठी महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि काही अधिकारी इटलीला (Italy) जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. (PMC Pune officers Italy Tour)
पुणे महापालिकेच्या वतीने जायका प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी 11 मैलापाणी शुद्धीकरण केंद्र बांधण्यात येणार आहेत. 1100 कोटीच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकार 850 कोटी निधी देणार आहे. त्यापैकी 170 कोटी केंद्र सरकार कडून देण्यात आले आहेत. या प्रकल्पाचा उद्देश हा शहरातून वाहणारी प्रदूषित होऊ नये हा आहे. त्यानुसार पाणी शुद्ध करून नदीत सोडले जाणार आहे. दरम्यान पाणी शुद्ध करताना प्रक्रिया केल्यानंतर जो गाळ (sludge) शिल्लक राहणार आहे. त्यापासून महापालिका खत तयार करणार आहे. त्यासाठी Sludge Thickeners ही मशिनरी वापरली जाणार आहे. ही मशीन इटली देशातून पुण्यात आणली जाणार आहे. इटली तील Lacto Fungai नावाची कंपनी ही मशीन देणार आहे. दरम्यान या मशीन ची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी येत्या काही दिवसात इटलीला रवाना होणार आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि जायका प्रकल्प प्रमुख जगदीश खानोरे यांचा समावेश आहे. दरम्यान याचा सगळा खर्च हा संबंधित कंपनीच करणार आहे. सुरुवातीला चीन देशात दौरा होणार होता. मात्र तिथे असलेले कोरोनाचे सावट अजून न संपल्याने हा दौरा रद्द करून इटलीला जाण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान या मशीनचा आवाका मोठा असल्याने ती विमानातून (Airplane) न आणता जहाजाच्या (Ship) माध्यमातून भारतात आणली जाणार आहे. लाल समुद्राच्या (Red Sea) माध्यमातून ही मशीन भारतात आणण्याचे नियोजन होते. मात्र सद्यस्थितीत लाल समुद्रात समुद्री चाचांनी (Samudri Chacha) धुमाकूळ घातला आहे. हे लोक जहाज लुटून नेत आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या मार्गे ही मशिनरी भारतात आणली जाणार आहे. येत्या काही दिवसांतच ही मशीन पुण्यात दाखल होईल.

PMC Vs TATA Projects | महापालिकेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | टाटाच्या उज्वल कंपनीला महापालिकेला द्यावे लागणार व्याजासहित पैसे

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Vs TATA Projects | महापालिकेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली | टाटाच्या उज्वल कंपनीला महापालिकेला द्यावे लागणार व्याजासहित पैसे

| बिल अडवून ठेवल्याने महापालिकेचेच नुकसान

PMC Vs TATA Projects | पुणे | शहरातील पथ दिव्यांच्या (LED Fitting) माध्यमातून वीज बचत (Electricity Saving) करण्यासाठी महापालिकेकडून (PMC Electricity Department) प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स (TATA Projects) च्या उज्वल कंपनीला (Ujwal Pune) देण्यात आले आहे. मात्र कंपनीच्या कामावर महापालिका असमानाधी आहे. त्यामुळे जवळपास १५ कोटी महापालिका कंपनी कडून वसूल करणार आहे. मात्र कंपनीसोबत घेतलेला पंगा महापालिकेलाच महागात पडला आहे. कंपनीने बिल वेळेवर मिळत नसल्याबाबत पुणे महापालिकेची राज्य सरकारकडे तक्रार केली होती. तसेच याविरोधात औदयोगिक न्यायालयात देखील दाद मागितली होती. उज्वल  कंपनीला सात टक्के व्याजासह २ कोटी ८१ लाख १९ हजार रूपये देण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयाने महापालिकेला दिले होते. या विरोधात महापालिकेने सुप्रीम कोर्टात अपील केले होते. मात्र तिथे ती याचिका फेटाळली गेली. त्यामुळे उज्वल कंपनीला पैसे द्यावे लागणार हे सिद्ध झाले आहे. (PMC Pune)
पुणे शहरातील पथ दिव्यांच्या माध्यमातून वीज बचत करण्यासाठी महापालिकेकडून प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम टाटा प्रोजेक्ट्स च्या उज्वल कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनी कडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रकाशात आले आहे. याबाबत महापालिकेच्या मुख्य लेखापारीक्षकानी जोरदार आक्षेप काढले आहेत. तसेच कंपनी कडून त्याबदल्यात १५ कोटी वसूल करण्याचे आदेश देखील मुख्य लेखापरीक्षकांनी विद्युत विभागाला दिले होते. त्यानंतर विद्युत विभागाने तात्काळ उज्वल कंपनीला पत्र लिहित ही रक्कम जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जमा नाही केले तर आम्ही बिलातून वसूल करून घेऊ, असा इशारा देखील विद्युत विभागाने दिला होता. मात्र हे प्रकरण महापालिकेच्याच अंगाशी आले आहे. आता अडवलेले बिल व्याजासहित द्यावे लागणार आहे.