PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या | अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागातील निरीक्षकांचे मनोबल वाढवण्यासाठी आता चारचाकी गाड्या

| अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई

PMC Solid Waste Management | पुणे | महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) शहरात स्वच्छता टिकून राहावी, यासाठी गंभीरपणे पाऊल उचलले आहे. शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना विभागातील कर्मचाऱ्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला चारचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. या माध्यमातून शहरात अस्वच्छता करणाऱ्यांवर होणार ठोस कारवाई करण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 4 गाड्या घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 34 लाखाचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)
पुणे शहरात घनकचरा विभागाच्या माध्यमातून स्वच्छता करण्याचे काम केले जाते. शहरात दररोज 2300 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यातील 1700 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दरम्यान स्वच्छतेबाबत शहरातील लोक मात्र उदासीन दिसून येतात. उघड्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण जास्तच आहे. त्यासाठी घनकचरा विभागाच्या माध्यमातून लोकांना दंड केला जातो. मात्र तरीही काही लोकांची उदासीनता दिसून येते. कारवाई करण्याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांच्या मर्यादा दिसून येतात. ही बाब लक्षात घेत घनकचरा विभागाने निरीक्षकांचे मनोबल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना दंडात्मक कारवाईचे अधिकार आहेतच; मात्र ही कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी त्यांच्या दिमतीला आता चारचाकी गाड्या देण्यात येणार आहेत. (PMC Pune News)
याबाबत उपायुक्त कदम यांनी सांगितले कि एकूण 18 गाड्या घेण्यात येणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 1 आणि व्हिजिलन्स साठी तीन अशा 18 गाड्या घेण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात 4 गाड्या घेण्यात येणार आहेत. एका गाडीसाठी साधारणतः साडे आठ लाख खर्च अपेक्षित आहेत. 4 गाड्यांचा खर्च 34 लाख इतका येणार आहे. हा खर्च आतापर्यंत जो दंड जमा झाला आहे. त्यातूनच घेतल्या जाणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या या गाड्या GeM पोर्टल वरून घेण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.
कदम यांनी सांगितले कि शहरात गस्त घालणे आणि दंडात्मक कारवाई करण्यासाठी या गाड्या उपयुक्त ठरणार आहेत. एका गाडीत 4 कर्मचारी असतील. सहायक आयुक्त आणि विभागीय निरीक्षक ठरवतील हे चार लोक कोण असणार ते. दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळा या गाड्या शहरातून फिरतील. लोकांनी उघड्यावर कचरा आणि राडारोडा फेकू नये, तसेच स्वच्छतेबाबत शिस्त लावण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच कर्मचाऱ्यांना देखील अधिकार आल्याने लोक त्यांना घाबरतील आणि नियमांचे पालन करतील.
या चारचाकी गाड्यांच्या माध्यमातून आपल्या सेवकांचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे.  दंडात्मक कारवाई करताना आता जो विरोध तो  विरोध कमी होईल आणि ठोस कारवाई होईल. जेणेकरून लोकांना शिस्त लागेल आणि शहरात स्वच्छता टिकून राहिल. कारण बरेच लोक रात्रीच्या वेळी हायवे वर कचरा टाकत असतात. त्याला या माध्यमातून आळा घालता येईल. तसेच गर्दीच्या ठिकाणी या माध्यमातून स्वच्छते बाबत जनजागृती करता येईल.
संदीप कदम, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग. 
—-

Nagar Road BRTS | नगर रस्ता सिग्नल फ्री करणार |आमदार सुनिल टिंगरे

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Nagar Road BRTS | नगर रस्ता सिग्नल फ्री करणार |आमदार सुनिल टिंगरे

 

Nagar Road BRTS | नगर रोडवरील बीआरटी काढण्याबाबत आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) यांनी महापालिकेचे (PMC Pune) स्वागत केले आहे. टिंगरे म्हणाले,  नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी बीआरटी काढावी यासाठी गेली चार वर्ष मी पाठपुरावा करत होतो. विधी मंडळात हा प्रश्न मांडला आणि सरकारचे लक्ष वेधले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही स्वतः नगर रस्त्यांची पाहणी करुन बीआरटी काढण्याची सुचना केली होती. अखेर गोखले सस्थेने केलेल्या सर्व्हेंशनात आमच्या बीआरटी हटविण्याच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केला. येरवडा ते विमाननगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग महापालिकेने बुधवारी रात्री काढला. त्यासाठी उपमुखमंत्री अजितदादा पवार आणि पुणे महापालिका यांचे आभार व्यक्त करतो. केवळ विमाननगर पर्यंतच नाही तर संपूर्ण मार्गावरील बीआरटी काढावी अशी आमची मागणी आहे. त्यासाठी पाठपुरावा कायम सुरू राहील. नगर रस्ता सिग्नल फ्री करणे आज आगामी काळातील आमचा अजेंडा असणार आहे. असे  ही टिंगरे म्हणाले.

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महापालिका  ११ डिसेंबर  पादचारी दिवस म्हणून साजरा करणार

Categories
Breaking News PMC social पुणे

Pedestrian Day | PMC Pune | पुणे महापालिका  ११ डिसेंबर  पादचारी दिवस म्हणून साजरा करणार

 

Pedestrian Day | PMC Pune | रस्त्यावर चालणारे नागरिक म्हणजेच पादचारी हे रस्त्यावरील सर्वात महत्वाचे घटक असून तसे दुर्लक्षित आहेत. आपल्या देशात रस्त्यावरील अपघातांमध्ये चालणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. पादचारी सुरक्षा व अधिकारांबाबत जनजागृती करण्यासाठी , तसेच पादचारी (ज्यात प्रामुख्याने लहान मुले , वृद्ध / म्हातारी माणसे , स्त्रिया तसेच अंध ,अपंग, विकलांग नागरिक) यांच्या बाबत संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी दर वर्षी ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा करणारी पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation)  देशातील पहिली महापालिका आहे. (Pedestrian Day | PMC Pune)

या कार्यक्रमात पुणे मनपा बरोबर पुणे वाहतूक पोलीस , लक्ष्मी रस्ता व्यापारी संघटना, पथारीवाले संघटना यांचे सहकार्य फार महत्वाचे आहे. यांच्या
सहभागा व सहकार्यामुळे या वर्षी देखील सोमवार ११ डिसेंबर २०२३ रोजी पुणे महानगरपालिका सलग तिसऱ्यांदा हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहे. चालण्यासाठी स्वच्छ व सुरक्षित पदपथ ,रास्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित मार्ग ज्यात नियमित रंगवलेले झेब्रा पट्टे , रस्त्याच्या मध्ये उभे राहण्यासाठी बेट ज्यांना रेफुजी आयलंड म्हणतात, सिग्नल , माहिती फलक, पथदिवे इत्यादी हे पादचारी सुरक्षे बाबत चे उपाय रस्त्याचा अतिमहत्त्वाचा घटक आहेत तसेच पादचाऱ्यांचा अधिकार देखील आहे.

दर वर्षी पुणे महानगरपालिका पथ विभाग या दिवसाचे आयोजन करतो. आपल्या पुणे शहरातील सर्वात प्रतिष्ठित व गर्दीचा रस्ता म्हणजे लक्ष्मी रस्ता असल्याने तिथे या दिवसाचे मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. याच बरोबर पुण्यातील 100 महत्वाच्या चौकात पादचारी सुरक्षे बाबत उपाय केले जात आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक हा भाग वाहन- विरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजावण्याचे काम पथ विभागामार्फत करण्यात येईल. या दिवशी सोमवार असल्याने सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत हा रस्ता वाहनांना वापरता येणार नाही. या दिवशी जास्तीत जास्त नागरिक लक्ष्मी रस्त्यावर यावेत या करीत महामेट्रो मार्फत डेक्कन मेट्रो स्थानक व पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलींचे आयोजन करण्यात येत आहे तसेच पी.एम.पी.एम.एल मार्फत ज्यादा बस सेवा पुरविण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी लक्ष्मी रस्ता ;वॉकिंग प्लाझा; चा आनंद घेण्यासाठी
चालतच यावे व वाहन धारकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे आवाहन पुणे मनपा ने केले आहे.

या दिवशी लोकप्रबोधनासाठी व नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन ही केले जात आहे

 

काही प्रमुख कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत.

-सेव किड्स फौंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षा बाबत कार्यशाळा

-एकांश ट्रस्ट तर्फे अंध अपंग नागरिक यांच्या बाबत संवेदनशीलता व सार्वत्रिक प्रवेशयोग्यते विषयक कार्यशाळा
– सेव पुणे ट्रॅफिक मुव्हमेंट तर्फे पादचारी अधिकारांबाबत कार्यशाळा
– परिसर संस्थे मार्फत सार्वजनिक वाहतूक व जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन
– आई.टी.डी.पी संस्थे मार्फत रस्त्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन
– साथी हाथ बढाना संस्थे मार्फत मानसिक आरोग्याबाबत पथनाट्य
– रंग कला अकादमी तर्फे पादचारी दिनाबाबत भव्य रांगोळी
– इतिहास प्रेमी नागरिकांसाठी शौर्य खेळ
– रास्ता संस्थेमार्फत संगीत व वाद्य कला सादरीकरण
– पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थे मार्फत प्रदर्शन

याच बरोबर सामान्य नागरिकांना देखील आपली काही कला सादर करायची असल्यास लक्ष्मी रस्ता वॉकिंग प्लाझास्टेज त्यांच्या साठी खुले आहे त्यामुळे त्यांनी मनपातील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सादरीकरण करावे असे आवाहन पुणे मनपाने केले आहे.

या दिवसाच्या निमित्ताने नुकतेच १०० वर्ष पूर्ण झालेल्या लक्ष्मी रस्त्याला एक नवे रूप येणार आहे. लोकांनी खासगी गाड्यांचा वापर कमी करावा , चालण्याचा आनंद घ्यावा या साठी सर्व रस्ते स्वच्छ सुरक्षित व आकर्षक व्हावे असे आपले राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरण सांगते. पुणे महानगरपालिकेलने
मागील काही वर्षात  शहरी रस्ते रचना नियमावलीसुरक्षित रस्ते धोरण, गतिरोधक नियमावली, शालेय विद्यार्थी प्रवास योजना अश्या अभिनव संकल्पना राबविल्या व शहरातील प्रमुख रस्ते यांचा कायापालट करून दाखवला आहे. अजून बरेच काम करायचे आहे , येणाऱ्या काळात मेट्रो व सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी व खासगी वाहनांचे प्रमाण कमी करण्यासाठी चालणे हा पर्याय अधिक महत्वाचा ठरणार आहे त्या दृष्टीने पादचारी दिन हा पुणे मनपाने सुरु केलेला महत्वाचा उपक्रम आहे.

PMC Employees Promotion | 25% जागांवर चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली? | महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Promotion | 25% जागांवर  चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली?

| महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल

PMC Employees Promotion | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवर कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी सेवकांना बढतीच्या संधी प्राप्त होणेकरीता लेखनिकी संवर्गातील ‘लिपिक टंकलेखक’ या पदावर पदोन्नतीने नेमणूका देण्याबाबत पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश नियमावली २०१४ मध्ये तरतूद आहे. मान्य आकृतीबंधानुसार या पदाच्या एकूण जागांपैकी २५ % जागा या विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या चतुर्थश्रेणी मेवकांमधून भरणेबाबत नियमावलीमध्ये तरतूद असून त्यानुसार मनपा प्रशासनाकडून सद्यस्थितीत कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून यातील 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना बढती पासून वंचित ठेवण्यात आले आहे. पदोन्नती समितीतील काही सदस्यांनी याबाबत नवीन नियम काढत रोस्टर लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बढती प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे बढती कधी देणार, असा सवाल कर्मचारी विचारत आहेत. (PMC Pune News)

 महाराष्ट्र शासनाने जानेवारी २०१७ मध्ये निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर मनपा सेवेत रुजू होणाऱ्या सेवकांना लिपिक टंकलेखक या पदावर थेट नियुक्ती देण्यात येते. परंतु या शासन निर्णयापूर्वी महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या सेवकांना मात्र पदोन्नतीसाठी १२ ते १५ वर्ष वाट पहावी लागत आहे. महापालिकेच्या सेवेच्या पुरेसा अनुभव व लिपिक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असून देखील पदोन्नतीपासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याने या सेवकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. (PMC Marathi News)
सामान्य प्रशासन विभागाकडून जानेवारी २०१३ पूर्वी महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या व लिपिक टंकलेखक पदासाठी पात्र असलेल्या सेवकांची विभागीय परीक्षा (पेपर क्र.१) घेतली असून त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या एकूण सेवकांपैकी ५३ सेवक मागील दोन ते तीन वर्षापासून बडतीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या चतुर्थश्रेणी सेवकांचे पदोन्नतीसाठी अर्ज अद्याप मागविलेले नाहीत त्यामुळे त्यांनतर मनपा सेवेत थेट लिपिक पदावर रुजू झालेले सेवक हे सेवाज्येष्ठ ठरणार असल्याने पुढील पदोन्नतीवर देखील यांचा परिणाम होणार आहे. हे सेवक आपल्याला कधी पदोन्नती मिळेल या प्रतीक्षेत आहेत. (PMC Pune Employees)
मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे इतकी वर्ष सेवा करून देखील आपल्याला बढतीसाठी अजून किती काळ वाट पहावी लागणार आहे असा प्रश्न या सेवकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीचा मनपा प्रशासनाकडून विचार होवून जानेवारी २०१३ पूर्वी महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या लिपिक टंकलेखक पदासाठी पात्र ठरलेल्या व विभागीय परीक्षा (पेपर क्र. १) उत्तीर्ण झालेल्या ५३ सेवकांना तात्काळ बढती देणे व यापूर्वी परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या परीक्षेस काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या तसेच जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या चतुर्थश्रेणी सेवकांचे पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा (पेपर क्र. १) देणेसाठी सेवकांकडून अर्ज मागविणेबाबत कार्यवाही लवकरात लवकर करणेकरीता सामान्य प्रशासन विभागास आदेश व्हावे. अशी मागणी याआधीच पीएमसी एम्प्लॉईज कडून करण्यात आली आहे. (PMC DPC Committee) 

| आमदार रविंद्र धंगेकरांनी घातले लक्ष

दरम्यान या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील लक्ष घातले आहे. प्रशासनाला पत्र देत बढती देण्याची मागणी धंगेकर यांनी केली आहे. मात्र तरीही याबाबत हालचाल झालेली दिसून येत नाही.

| रोस्टर लावण्याला कर्मचाऱ्यांचा विरोध

दरम्यान या उर्वरित कर्मचाऱ्यांना बढती देण्याबाबत पदोन्नती समिती आता रोस्टर लावण्याबाबत ठाम आहे. समितीतील सदस्यांनी याबाबत मागणी केली होती. यावर समितीचे एकमत झाले आहे. त्यानुसार आता रोस्टर लावले जाणार आहे. मात्र याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याआधीच्या 200 कर्मचाऱ्यांना बढती देताना हा विचार का केला नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. तर प्रशासन म्हणते कि, पहिल्यांदा आमची चूक झाली. आता आम्ही चूक सुधारत आहोत.

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड 

Categories
Breaking News PMC social पुणे

Plastic Use Ban | PMC Pune | प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे पुणे महापालिकेचे आवाहन | अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड

Plastic Use Ban | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) कार्यक्षेत्रात प्लास्टिक वापराबाबत नियमांच्या तरतुदी लागू आहेत. त्यास अधीन राहून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या (PMC Pune) वतीने करण्यात आले आहे. अन्यथा 5 हजारापासून 25 हजारापर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे. (PMC Pune News)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २१६ च्या नियम ४ (२) नुसार (सुधारित केल्यानुसार ), “पॉलीस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिनसह खालील एकल वापराच्या प्लास्टिक (SUP) चेउत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर दिनांक १ जुलै २०२२ पासून प्रभावीपणे प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation)

अ) प्लास्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणा-या प्लास्टिकच्या  काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन;
ब) प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, पेंढा, ट्रे, मिठाईचे बॉक्सेस, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, 100 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टिरर इ. (PMC Solid Waste Management Department)

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या नियम ४(१) (क) नुसार (सुधारणा केल्यानुसार ) “व्हर्जिन किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकची कॅरी बॅग दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पासून पंचाहत्तर (७५) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२२ पासून एकशे वीस (१२०) मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची नसावी. महाराष्ट्र शासनाच्या २३ मार्च २०१८ च्या अधिसूचनेनुसार, संपूर्ण राज्यात हँडलसह आणि हँडलशिवाय प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून या सर्व नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्ती/संस्था/ कंपन्यांना खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

प्लास्टिकचे उत्पादन, वितरण, साठवण, विक्री किंवा प्लास्टिक वस्तू किंवा थर्माकोलचा वापर केल्यास किंवा पहिल्या वेळी ५०००/- दंड/तडजोड शुल्क, दुस-या वेळी १००००/-, तिस-या वेळी २५०००/- व तीन महिन्यांची कैद

पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात सर्वत्र वरील नियमांच्या तरतुदी आणि सुधारणांसह अधिसूचना लागू आहेत आणि सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने (मॉल्स/बाजारपेठे/शॉपिंग सेंटर/सिनेमा घर/पर्यटन ठिकाणे ) यांना सूचित करण्यासाठी जारी केले जात आहेत. शाळा/महाविद्यालये/कार्यालयीन ठिकाणे/रुग्णालये आणि इतर संस्था) आणि सामान्य जनतेने बंदी असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा,
विक्री, वाहतूक, वितरण किंवा वापर त्वरीत बंद करावा हे सर्व नागरिकांस आवाहन करण्यात आले आहे.

SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याचा दिला जातो अभिप्राय | माजी नगरसेवकांचा आरोप

Categories
Breaking News PMC Political पुणे

SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याचा दिला जातो अभिप्राय | माजी नगरसेवकांचा आरोप

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण न राहता फक्त पुणे शहरातील जुने वाडे आणि इमारती यांच्या पुनर्वसनासाठी बनलेले प्राधिकरण आहे.  झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय वॉर्ड ऑफिसर च्या माध्यमातून त्यांच्या अभियंत्याकडनं घेतात आणि जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करतात. असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, संजय बालगुडे यांनी केला आहे.
माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार या अभिप्रायामुळे पुणे महानगरपालिकेचे नुकसान आहे. कारण पुणे मनपाला विकास शुल्क मिळत नाही. विकासकाला शुल्क भरावे लागत नाही आणि टीडीआर विकून करोडो रुपये मिळतात. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वार्ड रचनेतील अभियंत्यांना हाताशी धरून हे सगळे षडयंत्र चालू आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेच्या पेठांच्या मध्ये जवळपास 20 हजार वाडे आहेत त्यांचा विचार केला तर हा 50 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा आहे. माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त यांना विनंती केली आहे कि आयुक्तांच्या  परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय देऊ नये. हा अभिप्राय देण्याचा दर किमान 30 लाख रुपये असल्याचे कळते. याबाबत त्वरित योग्य पावले उचलून हे अभिप्राय देणे थांबवावे.  आयुक्त किंवा नगर अभियंत्यांच्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने कुठलाही अभिप्राय देऊ नये असे आदेश द्यावेत. अशी मागणी आयुक्तांकडे केली आहे.

Mahaparinirvan Din | PMC Pune | पुणे महापालिकेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

Categories
Breaking News cultural PMC पुणे

Mahaparinirvan Din | PMC Pune | पुणे महापालिकेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

Mahaparinirvan Din | PMC Pune | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना  महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनपा अधिकारी व सेवक यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. (Pune Municipal Corporation)

उपायुक्त सचिन इथापे यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळयाला हार घालण्यात आला. या  प्रसंगी उपायुक्त जयंत भोसेकर, योगिता भोसले प्रभारी नगरसचिव राकेश विटकर सुरक्षा अधीकारी,  रुपेश सोनवणे अध्यक्ष मागासवर्गीय युनियन, विष्णू कदम सचिव अध्यक्ष स्थायी समिती, धनंजय खलुले, महेश कड शुभांगी रणपिसे, प्रतीक भोसले, चिंतामण बाबळे,  नितीन एकबोटे इत्यादी अधिकारी व सेवक उपस्थित होते.

PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | अपघाताची माहिती देण्याचे कामगार विभागाचे कर्मचाऱ्यांना आदेश

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना  | अपघाताची माहिती देण्याचे कामगार विभागाचे कर्मचाऱ्यांना आदेश

PMC Accident Insurance | (Author – Ganesh Mule) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. कर्मचाऱ्याकडून 136 रुपये घेऊन 10 लाखाचा विमा उतरवला जायचा. मात्र यंदा रक्कम वाढवली आहे. वर्ग-१ साठी २५ लाख, वर्ग-२ साठी २० लाख, वर्ग-३ व ४ साठी १५ लाख इतका विमा असेल. दरम्यान ज्या कर्मचाऱ्यांचा अपघात झाला आहे. त्यांना लाभ देण्यासाठी आगामी 10 दिवसांत त्याची माहिती कामगार विभागाकडे देण्याचे आदेश मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिले आहेत.  (PMC Pune News) 

 – सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना

 महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.  यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात.  आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता.  परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे.  कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात.  यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत.  अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे.  अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा विमा मिळत होता. जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो.  कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे.  पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.  यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ १३६ रुपये द्यावे लागत होते. महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे 19 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. (PMC Accident Insurance News) 

| असा मिळेल लाभ

दरम्यान यंदा वैयक्तिक अपघात योजना गट-अ ते ड मधील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना लागू असेल. वैयक्तिक अपघात योजनेचा राशीभूत विमा (Capital Sum Assured) रक्कम १) वर्ग-१ साठी रु.२५ लाख, २) वर्ग-२ साठी रु. २० लाख, ३) वर्ग-३ व ४ साठी रु. १५ लाख इतका असेल. अपघातामध्ये आलेला मृत्यु, कायमचे अपंगत्व / विकलांगता किंवा दोन हात, दोन पाय किंवा दोन्ही डोळे गमावून अपंगत्व / विकलांगता आल्यास त्यास १००% लाभ अनुज्ञेय असेल. कायमचे अंशत: अपंगत्व / विकलांगता आल्यास अंपगत्वाच्या स्वरूपानुसार लाभाची टक्केवारी विहीत करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation News)

| अशी असेल वर्गणी

त्यासाठी पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांना या  वर्षासाठी समुह अपघात वार्षिक सभासद वर्गणी १) वर्ग-१ साठी प्रत्येकी ४७२ २) वर्ग-२ साठी प्रत्येकी ३७१.१०, ३) वर्ग-३ व ४ साठी प्रत्येकी २६५.५०/- कपात करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ हवा असल्यास 30 दिवसात संबंधित कंपनीला माहिती देणे आवश्यक असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आगामी 10 दिवसांत याची माहिती कामगार विभागाकडे द्यावी. जेणेकरून प्रकरण पुढे देता येईल.
नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी 

PM Modi Pune Tour Expenditure | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख! 

Categories
Breaking News PMC social देश/विदेश पुणे

PM Modi Pune Tour Expenditure | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख!

| खर्चाचा प्रस्ताव अवलोकनासाठी स्थायी समिती समोर

PM Modi Pune Tour Expenditure | पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे ऑगस्ट महिन्यात पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्याचा खर्च 1 कोटी 15 लाख 14 हजार इतका आला आहे. महापालिकेकडून सर्व कामे ही 67 3 k नुसार केली होती. त्यानुसार खर्चाचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून (PMC Pune) अवलोकनासाठी स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. (Pune Municipal Corporation)
स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांचा दौरा होऊन एस. पी. कॉलेज मैदान, टिळक रोड येथे सभा आयोजीत करण्यात आली होती. या कॉलेज मधील मैदानामध्ये नवीन डांबरी रस्ते तसेच पार्किंग साठी जागा विकसित करणे अत्यावश्यक होते. त्याकरीता मुरूम, जीएसबी डीबीएम, बीसी ई.ची कामे करणे आवश्यक होते. राज्य शासनाने विहित केलेल्या नियमावली नुसार  कामाची व्याप्ती मोठया स्वरूपाची असल्यामुळे व सदरचे काम तातडीने करावयाचे असल्याने जाहिर निविदा न काढता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६७ (३) (क) नुसार अति. महापालिका आयुक्त( वि) यांचे तोंडी आदेशानुसार ठेकेदार  धनराज अस्फाल्ट कं, मे. एस ए इन्फ्रा आणि मे. साईलीला कं यांनी वेगवेगळी कामे केली होती. त्यानुसार ठेकेदार  धनराज अस्फाल्ट कं यांना 67 लाख 99 हजार मे. एस ए इन्फ्रा यांना 38 लाख 61 हजार आणि मे. साईलीला कं यांना 9 लाख 31 हजार असे एकूण 1 कोटी 15 लाख देण्यात येणार आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. (PMC Pune News)