SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याच्या प्रस्तावांना स्थगिती | महापालिका आयुक्तांचे SRA च्या CEO ना आदेश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

SRA | PMC Pune | जुने वाडे झोपडपट्टी सदृश्य असल्याच्या प्रस्तावांना स्थगिती

| महापालिका आयुक्तांचे SRA च्या CEO ना आदेश

SRA | PMC Pune | झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण न राहता फक्त पुणे शहरातील जुने वाडे आणि इमारती यांच्या पुनर्वसनासाठी बनलेले प्राधिकरण आहे.  झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय वॉर्ड ऑफिसर च्या माध्यमातून त्यांच्या अभियंत्याकडनं घेतात आणि जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करतात. असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, संजय बालगुडे यांनी केला होता. याकडे महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. अशा प्रस्तावांना स्थगिती देण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation)
माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांना मागणी केली होती कि, अभिप्रायामुळे पुणे महानगरपालिकेचे नुकसान आहे. कारण पुणे मनपाला विकास शुल्क मिळत नाही. विकासकाला शुल्क भरावे लागत नाही आणि टीडीआर विकून करोडो रुपये मिळतात. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वार्ड रचनेतील अभियंत्यांना हाताशी धरून हे सगळे षडयंत्र चालू आहे. निवेदनात म्हटले होते कि, पुणे महानगरपालिकेच्या पेठांच्या मध्ये जवळपास 20 हजार वाडे आहेत त्यांचा विचार केला तर हा 50 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार घोटाळा आहे. माजी नगरसेवकांनी महानगरपालिका आयुक्त यांना विनंती केली होती कि आयुक्तांच्या  परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय देऊ नये. त्यानुसार आयुक्तांनी नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. 
आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका हद्दीतील झोपटपट्टी नसलेल्या व महाराष्ट्र झोपडपट्टी ( सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास ) अधिनियम १९७१ अन्वये घोषित गलिच्छ वस्ती नसलेल्या खाजगी मालकीच्या जागांवर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे प्रस्ताव दाखल / स्वीकार करून घेऊन त्यावर अशी बांधकामे झोपडपट्टी दर्शवून / समजून रहिवासी / भाडेकरूंचे झोपडपट्टीधारक म्हणून पात्र / अपात्रता ठरवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाकडून पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालकडे अहवाल मागविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निदर्शनास आलेले आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाकडून विशिष्ठ तक्त्यात ठराविक मुद्दयांबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून झोपडपट्टी सदृश्य अहह्वाल शिर्षकाखाली केवळ विशिष्ठ तपशील मागवून अशा जागा त्या आधारावर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे, त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियमावलीनुसार रहिवासी भाडेकरूंना झोपडपट्टीधारक म्हणून विनामोबादला सदनिका/गाळे देणे, त्यापोटी विकसकास मोठ्याप्रमाणात चटई क्षेत्र / टीडीआरचा मोबदला देणे याबाबी होत असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास येत आहे. या पार्शवभूमीवर  ज्या प्रकरणांमध्ये पुणे महानगरपालिकेकडून अहवाल पाठविण्यात आलेले आहेत, परंतु झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाकडून अध्याप प्रस्ताव मान्य करण्यात आलेले नाहीत, असे सर्व प्रस्ताव स्थगित करण्यात यावेत व त्या सर्व प्रकरणांचा अहवाल सादर करण्यात यावा.

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण

Pune Water Crisis | PMC Pune | यंदा उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) मोठया प्रमाणात पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र महापालिकेला असे करणे परवडणारे नाही. नागरिक आणि राजकीय लोकांचा रोष महापालिकेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने संयत  भूमिका घेत सध्या तरी पाणीकपात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीकपाती बाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे  पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी The Karbhari शी बोलताना सांगितले. (Pune Water Cut)
शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. (PMC Pune News)

जलसंपदा विभागाने म्हटले आहे कि, सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते
३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. याबाबत जगताप यांनी सांगितले कि पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे.

| महापालिका 200 एमएलडी पाणी वाचवणार

जगताप यांनी सांगितले कि महापालिका येत्या 8 दिवसात कुठलीही कपात न करता महापालिका 150 MLD पाणी बचत करणार आहे. कारण फुरसुंगी गावाला 172 एमएलडी पाणी कॅनॉल मधून दिले जाते. खडकवासला धरणातून हे पाणी दिले जाते. फुरसुंगी गावाची गरज ही 22 एमएलडी ची आहे. मात्र पाणी गळती जमेस धरून एवढे पाणी सोडावे लागते. मात्र आता हे पाणी बंद पाईपलाईन मधून घेतले जाणार आहे. बंद पाईपलाईन झाल्याने महापालिका फक्त आवश्यक 22 एमएलडी च पाणी उचलणार आहे. बाकी 150 एमएलडी पाणी बचत होणार आहे. तसेच जगताप यांनी सांगितले कि अजून 50 एमएलडी पाण्याची बचत आम्ही करू शकतो. असे 200 एमएलडी पाणी आम्ही बचत आम्ही कुठलीही कपात न करता करणार आहोत. याबाबत लवकरच पाटबंधारे विभागाला अवगत केले जाईल.

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

Categories
Breaking News PMC social पुणे

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

Fire NOC | PMC Pune | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रांत येणाऱ्या विविध प्रकारच्या व सर्व उंच इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी प्राथमिक अग्निशमन दाखला देण्यात येतो. तसेच भोगवटा पत्र देणेपूर्वी पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत (PMC Fire Brigade Department) अग्निशमन सेवा शुल्क आकारून अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. मात्र अंतिम दाखला देताना हेरफार केल्याची उदाहरणे निदर्शनास आली आहेत. याबाबत महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे टाळण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी नवीन नियमावली जारी केली आहे. (Pune Municipal Corporation News)
महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा अधिनियम २००६ कलम ३ (२) व ४ (१) तसेच एकत्रित विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली २०२० नुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रांत येणाऱ्या विविध प्रकारच्या व सर्व उंच इमारतींचे बांधकाम नकाशे मंजूर करण्यापूर्वी प्राथमिक अग्निशमन दाखला देण्यात येतो. तसेच भोगवटा पत्र देणेपूर्वी पुणे महानगरपालिका अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन सेवा शुल्क आकारून अंतिम अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. प्राथमिक अग्निशमन ना हरकत दाखल्यामध्ये नमुद केलेल्या अग्निशमन यंत्रणेचे काम संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांनी परवाना दिलेल्या फायर लायसन्स एजन्सी यांच्या कडून केले जाते. तथापी, फायर लायसन्स एजन्सी अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना मंजुर बांधकाम नकाशानुसार जागेवर बांधकाम नसतांना देखील अग्निशमन यंत्रणेचे काम करणे, अग्निशमन यंत्रणेचे चुकीच्या पध्दतीने काम करणे, भारतीय मानांकनाचे (ISI Mark) अनुपालन न
करता अग्निशमन यंत्रणेचे काम करणे, फायर लायसन्स एजन्सी स्वतः अग्निशमन यंत्रणेचे काम न करता “फॉर्म-अ/ फॉर्म-ब” अदा करणे व दोन फायर लायसन्स एजन्सींनी काम केल्यामुळे संबंधितांवर जबाबदारी निश्चित करणे अडचणीचे होणे अशा बाबी घडल्याचे निदर्शनास आले आहे. यातून तक्रारीचे प्रसंग उद्भवले आहेत. या  बाबी टाळण्यासाठी कार्यपद्धतीत सुसूत्रता आणली आहे. (PMC Pune News)

अग्निशमन यंत्रणेचे काम करण्यापूर्वीची कार्यपध्दती (प्राथमिक अग्निशमन दाखल्यासाठी)
१) बांधकाम नकाशे मंजुरी असल्याची तसेच जागेवरील बांधकाम मंजुर बांधकाम नकाशानुसार झाले आहे किंवा नाही (जसे साईड मार्जीन, जीन्याची रुंदी, पॅसेज वॉटर टँक इत्यादी) याची खात्री करुनन फायर लायसन्स एजन्सी यांनी अग्निशमन यंत्रणा उभारणीचे प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी.
२) प्राथमिक अग्निशमन ना-हरकत दाखल्यात नमुद केल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर सुरु करण्यापूर्वी अग्निशमन यंत्रणेच्या कामाचा नकाशे तयार करुन ते अग्निशमन विभागा कडून मंजुर करुनच लायसन्स एजंसी णे तयार केलेले अग्निशमन यंत्रणेचे काम प्रत्यक्ष जागेवर सुरु करण्यात यावेत.
३) नियमितीकरण बांधकामाच्या अग्निशमन यंत्रणेचे काम सुरु करण्यापूर्वीदेखील अग्निशमन यंत्रणेच्या कामाचे नकाशे तयार करुन ते अग्निशमन विभागाकडून मंजुर करुनच अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर सुरु करण्यात यावेत.
४) अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना आवश्यक त्या सर्व ठिकाणी / वापरण्यात येणाऱ्या उपकरणांसाठी भारतीय मानंकनाचे (ISI Mark) अनुपालन करावे. तसेच या यंत्रणेचे काम करताना वापरण्यात येणारे साहित्याचा मेक व तांत्रिक माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक राहील.

अग्निशमन यंत्रणेचे काम केल्यानंतर करावयाची कार्यपध्दती (अंतिम अग्निशमन ना- हरकत दाखल्यासाठी)
१) अग्निशमन यंत्रणेचे काम जागेवर पूर्ण झाल्यानंतर फायर लायसन्स एजन्सी यांनी प्रथम अग्निशमन यंत्रणेची चाचणी घेऊन चाचणी यशस्वीरित्या पार पडल्यावर सदर चाचणीस समधानकारक असल्यास त्याबातचे विकासकाचे प्रमाणपत्र घेऊन फायर लायसन्स एजन्सी यांनी विकासक यांना फॉर्म अ अदा करावा.
२) अंतिम अग्निशमन ना हरकत प्रस्तावासाठी प्रस्ताव दाखल करतांना जागेवर काम करण्यात आल्याप्रमाणे अग्निशमन यंत्रणेच्या कामाचे नकाशे (Fire System Layout) व Hydraulic Calculation सादर करणे आवश्यक राहिल.
३) अग्निशमन विभागाने दिलेली चेक लिस्ट नुसार अंतिम अग्निशमन ना-हरकत प्रस्ताव सादर करावा.
४) अग्निशमन यंत्रणेचे काम एकापेक्षा अधिक फायर लायसन्स एजन्सी यांनी केले असल्यास कोणत्या एजन्सी यांनी कोणते काम केले आहे याबाबत मेक व तांत्रिक माहितीसह स्पष्ट उल्लेख असावा. अशा एजंसीची नावे अंतिम ना-हरकत दाखल्यात दाखल करण्यात येतील
५) अपूर्ण अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना पूर्वीच्या फायर लायसन्स एजन्सी यांनी केलेल्या कामाबातचा तपशिल व अग्निशमन कायद्याप्रमाणे आवश्यक Form-A विकासकामार्फत सादर करणे आवश्यक आहे.
६) अग्निशमन यंत्रणेचे काम करतांना वापरण्यात आलेल्या अग्निशमन पंपाची क्षमता, पंपाचा सिरियल नंबर, पॅनल डिटेल्स याचा समावेश असणे अत्यावश्यक राहील तसेच फायर हायड्रन्ट, डिटेक्शन स्पिन्कलर्स, पाईप्स, फायर डोअर ( Fire Door) यांचे मेक, क्षमता व संख्या तसेच आवश्यकतेनुसार सिरियल नंबर उपलब्धे नुसार “FORM-A” मध्ये नमुद करणे आवश्यक राहील.

PMC Engineer Promotion | अधीक्षक अभियंता नियुक्तीच्या मुख्य सभा ठरावाला न्यायालयात आव्हान देणार | अरविंद शिंदे

Categories
Breaking News PMC पुणे

 PMC Engineer Promotion | अधीक्षक अभियंता नियुक्तीच्या मुख्य सभा ठरावाला न्यायालयात आव्हान देणार | अरविंद शिंदे

PMC Engineer Promotion | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) नुकतीच अधीक्षक अभियंता (स्थापत्य अभियांत्रिकी) पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. मात्र याबाबत होत असलेली कार्यपद्धती आक्षेपार्ह असल्याचा आरोप शहर काँग्रेस चे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी केला आहे. तसेच याबाबत न्यायालयात जाण्याचा इशारा देखील शिंदे यांनी दिला आहे. (PMC Pune News)

याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. शिंदे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका मध्ये अभियांत्रिकी पदाच्या बढती प्रक्रिया चे कामकाज सामान्य प्रशासन विभाग पुणे म.न.पा. मार्फत चालु आहे. सदस्थितीत ‘अधिक्षक अभियंता’ स्थापत्य अभियंत्रिकी पदाच्या बढतीचे मुख्य समेत ठराव करण्यात आल्याचे समजते. सदर चुकीच्या व आक्षेपार्ह ठरावामुळे मुळ (सेवेत रुजु होण्यापूर्वी) पदवीधारक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्याय होत आहे. सदर ठरावातील निवड यादी करताना सामान्य प्रशासन विभाग पुणे महानगरपालिका चांच्याकडून मनमानी पद्धतीने त्यांच्या मर्जीतील तत्कालीन डिप्लोमाधारक (पदविका धारक) वायदंडे श्रीकांत व अमर शिंदे यांना बढतीत प्राधान्य दिलेले आहे. वास्तविक शासन निर्णय नुसार २५.०५.२००४ रोजी किंवा त्यापुर्वीची सेवा ज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील, असे नमूद आहे. म्हणजेच यापदासाठी तत्कालीन अभियंत्रिकी स्थापत्य पदवी आवश्यक / बंधनकारक आहे. मात्र त्यावेळी डिप्लोमाधारक (पदविका) असणाऱ्या सेवकांचा या पदासाठी प्रशासक प्रशासनाने विचार केल्यामुळे, तत्कालीन पदवीधारक असणाऱ्या सेवकांवर अन्याय होत आहे. (PMC Employees promotion)
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, सद्यस्थितीत पुणे महानगरपालिकेत प्रशासक यांच्याकडून मुळ तत्कालीन पदवीधारक यांनी केलेल्या तक्रारींचे/अर्जाचे विचार केला जात ना , ही वस्तुस्थिती आहे. याबाबत केलेल्या तक्रारींचे लेखी उत्तर म.न.पा. सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून दिले जात नाही. तसेच शासन निर्णय बाबत चूकीचा अर्थ लावून सदर अधिक्षक अभियंता या पदासाठी चूकीची निवड यादी करून शहर अभियंता यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात येत आहे. त्यामुळे तत्कालीन पदवीधारक यांच्या नैसर्गिक हकावर गदा येत आहे. तसेच त्यामुळे महानगरपालिकेतील मुळ तत्कालीन पदवीधारक यांच्यावर फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक स्वरूपाचा अन्याय होत आहे. (Pune Municipal Corporation)

शिंदे यांनी म्हटले आहे कि, सद्य स्थितीत प्रशासन, पुणे महानगरपालिका यांच्याकडून तत्कालीन सेवक श्री. अमर शिंदे व श्री. श्रीकांत वायदंडे या सेवकांची मुख्य सभेकडे केलेली शिफारस ही अक्षेपार्ह वादग्रस्त व संशयास्पद आहे. सदर पदोन्नतीबाबत आर्थिक गैरव्यवहार व वशिलेबाजी झाल्याचे नाकरता येत आहे. यामुळे शासनाच्या परिपत्रक व नियमावलीस विसंगत भूमिका घेत अभियंता श्री. अमर शिंदे व श्री. श्रीकांत वायदंडे यांच्या पदोन्नतीस मुख्य सभेने दिलेल्या मान्यतेस भी हरकत घेत आहे. सदर निर्णयाचा फेरविचार करून शासकीय नियमावलीनुसार पात्र मुळ पदवीधर यांचा अधिक्षक अभियंता पदासाठी विचार करावा. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व न्यायालयीन दाद मागावी लागेल. असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Metro | PMC Pune | पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या सहयोगाने येरवडा मेट्रो स्थानकाचे नाविन्यपूर्ण नियोजन

Pune Metro | PMC Pune |पुणे मेट्रो प्रकल्पातील (Pune Metro Project) रुबी हॉल ते रामवाडी या मार्गीकेवरील स्थानकांची कामे जवळपास पूर्ण होत आली आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मार्गावर येरवडा हे महत्त्वाचे स्थानक असून, हा भाग दाट लोकवस्तीचा आहे. येरवडा मेट्रोस्थानक सुरू झाल्यानंतर या परिसरातील हजारो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. (Pune Metro | PMC Pune)

येरवडा स्थानक हे पुणे – नगर या राष्ट्रीय महामार्गावर असून तेथे प्रचंड प्रमाणात वाहनांची निरंतर वाहतूक सुरू असते. येरवडा मेट्रो स्थानकात प्रवेश व बाहेर बाहेर पडण्याची रचना तेथील वाहतुकीला सुसंगत व पूरक अशी करण्यात आली आहे. यामुळे येथील होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यास याची मदत होईल. पुणे मेट्रो व पुणे मनपा यांनी नुकताच यासंबंधी आराखडा बनविला आहे व त्या आराखड्यानुसार लवकरच काम पूर्ण करण्यात येईल.

येरवडा मेट्रोचा स्थानकाच्या दोन्ही बाजूला लिफ्ट, सरकते जिने (एस्केलेटर) आणि पादचारी जिने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल तसेच प्रवाशांना चांगली सेवा देता येईल.

येरवडा मेट्रो स्थानकापासून पुणे विमानतळ जवळपास ४.८ किमी अंतरावर असून त्यामुळे येरवडा मेट्रो स्थानक ते विमानतळ अशी फिडर बस सेवा पीएमपीएमएलच्या सहकार्याने चालविण्यात येणार आहे. विमानतळ विशेष फिडर बस थांबण्यासाठी व दोन बस बेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो मधून उतरल्यावर लगेचच विमानतळ बस सेवेचा लाभ घेऊन विमानतळावर जाणे सोयीचे होईल.

मेट्रो स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला (वार्ड ऑफिसच्या बाजूला) महापालिकेची जागा असून तेथे पीएमपीएमएल बस व एमएसआरटीसी बस थांबा करण्यात येणार आहे. जेणेकरून बस थांबलेली असताना महामार्गावरील वाहनांना अडथळा होणार नाही.

याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रावण हर्डीकर (भाप्रसे) म्हणाले की, ‘पुणे मेट्रो आणि पुणे मनपा यांच्या संयुक्त नियोजन करून येरवडा स्थानकाचा आराखडा वैशिष्ट्यपूर्ण बनविला आहे. त्यामुळे रस्त्यावरची कोंडी कमी होणार आहे तसेच येरवडा स्थानक वापरणाऱ्या प्रवाशांना मल्टी मॉडेल इंटिग्रेशन चा फायदा होणार आहे तसेच विमानतळासाठी कनेक्टिव्हिटी सुधारून प्रवास जलद होणार आहे’.

PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा

 

PMC Pedestrian Day | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) पादचारी दिवस (Pedestrian Day) हा अभिनव उपक्रम देशात राबवणारी पहिली महापालिका आहे.  यंदा देखील पादचारी दिनाचे तिसरे वर्ष साजरा करण्यात आले. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)

पुण्यातील प्रतिष्ठित लक्ष्मी रस्ता या दिवशी वाहन विरहित करण्यात आला. नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक हा रस्ता वाहनांना बंद करून फक्तं पादचारी करण्यात आला. या शिवाय पुणे शहरातील १०० चौक देखील पादचारी सुरक्षा निश्चित करण्यात आले. आज पुणे महापालिकेच्या पथ विभागाने दर वर्षी प्रमाणे हा उपक्रम यशस्वी करून दाखवला. पथ विभागाने केलेल्या योजना व मागील पाच वर्षात केलेली कामे यंदा प्रदर्शित करण्यात आली. पदपथ नियोजन करताना महत्त्वाचे मापदंड यावेळी प्रदर्शित करण्यात आले , परिसर संस्थेच्या मार्फत सार्वजनिक व शाश्वत वाहतुक याचे महत्व,  सेव किड्स फाऊंडेशन तर्फे लहान मुलांसाठी रस्ते सुरक्षा कार्यशाळा , एकांश ट्रस्ट तर्फे विकलांग अपंग लोकांसाठी जनजागृती कार्यशाळा , साथी हाथ बढाना संस्थेचे मानसिक आरोग्य या विषयी पथनाट्य,  sptm मार्फत झेब्रा वेषभूषा करून  रस्ते सुरक्षा बाबत प्रबोधन असे उपक्रम होते.

त्र्यंबकेश्वर संस्थेतर्फे मर्दानी खेळ , रस्ता Jammers तर्फे संगीत इत्यादी मनोरंजन उपक्रम होते. आज महामेट्रोने ई-स्कुटी  ही विद्युत वाहन मेट्रोपासून घरापर्यंत प्रवासासाठी उपलब्ध केले तसेच पीएमपीएमएल ने जादा बसचे नियोजन केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचे मा. श्री विकास ढाकणे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) यांच्या हस्ते झाले व पथ विभागाचे मा. मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर अणि मा. अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, माजी मुख्य अभियंता (पथ विभाग) व्ही. जी. कुलकर्णी तसेच पर्यावरण विभागाचे प्रमुख मा.माधव जगताप उपस्थित होते.  लक्ष्मी रस्ता व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष श्री फत्तेचंद रांका , पथारी संघटनेचे श्री. रवींद्र माळवदकर व श्री. शंके हे  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा  सामान्य लोकांनी आनंद घेतला.

Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा! | अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव 

Categories
Breaking News PMC पुणे

Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा!

| अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव

Ramesh Shelar News | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र अकार्यकारी पद हे प्रशासनाच्या चुकीमुळे माझ्यावर लादले गेले आहे. असे रमेश शेलार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आपल्याला दिली गेलेली शिक्षा रद्द करावी, याबाबत स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि अपील उप समिती (PMC Appellate Sub Committee) कडे अपील केले होते. अपील उप समिती च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला कि याबाबत आयुक्तांनी अभिप्राय द्यावा. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांच्या माध्यमातून अभिप्राय देणार आहेत. या अभिप्राया बाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. (Pune Municipal Corporation)
अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी प्रशासनास याआधीच निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे आधीच केली आहे. (Pune Municipal Corporation)
त्यानंतर प्रशासनाला शेलार यांनी दुसरे पत्र दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे कि मुख्य  सुरक्षा अधिकारी” (वर्ग-१) पदावरून अकार्यकारी पदभार समकक्ष पद हे वर्ग- २ “सुरक्षा अधिकारी” या पदाशी समकक्ष यादी तत्कालीन महापालिका आयुक्त यांजकडेस मान्यतेसाठी तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे मार्फत तत्कालीन उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागामार्फत ठेवली होती. वास्तविक माझी निवड “मुख्य सुरक्षा अधिकारी” (वर्ग – १) पदी सरळसेवेने झालेली आहे व हे पद खातेप्रमुखांचे आहे. (PMC Pune News)
खातेनिहाय चौकशी आज्ञापत्रक ३१/०८/२०१९ रोजी पारित झालेनंतर मी सेवेमध्ये पुर्नस्थापीत झालो. तदनंतर तत्कालीन उप आयुक्त सामन्य प्रशासन विभागाने समक्ष चर्चा करून (वर्ग-२) पदांची यादी केली. म्हणजेच मला (वर्ग -१) पदावरून (वर्ग -२) समकक्ष पदावरती अकार्यकारी कामकाज सोपविले यामधून मला पुन्हा जबरी शिक्षा केली अशी माझी धारणा झाली आहे. माझी शैक्षणिक अर्हता त्यावेळी D.C.E,BE(old) Civil, L.L.B, अशी होती कारण माझी सन २००९ रोजी सरळसेवा नेमणूक पद “मुख्य सुरक्षा अधिकारी”पदासाठी L.L.B पदवीस प्राधान्य होते म्हणूनच झालेली आहे. ०१/१०/२०१९ चे निवेदनावरती तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “GAD मधून हजर करून अकार्यकारी पदावर नियुक्ती देणेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करणे उचित राहील”. असा शेरा नमूद केलेला आहे. त्यांस तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी मान्य असे नमूद केलेले आहे. (PMC Pune Marathi News)
वास्तविक त्यावेळी मी सेवेमध्ये कार्यकारी म्हणून “मुख्य सुरक्षा अधिकारी” कामकाज पाहत होतो. ‘मानीव निलंबन’ निलंबन झालेले वर्ग -१ चे अधिकारी सेवेमध्ये आलेनंतर कार्यकारी म्हणून कामकाज पहात आहे. एल.बी.टी विभागाने प्रसिद्ध झालेली संकेतस्थळावरील माहिती व प्रमाणपत्र हा त्याचा भाग आहे. या  सर्व प्रकारामुळे माझे सह महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त चा पदावरती पदोन्नतीचा परिणाम झाला आहे.  तसेच इतर समकक्ष पदावर (मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, मुख्य अभियंता, उप आयुक्त अतिक्रमण व समाज विकास अधिकारी इत्यादी.) सुद्धा कामकाज करता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार होऊन “कार्यकारी” पदावरती (वर्ग -१) समकक्ष काम करण्याचे आदेश दिले जावेत. असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान आपली शिक्षा रद्द करावी यासाठी शेलार यांनी  स्थायी समिती आणि अपील उप समिती कडे अपील केले होते. अपील उप समिती च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला कि याबाबत आयुक्तांनी अभिप्राय द्यावा. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांच्या माध्यमातून अभिप्राय देणार आहेत. या अभिप्राया बाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
—-

Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

Categories
Breaking News PMC social पुणे

Kunbi-Maratha Reservation | PMC | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदीची माहिती घेण्यास सुरुवात

 

Kunbi-Maratha Reservation | PMC | राज्यभरात मराठा-कुणबी नोंदी (Maratha-kunbi Registration) घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) कर्मचाऱ्यांच्या कुणबी नोंदी ची देखील माहिती घेतली जाणार आहे. १९६७ पूर्वीचे महापालिका अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्तक / सेवा अभिलेख तपासणी करून त्याआधारे प्राप्त नोंदी कळविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांनी दिले आहेत. दरम्यान महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या नोंदीची देखील माहिती घेतली जात आहे. (Kunbi-Maratha Reservation | PMC)

शासन निर्णयान्वये मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देणेबाबत मा.न्यायमूर्ती श्री. संदिप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेत आलेली आहे.
या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. दरम्यान या नोंदी  बाबत  तपासणीची कार्यवाही सुरु करणेचे अनुषंगाने सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी यांचे स्तरावर समन्वय कक्ष/विशेष कक्ष स्थापन करणेत आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही करून त्याबाबत अहवाल सादर करणेबाबत सरकारने आदेश दिले आहेत. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेमधील अधिकारी / कर्मचारी यांचे सेवापुस्ताकांची अभिलेख तपासून त्याआधारे नोंदीबाबतची माहिती सादर करणेबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत कार्यवाही करणेबाबत एक समन्वय अधिकारी नेमण्यात आला आहे. संजयकुमार राठोड, प्रशासकीय अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग यांची याकामी नेमणूक करण्यात आली आहे.  राठोड यांनी  ज्योती कदम, निवासी उप जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून कामकाज पहावयाचे आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत. (PMC Pune News)

तर दुसरीकडे महापालिका शाळांतील (PMC Pune Schools) विद्यार्थ्यांच्या नोंदी घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. हे काम देखील प्रशासकीय अधिकारी राठोड यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

PMC Pune | Viksit Bharat Sankalp Yatra | २४ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा | ५६७५५ पुणेकर सहभागी 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune | Viksit Bharat Sankalp Yatra | २४ ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा | ५६७५५ पुणेकर सहभागी

PMC Pune | Viksit Bharat Sankalp Yatra | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने आयोजित “विकसित भारत संकल्प यात्रेत” (Viksit Bharat Sankalp Yatra )केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनच्या पी.एम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना,राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना व पुणे मनपाची शहरी गरीब योजना ,मोफत आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यत पोहोचवण्यात येत आहे. आतपर्यंत एकूण २४ ठिकाणी विकसित भारत संकल्प रथाचे आयोजन करणेत आले असून त्यामध्ये पुणे शहरात्तील ५६७५५ नागरिकांपर्यंत माहिती देणेत आली व प्रत्यक्ष ८९८६ नागरिकांना विकसित भारत यात्रेत लाभ देणेत आला. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

सकाळ व दुपार सत्रामध्ये आतापर्यंत कसबा गणपती मंदिर परिसर,दगडूशेठ हलवाई मंदिर परिसर,शनिवार वाडा परिसर,सेवा मित्र मंडळ परिसर,महाराणा प्रताप बाग,सणस मैदान परिसर,खडकमाळ आळी चौक,मिठगंगा पोलीस चौकी,महात्मा फुले स्मारक,रामोशी गेट परिसर,कामगार मैदान परिसर भवानी पेठ,पवळे चौक,निंबाळकर तालीम चौक,पत्र्या मारुती चौक,, लक्ष्मी रोड,ज्ञानेश्वर पादुका चौक, छत्रपती शिवाजीनगर,कमला नेहरू पार्क,चित्तरंजन वाटिका बाग,छत्रपती शिवाजीनगर गावठाण परिसर,पीएमसी बस स्टॉप,छत्रपती संभाजी महाराज बागेचा परिसर,गुडलक चौक परिसर,एफ सी कॉलेजचे मुख्य गेट,ओम सुपर मार्केट परिसर,खैरेवाडी परिसर या ठिकाणी प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी(स्वनिधी),आरोग्य तपासणी शिबीर/राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम,प्रधानमंत्री आयुष्मान कार्ड योजना ,उज्वला गॅस योजना,आधार अपडेट ,शहरी गरीब योजना पुणे मनपा, गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना इत्यादी योजनां राबविण्यात येत आहेत. यावेळी मा. महापालिका आयुक्त श्री.विक्रमकुमार मा.अतिरिक्त महापालिका डॉ.कुणाल खेमनार मा. उप आयुक्त तथा नोडल अधिकारी श्री नितीन उदास, कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त,घोले रोड सहाय्यक आयुक्त, भवानी पेठ सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे. (PMC Pune News)

विकसित भारत संकल्प रथ पुढील आठ दिवसात खालील ठिकाणी जाणार आहे.

१ 10-Dec-23 रविवार बारामती हॉस्टेल क्षेत्र 10:00 ते 01:00
10-Dec-23 रविवार परिहार चौक, औंध 02:00 ते 06:00
२ 11-Dec-23 सोमवार पांडव नगर परिसर 10:00 ते 01:00
11-Dec-23 सोमवार पुणे विद्यापीठ परिसर 02:00 ते 06:00
३ 12-Dec-23 मंगळवार छाजेड पेट्रोल पंप परिसर, बोपोडी 10:00 ते 01:00
12-Dec-23 मंगळवार रोहन निलय, औंध 02:00 ते 06:00
४ 13-Dec-23 बुधवार बालेवाडी हाय स्ट्रीट 10:00 ते 01:00
13-Dec-23 बुधवार बालेवाडी फाटा चौक 02:00 ते 06:00
५ 14-Dec-23 गुरुवार गणराज चौक 10:00 ते 01:00
14-Dec-23 गुरुवार बाणेर गावठाण परिसर 02:00 ते 06:00
६ 15-Dec-23 शुक्रवार पाषाण गावठाण परिसर 10:00 ते 01:00
15-Dec-23 शुक्रवार नळ स्टॉप परिसर, कोथरूड 02:00 ते 06:00
७ 16-Dec-23 शनिवार कर्वे पुतळा परिसर 10:00 ते 01:00
16-Dec-23 शनिवार कमिन्स कॉलेजचे मुख्य गेट 02:00 ते 06:00
८ 17-Dec-23 रविवार किनारा हॉटेल चौक 10:00 ते 01:00
17-Dec-23 रविवार सारबाग बागेचा परिसर 02:00 ते 06:00

तरी पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होऊन केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

DP Road | PMC Encroachment action | डीपी रस्त्यावर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

DP Road | PMC Encroachment action | डीपी रस्त्यावर महापालिकेची अनधिकृत बांधकामावर कारवाई

DP Road | PMC Encroachment Action | म्हात्रे पुल ते राजाराम पूल (Mhatre Bridge to Rajaram Bridge) दरम्यानच्या नदीकाठच्या हरित पट्ट्या मधील  डीपी रस्त्यावर महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या (PMC Building Devlopment Department) वतीने कारवाई करण्यात आली. NGT न्यायालयाने नदी पात्रातील निळ्या व लाल पूररेषा मध्ये बांधकाम वर कारवाई करून १० तारखेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.  यावेळी विविध मंगल कार्यालय, लॉन, हॉटेल इ. वर कारवाई करण्यात आली. यावेळी काही मिळकत धारकांनी स्वतः बांधकाम  काढून घेतले.  या कारवाईत सुमारे दीड लाख चौरस फुट विनापरवाना बांधकाम काढण्यात आले. अशी माहिती महापालिका बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
एका मिळकत धारकाने निळ्या व लाल पूर रेषे मध्ये केलेला भराव सात जेसीबी लावून काढून घेण्यात आला. यावेळी सहा डंपर चे मदतीने सुमारे ६000 घन फुट भराव काढून वाघोली प्लांट येथे पाठविण्यात आला.
या कारवाईत ७ jcb, ४ गॅस कटर, 3 ब्रेकर, ५० कर्मचारी  व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. (Pune PMC News)
सदर कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम , उप अभियंता श्रीकांत गायकवाड ,  कनिष्ठ अभियंता मनोज कुमार मते , शाखा अभियंता राहुल रसाळे , शाखा अभियंता भावना जड़कर , समीर गडइ , ईश्वर ढमाले, सागर शिंदे  कनिष्ट अभियंता यांनी पूर्ण केली .
एकूण १५ मिळकतीवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये सृष्टी गार्डन , कृष्णसुंदर लॉन्स , नारायणी लॉन्स , श्री वनारसे , मजेन्टा लॉन्स , केशवबाग pandit farm या  मिळकतदार व व्यावसायीक यांचा सह बहुतांश मिळकत धारकांनी स्वतःहून अनधिकृत बांधकामे काढून घेतली.