Kothrud Police Pune  | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोथरुडच्या जिगरबाज पोलिसांचा सत्कार

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Kothrud Police Pune  | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कोथरुडच्या जिगरबाज पोलिसांचा सत्कार

 

Kothrud Police Pune | काही दिवसांपूर्वी कोथरूड पोलिसांच्या (Kothrud Police) कर्तव्यदक्षतेमुळे दोन दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी कोथरुड पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वातील सर्व टीमचा विशेष सत्कार करुन अभिनंदन केले. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा सर्वांना अभिमान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. (Kothrud Police Pune)

राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून फरार म्हणून घोषित केलेल्या दोन दहशतवाद्यांना कोथरुड पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे पकडण्यात यश आले. या कारवाईत पोलिस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नजन यांच्या सह पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, पोलीस अंमलदार बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर पांचाळ, वैभव शिरकाल यांनी अतिशय शिताफीने दोघांना पकडले. (Pune Police)

कोथरुड पोलिसांच्या या कारवाईचे संपूर्ण देशभरातून कौतुक होत असून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज आपल्या कोथरुडमधील निवासस्थानी सर्व पोलिसांचा यथोचित सन्मान करुन, त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

यावेळी भाजपा नेते शैलेश टिळक, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपा कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी हे देखील उपस्थित होते.


News Title |Kothrud Police Pune | Guardian Minister Chandrakantada Patil felicitated the brave policemen of Kothrud

Pune Police |NIA | कर्तव्यदक्ष कोथरूड पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक!

Categories
Breaking News social पुणे महाराष्ट्र

Pune Police |NIA | कर्तव्यदक्ष कोथरूड पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक!

| पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून दोन्ही जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन

| मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्याची ग्वाही

Pune Police | NIA |कोथरुड परिसरात (Kothrud Area) संशयित दहशतवाद्यांना पकडणारे पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण (Pradeep Chavan), अमोल नाझण (Amol Nazan) यांच्या जिगरबाज कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात होत असून, कर्तव्यदक्ष पोलिसांचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, मुख्यमंत्री (CM) आणि उपमुख्यमंत्री (DCM) यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्याची, ग्वाही यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले. (Pune Police | NIA)

कोथरुड पोलीस स्टेशनचे शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझण मंगळवारी रात्री कोथरुड भागात गस्त घालत होते. यावेळी त्यांना तीनजण संशयास्पदरित्या वावरत होते. यावेळी पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाद यांनी तिघांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली.‌ यावेळी आरोपी इम्रान खान, युनुस साकी यांना ताब्यात घेतले. तर त्यांचा एक साथीदार तेथून पसार झाला. (Pune Police News)

यानंतर पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझण यांनी दोघाही आरोपींच्या घराची कसून झाडाझडती घेतली असता, त्यांच्या घरातून एक काडतूस, चार मोबाइल संच, लॅपटॉप जप्त करण्यात आला. चौकशीत खान, साकी आणि साथीदाराविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने राजस्थानात गुन्हा दाखल केला होता हे उघड झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर ते पसार झाले होते. एनआयएने त्यांची माहिती देणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यान, पोलीस शिपाई प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझण यांच्या कर्तव्यदक्षतेचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही दोन्ही जिगरबाज पोलिसांचे अभिनंदन केले असून, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्याची ग्वाही यानिमित्ताने केली आहे. (Pune Kothrud Police)


News Title |Pune Police |NIA | Dutiful Kothrud Police appreciated from all levels! | Congratulations to both the Jigarbaz Policemen from Guardian Minister Chandrakantada Patil

Women Safety | Pune Police WhatsApp Number | पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आयुक्त झाले सक्रिय | सूचना करण्यासाठी नागरिकांना दिला whatsapp नंबर

Categories
Breaking News social पुणे

Women Safety | Pune Police WhatsApp Number | पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेबाबत पोलिस आयुक्त झाले सक्रिय | सूचना करण्यासाठी नागरिकांना दिला whatsapp नंबर

Women Safety | Pune Police WhatsApp Number | पुणे शहरात सदाशिव पेठेत एका मुलीवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घडलेल्या घटनेनंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) यांनी महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी 8975953100 हा व्हॉटस्‌ अप नंबर (Pune Police WhatsApp Number) जाहीर केला असून त्यावर महिलांच्या सुरक्षेसंदर्भात (Women Safety) सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन केले आहे. त्यासोबत इतर घटनांचा आढावा घेऊन सूचनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच तातडीच्या सेवेसाठी 112 नंबरवर संपर्क करावा, असे सांगितले आहे. (Women Safety | Pune Police WhatsApp Number)

 यानंबरवर व्हॉटस्‌ऍपवर पुणेकर नागरिक महिलांच्या सुरक्षेसंदर्भात सूचना देऊ शकतात. यावर प्राप्त तक्रार व मेसेज संबंधित पोलीस स्टेशन, दामिनी पथक आणि गुन्हे शाखेचे पथक यांच्याकडे देण्यात येतील. या मेसेजच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईवर पोलीस आयुक्त कार्यालयातून देखरेख ठेवली जाईल. नागरिकांशी मैत्रीपूर्व अभिप्राय उपक्रम राबवावा, अशा हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आपण त्यांच्या गरजा आणि समस्या जोपर्यंत जाणून घेऊन शकत नाहीत. तोपर्यंत त्यावर उपाय शोधू शकत नाही. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांचा सहभाग घेण्यात आला आहे. (Pune Police)

शहरात युपीएससी परीक्षा पास झालेल्या एका तरुणीचा तीच्या मित्राने राजगडला नेऊन खून केला होता. या घटनेनंतर संगणक अभियंता असलेल्या महिलेवर रिक्षा चालकाने आडबाजूला नेऊन अतिप्रसंग करण्याची घटना घडली. तर नुकतीच एका तरुणीच्या मागे तिचा माजी प्रियकर कोयता घेऊन मागे लागलेली घटना घडली. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तिचे प्राण वाचवल्यावर ही घटना देशभर चर्चीली गेली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

——

News Title | Women Safety | Pune Police WhatsApp Number | Police Commissioner became active regarding safety of women in Pune city WhatsApp number given to citizens for notification

G 20 Summit in Pune | जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा | पालकमंत्री  

Categories
Breaking News Education Political पुणे

G 20 Summit in Pune | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालय येथे आढावा बैठक

| जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनासाठी चोख बंदोबस्त ठेवा | पालकमंत्री

G 20 Summit in Pune | जी-२० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित शैक्षणिक प्रदर्शनास (Educational Exhibition) मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी भेट देणार असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने चोख बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी केले. (G 20 Summit in Pune)

जी-२० बैठकीनिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलीस आयुक्तालय पुणे येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवी शिंगणापूरकर आणि शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Pune Police)

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, बैठकीसाठी येणाऱ्या परदेशी प्रतिनिधींच्या सुरक्षेबाबत अत्यंत गांभीर्याने लक्ष द्यावे. शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असल्याने सुमारे ४ ते ५ लाख विद्यार्थी भेट देण्याची शक्यता आहे. विद्यार्थी शाळेच्या बसेसने येणार असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे. नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले.

सुरक्षाविषयक समन्वयासाठी कमांड सेंटरची स्थापना करण्यात आली असून वाहतूक नियोजनासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना भेटीची पूर्वनियोजित वेळ देण्यात येत असून एकाच वेळी गर्दी होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


News Title | G20 Summit in Pune | Review meeting at Police Commissionerate in the presence of Guardian Minister Chandrakant Patil | Make proper arrangements for the exhibition organized on the occasion of the G-20 meeting Guardian Minister

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

Categories
Breaking News PMC social पुणे

CP Pune | PMC Pune | पावसाळ्यात पुणेकरांना नाहक त्रास होणार नाही याची काळजी घ्या | पुणे पोलीस आयुक्तांच्या पुणे महापालिकेला सूचना

CP Pune | PMC Pune | यावर्षी पावसाळा (Monsoon) सुरु होणेपुर्वी शहरातील वॉटर लॉगींगचे ठिकाणांची (Water Logging Places) व ड्रेनेजच्या झाकणांची (Drainage Covers) पाहणी करा. तसेच रस्त्यावरील खड्यांची (Potholes) पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती आणि उपाययोजना करुन घेणे उचित होणार आहे. जेणेकरुन वाहतूक कोंडी (Traffic Jam) होणार नाही.  तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Pune Ritesh Kumar) यांनी पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) केल्या आहेत. (CP Pune | PMC Pune)

विकासकाम झाल्यानंतर काळजी घेतली जात नाही

पोलीस आयुक्तांनी महापालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये विविध विकासकामे (Devlopment Works) सुरु असुन विविध विकासकामांकरीता रस्ते खोदाई ( ड्रेनेज लाईन / पिण्याचे पाईपलाईन / इलेक्ट्रीसीटी केबल / गॅस लाईन ) करण्यात येते. मात्र काम पूर्ण झालेनंतर त्या कामाकरीता खोदलले रस्ते तात्काळ दुरुस्त केले जात नाहीत. कंपनीने नियुक्त केलेला ठेकेदार खोदलेला रस्ता व्यवस्थित बुजवत नाहीत. खडी, माती टाकून बुजवलेल्या रस्त्यावरुन गाडी गेल्यास रस्ता लगेच खचून तो वाढतच जातो. त्यात पाणी साचल्याने खड्डे तयार होतात व असे खड्डे अपघातास कारणीभूत होतात.  विकास कामांकरीता रस्ते खोदाई झालेनंतर खोदलेला भाग बऱ्याच ठिकाणी तसाच ठेवला जात असून त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागते. प्रसंगी अपघात होण्याची शक्यता वाढते. (Pune Police)

मेट्रोच्या कामाने अडचणी वाढल्या

पुणे शहरामधील अनेक रस्त्यावर मेट्रोचे कामकाज (Pune Metro) चालु असुन त्या कामाच्या अनषंगाने रस्त्यावर खोदण्याचे कामे करण्यात आलेली आहे. काम पुर्ण झालेनंतर त्याकारीता खोदलेले रस्ते दुरूस्त केले गेलेले नाहीत. त्यामध्ये तात्पुरती खडी, माती टाकुन ते बुजविण्यात येतात. या ठिकाणावरून वाहने जाऊन रस्ता खचला जातो. त्यामुळे मोठा खड्डा होऊन पावसाचे पाणी साठवुन अपघात होण्याची शक्यता असते. मेट्रोच्या कामाचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडुन वाहतुकीची कोंडी होवुन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. मेट्रोच्या कामकाजाकरीता बरेच ठिकाणी बॅरीकेडस् करण्यात आले असुन मेट्रोचे कामकाज पुर्ण झालेनंतरही सदर ठिकाणाचे बॅरीकेडस् तसेच असल्याने वाहतुकीस कॅरेज वे कमी मिळुन अडथळा होवुन पावसाळयामध्ये सदर बॅरीकेडस् चुकविण्यात पावसाच्या पाण्यामुळे वाहने घसरून अपघात होतात. मेट्रोच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेली मशिनरी रोडवर तशीच ठेवण्यात आलेली आहे.  त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत असुन वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. (Pune Municipal Corporation News)

वाहनचालकांना करावी लागते कसरत

विविध कामांमुळे रस्त्यांची दूरावस्था होवून त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना नेहमी जीव मुठीत घेवून रस्त्यावर चालावे लागत आहे. अनेक भागात सांडपाण्याची वाहिनी तुंबल्यामुळे अगर फुटल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचल्यामुळे रस्ता वाहतूकीस उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी ड्रेनेजची तुटलेली झाकणे, रस्त्यावर अर्धवट बाहेर आलेली झाकणे यामुळे अपघातास निमंत्रण ठरते व रस्त्यावरचे खड्डे व अशी तुटलेली झाकणे चुकविण्याचे नादात वाहनचालकांचे वाहनावरचे लक्ष विचलीत होवून पायी चालणाऱ्या नागरिकांचा तसेच इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. (Pune police commissioner)

अनधिकृत फेरीवाल्यावर कारवाई आवश्यक

पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी फुटपाथ, रस्ते या ठिकाणी विशेषतः शहराचे मध्यवर्ती भागात मोठया प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत परिणामी वाहतूकीस रस्ता कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने वाहतूक
कोंडीच्या घटना घडत आहेत, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. अशा ठिकाणी वाहनचालक रस्त्यातच वाहन उभे करीत असतात, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता वाढते. याकरीता अशी अतिक्रमणे काढण्यात येवून फेरीवाले, पथारीवाले यांचेवर दैनंदिन कारवाई करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरुन चालणे शक्य होवून पादचाऱ्यांचे अपघात कमी होतील. तसेच त्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होईल. (Hawker’s in Pune)

पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक

पुणे शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वाहनांकरीता पार्किंग उपलब्ध नसल्याने रोडवर वाहने पार्क होत असतात, याकरीता पुणे महानगरपालिके तर्फे जास्तीत जास्त पार्किंग व्यवस्था उपलब्ध करणे आवश्यक आहे. शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ / भाजीमंडई आहे अशा ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पार्किंगची व्यवस्था / पार्किंग प्लाझा करणे गरजेचे आहे. (Parking Management)

सिग्नल यंत्रणा असणे गरजेचे

पुणे शहरामध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहतूक नियमन करणे जिकिरीचे होत आहे. त्यातच पुणे शहरातील प्रवेशाचे ठिकाणी जेथे अवजड वाहतूकीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी रस्त्यांची रुंदी जास्त असणे तसेच चौकामध्ये सिग्नल व्यवस्था असणे गरजेचे आहे. (Signal Management)

वाहतूक कोंडीवर उपाययोजनासठी बैठक आवश्यक

पुणे शहरामध्ये वारंवार होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वरील सर्व स्टेक होल्डर्स यांची संयुक्त बैठक झाल्यास एकत्रित चर्चा होऊन पावसाळयापुर्वी उपाययोजना करणेबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. जेणेकरुन पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या समस्यांमुळे व वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही. तसेच पोलीसांना वाहतूक नियमन करणे सोईस्कर होईल. ( Pune Traffic update)

पावसाळ्यात खड्डे होणार नाहीत याची दक्षता घ्या

पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडल्याने तसेच विविध कारणांमुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी साठून वाहतूक कोंडी झाल्याने वॉटर लॉगींगचे ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येवून वॉटर लॉगींग होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना होणे आवश्यक आहे. मागील वर्षी पावसाचे पाणी साठून वॉटर लॉगींग
झाल्याने त्याचा परिणाम शहरातील वाहतूकीवर झाला होता, शहरामध्ये जागोजागी प्रचंड प्रमाणात वाहतूक
कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहोचणेसाठी त्रास सहन करावा लागला होता. वॉटर लॉगींगचे ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था होऊन लहान मोठे अपघात झाले. तसेच जागोजागी ड्रेनेजचे झाकणातुन तुंबलेले पाणी रस्त्यावर येऊन बरीचशी वाहने रस्त्यात अडकुन पडल्याने
नागरिकांना त्रास झाल्याने प्रशासनास नागरिकांचा रोष सहन करावा लागला. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी
पावसाळयापुर्वीच ड्रेनेज झाकणांची दुरुस्ती तसेच रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरुन नागरिकांना तसेच प्रशासनास नाहक त्रास सहन करावा लागणार नाही व नागरिकांची गैरसोय
होणार नाही. माहितीचे अनुषंगाने यावर्षी पावसाळा सुरु होणेपुर्वी अशा वॉटर लॉगींगचे ठिकाणांची व ड्रेनेजच्या झाकणांची पाहणी तसेच रस्त्यावरील खड्यांची पाहणी करुन तात्काळ दुरुस्ती / उपाययोजना करुन घेणे उचित राहील जेणेकरुन वाहतूक कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना नाहक त्रास होणार नाही. असे पोलिस आयुक्तांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
—-
News Title | CP Pune |  PMC Pune |  Take care that Pune residents do not face any hardship during monsoon season  Notice of Pune Police Commissioner to Pune Municipal Corporation

Peace and Order in Pune | पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Peace and Order in Pune | पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्त यांना निवेदन

Peace and Order in Pune | पुणे शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शहर काँग्रेसच्या (Pune City Congress) वतीने पोलीस आयुक्त (CP Pune) यांना निवेदन देण्यात आले. (Peace and Order in Pune)

कॉंग्रेस च्या निवेदनानुसार  पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी (Cultural Capital) असून शांतता, सुव्यवस्था व सुरक्षा या शहरामध्ये उत्तमपणे गेली कित्येक वर्षे पाहावयास मिळते. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील नगर (Ahamadnagar), औरंगाबाद (Aurangabad), कोल्हापूर (Kolhapur), संगमनेर(Sangamner) आदी शहरांमध्ये काही अनुचीत प्रकार घडलेले आहेत. या प्रकारांचे पर्यावसण सांप्रदायिक वाद – विवाद व दंगलीमध्ये होत असल्याचे चित्र आहे. एखाद्या चूकीच्या प्रकाराबद्दल मोर्चे काढणे व त्यास जातीयवादी रंग देणे व शहराची शांतता आणि सुव्यवस्था बिघडविणे असे प्रकार आपल्याला पहावयास मिळाले आहेत. (Pune News)

     पुण शहरामध्ये असे कोणतेही प्रकार घडू नयेत या दृष्टीने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंध करणारे उपाय तातडीने पोलीसांनी अमंलात आणावेत. जी मंडळी अशा प्रकारचे उद्योग करतात त्यांच्यावर लक्ष ठेवावे या संदर्भात आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त मा. रितेश कुमारजी साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक  उपस्थित होते. (Pune Congress)

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, माजी महापौर कमल व्‍यवहारे, प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीता तिवारी, अजित दरेकर, मुनाफ शेख, सनी रणदिवे, रघुराज दरेकर आदी उपस्थित होते. –


News Title |A statement on behalf of the City Congress to the Commissioner of Police regarding the maintenance of peace and order in the city of Pune

 

Pune Police | PMC Pune | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Police | PMC Pune | मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात बैठक संपन्न

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे यंत्रणांना निर्देश

Pune Police | PMC Pune | पुणे शहरात पावसाळ्यामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने सर्व उपाययोजनांची कामे संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Ritesh Kumar) आणि पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी दिले. (Pune Police, PMC pune)

मान्सूनपूर्व तयारीच्या (pre-monsoon preparations) अनुषंगाने पुणे पोलीस आयुक्तालयात (गुरुवारी) आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते (Smart City CEO Sanjay kolte), पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक (Assistant police commissioner Sandeep karnik), पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (PMC Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच महामेट्रो, टाटा मेट्रो, पी.एम.आर.डी.ए., सार्वजनिक बांधकाम विभाग, कटक मंडळ, पी.एम.पी.एम.एल.चे अधिकारी उपस्थित होते. (Pune Monsoon news)

या बैठकीमध्ये पुणे शहरामध्ये पावसाळ्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी (Pune Traffic) होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. पावसाचे पाणी साचणारी ठिकाणे, मेट्रो मार्ग, मेट्रो स्थानकांची कामे व त्याचा राडारोडा रस्त्यावर असल्याने होणारी वाहतूक कोंडी, शहरात सुरु असलेली उड्डाणपुलांची कामे, स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत सुरु असलेल्या खोदकामामुळे पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे आदींच्या अनुषंगाने उपाययोजनांविषयी विचारविनिमय करण्यात आला. (Pune traffic news)

गटारे, नालेसफाईचे काम गतीने पूर्ण करावे तसेच गटारांची तुटलेली झाकणे बदलावीत असे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळी (स्टॉर्मवॉटर) पाईप लाईन, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन वगैरे कामामुळे रस्त्यात पडलेला राडारोडा काढून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या.

पावसाळ्यामध्ये वाहतूक नियमानाकरीता पुणे मनपा, महामेट्रो, टाटा मेट्रो यांच्याकडून वाहतूक शाखेस अतिरिक्त वॉर्डन पुरविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले.

आंबील ओढा, कोळेवाडी नाला, दळवी नगर चौक, आंबेगांव नाला, जांभुळवाडी नाला आदींच्या नालेसफाईबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पीएमपीएमएल बसेस नादुरुस्त होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. वाहतूकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे तात्काळ काढावीत असेही सांगण्यात आले.

अचानक पाऊस झाल्यास उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. सर्व संबंधित यंत्रणांचा एकमेकांशी समन्वय रहावा याकरीता सर्व संबंधित स्वायत्त संस्थांच्या कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येणार असून जलद प्रतिसादासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये तातडीने संदेशाचे आदानप्रदान करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.


News Title |

Pune police force | पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

Categories
Breaking News Political social पुणे महाराष्ट्र

Pune police force | पुणे पोलीस दलाच्या पायाभूत सुविधेसाठी १०० कोटी रुपयांचा निधी

 | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

Pune Police Force | पुणे व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय (Pune and Pimpri police commissionerate) आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या (Pune Rural police force) पायाभूत  सुविधेकरीता जिल्हा नियोजन समितीमधून (DPDC) ५० कोटी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून ५० कोटी असे एकूण १०० कोटी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापैकी ४१ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असून उर्वरित रक्कम लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian minister Chandrakant Patil) यांनी केले.
पुणे ग्रामीण पोलीसदलाअंतर्गत वेल्हे पोलीस ठाण्याच्या दुमजली नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार दिनेश पारगे, गट विकास अधिकारी पंकज शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते. (Pune police news)
श्री. पाटील म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पोलीस दलाला सुसज्ज साधने, आणि पोलिसांच्या निवासस्थानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पोलीस शहर आयुक्तालय आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाला वाहनासाठी जिल्हा नियोजन समितीमधून प्रत्येकी २ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व्यायामशाळेकरिता सुमारे २ लाख रुपयापेक्षा अधिकचा निधी देण्यात आला आहे. (Pune police commissionerate)
वेल्हे येथील पोलीस ठाण्याचे बांधकाम अद्ययावत पद्धतीने करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या पोलीस स्थानकाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम आणि फर्निचर करण्यासाठी रुपये ३ कोटी ३४ लाख रुपये इतका निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस दलाला सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट कार्य या इमारतीतून व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. (Pimpari police commissionerate)
पोलीस विभागाकडून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या परिसरातील घटनेबाबत माहिती पोलिसांना दिली पाहिजे. पोलीस विभागाने निःपक्षपणे तपास करुन सर्व सामान्य नागरिकाला न्याय मिळवून दिला पाहिजे. महिला विषयक प्रकरणे, जातीय तंटे आदी प्रकरणे जलदगतीने तपास केला पाहिजे. गुन्हा घडूच नये यासाठी सदैव सावध असले पाहिजे. वेल्हा तालुकाच्या विकासासाठी मागणीप्रमाणे पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून यापुढेही विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील श्री. पाटील यांनी दिली. (Pune police Force)
विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, वेल्हे पोलीस ठाण्याची इमारत ही पर्यावरणपूरक व निसर्गाला साजेशी आहे. सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी पोलीस दल कार्यरत असून पोलीस अधिकारी व कर्मचारी पारदर्शकपणे काम करावे. आपल्या परिसरात अनुचित घटना घडल्यास नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. फुलारी यांनी केले.
पोलीस अधीक्षक श्री. गोयल म्हणाले, जुने पोलीस ठाणे ब्रिटीशकालीन इमारतीत होते. सदर इमारत मोडकळीस आल्याने येथील कामकाज सन २०१६ पासून भाडेतत्वावर जागा घेऊन सुरु करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलीस स्थानकाच्या नवीन इमारत बांधकाम आणि फर्निचरसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती श्री. गोयल यांनी दिली.
श्री. पाटील यांनी पोलीस स्थानकाच्या नूतन इमारतीची पाहणी करुन झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांच्या हस्ते पोलीस स्थानक प्रागंणात वृक्षारोपण करण्यात आले.

सहायक निरीक्षक मनोज पवार यांचा सत्कार

यावेळी वेल्हे पोलीस स्थानकचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला. श्री. पवार यांनी पानशेत हद्दीत तीन वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीचा ४८ तासात शोध घेतला. हा खटला ‘फास्ट ट्रक कोर्टामध्ये चालविण्यात आला. उत्कृष्ट पद्धतीने तपास करुन पुरावे सादर केल्यामुळे आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात आली. याबद्दल भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत उत्कृष्ट तपासी अधिकारी म्हणून गौरव तसेच गृहमंत्री व पोलीस महासंचालक पदक प्राप्त झालेले आहे.
यावेळी परिसरातील आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

अद्ययावत सुविधा असलेले पोलीस स्थानक

वेल्हे पोलीस स्थानकाचे एकूण चटई क्षेत्रफळ ७८३.३० चौ. मी. आहे.  तळमजला मजल्यावर एकूण १२ कक्ष असून पहिल्या मजल्यावर एकूण ६ कक्ष आहेत. या पोलीस स्थानक हद्दीत एकूण १२९ गावे असून क्षेत्रफळाने मोठी हद्द आहे. यामध्ये डोंगर दरे, दोन किल्ले, ३ धरणे व पर्यटन स्थळे, शिवकालीन मेंगाई माता देवीचे मंदीर, महाराणी राजमाता सईबाई समाधीस्थळ, पाल यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांनी परिसरात वृक्षारोपणदेखील केले आहे.
0000
News Title | Pune police force |  100 crore fund for infrastructure of Pune Police Force  |  Guardian Minister Chandrakantada Patil

Pune CCTV Project | पुणे पोलिसांनी पुणे महापालिकेकडे केली ही मागणी | मात्र महापालिकेचा पोलिसांना प्रतिसाद नाही!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune CCTV project | पुणे शहरात सीसीटीव्ही बसवताना खोदाई शुल्क माफ करण्याची पुणे पोलिसांची मागणी

| पुणे महापालिकेकडून मात्र कसलाही प्रतिसाद नाही

Pune CCTV project | पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून (Pune Police commissionerate) पुणे शहर सीसीटीव्ही फेज-२ प्रकल्पाच्या (Pune city CCTV phase 2) कामाची सुरुवात करण्यात येणार आहे. हे काम करताना खोदाई आवश्यक असते. मात्र यासाठी पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) खोदाई शुल्क (Trenching Fee) आकारले जाते. हे शुल्क माफ करण्याबाबत पुणे पोलिसांनी (Pune Police) महापालिकेला राज्य सरकारच्या आदेशाचा हवाला देत खोदाई शुल्क माफ करण्याबाबत पत्र दिले होते. मात्र महापालिकेकडून याबाबत कुठलाही प्रतिसाद पुणे पोलिसांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त कार्यालयाने  पुन्हा एकदा पत्र पाठवत खोदाई शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. (Pune CCTV project)

पुणे पोलिसांच्या (Pune police) पत्रानुसार , पोलीस आयुक्त, पुणे शहर हद्दीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा (CCTV in Pune) वाढवणे व नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याने सध्याच्या सीसीटीव्ही कार्यान्वीत प्रकल्पामध्ये वाढ करावयाची आहे. त्यासाठी पुणे शहर हद्दीमध्ये विविध ठिकाणी खोदकाम, पुर्नस्थापीत करणे इ. कामे करणे करीता पुणे महानगर पालिकेकडून (PMC Pune) तसेच पुणे व खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाकडून (Khadaki Cantonment Board) विविध शुक्लाची आकारणी येते. यापूर्वी सन २०१३ मध्ये महाराष्ट्र शासन गृह (Home ministre Maharashtra) विभागाने महापालिकेस विविध कामाकरीता आकारण्यात येणारे कोणतेही शुल्क अलाईड डिजीटल सर्व्हिसेस लि. मुंबई यांचे कडून अकारणी करणेत येवू नसे असा प्रस्ताव आपले कायर्पलयास पाठविणेत आला होता. त्याअनुषंगाने महापालिकेकडून कोणतेही शुल्क आकारणेत आलेले नव्हते. (Pune CCTV news)

गृह विभागाचे पत्रा नूसार त्याच प्रमाणे शासनाच्या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या फेज-२ कामा करीता ROWIRI सह इतर कोणतेही शुल्क मे अलाईड डिजीटल सर्व्हिसेस लि. मुंबई न आकारता ते क्षमापीत (Exempt) करणेस व तसे पोलीस आयुक्त कार्यालयास कळविणे  पत्रान्वये पालिकेस विनंती करण्यात आलेली होती. परंतू अदयाप याबाबत पालिकेकडून आदेश होणे प्रतिक्षाधीन आहे. याबाबत लवकर कार्यवाही करावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.
——
News Title | Pune CCTV project |  Demand of Pune Police to waive excavation fee while installing CCTV in Pune city |  But there is no response from Pune Municipal Corporation

Pune-Bengaluru highway Accident | पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी काय करणार उपाययोजना?

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune-Bengaluru highway Accident | पुणे- बेंगलुरू महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजनांचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे निर्देश

Pune-Bengaluru highway Accident |  पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Bengaluru highway) स्वामी नारायण मंदिराजवळ (Swami Narayan Temple) २३ एप्रिल रोजी पहाटे ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल बसच्या अपघाताच्या अनुषंगाने अपघाताची कारणे आणि अपघात टाळण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख(Pune Collector Dr Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले. (Pune-Bengaluru highway Accident prevention)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे आदी अधिकाऱ्यांसह ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’ या संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुणे- बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान होणाऱ्या अपघातांच्या अनुषंगाने उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. Pune-Bengaluru highway Accident

यावेळी स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताच्या संभाव्य कारणांबाबत परिवहन विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतचा संपूर्ण रस्ता उताराचा असल्याने इंधन वाचविण्याच्या प्रयत्नात न्यूट्रलमध्ये वाहन चालविण्याची वाहनचालकांची प्रवृत्ती असते. यातून वाहनांचा वेग वाढतो. वाहनाला सतत ब्रेक लावल्यामुळे ब्रेकमध्ये अनावश्यक उष्णता व दाब निर्माण होऊन तत्कालीन स्थितीत ब्रेक काम करेणासे होतात. हेदेखील अपघातांचे महत्त्वाचे कारण ठरू शकते, असे यावेळी सांगण्यात आले.

जड वाहनांची वेगमर्यादा घटविणे आवश्यक
कात्रज बोगदा ते नवले पूलादरम्यान अपघात टाळण्याच्या अनुषंगाने जड वाहनांसाठी वेगमर्यादा घटवणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. त्याअनुषंगाने ट्रक मालक संघटनांसोबत बैठक घेण्यात यावी, असे निर्देष जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिले.

एनएचएआय, पोलीस विभाग, परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींसह सेव्ह लाईफ फाऊंडेशन संस्थेने सुचविलेल्या विविध उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका
या अनुषंगाने तातडीने करावयाच्या उपाययोजनांतर्गत तसेच कात्रज बोगदा ते नवले पुलादरम्यान जड वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस चौकी स्थापन करणे, त्या ठिकाणी सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली (पीएएस) कार्यान्वित करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरी पूल दरम्यान वाहनांचा वेग कमी करण्यासाठी रम्बलरची संख्या वाढवणे, तातडीचे मदत देण्यासाठी पोलीस चौकीजवळ क्रेन तैनात ठेवणे, दरी पुलाजवळ सेवा रस्त्याला जड वाहनांना प्रतिबंध करण्यासाठी हाईट बॅरिकेट्स बसवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.

नियम तोडणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी 2 इंटरसेप्टर वाहने
राष्ट्रीय महामार्गाच्या या लांबीत वाहतूक नियमांचे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना तातडीने रोखण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेला एक आणि ग्रामीण पोलीसांना एक अशी दोन इंटरसेप्टर वाहने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याबाबत तातडीने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन करावयाच्या उपाययोजनांतर्गत कामांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून त्याअनुषंगाने लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री यांची बैठक होणार असल्याचे एनएचएआयचे प्रकल्प संचालक श्री. कदम यांनी सांगितले.

वाहन चालविताना ब्रेक निकामी झालेल्या वाहनांना रस्त्यावरुन बाजूला जाण्याचा पर्याय उपलब्ध होण्याच्यादृष्टीने इमर्जन्सी एस्केप प्लॅनअंतर्गत बाहेर पडण्याचे ठिकाण तयार करणेही उपयुक्त ठरेल, असेही यावेळी सुचविण्यात आले.