Tag: PMC Pune
PMC Solid Waste Management | स्वच्छता कर्मचार्यांची सुरक्षितता व प्रतिष्ठा याबाबत ५३ मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण संपन्न
PMC Solid Waste Management | वॉश सेक्रेटरीएट आणि युनिसेफ (UNISEF) च्या सहाय्याने व पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) सहयोगाने ५३ मास्टर ट्रेनर्सचे ३ दिवसांचे प्रशिक्षण राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे ११ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम सहभागी झाले होते. हे सर्व मास्टर ट्रेनर्स पुढील कालावधीत पुणे महानगरपालिका मधील सर्व स्वच्छता कर्मचार्यांना (Sanitation Workers) या विषयाबाबत प्रशिक्षित करतील. अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC Pune Solid Waste management Department) वतीने देण्यात आली.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (नागरी) टप्पा २.० च्या मार्गदर्शक सुचनांच्या अनुसार महाराष्ट्र राज्यात मिशनची अंमलबजावणी स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत सुरू आहे. यामध्ये ‘सफाईमित्र’ हे अत्यंत महत्वाचे सहयोगी आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत स्वच्छता कर्मचार्यांचे प्रशिक्षण, क्षमता बांधणी, माहिती, शिक्षण व संवाद या उपक्रमाच्या माध्यमातून सफाईमित्रांची/ स्वच्छता कर्मचार्यांची व्यावसायिक सुरक्षा आणि प्रतिष्ठा यावर भर द्यावयाचा आहे. यासाठी विभागीय नागरी आणि पर्यावरण अभ्यास केंद्र (RCUES), अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई (AIILSG) येथे युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहयोगाने सेक्रेटरीएट महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एनवारमेंटल सॅनिटेशन कोएलिशन स्थापन करण्यात आले आहे. या वॉश सेक्रेटरीएट आणि युनिसेफ च्या सहाय्याने पुणे महानगरपालिकेच्या सहयोगाने ५३ मास्टर ट्रेनर्सचे ३ दिवसांचे प्रशिक्षण राजा रवी वर्मा आर्ट गॅलरी, घोले रोड, पुणे येथे दिनांक ११ ते १३ सप्टेंबर २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम सहभागी झाले होते. (Pune Municipal Corporation)
हे सर्व मास्टर ट्रेनर्स पुढील कालावधीत पुणे महानगरपालिका मधील सर्व स्वच्छता कर्मचार्यांना या विषयाबाबत प्रशिक्षित करतील. या प्रशिक्षणाच्या समापन सत्रात या सर्व प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हे समापन सत्र श्रीमती. जलपा रत्ना, चीफ फील्ड सर्व्हिसेस, युनिसेफ, इंडिया कंट्री ऑफिस , श्रीमती. राजेश्वरी चन्द्रशेखर, चीफ फील्ड ऑफिस, युनिसेफ, महाराष्ट्र, श्री. संदीप कदम, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन ) पुणे महानगरपालिका , श्री. आनंद घोडके, वॉश ऑफिसर, युनिसेफ महाराष्ट्र आणि श्रीमती. उत्कर्षा कवडी, वरिष्ठ कार्यकारी संचालिका, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई, (संचालिका, सेक्रेटरीएट, महाराष्ट्र अर्बन वॉश आणि एनवारमेंटल सॅनिटेशन कोएलिशन), संचालिका, वॉश सेक्रेटरीएट, यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न झाले. (PMC Pune)
News Title |PMC Solid Waste Management | Completed training of 53 Master Trainers on safety and dignity of sanitation workers
PMC Pune Employees Union | अतिक्रमण विभागातील मारहाणीचा सर्व महापालिका संघटना उद्या करणार निषेध!
PMC Pune Employees Union | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) आणि अतिक्रमण निरीक्षक (Encroachment Inspector) यांना कर्त्तव्य बजावत असतांना मारहाण करण्यात आली. त्याचा उद्या सकाळी 11 वा. हिरवळीवर शांततामय मार्गाने निषेध केला जाणार आहे. यात सर्व संघटना सहभागी होणार आहेत. यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सर्व संघटना कडून करण्यात आले आहे. (PMC Pune Employees Union)
पुणे महापालिका कामगार यूनियन (मान्यताप्राप्त), पी एम सी एम्प्लॉईज युनियन, पुणे महानगरपालिका अभियंता संघ, पुणे महानगरपालिका अधिकारी संघ, डॉक्टर असोसिएशन, पुणे महापालिका मागासवर्गीय संघटना अशा सर्व संघटना यात सहभागी होणार आहेत. काल अतिक्रमण विभागात महापालिका कर्मचारी आणि RTI कार्यकर्ता यांच्या मारहाण झाली. अशा घटना घडत असल्याने महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे काम करणे अवघड झाले आहे. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार आहे. असे संघटना कडून सांगण्यात आले. (PMC Pune News)
News Title | PMC Pune Employees Union | All municipal organizations will protest the beating in the encroachment department tomorrow!
Warje DP Road | PMC Pune | वारजे, कर्वेनगर, कोथरूड परिसरात येण्यासाठी पर्यायी रस्त्याबाबत पुणे महापालिकेत महत्वाची बैठक
PMC Retired Employees Pension | गेल्या 10 दिवसांत 100 हून अधिक पेन्शन प्रकरणे मार्गी | अतिरिक्त आयुक्तांचा कारवाईचा इशारा आला कामी
PMC Sky Sign Department | परवाना निरीक्षक राजेंद्र केवटे, सुरेंद्र राऊत, लक्ष्मीकांत शिंदे यांचे निलंबन
| उपायुक्त माधव जगताप यांची माहिती
| या कारणांमुळे केले निलंबित
PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात बाचाबाची
| अतिक्रमण विभागातील टेबल फोडले
PMC Pune Workshop | मानसिक आरोग्य विषयक कार्यशाळेचा महापालिकेच्या ४०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ
PMC Pune Workshop | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) प्रशिक्षण प्रबोधिनी व पुणे महिला मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी (PMC Employees and officers) यांना मानसिक आरोग्य (Mental Health) विषयक जागरूकता निर्माण करणे आणि पॅरामेडिकल्सचे ज्ञान (Paramedical Knowledge) वाढविणे याबाबत प्रशिक्षण/ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर प्रशिक्षणाचा लाभ ४०० अधिकारी /कर्मचारी यांनी घेतला. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी, एनएएम, जीएनएम यांना ‘मानसिक आजाराची लक्षणे, कारणे व उपाययोजना याबद्दल प्रशिक्षण डॉ. स्मिता पानसे व डॉ. सनद पवार यांचेकडून देण्यात आले .तसेच दुपारच्या सत्रात 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य आणि वैय्यक्तिक कल्याण याबाबत चे प्रशिक्षण डॉ. अनघा लवळेकर यांनी दिले. त्या नंतर ‘ताणतणावाचे व्यवस्थापन करून कामाची परिणामकारकता व गती कशी वाढवावी’ याबाबतचे मार्गदर्शन श्री राजीव नंदकर, (उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका यांचेकडून देण्यात आले. श्री नंदकर यांनी यावेळी महानगरपालिकेचे २०० अधिकारी यांची वेलनेस स्कोअर व तणाव चाचणी स्कोअर तपासणी करून घेतली. त्या अनुषंगाने त्यांनी कामकाजात गतिमानता कशी आणावी याबाबत टिप्स त्यांनी दिल्या. (PMC Pune News)
यावेळी डॉ. सीमा उपळेकर यांनी जागतिक आरोग्य संघटनेचे ‘मानसिक आरोग्य माहिती पुस्तकेचे केलेले मराठी भाषांतर बाबत माहिती सर्वांना देऊन ती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली. या कार्यशाळेमुळे पुणे महानगरपालिका प्रशासन कार्यक्षमतेने व परिणामकारक रीतीने चालविणे व प्रशासनाच्या कामकाजात गतिमानता येण्यासाठी अधिकारी / कर्मचा-यांना उपयोग होईल. या कार्यशाळेचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या प्र.आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत, श्री राजीव नंदकर,(उप आयुक्त, प्रशिक्षण प्रबोधिनी) पुणे महानगरपालिका, पुणे महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती केतकी कुलकर्णी व डॉ. सीमा उपळेकर यांचे शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा उपळेकर यांनी केले.
News Title | PMC Pune Workshop | 400 officers and employees of the Municipal Corporation benefited from the workshop on mental health
Pune Municipal Corporation | पुणे महापालिका अधिकाऱ्यांना दिले जाणार कायद्याचे ज्ञान!
| विधी विभागाकडून तीन दिवसाची कार्यशाळा
PMC Pune Encroachment Action | शिवाजी नगर भागात हॉटेल वर कारवाईचा पुन्हा धडाका
PMC Pune Encroachment Action | पुणे पेठ शिवाजीनगर भागातील भांडारकर रोड वरील हॉटेल स्कोल तसेच कमला नेहरू पार्क समोरील भारत बाजार, कॅफे स्टोरी अल इराण व कॅफे स्ट्रीट बिन कॉफी याठिकाणी बांधकाम विकास विभाग झोन ६ या विभागाकडून कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation)
यावेळी सुमारे का 3100 चौरस फुट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या मध्ये बांबू, पत्रा , लोखंडी अँगल ई चे सहाय्याने बांधलेल्या शेड, लोखंडी अँगल आणि पत्रा यांचे सहाय्याने बांधलेली खोली ई. चा समावेश आहे. कार्यकारी अभियंता श्री. बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उप अभियंता श्री. सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण केली. यापुढेही कारवाई चालू राहणार आहे असे सुनिल कदम उप अभियंता यांनी सांगितले. (PMC Pune Building Permission Department)