PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Chief Labour Officer | अखेर नितीन केंजळे यांची महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी पदी पदोन्नतीने नियुक्ती

| महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचे आदेश जारी

PMC Chief Labour Officer | पुणे | महापालिकेच्या मुख्य कामगार अधिकारी (PMC Pune Chief Labour Officer) पदी अखेर नितिन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंजळे यांना कामगार अधिकारी पदावरून मुख्य कामगार अधिकारी पदावर पदोन्नती (Promotion) देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी जारी केले आहेत. (PMC Pune Labour Welfare Department)
तत्कालीन मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी सेवानिवृत्त झाल्यानंतर मुख्य कामगार अधिकारी हे पद रिक्त झाले होते. दरम्यान त्या अगोदर पदोन्नती समिती घेण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेनुसार नितीन केंजळे यांना कामगार अधिकारी पदावरून मुख्य कामगार अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबत बढती समितीने शिफारस देखील केली होती. मात्र याबाबतच्या प्रस्तावाला विधी समिती आणि मुख्य सभेत मान्यता मिळत नव्हती. त्यामुळे केंजळे यांच्याकडे आयुक्तांनी प्रभारी मुख्य कामगार अधिकारी पदाचा पदभार दिला होता. बऱ्याच महिन्यांच्या प्रतिक्षे नंतर हा प्रस्ताव विधी समिती आणि मुख्य सभेत मंजूर करण्यात आला. मात्र आयुक्तांकडून आदेश जारी होत नव्हते. अखेर मंगळवारी सायंकाळी पदभार दिल्याचे आदेश आयुक्तांनी जारी केले. त्यामुळे महापालिकेला नितीन केंजळे यांच्या रूपाने मुख्य कामगार अधिकारी मिळाला आहे. (Pune Municipal Corporation News)

दरम्यान केंजळे यांनी पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सेवाप्रवेश नियम तयार करणेबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम केले आहे. पुणे मनपा अधिकारी/कर्मचारी आरोग्य सलीकरण योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना, कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) प्रतिबंध व उपचार सुरक्षा कवच योजना इ. योजनांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. केंजळे हे पुणे महानगरपालिकेमध्ये  २/९/१९९३ पासून कार्यरत. पुणे महापालिकेमध्ये सेवकवर्ग विभाग (आस्थापना) विभागाचा १८ वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. कामगार अधिकारी म्हणून दिनांक ९/१२/२०११ पासून ९ वर्षे कार्यरत असा एकूण २७ वर्षांचा प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. खातेप्रमुखांच्या रजा कालावधीमध्ये खातेप्रमुख म्हणून वेळोवेळी कामकाज केले आहे. प्र. सुरक्षा अधिकारी म्हणून १२/७/२०१७ पासून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. आस्थापना विषयक सरळसेवा, पदोन्नती रोस्टर नियमावली, भरती प्रक्रिया खातेनिहाय परिक्षा मदती व निवड समिती, बदल्या, धोरणात्मक बाबी, सेवाविनियमातील दुरुस्त्या निलंबन इ. बाबत सर्व कामाची माहिती व प्रत्यक्ष कामाचा त्यांना अनुभव आहे.

कामगार कल्याण विभागाकडील कामकाजांतर्गत कामगार व औद्योगिक न्यायालयातील कोटकेसेसच्या अनुषंगाने कामकाज पाहणे तसेच सेवाप्रवेश नियम तयार केले आहेत. मनपा सेवाविनियम व सेवा वर्तणूक नियम, कामगार कायद्यांच्या अनुषंगाने कायदेशिर अभिप्राय देणे.  कंत्राटी कामगारांना विविध लाभ मिळवून देणेकामी विविध उपाययोजना करणे. पुणे महानगरपालिकेतील कर्मचान्यांना सेवा नियमांचे व किमान वेतन अधिनियमाचे प्रशिक्षण देणे, विभागीय परिक्षांसाठी प्रशिक्षण देणे, कामगार प्रशिक्षण वर्ग आयोजन करणे. अशी कामे केंजळे यांनी केली आहेत.
सन २००४ साली त्यांना पुणे मनपा सांस्कृतिक मंचातर्फे “गुणवंत कामगार” म्हणून गौरविण्यात आले आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतर्फे सन २००९ साली ‘गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा  | महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा

| महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण

 

PMC EV Charging Stations | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीतील विविध ८२ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील २१ स्टेशन चे काम पूर्ण झाले आहे. याचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले आहे.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.  आजपासून नागरिकांना याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.  (PMC Pune News)

 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध ८२ ठिकाणी कार्यालयीन इमारती, वाहनतळ क्षेत्रे, उद्याने, संग्रहालये, सभागृहे, दवाखाने व स्मशानभूमी इ) नागरिकांच्या सोयीकरिता PPP तत्वावर आधारित इलेक्ट्रिक
व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा कालावधी ८ वर्षे आहे. मे. मरीन इलेक्ट्रिकल्स कंपनीला याचे काम देण्यात आले आहे. येणारा सर्व खर्च संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे व त्यामधून येणाऱ्या net profit मधून ५०% शेअर पुणे महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. (Pune PMC News)

नागरिकांना काय करावे लागेल?

चार्जिंग स्टेशन्स नागरिकांनी वापरण्यासाठी प्ले स्टोअर मधून अथवा प्रत्येक चार्जिंग स्टेशन वरील QR कोड स्कॅन करून Bijlify हे App डाउनलोड करून व स्वतःचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करता येईल. सदर App द्वारे हे लोकेशन मॅपच्या सहाय्याने ठिकाण व पार्किंग उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत माहिती सहज कळू शकते तसेच पेमेंट सुविधा सुद्धा App द्वारे उपलब्ध करण्यात आलेली असून चार्जिंग शुल्क (charges) नागरिकांना र.रु. १३ ते १९ प्रति युनिट दर राहणार आहे.  जे इतर खाजगी चार्जिंग स्टेशन दरापेक्षा कमी राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अत्याधुनिक सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात
आले आहे.

| या ठिकाणी आहेत  चार्जिंग स्टेशन्स

१ पुणे महानगरपालिका पार्किंग
२ सावरकर भवन पार्किंग
३ गणेश कला क्रीडामंच
४ यशवंतराव चव्हाण नाटयगृह / बाळासाहेब ठाकरे कलामंदिर
५ बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
६ घोले रोड क्षेत्रिय कार्यालय
७ टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय
८ बालगंधर्व नाट्यगृह
९ स्केचर्स शोरूम जंगली महाराज रोड पार्किंग
१० मॅकडोनाल्ड्स जंगली महाराज रोड पार्किंग
११ लेमन सलन एफ सी रोड पार्किंग
१२ कुशल वाल स्ट्रीट एफ सी रोड पार्किंग
१३ आर्ट स्टेशन पुणे एफ सी रोड पार्किंग
१४ मिलेनिअम प्लाझा एफ सी रोड पार्किंग
१५ पेशवे पार्क पार्किंग
१६ मंडई आर्यन पार्किंग
१७ गुलटेकडी पार्किंग
१८ नवलोबा पार्किंग नं. ३८ शुक्रवार पेठ
१९ पद्मावती पम्पिंग स्टेशन पार्किंग
२० पंडित भीमसेन जोशी ऑडीटोरीअम
२१ संजय गांधी हॉस्पिटल पार्किंग

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके चे प्रकाशन

 

PMC Engineer Association Calendar | पुणे महानगरपालिका अभियंता संघाचे दिनदर्शिके (PMC Engineer Association Calendar) चे प्रकाशन महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांचे हस्ते करण्यात आले. (Pune Municipal Corporation)

यावेळी अतिरिक्त महा आयुक्त   रविन्द्र बिनवडे , डॉ. कुणाल खेमनार , शहर अभियंता श्री प्रशांत वाघमारे, सुनिल कदम , मुकुंद बर्वे, संजय पोळ, अजय मोरे हे उपस्थित होते.

PMC Pune | वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune | वाहन चालकांच्या आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!

PMC Pune | सार्वजनिक रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या वाहन चालकांच्या तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) नवीन नियमावली आखून दिली आहे. पुलाच्या बांधकामाच्या वेळी सिंहगड रोडवर एका व्यक्तीच्या डोक्यात रॉड पडला होता. तर बाणेर परिसरात इमारतीच्या बांधकामात शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. हे टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. (Pune Municipal corporation)

पुणे महापालिका (Pune PMC) हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्पांचे कामकाज चालू आहे. तसेच पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. सार्वजनिक रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या इमारत बांधकाम प्रकल्पामधून वस्तू / माल मटेरियल खाली पडून अपघात होण्याची शक्यता आहे. अशा अपघातामध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी / वाहन चालक हे जखमी / दगावण्याची शक्यता असते.  त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावरुन जाणाऱ्या पादचारी / वाहन चालक यांच्या सुरक्षिततेसाठी फुटपाथवरील भाग संरक्षित करणेसाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. सर्वच खात्याना याबाबत आदेश देण्यात आले आहेत. (Vikram Kumar IAS)
१) सार्वजनिक रस्त्यालगत इमारत बांधकाम सुरु असलेल्या मिळकती समोरील फुटपाथच्या भागामध्ये स्ट्रक्चरल स्टील व पत्रे यांचा वापर करुन टनेलसारखी व्यवस्था करणे.
२) सदर टनेलसाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून डिझाईन करून योग्य आकाराच्या स्ट्रक्चरल सेक्शन्स् व योग्य जाडीचा पत्र्याचा वापर करणे आवश्यक आहे.
३) सार्वजनिक रस्त्यालगतच्या इमारत बांधकाम प्रकल्पांमध्ये तळमजल्यावरील बांधकाम करताना इमारतीच्या दर्शनी सामासिक अंतर व इतर सामासिक अंतरे यामध्ये वरील मजल्यावरुन माल मटेरियल / वस्तू पडून दुर्घटना घडू नये यासाठी योग्य आकाराची भारतीय मानक ब्युरोमधील तरतूदीनुसार जाळी / स्ट्रक्चरल स्टीलमध्ये पत्रे टाकून संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात यावी.
४) बांधकाम परवानगी वेळी सार्वजनिक रस्त्यालगतच्या इमारत बांधकाम प्रकल्पांसाठी वरीलप्रमाणे अटीवर बांधकाम परवानगी अनुज्ञेय करण्यात यावी.

Yuvraj Deshmukh PMC | युवराज देशमुख यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती!

Categories
Breaking News PMC पुणे

Yuvraj Deshmukh PMC | युवराज देशमुख यांची मुख्य अभियंता पदी पदोन्नती!

Yuvraj Deshmukh PMC | पुणे | महापालिकेच्या बांधकाम विभागात (PMC Building Devlopment Department) अधिक्षक अभियंता पदी काम करणारे युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh PMC) यांना मुख्य अभियंता पदी पदोन्नती (Chief Engineer Promotion) देण्यात आली आहे. देशमुख यांच्याकडे वाहतूक नियोजन विभागाची (PMC Traffic Management Department) जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक्षक अभियंता (भवन) आणि अधिक्षक अभियंता (बांधकाम) या पदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (PMC Pune News)
पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) पथ विभागाचे मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (Chief Engineer V G Kulkarni) हे सेवानिवृत्त होत आहेत. तसेच याआधी पीएमआरडीए (PMRDA)!कडे प्रतिनियुक्ती वर गेलेले विवेक खरवडकर आणि राजेंद्र राऊत हे देखील निवृत्त झाले आहेत. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्यांना या पदावर संधी मिळणार आहे. त्यानुसार या पदासाठी बढती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली होती. समितीने शिफारस केल्यानुसार   मुख्य अभियंता पदासाठी दोन अधिकारी पात्र ठरत होते. यामध्ये अधिक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर (Anirudh Pawaskar) आणि युवराज देशमुख (Yuvraj Deshmukh) यांचा समावेश होता. सेवाज्येष्ठतेनुसार पावसकर यांना संधी देण्यात आली आहे. पावसकर यांना पथ विभागाची जबाबदारी देण्यात आली होती तर तर देशमुख हे वेटिंग लिस्ट वर होते. त्यानुसार देशमुख यांना पद रिक्त झाल्यानंतर पदोन्नती देण्यात आली आहे. देशमुख यांच्याकडे वाहतूक नियोजन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे अधिक्षक अभियंता (भवन) आणि अधिक्षक अभियंता (बांधकाम) या पदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.  (Pune Municipal Corporation News)

Savitribai Phule Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी | अजित पवार

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Savitribai Phule Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी | अजित पवार

 

Savitribai Phule Smarak |  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केले.

राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा (Pune Bhidewada Smarak) तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक (Savitribai Phule Smarak)  विस्ताराबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal_ (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikarm Kumar IAS), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Dr Rajesh Deshmukh IAS), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (Ramesh Chavan Pune ZP), महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्मारकासाठी आलेल्या आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल. स्मारक विस्तारासाठी जागा संपादन आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

भिडेवाडास्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरूप निश्चित करता येईल. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी.

भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारक प्रेरणादायी ठरावे यासाठी स्मारकाचा आराखडा तयार करताना त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रेरक कार्य आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधांचा अंतर्भाव असावा. या स्मारकासाठी शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल, असे श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याचे महत्व असल्याने याठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा असावी. शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असाव्यात. इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी.

इथे शिकणाऱ्या मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात यासाठी आवश्यक सुविधा असाव्यात. मराठी आणि इंग्रजीतील आदर्श शिक्षकांची समिती तयार करून इथे देण्यात येणाऱ्या शिक्षणावर लक्ष ठेवण्यात यावे. स्मारकात परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. या वास्तूचे ‘सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळा’ असे नामकरण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत सादारीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

Pune Bhidewada Smarak | मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार : अजित पवार यांनी केली स्मारकाच्या जागेची पाहणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Bhidewada Smarak | मुलींना शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारणार : अजित पवार यांनी केली स्मारकाच्या जागेची पाहणी

 

Pune Bhidewada Smarak | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांनी भिडेवाडा (Bhidewada) येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक भिडेवाडा येथे उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (Pune Bhidewada Smarak)

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, दीपक मानकर आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येईल. पुढच्या पिढीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य लक्षात रहावे आणि याठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतल्या बाजूस विद्यार्थीनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा असाव्यात असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठीदेखील व्यवस्था करण्याबाबत परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार

महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासंदर्भात श्री.पवार म्हणाले, अडीच एकर क्षेत्रावर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. याठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले वाडा १९९३ मध्ये उभारण्यात आला आहे. दोन्ही भाग एकत्र करून विस्तृत स्वरुपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा शासनाचा मनोदय आहे. त्यासाठी काही कुटुंबांना स्थलांतरीत करावे लागेल. यापूर्वीदेखील काही कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांचा यासाठी विरोध नाही. मात्र त्यांचे चांगले पुनर्वसन व्हावे, त्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. रहिवाशांना आवश्यक सुविधा आणि पर्यायी जागा देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. राज्य शासन आणि महानगरपालिका मिळून पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकूण पाऊणेचार एकर क्षेत्रात जागतिक दर्जाचे स्मारक उभारेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी श्री.पवार यांनी दोन्ही स्मारकाच्या जागेस भेट देऊन तेथील कामांबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या. त्यांनी स्थानिक रहिवाशांशी चर्चादेखील केली.

Vikram Kumar IAS | ९३ रजा मुदत शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार | आयुक्त विक्रम कुमार

Categories
Breaking News Education PMC Political पुणे

Vikram Kumar IAS | ९३ रजा मुदत शिक्षकांना ३१ डिसेंबर पूर्वीच नियुक्ती पत्र देणार | आयुक्त विक्रम कुमार

| चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून शिंदेशाही पगडी देऊन आयुक्तांचे विशेष अभिनंदन

 

Vikran Kumar IAS | पुणे महापालिका (PMC Pune) आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी ३१ डिसेंबर पूर्वी सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांना नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिल्याने या रजा मुदत शिक्षकांचा (PMC Teachers) दिवाळी प्रमाणे ३१ डिसेंबरचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्याबद्दल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांनीही आयुक्त विक्रम कुमार यांचे शिंदेशाही पगडी देऊन अभिनंदन केले. तसेच सर्व ९३ रजा मुदत शिक्षकांचे अभिनंदन करुन, त्यांना शुभेच्छा दिल्या. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांना सेवेत कायम करण्यासाठी मंत्री श्री. पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शिक्षण सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी शासन आदेश नुकताच जारी झाला. त्याबद्दल शिक्षण सेवकांच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन घोले रोड येथील क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी आयुक्त विक्रम कुमार डिसेंबर अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देण्याची ग्वाही दिली. (PMC Education Department)

यावेळी आयुक्त विक्रम कुमार, उपायुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, शिक्षण विभागाचे राजू नंदकर, संतोष वारुळे, चंद्रकांतदादा पाटील यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र मुठे यांच्या सह सर्व ९३ रजा मुदत शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, राज्य सरकार हे सर्व सामान्यांप्रती समर्पित सरकार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात भरीव वाढ करुन १६ हजार करण्याचा निर्णय घेतला. याचा लाभ पुणे महापालिकेच्या सर्व रजा मुदत शिक्षकांनाही मिळाला. त्यांना सेवेत कायम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सकारात्मक भूमिका घेऊन निर्णय घेत दिलासा दिला. या सर्वांनाही यापूर्वीच थकबाकी आधीच मिळाली आहे. नियुक्ती पत्र डिसेंबरपूर्वीच मिळणार असल्याने वर्षाखेरचा आनंद देखील द्विगुणित होणार आहे.

शासनाने अतिशय जलदगतीने निर्णय घेऊन आपली भूमिका चोख बजावली आहे. त्यामुळे शिक्षकदेखील आपल्या कर्तव्यात कसूर बाकी न ठेवता, सुशिक्षित आणि सदृढ समाज निर्मितीत आपली मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले की, शासनाने शिक्षकांचा न्याय देण्यासाठी जलदगतीने निर्णय घेतला. पुणे महापालिका देखील ९३ शिक्षकांप्रती अनुकूल असून, सर्वांना डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत नियुक्ती पत्र देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, सर्व शिक्षकांनी कायम झाल्यानंतर उत्तम समाजासाठी चांगला व्यक्ती घडविण्यात मोलाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Covid New Varient | कोविड च्या नवीन व्हेरियंट ची भीती बाळगण्याची गरज नाही | महापालिका आयुक्तांचे दक्षता घेण्याचे आवाहन

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Covid New Varient | कोविड च्या नवीन व्हेरियंट ची भीती बाळगण्याची गरज नाही | महापालिका आयुक्तांचे दक्षता घेण्याचे आवाहन

Covid New Varient | भारतामध्ये JN. 1 या व्हेरीयंटचा (JN 1 Covid Varient) रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने (PMC Pune) पूर्वतयारी सुरु केली आहे. दरम्यान महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी कोविड च्या नवीन व्हेरियंट ची भीती बाळगण्याची गरज नसून प्रतिबंधासाठी दक्षता घेणे आवश्यक आहे. असे आवाहन केले आहे. (Pune Municipal Corporation)

केरळ मधील कोरोना संक्रमित जे.एन. १ हा कोविड १९ विषाणूचा उपप्रकार आढळल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या पूर्व तयारीसाठी  १९ रोजी मा. रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज), पुणे महानगरपालिका यांचे अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस आरोग विभागांकडील सर्व अधिकारी यांची उपस्थिती राहून खालील विषयावर आढावा घेण्यात आला. (PMC Health Department)

भारतामध्ये JN. 1 या व्हेरीयंटचा रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. हा रुग्ण ७९ वर्षाची महिला असून
रुग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापी कोविड प्रतिबंधांसाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे. राज्यामध्ये नियमितपणे जनुकीय क्रमनिर्धारण (W.G.S.) करण्यात येत आहे. आजपर्यंत पुणे शहरात एकही JN.1 या व्हेरीयंटचा रुग्ण सापडला नाही. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे आहे.
या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर सर्व म. न. पा. दवाखाने / रुग्णालयाने दक्षता घेणे बाबत कळविले
असून, Influenza like illness ( I.L.I. ) / Severe adverse respiratory infection (SARI) रुग्णांचे
सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहे. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या I.LI व SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बरोबर सर्व म. न. पा. च्या कार्यक्षेत्रामध्ये कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत.
या अनुषंगाने पुणे शहरात कोविड पूर्व तयारी करण्यात आली व त्यामध्ये सर्व पुणे म.न.पा. व खाजगी रुग्णालयाच्या आरोग्य संस्थांचे मॉकड्रील दिनांक १७ डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण करण्यात आले.  भारत सरकारच्या सुचनेनुसार, कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणून राज्यातील व्दितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील १५ ते १७ डिसेंबर २०२३ रोजी करण्यात आले.
पुणे म. न. पा. आणि शासकीय महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला.
रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत पुणे म. न. पा. रुग्णालयांचा
आढावा घेण्यात आला. पुणे म. न. पा. सद्यस्थितीमध्ये कोविड सर्वाधिक रुग्ण संख्येच्या वेळेत लागलेल्या ऑक्सिजनच्या क्षमतेपेक्षा दुपटीने ऑक्सिजनची उपलब्धता आहे. १७ डिसेंबर २०१३ रोजी पर्यंत पुणे म.न. पा. स्तरावर संस्थांनी हे मॉकड्रील पूर्ण करून त्याची माहिती सादर केली आहे.
: मॉकड्रील केलेल्या रुग्णालयांचा तपशील

Chetna Kerure PMC | उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाचा पदभार काढला | महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

Categories
Breaking News PMC पुणे

Chetna Kerure PMC | उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाचा पदभार काढला

| महापालिका आयुक्तांचे आदेश जारी

Chetna Kerure PMC पुणे | महापालिकेच्या उपायुक्त चेतना केरुरे (Deputy Commissioner Chetna Kerure) यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाचा (PMC Central Store Department) पदभार काढून घेण्यात आला आहे. ही जबाबदारी आता आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने (Disaster Management Officer Ganesh Sonune) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. गणेश सोनुने यांच्याकडे भांडार विभागाचा अतिरिक्त पदभार असणार आहे. (PMC Pune)
उपायुक्त केरुरे यांच्याकडे भांडार, क्रीडा तसेच सोशल मीडिया कक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. दरम्यान भांडार विभागात विविध सामग्री खरेदी वरून केरुरे यांच्या विरोधात ठेकेदाराकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. महापालिकेत आवश्यक पेपर खरेदी, टोनर खरेदी शिवाय सॅनिटरी नॅपकिन खरेदी याबाबत विवाद निर्माण झाले होते. त्यांच्या या विवादास्पद कामकाजामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांच्याकडील भांडार विभागाचा पदभार काढून घेतला, अशी चर्चा महापालिका वर्तुळात आहे.