Safai Karmchari | सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती

Categories
Breaking News PMC Political social पुणे

सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू | हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबांना मिळाली नोकरीची शाश्वती सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात […]

Education Dept | PMC | शिक्षण विभागाचे समायोजन करण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी | 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांसमोर

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागाचे समायोजन करण्यात बऱ्याच तांत्रिक अडचणी | 450 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे होणार समायोजन पुणे | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केले. सरकारच्या आदेशानुसार मंडळ हा एक महापालिकेचा विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने […]

Irrigation Dept Vs PMC | पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले

Categories
Breaking News PMC social पुणे

पाणी बिलाचा वाद महापालिकेच्या अंगलट! | पाटबंधारे विभागाकडून अडवणूक करत दोन गावांचे पाणी तोडले पुणे | पाणी वापराच्या वाढीव बिलावरून पाटबंधारेविभाग आणि मनपा पाणीपुरवठा विभाग या दोन संस्था दरम्यान वाद सुरु आहे. महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत औद्योगिक दराने बिल देणार नसल्याचा दावा केला आहे. केवळ घरगुती पाणी वापराचेच (Domestic use) पाणी बिल देणार असल्याचे महापालिकेने […]

Biometric Attendance | बायोमेट्रिक हजेरीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती बंधनकारक | नोडल ऑफिसरसाठी मंगळवारी कार्यशाळा | उपस्थित राहणे अनिवार्य

Categories
Breaking News PMC पुणे

बायोमेट्रिक हजेरीसाठी नोडल ऑफिसरची नियुक्ती बंधनकारक | नोडल ऑफिसरसाठी मंगळवारी कार्यशाळा | उपस्थित राहणे अनिवार्य पुणे | “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र यात बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाची आलोचना होत आहे. त्यामुळे आता हे सुरळीत करण्यासाठी प्रत्येक विभागात नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचे आदेश देण्यात […]

Kid’s Festival | PMC Pune | पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या बालोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Categories
Breaking News Education PMC social पुणे

पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या बालोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पुणे महानगरपालिकेने, बर्नार्ड व्हॅनलीर फाऊंडेशन आणि इजीस इंडिया यांच्या सहकार्याने  २६ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ या कालावधीत पुण्यातील पहिला बालोत्सव सप्ताह आयोजित करण्यात येत आहे. मुखत्वे ०-६वयोगटातील मुले व त्यांचे सांभाळकर्ते यांच्यासाठी पहिला बालोत्सव (किड्स फेस्टिव्हल) पुण्यात सुरु होत आहे! २६ फेब्रुवारी २०२३पासूनबालोत्सव (किड्स फेस्टिव्हल) सप्ताह सुरू होत […]

Water Closure | येत्या बुधवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद | गुरुवारी कमी दाबाने पाणी

Categories
Breaking News PMC social पुणे

येत्या बुधवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद | गुरुवारी कमी दाबाने पाणी पुणे शहरामधील एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) भागात फ्लो मीटर बसविणेचे काम हाती घेण्यात येणार असल्याने बुधवार दि. ०१.०३.२०२३ रोजी पुणे शहरातील खालील भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक ०२.०३.२०२३ रोजी या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन […]

7th Pay Commission | शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हफ्ता मिळता मिळेना!

Categories
Breaking News Education PMC पुणे

शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा पहिला हफ्ता मिळता मिळेना! पुणे | शिक्षण मंडळ बरखास्त करून शिक्षण विभाग हा पुणे महापालिकेचा भाग झाला खरा, मात्र अजून तरी ते कागदावरच आहे. महापालिका कर्मचाऱ्या प्रमाणे शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांना अजून लाभ मिळणे सुरु झाले नाही. कारण महापालिका कर्मचाऱ्यांना आता येत्या काही दिवसात सातव्या वेतन आयोग फरकातील दुसरा हफ्ता मिळेल. […]

Children Health | आता मातांप्रमाणे शहरातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी होणार!

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

आता मातांप्रमाणे शहरातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी होणार! | १ लाख बालकांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पूर्ण पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ‘जागरूक पालक सुदृढ बालक’ अभियान सुरु झालेले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्यातील अंदाजे २.९२ कोटी. ० ते १८ वर्षे वयोगटातील बालक आणि किशोरवयीन मुला-मुलींची सर्वांगिण आरोग्य तपासणी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, एकात्मिक […]

PMC | News Post | पुणे महापालिका निर्माण करणार नवीन 549 पदे! | वर्ग 1 ते 4 मधील पदे

Categories
Breaking News PMC social पुणे महाराष्ट्र

पुणे महापालिका निर्माण करणार नवीन 549 पदे! | वर्ग 1 ते 4 मधील पदे | नवीन उमेदवारांना चांगली संधी | राज्य सरकारला पाठवला जाणार प्रस्ताव पुणे | पुणे महापालिका हद्दीत 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे हद्दवाढी बरोबरच कामाचा बोज देखील वाढला आहे. मात्र कर्मचाऱ्यांची कमी असल्याने बऱ्याच अडचणी येत आहेत. हा बोज कमी करण्यासाठी […]

PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात

Categories
Breaking News PMC social पुणे

पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात | वर्ग 1 ते 3 मधील विविध 11 पदांसाठी असेल भरती पुणे | पुणे महापालिकेतील दुसऱ्या टप्प्यातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात 448 पदांची भरती करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात 320 पदांची भरती करण्यात येणार आहे. वर्ग 1 ते 3 मधील विविध 11 […]