Tag: 7th pay commission
गौरी गणपती येण्या अगोदर मनपा कर्मचाऱ्यांना पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळणार का?
| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा
राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली. वाढीव महागाई भत्त्याचा लाभ रोखीने ऑगस्ट 2022 पासून मिळेल. ही वाढ ऑगस्ट 2022 पासून रोखीने देण्यात येईल. यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन 34 टक्के होणार आहे.
7 th pay commission | 9 लाखांहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाची भेट | डीएमध्ये 3 टक्के वाढ
DA (महागाई भत्ता) कधी वाढणार?
NFSA योजनेचा विस्तार केला
वेतन लवकर करण्यासाठी सुट्टीच्या दिवशीही बिल तपासणीचे काम सुरु
| मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे आदेश
काय आहेत आदेश?
पुणे महानगरपालिका सर्व अधिकारी/कर्मचारी यांना ७ व्या वेतन आयोगानुसार जुलै-२०२२ पेड इन ऑगस्ट महिन्याचे वेतन (वेतनवाढी सह ) अदा करणेबाबत मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांनी आदेश दिलेले असून, त्यानुसार नियमित वेतन बिलांची तातडीने तपासणी करणे आवश्यक आहे. जेणेकरून सर्व मनपा कर्मचाऱ्यांचे माहे जुलै २०२२ वेतन अदा करता येईल.
बिलांची तपासणी करून घेण्याची दक्षता सर्व संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी घ्यावी.
मागण्यांवर अंमल करा अन्यथा 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन .!
| पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचा मनपा प्रशासनाला इशारा
सेवानिवृत्त सेवकांच्या विविध मागण्यासाठी ०५ एप्रिल रोजी मनपा भवनासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले होते. रवींद्र बिनवडे (अतिरिक्त महापालिका आयुक्त, जनरल) यांचेशी चर्चा झाली होती. त्यावेळी माहे मे पेड जून २०२२ चे निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणेत येईल. असे आश्वाशित करण्यात आले होते. परंतु दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या एकाही सेवानिवृत्ती सेवकांचे निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाचे वतीने पुनश्चः एकदा सर्व प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावर 1 सप्टेंबर पर्यंत अंमल नाही झाला तर 6 सप्टेंबर पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा पुणे महानगरपालिका निवृत्त सेवक संघाने दिला आहे.
या आहेत प्रमुख मागण्या
1) दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांच्या शिल्लक
हक्काचे रजेच्या वेतनाचा फरक दि.०८/०८/२०२२ चे पूर्वी अदा
करण्यात यावा.
2) दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना १ जानेवारी २०२२ पासून केंद्र सरकारने घोषित केलेला महागाई भत्ता फरकासह माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबरमध्ये मिळावा.
३) दि.०१/०१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन व निवृत्तीवेतन निश्चित करून माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर २०२२ ला सुधारीत निवृत्तीवेतन मिळावे.
4) सातव्या वेतन आयोगास महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मान्यतेमध्ये दि.०१ जानेवारी २०२१ ते प्रत्यक्ष वेतनात सातव्या वेतन आयोगाचे अमलबजावणीचे दिनांकापर्यंतचा वेतन फरक रोखीने द्यावा. असे नमूद केलेले आहे. त्यानुसार मनपा सेवेतील सेवकांना दहा महिन्याचा फरक ही अदा करण्यात आला आहे. दि.०१/१/२०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे निवृत्तीवेतन सातव्या वेतन आयोगानुसार अद्यापही अदा केलेले नाही. त्यामुळे जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ या कालावधीतील निवृतीवेतन फरकापोटी रक्कम रु.१,००,०००/- अॅडव्हान्स पोटी दि.१५/०८/२२ पूर्वी देण्यात यावी.
५) सेवानिवृत्त झालेल्या सेवकांचे निवृत्तीवेतन फरक महाराष्ट्र शासनाने मान्यतेनुसार दोन हप्त्यात देण्यात यावे. दि ०१/०१/२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना त्यापैकी एक हप्ता माहे ऑगस्ट २०२२ मध्ये अदा करण्यात यावा.
6) दि.०१/०१/२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या सेवकांना जानेवारी २०२१ ते ऑक्टोंबर २०२१ च्या दहा महिन्याचा निवृत्तीवेतनाचा फरक मे पेड इन जून २०२२ ला अदा करणेत येणार होता. तो अद्यापही अदा करण्यात आलेला नाही. या दहा महिन्याचा निवृत्ती वेतनाचा फरक दि. १० ऑगस्ट २०२२ पूर्वी अदा करणेत यावा.
—
केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली
| त्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार, हे आता निश्चित
| जूनचे AICPI-IW निर्देशांक जाहीर झाले आहेत.
महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढणार
निर्देशांक संख्या 129.2 वर पोहोचली
38% DA कधी जाहीर होईल?
पगार किती वाढणार?
7 व्या वेतन आयोगातील पहिल्या हफ्त्याची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा
| लेखा व वित्त विभागाने जारी केले परिपत्रक(circular)
| 5 ऑगस्ट पर्यंत बिले तपासून घेण्याचे आदेश
| परिपत्रकातील महत्वाचे मुद्दे
२०२२ ची वार्षिक वेतन वाढ आकारणी करून माहे जुलै २०२२ पासून वेतन अदा करण्यात यावे.
वेतन, महागाई भत्ता व घर भाडे या बाबींचा विचार करण्यात यावा. फरक क्र. १ चे रक्कमेमधून ७ व्या वेतन आयोगापोटी अदा करण्यात आलेला र.रु. २५०००/- चा हप्ता अधिक ७ व्या वेतन आयोगाच्या नियमावली मध्ये वेतनाची थकबाकी प्रदान करण्याची पद्धती यामध्ये नमूद वजावटी या समायोजित
करून उर्वरित रक्कमेचे ५ समान हप्ते करून दर वर्षी जून महिन्याच्या मासिक वेतन देयकाबरोबर दिनांक ०१ जुलै रोजी रोखीने अदा करणेत यावा. तथापि सदर कार्यवाही करत असताना प्रथम हत्याचे रक्कमेमधून फरक क्र. २ नुसार रक्कम देय / वसूल करावयाची असल्यास सदरची रक्कम अधिक किंवा वजा करणेत यावी व तदनंतरच प्रथम हप्त्याची रक्कम अदा करणेत यावी.
आयोगानुसार वेतन माहे एप्रिल २०२२ पासून अदा केले असल्याने, माहे जानेवारी २०२२ ते माहे मार्च २०२२ या कालावधीतील ३ महिन्याचे वेतन आयोगाचा फरक अदा करणेत यावा. विवरण पत्रातील वेतन निश्चितीनुसार माहे एप्रिल २०२२ ते जून २०२२ या कालावधीत ७ व्या वेतन आयोगानुसार
वेतनाचा फरक अदा अथवा वसूल करावयाचा असल्यास सदर रक्कम प्रथम हत्याचे रक्कमेमधून अदा अथवा वसूल करण्यात यावी.
महागाई भत्ता व घर भाडे या बाबींचा विचार करण्यात यावा. सदर रक्कमेमधून ७ व्या वेतन आयोगापोटी अदा करण्यात आलेला र.रु. २५०००/- चा हप्ता अधिक ७ व्या वेतन आयोगाच्या नियमावली मध्ये
वेतनाची थकबाकी प्रदान करण्याची पद्धती यामध्ये नमूद वजावटी या समायोजित करून उर्वरित रक्कमेचे ५ समान हप्ते करून दर वर्षी जून महिन्याच्या मासिक वेतन देयकाबरोबर दिनांक ०१ जुलै रोजी रोखीने
अदा करणेत यावा.
6. ७ व्या वेतन आयोगानुसार पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना हप्त्याची रक्कम रोख स्वरुपात अदा करण्यासाठी संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राप्त करून द्यावी.
8. ७ व्या वेतन आयोगानुसार पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील बिल लेखनिकां पहिल्या हप्त्याची बिले दि. ०५/०८/२०२२ अखेर ऑडीट विभागातून तपासून घ्यावी. तसेच आयकर कपात करण्याबाबत सुविधा संगणक प्रणाली (व्हर्जन) माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राप्त करू द्यावी.
प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडी कर्मचाऱ्यांना अदा केलेल्या पहिल्या हप्त्याची व पुढील मिळणाऱ्या हप्त्यांची तसेच विवरण पत्रातील वेतन संबंधीची नोंद सेवा पुस्तकामध्ये संबंधीत पगार बिल लेखनिकांनी ठेवणे आवश्यक आहे.
| इथे पहा परिपत्रक
पहिल्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबतची संगणक प्रणाली अद्ययावत
| रक्कम लवकरात लवकर मिळेल अशी कर्मचाऱ्यांना अपेक्षा
७ व्या वेतन आयोगापोटी पहिल्या हफ्त्याची रक्कम लवकरच मिळणार!
| लेखा व वित्त विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे मागितली माहिती
पुणे | पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पहिल्या हत्याची रक्कम लवकरच मिळणार आहे. याबाबत लेखा व वित्त विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे कर्मचारी संख्या आणि लागणारी रक्कम याची माहिती मागितली आहे. मात्र दुसरीकडे असा देखील सवाल केला जात आहे कि ही माहिती जर लेखा विभागाकडे उपलब्ध असताना आयटी विभागाकडून माहिती घेऊन वेळ का दवडला जात आहे.
महापालिका कर्मचाऱ्याना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यानुसार वेतन देखील होत आहे. मात्र हा आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू झाला आहे. त्यामुळे तो फरक कर्मचाऱ्यांना समान ५ हफ्यात दिला जाणार आहे. २०२१ सालातील १० महिन्याचा फरक या आधी देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व माध्यमिक, उच्च माध्यमिक तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगापोटी पाच
समान हम्याची रक्कम दर वर्षी जून महिन्याच्या मासिक वेतन देयकाबरोबर माहे जुलै मध्ये रोखीने अदा करणेबाबत अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचेमार्फत मा. महापालिका आयुक्त यांचेकडे निवेदन सादर केले असता अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “एकूण कर्मचारी संख्या व आवश्यक निधी बाबत विचारणा केलेली आहे. ही विचारणा लेखा व वित्त विभागाने केली होती. त्यानुसार आता लेखा व वित्त विभागाने यासाठी आयटी विभागाला कामाला लावले आहे. लेखा विभागाने कर्मचारी संख्या व सेवानिवृत्त सेवक अशी एकूण संख्या तसेच पहिल्या हफ्त्यासाठी देय रक्कमेचा तपशिल पाठवण्याबाबत पत्र आयटी विभागाला दिले आहे.
असे असताना दुसरीकडे असा देखील सवाल केला जात आहे कि ही माहिती जर लेखा विभागाकडे उपलब्ध असताना आयटी विभागाकडून माहिती घेऊन वेळ का दवडला जात आहे.