Cast Your Vote Without Voter ID | तुम्ही मतदान ओळखपत्र नसतानाही तुमचे मत देऊ शकता | मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल?

Categories
Breaking News social देश/विदेश लाइफस्टाइल

Cast Your Vote Without Voter ID | तुम्ही मतदान ओळखपत्र नसतानाही तुमचे मत देऊ शकता | मतदार यादीत तुमचे नाव कसे तपासाल?

Cast Your Vote Without Voter ID – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर (Loksabha Election Schedule) झाल्या आहेत.  जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र (Voter ID) नसेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.  याशिवाय, व्होटर आयडी व्यतिरिक्त, तुम्ही इतर अनेक कागदपत्रांचा वापर करून तुमचे मत देऊ शकता.
  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.  भारतात मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हे आवश्यक कागदपत्र आहे.  18 वर्षांचे झाल्यानंतर, हे भारत सरकारद्वारे जारी केले जाते.  मतदानासाठी हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे.  हे ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरले जाते.  जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता.  याशिवाय, व्होटर आयडी व्यतिरिक्त, तुम्ही इतर अनेक कागदपत्रांचा वापर करून तुमचे मत देऊ शकता.

 या कागदपत्रांचा वापर करून तुम्ही तुमचे मत देऊ शकता

 तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसले तरीही, तुम्ही भारत सरकारने जारी केलेल्या अनेक सरकारी कागदपत्रांचा वापर करून तुमचे मत देऊ शकता.
 आधार कार्ड
 शिधापत्रिका
 मनरेगा जॉब कार्ड
 बँक पासबुक
 विमा स्मार्ट कार्ड
 चालक परवाना
 पॅन कार्ड
 पासपोर्ट
 पेन्शन दस्तऐवज
 राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (NPR) द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड

–  घरबसल्या मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा करावा

 जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करून घरबसल्या अर्ज करू शकता.
 याप्रमाणे अर्ज करा
 सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर जा.
 मुख्यपृष्ठावर तुम्हाला सामान्य मतदारांसाठी नवीन नोंदणी दिसेल, त्यावर क्लिक करा.
 यानंतर तुम्हाला साइन अप करावे लागेल.
 यानंतर, तेथे विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करा.
 आता तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड, कॅप्चा आणि ओटीपी टाकून नोंदणी करावी लागेल.
 यानंतर फॉर्म 6 सबमिट करा.

– तुमचा मतदार ओळखपत्र हरवल्यास काय करावे

 तुमचे मतदार ओळखपत्र कुठेतरी हरवले असेल तर तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकता.

– असे मतदार ओळखपत्र डाउनलोड करा

 सर्व प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.nvsp.in/ वर जा.
 तेथे तुम्हाला ‘लॉगिन’ पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा प्रविष्ट करा.
 यानंतर तुमच्या फोनवर एक OTP येईल, तेथे ‘Verify & Login’ वर क्लिक करा.
 यानंतर ‘E-EPIC Download’ टॅबवर क्लिक करा.
 येथे तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक टाकावा लागेल आणि तुमचे राज्य निवडावे लागेल.
 तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर ओळखपत्र दिसेल.
 तेथे होम पेजवर ‘डाऊनलोड ई-ईपीआयसी’चा पर्याय दिसेल.
 ते डाउनलोड करा.

– अशा प्रकारे तुम्ही तुमच्या यादीतील नाव तपासू शकता

 तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासायचे असल्यास, तुम्ही निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ या वेबसाइटवर किंवा मतदार हेल्पलाइन 1950 वर कॉल करू शकता.  याशिवाय तुम्ही हेल्पलाइन नंबर 1950 वर कॉल करू शकता.  याशिवाय मतदार ओळखपत्र यादीत तुमचे नाव जोडण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी तुम्ही https://eci.gov.in/ वर जाऊन बदल करू शकता.

Loksabha Election Model code of Conduct |  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा |जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

Categories
Breaking News social पुणे

Loksabha Election Model code of Conduct |  निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा |जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे

 

Loksabha Election Model code of Conduct  – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा (Loksabha General Election) कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे (Dr Suhas Diwase IAS) यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.

शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. ‘सी-व्हिजील’ ॲपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलकावर राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी व त्याबाबतचा करार झालेला असावा, त्याची खर्चात नोंद होणे आवश्यक आहे. निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. पक्षांनी परवानगी घेतलेल्या खाजगी वाहनाशिवाय इतर वाहनांवर जाहिरात करता येणार नाही. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सांगितले.

निवडणूक यंत्रणेने गेल्या तीन महिन्यात मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी चांगले परिश्रम घेतले आहेत. यापुढेही चांगली कामगिरी करून निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

PMC Election Department |  Orders to remove advertisements, banners of parties immediately after issuance of Model Code of Conduct

Categories
Uncategorized

PMC Election Department |  Orders to remove advertisements, banners of parties immediately after issuance of Model Code of Conduct

 |  Instructions to all Departments by Deputy Commissioner Chetna Kerure

 PMC Election Department – (The Karbhari News Service) – According to the Loksabha Election 2024, there is a possibility that the Ideal Code of Conduct will be implemented in the state soon.  Accordingly, Municipal Elections Department Deputy Commissioner Chetna Kerure PMC has ordered all departments and zonal offices to immediately remove political flexes, banners, advertisements of parties from public places after the implementation of the code of conduct.  (Pune Municipal Corporation (PMC)
 The Election Commission of India has consolidated the instructions issued from time to time regarding the publication of advertisements during the period of implementation of the Code of Conduct for the conduct of elections in a free and fair environment.  The instructions in the letter have been brought to the notice of all the concerned agencies and instructed to strictly follow the instructions.
 Also after coming into force of the Model Code of Conduct, writings, posters/papers or cutouts/hoardings/banners/flags on the walls of government property under the Prevention of Defacement of Property Act, 1995 as well as party advertisements on government buses, public places like railway stations bus stands, airports, railway bridges, roads  , electric / telephone poles, local body buildings etc. should be removed after the declaration of elections.  Collector and District Election Officer Pune have informed this.  Accordingly, to comply with the model code of conduct, appropriate action should be taken from your level.  It is said in the order.
 —–

PMC Election Department | आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर तात्काळ पक्षांच्या जाहिराती, बॅनर काढून टाकण्याचे आदेश 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Election Department | आदर्श आचारसंहिता जारी झाल्यावर तात्काळ पक्षांच्या जाहिराती, बॅनर काढून टाकण्याचे आदेश

| उपायुक्त चेतना केरुरे यांच्या सर्व विभागांना सूचना

PMC Election Department  – (The Karbhari News Service) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) अनुषंगाने राज्यात लवकरच आदर्श आचार संहिता (Ideal Code of Conduct) लागू होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यावर तात्काळ सार्वजनिक ठिकाणचे राजकीय फ्लेक्स, बॅनर, पक्षांच्या जाहिराती काढून टाकण्याचे आदेश महापालिका निवडणूक विभागाच्या उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी सर्व विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

भारत निवडणूक आयोगाने निवडणुका मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी आचार संहिता लागू होण्याच्या कालावधीत जाहिरातींच्या प्रकाशना संदर्भात वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना अधिक्रमित करून एकत्रित सूचना निदर्शनास आणल्या आहेत. पत्रातील सूचना सर्व सबंधित यंत्रणांच्या निदर्शनास आणून त्यांना सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्याबाबत कळविणेत आलेले आहे.

तसेच आदर्श आचार संहिता लागू झालेनंतर मालमत्तेच्या विरुपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५ अंतर्गत आपले कार्यक्षेत्रातील शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर / पेपर्स किंवा कटआऊट / होर्डिंग्ज / बंनर्स / झेंडे तसेच शासकीय बसेस वरील पक्षाच्या जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी जसे रेल्वे स्टेशन बसस्टॅंड, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, इलेक्ट्रीक / टेलिफोन खांब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती इत्यादी निवडणुका जाहीर झाल्या नंतर काढून टाकणेबाबतची कार्यवाही करण्यात यावी. असे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी कळविले आहे. त्यानुसार आदर्श आचार संहितेचे पालन होणेकामी आपले स्तरावरावरून योग्य ती कार्यवाही करावी. असे आदेशात म्हटले आहे.
—–

Loksabha Election 2024 Code of Conduct | महापालिका निवडणूक विभागाने सर्व विभागाकडून मागवली चालू विकास कामांची माहिती! 

Categories
Breaking News PMC पुणे

Loksabha Election 2024 Code of Conduct | महापालिका निवडणूक विभागाने सर्व विभागाकडून मागवली चालू विकास कामांची माहिती!

| लोकसभा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्याचे उपायुक्त चेतना केरुरे यांचे आदेश

पुणे – Loksabha Election 2024 Code of Conduct – (The Karbhari News Service) – लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता (Loksabha Election 2024 Code of Conduct) येत्या काही दिवसांत लागू शकते. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका निवडणूक विभागाच्या (PMC Election Department) उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure PMC) यांनी  महापालिकेच्या सर्व विभागांना चालू विकास कामांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (Pune PMC News)
लोकसभा निवडणुकीची देशभरात लगबग सुरु आहे. त्या निमित्ताने विकास कामे उरकून घेण्याबाबत लगीनघाई सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील जोरदार तयारी सुरु केली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेच्या निवडणूक विभागाला पत्र पाठवत महापालिकेच्या चालू विकास कामांची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. त्याला अनुसरून महापालिका निवडणूक विभागाच्या  महापालिकेच्या सर्व विभागांना आदेशित केले आहे कि चालू विकास कामाची माहिती जिल्हा निवडणूक विभागाला तात्काळ सादर करावी. त्यानुसार विभागाकडून यावर कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

Loksabha Election | Shivsena Pune | शिवसेनेचे मिशन 48 ..!  लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

Loksabha Election | Shivsena Pune | शिवसेनेचे मिशन 48 ..!  लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु

| शिवसंकल्प अभियानाच्या झंझावाती दौऱ्याला होणार सुरूवात !

 

 LokSabha Election | Shivsena Pune | राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti)  केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन ४८ ची सुरूवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान (Shivsena Shivsankalp Abhiyan) हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केले. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. या शिवसंकल्प अभियान दौऱ्याची सुरुवात शिरूर व मावळ लोकसभेपासून करण्यात येणार असून, येत्या ०६ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली हा दौरा संपन्न होणार आहे. (Pune Shivsena News – Lok Sabha Election )

याच पार्श्वभूमीवर आज पुण्यातील शिवसेना (Pune Shivsena) मध्यवर्ती कार्यालयात शहरातील पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यातील शिवसेनेचे प्रमुखपदाधिकारी, युवासेना, महिला आघाडी व अंगिकृत संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. (Pune Shivsena News – Lok Sabha Election )

यावेळी, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) म्हणाले की, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसैनिकांना मोठी ताकद मिळाली असून, भविष्यात या ताकदीचा वापर करून, एकनाथ शिंदे साहेबांचे व शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहचवा असे सांगितले. याचसोबत येत्या ६ जानेवारीला शिरूर व मावळ लोकसभेमध्ये होणाऱ्या शिवसंकल्प अभियानाला प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

तसेच, शिवसेना पुणे जिल्ह्याचे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले यांनी पक्षातील शिवदूत, बुथप्रमुख इथपासून ते शहरप्रमुखांपर्यंत नव्या जोमाने कामाला लागून, पक्षाला नव्याने उभारी देण्यासाठी आणि नव्या उमेदीने पक्ष बांधणी करून, पक्ष वाढीस हातभार लावूयात असे सांगितले आहे.

दरम्यान, शिवसंकल्प अभियानाचे प्रचार मेळावे दोन टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा  ६ जानेवारी रोजी शिरूर येथुन सुरू होणार असून ११ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर
येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात २५ जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याना पुन्हा सुरूवात होणार असून २५ जानेवारी रोजी शिर्डी येथे दुसरा प्रचार मेळावा पार पडेल, तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप ३० जानेवारी रोजी हातकणंगले येथे होईल.

या प्रचार मेळाव्यांच्या समारोपासह पक्षाच्या वतीने कोल्हापूर येथे दोन दिवसीय विशेष महाशिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होणार आहे.

या शिवसंकल्प अभियान पूर्व नियोजित आढावा बैठकीत, राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा पूर्ण ताकदीनिशी लढवण्याचा निर्धार शिवसैनिक, तथा सर्व पदाधिकऱ्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, या बैठकीला शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, पुणे लोकसभा निरीक्षक किशोर भोसले, जिल्हाप्रमुख रमेश बाप्पू कोंडे, उल्हासभाऊ तुपे, युवासेना सचिव किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, निलेश गिरमे, युवासेना सहसंपर्क प्रमुख अविनाश खेडेकर,  महिला आघाडी शहर प्रमुख पुजाताई रावेतकर, माथाडी कामगार सेना जिल्हाप्रमुख निलेश माझीरे, शहर संघटक श्रीकांत पुजारी, शहर समन्वयक शंकर संगम, नवनाथ निवंगुणे, राजाभाऊ भिलारे,  धनंजय जाधव, प्रमोद प्रभुणे, शिवसेना पुणे प्रवक्ते अभिजित बोराटे, लक्ष्मण आरडे, उपशहर प्रमुख सुधीर कुरुमकर, सुनील जाधव, गौरव साईनकर, संजय डोंगरे, सचिन थोरात, महिला उपशहर प्रमुख श्रद्धा शिंदे, श्रुती नाझिरकर, चैत्राली गुरव, ओबीसी शहर अध्यक्ष मकरंद केदारी  व शिवसेना, युवासेना सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, अंगिकृत संघटना व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Loksabha Election 2024 | लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Categories
Breaking News Political social देश/विदेश महाराष्ट्र

Loksabha Election 2024 | लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा

Loksabha Election 2024 | राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील (Maharashtra Vidhansabha) मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर करण्याबाबतचा कार्यक्रम सुरु आहे. लोकसभा निवडणुका-2024 (Loksabha Election 2024) मध्ये होणार असून त्या दृष्टीने राज्यातील मतदार याद्या अद्ययावत असण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्वाचा आहे. तसेच लोकसभा निवडणुकांची पूर्व तयारी सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी (District Élection Officer) यांच्याकडून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त हिर्देशकुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथकाने राज्याचा दौरा केला. या पथकामध्ये एन. एन. बुटोलिया, वरिष्ठ प्रधान सचिव सौम्यजित घोष, सचिव, सुमनकुमार दास, सचिव, भारत निवडणूक आयोग (Election Commission of India) यांचा समावेश होता.
            या पथकाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समवेत सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीमध्ये सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी वरील मुद्यांच्या अनुषंगाने आपापल्या जिल्ह्यांचे विस्तृत सादरीकरण आयोगासमोर केले.  यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर तसेच मुख्य निवडणूक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            या बैठकीमध्ये भारत निवडणूक आयोगाने तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अचूक व अद्ययावत करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 18-19 वर्षे वयोगटातील मतदार नोंदणींची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रयत्न करावेत. ज्यामध्ये शाळा, महाविद्यालय, विविध आस्थापनांमध्ये विशेष मोहीम राबविणे, मतदार साक्षरता मंडळ, स्वयंसेवी संस्था तसेच महाविद्यालयातील स्वयंसेवकांच्या मदतीने या वयोगटातील अधिकाधिक तरुणांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयनिहाय मतदार नोंदणीचा आढावा नियमित घेणे, इ. उपयायोजना सुचविल्या.
            राज्यातील महिला तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबवीत ग्रामसभांमध्ये मतदार याद्यांचे वाचन करुन टक्केवारी वाढविण्याचे निर्देश दिले. मतदार यादींमधील दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याबाबत करावयाच्या कार्यवाहीचे मार्गदर्शन आयोगाने केले. मतदान केंद्रांमध्ये सर्व किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश यावेळी देण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुका-2019 मधील मतदानाची राष्ट्रीय सरासरी तसेच राज्य सरासरीपेक्षा कमी सरासरी असलेल्या विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष देऊन तेथील मतदानाची आकडेवारी वाढविण्याच्या दृष्टीनेही आयोगाने उपाययोजना सुचविल्या. तसेच, मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना राष्ट्रीय मतदानाच्या दिवशी सन्मानित करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगितले.
****

Loksabha | Vidhansabha Election | लोकसभा, विधानसभा निवडणूक हालचालींना वेग | निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आले हे आदेश

Categories
Breaking News PMC social पुणे

Loksabha | Vidhansabha Election | लोकसभा, विधानसभा निवडणूक हालचालींना वेग | निवडणूक आयोगाचे पुणे महापालिकेला आले हे आदेश

Loksabha | Vidhansabha Election |  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ( Loksabha, Vidhansabha Election) हालचालींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने (State Election Commission) याबाबतची जोरदार तयारी सुरु केली आहे. याबाबत पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) देखील राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आले आहेत.

आगामी लोकसभा / विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारयादी दुरुस्ती व अद्ययावत करण्याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदारयादीमधील त्रुटी दूर करण्याबाबत उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयुक्त, यांनी याबाबत  व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महानगरपालिकांनी यादी दुरुस्ती करणेची कार्यवाही गांभीर्याने करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचे वेळेस मतदारयादी विभाजनाचे कामकाज सुलभ व विनातक्रार व्हावे यासाठी मतदारयादी बाबतच्या पुणे मनपाशी संबंधित दुरुस्त्या २९ सप्टेंबर पर्यंत सुचविणे गरजेचे आहे.  त्यानुसार विधानसभा मतदारसंघाची मतदारयादी दुरुस्ती बाबत  कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (PMC Pune)

त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांनी सर्व क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळ यांना खालील आदेश दिले आहेत.
१) पुणे मनपा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यापूर्वी करण्यात आलेल्या मतदारयादी विभाजनाच्या कार्यवाहीमध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींचा गोषवारा करून संबंधित मतदारयादी नोंदणी अधिकारी यांना कळविण्यात यावे.
२)  प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाने Section Address मध्ये सुचविलेले बदल झाले असल्याची खातरजमा करण्यात यावी. बदल झालेले नसल्यास संबंधित मतदारयादी नोंदणी अधिकारी यांना त्वरित कळविण्यात यावे.
३) Section Address मध्ये बदल सुचवताना मुख्य रस्ते, नैसर्गिक नद्या, नाले इत्यादी विचारात घेऊन नवीन Section Address सुचविण्यात यावे.
४) क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रामध्ये काम करत असलेल्या BLO सोबत आरोग्य निरीक्षक/विभागीय आरोग्य निरीक्षक / पेठ निरीक्षक (कर आकारणी) यांना जोडून योग्य तो समन्वय राखून Section Address टाकणे/अद्यावत करणेची कार्यवाही विहित मुदतीत करावी.
५) Section Address बाबत सुचविण्यात आलेल्या दुरुस्त्यांच्या गोषवारा करून त्याची प्रत निवडणूक कार्यालयाकडे जमा करावी.
६) संबंधित सह आयुक्त / उप आयुक्त (परिमंडळ कार्यालय) यांनी या कामावर दैनंदिनरित्या नजर ठेवावी.
——
News Title | Loksabha | Vidhansabha Election | Lok Sabha, Vidhan Sabha Election Movement Speed ​​Up | The order of Election Commission came to Pune Municipal Corporation

Shirur constituency | शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित! | लोकसभा निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ यांचा विश्वास

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

शिरुर मतदार संघात २०२४ मध्ये भाजपाचा विजय निश्चित!

| लोकसभा निवडणूक प्रभारी माधुरी मिसाळ यांचा विश्वास

| केंद्रीय मंत्री रेणुका सिंग यांचा बुधवारपासून तीन दिवस दौरा

पिंपरी   | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची वाटचाल सुरू असून, २०२४ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघात निश्चितपणे भाजपाचा उमेदवार निवडणून येणार, असा विश्वास शिरुर लोकसभा निवडणूक प्रभारी व आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय मंत्री रेणुका सिंग शिरुर लोकसभा मतदार संघात तीन दिवस दौरा करणार आहेत. दि.१४, १५ आणि १६ सप्टेंबर २०२२ असे तीन दिवस संघटनात्मक व सार्वजनिक कार्यक्रम होणार आहेत. त्या प्रवास योजनेची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार मिसाळ बोलत होत्या.
यावेळी संयोजक श्री. ॲड. धर्मेंद्रजी खांडरे, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, पिं. चिं.शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, खेड तालुका अध्यक्ष अतुल देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार मिसाळ म्हणाल्या की, शिरुर, बारामती, शिर्डी अशा तीन मतदार संघाचे क्लस्टर केले असून, त्याची जबाबदारी रवि अनासपुरे व सुनील कर्जतकर यांच्याकडे आहे. हडपसर, आंबेगाव, मंचर, जुन्नर , शिरुर आणि भोसरी विधानसभा मतदार संघनिहाय केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे.
भाजपाकडून केंद्रीय पातळीवर देशातील १४४ लोकसभा मतदार संघांची यादी केली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातील १६ मतदार संघांचा समावेश आहे. या सर्व मतदार संघांमध्ये भाजपा विजयश्री खेचून आणण्याच्या दृष्टीने पुढील अडीच वर्षांचे नियोजन केले आहे. मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये प्रवास योजनेची कमिटी नियुक्ती केली आहे. प्रभारी, संयोजक, सोशल मीडिया, कल्याणकारी योजना आदी विविध स्तरांवर समितीच्या नियुक्ती केल्या आहेत.
**

प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा…

संघटनात्मक बांधणीमुळेच भाजपाने यशस्वी वाटचाल ठेवली आहे. आगामी दीड वर्षांत शिरुर लोकसभा मतदार संघातील प्रलंबित प्रश्न केंद्रापर्यंत पोहोचवून मार्गी लावण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. नदी सुधार प्रकल्प, पुणे-नाशिक महामार्ग, रेड झोन, तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग आदी विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही आमदार मिसाळ यांनी म्हटले आहे.

**
… असा असेल दौरा
केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणुका सिंग यांच्या तीन दिवसीय दौऱ्यात संघटनात्मक आणि सार्वजनिक असे एकूण २१ कार्यक्रम होणार आहेत. पदाधिकाऱ्यांशी संवाद, लाभार्थींची चर्चा, भाजपा परिवारातील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद, हुतात्मे- महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील लोकांशी संवाद, तीर्थक्षेत्र भीमाशंकर भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक, महामार्ग समस्या पाहणी आदी कार्यक्रम नियोजित केले आहेत.