Tag: MLA sunil Tingre
विश्रांतवाडी ते विमानतळ रस्ता होणार सिमेंट काँक्रीटचा!
| वडगाव शेरीतील रस्त्याच्या कामांसाठी 42 कोटींचा निधी
| आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती
*वडगाव शेरीतील रस्ते आणि मंजूर निधी*
अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश
| मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी
पुणे | वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोरवाल रस्त्याला आखण्यात आलेल्या समातंर 24 मीटर रुंदीच्या नविन पर्यायी रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या रस्त्यासाठी मार्थोपोलिस शाळेने जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.
धानोरी-लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागाला जाणारा पोरवाल रस्ता हा एकमेव रस्ता असल्याने वाहतुक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी पोरवाल रस्त्याला समांतर असा कलम 205 अंतर्गत पर्यायी सुधारित रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी मार्च महिन्यात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धानोरी स. न. 12, 14, 15 व 17 मधून 24 मीटर रुंदीचा रस्ता कलम 205 अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा व मुख्यसभेत तातडीने मंजुर करण्यात आला होता. मात्र, पर्यायी रस्त्यांवर असलेल्या मार्थोपोलिस या शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. दरम्यान गत महिन्यात आमदार टिंगरे यांनी या शाळेचे पदाधिकारी व आयुक्त यांची एकत्रित बैठक घेऊन जागा हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळेला पत्र पाठविले होते. त्यावर शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे आता या नविन रस्त्यांच्या कामाला तात्काळ सुरवात होऊन पोरवाल रस्त्यांच्या वाहतुक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
—————————
या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मी विधानसभा निवडणूकीत दिले होते. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर अनेक अडथळ्यांची शर्यंत पार केल्यानंतर रस्त्यांचा मार्ग सुकर होत असून माझीही आश्वासनपुर्ती होत आहे.
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
समाविष्ट 23 गावे महापालिकेतून वगळण्यास तीव्र विरोध | आमदार सुनील टिंगरे
माझ्या मतदार संघातील लोहगाव हे त्यामधील एक उदाहरण आहे. त्यात आता पुन्हा समाविष्ट केलेली गावे वगळण्याची आपण चूक केली तर या गावांची अवस्था धनकवडी, आंबेगाव अशा भागांसारखी होईल. येथील नागरिकांवर हा मोठा अन्याय होईल. गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बांधील आहे. त्यासाठी महापालिकेने अनुदान घ्यावी अशी मागणीही नुकतीच आम्ही महापालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे गावे वगळण्यास माझा आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहेच. आणि तो कायम राहील. वेळप्रसंगी आम्ही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनही करु
– सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
लोहगाव उपजिल्हा रुग्णालय लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार
| आमदार सुनिल टिंगरे यांनी रूग्णालयाच्या कामाची केली पाहणी
मागील दोन वर्षांच्या काळात रूग्णालयाच्या कामामध्ये गती आली. आमदार सुनिल टिंगरे यांनी मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा करून जास्तीत जास्ती निधी मिळविला. डिसेंबर अखेर रूग्णालयाचे काम पूर्ण होणार आहे. नागरिकांच्या सेवेमध्ये मार्च २०२३ मध्ये रूग्णालय रूजू होगणार आहे. रूग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सोयी सुविधा व उर्वरीत कामे गतीने पूर्ण केली जात आहेत. आमदार सुनिल टिंगरे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे रूग्णालयाच्या सुधारित कामांसाठी आणखी २४ कोटी रुपए निधी मंत्रालयातून मिळाला आहे. या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देखील मिळाली आहे. रूग्णालयाच्या कामाची पाहणी करताना आमदार सुनिल टिंगरे यांच्या सोबत जिला शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, कार्यकारी अभियंता अजय भोसले, उप अभियंता जान्हवी रोडे, तसेच विद्युत विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
आमदारांचा आक्रमक पवित्रा आणि मनपा प्रशासन ऍक्शन मोड मध्ये!
| वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला
गेल्या काही महिन्यांपासून धानोरी, लोहगांव पोरवाल रोड व फाइव-नाइन परिसरात सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीने परिसरातील नागरीक त्रस्त आहेत. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मनपा व पोलीस अधिकार्यांनी अनेक वेळा परिसराचे निरीक्षण केले आहे. परंतु प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल केला गेला नाही. यामुळे वडगावेशरीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची तत्काल सुटका करण्याचा तसेच समस्या सोडविण्यासाठी आता प्रत्यक्ष उपाययोजनांवर अंमल करण्याचा निर्देश सुनील टिंगरे यांनी प्रशासनास दिला. संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली.
धानोरी सीटी हॉस्पिटल ते फाइव-नाइन रस्त्याचे प्रलंबित काम, धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करणे तसेच लोहगाव पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याच्या अपूर्ण कामाची पाहणी मंगलवारी करण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे यांच्यासोबत मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मनपा रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी तसेच मनपाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी परिसातील प्रलंबित रस्ते प्रश्नांची माहिती मनपा अधिकार्यांना देताना आमदार सुनील टिंगरे यांनी आक्रमण भूमिका घेतली. प्रत्यक्ष काम करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा. जे कामे अपूर्ण असतील त्यांना पूर्ण करण्यासाठी अडचणी दूर करा. परिसरातील नागरिक वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. रस्ते आणि वाहतूक कोंडी सोडविण्यास प्राथमिकता देण्यास अधिकार्यांना सांगितले गेले.
संबंधित पाहणी नंतर मनपा प्रशासनाने देखील तत्काल पावले उचलली. धानोरी जकातनाका ते मारथोफिलस शाळा रस्त्याकरिता भू-संपादन करण्यासाठी संबंधित मारथोफिलस शाळा प्रशासनास जागेची कागदपत्रे घेऊन भू-संपादन प्रक्रिया करण्यासाठी तत्काल मनपा कार्यालयामध्ये येण्यासाठी पत्र पाठवले आहे. तसेच या संबंधी २७ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले आहे. पोरवाल रोड येथील कमलाई चौकातून ऑर्चिड हॉस्पिटल येथील पर्यायी रस्त्याचे अपूर्ण काम बुधवारी सुरू करण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पोरवाल रोड येथे तात्पुरता वन-वे सुरू केला जाईल, जेणे करून परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत मिळेल.
सिद्धार्थनगर येथील नागरिकांचा वनवास कधी संपणार : सुनील टिंगरे
|विधानसभेत आमदारांनी प्रश्नाला वाचा फोडली
पर्यायी रस्ता विकसित न केल्याने नागरिकांची अडचण
वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी |आमदार सुनिल टिंगरे यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी
रस्त्यांची दूरावस्था दूर करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवा : सुनील टिंगरे
नागरिकांना भेडसावणार्या समस्या तात्काळ सोडविण्याचा सूचना वडगावशेरी मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनास केल्या.
लोहगाव परिसरात पाणी वितरणचे जाळे तयार करा
येरवडा ते वाघोली दुमजली उड्डाणपुलाबाबत लवकरच निर्णय
| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
| आमदार सुनिल टिंगरे यांनी वेधले लक्ष
नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी येरवडा ते वाघोलीपर्यंत दुमजली उड्डाणपूल उभारण्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणासह सर्व संबधित विभागाच्या अधिकार्यांची लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पुण्यात विविध विकासकामांची आढावा बैठक घेतली. या बैठकित वडगाव शेरीचे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी पुणे शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न मांडला. प्रामुख्याने नगर रस्त्यावरील येरवडा ते वाघोली दरम्यान वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाच्या माध्यमातून वाघोली ते शिरुरच्या दुमजली उड्डाणपूल आणि सहा पदरी रस्ता विकसीत करण्यात येणार आहे. मात्र, महापालिका हद्दीत येरवडा ते वाघोलीपर्यंत सर्वाधिक वाहन कोंडी असते. त्यामुळे हा दुमजली उड्डाणपूल थेट येरवड्यापर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी आमदार टिंगरे यांनी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडे याबाबत विचारणा केली. या अधिकार्यांनी महापालिका हद्दीतील रस्त्याबाबत पालिकेकडून प्रस्ताव येणे आवश्यक असून त्यासंबधीचा प्रस्ताव आला आहे. मात्र, त्यावर आता वरिष्ठपातळीवर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लवकर मुंबईत बैठकिचे आयोजन करण्याच्या सुचना संबधित अधिकार्यांना दिल्या. त्यात याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान या बैठकित गणेशोत्सव, तसेच कोरोना काळात नागरिकांवर, राजकिय कार्यकर्त्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर जे गुन्हे दाखल झाले आहेत. ते मागे घेण्याची कार्यवाही करावी अशी मागणीही केल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले.