PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न

| महापालिका कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर 5 पदावर पदोन्नती बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे. या पदांवर पदोन्नती देण्यासाठी  पदोन्नती समितीची बैठक (DPC) आज आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. जवळपास 80-90 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. काही दिवसांतच कर्मचाऱ्यांना नवीन पदाबाबत आदेश काढले जातील. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा मिळाला आहे. अधीक्षक, प्रशासन अधिकारी सह या बैठकीत, विभागीय अतिक्रमण निरीक्षक, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती देण्यात आली. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली गेली. तसेच विभागीय अतिक्रमण निरीक्षक पदावर देखील पदोन्नती देण्यात आली.  असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

 पदोन्नती समितीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक

2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी

3. विभागीय अतिक्रमण निरीक्षक

4. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक

5. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)

—-

विविध पदांच्या पदोन्नतीसाठी आम्ही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. अखेर कर्मचाऱ्यांना बढती मिळण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे समितीतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. आता लवकरच पदस्थापना करून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली जावीत.

रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना

—–

DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!

Categories
Breaking News PMC पुणे

DPC | PMC Employees Promotion | प्रशासन अधिकारी, अधीक्षक सह विविध पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक!

DPC | PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) तसेच इतर पदावर पदोन्नती देण्यासाठी उद्या पदोन्नती समितीची बैठक (DPC) आयोजित करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक होणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाकडून (PMC General Administration Department) देण्यात आली.
पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.  महापालिका कर्मचाऱ्यांना हा चांगला दिलासा आहे. मात्र उद्याच्या बैठकीत यातील प्रशासन अधिकारी आणि अधीक्षक पदासाठीच पदोन्नती होणार आहे. उपअधिक्षक आणि वरिष्ठ लिपिक बाबत काही काळाने निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय या बैठकीत, मोटर वाहन विभागाकडील विविध पदे, क्षेत्रीय फिल्ड वर्कर आरोग्य विभागाकडील विविध पदे, शस्त्रक्रिया गृह सहाय्यक, कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर,  नेटवर्क, हार्डवेअर) या पदांसाठी पदोन्नती होणार आहे. संगणक ऑपरेटर व संगणक प्रोग्रॅमर या पदावरून  कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर), कनिष्ठ अभियंता (नेटवर्किंग) पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. असे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

उद्याच्या पदोन्नती समिती बैठकीतील पदे

1.  उपअधीक्षक ते अधीक्षक
2. अधीक्षक ते प्रशासन अधिकारी
3. मोटर वाहन विभागाकडील विविध पदे
4.  क्षेत्रीय फिल्ड वर्कर आरोग्य विभागाकडील विविध पदे
5. शस्त्रक्रिया गृह सहाय्यक
6. कनिष्ठ अभियंता संगणक (सॉफ्टवेअर, नेटवर्क, हार्डवेअर)
——-

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा! 

Categories
Breaking News PMC पुणे

Pune PMC Education department | शिक्षण विभाग समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीत बाधा!

| लवकरात लवकर समायोजन करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

PMC Pune Education Department | राज्य सरकारने शिक्षण मंडळ बरखास्त केल्यानंतर  मंडळ हा एक महापालिकेचा (PMC Pune) विभाग करण्याचे ठरले. असे असले तरी महापालिकेत या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत. वेतन श्रेणी पासून पदोन्नती (promotion) पर्यंतच्या या अडचणी आहेत. दरम्यान महापालिका सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचा प्रस्ताव आयुक्त यांच्या समोर ठेवला होता. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत. मात्र अजूनही समायोजन न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून सेवाज्येष्ठता ठरवून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान या प्रक्रियेस अजून वेळ लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिकासेवा (PMC pune new) प्रवेश नियमावली २०१४ नुसार प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे शिडी प्रमाणे त्यांना संधी मिळणार आहे. आज मितीस माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागाकडील ळांतील शिक्षकेतर सेवकांच्या बदल्या/बढत्या या पुणे महानगरपालिका आस्थापनेवर करण्यात येत नाही. तसेच त्या शिक्षकेतर सेवकांची सेवाज्येष्ठता ही स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे. पुणे मनपाकडील अन्य विभाग जसे मुख्यलेखापरीक्षण विभाग, नगरसचिव कार्यालय, मुद्रणालय विभाग या कार्यालयाकडील सर्व संवर्गाच्या सेवकांच्या देखील सेवाजेष्ठता याद्या व रोस्टर स्वतंत्र ठेवण्यात आलेले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाकडील (तत्कालीन शिक्षण मंडळाकडील) सेवकांच्या सेवाज्येष्ठता यादी एकत्रित केल्यास पुणे महानगरपालिकेच्या मुळ संवर्गातील सेवकांच्या सेवाज्येष्ठतेवर परिणाम होऊन त्यास मूळ संवर्गातील सेवकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसेच सदर शिक्षकेतर सेवकांच्या सेवाजेष्ठता पुणे महानगरपालिका आस्थापनेत विलिन करावयाच्या झाल्यास मनपा आस्थापनेवरील मंजूर पद संख्येत बदल करावे लागतील . मनपा आस्थापनेवरील मंजूर पदांवर प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई, रखवालदार पदावरील रोजंदारी कर्मचारी सामावून घेण्याची मागणी देखील करण्याची शक्यता होती. या सर्व गोष्टी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभागाने समायोजनाचा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त यांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावाला महापालिका आयुक्तांनी मंजूरी दिली आहे.
आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्याने आता शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिकेतील कुठल्याही विभागात होतील. शिवाय त्यांना पदोन्नती देखील मिळणार आहेत.  त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून  प्रारूप सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यावर येणाऱ्या हरकतींचा निपटारा करून बदल्या केल्या जातील. मात्र आयुक्तांनी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतरही ही प्रक्रिया करण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करून समायोजनाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Time Bound Promotion |  कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

| महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नती (Time Bound Promotion Proposal) महापालिका आयुक्त यांच्याकडून चांगला दिलासा देण्यात आला आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे. राज्य सरकारच्या अधीन राहून पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नसणार आहे. विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना हा चांगलाच दिलासा मानला जात आहे.
 (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले याबाबतचे सर्क्युलर देखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे कि, तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करताना पदोन्नती समितीची अंतिम मान्यता घेण्यात येत होती. मात्र आता सादर होणाऱ्या प्रस्तावना अंतिम मंजुरीचे अधिकारी संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे पदोन्नती चा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय याचा फायदा सेवानिवृत्त सेवकांना देखील होणार आहे. कारण यामुळे त्यांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लवकर मार्गी लागणार आहेत.
याबाबत पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे उदय भट, पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर तसेच महापालिका मागासवसर्गीय संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.
——
कर्मचाऱ्याच्या कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी झाले आहे. हा कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा आहे. याबाबत प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. मात्र आता तात्काळ प्रक्रिया सुरु करून पदोन्नती द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन. 
——–
———
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Important news for employees There is no need to submit a proposal before the promotion committee for time-bound promotion! | Final approval authority to Head of Department

PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | सरकारने मान्यता देऊन महिना होत आला तरी अजून पदोन्नती नाही

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Pune Employees Promotion |  अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | सरकारने मान्यता देऊन महिना होत आला तरी अजून पदोन्नती नाही

|  सप्टेंबर अखेर होणार पदोन्नती समितीची बैठक

PMC Pune Employees Promotion | (Author: Ganesh Mule) | पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत  मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कारण महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मात्र सरकारने प्रस्तावाला मंजूरी देऊन एक महिना होत आला तरी अजून कर्मचाऱ्यांना अजून कुठलाही दिलासा मिळालेला नाही. आधीच पदोन्नती देण्याबाबत उशीर करण्यात आला आहे. त्यानंतर सरकारचे कारण देत प्रस्ताव रखडत ठेवण्यात आला. आता सरकारने मंजूरी देऊनही त्याबाबत हालचाल करण्यात आलेली नाही. दरम्यान सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्टोबर च्या पहिल्या आठवड्यात ही बैठक होऊ शकते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. PMC Pune Employees Promotion)
पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा या संवर्गातील ज्या अधिकारी / कर्मचारी यांना निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने ते सध्या त्यांच्या उच्च पदाच्या पदोन्नतीच्या विचाराधीन कक्षेत आले आहेत. त्यांना निम्न संवर्गातील ३ वर्षाचा कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती द्यावी अगर कसे याबाबत महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. या अनुषंगाने सरकारने कळवले होते की, महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमात पदोन्नतीदेताना “निम्न पदावरील ३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक” अशी तरतुद आहे. निम्न संवर्गातील पदावर मानीव दिनांक मंजुर केल्याने उच्च पदाच्या पदोन्नतीकक्षेत आलेल्या अधिकारी / कर्मचारी यांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव नसताना पदोन्नती देण्यासाठी सेवाप्रवेश नियमात सदर अर्हतेमध्ये “निम्न पदावरील ३ वर्षांची नियमित सेवा” असा बदल करणे आवश्यक आहे. त्यानुसार हा बदल करून प्रस्ताव सरकारला पाठवण्यात आला होता. सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. (Pune Municipal Corporation Employees promotion)
आता कर्मचाऱ्यांना पदोन्नती समिती बैठकीची प्रतीक्षा आहे. बैठकीत निर्णय होऊन प्रत्यक्षात आदेश निघायला बराच अवधी जाणार आहे. सरकारने मंजुरी दिल्यानंतर तात्काळ यावर अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाची उदासीनता याला कारणीभूत मानली जात आहे. (PMC Pune)

PMC Employees Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दिलासा

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Time Bound Promotion |  कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा दिलासा 

| राज्य सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत प्रक्रिया सुरु ठेवणार  

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्धपदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) लटकला होता. कारण याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले होते. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र आता प्रशासना कडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. दरम्यान सरकारने काही बदल सुचवला तर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees) 

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले आहेत. दरम्यान सरकारने काही बदल सुचवला तर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. (PMC Pune News)

– काय आहे कालबद्ध पदोन्नती

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Administration relief to municipal employees regarding time-bound promotions

PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Pune Employees | पुणे महापालिका प्रशासक तथा आयुक्तांच्या मनमानी कारभाराला राज्य सरकारकडून चपराक

|  लेखनिकी संवर्गावर होत असलेल्या अन्यायाची राज्य सरकारकडून दखल

PMC Pune Employees | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून काही हक्काच्या संधी हिरावून घेतल्या जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) परस्पर सेवा नियमावलीत (service rules) बदल  केले जात आहेत. यामुळे या संवर्गातील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तसेच महापालिका कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पदोन्नत्या रखडवल्या जात आहेत. महापालिका नियमावली ला डावलत सेवा प्रवेश नियमावलीत बदल केले जात आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासका कडून हा मनमानी कारभार केला जात आहे. याबाबत काही संघटनांनी राज्य सरकारकडे तक्रार केली होती. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. तसेच मनमानीपणे घेतलेल्या निर्णयाचा अहवाल सरकारने महापालिका आयुक्तांकडून मागवला आहे. महापालिका आयुक्तांना ही राज्य सरकारची चपराक मानली जात आहे.   (PMC Pune employees)

: प्रशासनाकडून ठेवले गेले नियमावलीला डावलून  प्रस्ताव

महापालिकेच्या सहायक महापालिका (PMC Assistant commissioner) आयुक्त पदाच्या अर्हता आणि नेमणुकीच्या पद्धतीत वारंवार बदल केला जात आहे. या पदाच्या 50% पदोन्नतीच्या (Promotion) पद्धतीत बदल केला गेला होता. प्रचलित पद्धतीनुसार सेवाज्येष्ठतेनुसार (Seniority) 50% पदोन्नती दिली जात होती. मात्र यात बदल करण्यात आला. त्यानुसार पदवी धारण करणारे अंतर्गत परीक्षेद्वारे वर्ग 1, 2 आणि 3 मधील कर्मचारी देखील सहायक आयुक्त होऊ शकतात. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महापालिकेच्या मुख्य सभेने (pmc pune General body) मान्यता दिली होती व हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. मात्र यात अजून एक बदल केला गेला आहे. आता फक्त पदवीच (Degree) नाही तर पदविका (Diploma) धारण करणारा कर्मचारी देखील परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. मात्र या माध्यमातून लेखनिकी संवर्गातून (clerical cadre) सहायक आयुक्त (Assistant Municipal commissioner, होण्याची मनीषा बाळगणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेदखल केले असल्याचे दिसून येत आहे. (PMC pune Assistant commissioner)
महापालिका सेवा नियमावली (PMC pune Service rules) नुसार सहायकमहापालिका आयुक्त पदासाठी अर्हता आणि नेमणुकीची पद्धत कशी करावी हे ठरवून दिले आहे. त्यानुसार त्याची साखळी देखील बनवण्यात आली होती. त्यामध्ये लेखनिकीसंवर्गासाठी अधीक्षक, प्रशासन अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त अशी आहे. तर तांत्रिक पदासाठी शाखा अभियंता, उप अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि शहर अभियंता अशी आहे. (PMC pune news)

: पदोन्नती मध्ये बदल

त्यानुसार प्रशासकीय सेवाश्रेणी – १ मधील  सहाय्यक आयुक्त (क्रिडा, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, स्थानिक संस्थाकर अधिक्षक, मालमत्ता व व्यवस्थापन, कर आकारणी व कर संकलन) या पदाची नेमणुकीची प्रचलित  पद्धत ही 25% नामनिर्देशन, पदोन्नती-५०% आणि प्रतिनियुक्ती 25% अशी होती. 50% पदोन्नती ही महापालिका कर्मचाऱ्यांमधून सेवाज्येष्ठेतेनुसार केली जात होती. मात्र आता यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे फक्त पदवीच नाही तर पदविका धारण करणारा कुठल्याही संवर्गातील कर्मचारी परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकणार आहे. प्रशासनाने सेवा नियमावलीत हा बदल केला आहे. त्यामुळे लेखनिकी संवर्गात गेली 20-25 वर्ष काम करणारे, प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असणारे कर्मचारी मात्र या नियमामुळे बेदखल होत आहेत. प्रत्येक संवर्गाची एक साखळी ठरलेली आहे. मात्र बदल करताना लेखनिकी संवर्गातील साखळीतच बदल करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation) 

आरोग्य सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र  ladder आहे. त्यानुसार  वैद्यकीय अधिकारी,  सहायक आरोग्य अधिकारी,  उप आरोग्य अधिकारी आणि आरोग्य अधिकारी अशी ती साखळी आहे. त्याचप्रमाणे वरील उल्लेखानुसार अभियंता पदाची साखळी आहे. समाज विकास विभागात देखील साखळी आहे. त्यानुसार  समाजसेवक, सहायक समाज विकास अधिकारी, उपसमाज विकास अधिकारी आणि  मुख्य समाज विकास अधिकारी अशी साखळी आहे. उद्यान विभागाची देखील साखळी आहे. तसेच लेखा व वित्त विभागाची देखील साखळी आहे. मात्र बदल करताना फक्त लेखनिकी संवर्ग : प्रशासकीय सेवा याच्या 50% पदोन्नतीत बदल केला जात आहे. या संवर्गात कुठल्याही साखळीतील कर्मचारी येऊन सहायक आयुक्त होऊ शकतो. मात्र लेखनिकी संवर्गातील कर्मचारी दुसरीकडे जाऊ शकत नाही. (Pmc Pune Marathi News) 

प्रशासनाने पदोन्नतीत बदल करण्याचे विषयपत्र ठेवले होते.  मात्र त्यात विसंगती दिसून आली.  विषयपत्रात म्हटले आहे कि तांत्रिक पदांना अतांत्रिक संवर्गात पदोन्नती देता येणार नाही. एकीकडे असे म्हणायचे आणि दुसरीकडे कुठल्याही संवर्गातील कर्मचारी हा परीक्षा देऊन सहायक आयुक्त होऊ शकतो, असे म्हणायचे. यात विसंगती दिसून येते. हा लेखनिकी संवर्गावर अन्याय असल्याचे सांगितले जात आहे.
कारण बऱ्याच कर्मचाऱ्यांची सेवा 15- 20 वर्षाहून अधिक काळ झाली आहे. त्यांनी कर संकलन, सामान्य प्रशासन पासून बऱ्याच खात्यात काम केले आहे. सेवा ज्येष्ठेतेनुसार त्यांना सहायक आयुक्त पद मिळायला हवे आहे. मात्र अशा कर्मचाऱ्यांचे क्लास वन होण्याचे मार्ग बंद झाले आहेत. एवढे काम करून पुन्हा त्याला परीक्षा देण्यासाठी मजबूर करणे, हे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहे. मुळात सहायक आयुक्त होणार अधिकारी हा खूप अनुभवी असणे, आवश्यक आहे. फक्त 5 वर्ष सेवा झालेला माणूस त्या पदाला न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे पदोन्नती पूर्वीसारखीच ठेवण्याची मागणी केली जात आहे. बदल करायचा असेल तर प्रतिनियुक्तीत करा, अशीही मागणी केली जात होती.
पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) लेखनिकी संवर्गातील (Clerical Cadre) अधिक्षक, उप अधिक्षक, प्रशासन अधिकारी आणि तसेच अन्य पदांच्या पदोन्नती (Promotion) रखडली आहे. तर दुसरीकडे अभियंता संवर्गातील पदोन्नती (Engineering cadre promotion) तात्काळ केली जाते. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. महापालिका प्रशासनाच्या या कामकाजाला कंटाळून काही कर्मचाऱ्यांनी महापालिकेची तक्रार भारत सरकारच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे (National Commission for scheduled castes) केली होती. याबाबत आयोगाने गंभीर दखल घेतली. तसेच महापालिका आयुक्तांना (PMC commissioner) चांगलेच सुनावले होते.
त्यानंतर आता राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना चपराक देण्याचे काम केले आहे. जे निर्णय नियमांना डावलून आणि मनमानीपणे घेतलेले आहेत. अशा सर्व निर्णयाचा अहवाल राज्य सरकारकडून मागवण्यात आला आहे.

खालील मुद्यांची माहिती राज्य सरकारकडून मागवण्यात आली आहे 

१) प्रशासकीय संवर्गातील सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी पदांचा तपशिल (मंजूर, भरलेली,
रिक्त)
२) प्रशासकीय संवर्गातील पदांना इतर कोणत्या संवर्गामध्ये पदोन्नतीने जाण्याची तरतूद सेवाप्रवेश
नियमामध्ये आहे किंवा कसे ? असल्यास त्याचा तपशिल.
३) सन २०१४ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या सेवाप्रवेश नियमामध्ये स्पष्ट असतांना प्रशासकीय संवर्गात अभियांत्रीकी संवर्गाचा समावेश करण्याची कारणमिमांसा स्पष्ट करावी.
४) प्रशासकीय संवर्गामध्ये इतर संवर्ग समाविष्ट केल्यास प्रशासकीय संवर्ग पदोन्नतीपासून वंचित
राहणार आहे. याबाबत आपले स्वंयस्पष्ट अभिप्राय
५) पुणे महानगरपालिकेच्या सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम-२०१४ मधील सहाय्यक आयुक्त, प्रशासन अधिकारी या पदाची अर्हता व नियुक्तीच्या पध्दतीत सुधारणा करणेबाबत दोन वेळा विभिन्न प्रस्ताव पाठविण्याचे प्रयोजन स्पष्ट करावे.
६) पुणे महानगरपालिकेने प्रस्तावित केलेले सेवाप्रवेश नियम इतरत्र महानगरपालिकेमध्ये आहे किंवा
कसे ?
७) निवडपध्दतीने पदोन्नतीसाठीच्या प्रस्तावित मर्यादित परीक्षा, स्वरूप यासाठी सेवा नियमात सुधारणेची
आवश्यकता तपासून आपले स्वंयस्पष्ट अभिप्राय द्यावा. 
——
News Title | PMC Pune Employees | Pune municipal administrator and commissioner slapped by the state government

PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक  | कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो? 

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक

| कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो?

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. यामुळे कर्मचारी संघटना मात्र चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच याबाबत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सर्व संघटना प्रशासन विरोधात आंदोलन करणार आहेत. (PMC Employees Time Bound Promotion)
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व सुधारित वेतन संरचना यानुसार तीन लाभांची सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३० वर्षे) लागू करण्याबाबत कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. या  प्रकरणी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागवावे, तोपर्यंत दाखल प्रस्ताव व यापूर्वी मान्य केलेले प्रस्ताव देखील पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करावेत, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेले आहेत. (PMC General Administration Department) त्यानुषंगाने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेश प्रशासनकडून जारी करण्यात आले आहेतमी. यामुळे कर्मचारी मात्र हवालदिल झाले आहेत. यामुळेच कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. (7th Pay Commission Update)
– —–
अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासित प्रगती योजनेला दिलेली स्थगिती ही निषेधार्ह आहे. मुंबई  तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी अंमलबजावणी केलेली आहे याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्या आधारे आम्ही आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना कळवले असून ताबडतोब आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात सांगितलेले आहे.  अंमलबजावणी झाली नाही तर सर्व सहयोगी  संघटनांची एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय करूया.
उदय भट, अध्यक्ष, पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)
महापालिका प्रशासनकडून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय राज्य सरकारकडे पाठवला जातो. म्हणजेच प्रशासनाला कमर्चाऱ्यांविषयी काही घेणे देणे नाही. आश्वासित प्रगती योजनेचा विषय सरकारकडे पाठवण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती.  याचा सगळ्यात जास्त त्रास सेवानिवृत्त सेवकांना होणार आहे. त्यांची पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहणार आहेत. 
आशिष चव्हाण, सरचिटणीस, पीएमसी एम्प्लॉईज युनियन 
——–
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Municipal employees union aggressive over suspension of Assured Progress Scheme

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! 

 

| राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव 

 
PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. यामुळे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला आहे. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Employees)

– सामान्य प्रशासन विभागाचे सर्क्युलर जारी

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व सुधारित वेतन संरचना यानुसार तीन लाभांची सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३० वर्षे) लागू करण्याबाबत स कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. या  प्रकरणी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागवावे, तोपर्यंत दाखल प्रस्ताव व यापूर्वी मान्य केलेले प्रस्ताव देखील पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करावेत, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेले आहेत. (PMC General Administration Department)
त्यानुषंगाने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे अंमलबजावणीबाबत राज्य
शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेशात म्हटले आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे. (7th Pay Commission Update)

– काय आहे कालबद्ध पदोन्नती

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Employees Time Bound Promotion | The time-bound promotion of Pune municipal employees is suspended again!

PMC Employees Promotion | पदोन्नती प्रलंबित ठेवल्याने एक दिवसाचे वेतन देण्यास पुणे मनपा कर्मचाऱ्यांचा नकार

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Employees Promotion | पदोन्नती प्रलंबित ठेवल्याने एक दिवसाचे वेतन देण्यास पुणे मनपा कर्मचाऱ्यांचा नकार

| महापालिका कर्मचाऱ्यांची प्रशासनावर नाराजी

PMC Employees Promotion | जुलै २०२३ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन (One Day Salary) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM AID fund) देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) काही कर्मचाऱ्यांनी हरकत (PMC Employees Objection) घेतली आहे. काही कर्मचाऱ्यांनी याबाबत कारण देताना म्हटले आहे कि प्रशासनाने पदोन्नती प्रलंबित ठेवल्याने (Promotion Pending) आम्ही वेतन देणार नाही. महापालिका प्रशासनाकडून बऱ्याच पदाच्या पदोन्नत्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. तरीही प्रशासनाला मात्र जाग येत नाही. आता कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने नाराजी दाखवल्यावर तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे. (PMC Employees Promotion)

महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीस (Natural Calamities) सामोरे जाण्यासाठी सहाय्य, मदत व पुनर्वसनाच्या कामात हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्य बुध्दीने त्यांच्या वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन (One Day Salary) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM Aid Fund) देण्याबाबत शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. या अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त नागरिकांना मदत म्हणून पुणे महानगरपालिका व शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर अधिकारी/कर्मचाऱ्यांचे (PMC Employees) एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणेबाबत महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांनी वेतन देण्यास नकार दिला आहे. तसा अर्ज देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (PMC Pune)

काय म्हटले आहे अर्जात?

कारणे विनंतीपूर्वक अर्ज करतो कि परिपत्रकानुसार  ३ नुसार माझ्या माहे जुलै पेड इन ऑगस्ट २०२३ चे मासिक वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास माझी हरकत आहे.

कारण, गेल्या २ वर्षापासून मी पात्र असून देखील मला कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नतीने नेमणूक मिळालेली नाही. त्यामुळे माझे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान झालेले आहे. माझी काही चुक नसतानी मला पदोन्नतीने नियुक्ती पासुन वंचित ठेवण्यात आलेले आहे. माझ्यावर अन्याय झालेला आहे. सबब, माझ्या माहे जुलै पेड इन ऑगस्ट २०२३ चे वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास माझी सहमती नाही. माझे वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये.
—-
News Title | PMC Employees Promotion | Pune municipal employees refuse to pay one day’s salary due to pending promotion