Vadgaonsheri Water Supply | भामा आसखेड प्रकल्पातून वडगावशेरी हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Vadgaonsheri Water Supply | भामा आसखेड प्रकल्पातून वडगावशेरी हद्दीतील पाणी पुरवठा सुरळीत करा

| डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची मागणी  |पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले निवेदन

 

Vadgaonsheri Water Supply | भामा आसखेड प्रकल्पातून (Bhama Aaskhed Dam) वडगाव शेरी (Vadgaonsheri) हद्दीतील पाणी पुरवठा (Water supply) सुरळीत करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी केली आहे. पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे (PMC Water Supply Department) मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डॉ. धेंडे यांनी निवेदन देऊन मागणी केली. (Vadgaonsheri Water Supply)

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, वडगावशेरी मतदार संघातील भामा आसखेडच्या माध्यमातून जो पाणी पुरवठा होत आहे. त्यामध्ये गेल्या वर्षभरात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. परिसरातील नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अपुरा पाणी पुरवठा होत आहे. चाकरमान्यांची, गृहिनींची गैरसोय होत आहे. भामा आसखेडच्या परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत आहे. परिणामी पाणीपुरवठा होत नाही. भामा आसखेडच्या लाईनवर सातत्याने गळती होत आहे. त्याची दुरुस्ती करण्यासाठी वेळ जात आहे. तोपर्यंत नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. (Pune Municipal Corporation)

वरील सर्व बाबींमुळे या मतदार संघातील नागरीक हे पाण्यासारख्या मुलभूत गरजेपासून त्रासले आहेत. गेल्या आठवडयात गुरुवारी पाणी पुरवठा बंद होता. शुक्रवारी पूर्ण दिवसभर कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारपर्यंत पाण्याच्या लाईनच्या गळतीमुळे नागरीकांचे पाण्याविना अतोनात हाल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी (दि. 22) पुणे शहरात होणारा पाणी कपातीचा निर्णय भामा आसखेड परिसरात लागू नये.
भामा आसखेड प्रकल्पाच्या आधी लष्कर व होळकर या दोन जलशुध्दीकरण प्रकल्पातून या मतदारसंघाला पाणी पुरवठा होत होता. त्याची पर्यायी व्यवस्था आपत्कालीन स्थितीमध्येच चालू ठेवावी. तसेच एका अधिकाराऱ्यांची खास टीम या आपत्कालीन परिस्थिती करीता कार्यान्वित करावी. जेणेकरून येथील नागरीकांचे हाल होणार नाही. आपण या सूचनांचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली. (pune water cut)

या वेळी दिलेल्या निवेदनावर सकारात्मक मार्ग काढू असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती डॉ. धेंडे यांनी दिली.


News Title | Vadgaonsheri Water Supply | Improve water supply in Vadgaonsheri area through Bhama Askhed project | Dr. Siddharth Dhende’s demand

Pune News | नागपूर चाळ रस्ता नो पार्किंग झोनच्या आदेशाला स्थगिती | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मागणीला यश

Categories
Breaking News Political social पुणे

Pune News | नागपूर चाळ रस्ता नो पार्किंग झोनच्या आदेशाला स्थगिती

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मागणीला यश ; पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली तत्वतः मान्यता

– माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे वाहतूक पोलिस उपायुक्तांना निवेदन

 

Pune News | नागपूर चाळ गल्ली क्रमांक 1 ते गल्ली क्रमांक 4 तसेच एअरपोर्ट रस्त्यावरील पोस्ट ऑफिस चौक ते जेल रोड पोलिस चौकीपर्यंत येरवडा कारागृहाच्या सीमाभिंतीलगत नो पार्किंग झोन (No Parking Zone) करण्याचा आदेश येरवडा वाहतूक विभागाअंतर्गत घेण्यात आलेला होता. हा निर्णय सर्व नागपूर चाळ आणि महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड मधील रहिवासी यांच्यासाठी गैरसोयीचा आहे. सर्वसामान्य नागरिक, इथले व्यावसायिक यांचा जगण्याचा हक्क हिरावणारा निर्णय आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करा, अशी मागणी नागपूर चाळ रहिवासी संघाने केली होती. पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (PMC former Deputy mayor Dr Siddharth Dhende) यांनी हा निर्णय मागे घेण्यासाठी पाठपुरावा केला. या वेळी हा निर्णय मागे घेण्याला तत्वतः मान्यता दिली असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. (Pune News)

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर यांची भाजपा शहराध्यक्ष तथा माजी आमदार जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी हा निर्णय मागे घेत असल्याचे सांगण्यात आले.

या वेळी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक आयुब शेख, नागपुर चाळ व्यापारी अशोशियनचे अध्यक्ष किशोर चौरे, सरचिटणीस शाम गुप्ता, ताराचंद जैन, राजु बाफना, यशवंत शिर्के, पथारी संघटना अध्यक्ष विजय कांबळे, अण्णा मोहिते, चंद्रकांत जाधव, संजय वाईकर, डॉक्टर असोशियशनचे डाॅ साजिद शेख, डॉ. मेश्राम, पापाभाई , मुन्नाभाई, प्रशांत दिंडोरकर, सुरेश मोरे, विनोद मोरे, राजु हिरे, जेम्स शिंगार, मुनीर शेख, विनू महाडिक व नागरिक मोठ्या संख्येने होते.

या वेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, नागपूर चाळ रहिवाशांसाठी पार्किंगची कोणतीही सुविधा नाही. या ठिकाणी 3 हजार 200 कुटुंबे राहत आहेत. तर महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड मध्ये सुमारे चार हजार कुटुंबे राहत आहेत. नागपूर चाळ ही विघोषित झोपडपट्टी आहे. या ठिकाणी असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा 142 विविध प्रकारची दुकाने आहेत आहेत. तीन रुग्णालय, चार मेडिकल दुकाने तसेच दोन अधिकृत रिक्षा थांबा आहे. या सर्वांची पार्किंगची व्यवस्था ही सध्या तरी रस्त्यालगतच आहे. मात्र या ठिकाणी नो पार्किंग झोन झाल्यास जगण्याचा हक्कच हिरावून घेण्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित हा रस्ता यापूर्वीच शंभर फुटी करण्यात आलेला आहे. रस्ता प्रशस्त असल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न येत नाही. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचा दौरा असल्यास या रस्त्यावरील वाहने नागरिकांकडून काढली जात आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यात देखील कोणताही अडथळा येत नाही. याबरोबरच या रस्त्याला पर्यायी इतर अनेक रस्ते निर्माण झालेले आहेत. यामध्ये जुना एअरपोर्ट रस्ता, विमाननगर ते कल्याणी नगर कडे जाणारा रस्ता, तसेच एअरपोर्टवरून शाहू चौक, कॉमरझोन मार्गे पुणे शहरात जाणारा रस्ता आहे. त्यामुळे इतरही पर्याय सुविधामुळे नागरिकांना त्रास होत नाही.

या सर्वांचा विचार करता काही समाधानकारक तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांची आहे. यामध्ये जे नागपूर चाळ रहिवासी आहेत किंवा जे व्यवसाय करणारे आहेत, अशांच्या वाहनांना नागपूरचा रहिवासी संघाचा स्टिकर द्यावा. या लोकांनाच पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या व्यतिरिक्त वाहने लागल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्यासाठी पार्किंगचे पट्टे आखून द्यावेत. तसेच सुरक्षेचा प्रश्न असेल तर या परिसरात नागपूर चाळ रहिवासी संघाच्या वतीने सीसीटीव्ही देखील लावण्यासाठी नागरिक तयार आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता नुकताच काढलेला नो पार्किंगचा आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.

या वेळी नागरिकांची होणारी गैरसोय व मागणी पाहता वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजकुमार मगर यांनी नो पार्किंच्या आदेशाला स्थगिती देत असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसेच जी 20 परिषद तसेच महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे असल्यास या वेळी वाहने काढण्याचे आवाहन केले. याला नागपुर चाळ येथील रहिवाशांनी सकारात्मकता दर्शवली.


News Title | Pune News | Suspension of Nagpur Chal road no parking zone order| Former Deputy Mayor Dr. Success to Siddharth Dhende’s demand

Buddha Vihara in Vishrantwadi | विश्रांतवाडीतील बुद्धविहाराला मिळणार हक्‍काची जागा |दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीला महापालिका आयुक्‍तांची मान्यता

Categories
Breaking News PMC Political पुणे

Buddha Vihara in Vishrantwadi | विश्रांतवाडीतील बुद्धविहाराला मिळणार हक्‍काची जागा

|दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीला महापालिका आयुक्‍तांची मान्यता

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

Buddha Vihara in Vishrantwadi | विश्रांतवाडी चौकापासून (Vishrantwadi chowk)  धानोरीला जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने असणाऱ्या बुद्धविहाराला हक्‍काची जागा मिळणार आहे. लवकर या बुद्धविहाराचे इतर जागेत स्थलांतर होणार आहे. त्यासाठी दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याच्या कार्यवाहीचा ठराव पुणे महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांनी मंजूर केला आहे. पुणे महापालिकेचे (pune municipal corporation) माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former dy mayor Dr siddharth Dhende) यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टी पुनवर्सन विभाग, महापालिकेकडे डॉ. धेंडे यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आले आहे. (Buddha Vihara in Vishrantwadi)

धानोरी सर्व्हे नंबर 46 विश्रांतवाडी चौक येथे असणारे बुद्ध विहार राधेशाम आगरवाल यांच्या खासगी जागेत असून या जागेतून 60 फुट व 160 फुट नियोजित डीपी रस्ता आहे. त्यामुळे बुद्धविहाराची ही जागा बाधित होणार असल्याने तिचे इतर ठिकाणी योग्य पद्धतीने स्थलांतर होण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सदरच्या जागेपुढेच वॉटर वर्क्‍ससाठी आरक्षित असणाऱ्या जागेत दोन गुंठे जागा बुद्धविहाराला देण्याचे आगरवाल यांनी मंजूर केले होते. त्यासाठी झापडपट्टी पुनवर्सन प्रकल्प विभागाचा आदेश आवश्‍यक होता. त्यासाठी हे काम रखडले होते. त्या बबात माजी यांनी झोनिपुकडे पाठपुरावा केला. जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिकेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. (pune municipal Corporation)

त्या पत्रानुसार पुणे महापालिकेने सदरची जागा ताब्यात घेऊन बुद्ध विहाराच्या उभारणीसाठी मार्ग मोकळा करून देण्याची कार्यवाही पुर्ण केली आहे. यासाठी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सातत्याने महापालिका, झोपडपट्‌टी पुनर्वसन विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या पत्रानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती. अखेर डॉ. धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून लवकरच बुद्ध विहाराची उभारणी देखील केली जाणार आहे. (PMC pune news)

या बरोबरच माजी नगरसेवक अशोक कांबळे, बुद्ध विहार कमिटी अध्यक्ष राजेश बेंगळे, सर्व पदाधिकारी, विकसक प्रमोद अग्रवाल हे पाठपुरावा करत होते. तसेच पुणे मनपाच्या ताब्यात जागा आलेली आहे सर्व सभासद मिळुन वास्तुविशारद यांच्या मार्फत नविन विहाराच्या नकाशाला पसंती देऊन लवकरच काम चालु होणार आहे.

 महापालिकेच्या बैठकीत निर्णय-

डॉ सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्यावरून महापालिकेत आयुक्‍तांच्या अध्यक्षतेखाली 2021 मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चार मुद्‌द्‌यांवर निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये सध्याच्या विश्रांतवाडी येथील बुद्ध विहाराच्या जागेच्या बदल्यात मुळ मालक आगरवाल यांनी त्यांच्या सर्व्हे नंबर 46 मधील वॉटर वर्क्‍सकरिता आरक्षित असलेल्या जागेमधील झोपडपट्ट्या काढून दोन आर क्षेत्र बुद्धविहारासाठी पर्यायी जागा देऊन बांधकाम करावे. पर्यायी जागेमध्ये बुद्ध विहाराचे बांधकाम मिळकतधारक राधेशाम आगरवाल यांनी करून द्यावे. वॉटर वर्क्‍ससाठी आरक्षित क्षेत्राचा मोबदला आगरवाल यांनी टीडीआर स्वरूपात द्यावा. 60 फुट डीपी रस्ता मधील बुद्ध विहाराची जागा रिकामी झाल्यावर उर्वरीत क्षेत्राचा प्रलंबित टीडीआर देणेची कार्यवाही करावी.

—–

पुणे महापालिका आयुक्‍तांनी विश्रांतवाडी येथील बुद्ध विहारासाठी मागणीनूसार दोन गुंठे जागा ताब्यात घेण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी पाठपुरावा करत आहे. त्याला यश मिळाले आहे. लवकर पर्यायी जागेवर भव्य दिव्य बुद्ध विहार बांधण्यात येईल .

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका.


News Title | Buddha Vihara in Vishrantwadi will get the rightful place|Municipal Commissioner’s approval of the proceedings to take possession of two plots of land

Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

Categories
Breaking News Political social पुणे

Power Cut In Pune News | महावितरण अधिकाऱ्यांनो कारभार सुधारा अन्यथा नागरिकांसह भव्य मोर्चा काढू

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा

 

Power Cut In Pune News | महावितरणच्या (Mahavitran) कारभाराचे सगळीकडे वाभाडे निघत आहेत. तरी देखील त्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुधारणा होताना दिसत नाही. गुरुवारी तब्बल आठ तास ऐन उन्हाळ्यात वीज पुरवठा खंडित (Pune Power Cut) करण्यात आला. त्याचा नाहक त्रास नागरिकांना झाला. महावितरणच्या कारभारात सुधारणा न झाल्यास नागरिकांसह भव्य मोर्चा महावितरणच्या कार्यालयावर आयोजित करू, असा इशारा पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Former Deputy Mayor Dr Siddharth Dhende) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला. (Power Cut in pune news)

पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) अतिउच्चदाब ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगावच्या चारपैकी दोन वीजवाहिन्यांमध्ये गुरूवारी (दि. १८) रात्री ७ वाजून १० मिनिटांनी अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिणामी चाकण एमआयडीसीसह पुणे शहरातील नगररोड विभाग आणि पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी व भोसरी विभागातील सुमारे ३ लाख ५५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. सुमारे ३९६ मेगावॅट विजेचा पुरवठा बंद झाल्यामुळे पुणे शहरातील प्रामुख्याने खराडी, वडगावशेरी, विमाननगर, येरवडा, धानोरी आदी परिसरातील सुमारे १ लाख २५ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. (Pune power cut PGCIL)

महावितरणच्या या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, नागपूर चाळ, त्रिदलनगर सह अन्य भागातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. पुण्यात उन्हाचा पारा वाढला आहे. दिवसा बाहेर पडण्यास नागरिक धजावत नाहीत. घरात बसूनही प्रचंड गर्मीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गर्मीने त्रस्त असताना यामधे महावितरणच्या गलथान कारभाराची भर पडली आहे. (Mahavitran Marathi news)

वास्तविक पाहता देखभाल दुरुस्तीसाठी खासगी ठेकेदार कंत्राटी कर्मचारी नेमून लाखो रुपये खिशात घालत आहेत. देखभाल दुरुस्तीसाठी मोठी रक्कम खर्च होत असेल तर तांत्रिक बिघाड कसा होतो, असा सवाल डॉ. धेंडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार धरावेत. तसेच वीज पुरवठा खंडित करून ही यंत्रणा खासगी उद्योजकांच्या घशात घालण्याचा डाव बंद करा. अन्यथा या गलथान कारभाराचा तीव्र मोर्चा आयोजित करून निषेध करू, असा इशारा डॉ. धेंडे यांनी दिला. (Pune power cut)
—————————

News Title | Reform the administration or else we will take out a grand march with the citizens- Former Deputy Mayor Dr. Siddharth Dhende’s warning to the General Distribution Officers

Senior Citizens Health | शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी पूर्ववत करा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आयुक्‍तांना निवेदन

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

शामाप्रसाद  मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी पूर्ववत करा

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे आयुक्‍तांना निवेदन

| 2023-24 या आर्थिक वर्षात निधीची तरतूद करण्याची केली मागणी

 

ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी योजनेला यंदाच्या महापालिका अर्थसंकल्पात तरतूद केली नाही. परिणामी आरोग्य तपासणीसाठी मोठा आर्थिक बुर्दंड ज्येष्ठांना बसणार आहे. खासगी रुग्णालय, संस्थांमध्ये जाऊन तपासणी करण्याचा खर्च पेलवणार नाही. परिणामी ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल. हे टाळण्यासाठी शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणी योजना पुर्ववत करा, अशी मागणी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्‍त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे. तसेच 2023-24 या वर्षाच्या महापालिका अर्थसंकल्पात या योजनेच्या निधीची देखील तरतूद करण्याची मागणी डॉ. धेंडे यांनी केली आहे.

डॉ. धेंडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पुणे शहर हे ज्येष्ठ नागरीकांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. सध्याच्या महागाईच्या काळामध्ये या ज्येष्ठ नागरीकांना स्वतःचे आरोग्य निरोगी करण्याकरीता आरोग्याच्या तपासणीवरसाठी मोठा खर्च करावा लागत आहे. खासगी रुग्णालयातील आरोग्य तपासणी महाग झालेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना सातत्याने आरोग्य तपासण्या कराव्या लागत आहेत. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीच्या तपासण्या व इतर आजारांकरीता रक्तांमधील तपासण्या, एक्‍स-रे, सोनोग्राफी व काही विशीष्ट तपासण्या आदींचा समावेश आहे.

गेल्या वर्षी सुमारे 30 हजार ज्येष्ठ नागरीकांनी शामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत तपासणीचा लाभ घेतला होता. त्याकरीता क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड या खासगी संस्थेला निधी उपलब्ध करून दिला होता. परंतू यावर्षी 2023-2024 च्या अंदाजपत्रकामध्ये निधी उपलब्ध केलेला नाही. त्यामुळे या ज्येष्ठ नागरीकांना आर्थिक बुदंड सोसावा लागत आहे.

त्यामुळे तात्काळ संबंधित आरोग्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरीकांच्या आरोग्य तपासण्याकरीता ज्येष्ठ नागरीकांकडून पैसे न घेता निधी मंजूर करून द्यावा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय टळणार आहे. या बाबत सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा. योजनेला निधी मंजूर केल्यास ज्येष्ठ नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्‍त केली जाईल, असे डॉ. धेंडे म्हणाले.
————————-

Ward No 2 | माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे| डॉ. सिद्धार्थ धेंडे | प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व धर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

Categories
Breaking News cultural Political social पुणे

माणुसकी हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे| डॉ. सिद्धार्थ धेंडे

| प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्व धर्मीयांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन

संपूर्ण जगात शांतता नांदण्याची गरज आहे. सर्व जाती-धर्मामध्ये भाईचारा निर्माण व्हायला हवा. स्वतःच्या धर्माचा अभिमान असायलाच पाहिजे. मात्र इतर धर्माचा द्वेष करणे योग्य नाही. जगात माणूसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील कै. नटराज गंगावणे सभागृहात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते धेंडे बोलत होते. या वेळी प्रत्येक घरात ईद साजरी व्हावी यासाठी गरजूंना शिरखुर्मा साहित्य किट प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाला माजी नगरसेविका फरझाना शेख, आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष अयुब शेख, पुणे शहर भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, हिंदू संस्कृती मंचाचे दिलीप म्हस्के, शिख समाजाच्या वतीने सरबतजीतसिंग सिंधू, बौध्दाचार्य रमेश गाडगे, यासिन शेख, ख्रिश्चन समाजाच्या वतीने महापुरे, सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव घाडगे, हुसेन शहा बाबा दर्गा ट्रस्टचे रज्जाकभाई, मुश्‍ताकभाई तसेच प्रभागातील हमारी तंजीम व जामा मजीद ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

हा कार्यक्रम यशस्वी करायला सुरैया शेख, सईदा शेख, नझिम शेख, पप्पु मगदुम, फिरोज शेख, नुमान शेख, अनवर देसाई, फिरदोस शेख, विजय कांबळे, गजानन जागडे, वसंत दोंदे, अल्हाबक्ष, भिमराव जाधव , गणेश पारखे व ईतर सर्व कार्यकर्ते यांनी सहकार्य केले.

डॉ. धेंडे म्हणाले की, जगाला प्रेम अर्पण करण्याची शिकवण सर्व धर्मांमध्ये दिली जात आहे. कोणताही धर्म एकमेकांच्या विरोधात उभा राहण्याची मुभा देत नाही. माणसांनी एकमेकांचा द्वेष करायला सुरूवात केली. माणसांनीच भेदाभेद निर्माण केला. धर्माचा योग्य अभ्यास केल्यास मानवतावादी भावना सर्वांमध्ये वाढेल. पुढे तीच भावना माणसांनी पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रभागात जोपासला सामाजिक एकोपा : अय्युब शेख –

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने गेल्या 17 वर्षांपासून प्रभागात ईफ्तार पार्टीचे आयोजन केले जात आहे. प्रभागात सामाजिक एकोपा वृर्द्धींगत व्हावा, सर्व जाती धर्मात शांतता नांदावी, सर्व जाती धर्मात प्रेम भावना वाढावी या उद्देशाने उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सर्व धर्मियांना एकत्रित करून भाईचारा वाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. गेल्या वर्षांपासून महिलांसाठी देखील इफ्तार पार्टीचे आयोजन करून नवीन आदर्श डॉ. धेंडे यांनी निर्माण केला आहे, असे प्रतिपादन आरपीआय (आठवले गट) महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अय्युब शेख यांनी केले.

Chaitanya Laughter Yoga Mandal | सुखी जीवनासाठी हास्याची जोड हवी | डॉ. सिद्धार्थ धेंडे | चैतन्य हास्य योग मंडळाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Categories
Breaking News cultural social पुणे महाराष्ट्र

सुखी जीवनासाठी हास्याची जोड हवी | डॉ. सिद्धार्थ धेंडे

| चैतन्य हास्य योग मंडळाचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

सुखी आयुष्यासाठी सतत हसत राहणे आवश्‍यक आहे. हसण्याची जोड दिल्यास जगणे आनंदी होऊन जाते. हास्य क्‍लबच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य लोकांच्या आनंदात भर घालणारे आहे. इथे सुख आणि दुःखावर चर्चा होते. त्यामुळे मनावर असणारे ओझे हलके होण्यास मदत होते. त्यामुळे हास्य क्‍लबकडून उत्कृष्ट काम केले जाते, असे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले.

महाराष्ट्र हौसिंग बोर्ड – नागपूरचाळ येथील चैतन्य हास्य योग मंडळ, लुंबिनी उद्यान समतानगर हास्य क्‍लबचा २२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. समता बालक मंदिराच्या सभामंडपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे बोलत होते.
या वेळी लेखक व प्रेरणादायी मार्गदर्शन करणारे प्राचार्य पद्माकर पुंडे, पुणे शहर भाजपा प्रवक्ते मंगेश गोळे, शिवसेनेचे यशवंत शिर्के, भाजपा चिटणीस राजू बाफना, सामाजिक कार्यकर्ते, शिवाजी ठोंबरे, दिलीप म्हस्के, त्रिदल नगर सोसायटीचे चेअरमन पांलाडे आदींसह हास्य क्‍लबचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष श्री. प्रभाकर घुले व इतर १५० सभासद या वेळी उपस्थित होते.

प्राचार्य पद्माकर पुंडे म्हणाले की, समाजात एकोपा राहणे आवश्यक आहे. त्यासाठी क्लब, टीम आदीसारखे एकत्रित येऊन उपक्रम राबविणे आवश्यक आहे. हास्य क्लबद्वारे चांगले उपक्रम घेतले जात आहेत. कितीही अडचणी आल्या तरी त्याला हसत सामोरे जाऊन मात करावी.

मंडळाचे अध्यक्ष प्रकाश आंब्रे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. परूळीकर मॅडम यांनी निवेदन केले.

Dr. Siddharth Dhende | डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व 

Categories
Breaking News Education Political social पुणे

डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

–   डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संकल्प

निराधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. १३२ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हा संकल्प केला असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्याने अनेक मुलांचे आयुष्य भरकटले जात आहे. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. समाजाची एक पिढी नाहक गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत असताना विविध ठिकाणी फिरताना ही परिस्थिती निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाविषयी आधार देण्याचा मानस केला होता. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचा सर्वत्र माहोल आहे. त्या निमित्त अनेक सामाजिक उपक्रम माझ्या पुढाकाराने आयोजित केले जात आहेतच. मात्र यंदा १३२ निराधार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलणार असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्या वर्षापासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी निराधार विद्यार्थ्यांच्या पालकांनी नागपूर चाळ येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ९६८९९३४२८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन, डॉ. धेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा करत असताना शिक्षण या विषयाला खूप महत्व दिले आहे. लोकांना गुलामीतून, आर्थिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होतो. अन्यायाला वाचा फोडली जाते. समाजात ज्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरविले आहे. ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे निमित्त साधत निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

MHADA | म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

Categories
Breaking News PMC पुणे

म्हाडानेच घ्यावे हवाई दल आणि पर्यावरण ‘ना हरकत’ प्रमाणपत्र!

| येरवडा, गाळेधारक पदाधिकाऱ्यांची आणि  डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

येरवड्यातील नागपूर चाळ येथील म्हाडाच्या इमारतींची पुनर्विकास प्रक्रिया जलद होण्यासाठी आवश्यक असलेले हवाई दल आणि पर्यावरण खात्याचे ‘ना हरकत’ पत्र गृहरचनासंस्थे ऐवजी म्हाडाने स्वतः मिळवावे, अशी आग्रही मागणी आज म्हाडाच्या गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली. जीर्ण आणि धोकादायक इमारतीत आणखी किती वर्ष राहायचे, असा उद्विग्न सवालही यावेळी गाळेधारकांनी उपस्थित केला.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या नेतृत्वाखाली गाळेधारकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन बैठकीत चर्चा केली. यावेळी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल माने, समता नगर गाळेधारक महासंघाचे शिवाजी ठोंबरे, संयुक्त महासंघाचे देवी दिघे, राजकुमार जाधव, भाजपचे मंगेश गोळे आदी उपस्थित होते.

हवाई दल, पुणे महानगरपालिका, म्हाडा आणि राज्य शासन यांच्यात समन्वय नसल्यामुळे आणि वारंवार धोरण बदलत असल्यामुळे म्हाडाच्या 127 जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. हवाई दलाने नागपूर चाळ सर्वे नंबर 191 अ परिसरात 2016 साली बांधकामावर निर्बंध लादले आहेत. परंतु हे निर्बंध नेमके काय आहेत, यात अद्याप स्पष्टता नाही.
इमारतींच्या पुनर्विकासाठी हवाई दलाचे आणि पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र पुणे महानगरपालिका प्रत्येक सोसायटीकडे  स्वतंत्र मागते. ते देणे व्यवहारी नाही. त्यामुळे हे पत्र देण्याची जबाबदारी म्हाडाने घ्यावी, असा मुद्दा माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पालकमंत्र्यांकडे मांडला.

म्हाडाच्या जुन्या इमारतीतील गाळेधारक अद्यापही भाडेकरूच आहेत. त्यामुळे गाळेधारकांना म्हाडाने मालकी हक्क करून द्यावा, अशी मागणी बैठकीत झाल्यानंतर पालकमंत्र्यांनीही तशी सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिली.

समता नगर गाळेधारक महासंघाचे शिवाजी ठोंबरे म्हणाले, म्हाडाच्या इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये गाळेधारक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. सरकार बदलले की धोरण बदलते हे थांबले पाहिजे. सर्व विभागांनी समन्वयाने काम केल्यास विषय मार्गी लागेल.
—————––————

म्हाडाच्या अल्प, मध्यम, आणि उच्च उत्पन्न गटातील गाळे धारकांना इमारतींच्या पुनर्विकासात समान न्याय मिळावा. पुनर्विकासासाठी म्हाडाने संपूर्ण परिसराचा एकत्रित आराखडा तयार करून नियोजन केल्यास हवाई दल आणि पर्यावरण विभागाच्या एकाच ना हरकत पत्रात काम होईल

 

डॉ. सिद्धार्थ धेंडे ( माजी उपमहापौर)
——————

म्हाडाच्या जुन्या इमारतीतील गाळेधारक हे भाडेकरू ऐवजी जमिनीचे मालक कसे होतील, याबाबत कार्यवाही करायच्या सूचना म्हाडाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच बांधकाम बाबतच्या निर्बंधाबाबत अधिक स्पष्टता येण्यासाठी हवाई दलाला विचारणा केली आहे.

– चंद्रकांत पाटील (पालकमंत्री)
——–————

Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Categories
Breaking News PMC Political पुणे

कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

| माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पाठपुराव्याला यश

 मुंबई उच्च न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनाला  कनिष्ठ अभियंता पदावर कागपत्रांची पडताळणी करून अश्विनी वाघमारे यांना त्वरित नियुक्त करण्याचे आदेश  दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आरती देवरगावकर आणि मोनाली जाधव यांना देखील न्याय मिळाला आहे.
पुणे महापालिकेच्या रिक्त झालेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठी प्रतीक्षा यादीत पात्र असतानाही महापालिका प्रशासनाने नियुक्ती दिली नाही. या बाबत अश्विनी वाघमारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
पुणे महापालिकेच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य विद्युत/यांत्रिकी) रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी ८ ऑगस्ट २०१६ आणि ३१ ऑगस्ट २०१६ रोजी जाहीर प्रकटन प्रसिध्द करून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार ८ ऑक्टोबर २०१६ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकाल २ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिध्द करण्यात आला होता. ऑनलाईन परीक्षेतील पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र छाननी नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे प्रवर्गनिहाय सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी/प्रतीक्षा यादी ५ जानेवारी २०१७ रोजी संकेत स्थळावर प्रदर्शित करण्यात आली आहे.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाकरिता अनुसूचित जाती महिलासाठी ७ जागा राखीव होत्या. त्या जागांवर निवड झालेल्या पैकी एक महिला उमेदवार रुजू झाल्या नाहीत. तर दुसऱ्या अपात्र ठरल्या. त्यामुळे रिक्त झालेल्या सदर २ जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेवारांना संधी देणे नियमानुसार गरजेचे आहे. त्यापैकी एका जागेवर प्रतीक्षा यादीतील महिला उमेदवाराला बोलाविण्यात आले. नियमानुसार दुसऱ्या जागेवर अश्विनी वाघमारे यांना बोलावणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर एक वर्षाच्या प्रतीक्षा यादीचा कालावधी असल्याचे सांगून नियुक्त करण्यास महापालिका प्रशासनाने नकारघंटा दिली.
महापालिकेच्या या मनमानी कारभाराविरोधात डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या मार्गदर्शनाने अश्विनी वाघमारे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात वकिलांमार्फत आपली बाजू मांडली. मा. उच्च न्यायालयाने सुनावणी देताना प्रतीक्षा यादीचा कालावधी एक वर्षाचा कोणी ठरवला, असा प्रश्न उपस्थित करत महापालिका प्रशासनाला खडसावले. रिक्त पद भरले जाईपर्यंत प्रतीक्षा यादीतील उमेदवार पात्र ठरतात असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. संबधित याचिकाकर्ते अश्विनी वाघमारे यांची कागदपत्रे पडताळणी करून ते योग्य असल्यास त्यांची नियुक्ती कायदेशीर ठरत आहे. त्यामुळे हा आदेश प्राप्त झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत संबंधित याचिकाकर्त्यांना नियुक्ती देण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने दिले आहेत.  त्यामुळे आरती देवरगावकर आणि मोनाली जाधव यांना देखील नोकरीवर रुजू करण्यात आले आहे.
—-
कनिष्ठ अभियंता पदासाठी पात्र ठरत असतानाही महापालिका प्रशासन नकार देत होते. प्रतीक्षा यादीतील उमेदवाराला वेळेत कळविण्याची जबाबदारी महापालिकेची होती. त्यांनीच त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून नियुक्ती दिली नाही. या बाबत न्यायालयात दाद मागितली. पाठपुरावा केला. मा. उच्च न्यायालयाने संबंधित महिला उमेदवाराला न्याय देऊन नोकरीवर रुजू करण्याबाबत महापालिकेला आदेश दिले आहेत.
– डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका
———————————–