Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune EV Charging Station | PMC |  पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

| शहरात 83 जागा निश्चित

Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने शहरात 83 ठिकाणी चारचाकी गाड्यांचे चार्जिंग स्टेशन (Four Wheeler Charging Station) उभारण्यात येणार आहेत. हे काम Evigo Charge Pvt. Ltd. या कंपनीला देण्यात आले आहे. 83 स्टेशन पैकी महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य राहणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. तसेच तीनचाकी वाहनांसाठी (Three Wheeler charging Station) देखील स्टेशन उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. (Pune EV Charging Station | PMC)

| बैठकीत हे झाले निर्णय

1. Evigo Charge Pvt. Ltd. यांना निश्चित करून दिलेल्या जागांपैकी ज्याठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यास अडचणी अथवा जागा बदल करणे आवश्यक असेल अशा जागांबाबत विद्युत विभागाने आवश्यक सर्व्हे करून नवीन जागा उपलब्ध करून द्याव्यात. (PMC Pune)

2. Evigo Charge Pvt. Ltd. यांनी निश्चित जागांवर खोदाई करण्यासाठी परवानगीसाठी मनपाच्या विद्युत खात्याकडे अर्ज करावा व पथ विभागाकडे ठरविण्यात आलेले खोदाई शुल्क संबंधितानी भरावे व पुनर्स्थापित (Reinstate) करावे. (Pune Municipal Corporation News)
3. चार्जिंग स्टेशनकरिता अतिरिक्त विद्युत पुरवठा आवश्यक असल्यास Evigo Charge Pvt. Ltd. यांनी MSEB कडे अर्ज करावे व यासाठी आवश्यक मदत विद्युत विभागाने करावी. (PMC Pune News)
4. निविदा जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे Evigo Charge Pvt.Ltd यांना जाहिरातीचे बोर्ड लावण्याची ठिकाणे, त्याचे आकारमान याबाबत आवश्यक पूर्तता करावी. (PMC Electrical Department)
5. प्रथमतः महापालिकेच्या मालकीच्या जागेवर उदा. मनपा मुख्य इमारत, १५ क्षेत्रीय कार्यालय, बालगंधर्व, सावरकर भवन इत्यादी किमान २० ठिकाणी, प्राधान्याने उभारण्यात याव्यात यासाठी विद्युत विभागाने मालमत्ता व मनपाच्या अन्य विभागाशी समन्वयाने जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. पुणेस्टेशन सारख्या वर्दळीच्या ठिकाणी- जास्तीचे चार्जिंग स्टेशन उभारण्याची कार्यवाही करावी. (PMC Pune Marathi News)
6. महापालिकेमार्फत पे ॲण्ड पार्क योजना राबविण्यात आलेल्या ठिकाणच्या निविदाधारकांना, बसविण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनच्या ठिकाणी, चार्जिंगसाठी आलेल्या वाहनाव्यतिरिक्त अन्य वाहन पार्क न करणेबाबत पत्राद्वारे सूचित करावे.
7. रिक्षा व अन्य तीन चाकी वाहनांच्या चार्जिंग स्टेशनबाबत करावयाच्या कार्यवाहीसाठी पुढील आठवड्यात बैठक आयोजित करावी.
—-
News Title | Pune EV Charging Station |  PMC |  Preference to set up charging station on 20 places owned by Pune Municipal Corporation!

Pune Sex Ratio | सांस्कृतिक राजधानीत मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत चालली घसरण! | राज्य सरकारने फटकारले | 2022 साली 1 हजार मुलांमागे फक्त 910 मुली, तर चालू वर्षात फक्त 863 मुली 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे महाराष्ट्र

Pune Sex Ratio | सांस्कृतिक राजधानीत मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत चालली घसरण!

 

| 2022 साली 1 हजार मुलांमागे फक्त 910 मुली, तर चालू वर्षात फक्त 863 मुली

 
 

Pune Sex Ratio | (Author – Ganesh Mule) | एक हजार मुलांच्या जन्मामागे मुलींचे प्रमाण राज्यात सुधारले असले, तरी पुणे शहर (Pune City) मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात मागेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पुढारलेल्या पुण्यात ही स्थिती व्हावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) माहितीनुसार पुणे शहरात मुलींचे जन्माचे प्रमाण 2022 साली हे 910 होते.  2020 साली हे प्रमाण 946 होते. तर चालू वर्षात हे प्रमाण 863 इतकेच आहे. मागील काही वर्षात महापालिकेने चांगले काम करत हे प्रमाण 879 वरून 946 पर्यंत आणले होते. मात्र आता पुणे शहरातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण होत चालली आहे. यामुळे आता राज्य सरकारने देखील पुणे महापालिकेला फटकारले आहे. (Pune Sex Ratio)

 

: जनजागृतीत आणि कारवाई करण्यात महापालिका कमी पडली 

 
एक हजार मुलांच्या जन्मामागेच मुलींच्या जन्माचे प्रमाण काढण्यात येते. पुणे महापालिकेकडून (PMC Pune) अथवा कोणत्याही शहर, जिल्ह्यातून मुलींच्या जन्माची आकडेवारी उपलब्ध झाल्यास त्यावरून लिंग गुणोत्तर निश्चित केले जाते. जन्म विभागाकडे दैनंदिन मुला मुलींच्या जन्माची नोंदणी केली जाते. त्यातून संकलित माहितीच्या आधारे हे प्रमाण काढले जाते. लिंग गुणोत्तराच्या बाबतीत पुणे शहर आणि महापालिका राज्यात वरच्या स्थानावर होती. याबाबत महापालिकेचे राज्य सरकार कडून कौतुक देखील केले जायचे. महापालिकेकडून वेगवेगळ्या उपाय योजना राबवून आणि जनजागृती करून हे प्रमाण वाढवले गेले होते. मात्र 2021 आणि 2022 सालात हे प्रमाण चांगलेच घसरले आहे. मुलींचे स्वागत करण्यात पुढारलेले पुणे उणे का असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान महापालिका जनजागृती करण्यात आणि लिंग तपासणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात कमी पडली असल्याचे सांगण्यात येत आहे.  (Pune Municipal Corporation Health Department)
 

: 2020 ला सेक्स रेशो 946 

दरम्यान, ‘ 2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2011 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 884 एवढे होते. 2012 व 2013 मध्ये अनुक्रमे 934 व 933 एवढे प्रमाण होते. 2014 मध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन ते 937 पर्यंत गेले, तर 2015 मध्ये  हे प्रमाण घसरून 925 पर्यंत खाली आले होते. त्यानंतर 2019 ला 922 तर 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये यात खूपच घसरण झाली. 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण फक्त 900 असे होते. तर 2022 साली यात थोडीशी सुधारणा होऊन हे प्रमाण 910 इतके झाले. त्यानंतर आता 2023 सालात देखील संख्या कमीच असल्याचे दिसून येत आहे. मे पर्यंतच्या आकडेवारी वरून हे प्रमाण 863 इतके असल्याचे दिसून आले आहे. असे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation News)

: लिंग गुणोत्तर (sex Ratio) प्रमाण 

 
वर्ष             रेशो 
 
2010     879
2011      884
2012     934
2013     933
2014      937
2019       922
2020.      946
2021.       900
2022.       910
2023.       863
(मे  पर्यंत)
News Title | Pune Sex Ratio | Declining birth rate of girls in the cultural capital!| Only 910 girls per 1 thousand boys in 2022, only 863 girls in current year

Pune Municipal Corporation | वडगाव बुद्रुक मधील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेकडून कारवाई

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | वडगाव बुद्रुक मधील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेकडून कारवाई

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC Pune) झोन क्र.२ मधील वडगाव बु. येथील विनापरवाना अनधिकृत बांधकामावर (Illegal Construction) कारवाई करणेत येऊन एकूण सुमारे १९००० चौ.फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले. बांधकाम आणि अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.  (Pune Municipal Corporation)

वडगाव बु. येथील स.नं. ३५ ते ४०, स.नं.५१ पार्ट येथिल विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कलम ५३(१) (अ) व कलम ५४ अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत आली. कारवाईमध्ये वडगाव बु. स.नं.३५ ते ४० येथील गोयल गंगा समोरील दुकाने यांचे १०,००० चौ. फुट, गंगा भाग्योदय यांचे १००० चौ. फुट, वडगाव बु. स.नं. ५१ सिंहगड कॉलेज समोरील शेड यांचे ४००० चौ. फुट.,स.नं.५० मधील बाळासाहेब जाधव यांचे ४००० चौ. फुट असे एकूण १९००० चौ. फुट. क्षेत्र मोकळे करणेत आले. सदरची कारवाई अतिक्रमण विभागाकडील कर्मचारी, बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, २ जेसीबी, १ ब्रेकर, इत्यादीच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. (PMC Pune News)


News Title | Pune Municipal Corporation | Action by Pune Municipal Corporation on unauthorized construction in Vadgaon Budruk

Kamala Nehru Hospital Dialysis Center | कमला नेहरू रुग्णालयातील डायलेसिस सेंटर चालवण्यास लायन्स क्लब असमर्थ!  | महापालिका आरोग्य विभागाने संस्थेकडून मागवला खुलासा 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Kamala Nehru Hospital Dialysis Center | कमला नेहरू रुग्णालयातील डायलेसिस सेंटर चालवण्यास लायन्स क्लब असमर्थ!

| महापालिका आरोग्य विभागाने संस्थेकडून मागवला खुलासा

Kamala Nehru Hospital Dialysis Center| (Author – Ganesh Mule) | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) कमला नेहरू रुग्णालयात डायलेसिस सेंटर (Kamala Nehru Hospital Dialysis Center) सुरु करण्यात आले आहे. शहरातील गरीब लोकांना माफक दरात सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने महापालिकेने हे सेंटर सुरु केले आहे. हे सेंटर लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला चालवण्यास देण्यात आले आहे. मात्र या संस्थेकडून चालवल्या जाणाऱ्या या डायलेसिस सेंटरमध्ये दैनंदिन कामकाजात अनियमितता आढळून आलेल्या आहेत. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लायन्स क्लब वर सेंटर चालवण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवला आहे. तसेच संस्थेकडून खुलासा देखील मागवला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी ही माहिती दिली. (Kamala Nehru Hospital Dialysis Center)
लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टकडून हे सेंटर कुठलेही कारण न देता नुकतेच दीड दिवसांसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने या सेंटरची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 17 जून ला  सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक यांनी या सेंटरची पाहणी केली. यामध्ये बऱ्याच अनियमितता आढळून आल्या आहेत. (PMC Health Department)
ट्रस्ट ला हे सेंटर 2016 साली 5 वर्षासाठी चालवण्यास देण्यात आले होते. याची मुदत संपल्यानंतर पुन्हा 5 वर्ष कालावधी वाढवून देण्यात आले आहे. करारानुसार संस्थेमार्फत डायलेसिस सेंटरचे कामकाज योग्य प्रकारे होणे अपेक्षित आहे. मात्र  सहाय्यक आरोग्य अधिकारी यांनी डायलेसिस सेंटरला भेट देऊन पाहणी केली असता एकूण 15 डायलेसिस मशिन्सपैकी 13 मशीन्स बंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. तसेच सोमवार दि. 12 ते मंगळवार दि. 13/06/2023 रोजी दुपारपर्यंत सदर सेंटर सुमारे दीड दिवस बंद होते. पाहणीच्या वेळी सेंटरमध्ये नेफ्रालॉजिस्ट अथवा डॉक्टर्स तसेच वैद्यकीयदृष्टया माहिती असलेली परिचारिका कार्यरत नसल्याबाबत निदर्शनास आले. त्यामुळे सेंटरमध्ये डायलेसिसचे उपचार घेत असतांना रुग्णाची तब्येत गंभीर झाल्यास तातडीने आवश्यक उपचार करणेसाठी तज्ञ डॉक्टर्स व परिचारिका उपलब्ध नसल्यास अशा रुग्णास तातडीने अन्य ठिकाणी उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार नाही. ही  बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे.
पाहणीच्या वेळी सेंटरच्या ठिकाणी अस्वच्छता आढळून आली. त्यामुळे सेंटरमध्ये इन्फेक्शन वाढून त्यामुळे तेथे उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेंटरमध्ये दैनंदिन निर्माण होणारा जैव वैद्यकीय कचरा (Biomedical Waste) मागील सुमारे एक ते दीड वर्षापासून साठवून ठेवला असलेबाबत माहिती प्राप्त झाली. व त्यानुसार तेथे अनारोग्यकारक पध्दतीने साठवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणेबाबत कोणतीही उपाययोजना आपण केली नसल्याचे निदर्शनास आले आहे. (PMC Pune Health service)
जुन 2022नंतर येथे निर्माण झालेला दैनंदिन जैव वैद्यकीय कचरा शास्त्रोक्त पध्दतीने निर्मुलनासाठी दिला नसून मागील सुमारे वर्षभरापासून या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा साठवून ठेवला असल्याचे दिसून येत आहे. तसेच आजअखेर जैव वैद्यकीय कचरा निर्मुलन शुल्कापोटी र.रु. 89,870/- इतक्या रकमेची थकबाकीही असल्याचे दिसून येत आहे. या बाबी तपासणी दरम्यान निदर्शनास आल्या असून सदर डायलेसिस सेंटर नियम व अटींनुसार चालविणेस संस्था असमर्थ असल्याचा अहवाल सहायक आरोग्य अधिकारी यांनी दिला आहे. त्यानुसार आढळून आलेल्या त्रुटींबाबतचा खुलासा सादर करण्याबाबत आरोग्य विभागाकडून नोटीस देण्यात आली आहे. (Kamala Nehru Hospital Pune)
——
News Title | Kamala Nehru Hospital Dialysis Center | Lions Club unable to run dialysis center in Kamala Nehru Hospital!| The Municipal Health Department sought clarification from the organization

PMC Toilet Seva App | पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळवा आता मोबाईल एप वर! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Toilet Seva App | पुणे महापालिकेच्या स्वच्छतागृहांची माहिती मिळवा आता मोबाईल एप वर!

|  Toilet Seva App चे उद्या उदघाटन

PMC Toilet Seva App | पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची (Pune Public Toilet) उपलब्धता व सोयीसुविधांबाबत अधिक प्रमाणात जनजागृती होणेकरीता पुणे महापालिका (PMC Pune) आणि  अमोल भिंगे यांनी शहरातील सार्वजनिक शौचालयांची ठिकाणे शोधणे, वापरानंतर त्या शौचालयास Feedback देणे किंवा तक्रारी नोंदविणे इ. सुविधा उपलब्ध असलेले Toilet Seva app तयार केले आहे. या एपचे उदघाटन उद्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC commissioner Vikram Kumar) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांनी दिली. (PMC Toilet Seva App)
उपायुक्त राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार  या App द्वारे टॉयलेट्स search करणे, टॉयलेट add करणे, ओव्हरऑल रेटिंग नुसार results sort करणे, टॉयलेटमध्ये असणाऱ्या सुविधा पहाणे किंवा त्यानुसार search results चे filtering करणे उदाहरणार्थ वॉशबेसिन, पाणी, liquid soap किंवा sanitizer, डस्टबिन, lights, महिलांसाठीच्या सॅनिटरी नॅपकिन्स, टॉयलेट कुठे लोकेटेड आहे हे तपासणे अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. (Pune Municipal Corporation)
पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण ११८३ सार्वजनिक स्वच्छतागृहांची (public टॉयलेट्स, community टॉयलेट्स) माहिती टॉयलेटसेवा app मध्ये उपलब्ध करून देण्य आलेली आहे. ही माहिती शहरातील नागरिक, वारकरी तसेच प्रवास करणाऱ्यांना उपयोगी पडणार आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांविषयी नागरिकांना आपला अभिप्राय टॉयलेटसेवा app मधून रेटिंग्सच्या मार्फत देणे आणि आपल्या तक्रारी नमूद करणे सोयीचे होणार आहे. २२ जून ला महापालिका आयुक्त यांचे शुभहस्ते या Toilet Seva app चे लॉचिंग करण्यात येत असून हे app नागरीकांना वापरासाठी खुले करण्यात येत आहे. पुणे शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या app चा वापर करून आपला सहभाग नोंदवावा असे जाहीर आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. (PMC Solid Waste Management Department)
—-
News TitlePMC Toilet Seva App | Get information about Pune Municipal Corporation toilets now on mobile app

SRA | PMC Pune | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी | एसआरए आणि पुणे महापालिकेसोबत झालेल्या बैठकीत निर्णय

Categories
Breaking News PMC Political social पुणे

SRA | PMC Pune | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी | एसआरए आणि पुणे महापालिकेसोबत झालेल्या बैठकीत निर्णय | मोहन जोशी

SRA | PMC P | पुण्याच्या राजेंद्रनगर (Rajendra Nagar) १००४/५ येथील अगोदर पासून पात्र असलेल्या २७ कुटुंबांचे दीर्घकाळ रेंगाळलेले पुनर्वसन त्वरित केले जाईल. त्यासाठी एसआरएच्या (SRA)जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांना हलवले जाईल. उर्वरित कुटुंबाची यादी मनपा विभागीय कार्यालय कडून घेऊन पात्रता तपासून त्यांचे देखील पुनर्वसन त्याच परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या एसआरए इमारतीत केले जाईल. असा महत्वपूर्ण निर्णय पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (SRA | PMC pune)

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कॉंग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे आणि सचिव रेखा कांबळे या बैठकीत सहभागी झाले होते. तेथील स्थानिक रहिवासी देखील या बैठकीत उपस्थित होते. (Slum Rehabilitation Authority)

या संदर्भात मोहन जोशी म्हणाले की, राजेंद्रनगर १००४/५ येथील पुनर्वसन रखडलेल्या कुटुंबांनी या संदर्भात कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कडे निवेदन दिल्यावर त्यांच्यासह मी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले. या वस्तीचे २००७ ते २०१३ दरम्यान काहीसे पुनर्वसन झाले. परंतु तेव्हा काही कुटुंबांचे पुनर्वसन झाले नाही. नंतर २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला पूर आला. शासनाने या परिसरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन करण्याचा निर्णय जाहीर केला. येथील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घरेलु कामगार महिला आहेत. या सर्व कुटुंबांच्या प्रश्नाचा पाठपुरावा पुणे जिल्हा घरकामगार संघटना २०१९ पासून करीत आहे. परंतु पुणे मनपा आणि एसआरए मधील ताळमेळ अभावी त्यांना न्याय मिळत नव्हता. आता हा निर्णय झाल्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे असे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)

या पूरग्रस्त नागरिकांना या पूर्वीच न्याय मिळायला हवा होता असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी या कामी मोठे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीतच राहू असे ते म्हणाले. (Pune Municipal Corporation)


News Title |SRA | PMC Pune | The question of pending rehabilitation of flood victims in Rajendranagar is on the way Decision taken in meeting with SRA and Pune Municipal Corporation

Education Commissioner | शिक्षण आयुक्तांनी पुणे महापालिका शिक्षण विभागाला दिले हे महत्वाचे आदेश 

Categories
Breaking News Education PMC social पुणे

Education Commissioner | शिक्षण आयुक्तांनी पुणे महापालिका शिक्षण विभागाला दिले हे महत्वाचे आदेश

Education Commissioner | राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे (Education Commissioner Suraj Mandhre) यांनी नुकतीच पुणे महापालिकेच्या काही शाळात (Pune Municipal Corporation Schools) भेट दिली. त्यावेळी त्यांना विद्यार्थ्यांच्या क्षमता बाबत मार्गदर्शनाचा अभाव जाणवला. यानंतर त्यांनी महापालिका शिक्षण विभागाला (PMC Education Department) काही मौलिक सूचना केल्या आहेत. (Education Commissioner)

याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले कि,  पुणे महापालिका क्षेत्रातील एका समुपदेशन कार्यक्रमास उपस्थित राहिलो. एकंदरीत पाहता विद्यार्थ्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी, आजारपण, शाळेतील विषय निरस वाटणे तसेच बिनचूक मार्गदर्शनाचा अभाव अशा कारणांमुळे विद्यार्थी किमान क्षमता प्राप्त करू शकत नाहीत, असे मला त्यांच्या बोलताना जाणवले. या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. (Pune Education News)

१. सर्व विद्यार्थ्यांची जुलै मधील परीक्षेसाठी नोंदणी करावी

२. विद्यार्थ्यांची विषयावर विभागणी करून स्वतंत्र वर्ग त्या त्या विषय शिक्षकांनी घ्यावेत

३. हे वर्ग घेताना नेमक्या कोणत्या कारणाने विद्यार्थी क्षमता प्राप्त करू शकले नाहीत त्याचे निदान करावे व तसे उपचार करावेत

४. किमान आवश्यक गुण प्राप्त होतील तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कॅप्सुल कोचिंग करावे या विद्यार्थ्यांपैकी जास्तीत जास्त विद्यार्थी आगामी परीक्षेत क्षमता प्राप्त करतील त्या शिक्षकांचा विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मान करणेत येईल. (PMC Pune News)


News Title |Education Commissioner The Commissioner of Education gave this important order to the Pune Municipal Education Department

  Pune residents have paid the entire property tax!  Then win a car, phone and laptop from Pune Municipal Corporation!

Categories
Breaking News PMC social पुणे

  Pune residents have paid the entire property tax!  Then win a car, phone and laptop from Pune Municipal Corporation!

 PMC Property Tax Lottery |  Pune Municipal Corporation has launched a Property Tax Lottery Scheme for property tax holders.  The Municipal Corporation has taken an innovative step to encourage timely payment of property tax arrears.  The Corporation has introduced a lottery scheme applicable to residential, non-residential and open plot taxpayers paying property tax between 15 May and 31 July 2023.  Attractive prizes ranging from cars to bikes, laptops and phones will be given in this.  (PMC Property Tax Lottery)

  The objective is to encourage timely payment

  To encourage timely payment, PMC has introduced a lottery scheme along with the existing 5% to 10% concessions for prompt property tax settlement.  The objective of the initiative is to encourage tax payers to pay property tax and ensure timely revenue collection for the Municipal Corporation.  (PMC Pune News)

 Efforts for maximum property tax recovery

  Apart from the lottery scheme, the PMC has taken strict action against tax defaulters.  In the last two weeks, the municipality has launched a drive to seal commercial properties, resulting in the seizure of 120 properties worth Rs 2.5 crore.  This aggressive approach is aimed at enforcing tax compliance and creating a fair environment for all taxpayers.  (Pune Municipal Corporation News)

PMC Appeal to property tax holders

  The PMC has appealed to all property holders to take advantage of this opportunity and pay their property tax on time to avail the benefits offered by the lottery scheme.  Lottery taxpayers are given the opportunity to win prizes while fulfilling their civic obligations.  (PMC Property Tax Department)

  Here are the payment options

  To make convenient payments, PMC accepts various payment methods including cash, cheque, online payment, NEFT, RTGS and IMPS.  Property holders can choose the best option for them to ensure hassle free tax payment.  (property tax 40% discount)

 – Such will be the rewards

 1. Annual Tax 25000 and below
 Prizes – 2 Petrol Cars, 6 E Bikes, 6 Mobile Phones and 4 Laptops.
2. Annual Tax 25001 to 50000
Prizes – 1 petrol car, 3 e-bikes, 3 mobile phones and 2 laptops
 3. Annual tax 50001 to 1 lakh
 Prizes – 1 Petrol Car, 3 E Bikes, 3 Mobile Phones and 2 Laptops
4.  Holders of annual tax above 1 lakh
 Prizes – 1 Petrol Car, 3 E Bikes, 3 Mobile Phones and 2 Laptops
 —

PMC Property Tax Lottery | पुणेकरांनो संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स भरलाय ना ! मग पुणे महापालिकेकडून जिंका कार, फोन आणि लॅपटॉप! 

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Property Tax Lottery | पुणेकरांनो संपूर्ण प्रॉपर्टी टॅक्स भरलाय ना ! मग पुणे महापालिकेकडून जिंका कार, फोन आणि लॅपटॉप!

PMC Property Tax Lottery | पुणे महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) प्रॉपर्टी टॅक्स धारकांसाठी लॉटरी योजना (Property Tax Lottery Scheme m) सुरू केली आहे. मिळकत कराची थकबाकी वेळेवर भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी महापालिकेने अभिनव पाऊल उचलले आहे.  महापालिके ने 15 मे ते 31 जुलै 2023 दरम्यान मिळकतकर भरणाऱ्या निवासी, अनिवासी आणि खुल्या भूखंडावरील करदात्यांना लागू असलेली लॉटरी योजना आणली आहे. यामध्ये इ कार पासून ते बाईक, लॅपटॉप, फोन अशी आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. (PMC Property Tax Lottery)
 वेळेवर पेमेंट करण्यास प्रवृत्त करणे हा उद्देश 
 वेळेवर पेमेंट करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, PMC ने त्वरित मालमत्ता कर सेटलमेंटसाठी विद्यमान 5% ते 10% सवलतींसोबत लॉटरी योजना आणली आहे.  टॅक्स धारकांना मिळकतकर भरण्यास चालना देणे आणि महानगरपालिकेसाठी वेळेवर महसूल संकलन सुनिश्चित करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. (PMC Pune News)
जास्तीत जास्त मिळकतकर वसुलीसाठी प्रयत्न 
 लॉटरी योजनेव्यतिरिक्त, पीएमसीने कर न भरणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे.  गेल्या दोन आठवड्यांत पालिकेने व्यावसायिक मालमत्ता सील करण्याची मोहीम सुरू केली असून, त्यामुळे अडीच कोटी रुपयांच्या १२० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.  या आक्रमक पध्दतीचा उद्देश कर अनुपालनाची अंमलबजावणी करणे आणि सर्व करदात्यांना न्याय्य वातावरण निर्माण करणे हे आहे. (Pune Municipal Corporation News)
प्रॉपर्टी टॅक्स धारकांना  आवाहन
 PMC ने सर्व मालमत्ता धारकांना आवाहन केले आहे  की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि लॉटरी योजनेद्वारे ऑफर केलेल्या फायद्यांचा लाभ घेण्यासाठी त्यांचा मालमत्ता कर वेळेवर भरावा.  लॉटरी करदात्यांना त्यांच्या नागरी जबाबदाऱ्या पार पाडताना बक्षीस जिंकण्याची संधी देण्यात आली आहे. (PMC Property Tax Department)
 हे आहेत  पेमेंट पर्याय
 सोयीस्कर पेमेंट्स  करण्यासाठी, PMC रोख, चेक, ऑनलाइन पेमेंट, NEFT, RTGS आणि IMPS यासह विविध पेमेंट पद्धती स्वीकारते.  त्रासमुक्त कर भरणा सुनिश्चित करण्यासाठी मालमत्ता धारक  त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडू शकतात. (property Tax 40% discount)
– अशी असणार आहेत बक्षिसे 
1. वार्षिक टॅक्स 25000 व त्यापेक्षा कमी
बक्षिसे – 2 पेट्रोल कार, 6 ई बाईक, 6 मोबाईल फोन आणि 4 लॅपटॉप.
2. वार्षिक टॅक्स 1 लाख वरील धारक
बक्षिसे – 1 पेट्रोल कार, 3 ई बाईक, 3 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप
3. वार्षिक कर 50001 ते 1 लाख
बक्षिसे – 1 पेट्रोल कार, 3 ई बाईक, 3 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप
4. 25001 ते 50000
1 पेट्रोल कार, 3 ई बाईक, 3 मोबाईल फोन आणि 2 लॅपटॉप
News Title | PMC Property Tax Lottery | Pune residents have not paid the entire property tax! Then cars, phones and laptops from Pune Municipal Corporation!

PMC Shahari Garib Yojana |  पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या  

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

PMC Shahari Garib Yojana |  पुणे महापालिकेच्या शहरी गरीब वैद्यकीय योजनेचा लाभ हवा असेल तर ही माहिती जाणून घ्या

PMC Shahari Garib Yojana | २०२३ – २०२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या (PMC Pune Urban Poor Medical Assistance scheme) नियम व अटीशूर्तीनुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अडमिट पेशंटसाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्याकरीता शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार (Shahari Garib yojana policy) सदर योजनेचे सभासद कार्ड (Shahari Garib yojana card) अॅडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे. कार्ड नसल्यास साहाय्य करता येणार नाही. अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (PMC Assistant Health officer) यांनी दिली. (PMC Shahari Garib Yojana)
शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजना ही पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पिवळे रेशनकार्डधारक, ग.व.नि सेवाशुल्क धारक व केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणाऱ्या गरीब कुटुंबियासाठी दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत लागू करण्यात येते. तथापि ही सवलत फक्त जे नागरीक आरोग्य विमा योजनेचे सभासद होतील त्यांच्यापुरतीच लागू राहील. तसेच हि योजना फक्त जनरल वॉर्डसाठी लागू आहे. सेमी-प्रायव्हेट, प्रायव्हेट व डिलक्स रूम घेणाऱ्या रुग्णाला या योजनेचा फायदा मिळणार नाही. (PMC Health Schemes)
शहरी गरीब वैद्यकीय योजनेअंतर्गत पॅनेलवरील प्रायव्हेट हॉस्पिटल मधील अंर्तरुग्ण विभागातील वैद्यकीय उपचारांसाठी सी.जी.एस.एस. मान्य दराने ५०% किंवा १००% हमीपत्रांतर्गत एका वर्षासाठी एका कुटुंबाला जास्तीत जास्त एक लाख किंवा दोन लाख (किडनी, हृद्यरोग व कॅन्सर) या कमाल मर्यादेपर्यंत खर्च करण्यात येतो. या मर्यादेपेक्षा जास्त होणारा खर्च सबंधित रुग्णाने भरणे आवश्यक आहे. (PMC Pune Health Department)

योजनेचे सभासदत्व घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

१) मनपा झोपडपट्टीत राहत असल्याचे ग.व.नि. विभागाचे चालू आर्थिक वर्षाचे सेवा शुल्क भरलेली पावती किंवा दारिद्र्य रेषेखालील असलेले पिवळे रेशनकार्ड पुरावा व वरील व्यतिरिक्त पुणे मनपाच्या कार्यक्षेत्रात राहत- असलेल्या केशरी रेशनकार्डधारक ज्यांचे वार्षिक उत्पन्न र.रु. एक लाखपर्यंत असलेला मा. तहसीलदार, पुणे यांचा दाखला.
२) पुणे मनपा कार्यक्षेत्रातील पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
३) आपत्यांचे आधार कार्ड (वय वर्ष २५ खालील)
४) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे आधारकार्ड (पुणे मनपा कार्यक्षेत्रातील)
५) कुटुंबातील पात्र सर्व सभासदांचे दोन फोटो (आयकार्ड साईझ)
६) सदर योजनेची नोंदणी फी रु. १००/- वार्षिक शुल्क रु. १००/- अशी एकूण रक्कम र.रु.२००/- शुल्क आकारण्यात येत आहे.
शहरी गरीब योजना राबविताना पारदर्शकता येण्यासाठी माहे सप्टेंबर २०२२ पासून संगणक प्रणाली राबवण्यात येत आहे. बरेचसे रुग्ण हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सदर योजनेचे कार्ड काढून रुग्णालयात दाखल झाल्यापासूनचे लाभ मिळण्याची मागणी करीत आहेत. सन २०२३ – २०२४ च्या आर्थिक वर्षापासून प्रत्येक आर्थिक वर्षात शहरी गरीब वैद्यकीय सहाय्य योजनेच्या नियम व अटीशूर्तीनुसार पुणे मनपा कार्यक्षेत्रातील नागरिकांनी पॅनेलवरील समाविष्ट असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट पेशंटसाठी हमीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्याकरीता शहरी गरीब योजनेच्या धोरणानुसार सदर योजनेचे सभासद कार्ड अॅडमिशन पूर्वी तयार केलेले असणे पेशंटला अनिवार्य आहे. तसेच सभासदत्वाच्या दिनांकापासून वैद्यकीय उपचाराच्या बिलांची प्रतीपूर्ती अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या नियमानुसार पुणे मनपा कडून देय राहील. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | PMC Shahari Garib Yojana | If you want the benefit of Urban Poor Medical Scheme of Pune Municipal Corporation, know this information