Ring Road | Pune| रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार – मंत्री शंभूराज देसाई

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार – मंत्री शंभूराज देसाई

नागपूर | “पुणे जिल्ह्यातील (pune district) प्रस्तावित रिंग रोडचे (Ring Road) काम प्रगतीपथावर असून भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. यासाठी निधीची तरतूद केली असून या प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण करण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Minister Shambhuraj Desai) यांनी सांगितले

संपूर्ण ग्रामीण भागाला आवश्यक असा हा प्रकल्प आहे. पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोड पूर्व व पश्चिम या दोन विभागांत आहे. याबाबत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.पश्चिम भागातील रिंग रोड प्रक्रिया फेब्रुवारी 2023 मध्ये निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर लवकरच सुरू केला जाईल.यासाठी मोबदला दुप्पट केला आहे. या रिंग रोडचे काम 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार असून, हे काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित रिंग रोडबाबत सदस्य ॲड. राहुल कुल यांनी अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. यावर उत्तर देताना मंत्री श्री. देसाई बोलत होते

MLA Sunil Tingre | पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन | आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

पुण्यातील तीनपट कराबाबत लोकहिताचा निर्णय घेणार | उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

| आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थित केला होता मुद्दा

पुणे शहरातील अनधिकृत बांधकाम असणाऱ्या मिळकतीला आकारण्यात येणारी तीन पट रक्कम रद्द करावी अशी मागणी, राष्ट्रवादीचे वडगावशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात केली. त्यांनी केलेल्या मागणीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत माहिती घेऊन लोक हिताचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. (Illegal construction three times tax)

पुणे शहर आणि समाविष्ट गावात नागरिकांकडून अनधिकृत बांधकामे केली जातात. सरकारच्या नियमानुसार अशा मिळकती कडून तीन पट कर घेतला जातो. मात्र याबाबत नागरिकाकडून तक्रारी आल्या आहेत. दरम्यान राज्य सरकार ने पिंपरी चिंचवड मधील हा कर रद्द केला आहे. त्याच धर्तीवर पुण्यातही तीन पट कर रद्द केला जावा. अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केली. त्यासाठी गुंठेवारीचा नियम बदलण्याची मागणी देखील टिंगरे यांनी केली. तसेच ४०% सवलत कायम ठेवण्याची मागणी देखील टिंगरे यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याबाबत महापालिकेकडून निश्चित माहित घेऊ आणि लोकहिताचा निर्णय घेऊ, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. यामुळे पुणे आणि समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (MLA Sunil Tingre)

 

PMC Budget 2023-24 | अपुऱ्या निधीअभावी मागील वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण नाही झाली तर …!  | महापालिका आयुक्तांचा उपायुक्त, खातेप्रमुखांना इशारा 

Categories
Breaking News PMC पुणे

अपुऱ्या निधीअभावी मागील वर्षातील अपूर्ण कामे पूर्ण नाही झाली तर …! 

| महापालिका आयुक्तांचा उपायुक्त, खातेप्रमुखांना इशारा 

पुणे | मागील आर्थिक वर्षाच्या अपुऱ्या कामांच्या खर्चाकरिता (spill over) आवश्यक तरतुद मागुन घेतलेली नसल्यास सन २०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकात (PMC Budget 2023-24) अतिरिक्त आर्थिक दायित्व निर्माण झाल्यास त्यास संबंधित खातेप्रमुख / सह महापालिका आयुक्त/उप आयुक्त / महापालिका सहायक आयुक्त यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा महापालिका आयुक्तांनी (PMC commissioner) दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी एक नियमावली ठरवून दिली आहे. (Pune Municipal corporation)

 

सन २०२३-२०२४ चे अंदाजपत्रक तयार करताना मागील वर्षीच्या अपुऱ्या कामांसाठी आवश्यक तरतूदी करण्याबाबतच्या सूचना केलेल्या असूनसुध्दा असे निर्दशनास आले आहे की अपुऱ्या तरतूदीमुळे पुढील अंदाजपत्रकावर या तरतूदींचे अतिरिक्त दायित्व निर्माण होत आहे. तसेच अनेक तरतुदींची वर्गीकरणे होत आहेत याचा परिणाम चालू आर्थिक वर्षाच्या विकास कामांवर होत आहे. तरी सन २०२३-२०२४ चे अदांजपत्रक तयार करताना वरीलप्रमाणे कामे निधी अभावी अपूर्ण राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. त्यादृष्टीने खातेप्रमुखांनी अंदाजपत्रक सादर करताना दक्षता घ्यावयाची आहे.

सन २०२३-२०२४ साठी प्रत्येक विभागाचा जमा व खर्च अंदाज (Plan व Non plan सह) व फलनिष्पत्ती अर्थसंकल्प तयार करण्या संदर्भात पुढील तपशीलवार सुचना देण्यात येत आहेत.
(अ) सन २०२३-२०२४ या वर्षासाठी जमा व खर्च अंदाज तयार करण्याबाबत सूचना :
सन २०२२-२०२३ मधील कामे
1. सर्व खातेप्रमुख व महापालिका सहायक आयुक्त यांनी
(committed work) तसेच दि. ३१/३/२०२२ पूर्वी दिलेल्या सर्व कार्यादेशानुसार अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी सन २०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकात प्राधान्याने तरतूदी नमूद करण्यात याव्यात. त्यानुसार कार्यादेश देण्याबाबतचे योग्य ते नियोजन तयार करावे.

2. सर्व खातेप्रमुखांनी व महापालिका सहायक आयुक्त यांनी आर्थिक तरतूदी सुचविताना महानगरपालिकेच्या प्रमुख कर्तव्यपूर्तीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६३ नुसार करावयाच्या अत्यावश्यक कामांसाठी राखीव व स्वतंत्र तरतूद नमूद करण्यात यावी.
3. महापालिका सहायक आयुक्त यांनी  प्रभाग समितीची मान्यता घेवून तसेच संबंधित मुख्य खात्यांशी समन्वय साधून अंदाजपत्रकीय तरतूदी अंतिम कराव्यात. तसेच नागरिकांच्या सहभागातंर्गत आलेल्या कामांचा सुध्दा अंतर्भाव यामध्ये करण्यात यावा मात्र अशा कामासाठी प्रत्येक प्रभागातील एका विभागासाठी एकूण कमाल तरतूद मर्यादा रु. २५ लाख राहील.
4. नव्याने करावयाची अत्यावश्यक कामे यासाठी पूर्वगणनपत्रक तयार करावे. अशा कामांवर दुरुस्तीचा खर्च पुढील तीन वर्षे येणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी. तसेच या कामांमुळे पर्यावरणावर होणा-या परिणामांची माहिती नमूद करावी. अंदाजपत्रकात कामे सुचविताना जागा मनपाच्या ताब्यात आहे/मनपाच्या मालकीची आहे, याबाबत खातरजमा करुनच कामे सुचविण्यात यावी.
5. ज्या प्रकल्पीय कामांसाठी खात्याने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ७२ (ब) प्रमाणे मुख्य सभेची मान्यता घेतलेली आहे त्याचा पूर्ण विचार करुन खात्याने सन २०२३-२०२४ मधील
अंदाजपत्रकात सदर कामासाठी आवश्यक असलेली तरतूद करावी.
6. सन २०२२-२०२३ मधील महसुली व भांडवली कामांसाठीची तरतूद दिनांक ३१/०३/२०२३ रोजी व्यपगत होणार असल्यामुळे मुख्य खात्यानी त्यांच्या अखत्यारीतील जी कामे अपूर्ण राहणार आहेत (committed work) व त्यासाठी स्पिल ओव्हर तरतूदीची आवश्यकता आहे अशा तरतूदीची मागणी सन २०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकात न चुकता प्राधान्याने करावी. जेणेकरून अशी अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध राहील. याबाबतची पूर्ण जबाबदारी खाते प्रमुख/सह महापालिका आयुक्त/ उप आयुक्त/महापालिका सहायक आयुक्त यांच्यावर राहील. अशाप्रकारे मागील आर्थिक वर्षाच्या अपुऱ्या कामांच्या खर्चाकरिता आवश्यक तरतुद मागुन घेतलेली नसल्यास सन २०२३-२०२४ च्या अंदाजपत्रकात अतिरिक्त आर्थिक दायित्व निर्माण झाल्यास त्यास संबंधित खातेप्रमुख / सहमहापालिका आयुक्त/उप आयुक्त / महापालिका सहायक आयुक्त यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल.
7. माहिती व तंत्रज्ञान विभाग, सेवकवर्ग विभाग व संबंधीत खाते यांनी एकत्रितरीत्या चर्चा करुन खात्याच्या शेडयुल प्रमाणे व नव्याने भरती झालेल्या सेवकांच्या वेतनाचा समावेश करून सर्व खात्यांची वेतनासंबंधीची अत्यावश्यक माहिती समाविष्ठ करुन माहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर च्या वेतन
बिलाबरोबर जोडून पाठविण्यात यावी. यासाठी यापूर्वी पगारबिलामध्ये अर्थशिर्षकासंदर्भात दुरुस्त्या केल्या आहेत या बाबींचा विचार करण्यात यावा. अशाप्रकारे महानगरपालिकेच्या सेवकांच्या वेतनाच्या तरतूदीचा
खातेनिहाय अंदाजपत्रकीय तरतूद आपल्याकडून अंतिम करुन त्याची माहिती एकत्रितरित्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मुख्य लेखा व वित्त विभागाकडे त्वरीत पाठविण्यात यावी. जेणेकरुन सेवकांच्या
वेतनाच्या योग्य अशा रकमा त्या खात्याच्या अंदाजपत्रकीय तरतूदींनुसार उपलब्ध करुन देता येतील.

Feedback about the city | केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

Categories
Breaking News social पुणे लाइफस्टाइल

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

पुणे|केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहराबद्दल आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स-२०२२’ अंतर्गत हे नागरिक जाणीव सर्वेक्षण (सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे- सीपीएस) २३ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असून पुणे शहरातील नागरिकांनी ऑनलाईनरित्या या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ (अर्बन आऊटकम फ्रेमवर्क-युओएफ २०२२) चा शुभारंभ केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने २०१८ मध्ये १११ शहरांचा समावेश असणारा पहिला ‘राहणीमान सुलभता निर्देशांक’ जारी केला. त्यानंतर पाठोपाठ २०१९ मध्ये राहणीमान सुलभता निर्देशांक २.० आणि महानगरपालिका कामगिरीचा निर्देशांक जाहीर झाले. शहरांना परिणामावर आधारित नियोजन आणि शहरी व्यवस्थापनाकडे वाटचाल करण्यास मदत करणारा उपक्रम म्हणून याकडे पाहिले जाते.

शहरी परिणाम फ्रेमवर्क २०२२ चा उद्देश हा विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर माहिती उपलब्ध करून देऊन शाश्वत विकास आणि सामाजिक-आर्थिक प्रगती साध्य करण्याची प्रक्रिया सुलभ करणे हा आहे. जनसांख्यिकी, आर्थिक, शिक्षण, ऊर्जा, वित्त, पर्यावरण, प्रशासन आणि माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, आरोग्य, गृहनिर्माण, गतिशीलता, नियोजन, सुरक्षितता आणि सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी व सार्वजनिक स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांमध्ये संपूर्ण शहरातील परिणामांवर आधारित पारदर्शक व सर्वसमावेशक माहितीसंग्रह विकसित करण्याचा हा उपक्रम आहे.

या फ्रेमवर्कमध्ये विविध क्षेत्रांमधील एकूण ४५० पेक्षा अधिक निर्देशांकांचा समावेश असून १४ क्षेत्रांमधील माहिती सुव्यवस्थित केली जाईल. माहिती संकलनावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाईल जेणेकरुन विस्कळीत माहितीचे विश्लेषण केले जाऊ शकते. तसेच संकलित माहितीसंग्रह विषय तज्ज्ञांद्वारे मानांकनासाठी वापरला जाऊ शकेल.

सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे अंतर्गत https://eol2022.org/CitizenFeedback या लिंकवर अधिकाधिक नागरिकांनी आपला शहराबद्दलचा अभिप्राय नोंदवावा तसेच क्यूआर कोडचाही उपयोग करावा, असे आवाहन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी केले आहे.

water closure | गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार | शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Categories
Breaking News PMC social पुणे

water closure |  गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार

| शुक्रवारी कमी दाबाने पाणी

पुणे | गुरूवारी  वारजे जलकेंद्र व अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, वारजे GSR टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एच.एल.आर टाकी परीसर तसेच नवीन, जुने वारजे जलकेंद्र, गणपती माथा पंपींग,कोंढवे -धावडे जलकेंद्र व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/ पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी क्लोजरची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने या कालावधीमध्ये मनपाची विविध देखभाल दुरूस्तीची कामे करण्याचे नियोजन असल्याने उपरोक्त
ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा
पाणीपुरवठा या दिवशी बंद ठेवावा लागणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक ०२/१२/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन मनपा पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चांदणी चौक (चौकोनी) टाकी परिसर :-
पाषाण साठवण टाकी, भूगावरोडपरिसर, कोकाटे वस्ती, सेंटीन हिल सोसायटी, मधुवन सोसायटी, संपूर्ण बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी व चढावरील भाग, चिंतामणी सोसायटी, गुरुगणेश नगर, सुरज नगर, सागर कॉलनी, भारतीन गर, बावधन परिसर, सारथीशिल्प सोसायटी, पूजा पार्क, शांतीबन सोसायटी परिसर, डुक्कर खिंडीकडील भाग, शास्त्रीनगर, न्यू लक्ष्मीनगर, परमहंस नगर, पूर्ण पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, निम्हणमळा, लम्हाणतांडा, मोहन नगर, सुस रोड, इत्यादी.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील गांधी भवन टाकी परिसर :-
 कुंभारवाडी टाकी परिसर, काकडे
सिटी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, रेणुका नगर, हिल व्यू गार्डन सिटी, पाप्युलर कॉलनी, वारजे माळवाडी
परिसर, गोकुळनगर, अतुलनगर, बी.एस.यु.पी स्कीम, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य
कॉलेज परिसर, कुमार परिसर, धनंजय सोसायटी, रोहन गार्डन परिसर, कोथरूड वॉर्ड ऑफिस परिसर, अथर्व
वेद, स्नेहल अमित पार्क, कांचन गंगा, अलक नंदा, शिवप्रभा मंत्री पार्क-१, आरोह सोसायटी, श्रावण धारा
झोपडपट्टी, सहजानंद (पार्ट), शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डीझेल कंपनी, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, मृणमयी प्रीमारोज आर्चिड लेन ७ व ९. मुंबई पुणे बायपास रोड दोन्ही बाजू. शेरावती सोसायटी, सिद्धकला सोसायटी, श्रीराम सोसायटी, गिरीष सोसायटी, तिरुपती नगर, कुलकर्णी हॉस्पिटल परिसर, हिंगणे होम कॉलनी, मिलेनियमस्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, राम नगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील पॅनकार्ड क्लब GSR टाकी परिसर :-  बाणेर, बालेवाडी, बार
गावठाण, चाकणकर मळा, पॅनकार्ड क्लबरोड, पल्लोड फार्म, शिंदे पारखे वस्ती, विधाते वस्ती, मेडिपॉईंट रोड,
विजयनगर, आंबेडकरन गर, दत्त नगर, इ.
वारजे जलकेंद्र अखत्यारीतील GSR टाकी परिसर :-
कर्वे नगर गावठाण परिसर, तपोधाम
सोसायटी,शाहू कॉलनी गल्ली क्र. १ ते ११, इंगळेनगर, वारजे जकात नाका परिसर, कर्वेनगर कॅनॉल गल्ली क्र.
१ ते १०
एस.एन.डी.टी. (एच.एल. आर.) :-
गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, वडार वस्ती, स्टेट बैंक कॉलनी, श्रमिक वसाहत, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजस नगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदा नगर, जयभवानी नगर, रामबाग कॉलनी, हनुमान नगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, वडारवाडी, पोलीस लाईन, संगमवाडी.
कोंढवे -धावडे जलकेंद्रः-
वारजे हाय-वे परिसर, रामनगर, उत्तम नगर, शिवणे, कोंढवे धावडे, न्यु कोपरे.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :-
मुळा रोड, खडकी कॅन्टॉनमेंट संपूर्ण परिसर,MES,
HE Factory, हरीगंगा सोसायटी इत्यादी.

Metro | Smart City | SRA | गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा |मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

Categories
Breaking News PMC Political social पुणे

गरवारे महाविद्यालय ते न्यायालय मेट्रो मार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा

|मेट्रो, स्मार्ट सिटी, एसआरएचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पुणे | शहरातील मेट्रोच्या कामाला गती देऊन गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रोमार्गाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मार्च अखेरपर्यंत शहरात सुरू असलेल्या ३३ किलोमीटरच्या मेट्रो लाईनचे काम पूर्ण होईल असे नियोजन करण्यात यावे. महामेट्रोला कामाची गती वाढविण्यासाठी शासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालाला शासनाची मंजूरी मिळावी यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचा आढावा
पालकमंत्री पाटील यांनी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला. यावेळी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, अपर जिल्हाधिकारी वैशाली इंदानी उपस्थित होते. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. श्री.गटणे यांनी शहरातील प्रकल्पांच्या सद्यस्थितीविषयी यावेळी माहिती दिली.

स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांचाही आढावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कार्पोरेशनच्या प्रकल्पांचाही आढावा घेतला. यावेळी कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर, मुख्य ज्ञान अधिकारी दिनेश वीरकर, मुख्य अभियंता अरुण गोडबोले, कंपनी सचिव स्वानंद शेडे उपस्थित होते.

स्मार्ट सिटीचे प्रकल्प नागरिकांच्या जीवनशैलीत अधिक चांगले बदल होण्याच्यादृष्टीने उपयुक्त असून या थीमबेस्ड प्रकल्पांना अधिक गती द्यावी, असे निर्देश यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

यावेळी श्री. कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. कॉर्पोरेशनच्या प्रकल्पांची सद्यस्थिती, निधीची आवश्यकता आदींविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

Canal Advisory Committee meeting | कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

Categories
Breaking News PMC Political social पुणे महाराष्ट्र

कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा

पुणे | खडकवासला प्रकल्पाची रबी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक २१ नोव्हेंबर ला होणार आहे. यामध्ये पाण्याच्या योग्य वापराबाबत चर्चा अपेक्षित आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सिंचन प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. माजी पालकमंत्री अजित पवार हे तत्काळ निर्णय घेण्याबाबत प्रसिद्ध होते. त्यामुळे बैठकीत वादळी चर्चा होत असत. भाजपचा अर्थात चंद्रकांत पाटील यांचा तसाच प्रयत्न असणार आहे.

नुकतेच पाटबंधारे विभागाने महापालिकेला दोन महिन्याचे १११ कोटींचे बिल दिले आहे. या वाढीव बिलावर आणि पाणी वापरावर या बैठकीत चर्चा होईल. कारण पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांचा वाद जुना आहे. दोन्ही संस्था आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे या बैठकीत कशी चर्चा होईल. याकडे लक्ष लागले आहे. शिवाय सिंचनासाठी पाणी कसे उपलब्ध करून द्यायचे याबाबत देखील बैठकीत चर्चा होईल.

Prasanna Jagtap | विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार? | माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल

Categories
Breaking News PMC पुणे

विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार?

| माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल

सिंहगड रोड परिसरातील विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवर गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील विविध वयोगटातील नागरिक तिन्ही ऋतूत व्यायामासाठी येत असतात. त्या ट्रॅकवर गेले दोन ते अडीच वर्षांत अतिशय मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली दिसत आहेत. याकडे लक्ष देऊन ही झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार आहेत. असा सवाल माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी केला आहे.

जगताप म्हणाले, कारण वेळोवेळी सांगून देखील उद्यान विभाग किंवा आरोग्य विभागाने या झाडाझुडपांची छाटणी करून हा ट्रॅकची स्वच्छता केलेली नाही.

तरी या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर याची स्वच्छता करून हा ट्रॅक परिसरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

यासंदर्भात ॲड.प्रसन्न जगताप यांनी वेळोवेळी वॉर्ड ऑफिसर यांना भेटून त्यांना सांगितले आहे तरी सुद्धा अजून पर्यंत त्यावर कार्यवाही झालेली नाही.

मुंबई सारख्या ठिकाणी गोवर सारख्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे अनेक बालकांचे मृत्यू झाले आहेत. तसेच डेंग्यूच्या डासांनी थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत आपल्या भागातील नागरिकांना देखील त्याचा सामना करावा लागू शकतो. या ट्रॅकवरील काटेरी झुडपांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.

आज प्रसन्न जगताप यांनी प्रत्यक्ष या ट्रॅकवर जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा त्याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी त्यांची मागणी आहे. तसेच याठिकाणी असलेले दिवे देखील लवकरात लवकर बदलण्यात यावेत अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

PMP CMD | महापालिकेचा बावधन येथील बंगला पीएमपी सीएमडीना भाडे तत्वावर दिला जाणार 

Categories
Breaking News PMC पुणे

महापालिकेचा बावधन येथील बंगला पीएमपी सीएमडीना भाडे तत्वावर दिला जाणार

| शहर सुधारणा समितीसमोर प्रस्ताव

पुणे : पीएमपीच्या सीएमडी पदी नुकतीच ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती राज्य सरकार कडून करण्यात आली आहे. कायद्यानुसार पीएमपी सीएमडीना निवासस्थानाची सुविधा पुरविण्यात येते. त्यानुसार बकोरिया यांनी महापालिकेच्या ताब्यातील बावधन येथील बंगला भाडे तत्वावर देण्याची मागणी केली आहे.  महापालिका प्रशासनाने देखील याबाबत सकारात्मक भूमिका दाखवली असून याबाबतचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती समोर ठेवला आहे. यावर समितीच्या पुढील बैठकीत चर्चा होईल.

समितीच्या पत्रानुसार  पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी  १४/१०/२०२२ रोजीच्या शासन आदेशानुसार पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक म्हणून नेमणूक केली असल्याचे कळवून त्यांचे निवास स्थानासाठी विषयांकित ठिकाणचा पुणे महानगरपालिकेच्या मालकीचा सद्यस्थितीत रिक्त असणारा बंगला उपलब्ध करून देणेविषयी विनंती केली आहे.  पत्रात त्यांनी मान्य दरानुसार भाडे तत्वावर निवासस्थानाकरीता मिळावा असे नमूद केले आहे. पुणे पेठ बावधन स.नं.२०/३/७+३/८ येथील अॅमेनिटीस्पेसने आरक्षित सुमारे १४९६.१७ चौ.मी क्षेत्राची जागा त्यामधील तळ मजला+पहिला मजला बंगल्याचे बांधकामासहित दि. २५/०९/२०१३ रोजी पुणे महापालिकेच्या ताब्यात आलेला आहे.

मिळकत वाटप नियमावली सन २००८ मधील तरतूदीनुसार पुणे मनपाची मिळकत जास्तीत जास्त १२ महिने पेक्षा कमी कालावधीकरीता भाडे तत्वावर देणेचे अधिकार  महापालिका आयुक्त यांना आहेत. व त्यापुढील कालावधीसाठी मुख्य सभेची मान्यता असणे आवश्यक आहे. सदर बंगला भाड्याने मिळण्याकरीता अद्याप कोणतीही मागणी या विभागाकडे प्राप्त झालेली नाही. सदर बंगल्याचा वापर यापूर्वी अति.महापालिका आयुक्त यांचेमार्फत सुरू होता. सद्यस्थितीत सदर बंगला हा रिकामा आहे. त्यामुळे अ व व्यवस्थापकिय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. यांनी मागणी केल्यानुसार विषयांकित सुविधा बंगला निवास स्थानासाठी देणे शक्य आहे व त्यामुळे पुणे मनपास आर्थिक उत्पन्न सुध्दा प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा बंगला दिला जाणार आहे.
प्रस्तावात पुढे म्हटले आहे कि संबंधित बंगल्याची दुरुस्ती आणि साफसफाईचा खर्च पीएमपीला करावा लागणार आहे. शिवाय मान्य दरानुसार भाडे द्यावे लागणार आहे. बकोरिया पदावर असेपर्यंत हा बंगला त्यांना निवासासाठी दिला जाईल.

MLA Sunil Tingre | Porwal road | अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

अखेर पोरवाल रस्त्यांच्या पर्यायी रस्त्यांचा मार्ग मोक़ळा | आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश

|  मार्थोपोलिस शाळेची जागा देण्यास मंजुरी

पुणे | वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पोरवाल रस्त्याला आखण्यात आलेल्या समातंर 24 मीटर रुंदीच्या नविन पर्यायी रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या रस्त्यासाठी मार्थोपोलिस शाळेने जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.

धानोरी-लोहगाव येथील पोरवाल रस्ता परिसरात  गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्प उभे राहिले आहेत. या भागाला जाणारा पोरवाल रस्ता हा एकमेव रस्ता असल्याने वाहतुक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली होती. त्यावर मार्ग काढण्यासाठी स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी पोरवाल रस्त्याला समांतर असा कलम 205 अंतर्गत पर्यायी सुधारित रस्त्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला होता. मात्र, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी मार्च महिन्यात उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धानोरी स. न. 12, 14, 15 व 17 मधून 24 मीटर रुंदीचा रस्ता कलम 205 अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा व मुख्यसभेत तातडीने मंजुर करण्यात आला होता. मात्र, पर्यायी रस्त्यांवर असलेल्या मार्थोपोलिस या शाळेच्या परिसरातील जागा मिळत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. दरम्यान गत महिन्यात आमदार टिंगरे यांनी या शाळेचे पदाधिकारी व आयुक्त यांची एकत्रित बैठक घेऊन जागा हस्तांतरीत करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शाळेला पत्र पाठविले होते. त्यावर शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असलेली जागा देण्यास बुधवारी मंजुरी दिली असल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे आता या नविन रस्त्यांच्या कामाला तात्काळ सुरवात होऊन पोरवाल रस्त्यांच्या वाहतुक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
—————————

या रस्त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मी विधानसभा निवडणूकीत दिले होते. त्यानुसार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अखेर अनेक अडथळ्यांची शर्यंत पार केल्यानंतर रस्त्यांचा मार्ग सुकर होत असून माझीही आश्वासनपुर्ती होत आहे.
सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.