Tag: Mohan joshi
Pune Congress Agitation | वॉशिंग मशीन, वाशिंग पावडर ठेऊन काँग्रेसचे भाजपाच्या विरोधात तीव्र आंदोलन
Pune Congress Agitation |पुणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर (BJP Pune Office) काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुमारे अडीच तास तीव्र अभिनव असे आंदोलन (INC Pune Agitation) करण्यात आले. भाजपा वॉशिंग मशीन, मोदी वॉशिंग पावडर अशा विडंबन माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचारी चेहरा उघड करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), माजी राज्यमंत्री रमेश बागवे, गोपाळ दादा तिवारी, पूजा आनंद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष वॉशिंग मशीन ठेवून त्यावर भाजपा वॉशिंग मशीन असे लिहिले होते. तसेच सोबत मोदी वॉशिंग पावडरही ठेवण्यात आली होती. (Pune Congress Agitation)
याप्रसंगी विविध घोषणांचे फलक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते – ‘इडी, सीबीआय, इनकम टॅसचे डाग धुवून मिळतील भाजपा वॉशिंग मशीन‘ ‘भारत मे पाप धोने के दो तरीके हैं… १) गंगा में स्नान २) BJP में छलांग…‘ ‘ मोदी वॉशिंग पावडर‘ अशा अनेक अभिनव घोषणांचे फलक हाती घेऊन कार्यकर्ते जोरदार घोषणा देत होते.
याप्रसंगी प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी (Congress Leader Mohan Joshi) यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, देशातील महागाई, बेकारी आणि भ्रष्टाचार यामुळे पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणूकांमध्ये भाजपला बहुमत मिळणार नाही व मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही. हे लक्षात आल्यामुळेच इडी, सीबीआय आदिंचा वापर करुन भाजप छोटे पक्ष फोडत आहे आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणार्यांना भाजपमध्ये घेत आहे. ही जनतेची आणि लोकशाहीची क्रुर थट्टा आहे. महाराष्ट्रात भाजपने केलेला फोडाफोडीचा तमाशा जनता बघत असून येणार्या प्रत्येक निवडणुकीत जनता भाजपला पराभूत करेल असे ते म्हणाले.
या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता. त्यामध्ये अविनाश बागवे, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, रफिक शेख, रमेश अय्यर, शाणी नौशाद, रजनी ताई त्रिभुवन, राजेंद्र शिरसाठ, सुनील मलके, अनिल सोंडकर, नुरुद्दीन सोमजी, मंजूर शेख, प्रशांत सुरसे, भूषण रानबरे, अजय पाटील, चैतन्य पुरंदरे, भरत सुराणा, मारुती माने, प्रवीण करपे, रमेश सकट, शोएब इनामदार, सुनील घाडगे, प्रदीप परदेशी, अजित जाधव, चेतन अग्रवाल, प्रथमेश आबनावे, रोहन सुरवसे, ओंकार मोरे, विशाल मलके, आशिष व्यवहारे, सुरेश कांबळे, गौरव बोराडे, नीलेश बोराटे, शाबीरखान आयुब पठाण, किशोर मारणे, संकेत गलांडे, साजिद शेख, प्रा. वाल्मिकी जगताप, सोमेश्वर बालगुडे, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अंजली सोलापुरे, सुविधा त्रिभुवन, डॉ. गिरीजा शिंदे, सोनिया ओव्हाळ, आस्मा शेख, संगीता थोरात, ज्योती परदेशी, रेश्मा शिलेगावकर, कांता डोने, कविता गायकवाड, पपीता सोनवणे, मंदाकिनी नलावडे, शिवाजी सोनार, शिवाजी भोईटे, जीवन चाकणकर, विनोद रणपिसे, अनिल पवार, राजू शेख, विजय वारभुवन, ऋषिकेश बालगुडे, राजू नाणेकर, परवेज तांबोळी, गणेश भंडारी, जयकुमार ठोंबरे, निलेश मोटा, दीपक ओव्हळ, अॅनड. राजेंद्र काळबेर, फैय्याज शेख, असलम बागवान, नूर शेख, गणेश काकडे, रमेश राऊत, राजेश जाधव, डॉ. साठे, प्रसन्न मोरे, अनुप बेगी, अक्षय सोनवणे, गणेश साळुंखे, राजू देवकर, मंगेश थोरवे, गोरख पळसकर, साहिल राऊत, बंडू शेंडगे, विनायक तामकर, नरेश नलावडे, धनंजय भिलारे, अविनाश अडसूळ, सचिन बहिरट, बाबासाहेब गुंजाळ, निलेश धुमाळ, उमेश काची, सागर कांबळे, नितीन जैन, रफिक आलमेल, रनजीत गायकवाड, सुरेश नांगरे, सादिक लुकडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.
News Title |Pune Congress Agitation | Intense agitation of Congress against BJP by keeping washing machine, washing powder
Education News | शालेय फी नियंत्रणासाठी प्रभावी अंमलबजावणीची मागणी
| विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबत आमदार रवींद्र धंगेकर व ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी घेतली शिक्षण उपसंचालकांची भेट
Pune Smart City | पुणे स्मार्ट सिटी बद्दल श्वेतपत्रिका काढा | मोहन जोशी
| भाजपाची स्मार्ट सिटी योजना म्हणजे ‘निवडणूक जुमला’
MLA Ravindra Dhangekar | गणेशोत्सवासाठी टिळक पुतळा मेट्रोचे काम १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा | आमदार रवींद्र धंगेकर
MLA Ravindra Dhangekar | गणेशोत्सव, दहीहंडी, श्रावण महिना इ. सणांचे (Festival) दिवस जवळ आले आहेत. यामुळे मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा परिसरातील मेट्रोचे (Pune Metro) काम येत्या १ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावे असे आवाहन आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) आणि प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे व अन्य अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत केले. (MLA Ravindra Dhangekar)
पुणे शहरातील मानाचे गणपती यांचे प्रमुख, पुणे मेट्रोचे अधिकारी यांच्या बरोबर टिळक पुतळा ते मंडई परिसरामध्ये पहाणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेमध्ये गणेश मंडल, छोटे व्यापारी व घटकांच्या अडचणीवर सारविस्तार चर्चा झाली. त्यावर उपाय योजना काय असाव्यात, काय कराव्यात याबद्दल सुद्धा कालबद्ध वेळापत्रक निश्चित करण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या अॅड. रुपाली ठोंबरे पाटील, बाळासाहेब मारणे, प्रवीण परदेशी, महेश सूर्यवंशी, भोळा वांजळे, विकास पवार, प्रसाद कुलकर्णी, सुरेश कांबळे आदि या भेटी प्रसंगी उपस्थित होते. (Pune Ganesh utsav)
News Title |MLA Ravindra Dhangekar | Complete the work of Tilak Putala Metro by 1st August for Ganeshotsav MLA Ravindra Dhangekar
PMC Teachers Agitation Update | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांच्या आमरण उपोषणाला काँग्रेस, भाजपचा पाठिंबा
PMC Teachers Agitation Update | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत. या आंदोलनाला काँग्रेस आणि भाजपने पाठिंबा दिला आहे. तसेच महापालिका प्रशासनासोबत चर्चा करून हा प्रश्न सोडवण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी केली आहे. (PMC Teachers Agitation Update)
काँग्रेस कडून सकाळी आमदार रविंद्र धंगेकर(MLA Ravindra Dhangekar), मोहन जोशी (Mohan Joshi), अभय छाजेड (Abhay Chajed) या नेत्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांची समस्या जाणून घेतली. तसेच प्रशासनासोबत चर्चा करून शिक्षकांना न्याय देण्याची मागणी केली. तर दुपारी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (BJP City President Jagdish mulik) यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. मुळीक यांनी देखील प्रशासना सोबत चर्चा केली. तसेच याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. (Pune Municipal Corporation)
SRA | PMC Pune | राजेंद्रनगर येथील पूरग्रस्तांच्या प्रलंबित पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी | एसआरए आणि पुणे महापालिकेसोबत झालेल्या बैठकीत निर्णय | मोहन जोशी
SRA | PMC P | पुण्याच्या राजेंद्रनगर (Rajendra Nagar) १००४/५ येथील अगोदर पासून पात्र असलेल्या २७ कुटुंबांचे दीर्घकाळ रेंगाळलेले पुनर्वसन त्वरित केले जाईल. त्यासाठी एसआरएच्या (SRA)जवळच्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये त्यांना हलवले जाईल. उर्वरित कुटुंबाची यादी मनपा विभागीय कार्यालय कडून घेऊन पात्रता तपासून त्यांचे देखील पुनर्वसन त्याच परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या एसआरए इमारतीत केले जाईल. असा महत्वपूर्ण निर्णय पुणे महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) झालेल्या बैठकीत घेण्यात आला. (SRA | PMC pune)
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटणे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कॉंग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी (Mohan Joshi), पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे आणि सचिव रेखा कांबळे या बैठकीत सहभागी झाले होते. तेथील स्थानिक रहिवासी देखील या बैठकीत उपस्थित होते. (Slum Rehabilitation Authority)
या संदर्भात मोहन जोशी म्हणाले की, राजेंद्रनगर १००४/५ येथील पुनर्वसन रखडलेल्या कुटुंबांनी या संदर्भात कॉंग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कडे निवेदन दिल्यावर त्यांच्यासह मी पुढाकार घेऊन या बैठकीचे आयोजन केले. या वस्तीचे २००७ ते २०१३ दरम्यान काहीसे पुनर्वसन झाले. परंतु तेव्हा काही कुटुंबांचे पुनर्वसन झाले नाही. नंतर २०१९ मध्ये आंबिल ओढ्याला पूर आला. शासनाने या परिसरातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसन करण्याचा निर्णय जाहीर केला. येथील रहिवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात घरेलु कामगार महिला आहेत. या सर्व कुटुंबांच्या प्रश्नाचा पाठपुरावा पुणे जिल्हा घरकामगार संघटना २०१९ पासून करीत आहे. परंतु पुणे मनपा आणि एसआरए मधील ताळमेळ अभावी त्यांना न्याय मिळत नव्हता. आता हा निर्णय झाल्यामुळे येथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे असे मोहन जोशी म्हणाले. (Pune News)
या पूरग्रस्त नागरिकांना या पूर्वीच न्याय मिळायला हवा होता असे सांगून आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, मनपा आयुक्त विक्रम कुमार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गटणे यांनी या कामी मोठे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. उर्वरित कुटुंबांचे पुनर्वसन निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीतच राहू असे ते म्हणाले. (Pune Municipal Corporation)
News Title |SRA | PMC Pune | The question of pending rehabilitation of flood victims in Rajendranagar is on the way Decision taken in meeting with SRA and Pune Municipal Corporation
Pune Akashwani Centre Update| चुकीच्या निर्णयाला स्थगिती नको, कायमस्वरूपी अधिकारी नेमा | काँग्रेसच्या मागणीला यश | मोहन जोशी
Pune Akashwani Centre Update | पुणे आकाशवाणी केंद्राचे (Pune Akashwani Centre) वृत्त विभाग केंद्र बंद करण्याच्या निर्णयावर तात्पुरती स्थगिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर (Union Minster Anurag Thakur) यांनी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. परंतु पुणेकर जनतेचा असलेला रोष व काँग्रेसने (Congress party) केलेली मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारनी (Central Government) केलेली ही तात्पुरती मलमपट्टी आहे. पुणेकरांना स्थगिती नको निर्णय कायमस्वरूपी रद्द झाला पाहिजे. अशी काँग्रेसची मागणी आहे असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी म्हंटले आहे. (Pune Akashwani Centre Update)
मोहन जोशी पुढे म्हणाले की, यासाठी केवळ सक्षम माहिती अधिकारी नाही असे कारण सांगून हे केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. मात्र हे कारण पुन्हा मिळू नये, त्यासाठी केंद्र सरकारने भारतीय माहिती सेवेतील सक्षम अधिकाऱ्याची येथे नेमणूक करावी म्हणजे पुणे आकाशवाणी केंद्राचे वृत्तसेवा केंद्र बंद होण्याचा प्रसंग पुन्हा उद्भवणार नाही. तसेच पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न कॉंग्रेस पक्षाने मार्गी लागण्यासाठी हाती घेतल्यावर पुणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त पाठींब्या बद्दल पुणेकरांचेही आभार मानतो, असे मोहन जोशी शेवटी म्हणाले. (Pune Akashwani news)
News Title | Pune Akashwani Center Update| Don’t suspend wrong decisions, appoint permanent officers Success to Congress demand Mohan Joshi