PMC Medical College News | मेडिकल कॉलेज प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा | सजग नागरिक मंचाची राज्य सरकारकडे मागणी

Categories
Breaking News Education PMC social पुणे

PMC Medical College News | मेडिकल कॉलेज प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा

| सजग नागरिक मंचाची राज्य सरकारकडे मागणी

PMC Medical College News | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) अटलबिहारी वाजपेयी महाविद्यालयातील (Atal Bihari Vajpeyi Medical College) वैद्यकीय प्रवेश घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी सजग नागरिक मंचाकडून (Sajag Nagrik Manch) राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. (PMC Medical College News)
याबाबत मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी सांगितले कि, पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयातील डीन ना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले. या महाविद्यालयातील प्रथम वर्ष प्रवेशातील संस्था स्तरावर दिल्या जाणाऱ्या १५ जागांवरील प्रवेशादरम्यान पालकांकडून फी व्यतिरिक्त लाखो रुपये लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई झाली. या महाविद्यालयावर एक ट्रस्टी बोर्ड आहे ज्यावर पुणे महापालिका आयुक्त, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त तसेच आरोग्य प्रमुख आणि डीन असे चौघेजण आहेत. डीन ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हाथ पकडले आहे.  त्यामुळे या प्रकारात उर्वरीत तीन सदस्य संगनमताने सामील आहेत का याची तसेच या वर्षीच्या आणि गेल्या वर्षीच्या संस्था स्तरावरील १५ जागांवरील प्रवेश प्रक्रियेची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. तसेच या भ्रष्टाचाराचं मूळ असलेल्या संस्था स्तरीय १५ जागांचा प्रवेश बंद करुन शासकीय मेडीकल महाविद्यालयातील प्रवेशा प्रमाणे १००% प्रवेश पूर्णपणे मेरीट वर आणि सेंट्रलाईज्ड पद्धतीने झाले पाहिजेत अशी आमची आग्रहाची मागणी आहे. असे वेलणकर यांनी सांगितले. (Pune Municipal Corporation News)
——–
News Title | PMC Medical College News | High level probe into medical college admission scam| Sajag Nagarik Mancha’s demand to the state government

PMC Medical College Dean | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या डीन ला 10 लाखाची लाच घेताना पकडले

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Medical College Dean | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या डीन ला 10 लाखाची लाच घेताना पकडले

PMC Medical College Dean | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Medical College) प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करून त्यातील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला (Dean) रंगेहात पकडण्यात आले. आज सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात (PMC Atal Bihari Vajpeyi Medical College) ही कारवाई करण्यात आली. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) (Dean Ashish Bangirwar) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 49 वर्षीय डॉक्टरने तक्रार दिली आहे. (PMC Medical College Dean)

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांचा मुलगा NEET परिक्षा – 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एम.बी.बी.एस.च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकिय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकिय महाविद्यालय, पुणे येथे इन्स्टिट्यूशनल कोटामधून निवड झाली होती. यासाठी 22 लाख 50 हजार रुपये इतके प्रवेश शुल्क होते. मात्र महाविद्यालयाचे डीन त्यांनी 16 लाख रुपये लाचेच्या स्वरूपात मागितले होते.

दरम्यान लाच देणे मान्य नसल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याची तक्रार केली होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता आशिष बनगिनवार यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनगिनवार यांच्या मागावर होते. दरम्यान आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्या कार्यालयात दहा लाख रुपयांची लाख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी आता समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


News Title | PMC Medical College Dean | Dean of Pune Municipal Corporation’s Medical College was caught accepting a bribe of 10 lakhs

Pune Municipal Secretary Department | पुणे महापालिका नगरसचिव विभागातील उपनगरसचिव सह 8 पदे ‘प्रमोशन’ च्या प्रतिक्षेत! | नगरसचिव पद देखील 3 वर्षांपासून रिक्तच!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Secretary Department | पुणे महापालिका नगरसचिव विभागातील उपनगरसचिव सह 8 पदे ‘प्रमोशन’ च्या प्रतिक्षेत! | नगरसचिव पद देखील 3 वर्षांपासून रिक्तच!

| बढती प्रक्रिया सुरु करण्याची मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेची मागणी

Pune Municipal Secretary Department  | पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिव विभागाकडील  (Pune Municipal Secretary Department) उपनगरसचिव (Deputy Municipal Secretary) या बढतीच्या पदासह इतर 8 पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांची बढती प्रक्रियाच (Promotion) होऊ न शकल्याने ही पदे 3 ते 9 वर्षांपासून रिक्तच आहेत. या पदांना सेवाप्रवेश नियमावली २०१४ मध्ये मान्यता मिळाली असून अद्यापही भरती झालेली नाही. त्यामुळे अन्याय होत असल्याची भावना कर्मचारी व्यक्त करत आहेत. दरम्यान रिक्त पदांची बढती प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून (Pune Mahanagarpalika Magasvargiy Karmchari Sanghatana) महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune Municipal Secretary Department)

 

याबाबत संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे (President Rupesh Sonawane) यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार  राजशिष्टाचार अधिकारी (प्रोटोकॉल ऑफिसर) हे एकाकी पद वगळता कार्यालयात सचिव, अध्यक्ष, स्थायी समिती हुद्याव्यतिरिक्त फक्त सर्व लखेनिकी संवर्गाची पदे कार्यरत आहेत. रिक्त पदांबाबत काहीना तीन- तीन रिक्त पदांचा पदभार आहे. तर काही पदावर मनपा आस्थापनेवरील अन्य खात्यातील सेवक वर्षानुवर्षे काम करीत आहेत. (Pune Municipal Corporation)
उपनगरसचिव हे पद बढतीचे पद आहे. या कार्यायातील ज्येष्ठ सेवकामधून बढती देणे आवश्यक आहे. तरी उपनगरसचिव पदाची खोतनिहाय बढती समिती ( D.P.C.) मध्ये सेवाज्येष्ठ सेवकांची माहिती दिली होती. उपनगरसचिव पदाची खोतनिहाय बढती समिती ( D.P.C.) सन २०२० या वर्षी घेण्यची आली होती. परंतु तांत्रिक अडचण दाखवून या पदावर सेवाज्येष्ठ सेवकाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे बढती साखळीतील सर्वच पदे रिक्त आहेत. (PMC Pune Employees promotion)

सोनवणे यांनी पुढे म्हटले आहे कि महापालिका आयुक्त यांनी सेवाज्येष्ठ सेवकास उपनगरसचिव पदाचा प्रभारी पदभार देण्यास व नियमानुसार बढती प्रक्रिया सुरू करणेस महापालिका आयुक्त यांनी मान्यता दिलेली आहे. परंतु ४ महिने झाले तरी अद्यापही पदभार किंवा बढती प्रक्रिया सुरू न केल्याने सेवाज्येष्ठ सेवकांवर अन्याय होत आहे. तसेच खात्याचीही प्रशासकीय अडचण होत आहे. त्यामुळे  उपनगरसचिव पदाची बढती प्रक्रिया सुरू केल्यास साखळीतील सर्व रिक्त पद भरणे सोयीचे होईल व सर्व सेवाज्येष्ठ सेवकांना योग्य तो न्याय मिळेल. अशी मागणी सोनवणे यांनी पत्राद्वारे केली आहे. (PMC Pune News)

अशी आहेत रिक्त पदे

हुद्दा                              रिक्त कालावधी 
नगरसचिव.      -.           3 वर्ष
उपनगरसचिव.    -.          3 वर्ष
महापौर यांचे सचिव. -.      6 वर्ष
उपमहापौर यांचे सचिव -.    5 वर्ष
समारंभ प्रमुख.             -.     9 वर्ष
अति. कार्यालय अधिक्षक. -.  1 महिना
सभागृह नेते – सचिव.         –    6 वर्ष
विरोधी पक्षनेते – सचिव.      -.   6 वर्ष
ज्येष्ठ समिती लेखनिक – २ पदे – 3 वर्ष
—-
News Title | Pune Municipal Secretary Department | 8 posts with Sub-Secretary in Pune Municipal Municipal Corporation are waiting for ‘promotion’! | The post of Municipal Secretary has also been vacant for 3 years!

Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

Categories
Breaking News PMC social पुणे

Katraj- Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला येणार वेग | काही जागामालक जागा ताब्यात देण्यास तयार

Katraj-Kondhwa Road | कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाला (Katraj-Kondhwa Road Land Acquisition) वेग येण्याची चिन्हे आहेत. रस्त्याच्या कामात बाधित होणारे काही नागरिक आता महापालिकेच्या ताब्यात जागा देण्यास तयार झाले आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी नुकतीच या रस्त्याची पाहणी केली. त्यावेळी नागरिकांनी तयारी दाखवली आहे. त्यानुसार आयुक्तांनी  देखील जागा ताब्यात घेऊन कामास सुरुवात करण्याचे आदेश दिले आहेत. (Katraj-  Kondhwa Road)
कात्रज-कोंढवा रस्त्याची पाहणी महापालिका आयुक्त विक्रम कुमार  यांनी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , नगरअभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, मालमत्ता विभागाचे प्रमुख  महेश पाटील, माजी आमदार योगेश टिळेकर,  माजी नगरसेवक प्रकाश कदम , संगिता ठोसर, आदी उपस्थित होते. (Pune Municipal Corporation News)
पुणे शहराच्या मंजूर विकास योजना आराखड्यामध्ये ८४ मी. रूंदीचा विकास योजना रस्ता ( कात्रज कोंढवा) दर्शविलेला आहे. सदर ८४ मी. रूंदी पैकी सरासरी २० मी. रूंदीचा रस्ता अस्तित्वात आहे. उर्वरीत रूंदीसाठी भूसंपादन करणे आवश्यक आहे. सदर रस्त्यावरून मुंबई सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्डकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. सदरचा रस्ता विकसीत केल्यानंतर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होईल. (Pune Municipal Corporation)
 रस्त्याच्या विकसनासाठी सन २०१८ मध्ये निविदा मागविण्यात आलेल्या असून ३१.१०.२०१८ रोजी सदर कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. या कामासाठी रक्कम रूपये १९२ कोटी (जीएसटी वगळून) खर्च येणार आहे. टी.डी. आर. पोटी ताब्यात आलेल्या जागेवर रस्ता विकसनाचे काम झालेले आहे. तुकड्या तुकड्यामध्ये सुमारे ३० % रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादना अभावी रस्त्याचे काम खोळंबलेले आहे. टी. डी. आर. चे दर कमी झाल्यामुळे रस्तारूंदीतील जागेसाठी रस्तारूंदीतील जागा मालकांकडून जागेच्या बदली रोख रकमेची मागणी करण्यात येत आहे. (PMC Pune News)
८४ मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी अंदाजे रक्कम रूपये ५५६ कोटी खर्च अपेक्षित आहे. भू संपादन व रस्ता विकसनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणे महापालिकेस अडचणीचे झालेले आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत ५० मी. रूंदीचा रस्ता करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ५० मी. रूंदीच्या रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २८० कोटी खर्च अपेक्षित आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेकडून 6 जुलै ला  विनंतीपत्र देण्यात आलेले होते. (Pune News)
पुणे महानगरपालिका हद्दीतील चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता महाराष्ट्र शासनाकडून १८५.४३ कोटी चा निधी मंजूर झालेला आहे व त्यानुसार काम सुरू आहे. प्रस्तुत कात्रज कोंढवा रस्ता मुंबई – सातारा या भागातून सोलापूरकडे व मार्केटयार्ड कडे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतुक आहे. यामुळे या भागातील वाहतुकीवर प्रचंड ताण येत आहे. चांदणी चौक उड्डाणपूल भू संपादन प्रकल्प याकरिता अनुदान प्राप्त झाले त्याच धर्तीवर कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन करणे व रस्त्याचे काम प्राधान्याने करणेकरिता निधी मिळणेस विनंती आहे. या रस्त्याचे भूसंपादनाबाबत उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सोबत दिनांक १७/१०/२०२२ रोजी बैठकही झालेली आहे. तरी रस्त्याच्या भूसंपादनासाठी रक्कम रूपये २०० कोटी निधी / अनुदान शासनाकडून सत्वर देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पुरवणी मागणीत सरकारने 200 कोटी मंजूर केले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाला वेग येईल. असे म्हटले जात आहे.
—-
News Title | Katraj- Kondhwa Road | Speed ​​of land acquisition of Katraj-Kondhwa road Some landlords are willing to hand over the premises

PMC Health Department | MNS Pune | महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेतली नसल्याने साथीच्या आजारात वाढ | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप

Categories
Breaking News PMC Political social आरोग्य पुणे

PMC Health Department | MNS Pune | महापालिका आरोग्य विभागाने काळजी घेतली नसल्याने साथीच्या आजारात वाढ

| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप

 PMC Health Department | MNS Pune |  पुणे शहरात साथीच्या आजारांचा (Epidemics) वाढता प्रभाव झपाट्याने वाढत असल्याने पुणे शहरातील अनेक नागरिक आजारी असल्याची भयानक परिथिती निर्माण झाली आहे. पावसाळी आजाराचा (Monsoon Diseases) प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगर पालिकेकडून (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात येतात.  परंतु यावर्षी पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून (PMC Health Department) कोणतीही काळजी घेतली नसल्याने साथीचे आजार वाढत आहेत.  प्रशासनाचे प्रयत्न तोकडे ठरत आहेत. असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS Pune) करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात उपाययोजना नाही केल्या तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे. (PMC Health Department | MNS Pune)
मनसेच्या निवेदनानुसार पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना विशेष मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी, पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काळात डासाची पैदास होऊ नये यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. पालिकेचे अधिकारी उंटावरुन शेळ्या हाकत आहे. शहरात ठिकठिकाणी वाढलेले गवत दिसत आहे. गवतामुळे डासाची उत्पती वाढली आहे. वाढलेल्या डासांमुळे शहरात मलेरीया,डेंगू,चिकन गुणीया, थंडी, ताप आदि आजाराशी पुणे शहरवासीयांना  करावा लागत आहे. पुणे शहरातील रुग्णालयात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे. डेंग्यू , मलेरीया पाण्याद्वारे पसरणारे रोग तीव्र अतिसार व तत्सम आजार कॉलरा काविळ डोळ्यांचे आजार डोळे येणे, अनेक जंतूंचा प्रार्दूभाव होत असल्याने अनेकांना संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये सध्या डोळे येण्याची साथ सुरु झाल्याचे आढळून येत आहे. पुणे शहरातील सर्व रुग्णालयात डोळे तपासणी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली असून, डोळे येण्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आहे. अनेक विद्यार्थी, पुणेकर नागरिक डोळे येण्याच्या आजाराने ग्रासले आहे. (Pune Municipal Corporation News)
पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी डॉक्टर आरोग्य सेवेतील कर्मचारी याची सर्वच स्थरावर उदासीनता दिसून येत आहे. प्रसूती  होणाऱ्या रुग्णालयात पुरेशे बेड उपलब्ध नाहीत याचा त्रास अनेक महिला व त्याच्या  कुटूंबियांना दररोज होत असल्याच्या अनेक तक्रारी महाराष्ट नवनिर्माण सेनेकडे आलेल्या आहेत. पुणे महानगर पालिकेच्या अनेक रुग्णालयामध्ये सेवाभावी संस्थांकडून डायलेसीस मशीन एक्सरे मशीन इतर आरोग्य तपासण्या करणासाठी लागणाऱ्या मशीन देण्यात आलेल्या होत्या. परंतु तपासण्या करणाऱ्या अनेक मशीन बंद असल्याने तपासण्या होत नसल्याने योग्य उपचार मिळत नाहीत.   त्यामुळे गोर गरीब जनतेचे दररोज हाल होत आहेत पुणे महानगर पालिकेकडून शहरी गरीब आरोग्य योजना राबवली जाते त्या योजनेचापण बोजवारा उडालेला आहे. उपचार घेणाऱ्या रुग्नाच्या नावे शहरी गरीब योजनेचे रुग्णालयास पत्र दिले तरी समंधीत रुग्णालये बिल भरण्याची मागणी करून नाहक रुग्नाना मानसीक त्रास देत आहेत. (MNS Agitation)
मनसे ने इशारा दिला आहे कि  पुणे शहरातील साथीचे आजारांचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महानगर पालिकेने साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्यात याव्यात डेंग्‍यू, मलेरीया चिकन गुणीया, थंडी, ताप, डोळ्यांचे आजार, डोळे येणे   या साथीचा आजार वाढत आहे. असे असताना महापालिका प्रशासन सुस्‍त असून साथीच्‍या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्‍याही हालचाली केल्‍या जात नाही.  त्यासाठी पुणे शहरातील सर्व रुग्णालयातील रुग्नांची माहिती घेऊन सांख्यिकीय सूत्रांचा उपयोग करणे गरजेचे आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णावर त्वरित उपचार करून साथीचे आजार आटोक्यात आणता येतील अन्यथा पुणेकरांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. (PMC Pune News)
——
News Title |Increase in epidemics due to lack of care by the Municipal Health Department Allegation of Maharashtra Navnirman Sena

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Pune Water Cut on Thursday | येत्या गुरूवारी  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. (MSEDCL) यांचे २२०/२२ KV पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी MLR पंपींग व वडगाव जलकेंद्र येथील वीजपुरवठा बंद राहणार असल्या कारणाने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद (Water Closure) राहणार आहे. तसेच कोथरूड व शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. शुक्रवार दिनांक ११/०८/२०२३ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या (PMC water Supply Department) वतीने करण्यात आले आहे. (Pune Water Cut on Thursday)

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती MLR टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती HLR टाकी परिसर :- सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग – १ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती LLR परिसर :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.
एस.एन.डी.टी. एम.एल. आर. टाकी परिसर :- एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर,वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड, गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.
चतुःश्रृंगी टाकी परीसर :- औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री
सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.
लष्कर जलकेंद्र भाग :- लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी,
नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
—-
News Title | Pune Water Cut on Thursday | Water supply to entire Pune city will be shut next Thursday

Pune Municipal Corporation | क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकतींची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही!

Categories
Breaking News PMC पुणे

Pune Municipal Corporation | क्षेत्रीय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकतींची माहितीच महापालिकेकडे उपलब्ध नाही!

| मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागाने  मागवली सर्व खात्याकडून माहिती

 

Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिका (PMC Pune) मालमत्ता व्यवस्थापन विभागामार्फत (PMC Property Management Department) अॅमिनिटी स्पेस, विकसकामार्फत मिळालेल्या सदनिका इ. ताब्यात घेण्यात येतात. तसेच भूमी संपादन विभागामार्फत जागा महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात येतात. मात्र महापालिकेच्या मिळकतीची (PMC Own Properties) संकलित माहितीच मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे नाही. खास करून क्षेत्रीय कार्यालयाकडून (PMC Ward Offices) ज्या मिळकती बांधल्या गेल्या आहेत. त्याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे उपायुक्त महेश पाटील (Deputy Commissioner Mahesh Patil) यांनी सर्व विभागाकडून महापालिकेच्या मिळकतीची माहिती मागवली आहे. (Pune Municipal Corporation)
महापालिकेच्या मालकीच्या मिळकतींची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन कार्यालयामार्फत संकलित करण्यात येते. त्यानंतर अशा मिळकतींचे रस्तारुंदीतील बाधित नागरिकांचे पुनर्वसन व मिळकत वाटप नियमावली २००८ नुसार भाडे तत्वावर मिळकत वाटप नियमावली २००८ चे तरतुदीनुसार वाटप केले जाते. संपादित केलेल्या जागा व अॅमिनेटीज स्पेस आणि विकसकाकडून मिळालेल्या सदनिका अशा मिळकतींवर पुणे महानगरपालिकेची मालकी असते. अशा मिळकतींचे रस्ता बाधित नागरिकांचे पुनर्वसन व मिळकत वाटप नियमावली २००८ नुसार भाडे तत्वावर वाटप केले जाते. तसेच काही मिळकती झोनिपु, चाळ विभाग, भवन रचना, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन व सर्व क्षेत्रिय कार्यालय यांना त्यांचे मागणीनुसार व कामकाजाच्या सोयीनुसार हस्तांतरित केलेल्या आहेत. क्षेत्रिय कार्यालये यांनी परस्पर बांधलेल्या मिळकतींची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडे संकलित नाही. (PMC Pune News)
अशा प्रकारे हस्तांतरण केलेल्या पुणे महानगरपालिकेच्या मिळकतींची माहिती तसेच क्षेत्रिय कार्यालयांनी बांधलेल्या मिळकती व त्यांचा विनियोग याचीही माहिती संकलित असणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांचे विनियोगाचा आढावा घेणे शक्य होणार आहे. याकामी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून आपले विभागाकडे हस्तांतरित केलेल्या सदनिका, गाळे, मोकळ्या जागा इत्यादीची अद्ययावत माहिती व क्षेत्रिय कार्यालयांनी बांधलेली मिळकतींची माहिती त्वरित पाठविण्यात यावी. असे आदेश उपायुक्त महेश पाटील यांनी सर्व विभागांना दिले आहेत. (Pune Municipal Corporation News)
——–
News Title | Pune Municipal Corporation | The municipal corporation does not have the information of the income generated by the regional offices!

Pune Potholes | 24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप | खड्डे बुजणार कधी आणि कसे हे स्पष्ट करावे | संदीप खर्डेकर यांची मागणी

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Potholes | 24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप |  खड्डे बुजणार कधी आणि कसे हे स्पष्ट करावे | संदीप खर्डेकर यांची मागणी

Pune Potholes | 24×7, पुणे मेट्रो यासह विविध विकासकामांसाठी केलेल्या खोदाई नंतर पुण्यातील अनेक रस्त्यांची शब्दश: चाळण झाली असून ह्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांची हाडं आणि वाहने सुद्धा खिळाखिळी झाली आहेत. विशेष म्हणजे सर्व स्तरावर तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे च आहे.  24×7 पाणीपुरवठा योजनेची खोदाई म्हणजे पुणेकरांसाठी विकतचा मनस्ताप असा आरोप करत खड्डे बुजणार कधी आणि कसे हे स्पष्ट करावे, अशी मागणी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर (BJP Spokesperson Sandeep Khardekar) यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांच्याकडे केली आहे. (Pune Potholes)
खर्डेकर यांनी अतिरिक्त आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार त्वरित खड्डे बुजविण्याचे आदेश देतानाच खड्डे ना बुजविल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचा ही इशारा आपण दिला आहे. वानगी दाखल फक्त कर्वेनगर व एरंडवण्यातील काही उदाहरण देत आहे. अलंकार पोलीस स्टेशन जवळील शैलेश पूल, पुढे समर्थ पथावरील शक्ती 98 चौक, गिरीजाशंकर विहार कडे जाणारा रस्ता, k52 समोरील तसेच सहवास सोसायटी कडे जाणारा रस्ता, नळस्टॉप चौकातील गल्लीत टेलिफोन एक्सचेंज मागील रस्ता अश्या अनेक ठिकाणी रस्ते खचले असून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. यावरून दुचाकी घसरून पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. तर अनेकांना पावसाचे पाणी साचल्यावर खड्ड्याचा अंदाज ना आल्याने गाडी उडून कंबर, मान आणि मणकेला मार बसला आहे. 24×7 पाणीपुरवठा योजना शहरासाठी महत्वाची असली तरी सदर काम करणाऱ्या कंपनी कडून रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत ही वस्तुस्थिती आपण लक्षात घ्यावी. यामुळे 24×7 म्हणजे पुणेकरांसाठी विकतचे दुखणे झाले आहे.मनपा च्या पावसाळी लाईन, ड्रेनेज लाईन, महावितरण च्या विद्युत लाईन, खासगी कंपन्याची केबल साठीची खोदाई ह्या सगळ्या कामानंतर रस्ते व्यवस्थित पूर्ववत केले जात नाहीत आणि त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसत आहे. खड्डे बुजविताना डांबर योग्य तपमानाचे नसल्याने लगेचच खडी रस्त्यावर पसरते आणि खड्डा परवडला पण अशास्त्रीय पद्धतीने बुजविणे नको असे सर्वांचेच मत झाले आहे.तरी आपण युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून पुणेकरांना दिलासा द्यावा. अजून पुण्यात मोठा पाऊस झालेला नाही. त्यानंतर काय स्थिती होईल याची कल्पनाच करवत नाही. आपण योग्य कार्यवाही कराल अशी अपेक्षा आहे. असे खर्डेकर यांनी म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—-
News Title | Pune Potholes | Excavation of 24×7 water supply scheme means pain for Pune residents Explain when and how the potholes will be filled Demand of Sandeep Khardekar

Swarajya Party | Pune Potholes | सोमवार पर्यंत खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करू | स्वराज्य पक्षाचा पुणे महापालिका आयुक्तांना इशारा

Categories
Breaking News PMC Political पुणे

Swarajya Party | Pune Potholes | सोमवार पर्यंत खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन करू | स्वराज्य पक्षाचा पुणे महापालिका आयुक्तांना इशारा

Swarajya Party | Pune Potholes | पुणे शहर आणि उपनगर परिसरात खड्यांचे साम्राज्य (Pune Potholes) वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाकडून याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांना (PMC Commissioner) खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे. सोमवार पर्यंत खड्डे नाही बुजले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ धनंजय जाधव (General Secretary Dr Dhananjay Jadhav) यांनी दिला आहे. (Swarajya Party | Pune Potholes)

डॉ जाधव यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार महापालिकेने दावा केल्याप्रमाणे खड्डेमुक्त पुणे कुठेही नसून अजूनही मोठ-मोठे खड्डे पुणे शहर आणि उपनगरात दिसत आहे. नुकतेच आम्ही पुणे शहर व उपनगरात RTO चौक ते जुना बाजार रस्ता, अलका चौक, जकात नाका ते साठे वस्ती रोड (धानोरी), पोरवाल रोड या सर्व ठिकाणी खड्डे बुजवा, जीव वाचवा’ आंदोलन केले असून आपणास ते निदर्शनास आणून देत आहोत. तरी लवकरात लवकर त्यावर कार्यवाही करावी. अन्यथा येत्या सोमवारी स्वराज्यच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असा इशारा डॉ जाधव यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation)
—–
News Title | Swarajya Party | Pune Potholes | Fill the potholes till Monday otherwise we will protest strongly Swarajya Party’s warning to Pune Municipal Commissioner

Pune Metro Line 4 | मेट्रो लाईन – ४ प्रकल्पाच्या मार्गिकेवर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांची माहिती द्या | पीएमआरडीए कडून महापालिकेकडे केली मागणी

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Metro Line 4  | मेट्रो लाईन – ४ प्रकल्पाच्या मार्गिकेवर वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पांची माहिती द्या

| पीएमआरडीए कडून महापालिकेकडे केली मागणी

Pune Metro Line 4  | पुणे शहरात महामेट्रो (Mahametro) आणि पीएमआरडीए (PMRDA) कडून पुणे मेट्रो (Pune Metro) च्या वेगवेगळ्या टप्प्याची कामे करण्यात येत आहेत. आगामी काळात मेट्रो लाईन 4 ची (Pune Metro Line 4) कामे केली जाणार आहेत. वेगवेगळ्या रस्त्यावर मेट्रो असणार आहे. या रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Traffic) सोडवण्यासाठी रस्त्यावर पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) काही प्रकल्प येणार आहेत का याची माहिती पीएमआरडीए कडून पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाकडे (PMC Project Department) मागण्यात आली आहे.  (Pune Metro Line 4)

पुणे शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्राधिकरणामार्फत प्रगतीत असलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन- ३ (Hinewadi-Shivajinagar Metro) प्रकल्पास पूरक ठरणान्या शिवाजीनगर हडपसर ते लोणी काळभोर या मार्गावर मेट्रो मार्गिका प्रस्तावित असून सदर मार्गिकेचा प्रारूप सविस्तर प्रकल्प अहवाल पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) यांच्या मान्यतेनंतर प्राधिकरणाच्या सहकार्याने महामेट्रो या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेला आहे. या मेट्रो मार्गीकेची अंमलबजावणी प्राधिकरण अथवा महामेट्रो या दोनपैकी एका संस्थेकडून राज्य शासनाची मान्यता प्राप्त झालेनंतर होणे प्रस्तावित आहे. (PMRDA News)

विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली  १४ जुलै रोजी संपन्न झालेल्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (PUMTA) बैठकीमध्ये मेट्रो मार्गिकांवर विविध संस्थांमार्फत प्रस्तावित असलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व महामेट्रो संस्थेस उपलब्ध करून देणेत यावी. असे पीएमआरडीए ने महापालिकेला आदेश दिले आहेत. तसेच, सदर प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा खर्च संबंधित संस्थांनी करावा असे निर्देश  विभागीय आयुक्त, पुणे विभाग यांनी दिले आहेत. (Maha Metro)

प्राधिकरण व महामेट्रो संस्थेमार्फत पुणे शहर व परिसरामध्ये खालील मेट्रो मार्गिका प्रस्तावित आहेत.

1. शिवाजीनगर ते लोणी काळभोर (शिवाजीनगर – पुलगेट – हडपसर – लोणी काळभोर)
2. हडपसर (गाडीतळ) ते सासवड रोड (मंतरवाडी फाटा)
3. खडकवासला ते खराडी ( खडकवासला – सिंहगड रोड- स्वारगेट – पुलगेट – मगरपट्टा – खराडी)
4. SNDT ते सिंहगड रोड (वारजे मार्गे)

या  मेट्रो मार्गिकांवर पुणे महानगरपालिके मार्फत पुणे शहर व परिसरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी काही उपाययोजना / प्रकल्प प्रस्तावित असल्यास सदर प्रकल्पांची सविस्तर माहिती प्राधिकरण व महामेट्रो संस्थेस उपलब्ध करून द्यावी जेणेकरून सदर उपाययोजना / प्रकल्पांचा अंतर्भाव प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांच्या सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये करणे शक्य होईल. असेही पीएमआरडीए कडून म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
—–
News Title |Pune Metro Line 4 | Give information about the proposed projects to solve traffic problems on Metro Line – 4 project route| Demand made by PMRDA to Municipal Corporation